या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५३. ७७५ जीवनास अत्यत अवश्य असलेल्या कर्मामध्ये प्रवृत्त होते. स्वाभाविक प्रवृत्तीला वासनेचे काही कारण लागत नाही. वासना सोडून शरीराला स्वाभाविक कर्म करू दिल्यास ' मी सुखी किंवा दुःखी आहे ' असा भनु- भव येत नाही. हा निर्वासन व्यवहारांत लाभ माहे. यास्तव चित्ता, जड इंद्रिये व वासना यांस सोडून यदृच्छाप्राप्त कर्म कर. म्हणजे तुला दुःख होणार नाही. बाबारे, तुच आपल्या दुःखाकरिता भोग-वासना धरलीम. इंद्रिय बाळांनो, तृष्णेच्या योगाने तुही व्यर्थ आपला घात करून घेत भाहा. या तृष्णेमुळेच जरा-मरणसकटात पडला आहा. वासनाच तुम्हाला एकत्र बाधावयास कारण झाली आहे. पण ती काल्पनिक व त्यामुळेच असत्य आहे. त्यामुळे संकल्प सोडल्यानेच ती शस्त्राने तोडल्याप्रमाणे नाहीशी होते. तीच तुमच्या मोहाम व मरणादि दुःखास कारण झाली आहे. यास्तव सर्व इद्रियाचा जणु काय कोशच अशा हे चित्ता, इंदि- याशी सकेत करून एकमताने आपल्या असत्स्वरूपास ओळख व शात बोधस्वरूप होऊन रहा. अमर्याद विषयविपसूचिका व अहस्थिति वासना याचा त्याग कर. मनाला जे इष्ट वाटते तें अनर्थकर असते. यास्तव त्याचा परिहार करणे या मंत्रयुक्तीने तूं अससारी व निर्भय हो ५२. सर्ग ५३ -वासना व मन याचा आत्म्याशी , सबंध नाही. शरीर व मन याचे र. उद्दालक-अति मोठ्या व भति सूक्ष्म अशा निर्विषय चित्-तत्त्वाचे भाक्रमण करण्यास वासनादिक समर्थ नाहीत. मन माझ्या सत्तेने वासनेचा अनुभव घेते. पण मी निर्लेप आहे. देह दुर्भावनेमुळे उद्भवलेल्या संसार स्थितीचे ग्रहण करो अथवा त्याग करो, मी चित् निर्लेप आहे. चित्-ला जन्म-मरण नाही. कारण सर्वगामिनी चित्चे मरणार काय व तिला मारणार कोण ? तिला जीविताची गरज नसते. कारण तीच सर्वाचं जीवित व सर्वाचा आत्मा आहे. मरण व जीवन या मनाच्या कल्पना आहेत. शुद्ध भात्म्याच्या नव्हेत. जो देहाहंभावास प्राप्त झालेला असतो त्याच्या बोकाडी हे जन्म-मरणभाव बसतात. मात्म्याला अहंभाव नाही म्हणून त्याला जन्म-मरणही नाही. देहाहंभाष वस्तुतः अहंकार व मन यासही नसतो. कारण ती दोन्हीं मिथ्या आहेत. बरें तो पदार्थांचा आहे म्हणून म्हणावे तर ते जड असतात. यास्तव तो निराश्रय व निर्विषय आहे,