या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ८२. ८४१ आहे ? यास्तव मी आता हा विचारही सोडतो. मी आता शात व मूक होऊन आत्म्यामध्ये स्थिर रहातो. राघवा, तत्त्वज्ञाने जाणे, येणे, भोजन करणे, निजणे, उभे रहाणे इत्यादि प्रमगी असा सतत विचार करावा. या विचाराने सज्जनाला शान अव- म्थेत रहाता येते. कर्मकाळीही त्याना उद्वेग होत नाही. महामनिमान पुरुषच मान-मदादि सोडून प्रकृत व्यवहारात विहार करीत असतानाही शातचित्त राहू शकतात ८१. सर्ग ८२-वीतयाने चित्तैकाप सिद्ध होण्याकरिता इद्रिये व मन याम केलेला बाप श्रीषसिष्ठ-रामराया, पूर्वी वृहस्पतीच्या मवर्तनामक विद्वान् भ्रान्याने असाच विचार केला व विध्याद्रीवर न्याने तो मला सागितला. याम्नव तूही या दृष्टीचा आश्रय करून विचारपर वुद्रीन ससारमागरातृन तरून जा. रामा, मी आता तला आणखी एक परम पदप्रद दृष्टि मागतो. तिच्या योगाने वीतहव्य मुनि निःशकपणे पावन पदी अ.रूट झाला. पूर्वी एकदा तो महात्मा विध्यपर्वतावर समाधि लावून बसण्याम योग्य गुहा हुडकीत पुष्कळ वेळ वनात हिडला. कारण त्याला या घोर समागविषयी पूर्ण वैराग्य आले होने निविकप समाधीच्या अशानेही प्राप्त होणा-या उदार परमात्म्याच्या इन्छेने त्याने जगद्यापार सोडला होता. उचित गुहा न मिळाल्यामुळे त्याने आपल्याच हाताने एक केळीच्या पानाची पर्णकुटी बाधली व तिच्यामध्ये तो आनदाने राहू लागला. शुद्ध व सम प्रदेशी त्याने आपले हरिणाजिन हातरले व त्यावर तो निश्चल होऊन बसला. पद्मासन, सरळ मान, अर्धोन्मीलित दृष्टि इत्यादि करून त्या महात्म्याने आपले मन सर्वतः आवरले. त्याने बाह्य व आभ्यतर स्पर्श क्रमाने मोडले व तो निष्पाप मनाने असा विचार करू लागला-- हु ! काय चमत्कार आहे, नदीच्या प्रवाहात पडलेल्या पानाप्रमाणे कितीही प्रयत्न केला तरी मन स्थिर होत नाही. हाताने उडविलेल्या चेंडूप्रमाणे ते एकसारखे वर उडते. ते पूर्व पूर्व वृत्ति सोडून उत्तर-उत्तर वृत्ति धारण करते. त्याला ज्या विषयापासून परतवा त्याच्याकडेच ते मुद्दाम धावते. तें घट सोडून वस्त्राकडे जाते; वस्त्राला सोडून लाकडाला आपला विषय करते, त्याला सोडून दगडाचा आश्रय करते. तात्पर्य