या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५२. ७७१ या चिंतेत निमग्न झालेला उद्दालक ब्राह्मण त्या पनात पुनः पुनः बसून अभ्यास करूं लागला. पण माकडासारख्या चंचल चित्तास विषय बाहेर मोदून नेऊ लागले असता त्याला भानंददायी समाधान लाधले नाही. मोठ्या प्रयत्नाने त्याने चित्ताला अंतर्मुख केल्यास तें रजोगुणाच्या योगाने आंतल्या आंत क्षुब्ध होत असे. एकादे वेळी आंतर समाधिसुखस्पर्शास भिऊन मनःसंज्ञक वानर बाह्य विषयाकडे उडी मारून जात असे. एकादे वेळी आत सूर्यासारखें दीप्त तेज पाहूनच तें झटकन विषयोन्मुख होई. कधी कधों तर अगदी शात होऊन तें अकस्मात् भ्यालेल्या पक्ष्याप्रमाणे भुरकन उडून बाहेर आसक्त होत असे. एकादे वेळी तो चित्तैकाग्र्याचा अभ्यास करू लागला म्हणजे तें दुष्टचित्त कोठल्या कोठल्या फार जुन्या गोष्टींचें स्मरण करी, अथवा पुढच्याविषयीं नानाप्रकारचे संकल्प करीत सुटे. तात्पर्य याप्रमाणे तो महात्मा चित्तवत्तीमुळे अतिशय व्याकुळ झाला. काय करावें, हे त्याला समजेना. तो एकटाच भ्रात चित्ताने त्या पर्वतावर इतस्ततः प्रत्यहीं भटकत असे. एकदा त्याला एक भृतास दुष्प्राप असलेली सुंदर गुहा सापडली. तिच्यामध्ये कोणत्याही प्राण्याचा संचार होत नसे. त्यात वायूची बाधा व पशुपक्ष्यांचा उपद्रव मुळीच होण्यासारखा नव्हता. देव व गंधर्व यानाही ती आजवर दिसली नसावी. परमाकाशाप्रमाणेच ती शात होती. तिच्या तोंडाशी पुष्पाचा थर पडत असे व सभोवार कोवळे गवत उगवले होते. त्यामुळे रत्नमाडित मठीप्रमाणे ती रम्य दिसत होती. तिच्या आसपास शीतल छाया पसरली होती व आतील भाग रत्नदीपानी प्रकाशित होत होता, वनदेवींच्या अतःपुरकुटीप्रमा- णेच ती गुहा अगदी सुरक्षित होती. तिचे तोंड पूर्वेकडे होते. त्यामळे प्रातःकाळी सूर्योदय झाला की त्याची फार उष्णही नाही व शीतही नाही अशी पिवळी प्रभा तिच्या द्वारात पडत असे. साराश हे रामचद्रा. उपशमपदवीस योग्य असलेली ती रम्य गुहा उद्दालकाच्या दृष्टी पडली ५१. सर्ग ५२-गुहेमध्ये आसन घालून बसलेल्या उद्दालकाने चित्तप्रबोधनाच्या उपा- यांचे चिंतन केलें. श्रीवसिष्ठ-दशरथपुत्रा, तो धर्मात्मा मुनि सहज फिरतांना मिळा- लेल्या त्या गंधमादनाच्या गुहेत शिरला. चित्तसमाधानाच्या उत्सुकतेने