विकिस्त्रोत:प्रगत अधिकार हटवण्याचे धोरण

विकिस्त्रोतावर सदस्यांना समुदायाने दिलेले अधिकार हे त्यांनी प्रकल्पावर सक्रिय योगदान करावे आणि काही विशिष्ट कामे पार पाडावीत या हेतूने दिले जातात.

विकिप्रकल्पावरील अधिकार हे त्या सदस्याला दिलेली आणखीन एक तांत्रिक सोय असते ज्याचा वापर करुन ते सदस्य प्रकल्पाची देखभाल करतात. कोणत्याही अधिकारांचा ह्या मुख्य हेतू व्यतिरिक्त काहीही उपयोग केला जात असेल तर ते अधिकार हटवले गेले पाहिजेत. विकिस्त्रोतावर प्रगत अधिकार म्हणजेच पेट्रोलर, टेमप्लेट इडीटर, इम्पोर्टर, सिसोप, इंटरफेस इडीटर, बॉट हे आणि इतर कोणतेही अधिकार जे स्टीवर्डद्वारा या प्रकल्पावर दिले जाऊ शकतात.(Patroller, Template editor, importer, sysop, interface editor, bot and any other rights which can be granted and revoked by local sysops/bureaucrats or stewards) त्यांचा गैरवापर आणि अनावश्यक मुकूट म्हणून वापर रोखण्यासाठी हे धोरण आहे.

निष्क्रियता :

संपादन
  • सलग तीन महिन्यापर्यंत अधिकारांचा एकदाही वापर न झाल्यास. (Zero use of rights for three consequent months.).

गैरवापर :

संपादन
  • अधिकार मुकूट म्हणून वागवताना दिसल्यास, आणि त्याचा प्रत्यक्ष वापर फक्त तीन महिन्याची अट पुर्ण करण्यासाठी केला गेला आहे असे दिसल्यास.
  • अधिकाराचा वापर इडीट वारींग मध्ये, इतरांची संपादने भांडणात उलटवण्यात, प्रताधिकार भंग करण्यात वापर झाल्यास तात्काळ अधिकार काढले जातील.

आयातदार अधिकार

संपादन
  • आयातदार(importer rights) हे खूप महत्वाचे अधिकार आहेत आणि याचा वापर फक्त आणि फक्त साचे, गेजेट्स, स्क्रीप्ट अशी पाने यांचीच आयात करण्यासाठीच करावा. कोणत्याही परिस्थितीत साहित्याची पाने आयात करू नयेत. (Importer rights are only to be used to import templates, mediawiki pages, scripts and other similar system pages only, try not to import any content pages at all. If you do import any content pages, remember you have only one week to provide source pages for those contents, otherwise all the imports will be deleted.)
  • आयातदार अधिकार वापरून आयात केलेल्या साहित्याचे प्रताधिकार योग्य ती स्त्रोत, पाने, पुरावे देऊन सिद्ध करण्याची जबाबदारी ही ती पाने आयात करणार्या सदस्याची असेल. आयात केल्यापासून एक आठवड्याचे आत जर त्यांनी आयात केलेल्या पानांचे प्रताधिकार मुक्ततेचे पुरावे सादर केले नाही तर, ती पाने ताबडतोब हटवली जातील त्याचबरोबर आयातदार अधिकार तात्काळ काढून घेतले जातील. (If you happen to import any content pages on mrwikisource, its your responsibility to provide source pages/pdfs/djvu for the same. If you failed to do so, your imports will be deleted after one week of imports and your importer rights will be removed.)

प्रचालक आणि तोंडवळा प्रचालक

संपादन

निवृत्ती :

संपादन
  • स्वत:च्या विनंतीने केव्हाही