या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १. ९७ आता यापुढे ज्ञानक्रम ऐक. तो तज्ज्ञ व सत्यभाषण करणाऱ्या ब्रह्म- निष्ठाच्या तोडूनच ऐकावा; म्हणजे श्रोत्याची इच्छा नसली तरी तो परम पदास प्राप्त होतो २०. ___ इति श्रीशकराचार्यभक्त विष्णुकृत बृहद्योगवासिष्ठसारातील दुसरे मुमुक्षुव्यवहार प्रकरण समाप्त झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. अथ तृतीयमुत्पत्तिप्रकरणम् । सर्ग १--या सर्गात, ज्ञानच मोक्षाचे साधन आहे, कर्मादि दुसरे काही नाही, असे ___ सागून बधाच्या कारणाचेही वर्णन केले आहे. श्रीगणेशाय नमः । श्रीशकराचार्यचरणारविंदाभ्यां नमः । श्रीवसिष्ठ- रामराया, विवेक, वैराग्य इत्यादि साधनांनी संपन्न असलेल्या पुरुषाने अथवा स्त्रीने तत्त्वाचा अपरोक्ष साक्षात्कार होईपर्यंत विचार करावा, असे मी तुला मागच्या प्रकरणात सागितले. आता या प्रकरणात सृष्टि कशी झाली, हे सागून मला अद्वैत ब्रह्माचे प्रतिपादन करावयाचे आहे. उपनिषदातील महावाक्याच्या श्रवणाने चित्तात अखडा- कार वृत्ति उत्पन्न होते. तिच्या योगाने ब्रह्मवेत्ता स्वतत्त्वास साक्षात् जाणतो व परामार्थिक-नित्यमुक्त-पूर्णरूपाने प्रकाशमान होतो. तात्पर्य, स्वमुक्तीस महावाक्यापासून उत्पन्न होणाच्या वृत्तीवाचून दुसऱ्या कशाचीही अपेक्षा नसते. कारण हे-देह, इद्रिये इत्यादि व आकाशादि बधरूप-दृश्यजात प्रत्यगात्मभूत ब्रह्मामध्ये स्वप्नाप्रमाणे भासत असते त्यामुळे स्वप्नातील सुखदुःखादि बधाच्या निवृत्तीस जागे होणे यावाचून दुसऱ्या कशाचीही जशी अपेक्षा नसते त्याप्रमाणे या जाग्रत्-बवापासून मुटण्यास पूर्वोक्त वृत्तीवाचून दुसरे काही लागत नाही, असा त्रिकालाबाधित नियम आहे. यास्तव साप्रतकालीही जो कोणी अधिकारी श्रवणादि उपायाच्या योगाने त्या तत्त्वास यथार्थपणे (ह्मणजे मीच ते परम तत्त्व आहे, असे साक्षात् ) जाणतो त्यास पूर्ण व नित्यमुक्त ब्रह्मभावरूप फली मिळते. जीवतपणीच त्याला परमानदाचा साक्षात्कार होतो अध्यस्त वस्तु अधिष्ठानाहून पृथक् नसते हा, अथवा अध्यारोपापा