या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५१. .६९ दुष्ट कावळ्याला शरीररूपी घरव्यातून दूर हाकून लाव. तृष्णारूपी पिशाची ज्याची परिचर्या करीत आहे, अज्ञान महावृक्षाखाली जे विश्राति घेत असते, व जें ससाररूपी महा भरण्यातील असख्य देहांत फिरत असते त्या चित्त पिशाचास विवेक, वैराग्य, गुरूपदेश व आपला प्रयत्न या स्वतंत्र मंत्रानी आपल्या चिदात्मगृहातन हुमकून लावावें. रामा, हृदय- रूपी मोठ्या ढोलीत रहाणान्या मनोरूपी महा सपाला अमोघ चिद्गरुड- मंत्राने मारून टाकून व सर्व भय सोडून तू अभयरूप हो. भोगरूपी माम मिळेनासे झाले म्हणजे चितगध्र देहवक्षावरून उडून जातो. रामा अत:- करणांत नाचणान्या या मनो-महा-मर्कटाला स्वसिद्धीकरिता मारून टाक. सकल्प सोडणे याच उपमंत्राच्या प्रभावाने हृदयाकाशातील चित्तमेघास उडवून टाक व मोठ्या उत्साहाने उत्कृष्ट फल सपादन कर. चित्तपाश तोडून सुखाने निःशकपणे विहार कर. एका घोर अवाने दुसन्या घोर अस्त्राचे जसे शमन करतात त्याप्रमाणे शुद्ध चित्तार्ने मलिन चित्ताचे निय- मन कर. चाचल्य सोड. साराश रघुकुलतिलका, देहापर्यंत सर्व बाह्य पदर्थाना तृणाप्रमाणे तुन्छ समजून व चित्ताला स्वाधीन ठेवून अगोदर संसारातून पार हो व नंतर हेयबुद्धीने खा, पी, विहार कर व रममाण हो ६०. सर्ग ५१-शांत-पदी विश्राति घेण्याकरिता चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न कर- णा-या उद्दालकाच्या विक्षेपाचे वर्णन. श्रीवसिष्ठ-लाब, अगदी पातळ, तीक्ष्ण, व पाढरी शुभ्र अशा वस्तन्याच्या धारेसारख्या चित्तवृत्तींमध्ये तू निमग्न होऊन राहू नकोस. फार दिवसांनी या क्षेत्रात उत्पन्न झालेल्या बुद्धिलतेस विवेकजलसेकानें वाढवावें. कालसूर्याच्या तापाने शरीररूपी लता कोमेजून भूमीवर पडली नाही तोच तिला उचलून धर. मेघरवाने मयूर जसा आनदित होतो त्याप्रमाणे मी आतां सागणार आहे त्या आख्यायिकेचा अर्थ चागला ध्यानात धरून त्याचेच पुनः पुनः मनन केलेंस की तुंही आनंदित होशील. उद्दालकाप्रमाणे तूही पुनः पुनः अति धैर्ययुक्त बुद्धीने भूतपंचका- विषयी विचार कर. उद्दालकाने कसा विचार केला म्हणून म्हणशील तर सांगतो. ___ या जगत्संज्ञक जीर्ण घराच्या विस्तृत वायव्य कोपन्यांत गंधमादन नामक एक स्थळ भाहे. ते पुष्पित वृक्षांनी व्याप्त, विचित्र वर्णाच्या ४९