या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४८ बृहद्योगवासिष्टसार. मात्र आहे तर तुला दिसणारे हे जग तरी सचेतन प्राण्यानी युक्त असन्या- सारखे कमें भासतें? हे जसे चिन्मात्र व मनोमात्रभ्रमोपम तसेच ते वीतहव्याचेही मनोमात्र भ्रमतुल्य होय. वस्तुतः कोणतेच जग नाही. तुझे हे प्रसिद्ध जगसुद्धा ब्रह्ममात्र आहे. हे सर्व त्रैकालिक दृश्य मनोमात्र आहे. हे असें आहे हे समजे तो वज्रासारखे दृढ असते, पण त्याचे खरे स्वरूप कळले ह्मणजे ते परम आकाशच होते. अज्ञानामुळे मनच हे सर्व अमे विकास पावले आहे ८४. सर्ग ८५-मुनिशरीराचा पिगलाने कलेला उद्वार श्रीराम-मुनिवर्य, तो महामनि भूमीतन वर कसा आला व ब्रह्मी- भूत कसा झाला? श्रीवसिष्ठ-नतर त्याला समाधीमध्ये अनत ब्रह्माकाराचे भान झाले. भात्मध्यानसमयीं त्याला एकदा आपलं पूर्वजन्म पहावे अशी इच्छा झाली व त्याप्रमाणे त्याने आपले सर्व नष्ट आणि अनष्ट देह पाहिले. अनष्ट देहातील मातीत रुतलेल्या त्या दहास पाहून त्याला वर काढावे, अमें त्याच्या मनात आले. पण एकाद्या किड्याप्रमाणे मातीत रुतलेल्या त्याला वर काढण्याचे सामर्थ्य प्राणवायूचा लय झाल्यामळे त्याच्यामध्ये नव्हते म्हणून तो शुद्धबुद्धीने पुन, असा विचार करू लागला.-प्राणवायूनी सोडल्यामुळे माझा देह काही करू शकत नाही. यास्तव त्याला उठ- वावयाचा उपाय जाणून, परकाया-प्रवेश-प्रकाराने मी सूर्याच्या देहात प्रवेश करतो. म्हणजे त्याच्या आईने त्याचा पिगल गण या शरीराचा उद्धार करील. अथवा मला याला घेऊन काय करावयाचे आहे ८ मी स्वपदीं लीन होतो. मला देहालेची काही गरज नाही. __ असा विचार करून वीतहव्य क्षणभर स्वस्थ बसला व पुनः चितन करू लागला. देहाचा त्याग किंवा आश्रय यातील मला काहीच ग्राह्य वाटत नाही. कारण जसा देहत्याग तसाच देहसंश्रय होय. यास्तव तो जोवर विद्यमान आहे, अणुत्वास प्राप्त झाला नाही, तोवर यावर आरूढ होऊनच मी विहार करतो. पिंगलाकडून याचा उद्धार करविण्याकरिता मी सूर्याच्या शरीरात प्रवेश करतों; असा बेत करून, तो वायुरूपी मुनि सूर्यामध्ये प्रविष्ट झाला. त्याबरोबर भगवान् भास्करानेही आपल्या पिंगलगणाला विध्यगुहेतील चिखलात रुतलेल्या व वरून गवतानें