या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५२. ७७३ दायिनी जगत्सृष्टीस ओळखूनही जर तू न सोडशील तर नष्ट होशील. अथवा तुज शत्रुला मी हा उपदेश कशाला करित बसलो आहे ? बलात्काराने तुझा निग्रह करून विचाराने उच्छेद करणे उचित होय. पण चित्ताच्या उच्छेदाकरिताही पृथक् यन्न करण्याचे काही कारण दिसा नाही. कारण मूल-अज्ञान असे तो चित्त असते व अज्ञानाचा जमा जसा क्षय होत जातो तसा तमा त्याचाही क्षय होना, असा अनुनः असल्यामुळे अज्ञानाचा उच्छेद केल्यानेच त्याचा उच्छेद आपाआप हो शक्य आहे. विचाराने वासनाचा क्षय करणं हेच चित्ताचे कृशत्व होय. कृश किवा सूक्ष्म चित्त फार शुद्ध होते. यास्तव या दुष्टाला उपदेश करीत बसणे व्यर्थ आहे. मी आता त्या असत् व क्षीण होणान्या चित्ताचा त्याग करतो. एकाद्याचा त्याग करून फिरून उपदेश करीत बसणे हे महा- मौर्य आहे. अरे चित्ता, मी अहकार व वासना यानी रहित निर्विकल्प चिदीप आहे. अहकाराचे बीज अशा तुझ्याशी माझा काही सवय नाही. आजवर 'हा मी' अशी दुर्दृष्टि व्यर्थ धरली होती. पण अणुपरिमाण मनामध्ये अनत आत्मतत्त्व राहील कमे ? मोठ्या थोरल्या फार बोल खळग्याप्रमाणे तू ही दुखद, गभीर व वासनाश्रित चित्तता चारण केली आहेस. पण मी तिचे अनुकरण करणार नाही. बालकाच्या मुख कल्पने- प्रमाणे हा देहच मी अशी भ्राति तू मला पाडली होतीस. पण आता मी विवेकी झालो आहे, चागला जागा झालो आहे, मी असल्या भ्रमात पुनः कधीही पडणार नाही. पायाच्या आगठ्यापासून मस्तकावरील कॅसापर्यत शरीराचे राईएवढे तुकडे करून जरी पाहिले तरी त्यात अह कोणीच सापडत नाही. मग तो आहे तरी कोठें ? या त्रिभुवनात सर्वत्र भरलेले मला एक निर्विषय ज्ञान मात्र दिसत आहे. त्याला इयत्ता, कल्पना, एकता, अन्यता, महत्ता, अणुता इ-यादि काही नाही. मी सवेदनात्मा असल्या- मुळेच स्वतःच्या साक्षिरूपाने ज्ञानगोचर होणान्या तु( चित्ता )ला पहातो व तू दुःखकारण आहेस असें निश्चयाने कळल्यामुळे या पुढच्या विवेकाने मी तुला मारतो. शरीरांत रक्त, मास, अस्थि इत्यादिकावाचून काही आढळत नाही. प्राण तर जड वायु आहे. शरीराची हालचाल त्याच्यामुळेच होते. शामशक्ति महाचैतन्याची आहे. जन्म, जरा व मरण हे शरीरधर्म