व्हाव्या प्रसाद तुलसीमाळा श्रीमत्पदावरिलचि बुका

येणेंचि धन्यता स्वस्वीकार करावया धरिल चिबुका. १


विधि हरहि म्हणे स्वपदर-पात्र पदापुढिल खारकेला हो.

ईणें उर:क्षतीं षडरींच्या निज लाभ खार केला हो ! २


यमदूत न पृष्ठीं, सुर पायांवरि बारिक मारितात बुक्या,

ज्याचा श्रीचरणांच्या भाग्यें होईल पात्र हात बुक्या. ३


तारी जनासि लाउनि आपण होउनि अलाबु कासेला,

श्रीचरणींचा झांकुनि शोभवितो बहु भला बुका सेला. ४


प्रणताधना म्हणावें श्रीदत्तें द्रवुनि ‘ बाबु ! क्या ? ले, खा. ’

तुज पुसतां भाळींच्या कांहीं नाहींच बा ! बुक्या ! लेखा. ५


जी साधुकरप्राप्ता गोड सुधेहूनि बहु सुपारी ती

येईल व्यजनाची जरि गुरू तरि काय हो ! सुपा रीती ? ६


साधुप्रेषित आला, प्रेमें धांवूनि दूर कागद हा

पांच किती ? नच याची सरि करितिल कामपूरकाग दहा. ७


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.