मीच तुमचा बाजीराव
११ जानेवारी, १७३९
१६६० पौष व. १३
१६६० पौष व. १३
श्री
- गंगाजान्हवीसमान मातुश्री वेणूबाई काकी वडिलांचे सेवेसी :-
- अपत्ये बाजीराव बल्लाळ साष्टांग नमस्कार वि|| येथील ताा पौष वद्य १३ पावेतों स्वकीय लिहित जाणे. विशेष पौष शुाा ११ स तारापुरावर हल्ला केला ते समयीं बाजी भिंवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी जाहले. ईश्वरें मोठें अनुचित केलें! तुम्हास शोक प्राप्त जाला. आमचा तर भाऊ गेला त्यास, तुम्ही वडील. दुःखाचे परिमार्जन करून विवेक करावा. त्यांची मुलें व चिमणाजी आप्पा आहेत, त्यांचेही त्याजपेक्षां अधिक चालेल. परंतु आमचा भाऊ गेला. बाजू गेली. उपाय नाहीं. त्यास, चिमणाजी भिंवराव हे पाठविले आहेत. हें सांगतील ते ऐकावें. सारांश, मीच तुमचा बाजीराव असा विवेक करून धीर धरावा. मजवर दृष्टी द्यावी. बहुत काय लिहिणें, लोभ कीजे हे विनंती.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |