या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १८. परानंद समाधीस प्राप्त झाला. स्वपदी भारूढ झाल्यामुळे तो चित्रा. प्रमाणे भचल राहिला. त्याच भानंददायी अवस्थेत त्याचा पुष्कळ काल लोटला. त्याच्या मंत्र्यादि अधिकाऱ्यांनी त्याला जागे कर- ण्याचा प्रयत्न केला. पण तो देहभानावर आला नाही. हजारो वर्षे तो एकचित्त होऊन राहिला. त्याने त्या अवस्थेत पूर्ण शातीचा अनुभव घेतला. पण प्रल्हाद असा निजानदांत निमग्न झाला असता रसातलमंडल राजरहित झालें. हिरण्यकशिपु मेला व त्याचा पुत्र समाधि लावून बसला असता तेथे योग्य राजा कोणी राहिला नाही. दानवाचा त्याला देहभानावर आणण्याचा प्रयत्नही व्यर्थ गेला (हें वर सागितलेच आहे). त्यामुळे ते सर्व उद्विग्न होऊन मन मानेल तिकडे निघून गेले. तेव्हा त्या दानव- नगरात कोणी त्राता राहिला नाही. दुजेनांना सुजनाचा व सबळांना निर्बळाचा छल करण्यास अनुकूल अवसर मिळाला दिवसा-ढवळ्या चोऱ्या होऊ लागल्या स्त्रियाची लज्जा राहिली नाही. दुष्टजन अगावरील वस्त्रेही मोदन नेऊ लागले. जो तो स्वार्थपरायण झाला. अबला धीट झाल्या. प्रत्येकाला जीविताचा संशय वाटू लागला. केव्हा कोणता प्रसग येईल याचा काही नेम राहिला नाही जगभर हाय हाय व उद्वेग मुरू झाल', लुटालूट व हाणमार याच प्राचुये झाले. देवाची पोरही येऊन तेथील आबालवृद्धास त्रास देऊ लागली. प्रल्हादाचें तें नगर रक्षकान्या अभावी राजदडाची भीतिच नाहीशी झाल्यामुळे, दुःखमय व अनीतिप्रधान झाले. तात्पर्य, कलियुगातील दुःखी प्रजेप्रमाणे प्रन्हादाच्या राजधानीतील दानवप्रजा मोठ्या अनर्थात पडली आणि स्त्री व धन याचेही सरक्षण होईनासे झाले ३७. सर्ग ३८-जगाची व्यवस्था व दैत्यकुलाचे रक्षण याविषयीं हरीची चिंता. श्रीवसिष्ठ-राघवा, पाताळात असा भयंकर प्रकार घडला असतां सर्व जगाच्या नियतीचे रक्षण करणे, हीच ज्याची क्रीडा आहे, असा क्षीर- सागरांतील शेष-शय्येवर निजलेला हरि चातुर्मास संपतांच कार्तिकांत देवाचे प्रयोजन साधून देण्याकरितां जागा झाला व त्या वेळची जग- स्थिति त्याने सहज पाहिली. स्वर्ग व भूलोक यांना आपल्या मनाने पाहन सो पाताळांत मनानेच भाला. तेथे प्रहाद स्थिर समाधि लावून बसग माहे व इंद्राच्या नगरांत संपत्ति अतिशय वाढली आहे, भसें पाहून शेष-