या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६२ बृहद्योगवासिष्ठसार. काय? आता आणखी तुला काय पाहिजे! तूं ही तपस्या को करतोस!" भगवानाचे हे मधुर भाषण ऐकून गाधीने आपले विशाल नेत्र उघडले व समोरील विष्णु मूर्तीस पाहतांच त्याचा कंठ दाटून आला. त्याने भगवाना- च्या मृदुचरणांस वंदन केलें. अादि उपचारांनी त्याची पूजा केली व मटले "देवा, तूं मला आपली तमोमय माया दाखविलीस खरी; पण तिचे तत्त्व मला कळले नाही. ते तू सांग. जलामध्ये अघमर्षण करीत असतांना मी में स्वप्न पाहिले तेच खरें कसें झालें ! एका घटित पाहिलेला भ्रम चांडाळादिकांन्या प्रामांत अनेक वर्षे कसा टिकला ! श्वपचाचा जन्म व नाश वस्तुतः माझ्या मनातच असताना ते बाहेर सत्य कसे ठरले ?" ___ त्यावर भगवान् म्हणतो-गाधे, हा सर्व वासनायुक्त मनाचा विलास आहे. जे काही आहेसे वाटत असते ते सर्व आपल्या चित्तातच वाटते. पर्वत, नद्या, समुद्र, वृक्ष इत्यादि सर्व चित्तात आहे. बाहेर काही नाही. चित्तवृत्तीच्या द्वारा अनुभवास येणारा प्रत्येक पदार्थ भ्रमरूप आहे. वृक्षातील पणे, पुष्पे व फळे याप्रमाणे वासनामय चित्तात लक्षावधि आकार असतात. पण भूमीतून ज्याला वर उपटून काढले आहे अशा वृक्षाला जशी पाने वगैरे पुनः येत नाहीत त्याप्रमाणे वासनाशून्य चित्तांत पुनः जन्मादि-अंकुर उगवत नाहीत. तेव्हा ज्याच्यामध्ये अनंत जगजाल आहे अशा तेजानें चांडालत्व प्रकट केल्यास त्यांत आश्चर्य कोणते ! अतिथीचे भागमन, त्याने सांगितलेला वृत्तांत, तुझे भूतमंडळास येणे, तेथें श्वपचालय साक्षात् पहाणे, कीर देशास जाणे, तेथल्या लोकांस विचारणे इत्यादि सर्व मनोभ्रम आहे. बा साधो, त्यांतील एकही प्रकार खरा नाही. वासनायुक्त चित्त असे असख्य चमत्कार प्रत्यही करीत असते. त्याचा निर्णय होणे शक्य नाही. यास्तव गाधे, मशक्य गोष्टींच्या मागे न लागतां शांत चित्ताने भापल्या नियत कर्माचे अनुष्ठान कर. स्वकर्मावाचून मानवांचे कल्याण होत नाही. राघवा, असे सागून पूज्य भगवान् स्वस्थानी गेला ४८. सर्ग ४९-गाधीला पुष्फळ विचार - प्रपल यावर सर्व माया मारे, बसें