पाश्चात्य पुरुषश्रेष्ठ



पाश्चात्य
पुरुष-श्रेष्ठ



लेखक
श्रीपाद महादेव माटे, एम्. ए.



प्रथमावृत्ति



१९३१



किंमत १ रुपया


[ सर्व हक लेखकाचे स्वाधीन ]



















प्रकाशक - श्रीपाद महादेव माटे, १९६/७६ सदाशिव, पुणे नं. २.
मुद्रक - अनंत सखाराम गोखले, 'विजय' प्रेस, ५७० शनवार, पुणे.


प्रस्तावना


 पुढील दोन एकशे पानांत युरोपांतील कांहीं पुरुषश्रेष्ठांचीं चरित्रे दिली आहेत. वास्तविक भूगोलदृष्ट्या जीसस क्राइस्ट हा आशिया- खंडांतील व हॅनिबल हा आफ्रिका खंडांतील होता. पण यूरोपच्या सरहद्दीपासून चारदोन पावलांवर जरी ते राहात असले तरी त्यांच्या मतांचा व कृतींचा प्रभाव यूरोपांतच दिसून आला. म्हणून त्यांची चरित्रे 'पाश्चात्य पुरुषश्रेष्ठां'च्या मालिकेत दिलीं आहेत.
 २. प्रत्येक देश कोणाच्या नांवाने ओळखला जातो किंवा त्या त्या देशाच्या जीविताची घडी कोणाच्या हस्तें विशेष प्रकारें बसविली गेली हें ध्यानांत घेऊन चरित्रनायकांची निवड केली आहे.
 ३. अशा तऱ्हेचीं सर्व पुरुषश्रेष्ठांची, मग त्यांची श्रेष्ठता कोणच्याही प्रकारची असो, चरित्रे लिहिण्याचा मूळ हेतु आहे.
 ४. खास मराठी भाषा वाचणारांना हीं चरित्रे पसंत पडतील अशी उमेद आहे.

श्री. म. माटे.

अनुक्रमणिका
चरित्र पृष्ठ
शिकंदर .... .... .... .... 

हॅनिबल .... .... .... .... 

२४

जूलियस सीझर .... .... .... .... 

४५

येशू ख्रिस्त .... .... .... .... 

७९

मार्टिन लूथर .... .... .... .... 

९८

कोलंबस .... .... .... .... 

११९

ऑलिव्हर क्रॉम्वेल .... .... .... .... 

१४४

जॉन सोबेस्की .... .... .... .... 

१६७

पीटर दि ग्रेट .... .... .... .... 

१८४