या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ३१. भापत्तीचे हाच हरण करतो व तटस्थ ईश्वराची उपासना करणारांस त्याचे इष्ट हाच देतो. जगस्थितीमध्ये हा आत्माच जीव होऊन संचार करतो, भोगविलास करतो व वस्त्र, अलकार, समाज, उत्सव इत्यादि वस्तूंमध्ये शोभतो. मियातील तिखटाप्रमाणे सर्व देहामध्ये हा आहे. तो आतल्या आत आपल्या शात स्वरूपाचा अनुभव घेत असतो. शाईतील काळेपणाप्रमाणे अथवा बर्फीतील शैत्याप्रमाणे देहात हा देहपति असतो. आकाश, वायु, तेज, जल पृथ्वी, अग्नि, चद्र व जगद्गण या वस्तूंमध्ये क्रमाने असणारे- शून्यत्व, स्पद, प्रकाश, रस, काठिन्य, उष्णता, शैन्य व सत्ता-हे धर्म याचेच आहेत. अथवा हाच त्याच्या रूपाने व्यक्त होता. सत्ता, काल व राजाची प्रभुशक्ति जशी सर्वगत असते त्याप्रमाणे इंद्रिये व मन याच्या व्यापारासह बाह्याभ्यतर प्रकाशन हे आत्म्याचे सार्वत्रिक कृत्य आहे. त्याचा प्रकाश हाच एक स्वभाव आहे, हाच देवास बोध करणारा महादेव आहे. मी तो आहे, याहून अन्य कल्पनाच नाही. धुळीचा आकाशास व जलाचा कमलपत्रास जसा स्पर्श होत नाही त्याप्रमाणे मला अनात्मपदार्थाचा स्पर्श होत नाही. वाळलेल्या भोपळ्यावर कितीही जरी पाणी ओतलें तरी त्यामुळे आतील आकाशाची जशी काही हानि नाही त्याप्रमाणे सुख- दुःखप्रसग माझ्या देहावर पाहिजे तितके येऊन पडले तरी माझी काही हानि नाही. तेल, वात व दिव्याचे टवळे यास सोडून गेलेला दिव्याचा प्रकाश जसा दोरीने बाधता येत नाही त्याप्रमाणे सर्व भावाहून निराळा असलेला मी कोणालाही बाधता येण्यासारखा नाही. सत्व असत्, काम आणि इंद्रिये याच्याशी माझा कोणता सबध असणार ? आकाशाशी कधी कोणाचा सबंध होत नाही. निराकार मनाला तरी कोण कशी पीडा देणार ? शरीराचे शतशः जरी तुकडे झाले तरी त्यामुळे शरीरी आत्म्याला काय होणार ? मातीची घागर तुटली, फुटली, किंवा नाहीशी झाली तरी त्याचे त्यातील आकाशाला काय आहे ? मन हे एक व्यर्थ उठलेले पिशाच भआहे. तेव्हा बोधामुळे त्याचा जर नाश झाला तर त्यात आमची कोणती हानि आहे ! माझे मन मागे सुख-दुःखवासनामय होते, पण आता तसे राहिलेले नाही. आता केवल अमर्याद शाति पसरली आहे. सर्व करणारा एक भात्माच असताना मूर्ख प्राणी दुसराच खातो, दुसराच कोणी घेतो,तिसरा अन- र्थात पडतो व चवथाच कोणी पहातो, असें ह्मणतो. हे चातुर्य कोणत्या गार-