४४ बाळमित्र. तुमचा स्नेही ह्मणवाया जोगी योग्यता माझे अंगी येण्यास फारच यत्न करावा लागेल. गोवा - मलाही तुझी आपले मैत्री बाहेर टाकू नका. मी लक्ष्मणापेक्षा काही चांगला वागलों असें ना. ही; पण सूड उगवावयाचा झाला तर दुसन्यावर उपकार करून त्यास लाजवावें; घात बुद्धीने उग- वूनये, अशी माझी बुद्धि झाली. गंगा- (हरणीची पाठ थापटून ह्मणते ) अहा, लहा. नगे लबाडे, त्वां आपल्या धन्यापासून इतःपर प. ळून जाऊनये ह्मणून तुला चांगली अद्दल घडली; सारी रात्र उपाशी मेलीस, पुन्हां जर अशी जाशी- ल तर पहा ह्याहीपेक्षां तुझी अधिक विपत्ति होईल, तूं येथे कशीही असलीस तरी माझी प्रीति तुजवर अखंड राहील असा माझा निश्चय आहे. कोंबडी. गोविंदराव व व्याचा मल रामचंद्र. गोविंदराव हा फार दयाळू होता. व त्याची अति- शय ममता पुत्रावर असे, ह्मणून रामचंद्र फार दैववान्, की असा बाप ज्यास देवाने दिला. रामचंद्र आपले म- नांत असें ह्मणत असे की, मी उत्तमगुण शिकलो ह- णजे शिकण्याचे श्रमाबद्दल मला बाप कंठी, चौकडा अ. शी कांही देणगी देईल, अशी त्याची पक्की खातरी हो. कोंबडी. ती, तरी त्याची आवड बागाकडे फार असे. तो आठ- वर्षांचा झाला तेव्हां बागांत कांहीं फुलझाडे लावू ला. गला; हा त्याचा छंद पाहून त्याचा बाप त्यास जे आ. वडतें तेंच द्यावें याविषयी विचार करूं लागला. एके दिवशी उभयतां, पितापुत्र भोजन करावयास बसले होते तेवेळेस गोविंदराव ह्मणतो, रामचंद्रा, पंतो- जीने मला सांगितले आहे की, आज तुमच्या रामचं- द्राने मराठी बखर वाचावयास प्रारंभ केला आहे; त्या- सही आजपासून आठा दिवसांत सर्व वाचून त्यांतील ज्या गोष्टी मी विचारीन त्या न्वां तोंडाने सांगिल्या म. णजे मी तुला असें कांहीं उत्कृष्ट बक्षीस देईन, की जें तझ्या ध्यानांत आतां कांहींच येणार नाही. हे बापाचे सांगणे क्षणभर न विसरतां त्या रामचं- द्राने बक्षीस मिळवावयासाठी रात्रंदिवस वाचण्याचा अतिशय श्रम मांडला. तो परीक्षेचे दिवसाची वाट निर्भयपणाने पहात हो- ता; मग उत्तम प्रकाराने बरखर वाचून तीतील सारांश मराठी लोक कस कसे योग्यतेस चढले, हे सांगून, त्यां- नी कोण कोणते मुलूख हस्तगत केले ते सर्व त्याने पृ. थ्वीचे नकाशावरून नचुकतां आपले बापास दाखविले. तेव्हां गोविंदराव हर्षयुक्त होऊन त्याला पोटाशी धरू. न बोलिला की, त्वां मला आज आनंदमय केले, तर चल माझे बरोबर, आतां. मी तुला आनंदमय करितों पहा! बाळमित्र. असे बोलून त्याने त्यास जवळचे बागांत नेलें, आ- णि एक रिकामी जागा पडली होती ती त्यास दाख- वून सांगितले की, आजपासून ही जागा तुझी; ह्या जागेचे तूं दोन भाग कर, एकांत फुलझाडे लाव, व ए. कांत भाजीपाला किंवा जें तुला पाहिजे ते लाव. असे सांगन त्याने त्यास माळ्याचे कोपीत नेलें, आणि मु. ला जोगी जी जी लहान लहान कुदळ, खोरें, खुरपे, इत्यादि हत्यारे होती ती दिली, व लहान लहान पां. ट्या व फुलाझाडांची कलमें, हुंड्या, व बियांच्या पि. शव्या संदुकीत होत्या त्या काढून दिल्या, आणि प्रत्ये. क पिशवीवर विजांची नावें, व कोणते वेळेस कोणते पेरावें मणजे कसे येईल, हे लिहिले होते ते सर्व दा. खवून दिले; तेसमयीं त्यास पराकाष्ठेचा आनंद झाला. जसा राष्ट्राच्या प्राप्तीने राजास आनंद होतो, तसा त्यास त्या जमिनीचे तुकड्याने झाला. तो आनंद त्याच्या वयाची मुले जाणतील. रामचंद्रास पंतोजीने खेळावयाकरिता ह्मणून जा वेळ दिला होता तो त्याने पहिल्याप्रमाणे रिकामा जा. ऊं न देतां आपले बागाचे कामाकडे योजिला. एके दिवशी रामचंद्र विसरभोळेपणाने बागाचा योपा न लावितां घरांत गेला असता. तेथे जवळच एक कोंबडी दाणे शोधीत होती ती रामचंद्राचे बागांत गेली आणि रामचंद्राने नुकतेच फुलझाडांस खत घात होतें तेथें उत्तम प्रकारचे जीवजंतु मिळतील ह्मणून कोबडी. मोठ्या हर्षाने ती जाऊन चोंचेने व पायांनी माती उ. करूं लागली, व तेथेंच रामचंद्राने दवण्याचे बी टाकले होते त्या ठिकाणी तर तिने फारच उकरून नाश केला. रामचंद्र परतून बागाकडे आला तेव्हां दरवाजा उ. घडा आहे, व बागांत कोंबडी जशी कांहीं माळीण च. मत्कारिक काम करते आहे, हे पाहातांच त्याला अति- | शय क्रोध आला, आणि मोठ्या स्वराने ह्मणतो, हा ! दुष्टे, किती नाश केला रांडेनें, थांब तुझें आतां काम काढितो. असें ह्मणून कोंबडीस जावयास वाट न मि- ळावी ह्मणून बागाचे दार बंद केले, आणि दगड, धोंडे, | ढेकूळ, इत्यादि में हातीं सांपडले ते घेऊन तिचे पाठी- मागे लागून तिला मारूं लागला. कोंबडी भयाभीत होऊन तिच्याने होई तितकें करून इकडे तिकडे पळून, भिंतीवरून उडून जाण्याचा यत्न करूं लागली; परंतु तिची उडी भिंतीवर न जातां पुन्हां रामचंद्राचे फुलझाडांवरच ती पडे. असें होता होतां एके ठिकाणी गुलाबाची पन्हेरी केली होती तीत तिचे पाय व पंख गुंतुन ती अडकली, तेव्हां रामचंद्रास वाटले की, आतां कोंबडी सांपडली, ह्मणून तिला ध- रावयासाठी गेला, तो पाचेच्या वाफ्यांचे वरंबे नवेच बांधले होते त्यांवर पाय कसा द्यावा हे रागाचे भिरा- रीत ध्यानांत न आणितां पाय देऊन ते त्यानेच तुड- वून टाकिले. बाळमित्र. कोंबडी आपला शत्रु' आला असें पाहून घाबरी झाली, आणि पुन्हां भिंतीवर उडावयास यत्न करूं लागली, तथापि तिची उडी भिंतीचे माथ्यावर गेली नाही, परंतु उडते समयीं पंखाच्या फडाक्याने जवळ- चा दवणा मात्र मोडला. असा नाश झाला तो पाहतांच त्याने हातांत पा- वडे घेऊन रागें रागें मोठ्या जोराने तिच्या अंगावर फेंकलें, परंतु ते तिला नलागतां चक्रासारखें उडून खि- डकीवर पडले, तेणे करून त्या खिडकीची दोन भिग फुटली आणि पावडे दगडावर आपटून मोडले. हे नुक सान होतांच रामचंद्र कुदळ आणावयास धांवला, त तिकडे कोंबडी अगदी दमन एके ठिकाणी कोपन्यास जाऊन बसली. कदाचित तो कदळ आणता तर त्या बापडीची वर्षे भरली असती. परंतु इतक्यामध्ये तो गलबला ऐकून गोविंदराव धांवत आला. रामचंद्र आपल्या बापास पाहतांच गल. बलून उभा राहिला; पण तोंडावाटें अशी अक्षरें नि- घाली की, पहा, तात्या, ही कशी द्वाड जात, हिने मा झे बागांत किती खराबी केली ती ! गोविंदरावाने त्याचे बोलण्याची अनास्था केल्या सारिखें करून उत्तर दिले की, जर त्वां दार उघडे ठेवि -लें असते तर ही खराबी कशाने झाली असती १ त तर कोंबडी, अज्ञानच, तुझा नाश होईल हें ज्ञान तिल आहे की काय ९ असे असतां त्या गरिबावर दांडगा कोबडी. ईने त्वां आपले सर्व बळ योजिलें, तुला लाज कशीरे वाटली नाहीं १ तिच्या अंगी विचार आहे की काय ? तुझ्या नुकसानीसाठी तिनें फुलझाडे उपटली असें नाहीं, आपल्या आहाराकरितां मात्र. ती आपला आहार शोधीत असतां जर तिनें गव. ताची मुळे उकरली असती तर तुला इतका राग येता? तिचे गांवीं गवत आणि फुलझाडे दोन्ही सारखीच. तूं युक्तीने काम करतास तर इतका नाश का होता. पा- हतां अंती दोष तुजकडेसच. जर तिला हळूच बाहेर हांकून लावले असते तर माझ्या खिडकीचा व पावड्या- चा नाश झाला नसता; दोन तीन झाडांचीच काय ख- राबी झाली असती ती असती. आतां तिचे वांटची तुलाच शिक्षा करावी हे योग्य. जर आतां ह्या झाडाची एक चांगली छडी काढन, जसें तूं कोंबडीचे पारिपत्य करीत होतास तसे मी तुझें केलें तर कसें १ परंतु सर्वांस राग आटोपायाचे सामर्थ्य आ. हे, ह्याचे खरेपणाची खात्री तुला करून दाखवितों. जरी मला राग आला आहे तरी मी आतां तुला मारीत ना- ही, परंतु तुझ्या रागामुळे जो माझे खिडकीचा नाश झाला तो मी सोसणार नाही. तर इतकेंच करीन की, तुझ्या खाऊच्या पैशांतून खिडकी नीट करावयापुर्ने काढून घेईन. असें बापाचे बोलणे ऐकतांच रामचंद्र खजील होबाळमित्र. ऊन तेथून निघून गेला, आणि ते दिवशी पुन: बापा पुढे तोंड दाखविण्याचे त्यास धैर्य राहिले नाही. दुसरे दिवशीं गोविंदरावाने रामचंद्रास झटले की तुझा संतोष असला तर मजबरोबर बागांत फिरावयार ये. नंतर रामचंद्र बापा संगती बागांत गेला, परंतु आ दले दिवशींच्या अन्यायाची जी दिलगिरी त्याचे मनां त होती ती त्यास लपवितां आली नाही. बापाने त्या ची ती मुद्रा पाहून विस्मयाने विचारले की, मुला, असा खिन्न कां दिसतोस ९ तुला खेद होण्याचे कारण काय १ राम- मी खिन्न आहे ह्यांत आश्चर्य काय ९ गेले म हिन्यापासून आपले खाऊचे पैसे, एक दमडी खचितां म्यां जमा करून ठेविले, आणि मनांत या जिले की, हे दहा रुपये जमले आहेत ह्यांची ब याला चांगली साडी भाऊबिजेचे दिवशी घेईन, प रंतु आतां अर्धे अधिक रुपये तुमचे खिडकीकडे ख र्च होतील, मग ते कशाने घडणार ! गोविंद०- बहिणीस भाऊबिजे बद्दल साडी देणा' होतास झणून तुला आनंद होता खरा, परंतु अगा दर खिडकीच नीट केली पाहिजे, कांकी रागाच्या योगानें नाश फार होत असतो, ह्मणून राग आय पला पाहिजे; ह्यासाठी ही शिक्षा तुझ्या अनुभवा आली झणजे पुनः असा रागास येणार नाहीस. राम- तान्या, मी आजपासून बागाचा झोंपा का कोबडी. ५१ उघडा ठेवणार नाहीं; जरी कदाचित् मी चुकलों त. री कोंबडीचें पारिपत्य करणार नाही. गोविंद०- काय ? ह्या पृथ्वीत कोंबडीच का एवढी तु. झा अपराध करणारी आहे. दुसऱ्या कोणास तुझा नाश करितां येणार नाही की काय ९ राम- नाहीं नाहीं, तात्या, एकदा मी पृथ्वीच्या न. काश्याचा पट बसकरावर पसरून बाहेर गेलो, तों इतक्यांत माझी धाकटी बहीण खोलीत आली, आ. णि तिनें दौतीत लेखणी बुचकळून त्या नकाश्याव. 1. र बिरखुड्या ओढल्या. आतां त्यांत गुजराथ कोठे, बंगाला कोठे, हे कांहींच समजत नाहींकाय करावे ? गोविंद- तर दुसऱ्या कडून आपणास असा अनर्थ । नव्हावा, ह्याविषयी प्रथमच बंदोबस्त राखावा की नाही? राम- होय, तात्या. गोविंद ०- तुला जिवाचा कंटाळा यावा ह्मणून मी सां. गत नाही, पण तुला समजावयासाठी सांगतो की, कोंबडीनें जो तुझा नाश केला त्यापेक्षा अधिक अनर्थकारक गोष्टी ह्या आयुष्यांत तुला पुष्कळ भो- गावयास पडतील. जसें कोंबडी तुझा नाश होईल हे मनांत न आणितां किडे वेंचावयास लागली, तसे लोक तुझें हित किंवा अहित हे मनांत न आणि- तां आपलेच सुख पाहतील. राम- धाकटे बहिणीचे कृत्यावरून पाहतां मला असे बाळमित्र. वाटते की, बिरखुड्या ओढण्यांत तर तिला मुख थो- डेंच झाले असेल, परंतु तिनें तितक्याच मुखासारी माझे परम उपयोगी नकाश्याचा नाश केला. गोविंद०- तुला बाहेर जावयाचे होते तर अगोद ॐ त्या पटाची घडी करून ठेवावी की नाही ? राम- होय, करून ठेवावयाची होती खरी. गोविंद- तर आतां आजपासून सावधपणे असे रा हावे की, लोकांपासून आपला कांहींच नाश होई. कदाचित् दैवयोगाने झाला तर मूळचा झा लेला नाश अधिक न होऊ देतां यक्तीनेच तेवर सोसला पाहिजे. राम- पण कसा सोसावा ९ गाविद - थोडकाच असला तर काही काळजी क रावी नलगे. फार असला तर धैर्य धरून सोसावा ह्याविषयींचा अनुभव, येथें तंनि मीच आहो, काह चिता नाही, ह्मणून सांगतो. भिवरावाशी कोणत्य रीतीने मी वागलो ती रीत तुला सांगतों, ऐक. राम- तात्या त्याचे तर नांव घेऊ नका. आज दा न वर्षे रस्त्यांत त्याची तमची गांठ पडली असताह कधीं तो तुह्मांकडे पाहात देखील नाही. उलट लोकांत तुमची अप्रतिष्ठा व्हावी ह्मणून टीका बरीच करीत बसतो. गोविंद०-- तो मजी असा का वागतो हे तुला का ही माहीत आहे ९ कोबडी. राम०- नाहीं तात्या, आणि कसें ह्मणून विचारण्या. चेही अझून मला धैर्य नाही. गोविंद- त्याला माझा द्वेष करण्याचे कारण मिळून इतकेंच की, चिटनविशीची असामी आमचे तीर्थ- रूपां कडे पस्तीस वर्षे होती, त्या लिहिण्यांत मला तीर्थरूसांनी फार हुशार केले, म णून ती जागा म. ला मिळाली. त्याकाळी भिवराव हा संभावित गृहस्थाचा मूल एवढा मोठेपणा मात्र त्याचे अंगी : होता, वरकड दुसरा एकही गुण सांगावयाजोगा नव्हता. त्याचे जितके वशीले होते तितक्यांनीही त्याविषयीं यत्न बहुत केला, परंतु सरकाराने पुरती चौकशी करून मलाच काम सांगितले, ह्यामुळे आ. मांवर त्याची एवढी कृपा आहे. राम- तात्या, मी तुमचे एवढा जर असतो तर मग त्यास दाखवितों. गोविंद०- असें नाहीं, मुला, त्याचेच मर्जीप्रमाणे त्यास चहाडी सांगण्याची वगैरे सदरपरवानगी दि. ली आहे.. कोंबडीने तुझा नाश केला त्यावेळेस तुला जसे वागावयास योग्य होते त्याप्रकारे मी वागतों; तुझी दवण्याची झाडे किड्यांकरितां जशी कोंबडीने उपटली, तसे माझी प्रतिष्ठा हाच दवणा त्याला तो मनांतील स्पर्धेस्तव उपटतो, आतां जर मी त्याचा सूड घेण्याकरितां झटेन, तर जसें त्वां आ- पल्याच पायांनी आपले पाचेचे रोप तुडविलें, तशी बाळमित्र. मी आपल्याच हाताने आपली प्रतिष्ठा क्षीण करीन. लवकर पारिपत्य होण्याबद्दल जसा पावड्याचा व खिडकीचा नाश झाला, तसा माझ्या सुखाचा व द्रव्याचा नाश होईल. आतां तूं नाशाचे स्मरण ध- रून बागाचा झोपा कोंबडीचे आंत जाणे न हो- ण्याकरितां जसा लावशील,तसा मी आपला मुस्व. भाव त्याच्या कुस्वभावाच्या लहरी मजवर न या- व्या ह्मणून मध्ये आड करीन. मग जशी कोंबडी झोप्याजवळ जाऊन चोंचा मारमारून आपणाला मात्र दुखापत करून घेईल, त्याप्रमाणे हा शत्रु माझे गंभीरपणाजवळ निंदा करता करतां कंटाळून प. श्यात्ताप पावेल. जर मी रागावलों तर लोकांचे दिसण्यांत मी केवळ ओत्सा असें येईल; ह्मणून त्याने केलेली निंदा मी तुच्छ मानितों तेणेकरून माझी प्रतिष्ठा तशीच राहून त्याचीच अप्रतिष्ठा होत राम०- आहा! तात्या, तुमचे सांगण्याप्रमाणे जर मी वागेन तर मीही दुःखांतून असाच पार पडेन. इतकें भाषण झाल्यानंतर उभयतां पितापुत्र घ री गेले. बापाने जो उपदेश केला तो रामचंद्राचे म नांत पक्का ठसला. पुत्रास हितोपदेश केल्याने पु तदनुरूप चालला असतां बापास जे सुख होते, ते गो विदरावाने अनुभविले.