या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७६. इत्यादि जीवन्मुक्त हल्ली आहेतच. यास्तव वीरा, वैराग्य व विवेक यांच्या योगाने महाबुद्धिमान् व समलोष्टाश्मकाचन होउन यालोकी विहार कर. मागें सागितल्याप्रमाणे मुक्ति दोन प्रकारची आहे. अससंगामुळे मनाची शाति होणे हीच विमुक्तता होय. ती देह असला तरी व नसला तरी संभवते. स्नेहाचा सर्वथा क्षय हेच उत्तम कैवल्य आहे. ते देहाचा भाव किंवा अभाव असला तरी संभवते. ज्याचें जीवित स्नेहयुक्त असतें तो बद्ध, जो निःस्नेह होऊनच जिवंत रहातो तो जीवन्मुक्त व जो दृढ अभ्यासबलाने मरणोत्तर निःस्नेह होतो तो विदेहमुक्त होय. साधनचतुष्टयातील पूर्व पूर्व साधना- विषयींच्या प्रयत्नाने उत्तर उत्तर साधन संपादन करून विजयी व्हावें. यत्न व युक्ति यावाचून गोष्पदही दुस्तर होतें. केवल मोहाचा आश्रय करून व यत्नाविषयीचा निश्चय सोडून विपुल दुःग्वाकरिता आत्म्याला अनात्मवश करूं नये. निश्चयी मनाने मोठे वैर्य धरून सिद्धीकरिता यन्न करावा. निश्चयी पुरुषाला जग्त टीचभर होते. बुद्ध सुदर विचारवान् झाला. कपिल पुष्कळ विचार करूनही यथार्थ निश्चय करण्याम समधे न झाल्याकारणाने त्रिगु. णसाम्यावस्थारूप प्रकृतीलाच तत्व समजू लागला. कोणी एक वेदनिंदक राजा आ म्याचे चित्स्वभावत्व जाणून तो शरीरा-एवढाच ( मणजे मध्यम परिमाणवान् ) आहे असे समजला. (म्हणजे त्याने त्याला अनित्य केलें.) व पुष्कळ वेदवेत्ते महात्मे विवेक व वैराग्य याच्या यागान सत्य-आनंद- पदास प्राप्त झाले, पण ते सर्व प्रयत्न-कल्पवृक्षाचेच महा कल आहे ७५. सर्ग ७६--संसारसागर, त्याच्या तरणाचा उपाय व तरून गेल्यावर यथेच्छ कोडा याचे वर्णन. श्रीवसिष्ठ-हे राघवा, सर्व भुवने ब्रह्माप मृन उत्पन्न हे तात; अविवे- काने त्याचे स्थैर्य होते व विवेकाने ती नट होतात ब्रह्मसागरातील जगत्-लहरीची गणना करण्यास कोण समर्थ आहे ? अयथार्थ ज्ञान हेच जगस्थितीचे कारण आहे व यथार्थ ज्ञान हाच त्याच्या शातीचा उपाय आहे. या सागराचें पर तीर दिसणे फार दुर्घट आहे. युक्ति व प्रयत्न यावाचून त्यांतून पार होता येतच नाही. हा सागर मोहरूपी जलपूराने भरलेला असतो. अगाध मरणरूपी भोवन्यांनी भयंकर झालेला असतो. पुण्यरूपी फेसाने कोठे कोठे शोभायमान होतो. दीप्त नरकरूपी बडवानीने संतप्त झालेला असतो. तृष्णासपी