मराठी विकिस्त्रोतावर आपले स्वागत. या प्रकल्पामध्ये योगदान देताना पुढील गोष्टींचे भान ठेवावेः

  • आपण इथे लिहिलेले साहित्य प्रताधिकारमुक्त आहे याची खात्री करून घ्यावी. भारतीय लेखकांसाठी एक साधा नियम म्हणजे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. शासकीय पत्रके आणि संसद व विधिमंडळांच्या कामकाजांची पत्रके प्रताधिकारमुक्त असतात.
  • विकिस्त्रोत हे मूळ लिखाणाचे भांडार आहे, त्यामुळे ते जसे आहे तसे मूळ स्वरुपात जतन केले जाणे आवश्यक आहे. लिखाण टंकलिखित करतांना जसे आहे तसेच करावे. जुन्या लेखकांचे साहित्य ते जसे छापले आहे तसे व्याकरणाच्या जुन्या नियमांनुसार टंकलिखित करावे. लिखाण जसेच्या तसे टंकलिखित करणे हा एक साधा नियम लक्षात ठेवावा.
  • विकिस्त्रोतामध्ये आपण इतर लेखकांचे साहित्य संग्रहित करत असतो, त्यामुळे लिहिलेली मते त्यांची असतात. ती मते आपल्याला पटतात किंवा पटत नाहीत हे महत्त्वाचे नाही, ते जसेच्या तसे जतन करणे महत्त्वाचे! उदा. जर तुम्ही हिटलरलिखित पुस्तक इथे लिहित आहात आणि त्यात ज्यू लोकांविषयी काही असह्य गोष्टी लिहिल्या आहेत, तरीही आपण त्याचे शब्द वगळू नये. जसेच्या तसे छापावे. आपला प्रयत्न आपले मत मांडणे नसून त्याचे मत इतरांना अभ्यासण्यासाठी उपलब्ध करून देणे आहे.
  • प्रमाणभाषेकडे विशेष लक्ष द्यावे. त्यातही मूळ स्रोताप्रमाणे लिखाण करावे.