या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्टसार. एवढेच सांगणे आहे की, जवळच असलेल्या गगाजलाचा लाग करूनही आमच्या या वडिलोपार्जित खाऱ्या विहिरीचेच पाणी आह्मी पिणार, असे आग्रहाने झणणारे जे आहेत, त्यानी खुशाल आपल्या इच्छेप्रमाणे करावे. पण प्रातःकाल होताच जसा अधकार नष्ट होतो त्याप्रमाणे ही सहिता ऐकताच मोह नष्ट होतो व विवेक उद्भवतो. सुज्ञ वक्त्याच्या मुखाने हिचें श्रवण केले असता हळु हळु चित्तावर उत्तम संस्कार होतो. महत्त्व व गुण याच्या योगाने शोभणारी चतुरता येते. उत्तम शब्दार्थज्ञान होते. त्यामुळे तो श्रोता सभेचे भूषण होतो. त्यास लोक, विद्वान् समजून, देवाप्रमाणे पूर्जू लागतात; त्यास पूर्वापर ज्ञान होते, त्याचे लोभ-मोहादि दोष नाहीसे होऊन बुद्धि स्वच्छ होते; मन प्रसन्न ह्मणजे सकल्प-विकल्परहित होते; चित्त अक्षुब्ध सागराप्रमाणे स्थिर होते, दैन्य-दारिद्यादि दोष त्याच्या मर्माचा भेद करीत नाहीत, ससाराची भीति त्याच्या चित्तास स्पर्श करीत नाही, दैव व प्रयत्न यातील कोणाचे केव्हा प्राधान्य असते याविषयी त्यास सशय रहात नाही, प्रज्ञेचा उदय झाल्यामुळे रागद्वेष नाहीसे होतात व परम शाति अनुभवास येते. विचारी पुरुषाच्या स्वभावात समुद्राप्रमाणे गाभीर्य, मेरूप्रमाणे धैर्य व चद्राप्रमाणे शीतलता येते. जीवन्मुक्ताची हीच लक्षणे आहेत. ही जीवन्मुक्तता हळु हळु वाढत जाते व शेवटी सर्व विशेष शात झाले असता त्या अवस्थेचे शब्दानी वर्णन करवत नाही. सर्व अनर्थ, सर्व क्लेश, सर्व दुःखे, सर्व चिता, सर्व तृष्णा, व सर्व भय एकदाच नष्ट होऊन तो स्वय नारायण-स्वरूप होतो या सहितेच्या पठनाने ज्ञानी झालेला अधिकारी विषयरूपी खड्डयात पडत नाही. त्याची ग्राम्यता नाहीशी होते. सदाचार व साधूचे शील यात त्याची बद्धि आसक्त होते. मोक्षाचे उपाय समजल्यामुळे ज्याचे अत करण शुद्ध झाले आहे, अशा त्यास कोणताही अवस्था व्याकुल करू शकत नाही. उत्पत्ति व नाश हा एक मायिक चमत्कार आहे, असे समजून तो त्याची उपेक्षा करू लागतो. या शास्त्राचा विचार केला असता, यात सागितलेल्या प्रत्येक अवस्थेचा अनुभव येतो. या सहितेत सर्व काव्यगुण असल्यामुळे ती रमणीय व मनोरजन करणारी झाली आहे. व्युत्पन्न षुरुषास हिच्या अवलोक- नान सहज ज्ञान होते. पण या सुबोध शास्त्राचाही ज्यास सहज बोध होण्यासारिखा नसेल, त्याने ज्ञानी पंडिताच्या मुखानेच याचे श्रवण