या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

०६ बृहयोगवासिमसार मनोहकार विलीन झाला असता सर्वभावाच्या भांत असणारी परमेश्वराची परानंद तनु उदय पावते. सुषुप्तीप्रमाणे हदयातच अनुभवास येणान्या त्या अवस्थेचे स्वानुभवातिरिक्त प्रमाण नाही. आत्म्याचे परमार्थस्वरूप. स्वानु- भवानेच कळते. • हे सर्व अनंत मारमतत्त्व सतत परिणाम पावणान्या चित्तांत असते. यास्तव चित्तांतील बाह्य चराचर विषय क्षीण झाले व ते प्रयत्नाने परिणामरहित झाले म्हणजे देवाधिदेवाचा अनुभव आपोमाप होतो. आत्मानुभवानतर विषयवासनाविनाश होतो. त्यानतर तो ज्ञानी स्वरूपात मिळतो. त्यावेळचे त्याचे स्वरूप ब्रह्मादिकासही अचिंत्य आहे १४. सर्ग ६५ सय पर्वत व त्यावरील मत्रीचा आश्रम, यांचे वर्णन, विलास व भाम यांचा जन्म, वृद्धि व पितृमरणजन्य शोक. श्रीवसिष्ठ-कमलनयना, विवेकिमनानेच मनाचा उच्छेद करून व अहं आणि मम याचा त्याग करून जर आत्मदर्शन घेतले नाही तर चित्रातील सूर्य जसा कधी अस्त पावत नाही त्याप्रमाणे जगहुःख नाहींसें होत नाही. उलट विस्तीर्ण आपत्ति येऊन कोसळते. याविषयी हा पुरातन इतिहास सांगतात. मागें सह्याद्रीच्या शिखरावर भास व विलास या नावाच्या दोघा मित्राचा संवाद झाला. त्याचाच साराश मी माता तुला सांगतो. ___ ज्याने आपल्या उंचीने आकाश टेंगणे केले आहे. पायथ्याने भूतलास भरून सोडल आहे व तळाने पाताळास जिंकले आहे असा एक त्रैलोक्य वीर पर्वत आहे. त्यावर असक्ष्य पुष्पाचा सदा पूर भालेला असतो. असख्य निर्मल जलाचे झरे झुळ झुळ वहात असतात व त्यातील निधीचे रक्षण गुह्यक करीत असतात. त्याची प्रभा जरी असह्य असली तरी नाव सहा असेच बाहे. त्यावर नानाप्रकारच्या मूल्यवान् वस्तु असून त्याच्या सदियोन तो फार रमणीय झाला आहे. आम्र, पनम, पलाश, इत्यादि नानाप्रकारचे वृक्ष, वेट, प्रफुल्ल कमलयुक्त मरोवरे, मोठमोठे काळे दगड, गुहा, थोड्या पाण्याग्या वेली, अनेक श्रीपधी व वनस्पती सिंह-व्याघ्रादि भारण्य पशु, इत्यादिकांचे तेथें प्राचुर्य आहे. त्याच्या शिखरावर देव, गधर्व, किनर विद्याधर, अप्सरा इत्यादि रहात असतात. अंगावर व पायथ्याशी मानव, पशु-पक्षी व स्थावर पदार्थ वास्तव्य करितात भाणि पाताळात १ अणूनच कोंकण देश भिकारी झालेला असून लोकांना तेथे काळे दगड व लाल माती यांवाचून काही सापडत नाही, असे वाटते.