भाग १ ला-अर्थशास्त्राचा इतिहास


अर्थशास्त्राचीं मूलतत्वें.

पुस्तक पहिलें.

भाग पहिला.

उपोद्धात.

अर्थशास्त्राचा इतिहास.

 एकोणिसाव्या शतकांतील जर कोणत्या एका शोधानें सर्व शास्त्रीय कल्पनांमध्यें मोठी क्रांति घडवून आणली असेल तर ती उत्क्रांतितत्त्वानें होय. डार्विननें प्रथम या तत्वाचा फक्त प्राणिशास्त्रांत उपयोग केला खरा, तरी पण त्यानें व कांहींसे त्याचे पूर्वींच हर्बर्ट स्पेन्सरनें तें तत्व सर्व विषयांस व सर्व शास्त्रांस सारखेंच लागू आहे असें सिद्ध केलें. तेव्हांपासूनच ऐतिहासिक पद्धतीला महत्व आलें व प्रत्येक शाखाचीं तात्विक व ऐतिहासिक अशीं दोन स्वतंत्र अंगें बनत चाललीं. पहिल्यामध्यें एखाद्या शास्त्राचीं मूलतत्वें, त्यावरून निघणारीं प्रमेयें, सिद्धांत व उपसिद्धांत यांचें सविस्तर विवेचन असावयाचें; व दुस-या अंगामध्यें त्या शास्त्राच्या उदयापासून तों पूर्णवाढीपर्यंतचा इतिहास असावयाचा. हा ऐतिहासिक भाग तात्विक भागांपेक्षां स्वाभाविकच मनोरंजक असून त्याच्यायोगानें शास्त्राचीं तत्वें व प्रमेयें सुलभ रीतानें समजूं लागतात. म्हणून अलीकडे प्रत्येक शास्त्राचे इतिहास प्रसिद्ध होत आहेत. तेव्हां हातीं घेतलेल्या शास्त्राच्या तत्वांचें व प्रमेयांचें सुलभ रीतीनें आकलन व्हावें अशा हेतूनें या उपोद्धातांत अर्थशास्त्राचा थोडक्यांत इतिहास देण्याचा विचार केला आहे; परंतु हा इतिहास युरोपीय राष्ट्रांमधलाच देणें अपरिहार्य कां आहे हें खालील विवेचनावरून ध्यानांत येईल.
 पाश्चात्य विद्या व वाङ्मय आणि संस्कृत विद्या व वाङ्मय यांची तुलना केल्यास संस्कृतांतील कांहीं उणिवा चटदिशीं ध्यानांत आल्यावांचून राहात नाहींत. आमच्यामध्यें जगाच्या कविमालेमध्यें पहिल्या रांगेत बसण्यायोग्य असे कवी झाले आहेत; सर्व जगांतील सहृदय विद्वान् लोकांनीं ज्यांच्या कृती वाचून आनंदानें माना डोलवाव्या असे नाट्यकार झाले आहेत; ज्यांच्या कांहीं बाबतींतील ज्ञानाबद्दल अजूनही पाश्चात्य लोकांना आश्चर्य वाटतें असे नामांकित गणिती व ज्योतिषी झाले आहेत; ज्यांच्या कांहीं कांहीं वैद्याविषयक उपपत्ति व योजना सुधारलेल्या देशांत अलीकडे पसंत पडत आहेत असे प्रसिद्ध वद्यक ग्रंथकार झाले आहेत. धर्मशास्त्र व वेदांतशास्त्र याबद्दल तर संस्कृत वाङ्मयाचा हात कोणत्याही वाङ्मयाला धरतां येणार नाहीं असें पाश्चात्य राष्ट्रें सुद्धां कबूल करतात. पाश्चात्य वाङ्मयाचा विशेष म्हणजे आधिभौतिक शास्त्रें व तत्संबंधी वाड्मय होय. परंतु अलीकडील शोधावरून रसायनशास्त्रासारख्या शास्त्राचेंही वाड्मय संस्कृतांत आहे असें दिसतें. मात्र इतिहास, राजनीति व अर्थशास्त्र या तीन विषयांसंबंधीं पुष्कळ अंशानें आपल्याला मान खालीं घालावी लागेल, हें कबूल करणें भाग आहे. या तीन विषयांत आमच्या इकडे नामांकित ग्रंथकार झाले नाहींत इतकेंच नव्हे, तर या विद्यांचा व विषयांचा शास्त्रीय व सोपपत्तिक विचारच मुळीं आमच्या पूर्वजांनीं केलेला दिसत नाहीं. आमच्या विस्तीर्ण वाङ्मयप्रदेशांत या तीन विषयांचे भूमिभाग कधींही लागवड न केलेल्या ओसाड जमिनीप्रमाणें आहेत.
 हे प्रांत असे ओसाड कां राहिले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या विषयावर आमच्यांत सर्वमान्य ग्रंथ होते; परंतु काळाच्या प्रचंड ओघांत ते नाहींसे झाले व यामुळेंच ते उपलब्ध नाहींत असें सकृद्दर्शनीं कोणी म्हणेल; परंतु अशी वस्तुस्थिति असती तर बाकी विषयांचे ज्याप्रमाणें थोडे थोडे ग्रंथ राहिले त्याप्रमाणें या विषयाचेही कांहीं कांहीं ग्रंथ राहावयास पाहिजे होते. दुसरें, ही गोष्ट निव्वळ काकतालीय आहे, असें म्हणणें यत्कीस धरून दिसत नाहीं. तसेंच आमच्या हीनबुद्धीमुळें असें झालें असें म्हणावें तर तेंही बरोबर नाहीं. कारण, ज्या आमच्या पूर्वजांनीं आपल्या बुद्धिसामर्थ्यानें इतकीं शास्त्रे व विद्या निर्माण केल्या व त्यांवर नामांकित ग्रंथरचना केली त्यांना या तीन विषयांवर सर्वमान्य ग्रंथरचना करतां आली नसती असें समंजस मनुष्य म्हणणार नाहीं. तर मग आमच्या वाङ्मयांतील या विषयांच्या अभावाची मीमांसा काय?
 आमची समजूत अशी आहे कीं या अभावाला कांहीं सबळ कारणें आहेत; व त्यांचा थोडासा विचार करणें येथें अप्रासंगिक होणार नाहीं व ज्या अर्थी या उपोद्धाताचा प्रत्यक्ष संबंध अर्थशास्त्राशीं आहे त्या अर्थी या शास्त्राच्या आमच्या वाड्मयांतील अभावाचा मुख्यत्वेंकरून येथें विचार करणें बरें.
 आर्यलोक प्रथमतः हिंदुस्थानांत आले त्या वेळीं त्यांचेमध्यें वर्ण व जाती हा भेद नव्हता ही गोष्ट आतां निर्विवाद सिद्ध झाली आहे. परंतु येथें आल्यानंतर वर्णाची कल्पना समाजांत बद्धमूल होऊं लागली व येथल्या मूळच्या काळ्या वर्णाच्या रहिवाशांना आर्यलोकांनीं शूद्र या नांवाच्या चेौथ्या वर्णामध्यें सामील केल्यापासून तर वर्णावर्णामधील भेद कडक होत चालले. धर्मशास्त्रदृष्ट्या जरी विद्या व ज्ञान मिळविण्याचा अधिकार वरच्या तीनही आर्यवर्णांस होता, तरी प्रत्यक्ष व्यवहारांत ज्ञानाची गुरुकिल्ली ब्राह्मणांच्या हातांत आली व बाकींचे वर्ण आपापल्या धंद्यांत चूर होऊन गेले. विद्या व ज्ञान मिळविणें, तें जतन करुन ठेवणें व वाढविणें आणि तें दुस-यांस शिकविणें हें काम फक्त ब्राह्मणांचें, असा सक्त नियम झाला. दुस-या वर्णाच्या मनुष्यानें ब्राह्मणांचें काम करणें किंवा त्यांचे आचार पाळणें म्हणजे एक मोठें पाप आहे, असा दृढ समज झाला. याचें प्रत्यंतर रामायणांतील शंबुकाच्या गोष्टीवरून खासें येतें. रामासारख्या सत्वशील राजाला तपश्चर्या करणा-या शूद्र शंबुकाचा गुन्हा देहान्त प्रायश्चित्तास योग्य असा वाटला. या कडक नियमानुरूप समाजांतील ब्राह्मणवर्गच कायतो विद्याव्यासंगी वर्ग राहिला; व आपल्या विशिष्ट धंद्याखेरीज त्यांना जे कामधंदे करतां आले किंवा प्रसंगानें करणें भाग पडलें तितक्या धंद्यांसंबंधीं सोपपत्तिक ज्ञानाचें वाङ्मय त्यांनीं भाषेंत निर्माण केलें. धार्मिक आचार चालविणें व समाजाला धर्मशिक्षण देणें हें त्यांचें मुख्य काम असल्यामुळें धर्मशास्त्र व वेदांतशास्त्र यांतच त्यांनीं आपलें बहुतेक बुद्धिसर्वस्व खर्च केलें व म्हणूनच हें वाङ्मय संस्कृतांत अपरंपार आहे. परंतु धार्मिक आचार योग्य त-हेनें पाळण्याकरितां आमच्या धर्मात मुहूर्त, विशेषकाळ व ऋतू सांगितलेले असल्यामुळे ही कालगणना करण्याकरितां ब्राह्मणांना ज्योतिषशाखाची उपपत्ति करावी लागली; व गणित, बीजगणित, त्रिकोणमिति वगैरेंसारख्या गणितशास्त्राची अवश्यकता, ग्रह व तारे यांच्या गतीचें ज्ञान होण्यास अवश्य असल्यामुळे, हेंही शास्त्र ब्राह्मणांनीं वाढविलें. गांवचे उपाध्याय, गांवचे जोशी, गांवचे धर्मोपदेशक व गांवचे शिक्षक या नात्यानें ब्राह्मणांना गांवांत व समाजांत साहजिक प्रमुखत्व होतें; व जुन्या काळीं वैद्यक व फलज्योतिष यांचा पुष्कळ संबंध असल्यामुळे ब्राह्मणांकडे वैद्यकीचा धंदाही ओघानेंच आला. म्हणूनच वैद्यकशास्त्र व त्याला उपयोगी असे वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, शारीरशास्त्र व रोगचिकित्साशास्त्र यांच्याही थोडाबहुत व्यासंग ब्राह्मणांस करणें भाग पडले व यामुळेच या आधिभौतिक शास्त्राचं थोडेबहुत वाङ्मय आमच्यामध्ये सापडते.
 परंतु ब्राह्मणांनीं पूर्वकाळीं वाणिज्यवृत्ति कधींच पत्करलेली दिसत नाहीं. यामुळे उद्योगधंदे, कलाकौशल्य व व्यापारउदीम यांची शाखीय उपपत्ति करून त्यांचें एक स्वतंत्र शास्त्र बनविण्याची कल्पना साहजिकपणें त्यांच्या डोक्यांत आली नाहीं. आपल्या समाजांत कलाकौशल्याची, उद्योगधंद्याची व व्यापारउदीमाची वाढ व प्रगति वैश्यवर्गानें पुष्कळ केली. ही वाढ व प्रगति युरोप ज्या वेळीं अगदीं रानटी स्थितीत होतें त्या वेळेपासून झालेली होती हेंही खरें. आमच्या वैश्यवर्गानें हस्तकौशल्य, प्रत्यक्ष अनुभव व कामाचा 'बापापासून लेकाला' अशा सांप्रदायस्वरूपानें मिळे. यामुळे तें ज्ञान पुस्तकांत ग्रथित करून त्यावरून सामान्य तत्वें व सिद्धान्त काढणें व त्याची उपपत्ति बसविणें हें काम वैश्यवर्णाला शक्य नव्हतें. कारण, विद्या व ज्ञान याला ते अगदीं पारखे असल्यामुळे, असल्या तऱ्हेचा बुद्धिविकास त्यांच्यामध्यें झालेला नव्हता. यामुळे जरी आमच्या इकडे औद्योगिक प्रगति झाली व तत्संबंधीं संस्थाही पूर्णत्वास आल्या तरी त्यांची उपपत्ति व मीमांसा करणारें शास्त्र निर्माण झालें नाहीं. याचें एक उदाहरण अर्थशास्त्रातील एका विषयाचें घेता येईल. अर्थशाखांतील एक महत्वाचा व मनोरंजक भाग म्हणजे पैसा व विनिमय हा होय. या भागांत पैशाचें
स्वरूप व त्याच्यायोगानें होणा-या अदलाबदलीचें स्वरूप, पेढ्या व त्यांचा उपयोग, हुंडीचा व्यापार व त्याची उपयुक्तता वगैरे विषयांचा ऊहापोह केलेला असतो. आतां आमच्या समाजांत या सर्व गोष्टी पूर्णतेस आल्या होत्या व या संबंधाचा स्वतंत्र धंदा करणारे सराफ व पेढीवाले हेही होते. पैशाची देवघेव करणें, नाणीं पारखून घेणें,पेढीचा व्यापार चालविणें, हुंडीचा व्यवहार करणें वगैरे कामें हे लोक करीत, व मोठमोठया शहरीं पेढ्यांची दुकानें असत. व सर्व देशभर पेढ्यांचे जाळें पसरलेलें असे.पुण्यास पैसे भरले असतां काशीस हुंडी दाखवून पैसे मिळत अशाबद्दल जुने दाखले सांपडतात. पेढ्यांच्या व्यवहारासंबंधीं बहुतेक पारिभाषिक शब्द आमच्या भाषेत रूढ झालेले होते, परंतु या भागाची इतकी व्यावहारिक प्रगति झाली असतांना या विषयावर एखादा ग्रंथ झाला नाहीं.कारण,या उपयुक्त व्यवहाराची मीमांसा करण्यास लागणारा बुद्धिविकास वैश्य जातींत झाला नव्हता.
 वरील विवेचनावरून आमच्या वाङ्मयांतील अर्थशास्त्राच्या अभावाचें एक मोठं कारण म्हणजे आमच्यांतील तीव्र जातिभेद होय असें दिसून येईल. या अभावाचें दुसरें एक कारण आहे,तें म्हणजे आमच्या तत्वज्ञानानें आमच्यांत रुढ झालेल्या कांहीं कल्पना व भावना ह्या होत.
  "संसार हा असार आहे, विषयसुखाची इच्छा ही मनुष्यास अधोगतीस नेणारी आहे, संपति ही सर्व दुःखाचें मूळ आहे, मानवी आयुष्य क्षणभंगुर आहे; संसार, मानवी वासना, संपति, विषयसुख या सर्व गोष्टी नश्वर आहेत. या सर्व मायामय आहेत; यामध्यें सत्यत्व व सनातनत्व नाही; यामुळे या सर्व मोक्षविघातक आहेत. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्यानें ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलें पाहिजे." अशा प्रकारच्या निवृतिपर वेदान्ताचा आमच्या ब्राह्मणवर्गावर बराच अंमल होता. यामुळेच इतिहास, राजनीति व अर्थशास्त्र या तिन्ही विषयांकडे आमच्या ब्राम्हणांचे लक्ष गेलें नाहीं. कारण, हे तिन्ही विषय नश्वर गोष्टींबद्दल ऊहापोह करणारे; तेव्हां यांत तथ्य किंवा सनातनत्व तें काय असणार असें त्यांना वाटणें साहजिक होतें
 अर्थशास्त्राच्या उदयास अडथळा करणारी अशीच कारणें प्राचीन ग्रीक लोकांमध्येंही होती. त्यांच्यामध्यें गुलामगिरीचा प्रघात जारीनें चालू होता व कलाकौशल्याचीं कामें तेच गुलाम करीत; यामुळें उद्योगधंदे व व्यापारउदीम हीं हलक्या दर्ज्याची कामें अशी ग्रीक नागरिकांमध्यें दृढ़ समजूत होती. त्यांच्या मताप्रमाणें नागरिकांस योग्य असे धंदे म्हणजे शिपाईगिरी व राज्यकारभार. ग्रीक लोकांमध्यें प्रजासत्ताक राज्यपद्धति असल्यामुळे नागरिकांचा बहुतेक वेळ राजकीय उलाढालींत जात असे. ह्यामुळे त्या लोकांमध्यें इतिहास व राजनीति या शास्त्राचा उदय झाला. या विषयांत त्यांनीं इतकी पारंगतता मिळविली कीं, ग्रीक लोकांसारखे प्रख्यात इतिहासकार,प्रख्यात मुत्सद्दी व प्रख्यात राजनीतिकोविद फारच थोड्या राष्ट्रांच्या वांट्याला आलेले आहेत. परंतु ज्याप्रमाणें आमच्यांत जातिभेद व संसाराची असारता ह्या कल्पनांमुळे अर्थशास्त्राचा उदय होऊं शकला नाहीं त्याप्रमाणेंच ग्रीक लोकांतील गुलामगिरी व त्यांची उद्योगधंद्याबद्दलची तुछाताबुद्धि यांच्यायोगाने अर्थशास्त्राचा उदय त्या लोकांत होऊ शकला नाहीं.
 वरील विवेचनावरून ज्या शास्त्राची पूर्वपीठिका आपल्यास पहावयाची आहे तें शास्त्र फार जुनें नाहीं हें तेव्हांच ध्यानांत येईल. परंतु इतर शास्त्रांच्या इतिहासाचे तीन काळ कल्पिण्याचा युरोपियन ग्रंथकारांचा रिवाज आहे. त्याला अनुसरून अर्थशास्त्राच्या इतिहासकारांनीही अर्थशास्त्राच्या इतिहासाचे तीन काळ कल्पिले आहेत. एक ग्रीक व रोमन लोकांच्या सुधारणेचा जुना काळ; दुसरा क्रिश्चन व रोमन कॅथलिकधर्माच्या प्रसाराचा व वाढीचा मध्यकाळ व तिसरा प्राटेस्टंटधर्माच्या उदायापासुंचा अर्वाचीन काळ.
 ग्रीक व रोमन लोकांमध्यें गुलामगिरीच्या प्रघातामुळे अर्थशास्त्राचा उदय होऊं शकला नाहीं हें वर सांगितलेंच आहे. परंतु ग्रीक लोकांनीं समाजशास्त्र व राजनीतिशास्त्र यांची चांगली वाढ केली होती; व या शास्त्रांच्या प्रमेयांचा विचार करतांना प्रसंगोपात ग्रीक तत्वज्ञान्यांनीं अर्थशास्त्रविषयक काही तत्वांचा उल्लेख केला आहे. व अर्थशास्त्राच्या इतिहासकारांनी या उल्लेखांचा एकत्र संग्रह करून त्यालाच अर्थशास्त्राची पूर्वपीठिका मानली आहे. ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो यानें "प्रजासत्ताक राज्य" म्हणून एक नामांकित ग्रंथ लिहिला आहे.त्यामध्ये श्रमविभाग या अर्थशास्त्राच्या एका तत्वाचें सुंदर तऱ्हेंनें वर्णन केले आहे. त्याप्रमाणेच अॅरिस्टॉटल याने आपल्या सुप्रसिद्ध "नीतिशास्त्र व राजनीतिशास्त्र ?" या ग्रंथामध्यें व्यापाराच्या स्वरूपाचें व पैशाच्या उत्पत्तीचें व कार्याचें मोठे मुद्देसूद व मार्मिक विवरण केले आहे. तसेच झेनाफन् या इतिहासकारानेंही आपल्या ग्रंथांत अर्थशास्त्रविषयक कांहीं बाबींचा विचार केलेला आहे. रोमन लोक शास्त्रांच्या कामांत ग्रीक लोकांच्या पुढें कधींच गेले नाहींत. ग्रीक लोकांनीं मिळविलेलें ज्ञान त्यांनीं आपल्या भाषेत आणिले इतकेंच. यामुळे अर्थशास्त्राला त्यांनीं एकही महत्वाच्या तत्वाची जोड करून दिली नाही यांत कांहीं एक आश्चर्य नाहीं.
 युरोपाचा मध्यकाळ सन ४०० पासून १३०० अखेर किंवा चेौदाव्या शतकाच्या अर्धापर्यंत मानतात. या सुमारास मुसलमान लोकांनीं कॉन्स्टॅटिनोपल हें शहर काबीज केलें व त्यामुळे तेथल्या बादशहाच्या पदरी असलेले ग्रीक व लॅटिन या भाषा अवगत असणारे विद्वान लोक यांचा राजाश्रय नाहीसा होऊन ते लोक सर्व युरोपभर पसरले व त्यांनीं सर्व युरोपभर ग्रीक व लॅटिन भाषा सामान्य जनास शिकविण्याची सुरुवात केली. याच काळाला विद्येच्या पुनरुज्जीवनाचा काळ म्हणतात व येथून अर्वाचीन काळाला प्रारंभ झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. ह्या मध्यकाळांत जरी अर्थशास्त्राचा प्रत्यक्ष उदय झाला नाहीं तरी त्या उदयास अनुकूल अशी परिस्थिति याच काळांत निर्माण झाली. प्रथमतः ग्रीक व रोमन लोकांमध्यें प्रचलित असलेली गुलामगिरी क्रिश्चन धर्माच्या उदार कल्पनांनीं लुप्तप्राय झाली व सर्व धंद्यांना व उद्योगांना एक प्रकारची मान्यता आली. युरोपामध्यें निरनिराळीं स्वतंत्र राज्यें व राष्ट्रे निर्माण झाली. युरोपियन लोकांनीं येशूची जन्मभूमि जेरुसलेम ती मुसलमानांपासून हस्तगत करून घेण्याकरितां कित्येक शतकें धर्मयुद्धे केली. त्यांचा युरोपाच्या उद्योगधंद्यावर व व्यापारउदीमावर चांगलाच परिणाम झाला. प्रथमतः या युद्धाच्या योगानें सरदारांच्या जमिनी मध्यम स्थितीच्या, व उयोगी व भांडवलवाल्या अशा लोकांच्या हातीं आल्या; त्यामुळे शेतकींत सुधारणा होऊं लागली. "दमास्कस येथें धर्मयोद्धयांनीं कापड करण्याचीं व धातूचीं कामें करण्याची कला हस्तगत करून घेतली. रेशमाचा धंदा व रेशमी किडे वाढविण्याची विद्या युरोपांत धर्मयोद्धयांनीं नेली. टायर येथील कारखाने पाहून व्हेनिसच्या व्यापा-यांनीं आपल्या कांचेच्या कारखान्यांत सुधारणा केली." धर्मयुद्धामुळे नौकानयनास व लोकांच्या  साहसवृत्तीस उत्तेजन मिळाले.याचेयोगानें आशिया व युरोप यांच्यामध्यें दळणवळण वाढून या दोन खंडांमध्यें जोराचा व्यापार सुरू झाला व आशिया व हिंदुस्थान येथील उत्तम कलाकौशल्याचा माल युरोपमध्यें जाऊन तेथें लोकांना त्याची गोडी लागली व तसले कारागिरी धंदे युरोपांत सुरू करण्याची प्रवृत्ति सुरू झाली. याप्रमाणें धर्मयुद्धाचा मृळ उद्देश सिद्धीस गेला नाहीं तरी इसापनीतींतील शेतांत पुरून ठेवलेल्या संपत्तीच्या शोधार्थ शेत नांगरणा-या शेतक-याच्या मुलांप्रमाणें युरोपियन राष्ट्रांचा या धर्मयुद्धापासून फार फायदा झाला.
 याप्रमाणें युरोपामध्यें व्यापारधंदा वाढत असतांनाच त्यांत भर पाडणारी आणखी कारणें उत्पन्न झालीं. छापण्याच्या कलेचा शोध लागल्यामुळें ज्ञानप्रसार सामान्य लोकांत सुद्धां झपाट्याने होऊं लागला. ज्योतिष, रसायन वगैरे शास्त्रांत जे नवीन शोध लागले त्यामुळे ज्ञानलालसा वाढून सर्व शास्त्रांची भराभर वाढ होत गेली. धर्मयुद्धानें आधींच नौकानयनास व लोकांच्या दर्यावर्दीपणास उत्तेजन मिळालें होतें, त्यांतच होकायंत्राच्या शोधाची भर पडून युरोपांतील लोकांच्या धाडसास व साहसास अधिकच जोर आला व एकीकडे कोलंबसानें अमेरिका खंड शोधून काढिलें व त्याला हिंदुस्थानचा पश्चिम किनारा समजून हिंदुस्थान असें नांव दिलें. तर दुसरीकडे बास्कोडिगामा यानें आफ्रिका ओलांडून केप ऑफ गुड होपच्या मार्गे ख-या हिंदुस्थानचा जलमार्ग शोधून काढिला. या दोन शोधांमुळे युरोपांतील जुन्या व्यापारी मार्गावरील राष्ट्रांचें व शहरांचें औद्योगिक व व्यापारी वर्चस्व कमी कमी होत जाऊन ते स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इंग्लंड व हॉलंड या अटलांटिक महासागरावरील राष्ट्रांना,येऊं लागले. शिवाय या राष्ट्रांनीं आफ्रिकेंत व विशेषतः अमेरिकेंत आपल्या वसाहती केल्या व या वसाहतींच्या सर्व व्यापार या देशांच्या ताब्यांत आला. याप्रमाणें युरोपांतील वर निर्दिष्ट केलेल्या देशांमध्यें उयोगधंद्यांची व व्यापारउदीमाची प्रगति होऊं लागून त्यांची संपत्ति वाढत चालली. त्यांतल्यात्यांत अमेरिकेमध्यें सोन्यारुप्याच्या खाणींचा शोध लागला व या पैशाच्या लोभानें हजारों लोक अमेरिकेंत जाऊ लागले व गवर हाऊन परत येऊं लागले. यामुळें युरोपखंडांत सोन्यारुप्याचा ओघ सुरू झाला व तिकडून पुढें तो ओघ हिंदुस्थानाकडेही वळला. युरोपांतल्या बहुतेक देशांत नाण्याचा सुकाळ झाला व पदार्थांच्या किंमती अतोनात वाढू लागल्या. ज्याप्रमाणें अलीकडील चारपांच वर्षांमध्यें हिंदुस्थानांत पदार्थाच्या बाजारभावांत विलक्षण क्रांति होत चालली आहे व यामुळे लहानथोर, अशिक्षितसुशिक्षित, गरीबश्रीमंत वगैरे सर्व वर्गाच्या लोकांचें लक्ष या विषयाकडे लागलें आहे, अशीच स्थिति त्या काळीं युरोपखंडांत झाली. दहावीस वर्षांत पदार्थांच्या भावांत जमीनअस्मानाचें अंतर पडू लागलें. या सर्व कारणांनीं विचारी लोकांचें लक्ष या संपत्तीच्या विषयाकडे लागलें व याचेंच फळ अर्थशास्त्राचा उदय हें होय.
 संपत्तीसंबंधाने युरोपियन लोकांच्या व राष्ट्रांच्या मनांत विचार येऊं लागून त्याला जें पहिलें व्यवस्थित स्वरूप आलें त्यालाच अर्थशास्त्राचे इतिहासकार अर्थशास्त्रातील पहिला पंथ म्हणतात. या पंथाचें नांव उदीमपंथ होय. या पंथाचीं दोन भिन्न भिन्न वर्णनें सांपडतात. या पंथाच्या प्रवर्तकांनी किंवा त्याच्या अनुयायांनीं या पंथाचीं तत्वे व मतें यांचा सविस्तरपणें विचार करून लिहिलेले ग्रंथ पुष्कळ काळपर्यंत उपलब्ध नव्हते. बराच काळपावेतों या पंथाच्या तत्वाची जी माहिती लोकांना होती ती या पंथाचा विरोधक अॅडम स्मिथ याच्या ग्रंथावरूनच काय ती होती. अॅडम स्मिथनें या पंथाचें खालीलप्रमाणें वर्णन केलें आहे.
 या पंथाच्या मताप्रमाणें संपत्ती म्हणजे सोनें, नाणें किंवा पैसा होय. अर्थात् संपत्ति व पैसा हे समानार्थक शब्द इतकेंच नव्हे तर संपत्तीचें सारसर्वस्व म्हणजे पैसा. ज्याप्रमाणें एखाद्या व्यक्तीजवळ हजारों रुपये असले म्हणजे आपण त्याला श्रीमंत म्हणतों, त्याप्रमाणेच ज्या देशांत पैसा व सोनेंरुपें मुबलक आहे तो देश श्रीमंत होय. म्हणूनच ज्या देशाला आपली भरभराट व्हावी अशी इच्छा असेल त्यानें देशांत पैसा जास्त येण्याचें धोरण ठेविलें पाहिजे. ज्या देशांत सोन्यारुप्याच्या खाणी आहेत,तेथें विशेष तजवीज करण्याची गरज नाहीं, परंतु जेथें अशी स्थिति नाहीं, तेथें बाहेरून देशांत सोनेरुपें येईल व देशांतील सोनेंरूपें बाहेर न जाईल अशी तजवीज केली पाहिजे व म्हणूनच या पंथाच्या पुरस्कर्त्यांनी प्रथमतः सोन्यारुप्याचा निर्गत व्यापार कायद्यानें बंद केला. परंतु असले कायदे सहज मोडतां येतात असें दिसून आल्यावरून या प्रत्यक्ष प्रतिबंधा-
पेक्षां दुसरा एक सुलभ उपाय त्यांनीं शोधून काढला. तो उपाय म्हणजे देशांतल्या आयातनिर्गत व्यापारावर नजर ठेवून देशांत पैसा जास्त येईल असें करणें हा होय. देशाबाहेर जो माल जातो त्याबद्दल देशांतील व्यापा-यांना पैसे मिळतात, व देशांत जो माल येतो त्याबद्दल पैसे देशाबाहेर जातात. तेव्हां निर्गत मालाची किंमत आयात मालापेक्षां नेहमीं जास्त असली म्हणजे या दोहोंमधला फरक देशामध्यें पैशाच्या रूपाने आला पाहिजे. यालाच उदीमपंथी लोक व्यापाराचें समतोलन म्हणतात. व प्रत्येक देशानें हें समतोलन आपल्याला अनुकूल करून घेण्याचें धोरण ठेविलें पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता व हें समतोलन आपल्याला अनुकूल करून घेण्याकरितां उदीमपंथी मुत्सद्द्यांनी व राष्ट्रांनीं सहा उपायांची योजना केली होती. निर्गत व्यापार वाढविण्याकरितां योजावयाचे उपाय म्हणजे:-
 १ बाहेर देशीं माल पाठविणारास दरशेकडा काही प्रमाणानें बक्षीस देणें,
 २ त्यांना जकातीची सूट किंवा सवलत देणें,
 ३ दुस-या देशांशीं आपला माल सवलतीनें खपण्याकरितां फायदेशीर तह करवून घेणें,
 ४ आपल्या ताब्यांतल्या वसाहती स्थापून त्यांच्याकडील सर्व व्यापार अापल्या ताब्यांत ठेवणें,
 ५ आयात मालाचा व्यापार कमी करण्याकरितां जबर जकाती ठेवणे.
 ६ व कायद्यांनी मालाची आयात अजीबाद बंद करणें.
 या शटसाधनांनी आपल्या देशाचा निर्गत व्यापार अतोनात वाढेल व व्यापाराचें समतोलन आपल्याला अत्यंत अनुकूल झाल्यानें देशांत मुबलक पैसा व सोनेंनाणें खेळतें राहील असा उदीमपंथी लोकांचा दृढ समज होता
.   अॅडम स्मिथनें आपल्या पुस्तकामध्ये उदीमपंथाच्या तत्वांची व मतांची ही हकी}कत दिली आहे. अॅडम स्मिथच्या काळीं उदीमपंथाच्या स्थापनेला शें दोनशें वर्षें होऊन गेलीं होती व त्याच्या धोरणाचा कांहींसा अतिरेक झाला होता. कारण या पंथाचा राज्यकर्त्यांच्या व मुत्सद्द्यांच्या मनावर पूर्ण पगडा बसून त्यासंबंधीं अतोनात कायदे होऊन हजारों पदार्थांवर निरनिराळ्या प्रसंगीं निरानराळ्या कारणांनीं जबर जकाती बसविलेल्या होत्या व यामुळे अॅडम स्मिथचें वर्णन कांहीं अंशीं त्या काळीं तरी उदीमपंथाला लागू होते. शिवाय अॅडम स्मिथ हा उदीमपंथाचा विरोधक होता व त्याच्या पुस्तकाचा एक हेतु उदीमपंथाच्या मतांचें व धोरणाचें खंडन करणें हा होता. यामुळे त्याचें वर्णन एकतर्फी व एककल्ली व्हावें व त्याला उदीमपंथांत कांहीं एक ग्राह्यांश नाहीं असें वाटावें हें स्वाभाविक होत.
 परंतु एकोणिसाव्या शतकांत ऐतिहासिक पद्धतीला प्राधान्य मिळालें व प्रत्येक शास्त्राचा पूर्व इतिहास व पूर्व पीठिका तत्कालीन कागदपत्रांवरून व लेखावरून निःपक्षपातबुद्धीनें ठराविण्याचा प्रवात सुरू झाला व त्यामुळेच या पंथाबद्दलही पुष्कळ नवी माहिती उपलब्ध झाली व कनिंगहॅमसारख्या औद्योगिक चळवळीच्या इतिहासकारांनीं या पंथाबद्दल पुष्कळ विश्वसनीय माहिती मिळवून या पंथाचें यथार्थ स्वरूप जगापुढें आणिलें व या विस्तृत माहितीचा अलीकडील अर्थशास्त्राच्या इतिहासकारांनीं आपल्या इतिहासांत उपयोग केला आहे. त्यावरून असें दिसतें कीं, उदीमपंथाच्या प्रवर्तकांचें आपलें औद्योगिक धोरण ठरविण्यांत चार राष्ट्रीय हेतू होते. ते हेतू हे:-
 १. देशांतील कलाकौशल्यांना उत्तेजन देणें व होतां होईल तों देशांतील कच्च्या मालाचा पक्का माल तयार करून परदेशीं पाठविणें.असा पक्का माल देशांतल्या देशांत झाल्यानें देशांतील मजूर व कारागीर यांना भरपूर काम मिळतें व पक्क्या मालाला कच्च्या मालपेक्षां किंमत पुष्कळच जास्त येत असल्यामुळे तो सर्व फायदा देशांतील व्यापा-यांस व कारखानदारांस मिळतो.
 २. देशाच्या संरक्षणास व सामर्थ्यास देशामध्यें नावाड्यांचा मोठा वर्ग असणें व मोठं व्यापारी आरमार असणें जरूर आहे. याकरितां होड्या, बोटी व गलबतें बांधण्याच्या धंद्यास व त्यास लागणाऱ्या दुसऱ्या धंद्यास उत्तेजन देणें. तसेंच मासेमारीच्या धंद्यास मदत करणें व दर्यावर्दी लोकांस साहाय्य करणें. अशायोगानें देशांत नावाड्याचा वर्ग तयार होइल व व्यापारी आरमारही सज्ज राहील.
 ३. परचक आलें असतां देशांतील लोकांना दुस-याच्या तोंडाकडे
पहाण्याचा प्रसंग राहूं नये म्हणून लोकसंख्येपुरती अन्नसामग्री देशांतल्यादेशांत उत्पन्न व्हावी, याकरितां शेतीला उत्तेजन देणें. शिवाय देशांत शेतकीची भरभराट असली म्हणजे देशाला प्रसंगीं मोठे सैन्य जमवितां येतें. कारण शेतकरी हा थोड्याशा शिक्षणानें उत्तम शिपाई बनतो असा सर्वत्र अनुभव आहे. तेव्हां देशांतील शेतकरीवर्ग सुसंपन्न असला म्हणजे तें एक देशाचें मोठे गुप्त सामर्थ्यच आहे.
  ४. शेवटीं देशाच्या स्वातंत्र्यास व संरक्षणास खजिन्याची भरपूर तयारी पाहिजे व म्हणून सरकारजवळ व देशांत भरपूर नाणें व सोनेंरुप राहील अशी तजवीज करणें देशांतील सरकारचें कर्तव्यकर्म आहे.
 अर्वाचीन इतिहासकारांच्या मतें उदीमपंथाचे वर निर्दिष्ट केलेले चार हेतू होते. परंतु हें हेतुचतुष्टय सुद्धां दुसऱ्या एका अंतिम हेतूचें साधनचतुष्टयच होय. हा अंतिम हेतु म्हणजे देशाचा दर्जा, वैभव व सामर्थ्य वाढविणें हा होय. व हा अंतिम हेतु सिद्ध करण्याकरितां जरी देशांतील कांहीं व्यक्ती अगर एखादा वर्ग यांचें नुकसान झालें तरी हरकत नाहीं, परंतु या अंतिमहेतूच्या सिध्यर्थ व्यापारउदीम व कलाकौशल्य यांवर दाब ठेवण्याचा सरकारास आधिकार आहे असें त्यांच्या व्यापारी धोरणाचें एक तत्व होतें. इंगलंडमध्ये कॉमवेल व फ्रान्समध्यें कोलवर्ट हे या पंथाचे पुरस्कर्ते व अभिमानी असें समजलें जातें. या दोघांनीं आपापल्या देशांतील कलाकौशल्याला प्रत्यक्ष मदत दिली व परकीय मालावर जबर जकाती बसवून आपल्या देशांतील कारागिरांना परकीय कारागिरांच्या स्पर्धेपासून सोडविलें व या योगानें आपल्या देशाची सांपत्तिक स्थिति व तिच्या द्वारें देशाचें वैभव व सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न केला. कॉमवेलच्या काळीं व्यापारामध्यें इंग्लंडचा प्रतिस्पर्धी हॉलंड हा देश होता. या देशाचा व्यापार सर्व जगभर होता व जलमार्गावरील तर बहुतेक व्यापार या देशाच्या व्यापा-यांच्या हातांत होता. हॉलंडचें हें व्यापारी व आरमारी वर्चस्व हाणून पाडण्याकरितां इंग्रजी इतिहासज्ञांस पूर्णपणे माहीत असलेले प्रसिद्ध नौकानायानासंबंधी कायदे कॉमवेलने केले.या कायद्यांनी इंग्रज व्यापाऱ्यांना हॉलंडच्या गलाबतांतून मालाची नेआण करण्याची मनाई केली. इंगालांडांतून बाहेर जाणारा माल किंवा आंत येणारा माल इंग्रजांनी बांधलेल्या,इंग्रजांच्या मालकीच्या व इंग्रज नावाड्यांनी चालविलेल्या गलबतांतच आला पाहिजे असा सक्त नियम
कॉमवेलने केला व या कायद्याचा इष्ट हेतु लवकरच साध्य झाला. या कायद्यानें हॉलंडच्या व्यापारी वर्चस्वास मोठाच धक्का बसला व इंग्लंडांतील गलबतें बांधण्याच्या व नावाड्याच्या धंद्यास फारच तेजी आली. व त्याच्या अनुषंगानें दुस-याही धंद्यांचा वर पाय निघाला.
 वर सांगण्यांत आलेंच आहे कीं, या उदीमपंथाच्या मताची छाप युरोपातील सर्व राष्ट्रांत बराच काळ टिकली. इंग्लंडामध्यें तर या मताच्या अनुरोधानें झालेले कायदे व जकातीची पद्धति एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू होती. या मताचा अवशेष म्हणजे इंग्लंडांतील प्रसिद्ध धान्याचे कायदे होत. या कायद्याविरुद्ध चळवळ कॉबडन व ब्राईट या उदारमतवादी मुत्सयांनीं १०।१२ वर्ष केली. तेव्हां एकदां हे कायदे १८४६ त नाहींसे झाले. व उदीमपंथाचा इंग्लंडमध्यें अगदीं बींमोड होऊन खुल्या व्यापाराच्या तत्वाचा पूर्णपणें जय झाला.

 फ्रान्समध्यें उदीमपंथाचा अभिमानी व पुरस्कर्ता कोलबर्ट हा मुत्सद्दी होता हें वर सांगितलेंच आहे. त्यानें आपल्या कारकीर्दीमध्ये कारागिरीला पुष्कळ उत्तेजन दिलें व अशा विशेष प्रकारच्या उत्तेजनानें ते ते कारखाने फ्रान्समध्यें भरभराटीस आले हे खरें. तरी पण या सर्व उदीमपंथी धोरणाचा देशाच्या सांपत्तिक स्थितीवर व बहुजनसमाजावर इष्ट परिणाम न होतां उलटच परिणाम झाला. कारण हे जे नवे कारखाने उभारले गेले त्याकरितां फ्रान्स सरकारला पुष्कळच खर्च आला. व हा सर्व खर्च फ्रान्समधल्या शेतकरीवर्गावर पडला. वास्तविकपणें फ्रान्स हा देश शेतकीला फार चांगला; परंतु या ठिकाणीं युरोपांत लुप्तप्राय झालेली जहागिरीपद्धति ब-याच काळपर्यंत अस्तित्वांत होती. यामुळे आधींच शेतकीसारख्या मोठ्या धंद्याची दैना होती. ह्यांतच कारखाने काढण्यास लागणारा पैसा या हलाख झालेल्या शेतक-यांच्याच बोकांडीं बसला. कारण जहागिरीपद्धतीच्या जुन्या काळच्या नियामानुरूप फ्रान्समधील सरदार, मानकरी, धर्मोपदेशक वगैरे जमीनदार लोक हे करापासून विमुक्त होते. शिवाय फ्रान्समध्यें राजाची सत्ता अनियंत्रित होती. यामुळे राजाच्या दरबारचे लोक व राजाच्या मर्जीतले लोक हे राजाची मर्जी संपादून आपली निरनिराळ्या करांतून मुक्तता करून घेत. सारांश, जहागिरीपद्धतीच्या अवशिष्ट चालींनीं व राजाच्या अनियंत्रित
[१४]

 सत्तेमुळे फ्रान्समधील बहुतेक सुखवस्तु व श्रीमंत वर्ग हे करापासून मुक्त झाले होते. व राजाच्या चैनीचा अवाढव्य खर्च, राज्यकारभाराचा खर्च व कोलबर्टसारख्या मुत्सद्याच्या एकपक्षी लोकहिताच्या धोरणानें कला-कौशल्याच्या उत्तेजनाचा खर्च-हा सर्व अवाढव्य खर्च मुख्यतः शेतक-यांवर व गरीब लोकांवर पडे. कारण, फ्रान्समध्यें त्या काळीं सरकारच्या उत्पन्नाच्या मुख्य चार बाबीच असत. पहिली बाब दरवर्षी शेतक-याच्या ऐपतीप्रमाणें आकाराला जाणारा जमिनीवरील कर. हा कर फक्त शेतकरी व शेत कसणारे यांवरच पडे हें वर सांगितलेंच आहे. दुसरी 'बाब मिठावरील जबर कराची. हा करही गरीब लोकांच्या वरच जास्त पडे हें उघड आहे. तिसरी बाब देशांतील आयातनिर्गत मालावरील जकाती व प्रांताप्रांतामधील आयातनिर्गत मालावरील जकाती; व शेवटची बाब म्हणजे सार्वजनिक रस्त्यावरील पट्टया. अर्थात् या सर्व बाबीचा मुख्य बोजा गरीब रयतेवर व विशेषतः शेतकरीवर्गावरच पडे.
 यामुळे फ्रान्समध्यें सामान्य लोकांची स्थिति फारच वाईट झाली होती. परंतु राजा व त्याच्या भोंवतालची मंडळी व वरच्या वर्गाचे लोक यांची सर्व प्रकारे चैन व आबादानी होती. या सर्व सामाजिक, राजकीय व औद्योगिक कारणांनीं फ्रान्समध्ये त्या काळीं सरकार व समाजव्यवस्था हीच आनिष्ट आहे व मनुष्याची स्वाभाविक व नैसर्गिक स्थिति हीच जास्त सुखकर आहे अशाप्रकारच्या कल्पना फैलावत चालल्या. त्यांतच इंग्लंडमधल्या लॉक वगैरे तत्त्वज्ञानच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनांची भर पडून फ्रान्सांत विचारक्रांति होत होती. या कारणांनी वया क्रांतीपासून या नव्या विचाराच्या खळबळीतंच अर्थ्शास्त्रांतला निसर्गपंथ उदयास आला. या पंथाचीं राजकीय व सामाजिक मते तंत्त्वेत्त्यांसाराखींच होतीं.मनुष्य हा स्वभावतः स्वातंत्त्र्यप्रिय प्राणी आहे व त्याला पुष्कळ नैसर्गिक हक्क आहेत.अगदीं रानटी स्थितींत 'बळी तो कान पिळी'हा न्याय असल्यामुळें कोणत्याही व्यक्तीला आपले स्वाभाविक हक्क उपभोगितां येण्याची खात्री नसते म्हणून मनुष्यें आपले बाकीचे हक्क राखण्याकरीतां थोड्याश्या स्वातंत्र्यावर पाणी सोडून तें स्वातंत्र्य सरकारच्या हातांत देतात तेंव्हा सरकार हें समाजाला अत्यावश्यक आहे; परंतु तें एक अवश्यक अनिष्टांपैकी आहे.परंतु सरकारला व्यक्तीचे कांही स्वभाविक हक्क कधींच हिरावून घेतां येत नाही
मनुष्याला आपल्या श्रमाचें फळ उपभोगण्याचा हक्क आहे. तसेंच प्रत्येक मनुष्याला आपल्या श्रमाचा होईल तितका फायदा करून घेण्याचा हक्क आहे. प्रत्येक मनुष्याला आपलें हित कशांत आहे हें समजतें व त्याला आपल्या या हिताचा मार्ग पत्करण्याचा हक्क आहे. समाजाचें हित व व्यक्तीचें हित यामध्यें विरोध नाहीं. फ्रेंच तत्वज्ञान्यांच्या व निसर्गपंथाच्या मतें हीं तत्वें स्वयंसिद्ध आहेत, व या तत्वांवरून त्यांनीं आपलीं अर्थशास्त्रविषयक कांहीं प्रमेयें व विशेषतः अप्रतिबंध व्यापाराचें तत्व सिद्ध केलें आहे. मनुष्याचे वरीलप्रमाणें हक्क असल्यामुळे त्याला उद्योगधंद्यास पूर्ण मुभा असली पाहिजे. त्याला वाटेल त्याप्रमाणें आपल्या श्रमाचा मोबदला मिळण्याची संधि पाहिजे. व्यापाराच्या कामांत पूर्ण चढाओढ व करार यांचा अंमल पाहिजे. सरकारला व्यापारांत ढवळाढवळ करण्याचा हक्क नाहीं. सरकारचें काम म्हणजे त्यांनीं मानवजीवित व मालमत्ता यांना सुरक्षितता देणें व त्यांचें संरक्षण करणें इतकेंच आहे. उद्योगधंदे व व्यापारउदीम यांसंबंधीं सरकारनें कायदेकानु करण्यापासून देशाचा फायदा नसून उलट नुकसान आहे. कारण व्यक्तीचें व समाजाचें हित हीं परस्पर विरुद्ध नसावींत व प्रत्येक व्यक्तीला आपलें हित कशांब आहे हें समजण्याचें सामथ्र्य असावें अशी मुळीं ईश्वरी येजनाच आहे. यामुळे व्यापारउदीमाच्या बाबतींत व्यक्तीस पूर्ण मुभा असण्यांत देशाचें हित आहे व व्यक्तिस्वातंत्र्यावरच देशाची सांपत्तिक भरभराट अवलंबून आहे.
 या वरील विवेचनावत्रून निसर्गपंथाचा सर्व रोंख उदीमपंथांविरुद्ध कसा होता हें स्पष्ट होईल. उदीमपंथाचें संरक्षक धोरण होतें. लणजे त्या पंथाचें मत व्यापारउदीम यावर सरकारचा दाब पाहिजे; व सरकारनें संरक्षणाचें तत्व अंगीकारिलें पाहिजे, तरच देशाची सांपत्तिक स्थिति सुधारेल असें होतें. तर निसर्गपंथाचे मताप्रमाणें जें जें होईल तें तें पाहावें हेंच सरकारचें खरें धोरण व यानेंच देशाची सांपत्तिक स्थिति सुधारणार.
 निसर्गपंथी लोकांची संपत्तीच्या स्वरूपाची व त्याच्या कारणांची कल्पनाही उदीमपंथी लोकांच्यापेक्षां निराळी होती. त्यांचे मतें देशाची संपति वाढविणारा धंदा शेतकीच होय. जमिनीचे मालक व शेतकरी एवढेच समाजांतले का वर्ग धनोत्पादक आहेत. कारण शेतकीच्या उत्पन्नांतून श्रमाचा पूर्ण मोबदला मिळून व भांडवलाचें व्याज व
फायदा निघून शिवाय पुष्कळ निव्वळ उत्पन्न शिल्लक राहतें. याचें कारण शेतकी व खाणीचें काम यांमध्यें मनुष्याच्या श्रमाला निसर्गाची मदत होते. व म्हणूनच खर्चापेक्षां उत्पन्न किती तरी पट जास्त होतें. कारखानदार, व्यापारी, बैौद्धिक धंदेवाले व घरगुती चाकरनैोकर हे समाजांतील वर्ग जरी उपयोगी आहेत तरी ते अनुत्पादक किंवा वांझ आहेत. यांच्या श्रमापासून देशांत जास्त संपात्ति उत्पन्न होत नाहीं. कारखानदार कच्च्या मालपेक्षां जास्त किंमतीचा पक्का माल तयार करून संपात्ति वाढवितो असें भासेल, परंतु तें खरें नाहीं. कारण, कापसापासून विणकर्यानें विणलेलें कापड जास्त मोलवान् असतें खरें, पण कापसाच्या व कापडाच्या किंमतींतील हा फरक म्हणजे विणक-याच्या श्रमाचा निवळ मोबदला आहे. कारण जितकी जास्त किंमत त्यानें निर्माण केली तितकाच त्याला उपजीविकेचा वगैरे खर्च अर्थात् त्याच्या मजुरीचे दिवस खर्च झाले. तेव्हां कारखानदार हे धनाच्या एका रुपाला दुसरें रुप देतात एवढेंच. त्यांच्या श्रमानें देशाची संपत्ति वाढत नाहीं. हे सर्व अनुत्पादक वर्ग जमीनदार व शेतकरी यांच्यावर अवलंबून आहेत. कारण यांची उपजीविका उत्पादकवर्गाच्या निवळ शिलकेपासून होते. म्हणून प्रत्येक देशानें शेतकीच्या सुधारणेकडे लक्ष दिलें म्हणजे झालें. शेतकीची सुस्थिति व प्रगति असेल तर इतर उपयुक्त धंदे आपोआप निघतील. परंतु शेतकीची जर दुःस्थिति असेल तर इतर धंद्यांना कितीही उत्तजन दिलें तरी ते ऊर्जियाकरितां फ्रेंच राजांनीं कारखान्याच्या उत्तेजनाचा नाद सोडून शेतकीच्या सुधारणेस लागावें. प्रथमतः तावस्थेस येणार नाहींत.

 ताप्रांतांमधील व देशादेशांमधील आयात व निर्गत मालावरील जबर जकाती काढून खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकारावें. फ्रान्समध्यें चालू असलेली अन्यायाची, भानगडीची व गुंतागुंतीची कराची पद्धत मोडून सर्व जमीनदार व शेतकरी लोकांवर नेमस्त व वाजवी असा सरसकट एकच कर बसवावा. व त्यामध्यें वारंवार फेरबदल करूं नये. या सुधारणा ताबडतोब घडवून आणल्यास फ्रान्समधल्या शेतक-यांची स्थिति सुधरेल व फ्रान्सच्या तिजोरीची दैनाही नाहींशी होईल. व फ्रान्स सांपत्तिक भरभराटीच्या मार्गास लागेल. अशा प्रकारचें या पंथाचें औद्योगिक धोरण होतें. कियेक इतिहासकारांचें असें ह्राणणें आहे कीं, या निसगपंथी लोकांच्या म्हणण्याप्रमाणें फ्रान्समध्यें जर ताबडतोब सुधा
[१७]

 रणा घडवून आणल्या असत्या तर फ्रान्समधली भयंकर राज्यक्रांति व तिचे दुष्परिणाम टळले असते. परंतु या लोकांच्या मतांचा परिणाम आधिकारी लोकांवर झाला नाहीं, व त्यांचीं मतें व प्रमेयें त्यांच्या पुस्तकांतच राहिलीं. मात्र त्यांच्या अप्रतिबंध व्यापाराच्या तत्वाचा कांहीं काळानें अॅडाम स्मिथनें फैलाव केला, व एक दोन शतकें तरी हें तत्व अबाधित रााहलें.

 निसर्गपंथानंतरच्या अर्थशास्त्राच्या पंथाचा जनक अॅडाम स्मिथ होय. अॅडाम स्मिथच्यापूर्वी इंग्लंडमध्यें सुद्धां उदीमपंथाच्या विरुद्ध मताचे पुष्कळ लेखक झाले. त्यांत ह्या इतिहासकाराचे अर्थशास्त्रविषयक निबंध फार मह्त्वाचे आहेत; परंतु या सर्व ग्रंथकारांच्या ग्रंथांतील ग्राह्यांश अॅडाम स्मिथच्या अभिमत ग्रंथांत आल्यामुळे अॅडाम स्मिथच्या उज्ज्वल कीतींमध्यें या ग्रंथकारांचीं नावं मावळून गेल्यासारखीं झालीं आहेत. ज्याप्रमाणें अॅरीस्टाटलला तर्कशास्त्राचा जनक समजतात त्याप्रमाणें अॅडाम स्मिथला अभिमत अर्थशाखाचा जनक समजतात. याचा अर्थ त्यानें सर्व शास्त्र अगदीं अथपासून इतिपर्यंत नवेंच केलें असा मात्र नव्हें आतांपर्यंत आपण पाहिलेंच आहे कीं, अर्थशास्त्रासंबंधीं दोन पंथ अॅडाम स्मिथच्या पूर्वींच उद्यास आले होते. परंतु अंडाम स्मिथ यानें आपल्यापूर्वीं झालेल्या अर्थशास्त्रविषयक वांड्मयापासून घेण्यासारख्या सर्व गोष्टी ग्रहण करून आपल्या बहुश्रुतपणानें, विचारानें व अवलोकनानें मिळविलेल्या ज्ञानाची त्यांत भर घालून या शास्त्राला व्यवस्थित व संघटित असें स्वरूप दिले. त्यानें या शास्त्राची मर्यादा ठरवून त्याची स्पष्ट अशी व्याख्या केली.या शास्त्रांतील निरनिराळे प्रश्न व विषय हे एकमेकांशी कसे संलग्न आहेत व ते परस्परावलंबी असुन कांहीं सर्वमान्य साधारण तत्वांपासून कसे सिद्ध होतात, हें आपल्या सुंदर विचारसरणीनें व विशेषतः विषद भाषाशैलीनें त्यानें लोकांच्यापुढे मांडिले. यामुळें अॅडाम स्मिथचा ग्रंथ एकदम विद्न्मान्य होऊन त्याच्या मतांचा प्रसार झपाट्यानें होऊं लागला व युरोपांतील इतर देशांतही त्याच्या पुस्तकाचीं भाषांतरें व रूपांतरें होऊ लागलीं. इंग्लंडमधील प्रसिद्ध मुत्सद्दी पिट हा स्मिथच्या मताचा आभमानी झाला.
[१८]
}

{[gap}}अॅडाम स्मिथचा ग्रंथ पंचपुस्तकात्मक आहे. राष्ट्रीय संपति ही राष्ट्रांतील वार्षिक श्रमाचें फळ आहे, या विधानापासून पहिल्या पुस्तकाला प्रारंभ केलेला आहे. या विधानानें अॅडाम स्मिथनें उदीमपंथ व निसर्गपंथ ह्या दोहोंपासून आपल्या मीमांसेचा फरक दर्शविला आहे. उदीमपंथानें पैसा व परकी व्यापार हीं संपत्तीचीं मुख्य साधनें आहेत असें प्रतिपादन केलें होतें; तर निसर्गपंथानें शेतकीला सर्व संपत्तीची जननी केलें होतें. ह्या दोन्ही पंथांचा एकतर्फीपण दाखविण्याकरितां व आपल्या मीमांसेचें संपूर्णत्व स्थापन करण्याकरितां संपत्तीचें तिसरें उपेक्षित कारण मानवी श्रम होत असें प्रतिपादन करून स्मिथनें अभिमत पंथांतील कारणात्रयीचा संप्रदाय पाडला

 राष्ट्रीय संपत्तीचीं भांडवल, जमीन व .श्रम अशीं तीन कारणें आहेत, हें त्यानें प्रथमतः दाखविलें आहे व मग श्रमाच्या ज्या एक विशेष गुणावर संपत्तीची कमीअधिक वाढ अवलंबून आहे त्याचें विशेषतः वर्णन कलें आहे. श्रमाचा हा गुण म्हणजे श्रमविभागाचें तत्व होय. अॅडाम स्मिथनें अर्थशास्त्रामध्यें या तत्वाचा एक नवा शोधच लाविला असे म्हणण्यास हरकत नाहीं. समाजांत श्रमविभागाचें तत्व सुरू झालें म्हणजे प्रत्येक माणसाच्या ब-याच गरजा दुस-याकडून भागविल्या जातात, म्हणून मालाच्या अदलाबदलीस सुरुवात होते व ही अदलाबदल सुलभ रीतीनें होण्याकरितां विनिमयसामान्य म्हणून पेसा आस्तित्वांत येता. तसेंच मालाची अदलाबदल मालाचें मोल ठरल्याखेरीज होत नाही. मालाच्या मोलाचें खरें प्रमाण म्हणजे तो माल उत्पन्न करण्यास लागणा-या श्रमाचें परिमाण होय. सारख्या परिमाणाच्या श्रमाची किंमत सर्व काळीं व सर्व ठिकाणीं सारखीच असते. सामान्यतः पदार्थाचे मोल पैशामध्यें मोजलें जातं व त्यालाच पदार्थाची किंमत म्हणतात. पैशाला उत्तम वस्तु म्हणजे सोनेंरूपें, कारण त्यांचें मोल सहसा बदलत नाही. समाजाच्या प्रथमावस्येंत वस्तूची किंमत बहुतांशीं श्रमावरच अवलंबून असते. परंतु समाजाच्या परिणतावस्थेंत किंमतीमध्यें तीन घटकावयव असतात. भाडें अगर खंड, मजूरी व नफा. जमीनदाराला भाडें मिळतें. कामगारांला मजुरी मिळते व संपत्ति उत्पन्न करणाराला नफा मिळतो. समाजाची संपत्ति ज्या प्रमाणानें वाढते, त्या प्रमाणानें भाडें व मजुरी वाढत जातात,
[१९]

 परंतु देशाच्या सांपत्तिक वाढीबरोबर नफा मात्र कमी होतो. कारण जसजसें देशांत भांडवल जास्त वाढतें तसतशी भांडवलवाल्यांत धंद्याबद्दल चढाओढ होऊन भांडवलवाल्यांचा नफा कमी होत जातो. तरी पण कांहीं विशिष्ट कारणांनीं निरनिराळ्या धंद्यांतील मजुरी व नफा यांमध्यें कायमचा फरक दिसून येतो.
 दुस-या पुस्तकामध्यें भांडवल, त्याची वाढ व त्याची सुस्थिति यासंबंधाचें विवेचन आहे. भांडवलाचे दोन प्रकार आहेत. एक स्थिर भांडवल व दुसरें चल भांडवल. यंत्रसामग्री, कारखान्याच्या इमारती वगैरे, शेताची कायमची सुधारणा धद्याचें व कलांचें ज्ञान हें स्थिर भांडवल होय. चल भांडवल म्हणजे पैसा, कारखानदाराच्या ताब्यांतील अन्नसामग्री, कच्चा माल व कारखानदाराच्या हातांतला पक्का माल. देशाच्या पैशाची दरवर्षी होणारी मोडतोड व झीज हीं भरून काढणें बरेंच खर्चाचें काम असतें, म्हणून देशांत व्यापारी पत, विश्वास व सचोटी यांचा उदय झाल्यावर कागदी चलन सुरू होतें व त्याचे योगानें बराच खर्च वांचतो, या पुस्तकाच्या शेवटीं अॅडाम स्मिथनें स्वाभाविकपणें उद्योगधंद्याच्या पाय-या कशा लागतात व देशांत वाढणारें भांडवल स्वाभाविक तऱ्हेनें कशा क्रमानें निरनिराळया धंद्यांत गुंतविलें जाईल हें सांगितलें आहे. अॅडाम स्मिथच्या मतानें भांडवल प्रथमतः शेतकींत जाईल. कारण तेथें सृष्टि मानवी श्रमाला मदत करीत असते. म्हणून या उद्योगांत फारच फायदा असतो. नंतर कारखाना, नंतर देशी व्यापार, मग परदेशी व्यापार व शेवटीं परदेशी अप्रत्यक्ष व्यापार, हा धंद्याच्या वाढीचा नैसर्गिक ऋम आहे
 या दोन पुस्तकांत अॅडाम स्मिथनें अर्थशास्त्राचा तात्विकदृष्ट्या विचार केला आहे व पुढील अर्थशाखकारांनीं अॅडाम स्मिथच्या विवेचनांतील याच तात्विक भागांत कोठें भर घातली आहे तर कोठें त्याच्या मतांत फरक केला आहे<br.>

 अॅडाम स्मिथचें तिसरें व चौथें पुस्तक हीं ऐतिहासिक आहेत. तिस-यामध्यें युरोपांत निरनिराळ्या धंद्यांची व एकंदर संपत्तीची वाढ कशी व कोणत्या कारणानें झाली याचा इतिहास दिला आहे. चैौथ्यांत आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या पंथांची हकीकत देऊन त्यांच्यावर टीका केली आहे. यामध्यें विशेषतः उदीमपंथाच्या हेतूचें व त्यांच्या साधनांचें सविस्तर
[२०]

 खंडण आहे. निसर्गपंथाशीं अॅडाम स्मिथचा विरोध थोड्याच बाबतींत होता. पुष्कळ बाबतींत त्याचें व अॅडाम स्मिथचें मतैक्यच होतें. म्हणून या पंथावर अॅडाम स्मिथनें फारशी सविस्तर टीका केली नाहीं.अॅडाम स्मिथच्या ग्रंथाच्या शेवटल्या पुस्तकांत सरकारचीं कर्तव्यकर्में व त्यांच्या सिद्धयर्थ लागणारा खर्च याचा प्रथम विचार करून मग हा खर्च सरकार कोणकोणत्या उत्पन्नाच्या बाबीनें भागवितें हें सांगितलें आहे. सुधारलेल्या सर्व देशांत बहुधा सरकारचें बहुतेक उत्पन्न करांपासून उत्पन्न होतें असें अॅडाम स्मिथनें दाखविलें आहे; व पुढें कराचे चार नियम दिले आहेत, व करांचें वर्गीकरण देऊन प्रत्येक कर हा समाजांतील कोणकोणत्या वर्गावर अखेर पडतो व त्यांचा संपत्तीच्या वाढीवर काय परिणाम होतो हें सांगितलें आहे व शेवटीं राष्ट्रीय कर्जाची मीमांसा करुन ग्रंथ समाप्त केला आहे.[br]

    ज्याप्रमाणें बेकन हा पाश्र्चात्य शास्त्रीय प्रगतीच्या आधीं उद्यास आला, परंतु त्यानें शास्त्राची विलक्षण प्रगति होईल असें भविष्य केलें, त्याप्रमाणें अॅडाम स्मिथ हा युरोपांतील औद्योगिक क्रांतीच्या आधीं झाला; व त्याच्या काळीं यंत्रे व अर्वाचीन काळचीं वाफेवर चालणारी एंजिनें झालीं नव्हतीं. तरी त्यानें आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीनें भावी संपत्तीच्या वाढीच्या कारणांचा विचार करून संपत्तीची विलक्षण वाढ होणार असें भाकीत केलें होतें; व तें भाकीत सर्वतोपरीं खरें ठरलें.
  त्याचे नंतरचा अर्थशास्त्राला एका महत्वाच्या प्रश्नाची जोड करून देणारा ग्रंथकार म्हणजे मालथस होय. मालथसचें नांव लोकसंख्येची मीमांसा या प्रश्नाशीं अगदीं खिळलेलें आहे; परंतु त्याचें या प्रश्नाकडे एका आकस्मिक प्रसंगानें लक्ष गेलें
{gap}} गाडविन् म्ह्णून त्या काळीं नांवाजलेला असा मोठा ग्रंथकार होऊन गेला. त्यानें सामाजिक प्रश्नासंबंधीं लोककल्याणाच्या हेतूनें व लोकांची स्थिति सुधारण्याकरितां पुष्कळ लेख व ग्रंथ लिहिले. त्या एकामध्यें त्याचें असें म्हणणें होतें कीं, जगांत किंवा एखाद्या देशांत संपत्ति कमी असते म्हणून लोक दारिद्र्यांत, दैन्यावस्थेंत व हृालांत राहतात असें नाहीं. देशांत संपत्ति सर्व लोकांना पुरेशी असते व नेहमीं पुरेशी राहील. मात्र देशांतील सर्व वर्गांमध्यें संपत्तीची व श्रमांची सारखी वांटणी झाली पाहिजे. हल्लीं श्रीमंत लोक मुळीं श्रम न करतां अन्यायी कायद्याच्या[
[२१]

 मद्तीनें संपत्तीचा मोठा वांटा पटकवितात. यामुळें गरीब लोकांस जीवापाड श्रम करूनही पोटापुरता संपत्तीचा वांटा मिळत नाहीं; व म्हणूनच त्यांना हालांत, दुःखांत व एकंदर दैन्यांत दिवस कंठावे लागतात. म्हणून संपत्तीची वांटणी न्यायाची केल्यास व प्रत्येक मनुष्यानें आपल्या उपजीविकेकरितां श्रम करावयाचेच असा निश्चय केल्यास सर्वत्र सुख व शांति नांदेल; व असें एकदां झालें म्हणजे सर्वाना आपलीं मनें सुसंस्कृत करण्यास वेळ मिळेल. देशांत सर्व लोक सुखी व ज्ञानवान् होतील. मग गुन्हे, दुःख, हाल वगैरे सर्व अनिष्ट प्रकार समाजांतून नाहीसे होऊन सर्वत्र स्त्ययुगास सुरुवात होईल. अशा प्रकारच्या विचारसरणींतील एक ढोबळ चूक दाखविण्याकरितां मालथस यानें आपला निबंध लाहला. मालथसच्या मतें ही घोडचूक म्हणजे मानवी स्वभावांतल्या एका प्रवृतीची विस्मृति होय. मालथसनें असें दाखविलें कीं, असा समाज स्थापन झाला आहे अशी कल्पना केली तरी हें सत्ययुग शाश्वत टिकणारें नाहीं. पुनः कलियुगास प्रारंभ झालाच पाहिजे. कारण, सर्व मनुष्यांची सुस्थिति आहे असें मानलें म्हणजे प्रत्येक मनुष्य लग्र करील. कां कीं, विवाहाची प्रवृति मनुष्याला उपजत आहे व प्रत्येक कुटुंबाची सुस्थिति आहे असें मानलें म्हणजे मानवी प्राण्याच्या प्रजोत्पादनशक्तीला अमर्यादित मुभा मिळेल. मनुष्याला लागणारें अन्न गणितश्रेढीनें वाढतें तर मनुष्यची वाढ भूमितिश्रेष्टीनें होते. यामुळे मनुष्यें इतकीं वाढतील कीं, सर्वांना अन्न मिळण्याची पंचाईत पडून पुनः जीवनार्थकलह सुरू होईल व सदृढ मनुष्यें आपल्याला जास्त संपत्ति मिळवितील व संपत्तीची विषमता व त्यापासून होणारें दुःख व हालअपेष्टा हीं जगांत अवतरतील. तेव्हां ज्या कारणानें या मनुष्यस्वभावांतील सत्ययुग नाहीसें होईल त्याच कारणानें असें सत्ययुग अस्तित्वांतच येणार नाहीं. तेव्हां जगांत लोकसंख्या मर्यादित राहण्यास दुष्काळ, सांथ, आजार, दुःखे वगैरे स्वाभाविक आपत्ती व अनीति, लढाया वगैरे कृत्रिम आपत्ती या पाहिजेत. तेव्हां ही लोकसंख्या मर्यादित करणारीं सक्षात् कारणें म्हणजे सृष्टीक्रमांतील एक आवश्यक भागच आहे.

  या पुस्तकाबद्दल मालथसवर धर्माभिमानी लोकांकडून अतोनात टीका झाली. कारण, त्याच्या विचारसरणीप्रमाणें दुष्काळादि कारणें
[२२]

 ईश्वरनिर्मित जगांत सतत राहणार असें ठरत असल्यानें देवावर अन्यायीपणाचा दोष येतो. परंतु याचें पुस्तक श्रीमंत लोकांना मात्र आवडलें. कारण, गरीब लोकांची दुःस्थिति त्यांनीं आपल्या अविचारानें आपणावर ओढून आणलेली आहे, असा त्याच्या प्रतिपादनाचा एकंदर रोख होता.

 या निबंधाच्या दुस-या आवृत्तींत मालथसनें पुष्कळच फरक केला. खरोखरी त्याचा ग्रंथ नवीनच झाल्याप्रमाणें झाला. पहिल्या आवृत्तीइतकी एककल्ली विचारसरणी त्यामध्यें नव्हती. आपल्या ह्मणण्यास त्यानें ऐतिहासिक पुरावा पुष्कळ जोडला. विशेषतः लोकसंख्या मर्यादित करणारें आणखी एक कारण प्रमुखत्वेंकरून त्यानें पुढें केलें. तें कारण म्हणजे दूरदर्शीपणा हें होय. जर मनुष्यांनीं लग्नाच्या बाबतींत दूरदर्शीपणा दाखविला व आपल्या बायकोचें व भावी मुलांचें चांगल्या रीतीनें संगोपन करतां येईल अशी सांपत्तिक स्थिति प्राप्त होईपर्यंत लग्नाचा विचार पुढें ढकलला तर लोकसंख्या कमी करणाऱ्या साक्षात् कारणांचा जोर कमी होईल. याप्रमाणें मालथसनें आपल्या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तींत समाजसुधारणेची शक्यता कांहीं अंशानें कबुल केली; परंतु ही सुधारणा घडून येण्यास मनुष्यांमध्यें विवाहसंबंधीं दूरदर्शीपणा व आपल्या मुलांबाळांचें संगोपन आपणच केलें पाहिजे अशी स्वावलंबी भावना उत्पन्न झाली पाहिजे असें प्रतिपादन केलें.

 याच्या पुढला अर्थशास्त्रकार म्हणजे रिकार्डो. यानें भाड्याची एक नवीन मीमांसा काढली. तसेंच राष्ट्रांराष्ट्रांमधील व्यापाराच्या तत्वाचा ऊहापोह केला. रिकाडेनें अर्थशास्त्र हें एक भूमितीसारखें तार्किक शास्त्र आहे असें प्रतिपादन केलें. या शास्त्राला अवलोकनाची गरज नाहीं. ज्याप्रमाणें संख्या व परिमाण यासंबंधींच्या कांहीं स्वयंसिद्ध तत्वांपासून गणितशास्त्र आपलीं सर्व तत्वें काढितें, त्याप्रमाणें मानवी स्वभावाच्या कांहीं स्वयंसिद्ध तत्वांपासून तार्किक पद्धतीनें सर्व प्रमेयें व सिद्धान्त अर्थशास्त्र काढितें. या शास्त्राचीं विधानें गणिताप्रमाणेंच सर्व काळीं व सर्व ठिकाणी व समाजाच्या कोणत्याही स्थितींत सारखींच लागू पडतात. अर्थशास्त्राला हें स्वरूप रिकॉर्डोनें दिलें ही गोष्ट फार अनिष्ट झाली कारण या तार्किक पद्धतीनें काढलेल्या या शास्त्रांतील पुष्कळ सिद्धांतांचा सत्याशीं व वस्तुस्थितीशीं विरोध येऊं लागला व म्हणूनच या शास्त्राच्या विफलतेबद्दल व खोटेपणाबद्दल ओरड होऊं लागली.
[२३]

' अर्थशास्त्राची व कराचीं तत्वें' या नावाच्या पुस्तकांत रिकार्डोचे बहुतेक सर्व विचार आलेले आहेत. रिकार्डोचा हा ग्रंथ म्हणजे या शास्त्रावरील साग्र व संपूर्ण असा ग्रंथ नाही; तर तो माल, किंमत, भाडें, मजुरी, नफा, कर, पैसा, पेढया इत्यादि अर्थशास्त्रांतील विषयांवरील एक निबंधसंग्रह आहे. तरी पण रिकार्डोच्या या निरनिराळ्या निबंधांतील विचारसरणी सारखीच असून त्या सर्वांमध्यें कांहीं एक सामान्य तत्वें प्रतिबिंबित झालेलीं आहेत यांत शंका नाहीं. या ग्रंथांत संपत्तीच्या उत्पत्तीच्या विषयापेक्षां संपत्तीच्या वांटणीच्या विषयालाच ग्रंथकारानें जास्त महत्व दिलेलें आहे. देशांत संपत्ति उत्पन्न झालेली आहे असें गृहीत धरून त्या संपत्तीची समाजांतील निरनिराळ्या वर्गांमध्यें वांटणी कशी होते व विशेषतः समाजाच्या प्रगतीच्या निरनिराळ्या पाय-यांमध्यें या वांटणींत. कसकसा फरक होत जातो या प्रश्नाचा ऊहापोह रिकार्डोनें विशेष प्रकार केला आहे.

   त्याची किंमतीची किंवा मोलाची मीमांसा होय. त्याच्या मतानें ज्या मालाचा पुरवठा अपल्या इच्छेप्रमाणं वाटेल तितका वाढवितां येतो, अशा मालाचें मोल चढाओढीच्या अमदानींत त्या मालाच्या उत्पत्तीला लागणा-या श्रमावर अवलंबून असतें. व्यावहारिक. भाषेत बोलावयाचें म्हणजे मालाची किंमत त्याच्या उत्पत्तीच्या खर्चावर अवलंबून असते. संपत्तीच्या उत्पत्तीला भांडवल लागतें खरें, परंतु भांडवल म्हणजे सांठविलेले श्रम होत. तेव्हां मालाची किंमत म्हणजे त्याला लागणा-या श्रमाची किंमत होय. याप्रमाणें रिकार्डोनें संपत्तीच्या एकाच कारणाला वाजवीपेक्षां फाजील महत्व दिलें. रिकार्डोच्या एककल्ली मतावरच सामाजिकपंथी ग्रंथकारांची मोठा भिस्त आहे, हें पुढील एका पुस्तकांत सामाजिकपंथाचा इतिहास द्यावयाचा आहे त्या वेळीं जास्त खुलासेवार दिसून येईल.
  या तत्वाच्या विवेचनानंतर रिकार्डोनें समाजांतील निरनिराळ्या वर्गामध्यें संपत्तीची वांटणी कशी होते हें दाखविण्याचा उपक्रम केला आहे व प्रथमतः त्यानें आपल्या प्रसिद्ध भाड्याच्या उपपत्तीचा ऊहापोह केला आहे. या उपपत्तीचा 'वांटणी' च्या एका भागांत सविस्तर विचार करावयाचा आहे. तेव्हां येथें त्याचें सामान्य स्वरूप दाखवेले. म्हणजे बस्स
[२४]

 होईल. जरी भाडयाची उपपत्ति हल्लीं रिकार्डोच्या नांवाखालीं मोडते तरी त्याच्यापूर्वी अंडरसन, मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधिशाच्या पदवीप्रत चढलेले वेस्टसाहेब व प्रसिद्ध अर्थशास्त्री मालथस या तिन्ही ग्रंथकारांच्या लेखांत ही उपपत्ति दृष्टीत्पत्तीस येते व ही गोष्ट रिकार्डो यानेंही कबूल केली आहे.थोडक्यांत या उप्पतीचे स्वरूप असें आहे.जमिनीचे भाडें म्हणजे जमिनीच्या उत्पादक शक्तीबद्दल जमीन कसणारानें जमिनीच्या मालकास दिलेली किंमत होय, व या किंमतीचें मान जमीन कसण्यास लागणारा खर्च व जमिनीच्या उत्पन्नाचीं येणारी किंमत यांच्या अंतराबरोबर असते व जसजशी देशाची लोकसंख्या वाढते तसतशी धान्याची किंमत वाढते व धान्याची किंमत वाढली म्हणजे कमकस जमिनीची लागवड करणें शक्य होतें. परंतु या अगदी निकृष्ट कसाच्या जमिनीचें भाडें येत नाहीं व या जमिनीचें उत्पन्न व सुपीक जमिनीचें उत्पन्न यांच्या अंतराइतकें जमिनीचें भाडे येतें. धान्याच्या किंमतीचा भाडें हा घटकावयव नसतो. तर धान्याच्या किंमती वाढल्यामुळे भाडे वाढतें. रिकॅर्डोच्या विचारसरणींत या भाड्याच्या उपपत्तीला विशेष महत्त्व आलेलं आहे. याचें कारण असें आहे कीं, त्यानें या उपपत्तीवरून समाजच्या एकंदर सांपत्तिंक स्थितीबद्दल व त्या समाजांतील निरनिराळ्या वर्गाच्या सांपत्तिक स्थितीबद्दल कांहीं विशिष्ट अनुमानें काढिलीं आहेत. त्याचे मतें देशाची जसजशी वाढ होते व लोकसंख्या वाढत तसतसे धान्याचे भाव चढत जातात व याचा परिणाम असा होती कीं, जमीनदाराचें भाड्याचें उत्पन्न सारखे वाढत जातें. धान्याचे भाव वाढले म्हणजे मजुरांच्या उपजीवनाचा खर्च वाढतो व यामुळे मजुरीचे दर वाढतात. परंतु या वाढत्या मजुरीच्या दरापासून मजुरांची सांपत्तिक स्थिति सुधारते असें मात्र नाहीं. कारण जीविताच्या अवश्यकालाच किंमत जास्त पडूं लागते व मजुरी जास्त झाली कीं, व्यापाच्यांचा व कारखानदारांचा नफा कमी होतो. अशा प्रकारची अनुमानें रिकाडेनेिं आपल्या उपपत्तीपासून काढिली आहेत. त्याच्या खरेखोटेपणाचा पुढल्या भागांत विचार करावयाचा आहे. तेव्हां सध्या इतकी माहिती पुरे आहे'
 रिकॅर्डोच्या मतांतील विशेष महत्त्वाचें दुसरें मत म्हणजे परकी व्यापारासंबंधीं होय. परकी व्यापाराचा विशेष फायदा कोणता व कोणत्या परि-
स्थितींत व्यापार चालू शकतो याचे रिकार्डोने मोठ्या मार्मिक तहेन विवेचन केले आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे परदेशी व्यापाराचा खरा व एकच फायदा हा होय कीं, त्याचे योगाने देशांतील भांडवल व श्रम यांच्या मोबदला आधिक माल मिळू शकतो, म्हणजे परकी व्यापाराच्या योगानें जणू कांहीं देशाची संपाति वाढल्याप्रमाणे होते. याही विषयाचा पुढे आपल्यास विशेष तऱ्हेने विचार करावयाचा आहे. तेव्हां सध्या इतकें विवे चन वस्स आहे.
 ज्याला अर्थशास्त्राचे इतिहासकार अभिमत अर्थशास्त्र म्हणतात, ते मुख्यतः या तीन ग्रंथकारांनी बनविलें असें म्हणण्यास हरकत नाही. यापुढील या पंथाचा अभिमान व पुरस्कर्ता म्हणजे जॉन स्ट्अयूर्ट मिल्ल होय. अँडाम स्मिथच्या अर्थशास्त्रावर पुष्कळ ग्रंथकर्त्यांनी आक्षेप घेतले. यामुळे अर्थ शास्त्रातील पुष्कळ प्रश्न पुनः वादग्रस्त बनले; शिवाय रिकॅर्डोनंतर व कांहीं अंशी त्याच्याच एककल्ली सिद्धान्तामुळे सामाजिक पंथ नांवाचा एक अर्थ शास्त्रात नवीन पंथ निर्माण झाला. या पंथाचा हेतु संपत्तची वाटणी न्यायाने व समतेने करण्याचा होता. या पंथाची हकीकत या ग्रंथाच्या तिसऱ्या पुस्तकांत दिली असल्यामुळे येथे त्याची पुनरुक्ति करीत नाही. परंतु या पंथानेही अभिमत अर्थशास्त्राच्या कांहीं प्रमेयांच्या सत्यत्वाबद्दल लोकांच्या मनांत संशय उत्पन्न केला. तसेच अर्थशास्त्रविषयक कांहीं नवीनच प्रश्न उपस्थित झाले. या सर्व नवीन सामग्रीचा उपयोग करून मिल्लने जुन्याच पायावर व जुन्याच पद्धतीने परंतु सामाजिक पथाने व उदयोन्मुख अशा ऐतिहासिक पंथाने आणलेल्या नव्या ज्ञानाचा उपयोग करून एक मोठा व्यापक ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्रावरील त्याचा पहिला ग्रंथ ‘‘ अर्थशास्त्रातील कांहीं निकाल न लागलेल्या प्रश्नांसंबंधीं » होता. या ग्रंथांत केलेल्या विवेचनाचा पुढे मिल्लने आपल्या प्रसिद्ध ग्रंथांत उपयोग केला. मिल्लची महत्वाकांक्षा ‘‘ अर्वाचीन अँडाम स्मिथ " लिहिण्याची होती, व ती पुष्फळ अंशी सफलही झाली. सुमारे पन्नास वर्षे अर्थ शास्त्रावरील मिल्लचे पुस्तक म्हणजे एक मोठा आधारभूत ग्रंथ गणला जात असे. मिल्लच्या लेखांच व ग्रंथांच प्रसाद हा एक विशेष गुण आहे. तसेच प्रतिपक्षाची मते योग्य तऱ्हेने मांडून मग त्यांचे यथार्थ खंडण कर

ण्याची त्याची शैली वर्णनीय आहे. तसेच कोणत्याही तत्वाला योग्य

[२६]

 दाखला व उपमा देऊन तें विषद करण्याची हातोटी मिल्लला उत्तम साधली होती. यामुळें त्याचें पुस्तक फार लोकप्रिय झालें, इतकेंच नव्हे तर अर्थशास्त्रांतील तत्वें व प्रमेयें हीं सामाजिक प्रश्नांना कशीं लागू करावयाचीं याचाही त्यानें ऊहापोह केला असल्यामुळें तें पुस्तक अॅडम स्मिथच्या पुस्तकांपेक्षांही जास्त महत्वाचें आहे असें लोकांस वाटलें. मिल्लनें या शास्त्राच्या तार्किक पद्धतीचें समर्थन केलें आहे व बहुतेक ठिकाणी रिंकार्डोचीं मतेंच प्रतिपादन केलीं आहेत.
 मिल्लच्या पहिल्या ग्रंथांत पांच विषयांवर पांच निबंध आहेत. पहिल्या निबंधाचा विषय म्हणजे राष्ट्रांराष्ट्रांमधील व्यापाराचे नियम हा होय. यामध्यें मिल्लनें असें दाखविलें आहे कीं, दोन देशांचा दोन मालांमध्यें व्यापार सुरू झाला तर त्या देशांची मागणी अशी होते कीं एका मालाची किंमत दुस-या मालाबरोबर होते. म्हणजे जरी राष्ट्रांराष्ट्रांमधील व्यापार पैशाच्या योगानें चालला तरी ता ऐनजिनसी अदलाबदलीसारखा असता व कांहीं विशेष कृत्रिम कारणें अस्तित्वांत नसलीं म्हणजे देशांतील आयात व निर्गत माल याची अदलाबदल होऊन व्यापाराची तोंडमिळवणी होते. या निबंधांतील तत्वांचें मिल्लनें आपल्या प्रसिद्ध ग्रंथांत "राष्ट्रांराष्ट्रांतील मागणीचें समीकरण" या नांवाखालीं विवेचन केलें आहे. दुस-या निबंधाचा विषय 'संपत्तीच्या व्ययाचा उत्पत्तीवर परिणाम' हा होय. यामध्यें सुखवस्तु लोक आपलें खेडेगांवांतील उत्पन्न शहरांत राहून खर्च करितात याचा देशाच्या संपत्तीवर काय परिणाम होतो याचा मिल्लनें विचार केला आहे व जरी कायमचा संपत्तीच्या उत्पत्तीचा अतिरेक होणें शक्य नाहीं तरी क्षणिक अतिरेक होणें शक्य आहे हें सिद्ध केलें आहे. तिस-या निबंधांत उत्पादक व अनुत्पादक या शब्दांच्या व्याख्या ठरविण्याचा मिल्लनें प्रयत्न केला आहे; चवथ्यामध्यें व्याज व नफा यांचा विचार केला आहे व त्यामध्यें नफा हा मजुरीवर कसा अवलंबून आहे, या रिकार्डोच्या तत्वाचें स्पष्टीकरण केलें आहे; व शेवटच्या निबंधांत अर्थशास्त्राची व्याख्या व त्याची शास्त्रीय पद्धति याचा विचार केला आहे, व येथें मिल्लनें रिकार्डोच्या तार्किक पद्धतीचें समर्थन केलें आहे.

 यानंतरचा मिल्लचा ग्रंथ म्हणजे त्याचा प्रसिद्ध अर्थशास्त्रावरील ग्रंथ होय. वर सांगितलेंच आहे कीं, या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्याची
[२७]

 विषद भाषाशैली व शास्त्रीय तत्वांचें सोदाहरण स्पष्टीकरण होय. मिल्लचीं अर्थशास्त्रविषयक मतें सरासरी जुन्या म्हणजे अभिमत पंथाचींच आहेत. परंतु त्याचा काळ हा संक्रमणावस्थेचा काळ होता व मिल्लचें मन नव्या नव्या कल्पनांचें ग्रहण करण्यास योग्य असें होतें, यामुळे त्यानें पुष्कळ बाबतीत नवीन मतें ग्रहण केलीं आहेत. तो सामाजिक पंथ याचा अभिमानी झाला होता व त्यांच्या कांहीं कल्पनांचा स्वीकार त्यानें आपल्या पुस्तकांत केला आहे. उदाहरणार्थ, पुढील पुस्तकांमध्यें ज्या 'मजुरीफंड' नांवाच्या मजुरीच्या उपपत्तीचा ऊहापोह करावयाचा आहे, त्यावर प्रथमतः मिल्लचा भरंवसा होता, परंतु पुढे ही उपपत्ति वस्तुस्थितीला धरून नाहीं असें त्याच्या ध्यानांत आल्यापासून त्यानें ती उपपत्ति सोडून दिली. परंतु मिल्लच्या या नवीन कल्पनग्रहणक्षमतेपासून त्याच्या ग्रंथांत नव्याजुन्या कल्पनांची खिचडी होऊन त्यामध्यें बरीच विसंगतता आली आहे; तरी पण मिल्लचें सामान्य धोरण रिकार्डोच्या व मालथसच्या मतांचा अनुवाद करण्याचच असल्यामुळे मिल्ल हा अभिमतपंथीच अर्थशास्त्रज्ञ होता असें ह्मणणें भाग आहे.
 यानंतरचे या पंथाचे अभिमानी ग्रंथकार केअर्नस्, फॉसेट, सिजविक् व निकॉलसन् हे होत. पहिल्या दोघांनीं बहुतेक ठिकाणीं मिल्लचाच अनुवाद केला आहे. दुस-या दोघांनीं मात्र ऐतिहासिक पद्धतीचा व अभिमत अर्थशास्त्राविरुद्ध असणा-या दुस-या लेखकांच्या ग्रंथांचा उपयोग करून या जुन्या अर्थशास्त्राचीं प्रमेयें थोड्याबहुत फेरबंदलानें सध्यासुद्धां वस्तुस्थितीशीं कशीं सुसंगत आहेत हें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

 रिकार्डो, मिल्ल व केअर्नस् या ग्रंथकारांचे फ्रान्समधील अनुयायी कझन व जे. बी. से यांनीही तार्किक पद्धतीचा सर्वस्वी अवलंब केला व या शास्त्राचीं प्रमेयें सर्व ठिकाणीं व सर्व काळीं सारखींच लागू असली पाहिजेत असें प्रतिपादन केलें. परंतु अर्थशास्त्रांतील तत्वें भूमितिशास्त्राच्या तत्वांप्रमाणं त्रिकालाबाधित नसल्यामुळे, अभिमत अर्थशाखांतील सिद्धांतांचा दुस-या देशांतील वस्तुस्थितीशीं विरोध दिसून येऊं लागला. उदाहरणार्थ, अभिमत अर्थशास्त्राची तत्वें जर्मनीसारख्या औद्योगिक व राजकीय बाबतींत मार्गे असलेल्या देशाला लागू पडेनात. यामुळेंच जर्मनीमध्यें ऐतिहासिक पंथाचा उदय झाला. या
[२८]

 ऐतिहासिक पंथाच्या थोडेसे आधीं झालेले, परंतु ज्यांच्या श्रमानें ऐतिहासिक पंथ अप्रत्यक्षपणें उदयास आला अशा दोन लेखकांचा येथें उल्लेख करणें रास्त आह. ते लेखक अॅडम म्युल्लर व फ्रेडारिक लिस्ट हे होत.<gr>  अॅडम म्युल्लरनें मध्यकाळच्या औद्योगिक संस्था व वाली यांचें समर्थन केलें आहे, व त्याच्या काळच्या उदारमतपंथाचा निषेध केला आहं. त्याचे मतें अॅडम स्मिथचें अर्थशास्त्र हें व्यक्तीच्या संपत्तीच्या वाढीचें शास्त्र आहे. तें राष्ट्रीय दृष्टीनें विचार करीत नाहीं, इतकेंच नव्हे, तर तें संपत्तीच्या पलीकडे कांहीं विशेष महत्वाच्या गोष्टी आहेत हेंही जाणत नाहीं. अर्थशास्त्रानें राष्ट्राच्या बौद्धिक, नैतिक व औद्योगिक अशा सर्व बाजूंचा विचार करून राष्ट्राच्या हिताच्या गोष्टी कोणत्या हें ठरविलें पाहिजे असें म्युल्लरचें ह्मणणें होतें. श्रमविभाग हा भांडवलाच्या वाढीवर अवलंबून आहे; हें अॅडम स्मिथच्या ध्यानांत नव्हतें; तसेंच श्रमविभागाच्या तत्वाचें पूरक तत्व श्रमसंघटना याचा अॅडम स्मिथनें विचार केला नाहीं, वगैरे दोष म्युल्लरनें अॅडम स्मिथच्या ग्रंथांत दाखविले आहेत. शेवटीं म्युलूरचें ह्मणणें असें आहे कीं, अॅडम स्मिथचें अर्थशास्त्र समुद्रानें वेष्टित अशा इंग्लंडसारख्या पृथक् देशास मात्र लागू आहे; परंतु यांतील तत्वें युरोपांतील इतर देशांस जर लागू केलीं तर ती गोष्ट राष्ट्रीयदृष्ट्या हानिकारक होईल.

मुल्लरच्या लेखांत दिसून येणारा राष्ट्रीयपणा लिस्टनें जास्त जोरानें पुढें आणला व त्यानें आपल्या ग्रंथास राष्ट्रीय अर्थशास्त्र असें नांव दिलें. त्याचे मतें स्मिथचें अर्थशास्त्र हें विश्वव्यापी आहे म्हणजे यामध्यें सर्व जग एकाच राज्यपद्धतीखालीं आहे असें गृहीत धरलें आहे. निदान त्यांत जगांत सध्या प्रचलित असलेल्या निरनिराळ्या व स्वतंत्र राज्यपद्धतीकडे कानाडोळा केला आहे व सर्व जगाच्या सांपत्तिक कल्याणाचा मार्ग कोणता हें ठरविलें आहे. त्यानें अप्रतिबंध व्यापाराचें समर्थन केलें आहे तें या दृष्टीनें बरोबरही आहे. परंतु लिस्ट याला या दोन्ही गोष्टी कबूल नव्हत्या. त्याचे मतें मनुष्याच्या स्वभावाकडे लक्ष देतां व सध्याच्या जगाच्या व्यवस्थेकडे लक्ष देतां प्रत्येक राष्ट्रानें आपापल्या हिताकडे पाहणें एकंदरींत हितावह आहे, व खरी मानवी प्रगति या मार्गानेच होईल. तेव्हां प्रत्येक राष्ट्रानें आपण पूर्णपणें स्वावलंबी व स्वयंपूर्ण होण्याची खटपट केली पाहिजे. देशाच्या सर्वांगीय वाढीस उद्योगवैचित्र्य अवश्यक आहे.
[२९]

म्हणूनच प्रत्येक देशाने शेतकी, कारखाने, व्यापार या सर्व औद्योगिक अंगांची प्रगति केली पाहिजे, व ही प्रगति घडवून आणण्यास संरक्षक पद्धतीचा अंग र केल्याखेरीज गत्यंतर नाही. लिस्टच्या मताप्रमाणे समा जाचे किंवा राष्ट्राचे बाल्यावस्थेत अनियंत्रित व्यापार असावा. कारण अशा व्यापाराने सुधारलेल्या देशांतून कलाकौशल्याचे जिन्नस देशांत येतात, व त्यांचा लोकांत प्रसार होतो, व ह्यायोगाने  लोकांची अभिरुची परिणत होते व वासना व गरजा जास्त वाढतात. असे झाल्यानंतर संरक्षणपद्धतीचा अवलंब केला पाहिजे म्हणजे देशांत लोकांच्या नवीन वाढलेल्या गरजा, वासना व अभिरुची यांच्या तृप्तीसठी कारखाने निघू लागतात व असे वाल्यावस्थेतील कारखाने पूर्ण वाढ झालेल्या कार- खान्याच्या मालाशी बरोबरीच्या नात्याने टक्कर देऊ शकत नाहींत. व म्हणून याकाळीं देशांत संरक्षणपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. सर्व ग्रंथांची पूर्ण वाढ झाल्यावर व आपल्या देशांतील कारखाने दुसऱ्या देशांशी टक्कर देण्यास समर्थ झाले म्हणजे मग पुनः अप्रतिबंधव्यापारपद्धति सुरू केली पाहिजे. कारण, माल उत्तम होण्यास व त्याची किंमत कमी होण्यास चढाओढ अवश्यक आहे. अशी चढाओढ नसल्यास व आपलें गिऱ्हाईक कायम आहे अशी कारखानदारांस खात्री असल्यास सुधारणा करण्याची प्रवृति कमी होण्याचा फार संभव असतो. लिस्टच्या मतें सर्व युरोपांत इंग्लंड मात्र या शेवटल्या स्थितीप्रत आल्यामुळे तेथे अप्रतिबंध व्यापारतत्व फायद्याचें आहे; परंतु जर्मनीला संरक्षण अवश्यक आहे.
 लिस्ट याला सर्व जर्मनीच्या संस्थानांचे एक राष्ट्र व्हावें अशी फार इच्छा होती. व त्याच्या संरक्षक पद्धतीचा एक हेतु राष्ट्रीय ऐक्य घडवून आणणे हा होता. कारण संस्थानासंस्थानामधील जकाती काढून सर्व जर्मनीभर अप्रतिबंध व्यापार सुरू करावा व परराष्ट्रांशी मात्र संरक्षण पद्धतीचा अवलंब करावा असे त्याचे म्हणणें होते, व त्याचे लेखांनी जर्मनी च्या राष्ट्रीय घटनेस फारच मदत झालेली आहे असें जर्मन इतिहासकार म्हणतात
 ऐतिहासिक पद्धतीचा व समाजशास्राचा जनक फ्रच तत्वज्ञानी कोम्ट् हा होता. याच्या ग्रंथांनीच ऐतिहासिक पद्धतीला प्रथमतः महत्व आलें व त्याच्या प्रोत्साहनानें अर्थशास्त्रांतला ऐतिहासिक पंथ अस्तित्वांत आला.
[३०]  या पंथाचे प्रवर्तक रोशर, हैंल्डीबांड व नाइस हे होते. या पंथाचे मुख्य म्हणणे असें आहे की, अर्थशास्त्राचा तात्विकदृष्ट्या विचार कधींच करतां येत नाही. कारण समाजाचीं औद्योगिक व इतर अंगे यांचा अगदीं निकट संबंध आहे. तेव्हां प्रत्येक राष्ट्राची औद्योगिक स्थिति इतिहासदृष्टया ठरविली पाहिजे व या ऐतिहासिक निरीक्षणावरून काय ते सिद्धांत काढले पाहिजेत. तसेच अर्थशास्त्रामध्ये सर्व काळी व सर्व ठिकाणी व सर्व स्थितींत सारखे लागू पडणारे असे नियम नाहीत. सारांश, अर्थशास्त्र हैं तार्किक शास्त्र नाही व त्याची पद्वतिही तार्किक नाही, तर हैं शास्त्र अनुभ विक शास्त्र आहे व त्याची पद्धति ऐतिहासिक आहे
 ऐतिहासिक पंथाने या दृष्टीने अर्थशास्त्राचा विचार केला आहे व त्यांच्या श्रमानें अर्थशास्त्राचा सविस्तर इतिहास, तसेच प्रत्येक देशाचे औद्यो गिक इतिहास निर्माण झाले आहेत. व या नवीन माहितीवरून त्यांनींअभि- मत अर्थशास्त्रांतील बऱ्याच प्रमेयांचा व विधानांचा खोटेपणा सिद्ध केला आहे. जर्मनीमध्ये हा ऐतिहासिक पंथ व पूर्वी निर्दिष्ट केलेला सामाजिक पंथ यांचे फार प्राबल्य आहे. तर अभिमत अर्थशास्त्राचे इंग्लंडमध्ये फार प्राबल्य आहे. तरी पण तेथेही जर्मनीच्या ऐतिहासिक पंथाची छाप अलीकडील ग्रंथकारांवर पडलेली दिसते.
 द्द इंग्लंडमध्ये सुद्धां अभिमत अर्थशास्त्राच्या पुष्कळ तत्वांचे खंडन करणारे ग्रंथ प्रसिद्ध होतच आहेत. कांहींजणांनीं नीतिशास्त्रदृष्ट्या या शास्राच्या तत्वांचा विचार केला आहे; व नीतिशास्त्रदृष्टया हे शास्त्र भयाण आहे असे प्रतिपादन करणारे वाइमयविषयक ग्रंथकर्ते कार्लाईल व रस्किन यांनी या शास्त्राची सररहा निंदा केली आहे. कांहीं ग्रंथकारांनीं आभिमत अर्थशास्त्रकारांच्या कांही बाबतीतील चुका दुरुस्त करून पुष्कळ नवी प्रमेयें, सिद्धांत व नियम काढण्याचा प्रयत्न केला आहे, व या तऱ्हेने या शास्त्रांत पुष्कळ भर पडत आली आहे.अशा तऱ्हेने पूर्वीच्या शास्त्रात भर घालणारे ग्रंथकार म्हणजे जेहन्स, मार्शल, वाँकर, कॅरे वगैरे होत.
 कांहीं ग्रंथकारांनीं अभिमत अर्थशास्त्र हें सर्वथा असत्यमय व खोटं शास्त्र असून कुचकामाचे आहे असें प्रतिपादन केले आहे,आणि

नवीन अर्थशास्त्राची अगदीं पायापासून-नव्हे पूर्वीच्या पायासुद्धां पार
[३१]

 खणून टाकून-सर्व इमारत नवी रचण्याचा आव घातला आहे. असे ग्रंथकार म्हणजे प्रो० बेन व मिस्टर क्रोझिअर हे होत. बेन यांनी ‘संप त्तीच्या उत्पत्तीचें तत्व' या नांवाने एका तत्वावर नवीन शास्त्र बनवि ण्याचा प्रयत्न केला आहे; तर क्रोझिअर यांनीं ‘संपत्तिचक्र’ या नांव खालीं अर्थशास्त्राची अगदीं कोरीकरकरीत व नवी इमारत बनविण्याच प्रयत्न केला आहे.
 अर्थशास्त्राच्या वरील संक्षिप्त इतिहासावरून या शास्त्राची हळूहळू कशी वाढ होत गेली आहे हें ध्यानात येईल. ‘थेबे थेंबे तळे सांचे’ हाच न्याय शास्त्राच्या वाढीलाही लागू असतो. एका ग्रंथ कारानें एक कल्पन नवी काढली, दुसयाने एक तत्व नवीन शोधिलें, तिस- ऱ्याने याचें उदाहरण हुडकून काढले, तर चवथ्याने एखाद्या वस्तुस्थितीची उपपात्ति वसविली; याप्रमाणे हळूहळ शास्त्रात भर पडत गेली आहे. परंतु कित्येक वेळां नवीन कल्पना काढणारास मात्र आपण सर्व शास्त्रच बदलून टाकीत आहों असा भास होतो. कारण, त्याचे त्याने काढ लेल्या कल्पनेबद्दल विशेष प्रेम असते; व म्हणून ती त्याला अत्यंत मह त्वाची दिसते.ज्याप्रमाणे प्रत्येक बापाला आपला मुलगा वृहस्पतीचा अवतार वाटतो; कारण अंधभक्तीने सारासारविचार नाहींस होतो त्याप्रमाणेच कल्पनारूपी मानसपुत्राच्याही बद्दल अंधप्रेम वाटतें; व या कारणांनीच पुष्कळ वेळां नवन एखादी कल्पना काढणारा लेखक मागच्या सर्व ग्रंथकारांस कुचकामाचे ठरवून आपल्यास सर्वं ज्ञानाचा मक्ता मिळाला आहे असे मोठ्या आढ्यतेने सांगतों; परंतु ही गोष्ट अगदीं असंभवनीय आहे. कारण, एकाच ग्रंथकाराने सर्व शास्त्र अथपासून इतिपर्यंत एकदम निर्माण करावें हें उत्क्रांति-तत्वाला अगदी विरुद्ध आहे. ज्याप्रमाणे प्राणिमात्रांत लहान लहान फरक पडत जाऊन कालांतराने
त्यांच्या भिन्न दोन जाती बनत जातात, त्याचप्रमाणे ज्ञानाच्या व शास्त्राच्याही वाढीची गोष्ट आहे व अर्थशास्त्राची वाढही अशीच हळूहळ व क्रमाने झाली आहे, हे मागलि संक्षिप्त इतिहासावरून दिसून आले असेल व पुढील विवेचनावरून ते जास्त स्पष्टपणे दिसून येईल. •