या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७२. ८२१ नाही. मात्मा चित्तवेष घेऊन भूतांस जोडतो (एकत्र करतो). यास्तव त्याला चित्ताचा वेषच घेऊ देऊ नये. म्हणजे आत्मज्ञानाने चित्तशून्य झालेला ज्ञानी भूतसमूहास आपल्यापासून फार दूर व खाली पहातो. त्यामुळे तो देहा- तीत व अज होतो परप्रकाशास प्राप्त होतो. मदिरेची धुंदी उतरली असतां मद्यप्याला जसे वस्त्रादिकाचे भान होते त्याप्रमाणे देहात्मभाव सोडलेल्या त्याला प्रमाण-प्रमेयशून्य स्वात्म्याचा स्वयं अनुभव येतो. राबवा, महासत्त्व- पदास पोंचलेले जीवन्मुक्त असाच व्यवहार करितात. उत्तम पुरुषाचा क्षय झालेला असल्यामुळे आपल्या उचित लोकव्यवहाराने ते म्लान होत नाहीत. तत्त्ववेत्त्यामध्ये रागद्वेष नसतो. जगाविषयी मनाचे मनन हा विष- योन्मुख झालेल्या चित-तत्त्वाचा विलास आहे, असे ते समजात. दृश्य-दर्शन- संबंधामुळे भासणारे हे सर्व व मी मनच आहे. दृश्य मूढदृष्ट्या सत् व ज्ञानदृष्टया असत् असते. सत्-प्रमाणे स्वभावतःच असत् असलेल्या वस्तू- विषयीही हर्षशोक करणे उचित नव्हे. राघवा, तू यथार्थदृष्टि हो. कारण यथार्थज्ञानी मोहित होत नाही. सर्व लोक भोगसुखाकरिता विषय व इद्रिये याचा सबध इच्छितात. पण ते भोगसुखही, त्याची भोग ही उपाधि सोडली म्हणजे वस्तुतः ब्रह्मरूपच आहे. कारण दृश्य व दर्शन याच्या संबंधामध्ये जी अखडआनदात्मक अनुभूति तीच मुक्त होय, असे विद्वान् म्हणतात. तिचा आश्रय केला म्हणजे स्वरूपावरणदृष्टि जाते, व स्वरूप- घष्टि प्रकट होते. याप्रमाणे दृश्यदर्शनसबध-ज्ञान तुर्यत्वास प्राप्त होते. भाता तुर्यतालक्षण मुक्तीमध्ये आत्मा कशाप्रकारचा अवशिष्ट रहातो ते सागतो. तो त्यावेळी स्थूल, अणु, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, चेतन, जड, सत्, असत्, अहं, अनह, एक, अनेक, समीपस्थ, दूरस्थ, अस्ति, नास्ति, प्राप्य, अप्राप्य, सर्व, असर्व, पदार्थ, अपदार्थ, इत्यादिकातील कोण याही प्रकारचा नसतो. मनामह सहा इद्रियाच्या द्वारा जे काही ज्ञात होत असते त्याच्या पलीकडे व शब्दानी न सागता येण्यासारखे तें तत्व आहे. ज्ञानी सर्व जगच आत्ममय पहातो. आकाशादि सर्व भूतामध्ये तो आत्म्याला पहातो. रामा, चित्-तत्त्वावाचून जगातील कोणत्याही वस्तुला सत्ता प्राप्त होत नाही. या वस्तूहन मी निराळा आहे, असे म्हणणे किंवा समजणे हे मूर्खपण आहे. यास्तव जगातील इतर सर्व कल्पना मिथ्या