या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५१. ७७९ इत्यादि उत्पन्न करून त्याला पीडा देण्याची इच्छा करतो. 'मनापासून झालेला व त्यामुळेच पुत्राप्रमाणे असलेला देह पितृतुल्य मनाला पीडा देण्याची इच्छा कशी करतो ह्मणून म्हणशील तर सागतों ? सर्वस्वी नाश करावयास सज्ज झालेल्या झणजेच आततायि पित्याला पुत्रही मारतो, हे सर्वास माहितच आहे. स्वभावतः कोणी कोणाचा शत्रु नाही व मित्र नाही. सुख देणाऱ्या प्राण्याला मित्र व दुःख देणान्या प्राण्याला अथवा वस्तूला शत्रु म्हणत असतात. यास्तव मनामुळे दःखी होण रा देह मनाला मारण्याची इच्छा करतो. मन मोठे धूर्त आहे ते एका क्षणात देहाला भापल्या दुःखाचे आयतन करतें. तेव्हा अशा परस्पर विरुद्ध व दुःखद पण एकामेकांशी सबद्ध झालेल्या या दोघांपासन सुखाचा लाभ कसा होणार ! मनच क्षीण झाले म्हणजे देह दुःखाचे भाजन होत नाही? एवढ्यासा- ठींच तो त्याच्या क्षयाच्या उत्कंठेने ज्ञानसाधनाविषयीं यत्न करतो. मग मनही उलट तसाच प्रयत्न का करीत नाही? म्हणून कोणी विचारील तर सांगतों-ज्याला भात्मविवेक झालेला नाही अशा मनाने नाश करून सोडलेले अथवा नाश न केलेलें शरीर मनालाच कारण होते. त्यामुळे त्याच्या नाशाने मनाची इष्टसिद्धि होत नाही. मन व शरीर जडरूप असूनही परस्परामुळे पुष्ट होतात. ती परस्पर विरोधी असूनही पुरुषास दुःख देण्याकरिता अन्योन्य तादात्म्प-अध्यासाने एकरूप होतात. चित्त क्षीण झाले असता देहही समूल क्षीण होतो व तें वृद्धिगत होऊ लागले भसता हाही वृक्षाप्रमाणे शेकडो शाखानी विस्तार पावतो. पण देह क्षीण झाल्याने मन क्षीण होत नाही. यास्तव मन क्षीण करण्याविषयींच प्रयत्न करणे उचित होय. मीही आतां संकल्प हेच ज्याच्यांतील वृक्ष आहेत व तृष्णा या लता आहेत अशा मनोवनास तोडून सपाट भूमीत सुखाने विहार करतों संकल्पांचा नाश झाला म्हणजे मन मनःस्वभावामध्येच रहात नाही. तर तें वासनाजाल सोडून क्षीण होते. मनाचा क्षय झाला म्हणजे सप्त धातूचा गोळा असा हा देह राहो की जावो त्यामुळे माझी काही हानि नाही. कारण देह जरी असला तरी मन नसल्याकारणाने दुःखसंबंध होत नाही. मी देह नव्हे, असें जाणावयास सबळ कारणही आहे. मेलेला देह सर्व अवयव जसेच्या तसेच असताना दर्शन-श्रवणादि क्रिया करीत नाही, हे प्रसिद्ध आहे. पण त्याच्यामध्ये अहं म्हणणारा