श्रीदेवीची भजने
<poem>
भजन 1
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझीया येई सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई ॥धृ॥
तू विश्वाची रचिली माया, तू शितल छायेची छाया तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरीत तयाला नेई दुरीत तयाला नेई, सेवा मानून घे आई ॥१॥
तू अबला अविनाशी किर्ती, तू अवघ्या आशांची स्फूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वाते नेई पूर्णत्वाते नेई, सेवा मानून घे आई ॥२॥
तूच दिलेली मंजूळ वाणी, डोळ्यांमधले निर्मळ पाणी तूझ्यां पूजनी माझ्याजवळी, याविण दुसरे नाही याविण दुसरे नाही, सेवा मानून घे आई ॥३॥
भजन 2
येई अंबे भजनाला धावूनी ये ग सुंदर साडी सावरत ये ग चंदेरी काठ त्याचा आवरीत ये ग ॥धृ॥
गाईन तुजला गीत तुझे गं पैंजण रुणझुण वाजवीत ये गं ठेक्यावरती टाळ माझी ठुमकत ये गं ॥१॥
लाविन तुजला कुंकुम भाळी नेसवीन तुजला साडी चोळी सिंहावरती बसण्याला लवकर ये गं ॥२॥
चमेली गुलाब चाफा गुंफुनी सारे सौंदर्याचा मोरपिसारा फुलवित ये गं ॥३॥
तूच तुकाई तुळजापुरची मायभवानी माहुरगडची काजळनयनी तांबुल ओठी हासत ये गं ॥४॥
भजन 3
जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥धृ॥
देवीच्या देवळात कोण गं उभी ओटी भरण्या मी हाय उभी जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥१॥
हिरवा चुडा भरते करी
जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥२॥
पाच फळ मी आणीली आरास त्याची मी मांडीली जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥३॥
सिंहासणी शस्त्र धारीणी भक्तालागी ये धावूनी जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥४॥
जगताची तू मायमाऊली भगवा झेंडा फडकूनी गगनीं जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥५॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेने आसूर मारीले भक्त तारिले जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥६॥
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |