या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार या सकटातून पार पडावयाचे झाल्यास आत्मज्ञानावाचून दुसरा कोणता उपाय सफल होणार ? आत्मज्ञास ही सकटे काही करू शकत नाहीत. तत्त्वज्ञायाचून यास न जुमानणारा धीर दुसरा आढळत नाही. यास्तव, बा सत्पुत्रा, तत्त्वज्ञानाकरिता मोठ्या प्रयत्नाने योग्य ब्रह्मनिष्ठास शरण जावे. त्यास नम्रपणे प्रश्न करावा. तो हितकर्ता व सत्य- वक्ता में सागेल त्याच्यावर विश्वास ठेवावा. त्याचे प्रत्येक वचन हृदय कमलावर खोदून ठेवावे. अतत्त्वज्ञ व अनधिकारी पुरुषास जो असल्या गोष्ठी विचारतो तो मूर्ख होय. प्रामाणिक तत्त्वज्ञास विचारून त्याच्या सागण्याप्रमाणे जो वागत नाही त्याच्यासारिखा अधम पुरुष दुसरा कोणी नाही. वक्ता कसा आहे, याचा अनुभव घेतल्यावाचून जो मूर्ख प्रश्न करितो, तो अधम पृच्छक होय. त्यास गभीर तत्त्वाचा लाभ कवीच होणार नाही. पूर्वापर विचार करून सागितलेले तत्त्वज्ञान ग्रहण करण्यास ज्याची बुद्धि समर्थ असते त्यासच गूढ तत्त्व सागावे. पशुधर्मी अधमास सागू नये. प्रश्न करणारा प्रामाणिकपणे प्रश्न करीत आहे की, छल करीत आहे, याचा विचार न करिता जो तत्त्वार्थ सागतो त्याची चागल्या उपदेशकात गणना होत नाही. बा रघुनदना, तू अत्यत गुणी पृच्छक आहेस व मी ही उपदेश कसा करावा हे जाणतों.. यास्तव आजचा हा आमचा योग चागला झाला आहे. बा सूक्ष्मार्थवेच्या, मी जे काही सागेन ते चागले समजून, तू आपल्या हृदयात दृढ' कर तू उदारचित्त, विरक्त व जनमर्यादेचे तत्त्व जाणणारा आहेस यास्तव तुला सागितलेले काही- ही तुझ्या चित्तावर परिणाम केल्यावाचून रहाणार नाही. तुझे पूर्व अध्ययन मजजवळच झालेले असल्यामुळे तुझ्या बुद्धीचे गुण मला चागले ठाऊक आहेत. निर्मल जलामध्ये जसे सूर्याचे बिब प्रवेश करिते त्याप्रमाणे वक्त्याच्या प्रत्येक शब्दाकडे अवधाम ठेवणारी व स्वभावतःच परमार्थाचा, विवेक करणारी तुझी बुद्धि अर्थात प्रवेश करीत असते. तरी - मन भतिचचल असल्यामुळे त्यास शुद्ध व स्थिर करून, मी काय सागतो ते ऐक; असे सुचविल्यावा- चून रहावत साही अविवेकी, अज्ञ व असजन याची सगति धरणारा जो पापी असेल त्याच्यापासून दूर राहूव साधूंचा सत्कार करावार, सतत सज्जन-समागम केल्याने विधेक उत्पल होतो. भोग व मोक्ष ही.या विवेक- रूसी वृक्षाचीच फळे आहेत. शम, विचार, सतोप वा साधा समागम हे