या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८११ बृहद्योगवासिष्ठसार ज्याचे मन निर्विषय चैतन्याचा माश्रय करून राहिलेले असते त्याच्याकडे नुस्ते पाहूनच जनसमूहाचें चित्त निर्मल होते. पाण्यांत हालत असल्यासारखा दिसणाराही सूर्य जसा वस्तुतः निश्चल असतो त्याप्रमाणे आत्मदृष्टि ज्ञानी शरीरतः चल आहे, असे भासत असले तरी आतून स्वस्थ असतो. अति उत्कर्ष पावलेले प्रबुद्ध, आत्माराम महात्मे बाहेरून पिसाच्या टोकाप्रमाणे चल व आतून मेरूप्रमाणे अचल असतात. स्फटिक जासवंदीच्या फुला. च्या सानिध्यामुळे जरी लाल दिसत असला तरी तो जसा वस्तुतः लाल होत नाही, त्याप्रमाणे आत्मत्वास प्राप्त झालेले चित्त सुख-दुःखानुरक्त होत नाही. आत्म्यामध्ये संसक्त होई तो बाह्य अनात्म्याविषयी असंसक्ति दुर्लभ भआहे. जो आत्मज्ञ मलानी दूषित न होतां आत्मध्यानमय असल्याप्रमाणे सुखमग्न असतो, त्याला स्वसक्त म्हणतात. जसा जसा ज्ञानाचा परिपाक वाढत जाईल तसा तसा आत्मसक्तीचा उत्कर्ष होऊन क्रमाने बायसग क्षीण होतो. या असगष्टीमध्ये गेलेला जीव जाग्रत्समयीं सुषुप्तस्थ असल्याप्रमाणे निद्व व नित्य हर्षविषादशून्य असतो. चित्त चित्तदशा- रहित झाले असता, क्षीण-चित्त पुरुषाची जी स्थिति तिलाच जाग्रतीत सुषुप्ति म्हणतात. असल्या सुषुप्तीस प्राप्त झालेला पुरुष जीवदयस्थेत व्यवहार करीत राहिला तरी सुख-दुःखरूपी दोयानी आकृष्ट होत नाहीं कळसूत्री यंत्रातील बाहुल्या व्यवहार करीत असल्या तरी जशा सुर्ख किंवा दुःखी होत नाहीत, त्याप्रमाणे असला पुरुष व्यवहारसमयी क्लिष्ट होत नाही. अहंभावरूप शक्तिच चित्ताला ताप देत असते व तीह इष्टाची अप्राप्ति व अनिष्टाची प्राप्ति या निमित्तानेच त्याला संताप देते पण ते चित्त आत्मरूप झाल्यावर निमित्ताला अवकाशच मिळत नसल्या मुळे त्याला बाधा होत नाही. सुषुप्तबुद्धि पुरुष पूर्वीप्रमाणेच लीलेने के करीत असला तरी जीवन्मुक्ततेनें स्थित असल्यामुळे बद्ध होत नाह यास्तव हे निष्पाप रामा, सौषुप्ति वृत्तीचा आश्रय करून स्वाभाविक क हवे तर कर, नाही तर सोड. ज्ञान्याला कर्मत्याग किंवा ग्रहण याती काहीच आवडत नाही. तर तो प्रसंग पडेल तसा वागतो. अतत्वज्ञ निद्र समयी हात-पाय हालविणे, श्वास सोडणे इत्यादि क्रिया करीत असला त मी हे करतो असा अभिमान धरीत नसल्यामुळे त्यांचा कर्ता होत नाही खामांत शरीरतः कोणाला मारीत नसतानाही संकल्पाने शत्रूच्या उरावर बस