श्री अंबामातेची आरती

अंबे प्रार्थितसें तुजला मी भावें ।
या समयी पावें ॥
मज संकट जननी त्वां निरसावें ।
वरदान द्यावें ॥ धृ. ॥

कां म्यां आणावे हरिसी सदना ।
आहा रे मदना ॥
छळिले मजला काय दावूं वदना ।
नच कां ये करुणा ॥ अंबे. ॥ १ ॥

माझा मज कांक कृतांत वाटे ।
निजकंदर दाटे ॥
जेणे हा भवसिंधू अतिशय वाटे ।
गतिसार न दाटे ॥ अंबे. ॥ २ ॥

अंबे अजुनी का न होसि तूं जागी ।
निष्ठुरता त्यागी ॥
श्रमलें यास्तव प्रार्थितसें मी तुजलागी ।
या धेनुरागी ॥ अंबे. ॥ ३ ॥

म्हणसी धात्याने जें लिहिले भाळी ।
तें कोण टाळी ॥
जें जें भवितव्य ज्या ज्या काळी ।
ते सुरवर पाळी ॥ अंबे. ॥ ४ ॥

तुझिया बिदुराचा घडतो पायां ।
करिसाल उपाया ॥
दावी निजजन दुष्ट मी कवणे पायां ।
उठिं ब्रह्मादि पायां ॥ अंबे. ॥ ५ ॥

राधा ये रितिनें करुणा भावी ।
भास्करसुतस्वामी सिद्भऋषि सुदावी ।
ते मूर्ति जपावी ॥ अंबे. ॥ ६ ॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.