"दत्ताची आरती/ धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:०९, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची । झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥

गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी। अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥

पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी । सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥ २ ॥

मृदंगताघोषी भक्त भावार्थे गाती ॥ नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥ धन्य. ॥ ३ ॥

कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत । लोटांगण घालितां ॥ मोक्ष लागे पायांता ॥ धन्य ॥ ४ ॥

प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला । श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य ॥ ५ ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.