बालमित्र भाग २/लहानजुगारी
लहान जुगारी २७९ शिवराम • • .. ..... माधवाचा मित्र. गोविंदा ................ माधवाचा शेजारी. विठू दाजी ....... पैजेचे खिलाडू. तात्या) स्थल जयरामाचा बाग. प्रवेश १, शिवराम आणि गोविंदा. शिव०- तुला माधवाचे घरी जावयाचे काय काम आहेरे? गोवि०- काही बोलावयास त्याचे येथे जावयाचे आहे, पण तूं त्यास वळखतोस १ शिव.- होय, त्याची आणि माझी उगीच तोंड ओ- ळख आहे; पण अगोदर कधी तुझी त्याची इतका ओळख नव्हती. गोवि.- त्याचे शेजारी माझे बापाने बि-हाड घेतले तेव्हांपासून मी त्याची सोबत धरिली आहे, काल रात्रीस मी न्याजबरोबर गंजिफा खेळत होतो. शिव.- आतांशी त्वां गंजिफांवर बरेंच ध्यान धरले आहे. मी तुला दाजी, विठू, ह्यांचे संगती फार वे. हां पाहिले, पण हे चांगले नव्हे. २०० बाळमित्र. गोविं.- एकून तूंही त्यांना ओळखून आहेस, मला तर, बाबा, त्यांची संगत नको; एकदा सुटती तर बरें होतें. शिव.- पण ते तुझ्या मनात येईल तेव्हांना तूं त्यांची -संगत सोडशील १ गोविं०- ते माझ्याने आजच करवत नाही, पण मी तुला एखादी गोष्ट जर सांगितली तर तूं कोठे फो. डणार तर नाहीस १ parms शिव०- तूं संशय कां धरितोस ९ तूं नि मी काही आजकालचे मित्र आहों ? गोविं०- काय सांगू, शिवरामा! त्यांनी मला फार ना- डले, ह्मणून मी पैज केली, पण ते जर का माझ्या बापास कळले तर तो मला घराबाहेर हांकून ला. वील. काय सांगू? मला क्षणभर देखील चैन नाही. शिव.- ती पैज कशी काय आहे बरें। गोविं०- त्यांनी मला काल एके ठिकाणी फसवून नेले, तेथें तात्या ह्मणून एक पोरगा होता, तेव्हां तो आह्मी सारे गंजीफा खेळू लागलों, न्यांत म्यां आपले सारे पैसे हारविले. शिव०- त्यांनी काही दगाबाजी केली असेल ह्मणून तूं फसलास; तुला सांगतों, झाले ते बरेच झालें, तुझें कांही फारसें गेलें नसेल. इतःपर मात्र तूं त्यांशी कद्धी खेळू नको, मणजे झाले. आतां जे तुझें नुलहान जुगारी २८१ कसान झालें तीच तुला हितावह शिक्षा झाली अ. से समज. गोवि०- पण अझून म्यां तुला कांहींच हकीकत कळविली नाही, अगोदर पुरतें ऐक. जों जों मी हरत गेलों तों तों मिळवीन मिळवीन ह्या लालचीने अधिक अधिक खेळत गेलो, तो दोन मोहरा, चा- कू, कातर, पागोटें, वगैरे में काय माझे जवळ हो- ते ते म्यां सर्व हारविले. इतकेंही जाऊन आणखी तात्यास एक मोहर द्यावयाची राहिली आहे, ती कसेही करून दिली पाहिजे. न देईन तर तो बा. पास जाऊन सांगणार आहे. शिव०- आतां तुला एक मसलत सांगतो. तूंच अगो. दर जाऊन आपले बापास सांग झणजे झाले. तो तुला रागें भरणार नाही हे मला पके ठाऊक आहे. गोवि.- ते तर मी प्राण गेल्याने करणार नाही. शिव- तर मग काय करशील ? गोविं.- तें तुला सांगावयास मला धैर्य होत नाही. शिव०- मजपाशीं सांगावयास काय चिंता आहे १ का- य ते मला ऐकू तर देशील ? गोवि- दाजी, विठू, ह्यांस मी सांगितले की आतां माझा उपाय नाही तेव्हां त्यांनी मला एक युक्ति सांगितली. शिव.- अहा त्यांची युक्तिनाः फारच खाशी असेल. २८२ बाळमित्र. गोवि०- ह्यांत कांहीं भलमनसाई नाही, पण मी तरी __ कसे करावें, दाजी, विठू, ह्यांजकडे मला माधवान नेले पाहिजे, कांकी त्याजवळ पैसे फार आहेत. शिव.- त्याचे पैसे तूं चोरून घेणार की काय? गोविं०- ईश्वर करो की मजकडून असें नहोवो, इत- केंच की, तात्याने जसे मला केले तसे तो माधवास ही करणार आहे. मग वाटणी होईल, असा युक्ती. ने मी कर्जातून मुक्त होणार आहे. शिव.- त्यांनी जसें तुला ठकविलें आहे, तसें तूं आ. पल्या मित्रास फांशांत घालणार आहेस, पण माधव हारेलच हे तरी कशावरून ह्मणतोस ? गोविं०- होय, होय, तो अकृत्रिमपणे खेळतो खरा. शिव.- आणि तूं लबाडीने खेळतोस काय ? गोवि.- काय लबाडीने मी कधी तरी लबाडी करीना शिव०- नाही, नाही, तुझी खेळण्यांत लबाडी कधीच आढळली नाही, ह्मणूनच तूं बुडालास, पण आता- ही खरेंच खेळशील तर मग त्याला कसे जिंकशील' गोवि.- कसे जिंकावें हे मला माहीत नाही, पण व्यांनी सांगितले की जिंकावयाची एक युक्ति आहे त्या युक्तीने खचीत जिंकू. शिव- त्यांची युक्ति लबाडीची आहे, पण तूंही त. शीच युक्ति करणार की काय १ मी इतका गरीब आहे तरी अशी युक्ति करून कधी पैसे मिळविणार नाही. तुझा अभिप्राय पाहून मला फार खेद वाटतो, लहान जुगारी गोविं- हे काय, बरें, शिवरामा, तूं मजवर कृपा क- रूंन मला सहाय हो, ह्मणजे मी प्रतिज्ञा करीन- शिव०- प्रतिज्ञा ! त्वां कशीही प्रतिज्ञा केली तरी मी तुला कधी सहाय होणार नाही. गोविं.- असे नव्हे, मी बोलतों की ह्या लबाड ता- त्याचे पैसे कसे तरी एकदा फेडल्यावर त्याची किं. वा त्याच्या सोबत्यांची संगतं सोडून देईन, आणि पुन्हां कधी गंजीफा हातांत धरणार नाही, ही प्र. तिज्ञा मी करितो. असे जर न केले तर मग तूं माझ्या बापाजवळ सांग. माधवास ठकवावे हे मा- झ्या मनांत नाही, आणि कसें ठकवावें हेही म. ला ठाऊक नाही. ठकवावयाचे काम तात्याकडे. मी आपला उगीच सोबती खेळणारा मात्र, त्यांनी मला वचन दिले आहे की आह्मी तुला कदापि हारूं देणार नाही, आणि जितके पैसे मिळतील त्यांतून तुला वांटा देऊ. शिव०- बरें तर मीही तुझ्या मंडळीत मिळतो. गोवि०- ठीक आहे, मी आतांच माधवास बोलावून आणतों. त्याचा बाप कोठे दुसरे गांवी गेला आहे, तो एक महिनाभर यावयाचा नाही. शिव-पण तुझ्या ध्यानांत इतके असूं दे. तूं हो- ऊन आंगे जर माधवास ठकविशील तर- गोवि०- असे झणूं नको, मी तुजशी बोललो नसतों तर बरें होतें.. २८४ बाळमित्र. शिव- होय, तूं बोलला नसतास तर मला ह्याचे कांहींच कारण नव्हते. गोविं०- तुला ९ काय कारण १ शिव- सद्गुणी मुलाशी लबाडी करणे हे मला कसे साहेल १ गोवि०- पण, तूं त्याला काही ठकवीत नाहींसना ९ मग काय ९ शिव- कसे बोलतोस कोण जाणे, अरे, कोणाची कांहीं वस्त चोर नेतो आहे हे न्वां पाहिले तर, काय उगीच राहशील १ गोवि०- फार झाले तर तो तीन च्यार मोहरा हारे तंवर खेळेल, मग तो खेळणार नाही. शिव- पण तितक्यानेच आतां जशी तुझी अवस्था झाली आहे तशीच त्याची पुढे होईल. प्रवेश २ गोविंदा, माधव, आणि शिवराम, (माधव शिवरामास भेटतो.) गोवि०- आज तूं बागांत खेळावयाला कां गेला ना. हीस १ माध०- मी आतांच बागांतून आलो. आज मी बापा. बरोबर आंबराईत वन भोजन करावयास गेलो होतो. गोवि.- तुझा बाप आला काय ९ तर, गड्या, मी लहान जुगारी २८५ खचीत सांगतों की तुला बाप आला ह्मणून संतोष वाटत नसेल. माघ.- तो वीस दिवसांनी गांवाहून आला आहे, तेव्हां संतोष कसा वाटणार नाही १ गोवि - माझे आईबापांची मला आवड आहे, पण ते जर कोठे बाहेर गेले तर मला वाईट वाटणार नाही. माधा- माझ्या आईबापांची मला इतकी आवड आ- हे की ते कधी दृष्टी वेगळे झाले तर चैन पडत नाही. गोवि०- माझ्या आईबापांचा मला इतका धाक आहे की अंमळ इकडे तिकडे जातां किंवा खेळतां कामासनये. . शिव.- तुला कोणत्या प्रकारचे खेळणे पाहिजे को- ण जाणे? माध.-ब्वां, आपल्या देखतां तर कधी झणजे तुझ्या बापाने तुला मटले की कोठे जाऊं नको, अगर खेळू नको, हे तर कांही आपण ऐकिलें नाहीं; तु- ला बरीक म्यां बागांत आणि ओट्यावर खेळतां- ना पाहिले आहे. गोविं.- जेव्हां माझा बाप बाहेर जातो तेव्हां मात्र मी तुझ्याशी बोलतों आणि खेळतो. आज तुझा बाप घरी आला, तेव्हां तुला आज रात्री आह्मांब. रोबर खेळावयास फावणार नाही. २८६ बाळमित्र. माधo- कां तो येऊ देणार नाही तसे काही नाही. जे काय मी ह्मणतों तें तो पुरवितो, पण म- ला बापाच्या सोबती शिवाय दुसरे कोणाची सोब. त आवडत नाही. गोविं०- अहा, तुझा बाप फार चांगला आहे, जेथे तुझ्या मनांत जावयाचे येते तेथें तो तुला जाऊं देतो; माध०- होय, खरेतें. कोठेही जाणे झाले तर मी बापा. स विचारितों, ह्मणूनच तो मला जाऊ देतो. शिव० - आणि तूंही बापाच्या झटल्याप्रमाणेच अ- 7वश्य वागत असशील गोवि०- बरें, पण बापजवळ असतां तूं आपले मन कसें रमवितोस . माध०- उन्हाळ्यांत व हिवाळ्यांत बाहेर जातों, पावसाळ्यांत आणि जे दिवशी कोठे जावयाचे नसते तेव्हां घरी राहून अधिक विद्याभ्यास करि- तों, व कधी कधी तिघां चौघां बरोबर नाटक खेळत असतो, नाटकावर आमची भारी आवड आहे. गोविं०- पण, अशा कामाने तुला भारी कंटाळा येत असेल असे वाटते. माध०- नाही, नाही, तेणेकरून तर आझांस भारी . आनंद वाटतो. गोवि०- पण त्यापेक्षां गंजीफांचा खेळ फार चांगला आहे नव्हे ! २८७ लहान जुगारी माध०- होय, तो तर माझा बापही खेळतो. गोवि०- कधी वधी रुपयांची पैज लावून खेळत अ- सतोस? माध- होय, थोडीशी पैज लावून खेळतो. ह्याचे कारण असे की खेळण्यांत मन लागावें, ह्मणून बाप ह्मणतो की पैसे हारले असतां राग येऊनये. संवय मात्र लागू देऊनये, इतक्याला जपावें. गोविं.- थोडक्या रुपयांची पैज करून खेळावे हे फार चांगले आहे; कारण की पैक्याचे संरक्षण झाले पाहिजे. माध०- मजजवळ पैसे नाहीत, असे समजूनको; मला खर्चापुरते पैसे मिळून आणखीही मिळतात. गोविं०- किती, कसे, बरें ? माध- दर महिन्यास एक मोहर गोवि०- पण इतके दर महिन्यास मिठाई वगैरे घ्या- वयास मिळतेंना माध०- सारा दिवसभर भातुकलीस पैसे बापाजवळ मागूनयेत ह्मणून एक नेम बांधून ठेविला आहे, पण मी त्यांतच काटकसर करून जमवीत असतो. शिव- खरेच आहे; पदरचे पैसे खर्चावे लागतात, ते. व्हां पाहून पाहून पदार्थ घ्यावे,आणि चार ठिकाणी किमतीची चौकशी करावी, हे चांगलें, ठीकच आहे. माध... खरी गोष्ट ह्मणतोस, शिवरामा, पण असे क. रून पैसे जमा करणार विरळा. पहा मजजवळ आ. २८८ बाळमित्र ज पांच मोहरा आहेत. गोवि०- इतके जमलेले पैसे कोठें खर्चशील १ माध०- कां ९ मला खर्च नाही की काय ९ कांहीं आ- वडते पदार्थ विकत घ्यावे लागतात, आणखी मी दु. सऱ्या तन्हेनें खर्चीत असतो. माझ्या चाकराचा मु. लगा आहे त्यास मी शाळेत पाठवितों, आणि मा. झा लहाणपणचा पंतोजी आंधळा आहे ह्मणून मी त्याचे पोटास कांहीं देत असतो, इतकें होऊन बा- की राहिले तर गंजीफा वगैरे खेळण्यांत खचितों. गोविं- गंजीफा खेळण्यांत तुझें दैव फार चांगले आ. हे, थोडे दिवसांमागें त्वां गंजीफांचे खेळांत माझा एक रुपया जिकला होता. माध०- मला ते फार अवघड वाटते. मित्राचे पैसे जि. कून घेतले असतां ते सर्वदा मनांत डाचीत असते. गोविं०- बरें, तर, ते पैसे खर्च करण्याची तुला त- शीच कांहीं एक हिकमत सांगेन, पण आजरात्रीस तुला कांहीं काम आहे १ माध.- नाही, नाहीं, मी रिकामाच आहे; आज मा. झा बाप एक्या गरीब बायकोची अर्जी लिहिणा- र आहे. गोविं०- बरेंच झालें, माझाही बाप आज संध्याका- ळी बाहेर जाणार आहे, तर तूं माझ्या घरी ये, मी विठू, दाजी, आणि तात्या ह्यांस बोलावीन. माध०- बरें तर, मी आपल्या बापास विचारून येतो, २८९ लहान जुगारी ' तंवर तूं एथेंच ऐस. गोवि०-नाही, मी त्या तिघांस बोलवायास जातो, तु. झा निरोप मला शिवराम कळवील. प्रवेश ३ शिवराम एकटाच आहे. ) ह्या असल्या कामांत माझी कल तर कुंठित झाली, बापडा गोविंदा फसला आहे: त्याला संकटांतून काढावे हे मला बरे वाटते, परंतु ख- प्रमाणीक तो माधव त्याशी जर कोणी लबाडी करूं कागले तर त्यास मी करू देईन काय ९ चोरास सामी. ल होणे आणि चोरी करणे बरोबरच आहे, ह्यासारी श्री माधवाला फसवू देणार नाही. माधवाकडे जाऊन ही गोष्ट मी त्याला कळवीन. पण राधाही इकडेसच येत आहे, बरेंच झालें, मी मित्राचा विश्वासघात कर. मार नाही. माधव न फसावा ह्मणून ही गोष्ट अगोदर मी राधेस सांगेन. प्रवेश ४ राधा आणि शिवराम शधा-शिवरामा, तूं तर इकडे एकटाच आहेस! मला २५ २९० बाळमित्र. वाटले की माझा भाऊही इकडेसच आला आहे. शिव- तो आतांच तर एथन गेला. राधा- त्याला तुझी सोबत असती तर फार बरे होते, तो गोविंदाशी स्नेह करावयास इच्छितो. शिव- त्याचे सोबतीत राहिल्याने माधवाचे अझून तर काही गमावले नाही, पण- राधा- ते खरे; माझा भाऊ फार भोळा आहे, त्याचे मनांत इतर लोक आपल्या सारखेच भोळे असतील, पर ज्यांना तो आपले मित्र करूं ह्मणतो ते तसे नव्हत. ते केव्हां फसवितील ह्याचा विश्वास नाही. गोविंदाची सोबत तुला बरी वाटत नाही हे मला माहीत आहे. शिव०- खरेंच जर विचारशील तर माधवाने गोविंदा- ची सोबत धरूं नये हे मला बरे दिसते. राधा- बहुतकरून असे घडते की नाश झाल्यावर मग माणसांचे डोळे उघडतात, ह्यासाठी प्रथमच सा- वध असावें, शिव.- तूं आपले भावावर प्रीति करतेस हे मी पुर- ते जाणतों, ह्याकरितां मला शिवरामाने सांगितले असे कोणास कळू देऊ नको, पण तुला सांगतों, गोविंदानें तान्यास वचन दिले आहे ह्यासाठी ता- त्याशी किंवा त्याचे सोबत्यांशी आजरात्री खेळं नको ह्मणून माधवास सांग, तो आतां हो अगर ना सांगावयास येणार आहे, ह्मणून मी बसलों लहान जुगारी २९१ होतो, पण आता मी बाहेर जातो. तो आतां ये. ईल. माधवाचा नि माझा भारी स्नेह आहे ह्याकरितां तुला सुचविणे प्राप्त आहे. प्रवेश ५ माधव आणि राधा. माध०- माझा बाप नुकताच गांवाहून आला ह्मणून मोठे मोठे गृहस्थ त्याला भेटावयास आले आहेत, तेथे फार दाटी आहे ह्याकरितां मला बोलावयास अवकाश झाला नाही. राधा- अशी कोणती मोठी गोष्ट तुला त्यांजवळ वि. चारावयाची होती माध०- मोठीशी काही नाही, मला आपले मित्राचे घरी जावयाकरितां विचारावयाचे होते, राधा- गोविंदाचे घरींना १ माध०- होय. राधा- मी तेव्हांच अटकळ केली, पण ह्यांत कांहीं चांगुलपणा नाही, हे तुला कसे कळत नाही ? माध०- त्याला तूं ओळखतीस ९ . राधा- त्याची चालचर्या पाहूनच मी तर्काने जाणते. माध०- काय, त्याची तुझी नेहमी संगत सोबत आहे का झणून त्याची चाल तुझ्या ध्यानात आली १ २९२ बाळमित्र.. राधा- तो कोणाचे पंक्तीस बसतो हे पाहूनच त्याची चाल कशी आहे हे मला समजतें, माध०~ मी समजलों, त्याचे सोबतीची मुले वाईट __ आहेत, त्यांतला मीही एक आहे ह्मणून. राधा- तुला नाही, पण तुजपेक्षा त्याचे जुने स्नेही फार दिवसांचे आहेत त्यांस मी लबाड लुच्चे असें नांव ठेविते. माध०- काय ९ ते लबाड आहेत ? राधा- लबाड पर सात लबाड. जे दुसऱ्याचे पैसे फ- सवून घेतात आणि त्या पैशांचा भलताच खर्च क. रितात, त्यांस लबाड ह्मणावयास भय कोणाचें! माध०- ह्यांत त्यांची लबाडी दिसत नाही, कांकी ते दोन घटका गमत करावयासाठी खेळतात आणि पैसे मिळवितात, मग ते आपले इच्छेप्रमाणे खर्च करितात, असें तर आझी देखील करतो. वरकड तूं ह्मणशील की ते पैसे जिंकावयासाठींच खेळतात. तर ते मजबरोबर खेळतांना फार वळेां हारले आहेत. राधा- होय, होय, त्यांनी आपले तांब्याचे पैसे हार- विले आणि तुझे रुप्याचे जिंकले. माध०- बरें तर ह्यांत माझाच नाश झाला, तुझें तर कांहीं गेलें नाहीं? मग उगीच कां माझें डोके उठ- वितेस . मी तुला सुख देतो आणि तूं मला दु:ख देतेस. लहान जुगारी २९३ राधा- (त्यांचा हात धरिते. ) असे नव्हे भाऊराया, तुझा ज्यांत संतोष त्यांत माझाही आहे, तुझे सु. खास विघात करावा हे मला चांगले वाटत नाही, पण- दादा इकडे आले ते पहा. प्रवेश ६ जयराम, माधव, आणि राधा. - अरे मुलांनो, आतां मी फार संतोष पावन । आलों. साधा- तुझी गांवाहून परत येऊन आपल्या स्नेही मंडळीस भेटला ह्मणून तुह्मांस फार संतोष मिळा. ला असेल, पण त्यांना तुह्मांवर प्रीति करणें प्राप्त आहे. कांकी, ज्या आमांस तुह्मांपासून भय मि. ळावे ते आझीही तुह्मांवर प्रीति करितों, मग त्यां- नी करावी यांत काय आश्चर्य माध०- होय खरेंच आहे, दादा, तुह्मांवांचून आह्मांस क्षणमात्र चैन पडावयाचें नाहीं. जय.- मी काय तुमचे जन्मास पुरणार आहे ९ मज- वांचून तुझांस राहाणे प्राप्त आहे, कारणकी ही मृत्युलोकची वस्ती- राधा- अहाहा, दादा, हे काय! आमचे मनांत ही सुखाची घडी आहे, अशा समयांत अह्मांस तुझी उदास करूनका. २९४ बाळमित्र. माध.- दादा, आमचे कल्याणा करितां तुझी फार दिवस वांचावें ही आमची आशा आहे. तुही तर आमचे छत्र आहां, तुह्मांजवळ आज एक विचारा- वयाचे आहे. जय०- ते काय, बरे? माध-तुह्मी गोविंदाचे बापास ओळखतां? त्याने मला आजचे रात्री खेळावयास बोलाविले आहे. जय०- काय हा आपला शेजारी ९ त्वा हा नवा मि- । त्र जोडला हे पाहून मला फार आनंद झाला. राधा- ऐकिलेंना १ दादा ह्मणतात की तो चांगला सोबती आहे. माध०-- तो चांगलाच आहे, मीही त्यास तसाच ले. वितों. त्याची निमाझी तीनचारवेळां गांठ पडली. त्याने आपल्या मित्राशी तरी कितीवेळां मला भे- टविले होते. राधा- तेही तसेच चांगले सोबती असतील. माध०- होय, तसेच आहेत, तुजपेक्षा मी त्यांस फार ओळखतों जय.- माझा चांगला ह्मणण्याचा भाव मिळून हाच की कुलीन, शहाणा, रीतीचा असा असावा. माध०- ते तसेच आहेत. राधा - हे तूं कशावरून ह्मणतोस १ त्यांची तुझी ए. कदोन वेळमात्र गांठ पडली. माध०- पण मी त्यांचे बरोबर फार वेळ बोलत होतो, लहान जुगारी २९५ न्यावरून मी ह्मणतों. जय०- तुझी आणि त्यांची ओळख कशी झाली ? राधा- गंजीफा खेळण्यावरून. नाध०- मग १ ह्यांत काय १ दादांनीच मला गंजीफा खेळावयास सांगितले आहे. नय०- मी सांगितले खरे, पण ते केव्हां १ दुसरा कां- ही उद्योग नाही आणि कमैना, तर उगीच थोड- क्याशा पैशांची पैज करून खेळावे, कारण की द्रव्य मिळाल्याचा संतोष व गमावल्याचा खेद निवारण्या- ची संवय असावी ह्मणून. धा०- पण दादा, गंजिफांच्या खेळापेक्षा दुसरे चां- गले खेळ नाहीत काय १ जय०-ठीकच बोललीस, गंजीफा खेळण्याने वेळ घालविण्यापेक्षा दुसन्या रीतीने वेळ घालवावयास वाटा पुष्कळ आहेत; उगीच रिकामपणी गप्पा तां- शीत बसावें त्यापेक्षा त्या अवकाशांत गंजीफा खे- ळाव्या ह्मणून मी सांगितले. असा मीही कधीब- धी खेळत असतो. राधा- ह्मणूनच राजश्री खेळत असतील. माध०- पण तुला कोणी इतका रिकामा कारभार __सांगितला आहेगे ? उगीच कां मधे लुडबुडतेस ९ जय- अरे, तिला काहीतरी ह्यांत काळेबेरे दिसत असेल, ह्मणून ती बोलते. तुजवर एखादी गोष्ट ये- ऊन बेतली तर त्याचे निवारण मीच करणारा २९६ बाळमित्र. आहे, ह्याकरितां कोणतीही गोष्ट मला कळविल्या. वांचून गुप्त ठेवूनये. राधा, तुझ्या भावाचे मित्र तुझ्या मनास कां येत नाहींत १ सांग. राधा - त्यांना गंजिफांचा भारी छंद आहे. माध०- तुला कोणींगे सांगितले, की त्यांना गंजिफां. चा भारी छंद आहे ह्मणून ९ राधा- त्याची काही चिंता नाही, पण गोष्ट खरी आहे. जय- म्यां तुला अगोदरच सांगून ठेवले आहे की, किती एक खेळ फार वाईट आहेत. माध.- माझे मित्र जो खेळ खेळतात तो फार सोपा आहे, त्याचे नांव एकतिशी. जय- तो खेळ कांहीं मला चांगलासा वाटत नाही. माधo- कां नाहीं बरें : दादा, मला वाटते की त्या. पेक्षा दुसरा खेळ चांगला नाही. ज्याला एकति- सांचे आंत अधिक ठिपके मिळतात तो जिकितो. जय०- तुला ठाऊक नाही, हा खेळ दैवावरचा आहे. माध०- खेळामध्ये जिंकणे किंवा हारणे हे प्रारब्धाचे स्वाधीन ही गोष्ट खरीच आहे, पण सर्व खेळ ह्या- प्रमाणेच आहेतना १ जय.- त्यांत अंतर आहे; ह्या खेळांत प्रारब्धावरच सर्व हवाला आहे, एथें बुद्धीचे काम नाहीं; इतर खेळांत शाहाणपणाची गरज आहे. थोडक्यात सां- गतो, दैवापुढे शाहाणपण चालत नाही, ह्यासाठी म. ला असे वाटते की ज्यांत बुद्धीचे कौशल्य अधिक लहान जुगारी २९७ आहे त्याचे नांव खेळ. राधा- आणि तसल्या खेळांत आपणास संतोष देखी. ल होत नाही, आपणास जी गंजीफ पाहिजे ती न मिळाली झणजे तिची भारी हळ हळ लागते. माध.- असें ह्मणूंनको, त्यांतच काय ती मजा आहे, जी गंजीफ आपणाला पाहिजे असती तिजकडे क- सें भारी लक्ष लागलेले असते! जय०- हा संतोष लोभामुळे उत्पन्न होतो; लोभ मो. ठा अनर्थकारी आहे, ह्या लोभामुळे सहस्रावधि लो- क बुडून जातात, आणि जे ठक आहेत ते अशा खेळांत भोळे प्रमाणीक ह्यांसच बहुत करून ठक- वितात. माध०-हे कसे बरे, दादा राधा- मला वाटते की हुकमा हुकमाची पाने की लावावी ही युक्ति ते जाणत असतील. जय.- होय, हेच खरे, त्यांची ती युक्ति कशी काय आहे हे मला काही माहीत नाही हो; पण आहे खरी, हे मी पक्के जाणतो. कशावरून ९ त्यांच्या त्या युक्तिनें बहुतांचा नाश झालेला मी फार वेळां पा. हिला आहे. माध- त्यांतली एखादी गोष्ट आझांस कळवाना, दादा जय०- बरें, ऐक, सांगतो. मी हैदराबादेस गेलो हो. तो, तेथे एके सावकाराचा तरुण मुलगा होता, त्या२९८ बाळमित्र. ला जुन्याचा छंद लागला, त्यापाशी लाख रुपयां- ची मत्ता होती ती आणि कांहीं वतन वाडी, तित- कीही त्याने जुवेबाजीत हारवून बुडविली, हे मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले. राधा- अबाबाबा! लाख रुपये बुडविलेना ९ मग त्या बापड्याची कशी अवस्था झाली असेल ? माघ- तो तर मग वेडाच झाला असावा. जय- तसेच झाले. आपले सर्व ट्रव्य बुडालें असे समजतांच तो वापरा सारखा काळा ठिकर पडला, तेव्हां माझ्याने तर त्याचे तोंडाकडे पाहवेना दे. खील, मग त्या दुःखाच्या योगाने त्याने आपल्या मिशा उपटल्या, डोकीत धूळ घातली, आणि मो- ख्याने उर बडवून ओरडू लागला, शेवटी मूर्छा ये. ऊन पडला. अशी त्याची चळ भरल्या सारखी अवस्था होऊन त्याखोलीतून बाहेर वेड्यासारखा भटकत गेला. माध०- पण, दादा, अशी त्याची अवस्था पाहून ज्यांनी त्यापासून द्रव्य जिंकून घेतले होते त्यांनी त्यास पुन: परत दिले नाहीं ९ मी तर, ब्वा, तसे केले असते. जय.- अरे, द्रव्य परत कस्चें! त्यांनी त्याला मा- घारे देखील आणले नाही, एकदा मात्र खेळावरू- न दृष्ट काढून त्याजकडे तिरस्काराने पाहिले. राधा- अरे, अरे, ते कसे निर्दय प्राणी होते । लहान जुगारी २९९ जय०- पण अझून सगळ्यापेक्षां वाईट गोष्ट ती सां- गावयाची तशीच राहिली आहे - त्याच रात्रीस त्याबापड्याने प्राण सोडिला. राधा- अरेरे काय मोठा अनर्थ झाला हा! माध०- छी छी, हे कर्म फार वाईट, दादा, मी तु- झांस वचन देतों की आजपासून कद्धी गंजीफा खेळावयाचा नाही, हाच मी गोविंदाकडे जाऊन सांगतो. जय- अरे, थांब, थांब, इतकी उतावळी करूंनको, एखादे चांगले कर्म वाईट रीतीने केल्यामुळे नाश झाला ह्मणून ते कर्म अगदीच सोडावे की काय ९ मी तुला काय सांगितले की मित्र एकच असल्या- वर खेळण्यांत मुख. मग त्यांत कांही नाश नाहीं, हितच आहे. राधा-हित आहे, दादा ? जय०- हित हेंच की तो खेळ आपणास अनुकूळ किंवा प्रतिकूळ जरी आहे तरी सहन करावें; आ. ही इतकेंच शिकतों, जिंकल्याचा हर्ष किंवा हर- ल्याचा खेद किमपि मनांत आणूनये. माध.- मी काही इतका निचाडा नाही की दुस- न्यास जिंकलें असतां त्याचा धिक्कार करीन आ. णि हरलों असतां आपला खेद लोकांत प्रगट क- रीन, पण वाईट गोष्ट परिछिन्न नघडावी ह्मणून गोविंदाकडे जाऊच नये हे बरें. बाळमित्र. जय०- ह्यांत कांही मोठीशी गोष्ट आहे असे नाही, तुला इकडे खेळणें नाहीं हाणून तूं असें ह्मणतोस, तिकडे जरी गेलास तरी खेळावयाचे तुझ्या हाती आहे. माध०- मला पकें गऊक आहे, मी गेलों ह्मणजे ते मला खेळावयास खचीत बसवितील. जय०- बरें कांही चिंता नाही, त्यांशी खेळलास तर तुझी आणखी दाट ओळख पडेल, पण गोविंदाचे घरी तूं जाऊंनको, त्यासच इकडे बोलावून आण, आणि सांग की राधाही खेळावयास इच्छिते आहे. राधा- पण दादा- जय- अगे, उगीच राहा, त्यांत कांहीं कारण आहे. राधा- खरे, पण त्यांनी माझे पैसे जिंकून घेतले तर मग म्यां काय करावें? जय०- ते मी परतून देईन. माधवा, त्यांस सांग की माझा एक मित्र आहे त्यास मी खेळावयास आणीन. माथ- दादा, पण माझा कोणी मित्र येणारा नाही. . मग असेंकसे सांगू जय०- अरे, माझा मित्र झटल्यावर तुझे ध्यानांत येत नाही राधा- दादाचे बोलण्याचा भाव त्यांजकडेसच आहे, हैं तुला समजत नाही काय ? माध०- होय दादा, तुझी खेळत असला तर ते अग. त्य येतील, लहान जुगारी. ३०१ जय-मित्र कोण हे त्यांस कळवू नको, आतां मी अर्जी लिहावयास जातो; परतून येईन तंवर तूं त्यांशी खेळत ऐस बरें ९ प्रवेश ७ राधा आणि जयराम. जधा- तुह्मी येथेच असा दादा, जाऊ नका, हे मला बरे दिसतें. जय०- कांबरें राधा-शिवरामाच्या बोलण्यावरून मला अंदेशा आ- ला आहे की, माधवाचे पैसे लबाडीने जिंकून घ्यावे असा त्यांनी कट केला आहे. जय.- असें आहे ? तर मी येथेंच लपून राहतो, तूं मात्र खबरदार हो, ते ठकबाजी करूं लागले तर कांहीं बोलूं नको. राधा- ते जर माझ्या भावाचे पैसे बुचाडूं लागले तर माझ्याने उगीच कसे राहवेलन जय- अशाने त्यांची खोडच मोडेल, पुन्हां गंजिफा खेळण्याचा नाद व नीचाची संगत धरण्याचा नाद अगदी मोडून जाईल. राधा- आपला माधव तर अगदीच भोळा, ब्वा, त्या- चे गांवीं कांही नाही. त्याचा स्वभाव न्यास अझुन ३०२ बाळमित्र. कळत नाही. त्यास असे समजेना की हा झणजे आपणास ठकवितो, आणि हरूं लागला ह्मणजे जो तापतो तो अगदी तांबडा लाल होतो, त्यास भान देखील राहात नाही. जय०- पण दाराकडे कोण आला तो ९ गोविंदा आ- पले मित्रांस घेऊन आला असे वाटते, आतां मी एकीकडे लपून राहतो. प्रवेश ८ गोविंदा, माधव, राधा, दाजी, आणि तात्या. गोविं०- ( राधेला ह्मणतो.) माझे मनास प्रशस्त वा- टत नाहीं, कां की आह्मी इकडे आलो ह्मणून क- दाचित तुह्मांस उपद्रव लागेल. माघ- तिला कांही आपला उपद्रव नाही, तीही आपल्या बरोबर खेळावयास येणार आहे असे माझे होन्यांत येते. राधा- होय, तुह्मी खेळू द्याल तर मी तुह्मांबरोबर खेळेन. दाजी०- ( मनांत वाईट आणून ह्मणतो.) बरेंच झा- लें तुह्मी आला, तर मला फार आनंद आहे. तात्या- (गोविदास हळूच ह्मणतो.) हे फार वा- ईट झाले, आतां ती जसें ह्मणेल तसे खेळणे प्राप्त आहे, आपण इकडे येऊन पस्ताई पडलों. लहान जुगारी. माध०- अहो गड्यांनो, माझा एक मित्र आहे त्यास मी खेळावयास आणीन, त्याचे जवळ पुष्कळ ट्र- व्य आहे. गोवि०- ठीक आहे. राधा- तुमची मर्जी असल्यास आपण येथे बागांतच खेळू. माझा बाप आतां इकडे यावयाचा नाही, तुह्मांस इकडे खेळं देण्याविषयी त्याने मला आज्ञा दिली आहे. (हे ऐकून विठू वगैरे सर्व मुले आ- नंद पावतात.) माधवा, चल आपण कांहीं भातु- कली आणि गंजिफा घेऊन येऊ. तात्या- कशाला जातां बाई, ह्या मजजवळ गंजिफा आहेत. माध०- काय तूं आपल्या खिशांतच नेहमी गंजिफा बाळगतोस १ तात्या- होय, मी आतांशी रात्रंदिवस गंजिफांचा अ./ भ्यास करीत असतो ह्मणून. राधा-- तुमच्या जवळ कवड्या आहेत ? सात्या- आह्मी पैसे लावितों. गोविं०- (तात्यास एकीकडे करून ह्मणतो.) मजजवळ पैसे नाहीत हे तुला माहीत नाही काय ९ (मोठ्या- ने) कवड्या नसल्या तर मोजावयास फारवेळ लागेल, ह्यासाठी बाई तुझी कृपाकरून जर कवड्या आणाल तर फार बरे होईल, बाळमित्र. राधा-बरें तर माधवा, चल आपण कवड्या आणा- वयास जाऊं. प्रवेश ९ गोविंदा, तात्या, दाजी, आणि विठू.. दाजी०- आह्मी येथे आलों ही फार वाईट गोष्ट झा- ली. नीट झाले नाही. विठू- त्याचा बाप येथें नाहीं मग काय चिंता आहे ? तात्या- (गोविंदास ) तूं अगोदर इकडे यावयास का राजी झालास १ गोवि.- येथल्याला आणि माझे घरच्याला काय अंतर आहे ? विठू- माधवाने सर्व आपला माल हरविल्यावर आ. पल्या मर्जीस येईल तेथे आपण जाऊन खेळं. दाजी- राधाबाईचे द्रव्य आही सर्व जिंकून घेऊ असें वाटते. तात्या- ह्यांत काय संशय आहे ? पण, गड्या, आपण पहिल्याने जपून खेळले पाहिजे; अगोदर एक डा- वाचा पण लावावा, तो त्यांसच जिंकू द्यावा, ह्मणजे त्यांस अंमळ लोभ उत्पन्न होईल, मग आपण दु. प्पट पण करूं. गोवि०- बरे आहे, हे तूं आपलें वचन मात्र विसरूं नको हो, तात्या. ३०५ लहान जुगारी. तात्या- तूं काही काळजी करूं नको, तूं नि मी ए. कच आहों. पण आझी परस्पर येकमेकांचे जे जि- कू अगर हरूं तें मात्र द्यावया घ्यावयाचें नाहीं हो, मी असें करीन की पहिल्याने त्यांसच जिंकू देईन, झणजे त्यांचे मन खेळाकडे बळकट गुंतेल. गोविं०- पण, तात्या, त्या दिवशी त्वां माझें सर्व भां. डवल जिंकून घेतले, आतां मजजवळ काही एक राहिले नाही. एक पावला मात्र राहिला आहे, तेवढा जर हरलों तर मग काय करूं ? तात्या- आतारे मी तुला कसा हरूं देईन १ तूं का चिता करतोस १ मी अशी खबरदारी ठेवीन की तूंच हटकून जिंकशील. दाजी- माधवाचा मित्रही येईल तर बरे आहे. मग तर आझांस खाशी दुसरी शिकार साधली. विटू-विद्याभ्यास करणारे लोकांस ठकविणे फार सोपे आहे. तात्या- आतां त्यांचे मनांत कांही कल्पना न यावी ह्मणून आपण अगोदरच खेळावयास प्रारंभ करूं या. (तो गंजिफा काढितो.) पहा गोविंदा, मी आतां कशा गंजिफा लावतो त्या, की तूं खचीत हरशील. (तो हातांत गंजिफांची गलत करितो.) पहा आ. तां. (विठू दाजी व गोविंदा ह्यांस तीन तीन गं. जिफा वांटून देतो, आणि आपण तीन घेतो, मग गोविंदास ह्मणतो. ) तुला पुरे ३०६ बाळमित्र. गोविं०- नाही, आणखी एक दे. तात्या -बरें तर, घे. गोविं०- (गंजिफा उलटून पाहतो.) माझे ठिपके जा- स्ती झाले, आतां मीच हरलो.. तात्या- ( दाजीस ह्मणतो.) तुला पाहिजेत ? दाजी- होय, मलाही एक पाहिजे. तात्या- घे तर. दाजी- माझे एकति सांवर ठिपके झाले, मीही हरलों. तात्या- (विठूस ह्मणतो.) आतां तूंही हरशील. कां९ गंजिफा देऊ ९ विठू- ते दोघेजण हरले त्यापक्षी मला नकोत. तात्या- तर मलाही नकोत. मोज, मोज, तुझ्या गंजि- फांवर किती ठिपके आहेत ? विठ्ठ-पंचवीस. तात्या- तर माझे ! तीस ! म्यांच जिंकिलें. मी मनांत आणले तर हेच उलटे करून दाखवीन. जिंकणे अथवा हरणे ही दोन्ही माझ्या हातांत आहेत. आतां माधवाची बहीण आली मणजे पाहशील चमत्कार. गोविं०- तर आमच्याही मनांत येईल तेव्हां आझी ही जिंकू. तूं ते कशावरून बोलतोस ? नात्या- हे शिकावयाकरितां त्वां आपले सर्व पैसे मजकडे हरविले ह्मणून मी ह्यांतला भेद तुला क. कवितों. माझी चाल आहे, मी पैसे जिंकल्यानंलहान जुगारी. ३०७ तर आपले मित्रास हमेशा सांगत असतों की मा. झी युक्ति शिका हाणजे जितके पैसे मी तुज पासू- न जिंकून घेतले आहेत तितके तूंही लोकांपासून जिकशील, झणजे फिटासफिट झाली. गोवि०- बरें, ते मला पाहूं दे, कसें ते. तात्या- हे पहा. ह्या दहा ठिपकेवाल्या गंजिफा, ही दहा टिपक्यांची राजाराणी इत्यादिक जी मोठ मो. ठी उंच पाने ती अंमळ लांब आहेत व पांच ठिप- क्यांचे आंत जी हलकी पाने ती अंमळ गहूं भर रुद आहेत ही ध्यानात ठेवन गलत करते समयी आपणास पाहिजेत तशी युक्तीनें खालवर लावा- वी. एखाद्यास ठकवायाचे असल्यास त्याला रुवा- कडची दोन पाने व पुस्ताकडचे एक पान इतकी दिली झणजे पंच विसांवर अधिक ठिपके होत ना- हील, मग तितक्याने त्याची तृप्ति होत नाही हा. णून तो आणखी मागतो तेव्हां रुवाकडचे एक मोठे हाणून पान द्यावें झणजे एकतिसांवर ठिपके अधिक होतात आणि तो हरतो. गोविं०- आतां मला कळले. तात्या- येवढीच कायती युक्ति. ही मी तुला कशी खाशी विद्या सांगितली ९ विठूला विचार, तो मा- झ्या युक्ती प्रमाणे खेळतो ह्मणून त्याचे हित कि. ती होतें तें. बाळमित्र. प्रवेश १० राधा, गोविंदा, तात्या, दाजी, आणि विठू. राधा- (गंजिफा व कवड्या बसकरावर आणून ठेवि- ते.) खेळण्याविषयी तुझी कांहीं खोळंबत नाहीं असे वाटते. तात्या- आली असून कांहीं खेळ मांडला नाही, उ. गीच मी गोविंदास दुसरे तव्हेचा एक खेळ मात्र शिकवीत होतो. गोवि.- तूंही खेळतीसना १ ये तर, तूं आल्याने आ- ____झांस फार संतोष होईल. राधा- तुझी कोणता खेळ खेळतां १ दाजी- खेळ तर अगदी सोपा आहे, ह्याचें नांव ह्मणा- ल तर एकतिशी. विठू- हा खेळ त्वां अगोदर जरी कधी पाहिला नाही तरी तूं आझांस जिंकशील. राधा- हा खेळ मला ठाऊक आहे, पण तुह्मी अल खेळणारे पडलां ह्मणून माझ्याने जिंकवणार नाही, पण तुह्मी जर नीट खेळू द्याल तर मी खेळेन. गोविं०- होय, पाहिजे तसें खेळेनास ? आमची कांहीं ना नाही. दाजी- त्वां आमांस जिंकिलें तरी आझी संतोषच मानूं. राधा- माझेही मनांत तसेंच आहे. विठू-जिंकिलें तरी फारसा नफा होणार नाही, कांलहान जुगारी. ३०९ की पण थोडा आहे. गोवि०- बरें, आतां अशा गप्पाच मारीत बसतां की कांहीं खेळतां तात्या- माधव येई पर्यंत खोळंबले पाहिजे. आपण त्याचे घरी आज पाहुणे आलो आहो.. प्रवेश ११ माधव, राधा, गोविंदा नात्या, दाजी आणि विठू. माध०- (पेढेबी जांब वगैरे मेवा मिठाई घेऊन ये- तो) चालूद्या आतां, मी आलो. विठू- आतां अगोदर कवड्या वांदन घ्याव्या, पण दरकवडीस किंमत काय ठरवावी ? माध०- मी पहिल्याने खेळलो होतो तेव्हां दरकवडी- चा एक आणा धरिला होता. राधा- बरे, चला, एक आणा का होईना १ तात्या- तर आतां खेळावयास लागतो. (तात्या गंजिफा वांटन देतो. त्याचे यक्तीने राधा व माधव हे लागोपाठ तीन डाव जिकितात.) राधा- अहा, असेंच जर आह्मी जिंकीत गेलों तर माझे बोलणे खरे होईल. तात्या- अॅ: एका आण्याचीच काय पैज करावी, तीत कांहीं फारसा नफा नाहीं तोय नाही. . बाळमित्र. दाजी- तर आतां दुप्पट पैज लावू. माध०- होय, मी कबूल आहे, माझे जवळ पैसे पु. ष्कळ आहेत, तुमी किती जिंकाल. ( तो आप- ली पिशवी दाखवितो. त्या पिशवीकडे पाहून ता. त्या व त्याचे गडी खुशाल होतात, ) राधा- मजजवळही माधवासारिखे पैसे आहेत. तात्या- बरें तर, पहिल्याने जे डाव झाले त्यांचा अगोदर हिसाब करूं, मग खेळावयास लागू. ( ता. त्या कवड्या मोजितो.) म्यां बत्तीस कवड्या हा. रविल्या, दोन रुपये झाले, हे घ्या आपले. विठ- माझ्या चाळीस कवड्या झाल्या, तर अडीच रुपये झाले ते हे घ्या. दाजी- माझें दैव फार वाईट, म्यां पांच रुपये हार- विले. माध०- तुझे किती गेले, गोविंदा ९ गोवि.- मजकडे एक रुपया मात्र झाला आहे; तो खेळ झाल्यावर मी मोहर मोडून देईन. राधा- आतां पहा मला किती पैसे मिळाले ते ! ( मो. जिते.) सात रुपये झाले. माघ- तर बाकीचे मला मिळाले, कायगे ? आमी दोघांनींच जिकिलें हे मला मोठे आश्चर्य वाटते. विठ्ठ- मी तर कधीच जिकीत नसतों. गोविं०- बरें, पण, आतां तर दोन आण्यांची पैज । आहेना १ लहान जुगारी. ३११ माध०-- हो, आह्मी कबूल आहों. तात्या- (गंजिफांची गलत करितो. ) पहा मी आ. तां वांटून देतो. प्रवेश १२. जयराम, माधव, राधा, गोविंदा, तात्या, दाजी, विठू, आणि शिवराम. जय- (त्यास पाहून गोविदा व त्याचे सोबती स- र्व घाबरून गडबडतात.) अरे, बसा, बसा, उर्ले नका. पाहूं तर खरे. माध- दादा कांहीं खेळं नका ह्मणत नाहीत. म्यां तुमाला पहिल्याने झटलेच होते की माझा एक- मित्र कदाचित् येईल. तुही खेळतां, दादा ९ राधा- दादा, तुह्मी खेळाच, तुमचे पैसे जिंकणे आ- मांस बरे वाटेल. आणि ही मुलेही तुमच्या पैशां. चा वांटा इच्छितात. जय०- बरें तर मी आपल्या संतोषाने खेळतों, तुझी अवघेजण बसा. (गोविंदाचे सर्व सामील गडी खिन्न दिसतात. त्यांस ह्मणतो.) अरे मलांनो, तमी मज संगती खेळण्याविषयी मनांत कांहीं भय बाळगं नका. मी काही खोटें खेळणार नाही. (ते सर्व बसतात, मग तात्यास ह्मणतो.) तूं गंजिफा वांट. तोस तर इकडे दस्त दे, मला अगोदर पाहू दे, त. ३१२ बाळमित्र. झी गलत कशी काय आहे ती. (तात्या इकडे तिकडे चुकावतो, पण जयराम बळेच दस्त घेऊन चाळून पाहतो.) ही हुकुमांची उंच उंच पाने सर्व एकीकडेसच लागलेली आहेत,ही अशी कशीरे ग- लत ९ राधे, आपला चांगला जोड होता तो कां दिला नाही १ तो आण बरें, पाहूं.. राधा- मला काय ह्मणतां ९ ह्यांनीच ह्या गंजिफा आ. पल्याबरोबर आणिल्या, आणि मी आलें नाहीं तों हे खेळावयास देखील बसले होते. जय.- (तात्यास ह्मणतो.) ह्या आमच्या गंजिफा घे, ह्यांत कांहीं घालमेल व्हावयाची नाही. (तात्या तो जोड भीतभीत घेतो. ) तुझी. कोणता खेळ खे. ळतां माध- एकतिशी. जय-पैज काय लावितां १ राधा-दर कवडीस दोन आणे. म्यां इतकें जिंकिलें आहे, ह्याशिवाय गोविंदाकडे माझा एक रुपया येणे आहे; तो खेळ झाल्यावर मोहर मोडून देणार आहे. जय०- बरें, तर, दरकवडीस दोन आण्यांचा करार ठीकच आहे; पण मला पाहूंद्या, अवघ्यांजवळ खे- ळापुरते पैसे आहेत किंवा नाहीत ते. ह्याकरिता सर्वानी आप आपलाले पैसे मला दाखवावे. गोविं- दा, दाखीव तुजजवळ किती पैसे आहेत ते. (गो. लहान जुगारी. ३१३ विंदाचा चळकांप होतो.) तूं कांपतोस कां ? तुला धनुर्वात झाला की काय ? गोवि०- (त्याची बोबडी वळते.) होय होय मीमीमी- . जय- असें, रे, काय करतां हें ९ एक तोतर बोल. k तो, एकाला डगडगां घाम आला, एकाला कांप सुटला. तात्या, तूं तर अगदी माशा खाल्ल्यासा- रखाच दिसतोस १ माध०- इतक्यांत ह्यांना असे काय झालें : जय०- ह्याचे कारण मी तुला सांगतों; ह्यांचे मनांत लबाडी करावयाची होती; हे ह्यांचे मुखचर्येवरूनच कळून आले. माध०-का? असे का ह्मणतां तुमी हातर डाव आहे. कोण हरेलनी कोण जिकेल. म्यां आणि माझे बहिणीने जिकिले की नाही ? तात्या-(अंमळ अवसान धरून.) हरलेल्या पैशां. ची फेड गोविंदावांचून अवघ्यांनी केली की नाही गोविं०- मी कोठून देऊ ? तुझींच माझे सर्व पैसे ल. बाडीने जिकून घेतले. जय०- ( मनांत ह्मणतो) बरे ह्या गट्टीतील एकतर फुटला; ही म्यां बरीच कल्पना काढली. ( मोठ्या- ने ) माधवा, पहा हे तुझे सोबती कसे आहेत ते. भाध०-दादा, हे काही इतके लबाड नाहीत असे मला वाटते. जय०- गोविंदा, तूं ह्या सर्वांतून अंमळ खरा दिसतोस. ३१४ बाळमित्र. तर खरेच सांग, तुझी माझ्या मुलांस ठकवावयाचा मनसोबा केला होता की नाही गोवि०- होय, दादासाहेब, खरेंच ने; माझे मनांत अ. से आले होते की आपण जितके पैसे हारविले तितके पुन: दुसऱ्यापासून मिळवावे, ह्मणून ह्या मुलांशी गट्टी करणे प्राप्त झाले, अशी लबाडी क. रकरून ह्या तात्याने माझे पैसे किती जिंकिले हे जर तुझांस माहीत झाले असते तर तुझी झाला तुरुंगांतच घालावयाला सांगतां. जय०- ठीक झाले, अशा लुच्चांची संगत धरली त्या- चें फळ झाले, ही बरीच तुला शिक्षा घडली. असो, पण त्वां किती काय गमाविले ते सांग. गोवि.- दोन मोहरा, चाकू, कातर वगैरे में काय होते ते सर्व तात्याने घेतले. याशिवाय आणखी एक माझें चित्र अडकावून ठेविलें आहे, न्याबद्दल मजवर एक मोहर लादली आहे, आणि ह्मणाला की माधवास आझांकडे खेळावयाला आण, नाहीं तर तुझे बापाजवळ सांगू. शिव०- हे त्याचे बोलणे खरे असेलसे वाटते, कां की ह्याप्रयाणेच त्याने मला आज सकाळी सांगितले होते, अशी लबाडी करावयास न्याला फार वाईट वाटलें. दादासाहेब, मी तुझांला सांगतों, लबाडीचे मुख्य घर तात्या आणि ते दुसरे दोघे- जय०- तूं बोललास ते माझ्या थ्यानांत आहे. (दालहान जुगारी. जी, आणि विठू, ह्यांस ) जा येथून लबाडांनो, तोंड काळे करा: वाईट ही तुमची चाल; थांबा आतां, तुमचे बापांस सांगून त्यांजकडून तुमची खा. डच काढतों.. दा०वि०-(त्याचे पायां पड़न ह्मणतात.) दादासा- हब, आमी चुकलों, येवढ्या कामाच्या अपराधा- ची क्षमा करा, आजपासून आमी तुमचे घरी क- धी येणार नाही. जय०- आतां नाहीं कसें : हा गोष्टींचा बंदोबस्त मला हजार कामें गकून केला पाहिजे; तुमच्या कपट रीतीपासून माझ्या एकट्या मुलास वाचवून उपयोग काय? या गांवांतील सर्व मुलांस वांचविले पाहिजे; खेळण्यावर नफा मिळविणे हा उदीम सान्यांत वाईट आहे. तुझी इतके लहान असतां आतांशीच अशी कमै करितां, तेव्हां पुढे काय काय अनर्थ कराल नकळे. पण तुह्मीही वाईट चाल टाकाल असे मला वाटते, ह्मणून मी तुझांस सोडून देतों, पण तुमच्या आईबापांस मात्र सांगेन. आतां पुरती आठवण ठेवा; जर इतःपर कोणाशी अशी लबाडी केली तर मी तुमची दुर्दशा केल्या. वांचून सोडणार नाही. (दाजी व विठू दोघेजण फजीत होऊन निघून जातात. ) ( मग तात्यास ह्मणतो.) त्वां गोविंदापासून इतकें जिंकून घेतले हे खरेंना ९ बाळमित्र. तात्या- (गुंग होऊन.) होय, दादा साहेब. जय.- त्यास त्वां ठकविले ह्याची चिंता नाही, त्याचे आचरणानुरूपच त्यास योग्य शिक्षा मिळाली. गोविं०- मजजवळ वस्ता गमावल्या बद्दल पैसे द्याव- । यास असते तर बरे होते. माध०- मजजवळ जितके पैसे आहेत तितके पुरत । असले तर मी देतो; ह्या घे पांच मोहरा. गोविं०- अहाहा केवढे तुमचे उपकार हे ! ह्याचा उ- तराई मी कधी होईन. ह्यावेळेस मजवर केवढी द. या केलीही. माध०- तुह्मी आह्मी शेजारी आहों, तुझ्या मनास, येईल तसे हमेबंदीने दिले तरी चिंता नाही. जय- ( गोविंदाचा माल तात्याकडून परत देववितो.) का ९ गोविंदा, आतां तुझें तुला अवघे मिळाले १ गोविं.- फार काय सांगू? तुमचे आणि माधवाचे कृपेने आज मी बापाचे मारांतून वांचलो. आता म्यां तोंडांत मारून घेतली; आजपासून कधीच अ- सा खेळ खेळणार नाही. जय०- (तात्यास पैसे देतो.) जें त्वां गोविंदापासून लबाडीने चोरून घेतले त्याचे किमतीबद्दल हे घे पण तुला न्यायाधीशाकडे थोडक्याच दिवसांत जा. वे लागेल; तंवर तुझ्या कपाळी बंदीखाना आहे. न्वां बदफैली करून दोघांस वाईट चाल शिकविली आणि गोविंदाचा माल लबाडीने नेला, आणि दु. लहान जुगारी. सन्या पोरास ठकवावें ह्मणून त्यास पाठविले, तर आतां तुझें खूपतराशी पारिपत्य होईल. (तात्या ' रागास्तव रडत रडत बाहेर जातो.) गोविं०-( जयराम दादाच्या पायां पडून ह्मणतो.) अहो दादा, तुझी मजवर जर कृपा केली नसती तर माझे बापाने मला यथास्थित कुहा काढून बाहेर हांकून लावले असते. अहो माधवराव, तु- मचे पैसे लबाडीने जिंकून घ्यावे असा ज्यांचा म. नसोबा त्यांस मी सामील झालों असतां तुह्मी तें कांहींच मनांत न ठेवून थोरपणाने वागला. माध०- तूं ह्या गोष्टीचा खतरा मनांत बाळगू नको, मी हे सर्व विसरून जाईन. जय०- ह्या शिवरामाच्या सांगण्यावरून माझी खात- रजमा झाली की तुझा हात गुंतला होता ह्मणून तुला त्यास अनुकूळ होणें प्राप्त पडले, ह्यासारी तुजकडे फारसा अपराध नाही, ह्मणून तुला मा. झे पुत्राची सोबत धरावयास आज्ञा देतो; परंतु आजपासून जर तूं जपून न वागशील तर तुझी ही दुर्दशा करीन; नीट वागलास तर तुजवर आ- णि शिवरामावर सारखी ममता करीन. मुलांनो, जुगार खेळण्याचा परिणाम कसा अनुचित आणि अनर्थकारी आहे तो पाहिलाना १ माधवा, मित्र वाईट आहे की चांगला आहे ह्याची निवड कर. ण्याविषयी फार सावधगिरी ठेविली पाहिजे.