या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९४ बृहद्योगवासिष्ठसार तो मनात व्याकुळ होत असे व एकाद्यावर अनुग्रह करण्याचा प्रसंग आला म्हणजे तो फार संतुष्ट होई. पण त्यामुळे त्याचे चित्त अस्थिर झाले. त्या राजाला विश्राति मुळीच मिळेनाशी झाली. पुढे एकदा त्याच्या येथे माडव्यमुनि आला. तेव्हा यथाविधि पूजा करून राजा त्या सदेह-छेदक ज्ञानी मुनीला असें म्हणाला.- मुनिराज, वसंताच्या आगमनाने भूपृष्ठ जसें आनदित होते त्याप्रमाणे आपल्या मागमनाने मी अतिशय सुखी झालो आहे. आज मी धन्य लोकाच्या अग्रभागी धर्मत. स्थित आहे. विकास पावणान्या कमलांकडे जसा सूर्य पहातो त्याप्रमाणे आपण मजकडे कृपादृष्टीने अवलोकन करीत भाहां हा काही सामान्य अनुग्रह नव्हे. भगवन, आपण सर्वधर्मज्ञ अमून फार दिवसापासून ब्रह्मपदी विश्राति घेत आहा. यास्तव सूर्य जसा अधका- यचा नाश करतो त्याप्रमाणे माझ्या या संशयाचा उच्छेद करा. महात्म्याच्या समागमार्ने कोणाची पीडा नाहीशी होत नाही ? सदेह ही मोठी पीडा आहे. माझ्या निग्रहानुग्रहामुळे होणारी प्रजेविषयींची चिंता मला आतून खात आहे. हे प्रभो, माझ्या चित्तात ममता उत्पन्न होईल असें कृपा करून करा. मांडव्य-राजन, आपल्याच प्रयत्नाने व आपल्याच उपायाने ही मनाची कोमलता घालिवता येते. स्वविचारानेच मनोवर सत्वर शात होतो. तु आपल्याच मनाने आपल्यापाशीच पुत्र-मित्रादिक, स्वशरीरगत इद्रिये, व दुसरीही सर्व तत्त्वतः कोण आहेत व युक्तितः कशा प्रकारची आहेत, याचा विचार कर. मी कोण ? हे कसे किंवा काय आहे ! मरण व जन्म कसे होतात? याचा तृ आपल्याशीच विचार कर, म्हणजे पूणे महत्त्वास प्राप्त होशील. त्यानतर विचाराने ज्याला स्वभाव कळला आहे भशा पर्वतासारख्या तुला हर्ष-क्रोध-दशा उचलू शकणार नाहीत. मनः- स्वरूप सोडून तूं शान होशील. (म्हणजे मन असतानाच तें कलकशून्य होऊन जीवन्मुक्त व्यवहारास योग्य होईल.) राजन्, भाग्यवशात् ही सर्वोत्तम दशा जर तुला प्राप्त झाली तर विष्णु-रस्यादि महाश्रीमान्हा तुला अनुकप्य वाटू लागतील. विवेकदीपाने तूं त्रिभुवनातील सार शोधून काढलेंस म्हणजे तुला सर्वोत्तम महत्ता प्राप्त होईल. नतर हे साधो, तुझे चित्त ससारवृत्तीमध्ये निमग्न होणार नाही. कामरूपी कृपणतेनें दूषित