या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग १९. ब्रह्मात्मसाक्षात्कार झाला की, जगांतील-मी गोरा आहे, मी ब्राह्मण आहे, मी विद्वान् आहे; मी कर्म-कर्ता आहे, मी फल-भोक्ता आहे; इत्यादि अनुभव भ्रम ठरतात. ब्रह्म प्रमाणभूत आहे की, अप्रमाण आहे; जग प्रकृतीचा विकार आहे की परमाणूच्या योगाने बनलेले आहे, इत्यादि संशय व तर्क नाहीसे होतात व अनर्थाची निःशेष निवृत्ति होते. आता- स्वभावतःच प्रिय असलेल्या भार्या-पुत्रादि सहज मुखदायक विषयात प्रवृत्त करणाऱ्या व त्यामुळेच हितकर वाटणाऱ्या भगवान् चार्वाकाच्या मताचें उल्लंघन करून जप-तप-नियमादिकाच्या योगाने अनेक क्लेशकारक, दारिद्र्यपूर्ण व भिकारी बनवून भाादिकाची ताटातूट करविणारे हे तुमचे वैदिक मत कोण मानणार ? असे ह्मणशील; पण ते बरोबर नाही. कारण विचार करून पाहिला असता वैयाप्रमाणे वाटणाऱ्या आमा ब्रह्मनिष्टाचे, ऐकण्यास अगदी अप्रिय असलेले, वचनच परिणामी परमान- दरूप परब्रह्म-प्राप्ति करून देणारे आहे, असे कळून येईल; व केवल क्षणिक सुखदाया विषयामध्ये प्रवृत्त करणाऱ्या चार्वाकापेक्षा नित्यसुखाच्या साधनाचे अनुष्ठान करावयास लावणारे आह्मी वैदिकच अधिक हितकर आहो, अशी खात्री होईल. रामचद्रा, प्रियभार्येचे भाषण जरी कानास गोड लागले, तरी परिणामी फारसे हितकर नसल्यामुळे, ते ऐकल्या- बरोबर कानास तृप्त न करणाऱ्या वेदवाक्याची बरोबरी करू शकणार नाही, हे तू ध्यानात धर. चार्वाकाप्रमाणे कपिल - कणादादि तत्त्ववेत्तेही खरे हितकर्ते नव्हेत, असे तूं निःसशय समज. कारण त्याचा उपदेश उपनिषदास धरून नसतो. ते आपल्या कल्पनेप्रमाणे उपदेश करीत सुटतात. शिवाय त्याना अनुभवाचा गधही नसतो आह्मीं जें सांगतो ते साक्षात् अनुभवास येणारे आहे. आह्मीं तसा अनुभव घेतला आहे आमच्या मागोने जो जाईल त्यासही आमच्याप्रमाणेच तो येईल. यास्तव अध्यात्मशास्त्राचा अगीकार करून प्रत्येकाने आपले हित क- रून घ्यावे १८. सर्ग १९--या सर्गात, सर्व साक्षी ब्रह्मच प्रमाण आहे, असे सागतात. श्रीवसिष्ठ--रामा, दृष्टातातील विशिष्ट व विवक्षित भाग मात्र घ्यावा.• कारण दृष्टात व दृातिक याचे सर्व साम्य झाल्यास ते भिन्न पदार्थ आहेत, असेही ह्मणता येणार नाही, असे मी वर सुचविले आहे;