या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२६ बृहद्योगवासिष्ठसार. असें जिच्या योगाने वाटत असते, ती परा शांति नैराश्यापासूनच प्राप्त होत असते. निस्पृहाला त्रिभुवन तृणासारखे वाटते. आशापाशातून सुटलेले जन घेणे, देणे इत्यादि जगातील क्रियांना हसत असतात. ज्याच्या हृद- यात कलना कधीही उत्पन्न होत नाही त्या निःस्पृहाला उपमा कशाची देणार ? मला हे हवें व हे नको, असे ज्याला वाटत नाही त्याची कोणाशी तुलना करता येणार ! नैराश्य हे बुद्धीचे परम सौदर्य आहे. आशा तुझी नाही व तूं आशाचा नाहीस व जगत् हा मिथ्या भ्रम आहे. मग तूं व्यर्थ मोहित का होतोस? मी इतका बोध करीत असतानाही हे माझें व हा मी असा संकल्प भ्रातचित्ताने का करतोस? जगत् एकरूप आहे, आत्ममय आहे, असे जाणून धीर खिन्न होत नाहीत. भाव-अभाव इत्यादि विसवाद सोडून आद्यन्त-अवस्थेत असणाऱ्या रूपाचा अवलब कर. तेच पदार्थारें खरे स्वरूप आहे. सिंहापासून हरिणी जशी पळून जाते त्याप्रमाणे वैर- ग्यामुळे वीर झालेल्या मनापासून ही अति मोह पाडणारी सासारी माया पळून जाते. धीम्बुद्धि पुरुष तरुण कातेस सुकलेल्या वेलीप्रमाणे अथवा जुन्या दगडाच्या बाहुलीप्रमाणे पहातो. भोग त्याला आतून मानद देत नाहीत, आपत्ती खेद देत नाहीत व दृश्यशोभा त्याला आकर्षण करून घेत नाहीत. स्मरशर त्याला व्याकुळ करू शकत नाहीत. ज्ञानी राग. द्वेषांना थाराच देत नाहीत. मग त्याना वश होण्याची गोष्ट तर बाजूलाच राहू दे. वाटसरु क्षणभर विश्राति घेण्याकरिता ज्याच्या छायेंत बसतो त्या वृक्षावर जसा आसक्त होत नाही तसाच आत्मज्ञ विषयात रममाण होत नाही. पण अनायासाने प्राप्त झालेल्या सर्वांचा लीलेनै भोग घेतो. तो त्याच्या दुःखाला किंवा सुखाला कारण होत नाही. कारण त्याला तात्कालिक भोगजन्य सुख व दुःखही जरी होत असले तरी त्यामुळे तो क्षुब्ध होत नाही. तर सदा सर्वभूतातर्गत आत्मपदाचा आश्रय करून रहातो. ब्रह्मदेव जगत् उत्पन्न करीत असतानाही जसा आत्मपरायण असतो त्याप्रमाणे तो कार्य करीत असतानाही अव्यग्र रहातो. देशकालानुरूप प्राप्त होणा-या सर्वांस सहन करतो. मन असक्त असल्यास, नुस्त्या इंद्रियानी अनिषिद्ध विषयात मग्न होणारा पुरुष वस्तुतः मग्न होतच नाही. (म्हणजे अंतःसंगच दूषित करतो. बहिःसग नव्हे.) सोने आतील कलंकानेंच कलंकित होते. बाहेरच्या माती, चिखल, इत्यादिकांच्या लेपाने खरोखरी कलाकत होत नाही.