==पहिली गं पुजाबाई==

पहिली गं पुजाबाई
देवा देवा सादेवा
घातीला मंडोबा
खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई...

पहिली गं पुजाबाई
गवर बसली न्हायाला
शंकर आले पाह्यला
शंकर आमचे जावई
शालमुंदी करावी
करावीचे दोरे
भुलोजी आमचे गोरे
गोऱ्या पायी घागऱ्या
घागऱ्या आमच्या सोन्याच्या
पहिला आसू मोत्याचा
भुलोजी आमचा नात्याचा

==झामक-झुमक==
झामक-झुमक
बाजारा गेली
घरची गहुली
पाण्या नेली
पाणी काढता फुटला चुळा
सासूनं मारला टुचकन टोला
त्या बाई टोल्याची गाळली आसू...

==आडकीत जाऊ खिडकीत जाऊ==

आडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होती सुई
भुलाबाईला लेक झाली
नाव ठेवा जुई...
==पाचा पुतराची माय==
"पाचा पुतराची माय, पालखीत बसून जाय',
==भुलाबाई बाळंतीण==
"भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस, पहिल्या दिवशी बाळाला टोपी',
"भुलाबाई राणीचे डोहाळे', "तिचे डोहाळे तिला भारी, नेऊन टाका पलंगावरी, शंकर बसले भुयारी',

=="चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू',==
== "पाचाचा पाळणा,==
 
बाळ नेता हनुमंता,
हनुमंताची निळी घोळी,
येता जाता कंबळतोडी'

==आपे दुध तापे त्यावर पिवळी साय==

==भिंती वरचा नागोबा==

चांदीचे पोळपाट सोन्याचे लाटणे

संपादन
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.