मुख्य मेनू उघडा

शंकराची आरती/जटा धारिल्या शीर्षावरती झेलियली गंगाधारा

< शंकराची आरती

<poem> जटा धारिल्या शीर्षावरती झेलियली गंगाधारा आणि खोविला आभूषणात्मक शीतल शशि कचसंभारा भालावरल्या नेत्रामधुनी बरसवुनी खदिरांगारा मदनदहन करूनिया शमविला क्रोध तुवा अतिबलेश्वरा जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा॥ १ ॥

विश्वाचा समतोल राखण्या अवलंबिशी तू संहारा कठोर जितुका तितुका भोळा असशी तू तारणहारा कर्पुरगोर्‍या अंगांगावर भस्म लेपिशी उग्रतरा व्याघ्रांबरधारका महेशा, मम वंदन तुज हरेश्वरा जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा॥ २ ॥

कंठ तुझा जाहला निळा जधि प्राशन केले हलाहला दाह तयाचा शमवायाला नाग धारिला जशि माला तांडवप्रिया, रूद्रनायका, कैलाशपती, त्रिशुलधरा अर्पण ही आरती चरणि तव नीलग्रीवा पशुपतेश्वरा जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा॥ ३ ॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg