पान:प्रमाणशास्त्र.pdf/399

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रक० १९८] जिवंतांचा पालट, आकाश व पृथ्वी यांचे नवे होणे, ३७७ पहिला मनुष्य पृथ्वीपासन मातीचा आहे, दुसरा मनुष्य आकाशापासून प्रभु (ख्रीस्त) आहे. जसा मातीचा तसेच जे मातीचे तेही आहेत; आणि जसा आकाशांतला तसेच जे आकाशांतले तेही आहेत. आणि मातीचे रूप जसे आह्मी धारण केले, तसे आकाशांतल्याचेही रूप धारण करूं (१ करिं० १५). २. 'असी वेळ येत आहे की तींत थडग्यांतली सर्व मनुष्याच्या पुत्राची वाणी ऐकतील; आणि ज्यांनी चांगली कामे केली ती जीवनाच्या पन्हा उठण्यास, पण ज्यांनी वाईट कामे केली ती दंडाच्या पुन्हा उठण्यास बाहेर येतील" (योह० ५, २८, २९).-"मांस व रक्त यांस देवाच्या राज्याचा वाटा मिळू शकत नाही, आणि नासकेपणाला अविनाशीपणाचा वांटा मिळत नाही.” (पौल ह्मणतो) “पाहा, मी तुमास गूज सांगतोः आपण सर्व निजणार नाही, पण सर्व पालटूं, क्षणांत, निमिषांत, शेवटला करणा वाजण्याच्या वेळेस, कारण करणा वाजेल आणि मेलेले अविनाशी उठविले जातील, आणि ( त्या वेळेस जिवंत असून राहिलेले) आमी पालटुं कांकी या नासक्याने अविनाशीपण नेसावे, आणि या मरणाऱ्याने अमरपण नेसावे हे अगत्य आहे. तेव्हां है लिहिलेले वचन पूर्ण होईल की: जयाने मरण गिळून टाकले आहे: अरे मृत्यू, तुझी नांगी कोठे? अरे अधोलोका, तुझा जय कोठे? मृत्यूची नांगी तर पाप, पापाचे सामर्थ नियमशास्त्र आहे. पण आमचा प्रभु येशू ख्रीस्त याकडून देव आह्मास जय देतो त्याची उपकारस्तुति असो” (१ करिं० १५).-"सृष्टीची अति उत्कंठा देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची अपेक्षा करती. कां की सृष्टि स्वतां नासकेपणाच्या दास्यांतून सुटून देवाच्या लेकरांच्या दिव्य सुखाच्या स्वतंत्रतेत येईल" (रोम०८, १९-२१). "प्रभूच्या येण्याच्या दिवसी आकाश आग लागून विरघळेल, आणि तत्वे जळन रस होतील. पण त्याच्या वचनाप्रमाणे ज्यांमध्ये नीति राहती असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची आपण वाट पाहतो" (२ पेतर ३. २२. १३). योहान्न प्रेषित ह्मणतोः “नवे आकाश व नवी पृथ्वी म्या (दष्टांताने ) पाहिली, कां की पहिले आकाश व पहिली पृथ्वी हीं होऊन गेली" (प्रग० २१, १). 48H