श्री जगदंबेची आरती
<poem>
आरती 1
जय देवी जगदंबे । संकट देवा पडले ॥ इंद्रादि निर्जर जय जय वाणी । तुज स्तविती बद्धपाणी ॥ धृ. ॥
शुंभनिशुंभासाठी । सुर रिघती तव पाठी । प्रकट हिमाचळी होऊनि बाळा ॥ दैत्यदुष्टा मोहुनी सकळां ॥ जय. १ ॥
पहातसे दैत्यराणा । स्वरूपाची करी तुळणां । मोहित झाला खळ तव काये ॥ नच जाणोनि आदिमाये ॥ जय. ॥ २ ॥
दैत्यांचे सैन्य सारें । जाळूनियां हुंकारे । वीरा करुनी खंडविखंड ॥ प्रथम वधिलें चंडमुंड ॥ जय. ॥ ३ ॥
जन असुरी बहु पिडिले । रूप भयंकार धरिले । मग बळि महिषासुर खल वधिला ॥ तिन्ही लोकीं हर्ष झाला ॥ जय. ॥ ४ ॥
दैत्यवरें मत्त झाले । सुरशुत्रू निर्दळिले । ज्यांची त्याला स्थानें दिधलीं ॥ निर्दैत्य भूमि केली ॥ जय. ॥ ५ ॥
आरती 2
निजपद दर्शन दे जगदंबे जगदोद्धारिणि गे ||धृ.||
अंबे जगदोद्धारिणि गे | श्री महालक्ष्मी प्रणवरूपिणी, मधुकैटभ-महिषासुरमर्दिनी शुंभ-निशुंभासुरअसुवाहिनी चित्सुखदायिनि गे ,अंबे चित्सुखदायिनि गे ||१||
स्वरूप लक्ष्यालक्ष्यधारि गे उत्पत्ती-स्थिति-लयाकारिके अनंत कोटि ब्रह्मांडनायिके भवभयनाशिनि गे ,अंबे भवभयनाशिनि गे ||२||
हर्षे वासुदेव तुझिया पायी निजशरणागत होउनि राही नाम मुखी, हृदयि कीर्ति ध्यायी पतीतपावनि गे अंबे पतीतपावनि गे ||३||
निजपद दर्शन दे जगदंबे जगदोद्धारिणि गे अंबे जगदोद्धारिणि गे || ||जगदंब नारायणी उदयो$स्तु||
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |