________________

E GOVERNMENT OF INDIA ARCHÆOLOGICAL SURVEY OF INDIA CENTRAL ARCHÆOLOGICAL LIBRARY ACCESSION NO. 3.5828 CALL No. 891.461/Sant Ran D.G.A. 79 ________________

DIRECTOR GENERAL OF THE DID e Library Reg No INDIA IN ________________

Santa racanamita R.D. Ranade ________________

.. . . . . . अध्यात्मग्रंथमाला * तैसें अध्यात्मशास्त्रीं इये । अंतरंगचि अधिकारिये। परि लोकु.वाक्चातुएँ । होईल सुखिया ॥ . . . . 35828 ज्ञानेश्वरी १८.१.७५४ ग्रंथांक २ । संतवचनामृत 23476 - - रा. द. रानडे, एम्. ए. E DIRECTOR GENERAL CHERAL OF ARCHA OF THE DIRE । INDIA PARAN किंमत १॥ रुपया. ________________

.... पुस्तके मिळण्याची ठिकाण... . Academy of Philosophy and Religion, Post Descan .. Gymsharma, Poom... ......... . .. २ अध्यात्मविद्यापीठ, पोष्ट नियाळ, जिन्हा विजापूर, ..

  • आर्यभूषण. प्रेस, पुणे..... ......... * गमेश प्रिंटिंग वक्स, शनिवार पेठ, पुणे. + सर्व प्रसिद्ध बुकसेलर्स, पुणे, मुंबई, नागपूर, योरे.

CENTRAL ARCHAEOLOGICAL LIBRARY, NEW_DELHI. Acc. No..3..8.25.... Date .....2.22.al.......... Call No...Milabisanilione हे पुस्तक रा: गणेश काशिनाथ गोखले यानी गणेश प्रिंटिंग प्रेस, जमखंडीकर यांचा वाडा (पाने १-२३२), व रा. अनंत विनायक पटवर्धन यांनी आर्यभूषण छापखाना (प्रस्तावना, पार्ने १-३८) यांमध्ये पुणे येथे छापिलें, व ते प्रो. रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांनी पुणे येथे प्रसिद्ध केले. ________________

RAA . . . . . BAR A EP 4 A - . . . - La . . संतवचनामृत. . . - . . - प्रस्तावना. - - - - - -- - . . . . : १. अध्यात्मगंधमालेच्या या दुसऱ्या पुस्तकांत निवृत्तिज्ञानेश्वरांपासुन लो भेट ‘जनार्दनएकनाथांपर्यंत जे संतकवि महाराष्ट्रांत निर्माण झाले त्यांच्या चरित्रांचा व शिकवणीचा थोडक्यांत इतिहास यावयाचा आहे. हा : जो नीनचारशे वर्षांचा काल आहे त्याचे सहजच तीन भाग पडतात. पहिल्या भागांत निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, व चांगदेव यांच्या अभंगांचा विचार व्हावयाचा आहे. दुसऱ्या भागांत नामदेव व इतर पंढरपुरांतील व पंढरपुरनजीकचे सर्व जातीचे व धंयांचे जे भगवद्भक्त होऊन गेले त्यांच्या शिकवणीचा विचार होईल. . निसत्या भागांत भानुदास, जनाईनस्वामी, व एकनाथ यांच्या अभंगांचा विचार होऊन हा ग्रंथांक पुरा व्हावयाचा आहे. ... ज्ञानदेवादि संत. २. या ग्रंथमालेच्या पहिल्या पुस्तकांत ज्ञानेश्वरांची सर्वांगीण शिकवण कशी होती याचा ज्ञानेश्वरीच्या आधारे आपण ऊहापोह केलेलाच आहे. तेथेंच निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, व मुक्ताबाई यांचे अल्पचरित्रही दिले आहे, ते वाचकांच्या लक्षात येईलच. निवृत्तिनाथांचा जन्म शके ११९५ मध्ये होऊन त्यांची समाधि शके १२१९ मध्ये नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे झाली. ज्ञानेश्वरांचा जन्म निवृत्तिनाथांच्या नंतर दोन वर्षांनी म्हणजे शके ११९७ मध्ये होऊन त्यांची समाधि निवृत्तिनाथांच्या अगोदर एक वर्ष म्हणजे शके १२१५ मध्ये आळंदी येथे झाली. सोपानदेवांचा जन्म शके ११९९ मध्ये होऊन शके १.३.३५ मध्ये त्यांची समाधि सासवड येथे झाली. सुकाबाईंचा जन्म शके 9 माये होऊन त्यांनी . . . ________________

- - संतवचनामृत. समाधि एदलाबाद येथे शके १२१९ मध्ये झाली. निवृत्तिनाथांची समाधि ब्रह्म-- गिरीच्या पायथ्याजवळच आहे. त्यांस ज्ञानदेव व इतर भावंडे गेल्यावरं जिणे जड होऊन " वळचणीचे पाणी आढ्यासि गेलें" असे वाटले, व जेथे आपल्यास प्रथम गहिनीनाथांचा प्रसाद झाला त्याच ब्रह्मगिरीच्या पायथ्याजवळ त्यांनी समाधि घेतली, व आपला देह गुरूस अर्पण केला. ज्ञानेश्वरांची ज्यावेळी आळंदी येथे समाधि झाली, त्यावेळी निवृत्ति, नामदेव इत्यादि संत तेथे हजर होतेच, व त्या वेळचा सोहळाही फार अवर्णनीय होता. ज्ञानदेव गेल्यावर बरोबर एक महिन्याने सोपानदेव हे सासवड मुक्कामी जाऊन तेथे समाधिस्थ झाले. मुक्ताबाईंनी ज्यावेळी एदलाबादेस समाधि घेतली त्यावेळी त्या विजेच्या कडकडाटांत निमून गेल्या अशी जी गोष्ट आहे, ती कदाचित् ज्ञानेश्वरांच्या या पुढील अभंगाच्या आधारें लिहिली गेली असेल:- .............. :.'.!.: 1. . मोतियांचा चूर फेडिला अंबरी । विजुचिया परी कीळ झालें ॥ ...... . जरी पीतांबर नेसविले नभा । चैतन्याचा. गाभा नीळबिंदुः॥ . ..... तळीवरी पसरे शून्याकार झालें । सर्पाचेही पिलें नाचू लागे । ..... कडकडोनि वीज निमालीच ठायीं । भेटली, मुक्ताई गोरोबाला ॥.. .. ..ज्ञानदेव म्हणे कैसी झाली भेट । ओळखिले अविट, आपुलेपण. ॥ .....:, . . ३. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये जी आपली गुरुपरंपरा दिली आहे तीच निवृत्तिनाथांनी आपल्या अभंगांत क्रमांक १ मध्ये दिली आहे. मत्स्येंद्रनाथांनी आपली "मुद्रा" गोरक्षांस दिली, व गोरक्षांनी गहिनीनाथांवर पूर्ण रुपा केली; गहिनीनाथांपासून निवृत्तीस परमार्थ मिळून त्यांचे सर्व कुळच कृष्णनामाने पावन झाले (क्र. १). गुरु करणे असेल तर जो प्रत्यक्ष देव आपल्या डोळ्यांस दाखवील असाच गुरु करावा, व तनुमनधन त्यास देऊन त्यापासून वस्तु मागून घ्यावी असें निवृत्तिनाथ सांगतात (क..) देहामध्ये देव आहे ही गोष्ट सास; परंतु वासना शुद्ध झाल्यावांचून तेथें देव प्रकट होत नाहीं (क्र. ८). अंतःकरण शुद्ध करण्याचा एक मार्ग म्हटला म्हणजे परापवाद अगरं परनिंदा कानी पडल्याबरोबर त्याकडे लक्ष न देतां निजमौन्याने कृष्णाचा जप करणे हा होय (क. १०) स्वतःची स्तुति व दुसन्याची निंदा ही न ऐकतां 'ऑपलें भान विष्णुपणामध्ये लोपून जावें (क्र. ११). ज्याच्या मुखांतून नामाची "' अमृतसरिता अखंड वाहते तोच एक घट पूर्णतेस पोचला आहे. असे समजावें। . . .. . त ________________

प्रस्तावना.. (क..१६) हे विश्व श्रीकृष्णाने व्यापिलें असल्याने या जगांत ज्या गोष्टी.. घड़तात त्या सर्व कृष्णरूपांतच होत जातात (क्र. १९). अंधाऱ्या रात्री ज्याप्रमाणे सूर्य उगवावा त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे रूप उदयास येऊन गुरुरुपर्ने ते केव्हांच अस्तवत नाही असा चमत्कार होतो (क्र. २२). ईश्वराचा सुगंध चंदनाच्या वासापेक्षा, जाईजुईच्या परिमळापेक्षां, अगर कल्पतरूच्या सुगंधापेक्षाही श्रेष्ठ आहे (क्र. २७). तेज आणि सुगंधाप्रमाणे ईश्वराचा शब्दही आनंदमय रीतीने प्राणापानांचे मथन झाल्यावर आंतल्या आंत उमटतो, व त्याच्या अनुसंधानामुळे गुरुनाममंत्र दृढतर होतो (क्र. २९). परंतु या अनुभवाच्या गोष्टी लोकांची बुद्धि विषयविषाने धारिली असल्याने त्यांस प्रतीत होत नाहीत (क. ३१). निवृत्तिनाथ मात्र चातकाप्रमाणे हरीस्तव आकाशाकडे दृष्टि ठेवून वरती पाहतात (क्र. ३२) एखाद्या दिवट्याप्रमाणं देहांत परापश्यंत्यादि चारी वाटा देव प्रकाशमान करतो. .(क्र. 30); त्या तेजांत ताराग्रहमेदिनी यांचा लोप होऊन सर्वत्र जनार्दनरूप भासते (क्र. ३६). आकाशांतील पोकळी नाहीशी होऊन तेथेहिः हरि घनदाट भरलेला दिसतो (क्र. ३७). निवृत्तिरूप घट सर्वत्र बिंबलेला दिसत असल्याने आत्मरूप पाहण्यास दर्पणाची जरूरी रहात नाही (क. ३८). हे आत्मरूपच गोसावीरूपाने अगर गहिनीरूपाने आम्हांस दिसते (क्र.४१); आणि देव व भक्त व गुरु यांचा त्रिवेणीसंगम होऊन सर्व विश्वच देवाने भरलेले दिसते (क. ४), अशी एकंदरीत निवृत्तिनाथांची शिकवण आहे. ४. निवृत्तिनाथांच्या अभंगचर्चेनंतर आपण आता ज्ञानेश्वरांच्या अभंगचर्चेकडे 'वळू. येथे ही एक गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे की काही वर्षांपूर्वी रा. भारद्वाज यांनी अभंगकार ज्ञानेश्वर निराळे, व ज्ञानेश्वरीकार ज्ञानेश्वर निराळे, अशी एक कल्पना पुढे मांडली होती. त्यावेळी रा. भिंगारकर यांनी न्यायमूर्ति रानडे वगैरच्या सहाय्याने त्यांच्या मताचे सप्रमाण खंडण केले होते. हा वाद येथे पूर्णपणे पुनः सांगण्याचे कारण नाही. तथापि ज्ञानेश्वरीकार व अभंगकार हे दोन निरनिराळे होते किंवा काय याबद्दलचा खुलासा थोडक्यांत येथे करणे जरूरीचें आहे. रा. भारद्वाज यांच्या मते (१) ज्ञानेश्वरीकार ज्ञानदेव हे आपेगांवास असून ते शेव होते, व अभंगकार ज्ञानदेव हे आळंदीस असून ते विठ्ठलभक्त होते. : (२) आपेगांव येथे जी दुहेरी समाधि दाखविण्यात येते, त्यांपैकी एक ज्ञानेश्वरांचे अणजे त्रिंबकपंत यांची मानिली, तथापि दुसरी समाधि, ज्ञानेश्वरांची आहे असे , ________________

संतवचनामृत. मानण्यास हरकत नाही. याचे कारण एक तर या ज्ञानदेवांच्या समाधीचा उत्सव कार्तिक वद्य १२।१३ स होतो. व दुसरें, आपेगांव येथील कुलकण्याच्या दप्तरावरून या "ज्ञानेश्वरांच्या समाधीकडे" जमीन लावून दिली गेली आहे ही गोष्ट निर्विवाद सिद्ध होते. (क) शिवाय अभंगांची व ज्ञानेश्वरीची भाषा इतकी भिन्न आहे की त्या दोहींचा कर्ता एकच असू शकत नाही. या तीन्ही मुद्यांस पुढीलप्रमाणे उत्तरे देतां येण्याजोगी आहेत. (१) आपेगांवकर ज्ञानदेव हे जर शैव होते तर आपेगांवच्या समाधीच्या मागे विट्ठलरखुमाईच्या मूर्ति का आहेत ? व आळंदीकार ज्ञानेश्वर हे जर रा. भारद्वाज यांच्या मताप्रमाणे विठ्ठलभक्त होते तर त्यांनी सिद्धेश्वरापुढे म्हणजे शिवाच्या लिंगापुढे समाधि का घेतली ! या गोष्टींचा उलगडा असा आहे की, ज्ञानेश्वरीकार व अभंगकार एकच असल्याने त्यांस शिव असो अगर विठ्ठल असो, यांमध्ये भेद नव्हता. ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलभक्ति आहे किंवा नाही याची चर्चा या मालेतील ग्रंथांक १ च्या प्रस्तावनेत केलीच आहे.. त्यावरून असे निष्पन्न होते की, ज्ञानेश्वरीत विठ्ठल असा शब्द जरी आला नसला तथापि ज्ञानेश्वरीकाराचा विठ्ठलभक्तीशी खात्रीने परिचय असावा असे दिसते. तसेच अभंगांमध्ये केवळ विठ्ठलभक्ति नसून "स्वर्ग जयाची साळोखा" अशा प्रकारच्या त्रिभुवन व्यापणा-या शिवाच्या लिंगाचीही भक्ति सांगितली आहे. (के. ६६). (२) आपेगांव येथे ज्या समाधीचा कार्तिक वद्य १२ स व १३ सा उत्सव होतो ती ज्ञानेश्वरांची मूळची समाधि नसून ती केवळ ज्ञानेश्वरांच्या नावाने केलेली असावी असे दिसते. अशाच प्रकारच्या ज्ञानेश्वरांच्या समाधि नानज, पुंसेसावळी, वगैरे ठिकाणी आहेत. संतांस मान देण्याच्या इच्छेनें, अगर त्यांची स्मृति रहावी म्हणून, अगर त्यांची भक्ति वाढविण्याच्या इच्छेने त्यांच्या समाधि एकापेक्षा जास्त ठिकाणी करण्यांत येतात हे सर्वविश्रुतच आहे. शिवाय ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगांव येथे झालेला असल्याने त्यांची खरी समाधि आळंदी येथे असली, तथापि त्यांच्या नावाने आपेगांवास दुसरी समाधि करणे हेही योग्यच ठरते. याच समाधीचा उत्सव चालावा म्हणून आपेगांवचे उत्पन्न या समाधीकडे, लावून दिले असावे. (३) आतां ज्ञानेश्वरी व अभंग यांची भाषा भिन्न आहे म्हणून ज्ञानेश्वर दोन निरनिराळे समजले पाहिजेत, या मतास उत्तर इतकेंच आहे, की अभंगाची भाषा नेहमी लोकांच्या तोंडातून गेली असल्याने ती ज्ञानेश्वरीच्या भषिपेक्षा किंचित् आधुनिक दिसले यांत संशय नाही. ज्ञानेश्वरी का अध्यय च ... ________________

- - . . . বলল, नाच्या ग्रंथ आहे, आणि अभंग हे पाठ म्हणण्याचे आहेत. अभंगांतील व्याक-:: रणाची रूपें. अगदी ज्ञानेश्वरीबरहुकूम का नाहीत याचेही हेच कारण आहे... तथापि ही गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे की बरेचसे मूळचे शब्द जे ज्ञानेश्वरीत येतात ते अभंगांतही दृष्टीस पडतात. . उदाहरणार्थ, " साइखेडिया, बिक, “पाने- : जोनि, नीचनवा, बरवंट, बुंथी, गळाळा, संवसाटी, खडाणी, सिंतरणे, वाडेकोर्डे पारिखे, " व असेच कित्येक शब्द ज्ञानेश्वरी व अभंग यांन सारखेच आहेत. यावरून ज्ञानेश्वरी व अभंग यांचे शब्दभांडार एकच आहे हे सिद्ध होतें. ()' या तीन वर दिलेल्या कारणांखेरीज आणखीही काही कारणे दोनी ज्ञानेश्वर एकच होत हे.दाखविण्याकरितां देतां येण्याजोगी आहेत. त्यांतून आपण येथे एकाचाच विचार करूं. शब्दभांडाराप्रमाणेच ज्ञानेश्वरी व अभंग, अगर अमृतानुभव आणि अभंग, यांचे विचारभांडारही एकच आहे हे सहज दाखविता येण्याजोगे आहे. हा विषय मोठा असून याचा कोणी सांगोपांग अभ्यास केला पाहिजे. तून दोन चारच मासले येथे दाखवितो. . या पुस्तकांत दिलेल्या ज्ञानेश्वरांच्या अभंगांतील । क्रमांक ९३ “ मलयानिळ शीतळु । पालवी नये गाळु । सुमनाचा परिमळु । . गुंफितां नये"; कमांक ३५ " श्रीगुरु सारिखा असता पाठिराखा ।...राजयाची.. कांता काय भीक मागे । कल्पतरुतळवटी जो कोणी बैसला । काय वाणी त्याला सांगिजो जी"; क्रमांक १३ सपै मैं दर्दर धरियेला रे मुखीं । तेपोंही रे माशी धरियेली पक्षी" क्रमांक ५ " मिथ्या मोहफांसा । शुकनळिके जैसा । मुक्त .. परि आपेसा । पळों नेणे"; पुनः क्रमांक ५ “ राखोंडी फुकिता दीप न लगे" क्रमांक १००" दिसतें परी न धरवे हातें । तें सतातें पुसावें" या सर्वांस' ज्ञानेश्वर्तिन अत्यंत सदृश अशा ओव्या सहज दाखविता येतील. त्याप्रमाणेच ज्ञानश्वरांचे आणखी काही अभंग " मृगजळाच्या जळीं । चारिशी जळचरें.", " स्तुति ते तुझी निंदा । स्तुतीजोगा नव्हेसी गोविंदा " • यांस व ज्ञानेश्वरअभंगांच्या क्रमांक ८६ मधील “ नारीपुरुष दोघे । एकरू दिसती । ज्ञानदेव म्हणे शिव तेचि शक्ति । पाहतां व्यक्ती व्यक्त नाहीं " यास सदृश 'उतारे अमृतानुभवांतून दाखविता येतील. एकंदरीत ज्ञानेश्वरी व अभंग, आणि अमृतानुभव व अभंग, यांमध्ये कल्पनांचे इतके साम्य आहे की, ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ज्या लेखणीतून उतरले त्याच लेखणीतून अभंग्रही उतरले असले पाहिजेत असें निश्चित रीतीने म्हणण्यास हरकत दिसत नाही. . ________________

- संतवचनामृत. ५. आता आपप्प या पुस्तकांत घेतलेल्या ज्ञानेश्वरांच्या अभंगांच्या चर्चेकडे वळू. एकंदरीत ज्ञानेश्वरांचे अभंग इतके चांगले. आहेत, आणि त्यांतल्यात्यांत साक्षात्कारविषयक अभंग इतके उत्कृष्ट आहेत, की ते त्या बाबतीत ज्ञानेश्वरीसही थोडेबहुत मागे टाकतील असे म्हणण्यास हरकत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये जसे ज्ञानेश्वरांचे उच्च दर्जाचे तत्त्वज्ञान दिसते, त्याप्रमाणे त्यांच्या अभंगांमध्ये भाकरस व. स्वानुभव ही विशेषेकरून दिसतात.. प्रथमच ज्ञानेश्वरांनी सकळ मंगळनिधि श्रीविठ्ठलाचे नाम घ्या असे सर्वांस विनविलें आहे (क्र. १). इतर काहींच न जाणतां एक विठ्ठल जाणल्यास. पुरे; हीच भक्ति व हेच ज्ञान, असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. (क्र. २). बहुत सुरुताची जोडी असेल तरच विठ्ठलावर आवड उत्पन्न होते, असे त्यांचे म्हणणे आहे (क्र. 3.). पुत्र, दारा, धन ही सर्व काळाचें साय असल्याने आपणांस शुकाप्रमाणे नळिकेस लटकावून घेऊन आपण बद्ध आहों अशी भावना करून घेऊ नये, राखुंडी फुकन ज्याप्रमाणे दीप लागत नाही, त्याप्रमाणे शब्दज्ञानाने आत्मप्रकाश होत नाहीं (क्र. ५). आमिषाकडे लक्ष ठेवून जसें बक ध्यान करतो, त्याप्रमाणे ध्यान करूं नकोस (क्र. ५). तुला पापांतून सुटका हवी असेल तर तूं गुरूस शरण जा ( क्र. ९). गुरुनाथाने मस्तकी हस्त ठेविल्यावांचन मनास समाधान प्राप्त होणार नाही (क्र. ११). गुरु हा एक संतकुळींचा राजाच आहे; गुरुस सुखाचा सागर अगर धैर्याचा डोंगर असेंही म्हणतां येईल (क्र. १२). सर्प बेडूक गिळीत असतां बेडकाने जसा मासा सावा त्याप्रमाणे तूं काळांच्या सपाट्यांत सांपडला असतांना विषयलोलुप होऊ नकोस (क्र. १३). ज्या नामानें ध्रुव, प्रल्हाद, अंबरीष तरले, तेच नाम सार आहे असे समज (क्र. १४). नाम घेण्यास अधिकार व अनाधिकार असे काही नसून केवळ त्याच्या उच्चारानेच मोक्ष मिळतो (क्र. १६). नाम ही श्रेष्ठांतील श्रेष्ठ वस्तु आहे ( क्र. १८ ). जन्मजन्मांतरीच्या पुण्याचा संचय असेल तरच रामाचे नांव वाचेस येईल (क्र. १९). नामाने क्षणार्धात पापराशि दग्ध होतील (क्र. २०). नाम उच्चारण्यास काळ वेळ वगैरे, पाहण्याचे कारण नाहीं (क्र. २४). एकतत्त्व नामाचे साधन केले असता केव्हाही द्वैताची बाधा होणार नाही, नामामृतगोडी लाधल्यास ती एक जीवनकळाच आहे असे म्हणण्यास हरकत नाही (क्र. २५). अर्धघटिकाही नामस्मरणावांचून राहू नको (क. २६.). एकतत्त्वनाम तूं हृदयांत दृढ धरशील तर हरीस तुझी खात्रीने करुणा येईल; ज्ञानेश्वराने मान्यरूप जपमाळ ________________

प्रस्तावना अंतरी धरल्याने ( क्र. २७), व वैकुंठाचा पाठ चालविल्याने, त्यास : हरि हा धनदाट भरलेला दिसतं आहे (क्र. २८). ज्यांनी ज्यांनी रामकृष्णटाहो फोडला त्यांस वैकुंठभुवनांतले घर मिळाले आहे ( क्र. २९) भानुबिंबाप्रमाणे हे साधु 'निर्मळ व अलिप्त आहेत. (क्र. 3.) त्यांची भेट आज होणार असल्याने बाहेरच्या दोन भुजा, व आंतल्या दोन भुजांनी जणू काही चतुर्भुज होऊन मी . त्यांस अलिंगन देण्यास धांवत आहे (क्र. ३१). व्यासांच्या खुणेने ज्ञानेश्वर ‘सांगतात की, अशा भक्तांच्या घरी देव रावतो (क्र.३२ ). पूर्वजन्मांमध्ये मी फार मुरुते केली म्हणून आज संतदर्शन झाल्याने ती फळास आली असें मी समजतो; आज अंतःकरणांत परमानंद उत्पन्न होऊन अचेतनास प्राण मिळावा, वत्सास धेनु भेटावी, अगर कुरंगिणीस पाडस मिळावे, तसे झाले आहे (क्र. 33). श्रीगुरुसारिखे पाठिराखे असतां दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याचे कारण - नाही; ज्याप्रमाणे राजाच्या कांतेस भीक मागावी लागत नाही, अगर कल्पतरूच्या छायेखाली जो बसला त्यास कोणत्याही गोष्टीची उणीव पडत नाही, त्याप्रमाणे श्रीगुरूंनी सांभाळ केला असतां आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात (क्र. ३५). ... ६. ज्ञानदेवांमध्ये वैराग्ययुक्त बोल फारसे दिसत नाहीत. नामदेवतुकारामांच्या अंतःकरणांत देवाच्या प्राप्तयर्थ ज्याप्रमाणे खळबळ उडून राहिली, अगर देवाची रुपा होण्याकरिता ज्याप्रमाणे रामदासांनी असंख्य करुणाष्टके केली, त्याप्रमाणे वैराग्ययुक्त बोल ज्ञानेश्वरांमध्ये फारच थोडे सांपडतात. ज्ञानेश्वरांस ईश्वरप्रीत्यर्थ 'फारच थोडे श्रम पडले असावे असे वाटते. त्यांच्या सर्व ग्रंथांत येथपासून तेथपर्यंत आनंदाची व अधिकाराची वाणी दिसते. ज्ञानेश्वरीत तर अंतःकरणाच्या तळमळीचे फारसे उद्गार दिसतच नाहीत. ज्ञानेश्वरांच्या अभंगांत मात्र चार दोन ठिकाणी असे वैराग्याचे बोल आहेत, त्यांचा जिज्ञासूंनी अवश्य अभ्यास करावा. क्रमांक ३७ मध्ये देव जवळ असून त्याची भेट होत नाही याबद्दल ज्ञानेश्वर दिलगिरी प्रगट करितात. क्रमांक ३८ मध्ये आपल्या अंगावरचे घोंगडें फाटले असल्याने आपल्यास धडौता करण्याविषयी त्यांनी देवास विनंति केली आहे; माझें घोंगडे फाटले असल्याने मला दुसरें घोंगडे केव्हां प्राप्त होईल याबद्दल मला रात्रंदिवस चिंता वाटत आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात; नवीन घोंगडे घेण्यास जवळ वित्त नाहीं; उघड्या पाठीवर हीच वाजत असल्याने देवास घोंगडे देण्याबद्दल त्यांनी प्रार्थना केली आहे. क्रमांक ३९ मध्ये जिचा भ्रतार परदेशास गेला आहे, ________________

. . . . - संतवचनामृत. अशा विरहिणी स्त्रीच्या रूपकाने त्यांनी गरुंडवाहना, गंभीस, मला लोकरं भेट दे अशी ईश्वराची प्रार्थना चालविली आहे; रजनी दिवसाप्रमाणे होऊन मला रात्री डोळाही लागत नाही; मला अवस्था लाऊन गेला तो अजून का येत नाही, अशी देवाच्या भेटबिद्दल त्यांनी उत्कंठा दर्शविली आहे. क्रमांक ४० मध्ये याच विरहिणीचा विरह जाज्वल्यदशेप्रत जाऊन आपल्या भ्रताराची भेट होत नाही म्हणून तिला फार वेदना होत आहेत; चंद्र, अगर चांफा, अगर चंदन, यांच्या योगाने मनांतील दुःख वाढत मात्र आहे; चंदनाचे चोळीने माझें सर्वांग पोळन आहे; पुष्पांची शेज शीतळ म्हणतात, पण ती आगीप्रमाणे माझ्या अंगास पोळत आहे; कोकिळांनो, तुम्हीं मुस्वर गाता, पण त्याच्या योगाने माझ्या अंतःकरणांतील दुःख जास्तच वाढत आहे; दर्पणांत पहात असतां माझें रूप मला दिसत नाहीं अशी देवकीनंदनाने माझी स्थिति केली आहे, असें ज्ञानेश्वर म्हणतात. क्रमांक ४१ मध्ये “पुरे पुरे आतां जड झालें जिणे" असे ज्ञानेश्वर म्हणतात; जेथें तेर्थे तूंच पूर्वी दिसत असून आतां तूं लपून मजशी अबोला कां धरिलास असें ज्ञानेश्वर देवास विचारतात. नभ नभांत मिसळून कालिंदीजलास क्षोभ आल्याने तुझे रूप पहावयास सर्व जगाचे डोळे उत्सुक झाले आहेत; तूं आपल्या. कटीवर हात ठेवून भवजलाब्धीचा अंत इतकाच आहे असा पनांस संकेत दाखवीत आहेस; आमच्या हृदयांतील दिसणारी श्रीमूर्ति विठ्ठलवेषाचे आवरण घेऊन आझांस वाळवति मात्र आहे. तं कितीही वंचना केलीस तरी माझ्या चित्तांत पालट होणार नाहीं; बाप रखुमादेवविरा विठ्ठला, तूं मजशी अबोला कां धरिलास; तुझ्याशी संभाषण न झाल्याने माझ्या कुडीतून प्राण बाहेर निबूं पाहत आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. ४२). ७. ज्ञानेश्वरांस साक्षात्कार झाला त्याचा मूळ पाया निवृत्तिनाथांनीच घातला असें ज्ञानेश्वरांचे म्हणणे आहे. ज्यावेळी निवृत्तिनाथांनी मला उपदेश दिला त्यावेळी तेथें एक वृक्ष होता, त्याच्या तळी योग्य रीतीने बसवून त्यांनी मला नामामृत पाजलें; अशा निवृत्तिनाथांच्या धर्माची भरभराट होवो असें ज्ञानेश्वर म्हणातात. त्यांनी मला परमार्थाचे रहस्य दाखविल्याबरोबर माझे अंधत्व नाहीसे झाले (क. 3 ). करतलावर' ज्यांप्रमाणे आंवळा. यावा त्याप्रमाणे परमार्थाचे सर्व वर्म निवृत्तिनाथांनी माझे हाती दिले ( क..r). ज्ञानेश्वरांनी आपल्या परमार्थमार्गातील जे जे अनुभव सांगितले आहेत से वे प ________________

प्रस्तावना. सर्व साधकांनी ध्यानात ठेवण्याजोगे आहेत. रक्त, शुभ्र, नील, पति, वर्ण समजून तुम्हीं मोन्याने रहा अमें ज्ञानेश्वरांचे म्हणणे आहे. (क. ४५). काळा, निळा, पारवा अखंड तमाशा डोळ्यापुढे दिसून (क. ४६ ), देवाचें बरवें कृष्णवर्ण अमोलिक रूप मला दिसले. (क. १७); जणू काही मला काळा दादुला . पाचारीतच आहे असे वाढू लागले, असे ज्ञानेश्वर म्हणतात (क. १८ ). हा जो गगनांत नांदणारा कृष्णवर्ण पुरुष तोच आत्मरूपाने मी या दृष्टीनं पाहिला (क्र. ५०). जिकडे तिकडे नीलप्रभा फांकन तिने सर्व आकाश व्यापून टाकिलें (क्र. ५३). ही अनुभवाची खूण बोटाने दाखविता येण्याजोगी नाही; आपण गुरुपुत्र होऊन तिचा अनुभवच घ्यावयास पाहिजे; ज्या ठिकाणी स्वरूप चळणार नाही व ढळणार नाही, त्या ठिकाणीच ते पहावे; ज्याच्या सत्तेने सर्व विश्व चालते, . में मागे पुढे बरोबर नेहमी. असते, जे पायाखाली तुडविलेही जातें, जे दृष्टीपुढे सर्वदा दिसते, ते बोटाने दाखविता येणे शक्य नाही. ही खूण समजून तिच्या . यथार्थतेबद्दल गुरुपुत्रास जाऊन प्रश्न करा, असे ज्ञानेश्वर सांगतात (क. ५४).. पाहता पाहता पाहण्याचा भाव नष्ट झाल्याने मोन्यच धरावे लागते; म्हणून अनुभवी जो मनुष्य आहे त्याचं बोलणे खुंटते असे समजावे (क. ५५). जे बुडणार नाही, ज्याचे आकलन करता येणे शक्य नाही, जे चोराचे हाती लागणार नाही, असें अमोलिक रत्न तुझ्या हाती सापडले आहे ( क्र. ५६ ). सतेज व उत्तम. आकाराचे, ज्याच्या अष्टही अंगांतून ज्योतीचा प्रकाश बाहेर पडत आहे, अशा. मोत्याचा लाभ तूं करून घे ( क्र. ५७). ते कोटें बाजारांत सांपडणार नाही, अगर शहरांत सांपडणार नाही; फक्त लक्षरूप लक्षाच्या मालाने मात्र ते मिळेल (क्र. ५८). ज्याने शून्य शोधिलें नाही त्याचे जिणे केवळ गाढवाचे होय; शुभ्र, . श्वेत, ताम्र, नील वर्णीचे शून्य पहावें (क. ५९). या शून्याचा शेवट ता डोळ्यानेच आपला डोळा पहावा ( क्र. ६२ ). ज्ञानेश्वरांस निवृत्तीनी हा नयन दाखविल्याने त्यांस हा नयनच सर्व ठिकाणी दिसू लागला (क्र. ६३). त्यांच्या शरीरांत ज्योतिलिंग उगवून त्यांनी हस्तावांचून त्यास कवळिलें (क्र. ६५ ). ज्याची स्वर्ग ही शाकुंका आहे, समुद्रवलय ही पिंडी आहे, शेषाप्रमाणे ज्याची बैठक आहे, जें तिहीं लोकांस आधारभूत आहे, ते लिंग मी देखिलें दोखलें असें ज्ञानेश्वर म्हणतात. मेघधारारूप धार त्याजवर धरिली, तारारुपी पुष्पांनी त्यास पूजिलें, चंद्रफळ त्यास अषण केलें, रविरूपी दिव्याने त्यास ओवाळिलें, व शेवटी आत्मनैवेद्य त्यात - ________________

संतवचनामृत. समर्पण करून त्या ज्योतिलिंगाचे आपल्या हृदयांत मी ध्यान केलें असें ज्ञानेश्वर - सांगतात (क्र. ६६ ). त्याचे तेज चंद्रसूर्यापेक्षाही जास्त होते. (क्र. ६९.) ने अणुप्रमाण असूनही जगाची उत्पत्ति त्यापासूनच होते असे माझ्या अनुभवास आले, असें ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. ७१). रात्रीस सूर्याचा व दिवसास चंद्राचा उजेड असा विपरोत चमत्कार मी पाहिला. ज्यास उदय नाही व अस्त नाही, ‘असा आपल्यास आपण दर्पणच होऊन मी ठेलों. ही खूण अनुभवी लोकांसच कळणार. ही खूण सांगितली असतां संत संतुष्ट झाले असें ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. ७२ ). नाद असो अगर ज्योति असो, दोहींच्या योगानं परिपूर्ण असा आत्मा माझ्या नजरेस आला (क्र. ७३ ). जो योगी अष्टांगसाधन करितो त्यास “याच मार्गाने आत्मप्राप्ति होते, असें ज्ञानेश्वर सांगतात (क्र. ७). ८. ज्ञानेश्वरांच्या अनुभवाची याच्याहीपुढे बहार आह. देवाचं रूप पाहिल्यावर ज्ञानेश्वरांस मौन पडलें, व पुढे बोलवेनासे झाले, असे ते म्हणतात (क्र. . .७६). देवांचा जो देव तो मी पहिला पाहिला, असें ज्ञानेश्वर द्विवार सांगतात. मी त्यांस अनंतरूपाने व अनंतवेषाने पाहिल्याने माझा संदेह फिटून गेला (क्र. ७७). • सबाह्य अभ्यंतर व्यापक अशा देवास निश्चयपूर्वक पाहिल्याने आज दिवस - सोनियाचा झाला आहे, व जणू कांहीं अमृताचा वर्षावच होत आहे असे वाटते. ... (क्र. ७८). मुक्यास जसा आपला आनंद व्यक्त करता येत नाही, तशी माझी . स्थिति झाली आहे (क्र. ७९). माझेच रूप सर्वत्र दिसत असल्याने मी आनंदांत मुरून गेलो आहे ( क्र. ८० ). हा आनंद माझ्या आंत न मावतां लोकांच्या नजरेस दिसू लागला आहे ( क्र. ८१). कापराची वात उजळून ती जशी आप ल्यामध्येच लनि व्हावी, तसा मी माझ्या आनंदांतच मुरून गेलो आहे (क्र. ८२). . अंगणांत कोण बोलले म्हणून पाहूं गेलो असतां मी पंढरिरायास पाहिले; व त्यामुळे जागृति, स्वप्न, सुषुप्ति, व तुर्या या अवस्थांमधील भेद नाहीसा झाला (क्र. ८r). • जारी व पुरुष दोघे एकाच रूपाने दिसतात, असें मी नवल पाहिल्याने शिव तोच शक्ति, व शक्ति तोच शिव, अशी माझी खात्री पटली (क्र.८६ ). ते रूप पहात असतां माझे पात्यास पातें सुद्धा लागण्याचे राहिले (क ८८) व त्या रूपाकडे पाहता ' पाहता मी तन्मय होऊन गेलों ( क्र. ८९). मी हे देखणे पाहिल्यावर प्रथम माझी दृष्टि गेली; मी बाह्या उचलून त्यास क्षेम द्यावयास गेलों, आनंदानें “अगा, गुरु-नाथ, देवराया " असें म्हणून मी स्फुदल्याने माझ्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहिल्या . 4 . ________________

प्रस्तावना - (क. ९.). मी त्यास क्षेम देऊ गेलो तसा तो माझ्या अंगांतच' जंडून गेला याची आशा केली असता हा पळून जातो, पण निराश बनल्यास तो. तत्काळ पावतो, असा याचा चमत्कार आहे (क. १२.) याच्या स्वरूपाचा निर्धार करणे अशक्य आहे. जसा मलयानिल पदरांतून गाळता येत नाही. अगर फुलांच्या वासाचा हार गुंफिता येत नाहीं, अगर मोत्यांचे पाणी रांजणांत भरतां येत नाही, तसे याचे वर्णनहीं करतां येणे अशक्य आहे (क. ९३). मी देह बळी दिल्यानेच याची मला प्राप्ति झाली; या निराकारास चंदन ज्याप्रमाणे भरावा, अगर अश्वत्थ ज्याप्रमाणे फुलावा, त्याप्रमाणे मी पाहिले. आता प्रपंच पाहणे पुरे; स्वरूपाच्या आनंदांत राहणे हेच श्रेष्ठ होय, अशी माझी खात्री पटली ( क. १४). आंत विठ्ठल, बाहेर विठ्ठल, मीच विठ्ठल, असे मला आता वाटू लागले (क्र. ९६), ध्याता व ध्येय यांमधील भेद नाहीसा झाल्याने देवा, तूं व मी आतां एकच घोंगडें पांघरूं, असें मी म्हणू लागलों (क्र. ९६ ). मी माझे गुरु जे श्रीनिवृत्ति तद्रूपच बनलों (क. ९७). रखुमादेवीवरास मी चक्षूविण' पाहिले, व हातावांचन स्पर्श केला ( क्र. ९९ ). जे दिसते पण हाती धरवत नाही, : त्याची खूण संतांस पुसावी, असे ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. १०० ). रखुमादेवीवरास मी देहावांचन आलिंगन दिलें (क. १०१.). त्याने मला भेट दिली, तरी तो मजशी संभाषण करीना, म्हणून माझा जीव लांचावून गेला (क्र. १०२)... ज्याच्या निढळावर कोटिचंद्र प्रकाशमान होतात, जो कमळनयन आपले हास्य- .. वदन दाखवीत आहे, तोच आतां हालूं व डोलूं लागला; उभा राहून हातार्ने खुणावू लागला, व घडोघडी गुजगोष्टी सांगू लागला (क्र. १०३). ज्या नरास : आत्मज्ञानाच्या गोष्टी माहीत नाहीत त्यास या स्थितीचे वर्म कळणार नाही (क्र. १०४); म्हणून या गोष्टींचा मुखांपुढे उलगडा करूं नये असें ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. १०५). ९, ज्ञानेश्वरांच्या अभंगचर्चेनंतर आपण सोपान, मुक्ताबाई व चांगदेव यांच्या अभंगचर्चेकडे वळू. जो सर्वदा रामकृष्णध्यान करितो. त्यास नानायोनिरूप आपदा भोगाव्या लागत नाहीत, असें सोनापदेव सांगतात (क्र. १). या जगांत सर्व काही सोवळे आहे, फक्त अभक्तांचे मन मात्र ‘ओवळे आहे; सोपानदेवाचे मोठे प्रचंड सोवळे असून, ते हरीविण वितंड बोलतच - . माहीत असे ते म्हणतात : (क्र. २). देवांमध्ये लीन होऊन आपण सुखदुःख : ________________

संतवचनामृत.. विशदाने असे त्यांचे म्हणणे आहे ( क. ४). भक्तियुक्त गोपालांचा शब्द कानावर पडल्याबरोबर देव त्यांस सामोरा येतो, असे सोनापदेव म्हणतात (क्र.) मुक्ताबाईंनी आपण अंध वायां जात असतांना निवृत्तिनाथांनी आपल्यास कसें सावध केले याचे वर्णन केले आहे (क्र. १). आम्ही या परमार्थनदीतून निवृत्तिमटाकाने गेल्याकारणाने आपल्या ध्येयास जाऊन पोचलों, असें मुक्ताबाई सांगतात ( क. २ ). आकाशांत मुंगी उडून तिने सूर्यास झांकून काकिलें, वांझ स्त्रीस देवरूपी पुत्र निर्माण झाला; शेषाने विचवास नमन केले; माशीएवढी आरति विऊन त्यांतून घार निर्माण झाली; व ते पाहून मुक्ताबाईस हंसें आले, असे त्या ... म्हपातात (क्र. ४). दिवसास चांदणे दिसून रात्री उष्णतेज पडल्याप्रमाणे वाटतें, आसे मुक्ताबाईनी म्हटले आहे (क्र. ५). चंद्रनाच्या वासाने वनांतील सर्व झाडे जशी सुवासिक व्हावीत, त्याप्रमाणे श्रीहरीची सेवा केली असतां मनुष्य हरिरूपच अनतो, असें मुक्ताबाईचे म्हणणे आहे (क्र. ६). १०. ज्ञानदेवादि चार भावंडांशी ज्यांचा अत्यंत संबंध आला असे पुरुष - म्हणजे चांगदेव हे होत. चांगदेव चौदाशे वर्षे जिवंत राहिले अशी जी एक समजून आहे तिचा अर्थ इतकाच की, एक तर चांगदेव या नांवाचे चौदा निरनिराळे पुरुष होऊन गेले, अगर निळोबांनी म्हटल्याप्रमाणे चांगदेव या नावाच्या व्यक्तीस चौदा निरनिराळी नांवे पडली. निळोबांनी एकाच व्यक्तीस चौदा निरनिराळी नांवें होती असे जे म्हटले आहे ते अशक्य दिसत नाही. आत्माराम या नावाच्या रामदासपंथांतील एका कवीने “दासविश्रामधाम" या नांवाचा जो एक ग्रंथ लिहिला आहे त्यांत प्रत्यक्ष रामदास यांस " विप्र, फकीरजिंदा, सामीरामदास" वगेरे निरनिराळी नांवें होती असे लिहिले आहे. एकंदरीत ही गोष्ट खरी आहे. की, चांगदेव या: नांवाचा जो प्रसिद्ध पुरुष होऊन गेला त्याचा जन्मशक माहीत नसला तरी त्याची समाधि गोदाबरीनदीवर पुणतांचे या गांवीं शके १२२७ मध्ये झाली. या चांगदेवाचा ज्ञानदेवादि चारी भावंडांशी जरी संबंध आला होता, तथापि त्यांतल्या त्यांत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांच्याशी न्याचा संबंध जास्त आला. चांगदेव व ज्ञानदेव यांचा संबंध म्हणजे हठयोग व राजयोग यांचा संबंधच होय. चांगदेव इठयोगांत फार निष्णात होता व त्याने पाठविलेल्या कोन्या कामदास उत्तर म्हणून ज्ञानदेवांनी "चांगदेवपासष्टी " या लांडावे पकसा ओलांचे एक पन्ना सन्यास पाठविले आहे. त्या पत्र्याच्या योगगर्ने ________________

चांगदेवाचे गर्वहरणाः होऊन हठयोग सोडून परमार्थसाक्षात्कार व्हावा या हेतूनें ज्या वेळेस तो चारी भावंडांस शरण गेला. त्या वेळेस ज्ञानेश्वरांनी मुक्ताईकडून त्यासः उपदेश देवविला. हठयोगापेक्षां साक्षात्कार श्रेष्ठ आहे अशी ज्यावेळी चांग-देवाची खात्री पटली त्यावेळी त्यांनी पुढील अभंग केला आहे: - मातियाचे पाणी रांजण भरिला । पोट भरुनी प्याला ज्ञानदेव । अनाची साउली धरोनिया हाती । गेलासे एकांती निवृत्तिदेव ॥ पुष्पाचा परिमळ वेगळा काढिला । हार तो लेइला सोपानदेव ।।. हिन्यांचिया घुगऱ्या जेवण जेवली । पोट भरुनी धाली मुक्ताबाई ॥ चौघांचे वर्म आले असे हातां । चांगदेव स्वतां तये ठायीं ॥ या अभंगावरून चौघांचेही वर्म आपणांस प्राप्त झाले असें चांगदेवांनी लिहिले आहे. आतां ज्ञानेश्वरांनी चांगदेवपासष्टी या नांवाचे जे पत्र चांगदेवास पाठविलें न्यायठ्ठल अलीकडे रा. चांदोरकर यांनी त्याचा कर्ता ज्ञानेश्वर नसून चक्रपाणि . बांगा हा आहे असे म्हटले आहे. या चक्रपाणि चांग्याचा उल्लेख पासष्टीत आला असून त्याने आपला गुरु वटेश चांगा यांस पासष्टीत नमनहीं केलें आहे असें चांदोरकर यांचे म्हणणे आहे. शिवाय चांदोरकर असेंही म्हणतात की, हा चक्रपाणि म्हणजे प्रसिद्ध महानुभाव चक्रधरच होय. हे मत खरे मानिल्यास चांगदेवपासष्टीचे कर्तृत्व ज्ञानेश्वरांकडे येतच नाही. या मताविरुद्ध इतकेच म्हणावयाचे आहे की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी व अमृतानुभव एका बाजूस व अभंग दुसऱ्या बाजूस ठेवून पाहिले असता त्यांच्या भाषासादृश्यामुळे व विचारसादृश्यामुळे त्यांचे कर्तृत्व एकाच व्यक्तीकडे येते, असे सिद्ध करितां येते, त्याप्रमाणेच ज्ञानेश्वरी व अमृतानुभव एका बाजूस ठेवून दुसन्या बाजूस चांगदेवपासष्टी ठेविली असता त्यांमध्येही भाषासादृश्य व विचारसादृश्य इतके आहे की त्या सर्वांचे कर्तृत्व एकाच व्यक्तीकडे येतें असे म्हणण्यास हरकत नाही. “ स्वस्ति श्रीवटेश।जो लपोनि जगदाभासु । दावी मग ग्रासु। प्रगटला करी" (१), "प्रगटे तंव नंव. नादिसे लिपे तंव तंव आभासे। प्रगट ना लपाला असे । न खोमता जो (२)", "नुसचे मुख जसें । देखिजतसे दर्पणमिसें । वायांचि देखणे ऐसे । गमों लागे" (२०); “यालागि मोनेंचि बोलिने । कांही न होनि सर्व होइजे। नव्हतां लाहिजें । काहीच नाही" (3) * एका ज्ञानदेव चक्रपाणी, ऐसे ! दोन्द्वी डोळस आसिखे । परस्पर पाहता कैसे । मुकले ________________

Jichoda संतवचनामृत. भेदा" (६२), या व इतर पासष्टीतील ओंव्यांवरून तिचे ज्ञानेश्वरी अगर अमृतानुभव यांशी किती सादृश्य आहे हे सहज दिसून येईल. जवळजवळ पासष्टीतील प्रत्येक ओंवीस ज्ञानेश्वरी अगर अमृतानुभव यांमधून समानार्थक ओंवी काढून दाखवितां येईल असे म्हटले असतां अतिशयोक्ति होणार नाही. ज्या वटेश्वराचा उल्लेख चांगदेवपासष्टीतही आहे.व चांगदेवाच्या अभंगांतही आहे (क्र. १, २, ४, ५, ८, ९, १०.) तो वटेश्वर म्हणजे चांगदेवाचे उपास्य देवत असले पाहिजे असे दिसते. मुक्ताबाईंनी उपदेश दिला, तरी चांगदेवांनी आपले उपास्य दैवत वटेश्वरच ठेविलें होते असे दिसते. वटेश्वर हे नांव वाटीच्या आकारावरून त्या देवास पडले असावे असें म्हणतात..... ११. मुक्ताबाईनी चांगदेवास दिलेल्या उपदेशांत “ उलट उलट माघारा प्राण्या " अशा आरंभाचे एक उत्तम पद आहे. ज्ञानेश्वरांनी जशी मायानदीची कल्पना केली, त्याप्रमाणेच मुक्ताबाईनी या संसारास नदीची उपमा देऊन “ उलट उलट" असा चांगदेवास उपदेश केला आहे. हे भवनदीचें. पाणी फार ओढणारें असल्याने मोठमोठ्या पोहणान्यांस सुद्धा तें खाली पाडते असे त्यांनी म्हटले आहे (. ७.). अहंकाररूप घोंगड्याचा त्याग करून तूं आतां गुरूपदेशाप्रमाणे वटेश्वराचें ध्यान कर, असें मुक्ताबाई चांगदेवास सांगितात (क्र. ८.). गुणातीत फांदीवर पाळणा लाविला, व तेथे मुक्ताबाईंचा सुत पहुडला; मुक्ताबाईंनी अनाहताचा हूलर वाजवून त्यास उन्मनीरूप. निद्रेत निजविलें, असें. मुक्ताबाई म्हणतात (क. १०). सोऽहं सोऽहं हाच छंद धर, व जागृति व निद्रा याच्या पलीकडच्या स्थितीत म्हणजे समाधीत सुखोपभोग घे, असे मुक्ताबाईंनी चांगदेवास सांगितले आहे ( क्र. ११). नोवरीच्या पोटासच नोवरा आला, आणि नोवरा जमल्यावर त्याने नोवरी पाहिलीच. नाही, असा तो नोवरा कोणासच सांपडत नाही, असे मुक्ताबाई म्हणतात (क्र. १२.) चांगदेवांचे जे अभंग उपलब्ध आहेत, त्यांत त्यांनी मुक्ताबाईंचा मोठ्या गोरवाने उल्लेख केला आहे. वटेश्वर चांग्यास मुकाईने पोसण्यास घेतलें असें चांगदेव म्हणतात (क. १.), ज्यावेळेस चांगदेव तयार होऊन शांतिनोवरीशी लग्न लावावयास गेले त्यावेळी मुक्ताईकरवलीने हळद वाटली असे ते म्हणतात (क्र. 3.). हे लग्न म्हणजे आत्मा. बकुडी यांमधील लाच होय (क्र.४). ज्याची - नोवरी त्याच्या हातात दिल्याने मी नियंत झालो असें ज्याप्रमाणे कण्वऋषींनी शकुंतलेस दुष्यंताकडे पाठविलें ________________

प्रस्तावना. त्यावेळेस म्हटले, त्याप्रमाणेच आतां चांगदेवही म्हणतात (क. ५). मार्ग मुक्ताबाईंनी उपमा दिल्यांप्रमाणे चांगदेवांनीही मुंगीने जाऊन आकाशास गवसणी घातली, व तेथें एक असे मोठे नवल वर्तले की, मुरकुटानें विश्व व्यापून टाकिलें असें म्हटलं आहे. (क्र. ५). माझ्या डोळ्यांस फार उत्कंठा झाल्याने ते निडारले असतां डोळ्यांवांचन मी स्वस्वरूप भोगिलें असें चांगदेव म्हणतात (क्र..); व शेवटल्या एका अभंगांत (क. १०) यंत्रांतून ज्याप्रमाणे शब्द निघतो त्याप्रमाणे शब्द निघतात, पण डोळ्यांस देव दिसत नाहीं; नेहमी रुणझुण रुणझुण किनरी वाजते, व याच आनंदांत चांगदेव निमून जातात, असे त्यांनी लिहिले आहे........ ... - नागोवा नामदेवादि संत. . ..... . . . . . १२. ज्ञानेश्वरांचे समकालीन पण त्यांच्या पश्चात् सरासरी अर्धशतक राहून ज्यांनी विठ्ठलसांप्रदाय वाढविला अशा महान् भगवद्गत नामदेवांचे चरित्र समजण्यास थोडाबहुत मागचा पंढरीसांप्रदायाचा इतिहास पाहिला पाहिजे.' पंढरीसांप्रदायाचा उगम केव्हां झाला व त्या सांप्रदायाचा आयमुनि पुंडलीक हा केव्हाँ होऊन गेला याबद्दल अद्याप निश्चितरीतीने लिहिता येण्याजोगें नाही. पुंडलीक हा कानडी भक्त असावा असे दिसते. व पंढरपुरास विठोबाची स्थापना त्याच्या हातून झाली असावी असेंही दिसते.. ही विठ्ठलस्थापना झाल्यावर विठ्ठलाची भक्ति हळू हळू महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, गुजराथ वगरेकडेही पसरली. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या अगोदर ६६ वर्षे म्हणजे शके १.१३१ मध्ये प्रत्यक्ष आळंदी येथेच झालेल्या एका कृण्णस्वामींच्या समाधीवर विठ्ठलरखुमाईच्या मूर्ति आहेत ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. यावरून असे दिसते की विठ्ठलभक्ति ज्ञानेश्वरांच्या अगोदरच आळंदीपर्यंतही पसरली होती. तदनंतरचा आणखी एक महत्त्वाचा शिलालेख म्हटला म्हणजे शके ११५९ मधील पंढरपूरच्या देवालयांतील होय. त्यांत सोमेश्वर या नांवाच्या राजाने भीमरथीच्या तीरावर पंडरगे नामक ग्रामांत तळ दिला होता, व त्यावेळी "पुंडलिकाचें मुनि म्हणून लोक प्रेमपूर्वक चिंतन करीत होते असे लिहिले आहे. त्यानंतर शके ११९५ मध्ये म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या अगोदर दोनच वर्ष पंढरपुरामध्ये विठोबाच्या देवळांतच चौन्यांशींचा शिलालेख कोरण्यांत आला. हा शिलालेख कोरण्याचे काम शके ११९५ पासून शके ११९९ पर्यंत चालले होते. त्यांत विठ्ठलाच्या देवळाचा जीर्णोद्धार करण्याच्या कामांत ज्यांनी ज्यांनी मदत ________________

संतवचनामृत. केली त्या सर्वांचा उल्लेख आहे. हे लोक कर्नाटक, तेलंगण, कोंकण, देश वगेरे सर्व भागांतून आलेले दिसतात. त्यांतच प्रसिद्ध मुत्सद्दी हेमाडपंत, व महाराष्ट्राधिपति रामदेवराव जाधव, यांनी शके ११९८ मध्ये देवळास भेट देऊन जीर्णोद्धाराचे कामी बरीच मदत केली असे लिहिले आहे. रामदेवरावास तर "पांडरीफडमुख्य" असे म्हटले आहे. यावरून रामदेवरावाची विठ्ठलावर अतिशय भक्ति होती असे दिसून येते. असो. अशा रीतीने ज्या विठ्ठलाचे महत्त्व पंढरी येथे वाढत चालले होते त्याच्याच सांप्रदायांत ज्ञानेश्वरांप्रमाणेच नामदेवही निर्माण झाले, व विठ्ठलभक्तीचा प्रसार दीर्घकाल करण्याचे श्रेय ज्ञानदेवांस जरी लाधले नाही, तथापि त्यांच्यानंतर पन्नास वर्षे राहून नामदेवांनी विठ्ठलभक्तीचा वृक्ष फारच विस्तीर्ण केला, हे त्यांचे भाग्य होय. नामदेवरायांसारखा भक्त निर्माण झाला नसता, तर आजचे विठ्ठलभक्तीचे विस्तीर्ण स्वरूपही लोकांच्या नजरेस पडले नसते. नामदेवराय हे विठ्ठलभक्तीचा पाया होत असे म्हणण्यास काही हरकत नाही. १३. नामदेवाचा जन्म शके ११९२ मध्ये झाला असे त्यांच्याच एका अभंगावरून कळते (क्र. १). त्यांचा बाप दामाशेटी हा नरसीब्रह्मणी येथील राहणास शिंपी होता. नामदेव आपल्या लहान वयामध्ये फार हूड होता, व त्याचे आचरणही बरेच दुष्ट असावे असे दिसते. तो चोरांच्या संगतीस लागून त्यानें पुष्कळ वाटसरूंस लुबाडलें, व कित्येकांस ठारही मारले. " ब्राह्मण कापडी गरीब साबडी । केली प्राणघडी बहुतांची ।। चौन्यांशी राऊत नाम्याने मारिले । चहुंकड साले भयाभीत ॥" हा अभंग नामदेवांचाच आहे असे मानले तर वाल्मिक ऋषीप्रमाणेच नामदेव हाही एकवार वाटवधाच होता असे म्हणण्यास हरकत नाही. तो आंवढ्यास एकदां देवाच्या दर्शनास गेला असतां तेथें आलेल्या एका बाईने आपल्या मुलास उद्देशून उच्चारलेले करुणोद्वार ऐकून, व तिचा भ्रतार आपण चौऱ्यांशी स्वारांत मारला असे समजून, नामदेवास में दुःख झाले त्याच्या योगाने अत्यंत विव्हल होऊन त्याने आपल्या मानेवर सुरी मारली, व रक्ताची धार देवावर जाऊन धरिली. याच गोष्टीमुळे त्याचे लक्ष एकदां देवाकडे जे लागलें तें लागले. तो पंढरपुरास येऊन विठ्ठलाची भक्ति करूं लागला. एकदा ज्ञानेश्वरादिक संतांच्या भेटीत गोऱ्या कुंभाराने आपले थापटणे त्याच्या डोक्यावर मारुन तें मडकें कच्चे आहे. असें ठरविलें. (क्र.५), ही गोष्ट आळंदी येथे घडली असें दिसते. त्यामुळे नामदेवाचा मोठा मानभंग होऊन तो जो इंद्रायणीच्या पार ________________

प्रस्तावनाः निघाला (क्र. ७.) तो प्रथम पंढरपूर, व नंतर नेथन बार्शीकडे विसोबावाच्या "दर्शनास गेला. तेथें विसोबास त्याने लिंगावर पाय ठेवून निजलेला. असतांना पाहिले. विसोबाने देवाच्या सर्वव्यापित्वाबद्दल नामदेवास उपदेश केला ( क...), व पाषाणाच्या देवानं भवव्याधि हरणार नाही असे सांगून (क्र. ९), नामदेवाच्या डोळ्याचा डोळा उघडला (क्र. १०). नामदेवास विसोबापासून जी परमार्थप्राप्ति झाली तिचा विकास ज्ञानेश्वरांच्या संगतीत झाला. नामदेवांचें व ज्ञानेश्वरांचे परस्पर अत्यंत प्रेम होते. एका प्रकारे ज्ञानदेव हे नामदेवांचे आजेगुरु होत. नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांस सोपानदेवांचा उपदेश झाला होता, व सोपानांस ज्ञानेश्वरांप्रमाणेच निवृत्तिनाथांपासून परमार्थप्राप्ति झाली होती... ज्ञानेश्वर हे ज्ञानाची मूर्ति, व नामदेव हे भक्तीची मूर्ति असल्याने त्यांच्या संयोगामुळे ज्ञान व भक्ति या दोहींसही महत्त्व चढले. ज्ञानेश्वरबारोबर नामदेव हिंदुस्थानची तीर्थे पाहण्यास गेले. त्या प्रसंगाचे अभंग त्यांनी आपल्या “ तीर्थावळी " या प्रकरणांत केले आहेत. ज्ञानेश्वरांची समाधि शके १२१८ मध्ये झाली त्या वेळी नामदेव तेथे हजर होते, • पंढरपुरास अगर पंढरपुराजवळ नाना यातीमध्ये जे महान् भगवद्भक्त होऊन गेले - त्यांचे आद्य आचार्य नामदेव हेच होत. आपणांसारखे मोठमोठे संत निर्माण करून, व त्यांच्या संगतीमध्ये अर्धशतक भक्तीचा उपभोग घेऊन, नामदेव शके १२७२ मध्ये समाधिस्थ झाले. हल्ली पंढरपुरास विठ्ठलाचे महाद्वाराजवळ जी - पायरी आहे तीच नामदेवांच्या समाधीची जागा आहे असे सांगतात. एका बाजस नामदेव व दुसऱ्या बाजूस चोखामेळा या उभयतांच्या समाधि महाद्वाराच्या वाटेवर असल्याने त्या द्वारास फार महत्त्व आले आहे हे सांगण्याचे कारण नाही. नामदेवांनी आपल्या घरांत ज्या केशिराजाची स्थापना केली, व त्यापुढे भजन केले, ती मूर्ति व तें घर अद्याप दाखविण्यांत येतें, नामदेवांसारखा भक्त झाला नसता तर पंढरीचें माहात्म्यही वाढले नसते. या भगवद्भक्त नामदेवांनी कीर्तनाचा सांप्रदाय घालून दिला, व प्रथम अभंगांची रचना केली. यांच्या अभंगांतच विष्णुदास नामा या नांवाचा जो एक ग्रंथकार शेंदोनशे वर्षांनी नामदेवानंतर होऊन गेला त्याचे अभंग मिसळलेले आहेत. तथापि प्रतिभा, भाषेचे सौंदर्य, जुनी भाषा, निकट भक्ति, वगैरे गुणांनी नामदेवांचे अभंग निवडतां येण्याजोगे आहेत. नामदेबांच्या अभंगांची खरी गाथा जगापुढे मांडणे हे एक मोठेच काम आहे, व तें काम - कोणी होतकरू व आस्थेवाईक महाराष्ट्रभाषाभक्तानें केले पाहिजे. नामदेवांनी ________________

संतवचनामृत. आपल्या हयातीतं इतकी प्रसिद्धी मिळविली की त्यांचे ऐशी अभंग शीख लोकांच्या ग्रंथसाहेबांत घेतले गेले; तसेंच गुजराथी भगवद्भक्त नरसी मेहता याने आपल्या संवत् १४७० मध्ये लिहिलेल्या " हरमाळा" या नावाच्या ग्रंथांतही नामदेवांचा उल्लेख केला आहे असें पंडित पांडुरंगशर्मा यांनी दाखविलेंच आहे. नामदेवांच्या अभंगांची भाषा जरी सोपी आहे, तरी तिच्यांत रा. भावे यांनी दाखविल्याप्रमाणे " वेळायितु, अनारिसा, केउता, दारवंटा, साउमा, नाथिलें, पडिपाडी, वारेमु” वगैरे ज्ञानेश्वरकालीन जुने शब्द आले आहेत हे ध्यानात ठेविले पाहिजे; याच कारणामुळे ज्ञानदेव व नामदेव हे समकालीन होते, असेही म्हणण्यास हरकत नाही. . १४. नामदेवांचे समकालीन इतर जे संत होते व ज्यांचे अभंग थोडेबहुत या पुस्तकांत घेतले आहेत त्यांचाही येथे अल्पमात्र उल्लेख केला पाहिजे. ज्याने नामदेवांच्या डोक्यावर थापटणे मारून त्यांची परीक्षा केली तो गोरा कुंभार शके ११८९ मध्ये जन्मला. तो तत्कालीन संतांत सर्वात वडील असल्याने त्यास सर्व लोक "काका" म्हणत असत. तो तेरढोकी येथे रहात असे. कीर्तनाच्य भरांत त्याने एकदा आपले मूलही पायाखाली तुडविले होते. ज्ञानदेव, नामदेव यांच्या तीर्थयात्रेच्या वेळी हा हजर होता. विसोबा खेचर हा जातीचा ब्राम्हण खरा, पण त्याचा खिस्तीचा व्यापार असे. यास परमार्थाविषयी प्रथम अश्रद्धा असल्याने ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांनी यास उपहासाने " खेचर " अशी संज्ञा दिली होती. यांचे गुरु सोपानदेव असावेत असे वाटते. हा आंवढ्या व बार्शी यांच्या दरम्यान असे. शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून देवाच्या सर्वव्यापकत्वाबद्दल याने नामदेवांची खात्री करून दिली. हाही ज्ञानदेव नामदेव यांच्या तीर्थयात्रेत होता. याने बाशी येथे श्रावण शुद्ध एकादशी शके १२३१ मध्ये देह ठविला. या संतांशी समकालीन सांवता माळी हा पंढरपूरनजीक अरणगांव येथे रहात असे. अरणगांव हें मोडनिंब स्टेशनपासून तीन मैलांवर आहे. सांवता माळ्याची बाग व विहीर अद्यापही तेथे दाखविली जातात. हाही ज्ञानदेव नामदेव यांच्या तीर्थयात्रेत होता.. याने शके १२१७ मध्ये आश्विनवद्य १४ स समाधि घेतली. त्याची समाधि फार चांगली बांधली असून तिच्यापुढेच त्याच्या एका ब्राम्हण भक्ताची समाधि आहे. याचे काही या पुस्तकांत न छापलेले असे अभंग श्रीमंत बाळासाहेब मिरजकर यांजकडे आहेत. त्यांचा द्वितीयावृत्तीत उल्लेख केला जाईल. सध्या येथें सांवता-- माळ्याच्या या इतर अभंगांपैकी एकच उद्धृत करितों: ________________

O . . . प्रस्तावना .. कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी .... ... . लसुण मिरच्या कोथिंबिरी । अवघा माझा झाला हरी ॥ . . मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥..... ... सांवत्याने केला मळा 1 विठ्ठल पायीं गोविला गळा ॥ " या अभंगावरून सांवत्या माळ्यांस अद्वैतसाक्षात्कार होऊन सर्वच हरिमय कसे भासत होते हे उत्कृष्ट रीतीने दिसून येते. नरहरि सोनार हा महाकट्टा शिवभक्त प्रथम देवगिरी येथे राहणाराः तेथून तो पंढरपुरास · रहावयास आला. त्याचे · गुरु गैबीनाथ (पा. भे.-गनीनाथ) असावेत असे दिसते. पांडुरंग हें प्रथम शिवाचे नांव असून ते जसे नंतर विठ्ठलास देण्यात आले, त्याप्रमाणेच नरहरी सोनार हा प्रथम शिवभक्त असून नंतर तो विठ्ठलभक्त बनला. "सोनार • नरहरि न देखे दूत । अवघा मर्तिमंत एकरूप" अशी त्याची स्थिति झाली. हा माघ रुष्ण शके १२३५ मध्ये समाधिस्थ झाला. मंगळवेढे येथे राहणारा चोखा हा खरोखरच वर्तनाने चोख होता; व त्यास शोभेशी त्याची बहीणही निर्मळा होती. हाही. ज्ञानदेवनामदेवांच्या तीर्थयात्रेत होता. मंगळवेढ्यास गांवकुस् बांधीत असतां त्याच्या अंगावर भिंत ढांसळून पडली, व तो तेथे समाधिस्थ झाला. ही गोष्ट वेशाख वद्य ५ शके १२६० मध्ये घडली. त्याच्या रोमरोमांत विठ्ठलनाम भरले होते, अशी त्याची विठ्ठलावर एकनिष्ठ भक्ति होती.. नामदेवाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या अस्थि मंगळवेढ्याहून पंढरपुरास आणिल्या, व त्या महाद्वारासमोर पुरल्या. ज्या जागी मंगळवेढ्यास चोखामेळ्याच्या अंगावर कुसू पडले ती जागा अद्याप तेथे बाजारांत दाखवितात. जनाबाई ही दामाशेट याच्या घरची दासी. ती नामदेवांच्या कुटुंबांतील नसली, तरी ती नामदेवांची एकनिष्ठ भक्त होती. महाराष्ट्रकवयित्रीमध्ये तिचे स्थान उच्च दर्जाचे आहे. एकदां महा- पुरांतून नामदेवांनी पंढरपूर गांव कसे वांचविले हे तिने आपल्या एका अभंगांत सांगितले आहे. सेना हा बेदरच्यां बादशहाचा न्हावी. देवभक्तीमुळे हा पिसा झाला होता, व लोकांसही तो पिसें लावी. आरशांतल्याप्रमाणे आपलें रूप दाखविण्याचा त्याचा धंदा होता. हा शके १३७० मध्ये हयात होता असे दिसते. श्रावण चद्य १२ दिवशी सेना समाप्त झाला, अशाबद्दलचे त्याचे दोन अभंग आहेत (क्र. १२, १३). कान्होपात्रा ही मंगळवेढे येथील श्यामा या नांवाच्या एका ________________

संतवचनामृत. दासीची मुलगी. ती कार सुस्वरूप असल्याने आपल्या योग्यतेनुरूप ज्याचे रूप असेल त्यास तिने वरण्याचा निश्चय केला होता. विठ्ठलाखेरीज तिची प्रीति दुसन्या कोणावर जाईना. बेदरच्या बादशहाने आपल्या राजगृहांत तिला सक्तीने बोलाविले असता त्याजकडे जाण्यापेक्षां मृत्यु बरा, असे वाटून तिने पंढरपुरास विठ्ठलासमोरच देह ठेविला. ही गोष्ट शके १३९० मध्ये घडली असे दिसते. ज्या ठिकाणी देवळांत हिला पुरले आहे त्या ठिकाणी एक चमत्कारिक झाड उगवले आहे, ते अद्यापही पाहण्यास सांपडते. या संतांखेरीज इतरही आणखी काही संत होऊन गेले; पण त्यांचे अभंग फारसे उपलब्ध नसल्याने त्यांचा तेथे उल्लेख करता आला नाही याबद्दल खेद वाटतो. एकंदरीत विठ्ठलभक्ति ही सर्व जातींच्या व सर्व वर्णांच्या लोकांस एकत्र कशी करित्ये हे या संतांच्या चरित्रांवरुन उत्तम रीतीने कळून येण्याजोगे आहे. ईश्वरभक्तीत कुळजातिवर्णाचे निष्कारणत्व कसे आहे. याचे प्रतिपादन ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत ( ६. ४१-४६०) फार उत्तम रीतीने केले आहे ते जिज्ञासूंनी पहावें. १५. आता आपण नामदेवाच्या अभंगचर्चेकडे वळू. सर्व भक्तांमध्ये नामदेव व तुकाराम हे अत्यंत आतुर भक्त होते असे म्हणण्यास हरकत नाही. पुढे दोन तीनशे वर्षांनी जसा तुकारामांनी देवाच्या प्राप्त्यर्थ टाहो फोडला, त्याप्रमाणेच यावेळीही नामदेवांनी मोठ्या करुणामय वाणीने देवाची प्रार्थना केली आहे. भ्रमर जसा सुवासावर लुब्ध व्हावा, अगर माशी जशी मधावर लुब्ध व्हावी, तसा मी देवावर लुब्ध झाली आहे, असे नामदेव म्हणतात (क्र. ११). मजसारख्या पतिताचा उद्धार केल्याखेरीज तुला पतितपावन हे नांव शोभावयाचे नाही ( क्र. १३ ). या प्रपंचाशी झोंबी खेळवून आपल्यापासून तूं माझें चित्त परावृत्त केल्याने तूं मजकडून आपला द्रोह मात्र कवितोस (क्र. १६). तूं माझी पक्षिणी असून मी तुझें अंडज आहे; तूं माझी कुरंगिणी असून मी तुझें पाडस आहे ( क. २०), पक्षिणी प्रभाती चरावयास गेली असतां तिचे पिलूं जशी तिची वाट पाहते तशी मी तुझी वाट पाहात आहे (क्र. २२), अग्नीमध्ये बाळक पडलें असतां माता ज्याप्रमाणे कळवळ्याने धावते, त्याप्रमाणे या तापत्रयानीत मी पडलों असल्याने तूं माझ्याकडे धांव (क्र. २३), मृत्यूच्या वेळी माझी स्थिति काय होईल याचा विचार केला असता माझ्या अंतःकरणांत भडभडून येते. जिने मला नऊ मास- पोटांत वाहिले ती आई मला टाकून जाईल; कन्यापुत्रादि बाळे अंती.. ________________

प्रस्तावना... दूर राहतील; देहगृहाची कामिनी तर भवनांतच साहील; मी मात्रः अमीबरोबर जळून जाईन (क्र. २४). या कारणामुळे डोळ्यांत आसवें येऊन. बाहु उभारून हा नामदेव तुझी वाट पाहात आहे. ( क...); त्याची लाजही नाहीशी होऊन कंठांत प्राण धरून तो तुझें ध्यान करीत आहे ( क्र. ३१). शोकमोहाच्या ज्वाळा चढूंकडे झळंबीत असल्याने, व चिंतेचा : वणवा चोहीकडे पेटला असल्याने, करुणाघना, तूं अंबरांत केव्हां वोळशील असे होऊन गेलें आहे (क्र. ३२)वांसरूं जसे आपल्या खंट्याभोवती फिरते तसा मी आपल्याच भोवती फिरुन खोट्याच भावांत गंतन गेलो आहे ( क..3). माझे गुणदोष मनास मुळीच आणूं नकोस, मी अपराधांची राशिच आहे; अंगुष्ठापासून मस्तकापर्यंत मी पातकें आचरीत आलो आहे; स्वप्नांतही तुझी भाक्त मला घडली नाही, तझ्यावांचून मला तारणारा दुसरा कोणी राहिला नाही (क्र. ३५). हैं हृदयच बंदिखाना करून तुला कोंडून ठेविल्याखेरीज तूं हाती सांपडावयाचा नाहीस; ज्या वेळेस तुला सोहं शब्दानें मार करावा त्यावेळेसच तूं काकुळतीस येशील (क्र. ३७). भक्तांचे कांहीतरी घेतल्याखेरीज देव त्यांस कांहीं देतच नाही असा देव सकाम आहे; सुदाम्याचे तीन मुठी पोहे घेतले तेव्हांच त्याने त्यास राज्य दिले; द्रौपदीचें भाजीपान घेण्याइतकेही मन हळुवार करून, नंतर त्याने तिला अन्न पुरविले (क्र. ३८). अशा रुपणाचे दारांत जाऊन काय मागावयाचे आहे ( क्र. ४०)! मढ्यापाशी हात जोडून बोलावें, तशी देवापाशी माझी स्थिति झाली आहे (क. 5९). भक्तभागवतांनी देवास थोरीव आणली, त्याचा उपकारच देव विसरला ( क्र. ११). ध्रुवास अढळपद देऊन तूं ठकविलेंस, उपमन्याची दुधाचा छंद पुरवून तूं फसगत केलीस; मी त्याप्रमाणे अज्ञान नाहीं (क्र. १२). मदमत्सरादि श्वापदें खा खा करीत मजजवळ आली असतां, व कंठास. विषयव्याळाने मिठी दिल्याने मी विषाने झळंबलों असतां, शेवटची लहरी येण्याच्या अगोदरच तूं आलास तर कांहीं आशा आहे (क्र. १५). या व इतर प्रकाराने पुढे ज्याप्रमाणे तुकारामांनी देवाशी भांडण केलें, त्याप्रमाणे नामदेवांनीही केलें. नामदेवांनी आपला सर्व जीवभाव देवापाशी समर्पिल्यावर देवाने त्यांस नामप्रेम दिले व त्या प्रेमामृतामुळे. नामदेव. तृष्ट झाले . ( क..3४). हे प्रेम त्यांच्या सर्वांगांत भरून ओसंडावयास लागल्याने ज्या शब्दांनी विठ्ठल डोलेल असे ________________

संतवचनामृत. शब्द ते आतां बोलूं लागले, व खेचरदात्याच्या कृपेमुळे आपल्या हाती सर्व सत्ता आली म्हणून त्यांस आनंद झाला (क्र. ४७).. १६ आतां आपण नामदेवांची शिकवण कशी होती याचा थोडक्यात विचार करूं.. नामस्मरणाचे महत्त्व नामदेवांनी जितकें गायिलें आहे तितकें इतर संतांनी क्वचितच गायिलें असेल. माझ्या मुखांत तुझ्या नामाचे खंडण झाल्यास माझी रसना शतधा विदीर्ण होवो; तुझें रूप माझ्या दृष्टीस न पडल्यास माझे डोळे उन्मळून निघोत, असें नामदेवांनी देवाजवळ मागितले आहे (क्र. ४९). अनुभवाने, भावाने; अगर कपटाने कसेंही नाम वाचेस आले असतां चालेल (क. ५१); कारण अठरा पुराणांच्या पोटांत नामावांचून दुसरी गोष्टच सांगितली नाही (क. ५५.).. शेतास थोडे धान्य नेऊन ज्याप्रमाणे गाडाभर परत आणितात, त्याप्रमाणे केवळ नामस्मरणाने देवाच्या प्राप्तीइतका मोठा लाभ होतो (क्र. ५८). नामस्मरणापुढे अग्नीचे सामर्थ्य चालत नाही (क्र. ५९ ). नामस्मरणानं जिभेवरचे असत्याचे मळ धुवून जातात ( क्र. ६१), व सर्व सत्ता प्राप्त होते (क्र. ६१). देव लपला तरी आपलें नाम तो कोठेही नेत नसल्याने नामस्मरण केले असतां देवास. अवश्य यावेच लागते (क्र. ६६). देह गेला तरी बेहत्तर, पण नामाचे वर्म सोडूं नये (क्र. ६७). प्रेमयुक्त नामस्मरण करणे ही कांही लहान गोष्ट नाही. चंद्रसूर्याची चित्रे काढली तरी त्यांत प्रकाश भरतां येत नाहीं (क्र. ७५) हातांत विणा व मुखांत हरीचें नाम धरून अन्नउदक सोडून देवाचें ध्यान लागले असतां दवाचे दर्शन होईल (क्र. ७७), व काळ देहास खावयास आला असतां असा भक्त आनंदाने गाईल व नाचेल (क्र. ८०)... १७. नामस्मरणाप्रमाणेच इतर गोष्टींबद्दलही. नामदेवाचा उपदेश फार विचारणीय आहे. इंद्रिये सर्वांगसाजिरी असेपर्यंतच हरिकथेस आपण सादर व्हावे (क्र. ८१ ). संसार करीत असतां देवाची प्राप्ति झाली असती तर सनकादिक संसार सोडून बाहेर जाते ना ( क्र. ८३ ). वावडी दूरच्या दूर उडत असतां तिजकडे वावडी उडविणारा जसे लक्ष ठेवितो, त्याप्रमाणे सर्वेश्वरावर लक्ष ठेवून कोणताही व्यापार करण्यास हरकत नाही ( क्र. ८५). दगडाचा देव व मायेचा भक्त यांचा संदेह फिटणे शक्य नाही, अशा प्रकारचे देव तुरुकांनी फोडले तरी ते ओरडत रडत नाहीत; अशी लोखंडमय दैवते मला दाखवू नकोस. असें नामदेव देवास म्हणतात (क्र. ९४.). सजीव तुळस सोडून निर्जीव दगडाची पूजा का ________________

प्रस्तावना. करावी ( क. (५) भक्तांचे नानाविध प्रकार आहेत; एकादशी करणाऱ्या मांजराची भक्ति, ध्यानास बसलेल्या लांडग्याची भक्ति, स्वयंपाक पाहिलेल्या श्वानाची भक्तिं, पतिव्रता बनलेल्या वेश्येची भक्ति, या सर्व भक्त सोडून एका लक्ष्मपितीस शरण जाण्याचीच भक्ति करावी (क्र. ९८ ). . .. १८. संताचे मुख्य लक्षण म्हटले म्हणजे जो मानापमानरहित झाला त्यासच संत म्हणण्यास हरकत नाहीं (क्र. १०९). चित्तांतून वासना खणून काढून नामावर सर्वभावाने विश्वास टाकणे हाच वैष्णवांच्या कुळींचा कुळधर्म होय (क. ११० ). निंदास्तुति समान लेखणे हीच समाधि ( क. १११). असे संत बोधसाबण लावून मनुष्यांची अंतःकरणे ज्ञानगंगेंत निर्मळ धुतात ( क्र. ११५); व एकमेकांस सावधान करून नामाचें अनुसंधान तुटू देत नाहीत (क. ११८ ). अशा संतांचे पायांवर विश्वास टाकिल्यास देवास आपोआप भेटावेच लागते (क्र. १२१); कारण जो प्रत्यक्ष राम दाखवील तोच संत, इतर संत घेऊन काय करावयाचे (क्र. १२५) ! नामस्मरण जरी स्वतःसिद्ध असले तरी गुरूवांचून वर्म हाती येत नाही (क्र. १२.७ ). रविरश्मी धरून स्वर्गास जाता येईल, पण संतसंगतीचा पार कळणार नाही (क्र. १२८ ). कोकिळ जसा वसंतऋतूखेरीज दुसऱ्यापुढे गात नाहीं, अगर मोर जसा मेघावांचन दुस-यापुढे नाचत नाही, त्याप्रमाणे संत हे देवावांचन दुसऱ्यापुढे काकुळतीस येत नाहीत (क्र. १३०). अशा संतांनी अव्हेरिल्यामुळे मुक्तिपद दीनरूपाने वाळवंटांत हिंडते, व कोणाचाच आसरा त्यास सांपडत नाही म्हणून ते योग्यांच्या घरांत शिरतें ( क. १३१). संतांमध्ये नाना प्रकारचे खेळिये होऊन गेले आहेत. एक खेळास भ्यालेले बारा वांचे नागवेंच पळून गेलेले बाम्हणाचं पोर; एक कपाट फोडून गेलेले सहा तोंडांचे शंभूचे बाळ; एक कामव्यसनांत न सांपडलेला शहाणा हनुम्या; एक बहुतच खेळ खेळलेला यादवांचा पोर गोप्या; असे नाना प्रकारचे खेळिये या जगांत होऊन गेले आहेत, व त्यांनी आपल्या क्रीडा निरनिराळ्या रीतीने करून दाखविल्या आहेत ( क्र. १३१). १९. देवास जाणण्याची कळा ही एक निसर्गदत्त देणगी आहे असें नामदेवांचे म्हणणे आहे. मोगऱ्याचे फूल उपजल्याबरोबरच त्यास मुवास कसा उत्पन्न होतो! वनांत व्यालेल्या धेनूचें वत्स तिच्या स्तनास कोण लावितो ? त्याप्रमाणेच, सहज ________________

२४.. संतवचनामृत. लक्षण ज्याच्या अंगांत असेल त्यासच देवाची प्राप्ति होईल ( क्र. १३५). एक वेळ देवास पाहिल्यावर मग भलत्या गावांस गेले असतांही हरकत नाहीं; कारण मग देव नेहमी जवळ असतोच ( क्र. १३७). अमृतलिंग केशव हा सदैव नामदेवांच्या चित्तांत असल्याने त्यांस अखंडित तृप्ति प्राप्त झाली. डावीउजवीकडे, आणि मागेपुढे, देवाचे चरण जोडावे अशी नामदेवांनी इच्छा प्रदार्शत केल्याबरोबर (क्र. १४०), नामदेवांनी पहावे तिकडे चारी दिशांस दिशामित भरलेला हरि त्यांस दिसू लागला (क्र. १४१). हे देवाचे स्वरूप आंधळ्यांसही दिसू शकते, व बहिन्यांसही त्याचा श्रवणानुभव येतो असें नामदेव म्हणतात ( क्र. १४२ ). देवाचे नामस्मरण केल्यावर देव जर पूजेचा संभार घेऊन सामोरा येणार नाही तर माझें मस्तक छेदा असें नामदेवांनी म्हटले आहे (क्र.१४४). बसून नाम आळविले असता देव पुढे उभा राहतो, व प्रेमाच्या भराने उभे राहून गर्जना केली असतां देव भक्तांपुढे नाचतो (क. १४५). गरुडाच्या संचाराने दाही दिशा भरून जाऊन कोटिसूर्यप्रभामय जगज्जीवनाचे भक्तांस दर्शन होतें असें नामदेव म्हणतात (क्र. १४७ ). आपण आपल्यास पाहण्यास चंद्रसूर्याचे कारण नाहीं; महाप्रळयांत सप्तसागर एकवटाचे तसा देव सर्व विश्व व्यापून राहतो ( क्र.१४८ ). उन्मन्यवस्थेत पाहिले असतां धिधिम् तुरे वाजून अनाहतध्वनीच्या गर्जनेमध्ये, चंद्रसापलीकडच्याही तेजांत ( क्र.१४९), केशव तेचि नामा व नामा तोच केशव असा अनुभव नामदेवांस प्राप्त झाला असे ते सांगतात (क्र. १५० ). .२०. नामदेवांचे समकालीन जे संत होते त्यांच्या अभंगांचा थोडक्यांत येथे विचार करणे जरूरीच आहे. नामदेवांची परीक्षा करणारा गोरा कुंभार याने नामदेवास अनुभवप्राप्ति झाल्यावर आपल्यामध्ये व त्याच्यामध्ये भेद उरला नाही असें सांगितले ( क्र. १.). पाहता पाहतां आपली खेचरी मुद्रा लागून जाते (क्र. २ ); व जयजय झनकून झांगट वाजते असे ते म्हणतात (क्र. 3). आपण जीवन्मुक्त होऊन कोणासच आपली स्थिति कळू देऊ नये, असेंहि ते सांगतात (क्र. ८). नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांनी नामदेवास तूं देव पाहिला असें म्हणशील, तर ते बोलणे खोटें आहे असे सांगितलें; जोपर्यंत आपला अहंकार गेला नाही, तोपर्यंत आत्माराम भेटणे शक्य नाही (क्र. १). अच्युत हरे, केशव हरे, ही नामें उच्चारिली असतां पर्वतप्राय पापराशि दग्ध होतील (क्र. 3); असें म्हणून नामदेवाच्या श्रवणांत मात सांगून त्याच्या मस्तकावर विसोबांनी हात ठेविला, व त्यांस पदपिंडविवर्जित ________________

- - प्रस्तावना केले ( क...). सांवतामाळी यांस आपल्या हीनयातीबद्दल थोडीशी जास्त जाणीव होती असे दिसते (क्र. 3). एकापरीने ही हीनयाती आली, व त्यामुळे माझी महंती वाढली नाही, हे बरेच झाले असें ते सांगतात (क्र. २ ).. आपण नेहमी देव ठेवील त्या स्थितीत आनंदाने रहावे; कधी हत्तीवर बसावें, तर कधी पायाने चालत जावे; कधी घरांत धान्य नाही, तर कधी द्रव्य कोठे ठेऊ व कोठे न ठेऊ असे होऊन जावे; कधी स्मशानांत जाऊन एकटे रहावे, तर कधी सद्गुरूची कृपा होऊन सांवत्याच्या बापाचे दर्शन घ्यावे, असे ते म्हणतात (क्र.). नरहरि सोनारानें “गैबीनाथ" असे आपल्या गुरूचें नांव सांगितले आहे (क्र. २ ). जसा एकादा चितारी भिंतीवर चित्रे काढितो व लगेच ती पुसून टाकितो, जशी पोरें एकादा खेळ खेळतात व शेवटी तो मोडून टाकितात, त्याप्रमाणेच है जग आहे असें नरहरि सोनार सांगतो ( क्र. १ ). अनाहत ध्वनीने माझें मन मोहून गेलें आहे असेंही तो सांगतो ( क्र. ). शेवटी, आपण सोना-. राचा धंदा परमार्थात सुद्धा कसा चालविला याचें तो उत्तमरीतीने. वर्णन करितो. देह हीच कोणी एक शेगडी, व अंतरात्मा हेच कोणी एक सोनें होय. त्रिगुणाची मूस करून मी त्यांत ब्रह्मरस ओतिला; जीवशिवांची फुकी करून रात्रंदिवस ठोकाठोकी केली; विवेकहातोडा हाती घेऊन कामक्रोध पूर्ण केले; मन. बुद्दीची कात्री घेऊन त्याने रामनाम सोने चोरिलें, व ज्ञानताजव्यांत घालून त्या दोन्ही अक्षरांचे वजन केले, तर ते अमूल्य भरलें असें नरहरि सोनार सांगतो. ( क्र. ५). एकदां चोखामेळ्यास विठोबाचा हार प्राप्त झाला असता त्यास बडव्यांनी मारिले, तेव्हां मी तुझ्या दारीचा कुतरा आहे मला मोकलू नको, असे त्याने देवास विनविलें (क्र. २). बाहेरची पंढरी व विठ्ठल पाहणे हे फारसे मोठे काम नव्हे; माझा देह हीच कोणी पंढरी असून अविनाश आत्मा हाच विठ्ठलरूपाने त्यांत दिसत आहे; त्याचे दर्शन झाल्याने मी त्याचे पायीं जडून गेलो असें चोखामेळा सांगतो (क्र. :). ऊस वांकडा असला तरी त्याचा रस जसा वांकडा होत नाही, . अगर कमान वांकडी असली तरी बाण जसा वांकडा होत नाही, त्याप्रमाणे चोखा वांकडा असला तरी त्याचा भाव वांकडा नाही हे लोकांनी ध्यानात ठेवावे (क्र.). पुत्र होणार असेल तर तो संत झाल्यासच त्याचा उपयोग; कन्या होणार असेल तर ती मिरामुक्ताबाईप्रमाणेच व्हावी, असे न झाल्यास त्यापेक्षा निःसंतान बरें असें चोखामेळा म्हणतो. ( क्र. ५). खटनटांनी पंढरीस येऊन शुद्ध होऊन जाकें ________________

२६. संतवचनामृत. ‘अशी चोखामेळा सदेव दवंडी पिार्टतो असे त्याने म्हटले आहे (क्र. ६) जना"बाईचे अभंग फार प्रेमळ आहेत, व त्यांत एक प्रकारचे तेज आहे. पतंग सुखाऊन दीपावर उडी घालील तर तो अधोगतीस मात्र जाइल, असें जनाबाई म्हणतात (क्र. १ ). शूरांचे शस्त्र, अगर हत्तीच्या गंडस्थळावरचे मोती, सिंहाचे नख, अगर पतिव्रतेचे स्तन ही जशी प्राण गेल्यासही हाती लागणार नाहीत, त्याप्रमाणे अहंकारत्याग झाल्यावांचन देव मिळणार नाही असे जनाबाई म्हणतात ( क्र. ४). आपण कायावाचामन सद्गुरूस देऊन त्यापासून वस्तु मागन घ्यावी; जो आत्मा प्रगट दाखवील तोच सद्गुरु होय असें जनाबाई म्हणतात ( क. ५). भक्ति ही : इंगळाच्या खाईप्रमाणे,विषाच्या ग्रासाप्रमाणे, अगर खड्गाच्या धारप्रमाणे तीक्ष्ण आहे असें जनाबाईचे म्हणणे आहे (क्र.६). हृदय बंदिखाना करून ज्यावेळी विठ्ठलास मी आंत कोंडिलें, व सोहं शब्दाचा मारा केला, त्यावेळी विठ्ठल काकुळतीस आला असें नामदेवांप्रमाणेच जनाबाईनी म्हटले आहे ( क. ११). नव-यामुलाबरोबर वहाड्यांसही ज्याप्रमाणे पुरणपोळीचे जेवण मिळते, त्याप्रमाणे नामदेवाबरोबर मलाही देवाची प्राप्ति झाली असें जनाबाई सांगतात (क्र. १२). रक्त, श्वेत, श्याम, नीळ वर्णांच्यावर भ्रमरगुंफेत मी देवाचे दर्शन घेतलें. असें त्या सांगतात (क्र. १५). वामसव्य, खालीवर, सर्वत्र देवाचे मला दर्शन झाले ( क. १६ ). स्वरूपाचा पूर डोळ्यावर आल्याने डोळ्यांस एकदम झापड पडली ( क्र. १७). माझा कान डोळा झाला, व बायको निबर असतांनाही भ्रतार तान्हा बनला असे नवल वर्तन गेलें (क्र. २० ). सहजगत्याच जरी मी द्वाराकडे पाहिले तरी तेथे विठ्ठल उभा आहे असे मला दिसू लागले (क्र. २२. ). आता मी देव खाते, देव पिते, देवावर मी शयन करिते, असें जनाबाई म्हणतात. ( क्र. २३) सूर्य आणि रश्मि ही जशी दोन नाहीत, त्याप्रमाणे देव आणि भक्त यांमध्ये भेद नाही, असे जनाबाईंचे म्हणणे आहे (क.२८). सेना न्हावी याने देवाच्या प्राप्त्यर्थ गिरिकाननास जाण्याचे कारण नाहीं असें सांगितले आहे. गिरिकाननास जाल तर विभांडकाप्रमाणे रंभेकडून नागवून मात्र घ्याल असे तो म्हणतो ( क्र. ४ ). सेनान्हावी याने आपण वारिक असून बारीक हजामत करितो असे सांगितले आहे. विवेकआरसा दाखवून आम्ही वैराग्याचा चिमटा हालवितों, शांतिरूप उदक डोईस चोळून अहंकाराची शेंडी पिलितों, भावार्थाच्या बगला झाडून कामक्रोधनखें काढितों, चारी वर्णास आम्हांवांचन गत्यंतरच नाही, आमच्या आधारानेच ते अजिवंत राहतात, असें सेनान्हावी याने म्हटले आहे (क्र. ११). कान्होपात्रा इला: ________________

• प्रस्तावना. ज्यावेळी बादशहाचे बोलावणे आले, त्यावेळी विषयध्यासाने इंद्राअंगीही भगें पडली, व भस्मासुर भस्म झाला, अशा अर्थाचा तिनें एक अभंग केला (क. १); व सिंहाचे खाय जर जंबूक नेईल तर त्याची लाज कोणास असा भगवंतास प्रश्न करून, तिने देवास आपलें बीद जतन कर असें बिनविलें, व आपला देह देवास अर्पण केला (क्र. ३). . एकनाथादि संत. २१. महाराष्ट्रसंतांच्या इतिहासात पहिला काल जसा ज्ञानदेवादिकांचा, क दुसरा जसा नामदेव व तत्कालीन संतांचा, तसाच तिसरा काल म्हटला म्हणजे एकनाथादि संतांचा होय. एकनाथांचे पणजे भानुदास हे पैठण येथे शके १९७० मध्ये जन्मले. हे दामाजीपंतांचे समकालीन असावेत असे दिसते. कारण दामाजीपंतांचे वेळी जो दुष्काळ पडला तो शके १७८० अगर १३९० चे सुमारास पडला असावा असे दिसते. लहानपणापासूनच भानुदासांस सूर्याची उपासना होती, व पुढे हे विठ्ठलसांप्रदायाचे एक मोठे अध्वर्यु बनले. मुसलमानांच्या स्वान्यांपासून विठ्ठलमूर्तीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने म्हणा, अगर आपली राजधानी जी विजयानगर तीस शोभा व महत्त्व आणण्याच्या उद्देशाने म्हणा, तेथील राजा कृष्णराय याने विठ्ठलाची मूर्ति पंढरपुराइन हंपी येथे नेली; व तेथें हल्ली में विजयविठ्ठलाचे देऊळ दाखविले जाते त्यांत त्या मूर्तीची स्थापना केली. पुढे पंढरीच्या भक्तांच्या आग्रहामुळे व आपल्याही विठ्ठलभक्तीच्या आतुरतेने भानुदास विजयानगरास गेले व तेथून त्यांनी आपल्या भक्तीमुळे कृष्णराय याचे मन आपल्याकडे वळवून घेऊन ती मूर्ति पुनः हंपीहून पंढरपुरास परत आणली. भानुदास यांनी शके १४३५ मध्ये देह ठेविला. एकनाथांचे गुरु जे जनार्दनस्वामी त्यांचा जन्म चाळिसगांव येथे शके १४२६ मध्ये झाला. त्यांचे लक्ष प्रथम परमार्थाकडे नव्हते. पण उपरति होऊन त्यांस नृसिंहसरस्वतींचा अनुग्रह औदुंबरनजीक अंकलकोप येथे झाला असावा असे दिसते (क्र. २). याच नृसिंहसरस्वतींनी विजापूर येथील बादशहास रोगापासून मुक्त केल्याने त्यांचे देऊळ त्या बादशहाने विजापूर येथे किल्ल्यांत आपल्या अगदी राजवाड्यानजीक बांधले, ते अद्याप तेथे पहावयास सांपडते. वाडी, औदुंबर, व गाणगापूर ही क्षेत्र या नृसिंहसरस्वतींचीच होत. जनार्दनस्वामी जरी दत्तोपासक असावे असे दिसते, तरी त्यांनी एकनाथास “ पंढरीचा सोपा मार्ग पतकर " . असेच सांगितले आहे. प्रपंच व परमार्थ यांची गुरुशिष्यांनी म्हणजे जनार्दनस्वामी . . ________________

संतवचनामृत. व एकनाथ यांनी फार उत्तम सांगड घालून दिली. जनार्दनस्वामसिं एका यवन बादशहाने देवगडचा किल्लेदार नमिले होते. हे शके १४९७ मध्ये समाधिस्थ झाले, व त्यांची समाधि देवगडावर एका गुहेत अद्यापिही दाखविली जाते. २२. या जनार्दनस्वामीचे पट्टशिष्य एकनाथ यांचा जन्म केव्हां झाला याबद्दल "दोन मते आहेत. रा. भावे व सहस्रबुद्धे यांच्या मते एकनाथांचा जन्म शके १४७० "मध्ये झाला; व रा. पांगारकर यांच्या मते शके १४५५ मध्ये झाला. एकनाथांच्या समाधीचें साल मात्र शके १५२१ हे जवळ जवळ निश्चितच आहे. एकनाथ हे भानुदासाचे पणतु होत. त्यांची मातापितरे त्यांच्या लहानपणीच निवर्तली. त्यामुळे त्यांचे आजे चक्रपाणि यांनीच त्यांचे संरक्षण केले. हे वारा वर्षांचे असतांना पैठणांत गांवाबाहेरील शिवालयांत त्यांस असा दृष्टांत झाला की “जनार्दन• पंत या नांवाचे साधु देवगडावर आहेत; तेथे जाऊन तूं त्यांचा उपदेश घे" असा दृष्टांत झाल्याने आपल्या आजाचीही अनुज्ञा न घेतां एकनाथ जनार्दनस्वामीकडे • गेले. तेथे त्यांनी आपल्या गुरूची उत्तम सेवा केली, व ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचा उत्तम अभ्यास केला. देवगडाच्या मागे एका डोंगरावर जाऊन सहा वर्षेपर्यंत त्यांनी तपश्चर्या केली. एकदा देवगडावर परचक्र आले असतां जनार्दन - स्वामी ध्यानात गुंतले आहेत असे पाहून एकनाथांनी स्वतः घोड्यावर स्वार होऊन त्या परचक्राचा पाडाव केला. सहा वर्षे गुरूजवळ अध्ययन व तपश्चर्या केल्यावर गुरूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी पैठणास येऊन विजापुरच्या गिरिजाबाई या नांवाच्या मुलीशी लग्न केलें, परमार्थ व प्रपंच मिळून चालविण्याची त्यांची हातोटी कार विलक्षण होती. आपल्या वर्तणुकीने त्यांनी सर्व जगास परमार्थी मनुष्याने प्रपंचांत कसे वागावे याबद्दल उत्कृष्ट कित्ता घालून दिला. आपल्या अंगावर थुकणाऱ्या यवनाशी शांततेने व सभ्यपणाने वागणे आपल्या पितरांच्या श्राद्धाचे वेळी महारांस जेऊ घालणे; गंगेचे पाणी घरी आणीत असतां तहानेने तळमळत असलेल्या एका गाढवास तें पाजणे; वेश्या, चोर, जार, यांचा उद्धार करणे; एका अस्पृश्य मुलाला उचलून कडेवर घेणे, ज्ञानाचा अभिमान चढलेल्या आपल्या . मुलाशी म्हणजे हरिपंडिताशी शांतरीतीने वागणे, या व इतर अशा अनेक गोष्टींनी एकनाथ हे शांतता, दया, अक्रोध, समता वगैरे गुणांचे मूर्तिमंत अवतार होते ‘असें म्हणण्यास हरकत नाही. एकदा त्यांच्या गळ्यास रोग झाला असतां "ज्ञानदेवांच्या गळ्यास लागलेल्या अजानवृक्षाची मुळी तूं काढ, म्हणजे तुझा रोग बरा ________________

प्रस्तावना होईल" असा त्यास दृष्टांत झाल्याने ते आळंदीस आले. या प्रसंगाची हकीकत च्यांनी स्वतःच पुढील अभंगांत दिली आहे: श्रीज्ञानदेवें येऊनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥ . दिव्य तेजःपुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥ . अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आळंदी काढ वेगी। ऐसें स्वप्न होतां आलों अलंकापुरी । तंव नदीमाझारी देखिले द्वार ॥ एकाजनार्दनीं पूर्वपुण्य फळलें। श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥ ५ ॥ या अभंगावरून त्यावेळी ज्ञानदेवाच्या समाधीचे द्वार नदीमध्ये होते असे दिसते. हल्ली जेथें सिद्धेश्वरापुढील नंदी दाखविला जातो तेथे त्यावेळी नदीचे पात्र असावें असे दिसते. असो. एकनाथ त्यामार्गाने जाऊन त्यांनी अजानवृक्षाची मुळी सोडविली असावी असे दिसते. ही गोष्ट शके १५०६ मध्ये घडली. याच साली एकनाथांनी भाद्रपद मासी कपिलाषष्ठीस ज्ञानेश्वरीचें संशोधन करून आधुनिक ज्ञानेश्वरी जगास दिली. काही जुन्या रूपांबद्दल नवी रूपे घालणे वगैरे किरकोळ सुधारणांखेरीज त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये फारशा सुधारणा केल्या असे त्यांच्या शब्दांवरून दिसत नाही. ज्ञानेश्वरीच्या पाठांत ओंवी घुसडून देणारा अमृताच्या ताटांत नरोटी ठेविणान्याप्रमाणेच हास्यास्पद होईल, असे त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या संशोधनपत्रिकेत म्हटले आहे. एकनाथ कीर्तन करितां करितांच पैठण येथे शके १५२१ मध्ये समाधिस्थ झाले. त्यांची भागवत एकादशस्कंधावरील टीका, भावार्थ रामायण (rr अध्याय), रुक्मिणीस्वयंवर, स्वात्मसुख, चत:लोकी भागवतावरील टीका, अभंग, वगरे पुष्कळ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या पुस्तकांत एकनाथांच्या अभंगांखेरीज दुसरीकडुन उतारे घेण्याची सवड नव्हती. शिवाय अभंगांतूनच उतारे घेण्याचे हेही एक कारण आहे की, अभंगांत एकनाथांचे अंतःकरण जितकें उघड रीतीने दृग्गोचर होते, तितके ते त्यांच्या इतर ग्रंथांत होत नाही. एकनाथांचे इतर ग्रंथ बुद्धिवादाचे आहेत, पण अभंग अनुभवप्रधान आहेत. एकंदरीत ज्ञानेश्वरांप्रमाणे बुद्धीस थरारून सोडणारी अशी ग्रंथरचना जरी एकनाथांनी केली नाहीं; तुकारामांसारखे अत्यंत हृदयस्पर्शी व कोमल असे अभंग जरी त्यांनी लिहिले नाहीत; रामदासांप्रमाणे कर्मयोगित्वाचा बाणाही त्यांनी जरी 'पत्करला नाही; तथापि प्रपंच व परमार्थ यांची विलक्षण सांगड घालून संसारांमध्ये ________________

संतवचनामृत. असतांच परमार्थ कसा करावा हे त्यांनी जसे आपल्या उदाहरणाने सर्व लोकांस शिकविलें, त्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही संतानें शिकविले नाही असे म्हटले. असतां अतिशयोक्ति होईल असे वाटत नाही. २३. आतां आपण प्रथम भानुदास व जनार्दनस्वामी यांच्या अभंगचर्चेकडे वळू. भानुदासांनी पंढरपूर ही एक निळांमाणकांची खाणीच आहे असे म्हटले आहे; जरी हजारों लोकांनी ती आजपर्यंत लुटली आहे तरी आगरांत जशीच्या तशीच ती शिल्लक आहे असे ते म्हणतात (क्र. २ ). भानुदासांस ज्यावेळी विजयानगर येथे राजाने हार चोरला ह्मणून मुळी द्यावयास नेले त्यावेळी त्यांनी केलेला अभंग फार हृदयद्रावक आहे. जरी आकाश तुटून वर पडलें अगर ब्रह्मगोळ भंगास गेला, अगर त्रिभुवन वडवानळाने खाऊन टाकिलें, तरी मी तुझीच वाट पाहीन असे ते विठो बांस ह्मणतात. मी तुझा नामधारक असल्याने तूं मला दुसऱ्याचा आकत करूं. नकोस; सप्तसागर जरी एकवटले, पृथ्वी जरी त्यांत विरून गेली, पंचमहाभूते जरी प्रळयांत सांपडली, तरी मी तुझी संगति सोडणार नाहीं; कोणतेही भयंकर विघ्न जरी येऊन वर आदळले तरी प्रतिव्रता जशी प्राणेश्वरास सोडणार नाही, तसे मी तुझें नाम सोडणार नाही ( क्र. ६); अशी करुणा भाकल्यावर ज्याप्रमाणे कोरड्या काष्ठास अंकुर फुटावे, त्याप्रमाणे त्यांच्यापुढे देवाचे दर्शन होऊन त्यांचं संकट निरसलें असें ते सांगतात (क्र. ७). जनार्दनस्वामींनी औदुबरास जाऊन अंकलकोप येथें नृसिंहसरस्वतींचा उपदेश घेतला असें मागे आम्ही लिहिलेच आहे ( क्र. २ ). तूं जर आम्हांवर रुपा करणार नाहीस, तर आम्ही कोणत्या देवाचे आराधन करावे, असे ते आपल्या गुरूस विचारतात (क्र. :). आपल्या गुरूचें नामस्मरण केले असतां आपण सद्गुरुरूपच होऊन जातो असे ते म्हणतात ( क्र. ६ ). त्यांनी एकनाथास जो उपदेश केला त्याचे येथे थोडक्यात सार द्यावयाचे आहे. लटक्या प्रपंचांत न गुंततां तूं पंढरीचा सोपा मार्ग पतकर असे ते एकनाथास सांगतात (क्र. ५). ज्ञातीचा विचार न करता, अन्न परब्रह्म असल्याने (क्र. १७ ), सर्व संतांस सरसकट अन्नदान दे (क्र. ९). तुझें मन शुद्ध झाल्यास बसल्या ठायींच तुला देव दिसेल ( क्र. १२).एकेक चक्र आकाशायेवढे दिसून त्यांमध्ये मोत्यांची चौकडी दिसेल; मण्यांच्या ज्योतीचा प्रकाश होऊन तेलावांचून दीप्ति पाजळतील ( क्र. १3). प्रथम समाधि निबिड साकार ________________

प्रस्तावना. होऊन ( क. १४), पुढे हंसस्वरूप दिसले असता, त्यांमध्ये रिघून आपले स्वरूप • पहावें; देहाचा जो स्वामी तो अविनाशरूपाने प्रगटतो (क्र. १६ ). यापुढे जो बोलेल त्यास पतन होईल असें जनार्दनस्वामी सांगतात. . २४. एकनाथांची जनार्दनांबद्दलची गुरुभाक्त ज्ञानेश्वरांच्या निवृत्ति नाथांबद्दलच्या गुरुभक्तीइतकीच खडतर आहे. परमार्थ साधावयास मातापिता ही कोणी उपयोगी पडत नसून केवळ गुरूचंच साह्य होते असे एकनाथ म्हणतात ( क्र. 3). साधनाच्या कोणत्याही आटी न करवितां जनार्दनस्वामीनी माझ्या हृदयसंपुष्टांतच मला देव दाखविला ( क्र. ६ ); व कामक्रोधादिविकारांचा अंधार पळवून लावून माझ्यापुढे विबिंबाप्रमाणे प्रकाश केला ( क. ७). गुरु हाच परमात्मा परेश असा माझा दृढ विश्वास असल्याने देव माझा अंकित होऊन राहिला आहे, असे एकनाथांनी म्हटले आहे ( क. ९ ). या विषयरोगाचे सामर्थ्य असें चमत्कारिक आहे की, परमार्थ हा गोड असूनही त्यामुळे तो कडू वाटतो (क्र. १०). पर. मार्थाची प्राप्ति होण्यास मुख्य अनुताप झाला पाहिजे; अनुताप झाल्यास देव जवळच असतो (क्र. १२). गुरुचे ठायीं अगर परमार्थाचे ठायीं अविश्वास उत्पन्न होणे हाच सर्व दोषांचा मुकुटमाण आहे (क. १४). परद्रव्य व परनारी या दोहीं. या विटाळ करून न घेणे हीच परमार्थमार्गातील दोन मुख्य साधने होत (क.१७). एका स्त्रीमुळेच परमार्थाचा नाश होतो, त्यांत धनलोभाची भर पडल्यास मग अनर्थ विचारावयासच नको ( क्र. २४). अदृष्टाचे सामर्थ्य काही विलक्षण आहे) देवाची रुपा झाल्याखेरीज अदृष्टाचे वर्चस्व कमी होणार नाही, भांडारगृहांत ठेवि. लेला कापूर उडून जातो, समुद्रांत तारुं बुडतें, ठक एकांतांत येऊन मुलाम्याचे माणे देऊन जातात, पेवाआंत पाणी भरून धान्याचा नाश होतो, परचक येऊन तळघरे फोडून द्रव्य घेऊन जातात, गोठ्यांतच शेळ्या, गाई, म्हशी, यांवर रोग पडून त्यांचा संहार होतो, भूमीमध्ये निक्षेप ठेविला असता तो धुळीस मिळून जातो, असे अदृष्टाचे नानाप्रकारचे चमत्कार आहेत (क. २८), फुल गेल्यावर फळ उत्पन्न होते, पण तेही सर्वच मासतें, प्रेत मेणारे किती ओझे हो म्हणून ओरडतात, पण तेही लौकरच प्रेतावस्थेस जातात; मरण असा शब्द उच्चारला असतां धुंकणारे तोंड लौकरच मसणांत जळून जातें, एका देवास शरण गेल्यावांचून या काळापासून आपली सुटका होणारं माही (क. २९). पांथस्थ ज्याप्रमाणे रात्री घरास येतो, व प्रातःकाळी उठून जातो, त्याप्रमाणे आपण वा ________________

संतवचनामृत. संसारांत असावें (क. ३० ). मन मागेल ते त्यास देऊ नये ( क. ३२). मनामागे जाणारास मागे थोर थोर दगे झाले आहेत (क्र. 3r). इंद्रचंद्रांस ज्याने दरारा लाविला, ज्याने नारदास धडक मारली, ज्याने विश्वामित्रासारख्या ऋषीस नाडविले, अशा एडक्या मदनास ज्याप्रमाणे शुकदेवाने ध्यान करून बांधून टाकिलें, त्याप्रमाणे आपण त्यास गुरूचे चरणी आणून बांधावें ( क्र. ३५). देवाची आठवण ठेवणे हेच परब्रह्मस्वरूप; देवास विसरणे हाच भवभ्रम आहे; असे एकनाथ म्हणतात (क. ३६ ). ज्याच्या पोटांत भाव नाही त्यास नाम ही एक थट्टाच वाटते, पण अनुभव आला असतां मात्र त्याच्या संसाराच्या खेपा चुकतात (क्र. ४०). नामरूपांस मेळ न घालतां उगाच वाचेचा गोंधळ करण्यांत काय अर्थ आहे (क. ४१ ) १ जो नामधारक आहे, त्याची योग्यता सहस्र ब्रह्मवेत्त्यांसही येणार नाही ( क. ४३ ). आपण देवाचें चिंतन केले असतां देव आपलें व्यंग पडूं देत नाही.( क्र. ४६ ). ज्यास प्रेम नाही असा ज्ञानी एकाद्या शृंगारलेल्या रडेप्रमाणे दिसतो ( क. ४८). भक्ति हे मूळ असून, वैराग्य हे त्याचे फूल, व ज्ञान हे फळ आहे ( क. ४९ ). नित्य कीर्तन करीत असतां रोज नवा नवा रंग ओढवतो, व श्रोता व वक्ता हे दोघेही देवरूपच होऊन जातात; वैष्णवांनी आल्हादानें हरिनाम गर्जले असता त्याचा घोष गगनात मावत नाही, हरीचें नाम गाइल्याबरोबर इंद्रियें आपआपला सर्व व्यापार विसरून जातात (क. ५१ ). आपण ज्याचे घरी कीर्तन करावे त्यांवर कोणतेही ओझें घालू नये; पणे भक्षूनही राहण्यास हरकत नाही (क. ५६ ). संतांची परमपवित्र चरित्रे आदरबुद्धीने वर्णन करावी, सज्जनवृंदांस मनोभावानें नमन करावे, संतसंगतीमध्ये अंतरंगांत नाम घेत जावे कीर्तनाचे रंगांत देवाजवळ सुखाने डोलावें; भक्तिज्ञानावांचून दुसऱ्या गोष्टी करूं नयेत;व ज्याच्यायोगें अंतरंगांत श्रीहरीची मूर्ति ठसावेल असें कीर्तन करावे (क्र.५५) श्रवणभक्तीनें परीक्षिति उद्धरून गेला आहे; कीर्तनाने नारद तरून गेला; हरिनाम. घोष करून प्रल्हाद पावन झाला, पादसेवनभक्ति करून रमा उद्धरून गेली; अङ्कराने वंदनभक्ति केली; मारुतीने दास्यत्व करून आपला उद्धार घेतला, अर्जुनाने सख्यभक्तीने रुपास आपला ऋणी केलें व बळीने आत्मनिवेदनभक्ति करून देवास आपलें शिर समर्पिलें. या नाना प्रकारच्या भक्तीपैकी कोणतीही भक्ति केली असता ती उद्गरागतीस खात्रीने कारण होईल यांत संशय नाही (क्र. ५८).. ________________

प्रस्तावना. २५. ज्वांस सर्वगत सदा ब्रह्म प्राप्त झाले अशा साधूंची भेट होणे मोठ्या भाग्याचे होय. वाऱ्यास आवरण घालवेल, रवि अस्तास जात असता त्यास धरवेल, पण या संतांचे महिमान कळणार नाही ( क्र. ५९ ). अशांच्या केवळ दर्शनानंच प्राण्यांस उद्धार होत असतो (क्र. ६० ). आपलें धन तस्कराने नेलें असत ज्याचे मन उद्विग्न होत नाही, आपल्या पुत्राचा शत्रूने वध केला असतांही ज्याच्या डोळ्यांस मोहाचा पाझर सुटत नाही, आपले शरीर शत्रूनें गांजलें असतां ज्याच्या शांतीचा ठेवा चुकत नाही, त्यासच या जगांत साधु या नावाने संबोधितां येईल (क्र. ६१). संसारांत आपदा कितीही असोत, असा साधु वाचेनें सदा विठ्ठल नाम गात असतो ( क्र. ६३ ), शिण्यापासून सेवा घेणे हे तो अधमलक्षण समजतो (क.६५), अशा संतांची रूपा झाल्यासच हरीचे दर्शन होईल; तुमचे हाती देव आहे तो मला एकदां दाखवा असें एकनाथ काकुळतीस येऊन संतांस म्हणतात (क.६८). संतांचे दर्शन झाल्याने आज त्रिविधतापांची बोळवण झाली, व. अनंतजन्मांचा शीण गेला (क्र. ७३ ). आज संतसंग घडल्याने भाग्याचा उदय झाला, व त्यामुळे आनंदाचे पूर लोटले, असें एकनाथ म्हणतात (क्र. ७r ). हे संत मेघापरीस उदार असून आपले सर्व मनोगत पुरवितात; त्यांस शरण गेल्यास ते सर्व भार चालवितात; सर्व लिगाडे व उपाधि सोडवून आपणांमध्ये सरते करतात; व काळाचा घाव अंगास लागणार नाही असे करतात (क्र. ७६ ). हे संत मायबापांपेक्षा श्रेष्ठ होत; कारण मायबाप जन्म देतात, व हे संत जन्म चुकवितात (क्र. ८१). त्यांचे जे सोयरे होतात त्यांस ते यातिकुळाविरहित करितात (क्र. ८६). अशा भक्तांच्या देहांत देव सदा वसून त्यांस धर्म व अर्थ अर्पण करतो (क्र. ८७ ). देवावर भार घातला असता तो निर्धाराने योगक्षेम चालवितो, यांत शंका नाही (क्र. ८९). आपले सर्व अंग वोढून तो भक्तपीडा निवारण करितो ( क्र. ९० ). भक्तांच्या अगोदर देव मुळीच नसल्याने भक्त वडील व देव धाकुटा असें म्हणण्यास हरकत नाही (क. ९).जो देवाची निंदा करितो, व संतांस सन्मानतो,त्यांस मुक्ति प्राप्त होते; कंसाने रुष्णाचा द्वेष केला, पण नारदास त्याने सन्मानिले, म्हणून तो सायुज्यसदनास गेला (क्र. १०१ ). भक्त हेच देवाचे आराध्यदैवत होत, असें श्रीरुष्ण उद्भवास खात्रीने सांगतात ( क. १०६). माझा शरणागत केविलवाणा दिसल्यास त्याची लाज मलाच आहे असें देव सांगतात (क्र. १०७ ). धर्माची वाट सोडून अंधर्म ज्यावेळेस शिगेस चढतो त्यावेळी संतांस अवतार घ्यावा लागतो, नाना पाषांडमताचें ________________

संतवचनामृत. खंडन करून, कर्मठतेचे तोंड ठेचण्याकरितां, व जडजावांचा उद्धार करण्याकरितां, संतांचा अवतार आहे. अशा संतांची देवही सर्व प्रकारें सेवा करितो. एकनाथाचे घरीं सडासंमार्जन करून गंध उगाळून देणा-या श्रीखंड्याच्या रूपानेच देवानं एकनाथाची सेवा केली असे म्हणण्यास हरकत नाही ( क्र. ११२). अशी संतसंगति धरल्याने माझें जन्मास आल्याचे कार्य सिद्धीस गेलें असें एकनाथ सांगतात (क्र. ११३). २६. एकनाथांनी आपल्यास साक्षात्कार कसा झाला याबद्दल आपल्या अभंगांत फार उत्तम रीतीने वर्णन केले आहे. प्रथम अष्टसात्त्विक भाव उत्पन्न झाल्यावांचून देव रुपा करीत नाही, असें एकनाथांनी म्हटले आहे. अंगावर रोमांच उभे राहणे, शरीरावर स्वेदाच्या कणिका उत्पन्न होणे, सर्वांगांस कंप सुटणे, नेत्रांतून अश्रु वाहणे, अंतःकरणांत आनंदातिशय होणे, कंठ प्रेमाने दादून येणे, वाचेस मोन्य पडणे, व नासिकांवाटें दीर्घ श्वासोच्छास निघणे हे अष्टसात्त्विक भाव उत्पन्न झाल्याचिन सत्त्वाची परिशुद्धि होत नाहीं (क्र. ११४). मी कानावाटे नयनास येऊन शेवटी नयनापुढे नयनरूपाने परिणमलों असें एकनाथ म्हणतान (क. ११५). एकाजनार्दनास सर्वांगीच डोळे झाल्याप्रमाणे त्यांची स्थिति साली, व तिन्ही अवस्था सोडून ते अर्धचंद्राच्या चांदण्यांत वागू लागले, असें ते लिहितात (क्र. ११६). हृदयात चिन्मय प्रकाश उत्पन्न होऊन एकनाथांची भ्राति निरसली ( क्र. १५८). जिकडे तिकडे पहांट होऊन पृथ्वी लखलखाटाने भरून गेली, असें एकनाथांनी लिहिले आहे (क्र. ११९). त्या बोधभानूस सायंप्रातर्माध्यान्ह नाहीसे होऊन, सर्वदा उदयच असल्याने, अस्तवणे अस्तास गेलें, व त्यामुळे पूर्वपश्चिमभाव उरला नाही ( क्र. १२० ). जळाच्या आंत बुडी दिल्यावर तेथेही चिन्मात्र दिसल्याने जळसुद्धा पावन होऊन गेलें, असें एकनाथ म्हणतात (क्र. १२१). स्वयंप्रकाशांत स्नान करून सर्वभूतनमनरूपी संध्या एकाजनार्दनांनी केल्यावर (क्र. १२२ ), त्यांचा संदेह नाहीसा होऊन आत्माराम त्यांच्या हृदयाकाशपालखीत विराजमान झाला (क्र. १२३). एकनाथांनी नामाची घनगर्जना केल्याबरोबर जनार्दनसागरास पूर आला असें ते लिहितात (क्र. १२). देवाचा चमत्कार असा की तो लन लागल्याबरोबर विटाळावांचून पोटास आला, व इतर पाहणा-यांस सुद्धा त्याने पिसें HELP REP STREET ________________

प्रस्तावना. लावून सोडलें ( क. १२५ ). " चतुर्भुज श्याममूर्ति । शंखचक्र ते शोभती। पीतांबर वैजयंती । रुळती गळां " अशा प्रकारचा देव मी पाहिला, पाहिला, असे एकनाथ द्विवार सांगतात; अशा देवास पाहिल्यावर भक्तही विदेही होऊन त्यास भेटला, दोघांची मिळणी होतांच देवभक्तभाव नाहीस झाला, नामाचा एकसारखा छंद घेतल्या, व कायावाचामनांमध्ये निश्चय पूर्णपणे वागविल्याने, एकाजनार्दनाचा देव अंकित झाला असे ते म्हणतात ( क. १२६ ). आज मी धन्य झालों, कारण मी हृदयांतच चतर्भज देवास पाहिले, असे एकनाथांनी म्हटले आहे (क्र. १२७), आतां भी जिकडे जाईन, तिकडे मला देवच दिसतो; जिकडे पाहीन, तिकडे देव पुढेच उभा आहे असे वाटते (क्र. १२८ ). गुरुरूपांजन डोळ्यांत घातल्याने आंत राम, बाहरे राम, जागृतीत राम, स्वप्नांत राम, सुषुप्तीत राम; अशी माझी स्थिति होऊन गेली (क्र. १२९). या देवास प्रावण कांहींच नसल्याने जेथें. तेथें देव उघडाच दिसून देव निलाजरासा वाटतो; देवाने पांढऱ्या डुकराचेही रूप घेतले आहे, अशी माझी खात्री पटली (क. १३२). या देवास बाहेर नेऊन घातले तरी घरी आल्याबरोबर तो पुनः घरांतच दिसतो ( क्र. १३३). घर सोडून परदेशास गेलो असतां देव माझ्या समागमेंच असतो; कड्यांकपाटांवर पहावें तिकडे देवाचेंच रूप दिसते ( क्र. १३४ ). सगळे मनच रामांत रंगून गेल्याने तें राममय होऊन गेलें, व पाहता पाहतां विश्व मावळून गेलें अशी स्थिति झाली आहे, असें एकनाथ म्हणतात ( क्र. १३६ ). दोराचा सर्प जसा · जिवंतही राहत नाही, व मरतही नाही, नसा देह असो वा नसो, त्याची आम्हांस किंमत नाहीं (क्र. १३८ ). जगन्नाथाच्या चरणी चित्त लागल्याने आतां सर्व त्रैलोक्यच आनंदाचे होऊन गेलें आहे (क्र. १३९). देवास मी पाहू गेलों तो मी देवरूपच होऊन ठेलों (क्र. १४२). आता मी देवाची पूजा करूं गेलो असतां माझचिमी पूजा केल्याप्रमाणे होणार आहे; पूजनाची सर्व उपकरणे म्हणजे अत्र, गंध, दीप वगैरे ही सर्व देवमयच होऊन गेली आहेत (क. १४३). आपली आपण पूजा करण्याची राहटी जोपर्यंत जगांत नाही, तोपर्यंत आपली आपण पूजा करणाऱ्या ज्ञान्यापेक्षा अज्ञानच बरा असे म्हणण्यास हरकत नाही ( क्र. १४४ ). आतां मीच आत्माराम झाल्याने मी परब्रह्मरूप बनलो आहे; मी एकट एकला असून आतां मला, आधिव्याधि, अगर उपाधि कांहींच उरल्या नाहीत (क. ११५). जे माझ्या दृष्टीस दिसते, तें तें परब्रह्मरूपच झाले आहे ( क्र. ११७ ). आठही दिशांस देव संपूर्ण ________________

संतवचनामृत. भरल्याने आतां पूर्वपश्चिमभाव राहिला नाही, व देवावांचून कोठे रिता ठावही उरला नाही ( क्र. १४९ ). उत्तमभूमि शोधून हे मी गुरुवचनबजि पेरिलें आहे; प्रेमाचें पीक ज्या वेळी येईल त्या वेळी तें सांठविण्यास गगनहीं पुरणार नाही; चार वेद व सहा शास्त्रे यांनी माप घातले, तरी देव अद्याप अमेयरूपच राहिला आहे; अंतःकरणांतल्या निकट भावावांचन देहांत पिकलेल्या देवाचें माप घेणे अशक्य आहे असें एकनाथ म्हणतात (क. १५०). २७. या ग्रंथाचे कामी प्रो. कृष्णाजी वेकटेश गजद्रगडकर, प्रो. शंकर वामन दांडेकर, रा. सा. वासुदेवराव दामले, रा.शंकर केशव धर्माधिकारी, व रा. जगन्नाथ रघुनाथ लेले या सर्वांची निरनिराळ्या प्रकारची जी मदत झाली आहे तिजबद्दल मी त्या सर्वांचा फार आभारी आहे. गणेश प्रिंटिंग वर्क्सच्या मालकांनी व आर्यभूषण छापखान्याच्या मालकांनी फार मेहनतीने व काळजीपूर्वक हे पुस्तक छापून दिलें त्याबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहे. रा. द. रानडे. ________________

संतवचनामृत अनुक्रमणिका . भाग पहिलाः ज्ञानदेवादि संत निवृत्तिनाथ ५ संतांची योग्यता ... २९ १ गुरुपरंपरा व समकालीन संत । ६ ज्ञानदेवांचे वैराग्ययुक्त बोल २ निवृत्तिनाथांचा उपदेश ... ५ ७ निवृत्तिप्रसाद ... ... 3 श्रीकृष्णाचे सगुणनिर्गुण वर्णन ८ ८ प्रातिभश्रावणादर्श ... . * साक्षात्कार ... ... १० ९ स्वरूपसाक्षात्कार ... ७ ज्ञानदेव सोपानदेव... ... ... १ विठ्ठलभक्ति .... ... मुक्ताबाई २ उपदेश ... ... १७. १ मुक्ताबाईचा अनुभव ... ६१ 3 गुरूची आवश्यकता ... २० २ मुक्ताबाईचा चांगदेवास उपदेश ६३ नामाचे महत्त्व ... ... २४ ' चांगदेव ... ... ... ६५ भाग दुसराः नामदेवादि संत. नामदेव | गोराकुंभार ... ... १३१ , नामदेवचरित्र ... ... . ७५ विसोबाखेचर १ नामदेवांच्या अंत:करणांतील सांवतामाळी तळमळ ... ... ७५ नरहरिसोनार 3 नाम आणि भक्ति ... ९ ! चोखामेळा ४ उपदेश ... ... जनाबाई ५ संतमहिमा :... सेनान्हावी ६ अनुभव ... ... १२५ : कान्होपात्रा FM ________________

संतवचनामृत. भाग तिसराः एकनाथादि संत ... ... १५९ १ गुरुस्तुति . . . . एकनाथ भानुदास जनार्दनस्वामी २ उपदेश .... १७३ १ जनार्दनस्वामीचा अनुभव १६२ 3 नामस्मरण आणि भक्ति... १८२ ४ संतांची लक्षणे ... ... १९० २ जनार्दनस्वामींचा एकनाथास ५ देव आणि भक ... ... १९९ उपदेश ... ... १६५६ साक्षात्कार ... ... .. ________________

संतवचनामृत. भाग पहिला. ज्ञानदेवादि संत. ________________

निवृत्तिनाथ. १ गुरुपरंपरा व समकालीन संत. १. निवृत्तिनाथांची गुरुपरंपरा. आदिनाथ उमा बीज प्रकटले । मच्छिद्रा लाधले सहजस्थिती॥ तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गयनीनाथा॥ वैराग्ये तापला सप्रेमें निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ॥ निद्व निःसंग विचरतां मही। सुखानंद हृदयींस्थिर जाला ॥ विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख । देऊनि सम्यक् अनन्यता ॥ निवृत्ति गयनी कृपा केली पूर्ण । कुळ हे पावन कृष्णनामें ॥ . २. गुरुकृपेने संसारवृक्षाचें छेदन. सुमनाची लता वृक्षी निपजली । ते कोणे घातली भोगावया ॥ तैसा हा पसारा जगडंबर खरा । माजि येरझारा शून्य खेपा ॥ नाहीं यासी छाया नाही यासी माया।तोहा वृक्षवाया विदान करी॥ निवृत्तिराज म्हणे तो गुरुविण न तुटे । प्रपंच सपाटे ब्रह्मीं नेतु ॥ ___३, गहिनीप्रसादाने सर्वगत आत्मा आम्हांस प्रत्यक्ष दिसतो. सर्वांघटी वसे तो आत्मा प्रकाशे । प्रत्यक्ष आम्हां दिसे गुरुकृपा ॥ विराले ते ध्येय ध्यान गेले मनीं । मनाची उन्मनी एक जाली। १ शंकर. २ संयोग. ३ काशल्य. ४ नेणारा. ५ शरीर. ६ मनरहितस्थिति. ________________

संतवचनामृत : निवृत्तिनाथ. [६३ ठेला अहंभाव सर्व दिसे देव । निःसंदेह भवं नाही आम्हां ॥ निवृत्तिसाधन गयनीप्रसाद । सर्व हा गोविंद सांगतुसे ॥ ४. जो प्रत्यक्ष हरि डोळ्यांस दाखवील असाच सद्गुरु करावा. सप्तपाताळे एकचीस स्वर्ग पुरोनि उरला हरि । काया माया छाया विवर्जित दिसतो आहे दुरी नाजवळीगे बाईये॥ प्रत्यक्ष हरि तो दाविपांडोळां ऐसा सद्गुरु कीजे पाहोनि । तनु मन धन त्यासी देऊनि ते वस्तु घ्यावी मागोनि गे बाईये ॥ पावाडां पाव आणी करी परवस्तुसी भेटी ऐसा तोचि । तो सद्गुरुविण मूढासि दर्शन कैचे ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये॥ एक मंत्र एक उपदेशिती गुरु ते जाणावे भूमिभारु । निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षित्वे दावी ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये॥ ५. समकालीन संतांचा उल्लेख. सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥ दिंडी टाळ घोळ गाती विठ्ठलनाम । खेचरासी प्रेम विठ्ठलाचे ॥ नरहरि विठा नाराँ ते गोणाई । प्रेमभरित डोहीं वोसंडती॥ निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे। पुंडलिकासंगे हरि खेळ ॥ ____६. खेचर व सोपान हे जणू काही परब्रह्माचे अंकुरच होत. धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचे जीवन जनक हेतु ॥ धन्य याचे कुळ पवित्र कुशळ । नित्य या गोपाळ जवळी असे॥ याचेनि स्मरणे नाशती दारुणे। कैवल्य पावणे ब्रह्मामाजी॥ निवृत्ति म्हणे परब्रह्म हे साकार । तेथील अंकुर उमटले ॥ १ नाहीसा झाला. २ संसार. ३ आत्मवस्तु. ४ सोबती. ५ वीणा. ६-७ नामदेवांच्या मुलांची नांवें. ८ नामदेवाची आई. .. ________________

निवृत्तिनाथांचा उपदेश. २ निवृत्तिनाथांचा उपदेश. ७. अनुभवाच्या गांवांत ज्ञान हे फळ असून विज्ञान हा वृक्ष आहे. अनुभवाच्या गांवीं ज्ञान हेचि फळ । विज्ञान केवळ वृक्ष तया ॥ साधनी स्वानुभव अनुभवीं अनुभव । ब्रह्माची राणीव आम्हां घरीं॥ रिकामा बरळु नस खेळेमेळे । ब्रह्माची कल्लोळे भोगितुसे ॥ निवृत्ति सरळ निरसले अज्ञान । सर्वत्र संपन्न आत्माराम ॥ ८. जेथे शुद्ध वासना आहे तेथेच वैकुंठ आहे. देही देव आहे हे बोलती वेद । परि वासनेचे भेद न दवडती॥ वासना पैं चोख तेथेचि वैकुंठ । भावेंचि प्रगट होये जना॥ न लगती सायास करणे उपवास । नाममात्रे पाश तुटे जना॥ निवृत्ति पहातु देहामाजी प्रांतु । देवचि दिसतु सर्वोघंटीं॥ . ९. दया, शांति, करुणा हीच योग्याची चिन्हें होत. सर्वभूती दया शांति पैं निर्धारी । तो योगी पैं सार्चार जनीं इये। नलगे मुंडणे काया हे दंडेणे । अखंड कीर्तने स्मरे हरी॥ शिव जाणे जीवीं क्षरला चैतन्य । हे जीवीं कारुण्य सदाभावी ॥ गगनीं सूर्य तपे अनंत तारा लोपे। एकुचि स्वरूप आत्मा तैसा॥ उगवला केळी उल्हासु कमळी । तैसा तो मंडळी चंद्र देखा ॥ निवृत्तिमंडळ अमृत सकळ । घेतले रसाळ हरिनाम ॥ १ विशेष प्रकारचे, अनुभवाचें, ज्ञान. २ राज्य. ३ बडबड. ४ लाट, ५ प्रकार. ६ देव. ७ शरीर. ८ खरोखर. ९ कष्टवणे, त्रास देणे. १० कलांनी, किरणांनी. ________________

संतवचनामृत : निवृत्तिनाथ. [६१० १०. परापवाद व परनिंदा ऐकतांच निजमौन्याने कृष्णजप करावा. परापवाद कानी परनिंदा झणी । ऐकतां निजमौनी कृष्ण जप ॥ हरि हरि म्हणे नायके ते मातु द्वैत तया आंतु नेघे बापा ॥ दुजियाची निंदा अपवाद सदा । वाचेसी गोविंदा जप करी ॥ निवृत्ति तत्पर नाइके ते शब्द । नित्यता गोविंद जपतसे ॥ ११. "विष्णुपणे लोपों भान तुझें." अपशब्द कानी पडतांचि द्वैत । नाम है अच्युत नये रया ॥ परनिंदा पीडा करितांचि मूढा । पडिलासी वेढा योनिमाळे ॥ आपस्तुति नको आपपर ऐको । विष्णुपणे लोपों भान तुझें ॥ निवृत्ति सत्वर द्वैत हे निरसी। अद्वैतसमरसी दिधला असे ॥ १२. देहांत आत्मा निरंतर नांदत असतां इकडे तिकडे कां धांवतोस ? देहाच्या दीपकी एकी वस्तु चोख। असोनियां शोक कां करितोसि॥ देहभरी आत्मा नांदे निरंतर | असता हा विचार कां धांवतोसी। तुझे तूं पाहीं आहे ते घेई । एकरूप होई गुरुखूणे ॥ निवृत्तीचे सार हरिरूप सदा । नित्य परमानंदा रातलाँसे || १३. जंव काळ पाहुणा आला नाही तंववरच नामस्मरणाचा वेग करा. संसारभ्रमे भ्रमले हे जीव । नेणती हे माँव रोहिणीची ॥ जाईल हा देह सरेल आयुष्य । आपेआप भविष्य उभे राहे ॥ वेगु करा आधी रामनामचिंतना जंव नाहीं पाहुणा काळ आला॥ १ दुसऱ्याचे दोष. २ कदाचित्. ३ गोष्ट. ४ बापा. ५ जन्माची परंपरा. ६ ज्योत. ७ रंगणे, रमणे. ८ माया, भास. मृगजळ. ________________

६१६] निवृत्तिनाथांचा उपदेश. सर्वत्र श्रीराम ऐसा करा वाचे । सुटतील मोहाचे मोहपाश ॥ तिमिरपडळ निमाली 4 दृष्टी । प्रपंच हे सृष्टि दिसनुसे ॥ निवृत्तीचे सार रामकृष्णनाम । वैकुंठ परम सर्वकाळ ॥ १४. समर्थाचे घरी काही उणे नसल्याने आम्हांस नामप्रेम द्यावें । इतकेंच आम्ही मागतो. न जाणती कळाकुसरी गोपाळा । नाम है मंगळा अच्युताचें ॥ हेचि मज द्यावे सप्रेम आपुले। ध्यातुसे पाउले एवढ्यासाठी॥ न मागे नेणे काहीं यावीण आणिक । सप्रेमाची भूक तृष्णा करी॥ सामर्थ्याचे घरी काही नाही उणे । अखंड प्रेम देणे कृष्णनामीं ॥ इतुकेचि दातारा पुरवी माझे कोड । यावीण काबाड भार नेघे॥ निवृत्ति सप्रेम संजीवनी मूळ । स्मरतां काळवेळ नाहीं नामीं ॥ । १५. ज्याच्या मुखांत नाम वसतें तेथेंच हरि असतो. नाम मुखीं सदा तोचि पैं भाग्याचा। तयासीयमाचा धाक नाहीं॥ रामराम हरि सर्वकाळ वसे । तेथेंचि वसे बसे हरि ॥ हरिध्यान वसे अखंड पैं सर्वदा । न पवे तो आपदा इये जनीं। निवृत्ति समता हरिभजन करी । सर्वत्र कामोरी ऋद्धिसिद्धि ॥ १६. ज्याच्या मुखांत नामाची सरिता आहे तो एकच पुरा घट आहे असे समजावें. ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि येकु पुरता घटु जाणा। नामाचेनि बळें कळिकाळ आपणां । ब्रह्मांडायेसणा तोचि होय॥ न पाहे यम काळ तयाकडे अवचिता नामाची सरिताज्याचे मुखीं। निवृत्ति नामामृत उच्चारी रामनाम । नित्यता परब्रह्म याचे घरीं ॥ १ अंधाराचे पडळ. २ सृष्ट, अर्थात् विनाशी, खोटें. ३ कलाकौशल्य. ४ दुःख. ५ दासी. ६ अमृताची नदी. ७ एवढा. ८ चुकून. ________________

संतवचनामृत: निवृत्तिनाथ. [६१७ ३. श्रीकृष्णाचे सगुणनिर्गुण वर्णन. १७. कृष्ण हाच देव आम्ही हृदयांत पूजितों. कल्पना कोडूनि मन हे मारिले । जीवन चोरिले सत्रावाचे ॥ साजीव सोलीव निवृत्तीची ठेव । कृष्ण हाचि देव हृदयीं पूजीं॥ विलास विकृति नाहीं 4 अवाप्ति । साधनाची युक्ति हारपली ॥ निवृत्ति कारण योगियांचे हृदयीं। सर्व हरि पाहीं दिसे आम्हां ॥ १८ श्रीकृष्णाचे सगुणरूपाने वर्णन. परोस परता पश्यंती वरुता । मध्यमे तत्वतां न कळे हरि ॥ ते हे कृष्णरूप गौळियांचे तप । यशोदेसमीप नंदाधरी ॥ चोखट चोखाळ मनाचे मवाळ । कांसवीचा ढाळ जया नेत्रीं ॥ निवृत्ति सर्वज्ञ गुरूची धारणा । ब्रह्म सनातना माजी मन ॥ १९. श्रीकृष्णरूपामध्ये हे सकळ होत जाते. भरते ना रिते आपण वसते । सकळ हे होते तयामाजी ॥ ते रूप मैं ब्रह्म चोखाळ सर्वदा । नित्यता आनंदा नंदाघरीं ॥ आशापाश नाहीं अशिजे पूर्णपणे । सकळ जग होणे एकरूप ॥ निवृत्ति तटाक रूपे ब्रह्म एक । जेथ ब्रह्मादिक हारपती॥ २०. शून्य गगनामध्ये उगवलेल्या चंद्राप्रमाणे श्रीकृष्णाचें तेज. निरशून्य गगनीं अर्क उगवला । कृष्णरूपें भला को सरलु ॥ ते रूप सुंदर गौळियांचे दृष्टि । आनंदाची सृष्टि नंदाघरी॥ या । जीवनकला. ३ विकार. ३ प्राप्ति. ४ चौथी, तुर्यावस्थेतील वाणी. ५ स्वसंवेद्य वाणी. ६ आकार, तेज. ७ अत्यंत शून्य. ८ अंकुर. ________________

६२४] श्रीकृष्णाचे सगुणनिर्गुण वर्णन. रजतम गाळी दृश्याकार होळी । तदाकारजळी कृष्ण बिंबे ॥ निवृत्ति साकार शून्य परात्पर । ब्रह्म हे आकार आकारले ॥ २१. ईश्वराने प्रेमळांची घोडी धुतली आहेत. म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा । आपण चौवांचातीत कृष्ण ॥ शब्दासी नातुडे बुद्धिसी सांकडे ।तो सप्रेमें आतुडे स्मरतां नाम ॥ उपचाराच्या कोडीन पाहे परवडी।तो प्रेमळाची घोडी धुये अंग॥ निवृत्तीचे तप फळले अमूप । गयनिराजे दीप उजळिला ॥ २२. कृष्ण हा अंधाऱ्या रात्री प्रकाशमान होणारा सूर्यच आहे. अंधारिये राती उगवे हा गभस्ति । मालवेना दीप्ति गुरुकृपा ॥ तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारी । हाचि चराचरी प्रकाशला ॥ आदि मध्य अंत तिन्हीं जाली शून्य ।तो कृष्णनिधान गोपवेषे॥ निवृत्ति निकट कृष्णनामपाठ । आवडी वैकुंठ वसिनले ॥ २३. हरि हा आमच्या माजघरांत नांदत आहे. नाहीं जनीं विजनी विज्ञानीं । निर्गुणकाहाणी आम्हां घरीं ॥ सुलभ हरि दुर्लभ हरि । नांदे माजधरी आमुचिये ॥ आनंदसोहळा उन्मनीची कळा। नामचि जिव्हाळा जिव्हे सदा॥ निवृत्तिदेवां साधनी राणीव । हारपला भाव इंद्रियांचा ॥ २४. हरि नित्य सोंवळा असून अखंड निर्मळ आहे. सजीव साँजिरी तिगुण गोजिरी । नांदे माजधरी आत्मराजु ॥ सदाचार आम्हां नित्य हरिप्रेमा । नेणों मनोधर्मा प्रपंचाचिया॥ १ चारीवाणीच्या पलीकडचा. २ सांपडत नाही. ३ संकट, ४ प्रकार. ५ सूर्य. ६ अनुभवाचे ज्ञान. ७ सुंदर. ८ त्रिगुणात्मक, साकार. ९ गोंडस. ________________

१० संतवचनामृत : निवृत्तिनाथ. [६२४ नित्य पैं सोविळा अखंड पै निर्मळा।झणीं बारा सोळा म्हणाल तया। निवृत्तिदेवी कलिका मैं अमूप । विश्वीं विश्वरूप दावीतसे ॥ २५. श्रीकृष्णाचे रूप आम्हांस उन्मनीत भोगावयास सांपडतें. विकटं विकास विनंट रूपस । सर्व हृषीकेश दिसे आम्हां ॥ ते रूप साजिरे नंदाचे गोजिरें । उन्मनीं निर्धारें भोगू आम्हीं ॥ विलास भक्तीचा उन्मेष नामाचा । लेशु त्या पापाचा नाही तेथे ॥ निवृत्ति म्हणे ते सुखरूप कृष्ण । दिननिशी प्रश्न हरि हरि ॥ . ४. साक्षात्कार. २६. देह हेच आत्म्याचे मंदिर आहे. दिननिशीं नाहीं अवघा दीपक । एकरूपें त्रैलोक्य बिंबलेसे ॥ ते रूप सांगतां नये पैं भावितां । गुरुगम्य हाता एकतत्त्वे ॥ सांडावे . कोहं धरावे . सोहैं । अनेकत्वे ओहं एकतत्त्वीं॥ निवृत्ति साकार वैकुंठींचे घर । देह हे मंदिर आत्मयाचे ॥ २७. चंदनाचा सुवास, जाईजुईचा परिमळ, व कल्पतरूच्या _आगरुवापेक्षा हरि आम्हांस प्रिय आहे. चंदनाचे झाड परिमळे वार्ड। त्याहूनि कथा गोड विठ्ठलाची ॥ परिमळु सुमनी जाई जुई मोगरे । त्याहूनि साजिरे हरि आम्हां । १ ज्योत. २ मोठे, अपरंपार. ३ सुशोभित. ४ अहोरात्री.५ मोठे. ________________

६ ३०] साक्षात्कार. आम्हां धर्म हरि आम्हां कर्म हरि। मुक्ति मार्ग चाही हरि आम्हां ।। कल्पतरु इच्छेसी सागरु । त्याहूनि आगरुं हरि माझा ॥ निवृत्ति सुवासु ब्रह्माचा प्रकाशु । विठ्ठलरहिवासु आम्हां पुरे ॥ २८. सुमनाच्या वासास जसे भ्रमर भुलतात तसे संत विठ्ठलांत लीन होतात. कमळाच्या स्कंधी गुणी गुढारले । वरि आकारले फूल तया ॥ सुमनाचेनि वासे भ्रमर भुलले । मार्ग पैं विसरले इंद्रियांचा ॥ तैसे हे संत विट्ठली तृप्त । नित्य पैं निवांत हरिचरणीं ॥ नाठवे हे दिन नाठवे निशी । अखंड आम्हांसी हरिराज ॥ तल्लीन प्रेमाचे कल्लोळ अमृतांचे ! डिंगर हरीचे राजहंस ॥ टाहो करूं थोरु विठ्ठलकीर्तने । मनाच्या सुमनें हरी पुजूं ॥ निवृत्ति निवांत तल्लीन पैं जाला । प्रपंच अबोला हरिसंगें॥ २९. तंत आणि वितंतामध्ये उमटलेल्या अनाहतनादानें ___ गुरुनामस्मरण. तंत आणि वितंत त्यामाजि मथित । नाद उमटत स्वानंदाचा ।। सोहं बीजतत्त्व गुरुनाम मंत्र । ज्ञानी उपासित हरिराज ॥ भेदुनी कुंडलिनी गोल्हाट निकट । आत्माराम पेठ पांडुरंग ॥ निवृत्ति म्हणे मी सर्वस्व होईन । हरि हा भरीन पूर्ण देहीं । ३०. सर्वव्यापक ईश्वराची अखंड वाजणारी नौबत. जेथे पाहे तेथे व्यापिले अनंते । तयाविण रिते कोण ठाये ॥ गगनेविण ठावो नाहीं जैसा रिता । तैसा या अच्युताविण कांहीं ॥ १ सुगंध. २ गुप्त असणे. ३ लाडके लेक. ४ आडवे उभे तंतु; श्वासनिःश्वास. ५ एक चक्र. ६ रिकामें. ________________

१२ संतवचनामृतः निवृत्तिनाथ. [६३० तेथे माझ्या चित्ता करी रहिवासु । न करी उदासु ऐसियातें ॥ निवृत्तीने मन ठेविले चरणीं । नामाची निशाणी अखंडित ॥ ३१. "असें तें न दिसे, नसें तें आभासे." गगनीं अभ्र चाले चंद्र असे निश्चळ । पृथ्वीतळी बाळ चाले म्हणे॥ भ्रमाच भुलीव आलेसे पडळ । प्रत्यक्ष केवळ डोळियांसी ॥ असे ते न दिसे नसे ते आभासे । विषयांच्या विर्षे घोरलेसे ॥ निवृत्ति कवळ भ्रमाचा सांडिला । अखंड ध्यायिला हृषीकेश ॥ ___ ३२ निवृत्तिचातक हरीस्तव वरती पाहात आहे. आम्ही चकोर हरि चंद्रमा । आम्ही कळा तो पूर्णिमा । कैसा बाहिज़ भीतरी हरि । बिंबे बिंबला एकसूत्रीं॥ आम्ही देही तो आत्मा । आम्ही विदेही तो परमात्मा ॥ ऐक्यपणे सकळ वसे । द्वैतबुद्धि काही न दिसे ॥ निवृत्तिचातक इच्छिताहे । हरिलागी वरते पाहे ॥ ३३. दीपाची कळिका दीपांतच सामावते. दीपाची कळिका दीपींचि समावे। तैसाजिवशिव वोळखिवोजी॥ दीप आहे देही तयाचे हे प्रकाश। त्याचेनि सावकाश हरि भजे रया॥ न मिळे आयुष्य न मिळे घटिका । देह क्षण एका जाईल रया ॥ निवृत्तीचा दीप दीपाचिये अँसे । आटोनि सौरसे एक जाला ॥ ३४. कैसा देव देहांत दिवटीप्रमाणे प्रकाशमान होत आहे ! आम्ही किरण तूं सूर्यो । आम्ही अस्तु तूं उदयो। कैसा देही देवा दिवटा । परा पश्यंती चारी वाटा । १ नौबत. २ ढग. ३ व्यापणे. ४ प्रास, पडळ. ५ बाहेर. ६ ज्योत. ७ सोने वगैरे धातु आटवण्याचे पात्र. ८ समरसपणानें. ________________

६३८] साक्षात्कार. .. आम्ही कळा तूं चंद्रमा । तूं अमृत आम्ही गरिमा ॥ आम्ही निधि तूं निधान । आम्ही ध्येय तूं साधन ॥ निवृत्ति उपरति वाहे । हृदयीं कृष्णनाथ ध्याये ॥ ३६. आम्हांस काळवेळ नसून, अखंड ज्योतिरूप हरि दिसत आहे. त्रैलोक्य पावन जनी जनार्दन । त्यामाजि परिपूर्ण आत्मज्योति ॥ नाहीं आम्हां काळ नाही आम्हां वेळ । अखंड सोज्वळ हरि दिसे ॥ ब्रह्म सनातन ब्रह्मींचे अंकुर । भक्तिपुरःसर भूतदया ॥ निवृत्ति म्हणे दीन दुर्बळ मी एक । मनोमय चोख आम्हां गोड ॥. ३६. आत्मोदयांत ताराग्रहमेदिनीचा लोप. गोविलो चरणी टाकिली सांडणी । विषयपोखणी दुरी ठेली ॥. पाहांट पाहाली ब्रह्मे उगवली । दिननिशीं जाली एकरूप ।। नाहीं तारा ग्रह नाही हे मेदिनी । सर्व जनार्दनीं बिंबलेसे ॥ निवृत्ति निकट ब्रह्म सर्व घोट । अवघा निघोट राम आम्हां ॥ ३७. हरच्यिा तेजामुळे चंद्र, सूर्य, तारा दिसत नाहीत.. हरीविण न दिसे जनवन आम्हां । नित्य हे पौर्णिमा सोळाकळी। चंद्रसूर्यरश्मि न देखों तारांगणे । अवघा हरि होणे हेचि घेवों ॥ न देखों हे पृथ्वी आकाश पोकळी।भरलासे गोपाळी दुमदुमित॥. निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम । गयनी हे धाम गुरुगम्य ॥. ३८. आत्मबोधामध्ये निवृत्तिनाथ दर्पण विसरतात. गगनीं वोळंले येते ते देखिले । दर्पणी बिंबले आपण ॥ ते रूप रूपस रूपाचा विलास । नामरूपी. वेष कृष्ण ऐसे ॥ . १ गुंतली. २ ओंवाळून टाकलेला पदार्थ. ३ पोसणे, पुष्टी. ४ सकट, सर्व.. ५ वळणे, प्राप्त होणे. टाराम पण पितरताव.. ________________

संतवचनामृत: निवृत्तिनाथ. [६३८ सांडुनी दिठीव जालासे राजीवं । सर्वत्र अवेव ब्रह्म येणें ॥ निवृत्ति घडला सर्वत्र बिंबला । दर्पण विसरला आत्मबोधी । ३९. उन्मन्यवस्थेत सर्व हरिमय होऊन जाते. उन्मनी अवस्था लागली निशाणी । तन्मयता ध्यानी मुनिजनां ॥ मन तेथे नाहीं पहासीरे कांहीं । सर्वहरिडोही बुडी दे कां ॥ मनाची कल्पना देहाची भावना । शून्य ते वासना हरीमाजी ॥ निवृत्ति म्हणे सर्व हरिपिक पिकले । ज्ञानासी लाधले गुरुकृपा ॥ ४०. मन शून्यांत, ध्यान उन्मनींत, चित्त नारायणांत लागून __गेले आहे. अनंत ब्रह्मांडे अनंत रचना । शून्य हे वासना तेथे जाली ॥ मन गेले शून्यीं ध्यान ते उन्मनीं । चित्त नारायणी दृढ माझे ॥ जेथे नाही ठायो वेदासि आश्रयो । लोपले चंद्रसूर्यो नाही सृष्टि ॥ निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठी। नेतसे वैकुंठा गुरु माझा ॥ ४१. आम्हांस सर्वत्र गोसावी दिसतो. दिहाची दिवटी अखंड पैं सतेज । चंद्रसूर्य भोज नाही तेथें ॥ नाही तेथे रवि नाही तेथे चंद्र । अवघाचि महेद्र एकतत्वे ॥ दीपकेंचि दीपक विस्तार अनेक । अवघाचि त्रैलोक्य एकतत्त्वे ।। निवृत्ति संपन्न एकतत्त्व सेवी । सर्वत्र गोसावी दिसे आम्हां ॥ ४२. निवृत्तिनाथ आत्मालिंगाच्या चरणरजांवर लोळण घेतात. हरिदाससंगै हरिरूप खेळे । ब्रह्मादिक सोहळे भोगिताती॥ संत मुनिदेव सनकादिक सर्व । तीही मनोभाव अर्पियेला ॥ १ दृष्टि. २ सुंदर, ३ घडलेला घट ४ निशाण, नौबत. ५ प्राप्त. ६ दिवस. ७ कौतुक. ________________

६ ४३] साक्षात्कार पुंडरिका फळ वोळले सकळ । शंकर सोज्वळ प्रेमे डुले ॥ निवृत्ति लाळत चरणरजी लाठी । माजी त्या वैकुंठा आत्मलिंगी॥ ४३. आत्मा हाच विश्वरूपाने विनटतो. सर्व परिपूर्ण भरलेसे अखंड । त्यामाजि ब्रह्मांड अनंत कोटि । आपणचि देव आपणचि भक्त । आपण विरक्त सर्व जाला ॥ अनंत संकेत जीवशिवरत । मागुते भरत सिंधु तोये ॥ निवृत्ति म्हणती तेथींचे हे अंश । साधक विश्वास गयनिराजे ॥ . १ बलान्य, बळकट. २ पाणी. ________________

ज्ञानदेव. १ विठ्ठलभक्ति. १. सकळमंगळनिधि विठ्ठलाचे नाम घ्या. सकळमंगळनिधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी॥ म्हण कां रे म्हण कां रे जना। श्रीविठ्ठलाचे नाम वाचे]॥ पतीतपावन सोचे । श्रीविठ्ठलाचे नाम वाचे ॥ बाप रखुमादेवीवरु साचें । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥ २. एकटया विठ्ठलास जाणणे हीच भक्ति व हेच ज्ञान. सकळ नेणोनियां आन । एकला विठ्ठलुचि जाण ॥ पुढती पुढती मन । एकला विठ्ठलुचि जाण ॥ गुरुगम्य ही तयाची खूण । एकला विठ्ठलुचि जाण ॥ बुझसी तरि तूंचि निर्वाण । एकला विठ्ठलुचि जाण ॥ हेचि भाक्ति हेचि ज्ञान । एकला विठ्ठलाचे जाण ॥ बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाचि आण । एकला विठ्ठलुचि जाण ॥ ३. पूर्वसुकृताच्या जोडीमुळे विठ्ठलावर आवड उत्पन्न होते. रूप पाहतां लोचनी । सुख जाले हो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनी विठ्ठली आवडी ॥ सर्व सुखाचे आगरु । बाप रखुमादेवीवरु ॥ १ खरोखर. २ समजणें. ३ शेवट. ४ शपथ. ५ गडे. ६ पुण्य. ७ पिकण्याची जमीन. ________________

६५] उपदेश. ४. माझे सर्व गोत पंढरीसच आहे. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन।। कासया त्यजीन प्राण आपुले गे माये ॥ असेन धणीवरि आपुले माहेरी। मग तो श्रीहरि गीती गाईन गे माये ॥ सकळही गोत माझे पंढरीसी जाण । बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाची आण ॥ - २. उपदेश. ५. प्राणी संसारांतच मरमरून जातात. उपजोनि संसारी आपुला आपण वैरी। मी माझे शरीरी घेऊनि ठेलें।। या देहात म्हणे मी पुत्रदाराधन माझे। परि काळाचे हे खाँजें ऐसे नेणतु गेला ॥ कामक्रोधमत्सराचेनि गुणे। बांधला आपण नेणे भ्रमितु जैसा। . मिथ्या मोहफांसां शुक नळिके जैसा। मुक्त परि आपैसा पळो नेणें ॥ जळचर आमिष गिळी जैसा कां लागलासे गळी । आप आपणापे तळमळी सुटिका नाहीं। तैसे आरंभी विषयसुख गोड वाटे इंद्रियां। फळपाकी पापिया दुःख भोगी ॥ १ तृप्ति होई पर्यंत. २ राहिला. ३ खाऊ, भोज्य. ४ मांसाचा तुकडा. सं...२ ________________

१८ संतवचनामृतः ज्ञानदेव. [६५ राखोडी कुंकितां दीप नलगे जयापरी। तैसा शब्दब्रह्म कुसरी शान न पवे। व्रत तप दाने वेचिले पोटा। दंभाच्या खटपटा सिणतु गेला ॥ मृगजळाची नदी दुरूनि देखोनि । धांवे परि गंगोदक न पवे तान्हेला जैसा । तैसे विषयसुख नव्हचि हित । दुःख भोगितो बहुत परि सावधान नव्हे ॥ परतोनि न पाहे धांवतो सैरा। करितो येरझारा संसारींच्या। ज्ञानदेव म्हणे बहुता जन्मांचा अभ्यासु । तरीच होय सौरसु परब्रह्मीं ॥ ६. सुवस्तु सांडून कुवस्तूचे सेवन का करावे ? संसारयात्रा भरली थोर । अहंभावे चळे हाटबाजार । काम क्रोध विवेक मद मत्सर । धर्म लोपे अधर्म वेव्हार ।। यात्रा भरली जनीं । देवीं विन्मुख प्राणी। विषयांचा दाटणी । भ्रांति आड रे॥ एकी मीपणाच्या मांडिल्या मोटा। अहंभावाच्यागोणिया सांडिल्या चोहटीं। एकी गाढवावरीभरिली प्रतिष्ठा । तन्हि तृप्ति नव्हे दुर्भरा पोटा ॥ एक पंडितपण मिरविती श्रेष्ठ । एक शान विकून भरिती पोट । हिंसेलागी वेद करिताती पाठ।चौन्यांशी जिवां भोवतसे आर्ट। अज्ञानभ्रांतीची भरली पोती । सुवस्तु सांडूनि कुवस्तु घेती। १ गोडी, २ बाजार. ३ गांठोडी. ४ चव्हाट्यावर. ५ त्रास, श्रम. ________________

६८] उपदेश. सुखाचेनि चाडै सुखाची प्रीति। अमृत सांडूनियां विष सेविती॥ शांति क्षमा दया न धरवेचित्तीं। विषयावरी थोर वाढविली भाक्ति। जवळी देवो आणि दाही दिशाधांवती|स्वधर्म सांडूनि परधर्मी रति ऐसे जन विगुंतले ठाई । आत्महिताची शुद्धीचि नाहीं। नाशिवंत देह मानिला जिही तयांतृप्ति जाली मृगजळडोही रया॥ श्रीगुरुनिवृत्तीने नवल केले । देखणेचि अदेखणे करूनि दाविले। मीमाजी देवो याने विश्व व्यापिलें । बाप रखुमादेवीवरे विठले रया। ___७. मनास साक्ष ठेवून भक्ति कर. शरीर वरिवार का दंडिसी जंव वारिलें न करी तुझे मन । । जळी नेत्र लाऊनि टोकिती ऑविसालागोनि तैसे नको नको बकध्यान करूं रया ॥ चित्त सुचित' करी मन सुचित करीं न धरी तूं विषयाची सोय। वनी असोनि वनिता चिंतिसी तरि तपचि वाउगें जाय रया ॥ त्रिकाळ स्नान करिसी तीर्थजळी परि नवजती मनींचे मळ । तुझियानि दोषे तीर्थ कुश्चित जाले जैशी त्या रजऊची शीळ रया। आतां करिसी तरि चोखटचि करीं त्यासि साक्ष तुझे तुज मन । लटिकेन झकविसी तन्ही देवदुन्हा होसी बाप रखुमादेवीवरा _ विठ्ठलाची आण ॥ ८. देवाचें ध्यान करणे हेच सुखप्राप्तीचे साधन, श्रवण घ्राण रसना त्वचा आणि लोचन हैं तो दैन्याची द्वारें। वोळंगसी यांचे यांसींचि न पुरे तुज पुरविती काये । यालागीं धरिजेसु आपुली सोयँ रे बापा। १ दूर, परतें. २ आशाळभूतपणाने पाहणे. ३ आमिष. ४ परीट. ५ फसवणे. ६ आश्रय करणे. ७ मार्ग. ________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६८ अरे मना रे अरे मना रे न संडी हरिचरणकमळा रे ॥ध्रु०॥ ... स्वप्नींचे धन तें धन नव्हे । मृगजळीचे जळ ते जळचि नव्हे। अभ्रींची छाया ते साउली नव्हे। ऐसे जाणोनियां वेर्गी धरिजेसु आपुली सोय रे रया ॥ तूं जयाचा तेथोनि जिवे जितासी । त्या श्रीहरीते रेनोळखिसी। बाप रखुमादेवीवरा विठ्ठला चिंतिसी। तेणे पावसी तूं सुखाचिया राशी रया ॥ ९, मन अनिवार असल्याने गुरूस शरण जाण्याची आवश्यकता. अरे मना तूं पापिष्ठा । किती हिंडसी रे तूं नष्टा । सैरा शिणसी रे फुकटा । विठ्ठली विनटा स्थिर होई ॥ तूं अनिवार नावरसी। तुझेनि संगे नाडले ऋषी। तूं तंव अपवंशी पाडिशी । म्हणोनि गेले गुरुसी शरण || न सोडी हरिचरण । नाहीं नाहीं जन्ममरण । अविटी सेवी नारायण । तेणे मीतूंपण एकसिद्ध ॥ ज्ञानदेव शरण हरी। मन हिंडे चराचरी । न सोडी चरण अभ्यंतरी । नित्य श्रीहरी हृदयीं वसो॥ ३. गुरूची आवश्यकता. १०. गुरूवांचून अनुभव कसा प्राप्त होईल ? योगयागविधि येणे नव्हे सिद्धि । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥ भावेवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ १ सुशोभित, चांगला. २ वाटरहित, कंटाळारहित. ________________

६ १२ .गुरूची आवश्यकता. तवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेंवीण हित कोण सांगे ॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥ ११. " आहे तें वर्म वेगळोंचे." कां सांडिसी गृहाश्रम । कां सांडिसी क्रियाकर्म । कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे ते वर्म वेगळेचि ॥ भस्म उधळण जटाभारु । अथवा उदासी दिगंबरु।। न धरी लोकांचा आधारु । आहे तो विचार वेगळाचि ॥ जप तप अनुष्ठान । क्रियाकर्म यज्ञदान । कासया इंद्रियां बंधन । आहे ते निधान वेगळेचि ॥ वेदशास्त्र जाणितलें । आगमी पूर्ण ज्ञान जालें। पुराणमात्र धांडोळिलें । आहे ते राहिले वेगळेचि ॥ शब्दब्रह्मे होसी आगळा । म्हणसी न भिये कळिकाळा । बोधेवीण सुखसोहळा । आहे तो जिह्वाळा वेगळाचि ॥ याकारणे श्रीगुरुनाथु । जंव मस्तकी न ठेवीं हातु । निवृत्तिदास असे विनवितु । तंव निवांतु कवि होय ॥ १२. गुरु हा संतकुळींचा राजा आहे. गुरु हा संतकुळींचा राजा । गुरु हा प्राणविसांवा माझा । गुरुवीण देव दुजा । पाहतां नाहीं त्रैलोकीं ॥ गुरु हा सुखाचा सागर । गुरु हा प्रेमाचा आगरु । गुरु हा धैर्याचा डोंगरु । कदाकाळी डळमळीना ॥ गुरु हा वैराग्याचे मूळ । गुरु हा परब्रह्म केवळ । गुरु हा सोडवी तात्काळ । गांठ लिंगदेहाची ॥ १ गुह्य. २ अनुभव. ३ गोष्ट. ४ भस्म लावणे. ५ नन. ६ शास्त्र. ७ वेद. ________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६११ गुरु हा साधकासी साह्य । गुरु हा भक्तालागी माय। गुरु हा कामधेनु गाय । भक्ताघरी दुभतसे ॥ गुरु हा घाली ज्ञानांजन । गुरु हा दाखवी निजधन । गुरु हा सौभाग्य देऊन । साधुबोध नांदवी ॥ गुरु हा भक्तीचे मंडण । गुरु हा दुष्टांचे दंडण । गुरु हा पापाचे खंडण । नानापरी वारितसे ॥ कायाकाशी गुरुउपदेशी। तारकमंत्र दिला आम्हांसी। बाप रखुमादेवीवरासी । ध्यान मानसी लागले॥ १३. मदालसैचा पुत्रास गुरूपदेश. श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा। मनादि मूळ तूंचि विश्वव्यापका बीजा। समाधी येई पुत्रा स्वानंदाचिया भोजा। पालखीं पहुडैलिया नाशिवंत रे माया ॥ जागरे पुत्रराया जाई श्रीगुरु शरण । देह तूं व्यापिलासी चुकवीं जन्ममरण । गर्भवासु वोखटा रे तेथे दुःख दारुण । सावध होई कां रे गुरुपुत्र तूं सुजाण ॥ मदालसा म्हणे पुत्रा ऐक बोलणे माझे। चौयांशी घरांमाजीं मन व्याकुळ तुझे । बहुत शिणतोसी पाहतां या विषयासी। जाण हे स्वप्नरूप येथे नाही वा दुजे ॥ सांडिरे सांडि बाळा सांडि संसारछंदु । माशिया मोहळ रे रचियेला रे कंदु । १ तारणारा. २ उपभोग, अनुभव. ३ निजणे. ४ वाईट, ५ शहाणा. ________________

६१३] गुरूची आवश्यकता. २३ झाडूनि आणिकी नेला तयां फुकटाच वेधु । तैसी परी होईल तुज उपदेशे आनंदु ॥ सत्व हे रजतम तुज लाविती चाळा। काम क्रोध मद मत्सर तुज गोविती खेळा। या सवे झणे जासी सुकुमार रे बाळा । अपभ्रंशी घालितील मुकशील सर्वस्वाला ॥ कोसलियोंने घर सुदृढ 4 केलें। निर्गमु न विचारितां तेणे सुख मानिले। जाले रे तुज तैसें यातायाती भोगविलें। मोक्षद्वार चुकलासि दृढ कर्म जोडिले ॥ सर्पे मैं दर्दुर धरियेला रे मुखीं। तेणेहि रे माशी धरियेली पक्षीं । तैसा नव्हे ज्ञानयोगु आप आपणां भक्षी । इंद्रियां घाली पाणी संसारी होई रे सखी॥ पक्षिया पक्षिणी रे निरंजनी ये वनीं। पिलिया कारणे रे गेली चाराया दोन्हीं। मोहोजाळे गुंतली रे प्राण दिधले टाकुनि । संसार दुर्घट हा विचारु पाहे परतुनी ॥ जाणत्या उपदेशु नेणे तो भ्रांति पडिला । तैसा नव्हे शानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला। अनुभवी गुरुपुत्र तोचि स्वये बुझाला। ऐके त्या उद्धरणा गायक सहज उद्धरला॥ १चुकून. २ कोळी. ३ बाहेर येण्याचे द्वार. ४ बेडुक.५ समजला. ________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [$ १४ ४. नामाचे महत्त्व. १४. विठोबा, नाम तुझे सार. सार सार सार विठोबा नाम तुझे सार । म्हणोनि शूळपाणि जपताहे वारंवार ॥ आदि मध्यअंती निजबीज ओंकार। ध्रुवप्रल्हादअंबऋषी मानिला निर्धार ॥ भुक्ति मुक्ति सुखदायक साचार । पतीत अज्ञान जीव तरले अपार ॥ दिवसेंदिवस व्यर्थ जात संसार। बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाचा आधार ॥ बाप रखुमारा १५. नाम हे गगनाहून वाड आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयांजवळी ॥ नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥ हरिवीण जन्म तो नर्कची पैंजाणा। यमाचा पाहुणा प्राणी होय॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहूनि वार्ड नाम आहे ॥ १६. भगवंतांमध्ये जाणीव नेणीव काही नसून केवळ _नामोच्चारानेच मोक्ष मिळतो. जाणीव नेणीवे भगवंती नाहीं । उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ नारायण हरि उच्चार नामाचा । तेथे कळिकाळाचा रीर्घ नाहीं॥ १ शंकर. २ इच्छा. ३ मोठे. ४ ज्ञान. ५ अज्ञान. ६ प्रवेश. ________________

२५ ६१८] नामाचे महत्त्व. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी। ते जीवजंतूंसी केंवि कळे ॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असे ॥ १७. संपत्ति आटे, नाम नाटे. अंडज जारज स्वेदज उद्भिज । आटे, हरिनाम नाटे ते बरवें ॥ जे नाटे ते नाम चित्ती । रखुमादेवीपति श्रीविठ्ठलाचें ॥ शरीर आटे संपत्ति आटे । हरिनाम न आटे ते बरवें ॥ बापरखुमादेवीवराचे नाम नाटे । युगे गेली परि उभा विटे ॥ १८. नामस्मरणाने अनेक संतांचा उध्दार झाला आहे. नाम प्रल्हाद उच्चारी। तया सोडवी नरहरी। उचलूनि घेतला कडियेवरी। भक्त सुखे निवाला ॥ नाम बरवयां बरवर्ट । नाम पवित्र चोखट। नाम स्मरे नीलकंठ। निजसुखे निवाला ॥ जे धुरूसी आठवलें। तेचि उपमन्ये घोकिले। तेचि गजेंद्रा लाधले। हित जाले तयाचें ॥ नाम स्मरे अजामेळ । महापातकी चांडाळ। नामें जाला सोज्वळ । आपण्यासहित निवाला । वाटपाडी कोळिकु। नाम स्मरे वाल्मीकु। नामें उद्धरिले तिन्ही लोकु । आपण्यासहित निवाला ॥ ऐसे अनंत अपार । नामें तरले चराचर । नाम पवित्र आणि परिकर । रखुमादेवीवराचे ॥ १ देव, परमात्मा. २ जरायुज, ३ वृक्षादिक, ४ आटत नाही. ५-६ उत्तमांत उत्तम. ७ ध्रुव. ८ वाटमाऱ्या. ९ समर्थ, बलवान् . ________________

२६ संतवचनामृत : ज्ञानदेव. [$१९ १९. जन्मजन्मांतरीची पुण्यसामुग्री असेल तरच हरिनाम वाचेस येईल. जन्मजन्मांतरी । असेल पुण्यसामुग्री। तरिच नाम जिव्हाग्री । येईल श्रीरामाचें ॥ धन्य कुळ तयाचें । रामनाम हेचि वाचे । दोष जातील जन्माचे । श्रीराम म्हणतांचि ।। कोटि कुळांचे उद्धरण । मुखीं नाम नारायण । रामकृष्ण स्मरण । धन्य जन्म तयाचें ॥ नाम तारक सांगडी। नाम न विसंबो अर्धघडी। तप केले असेल कोडी। तरिच नाम येईल ॥ ज्ञानदेवी अभ्यास मोठा । नामस्मरण मुखावाटां। कुळ गेले वैकुंठा । हरि हरि स्मरत ॥ २०. पापराशि, भूतबाधा, सर्व नामस्मरणाने लय पावतील. हरिउच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥ तृणं आग्निमेळे समरस झाले । तैसे नामें केलें जपतां हरि॥ हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भेणे तेथे ॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥ २१. रामकृष्णनामाचीच माळा गळ्यांत घाला. कर्माचिया रेखा नुलंघती अशेखा । म्हणोनि विशेखों केशवसेवा। रामकृष्ण माळा घाला रे पां गळां। अखंड जीवनकळा राम जपा॥ करावा विचार धरावा आचार । करावा परिकर रामनामीं ॥ १ भोपळ्याची सांगड, २ गवत. ३ भीतीनें. ४ मर्यादा, ५ विशेष महस्वाची. ६ निश्चय. ________________

६३४] नामाचे महत्त्व. २७ सकळांचा सकळी त्यात तूं आकळीं। जिव्हा हे वाचाळी रामरतीं। रिघे रे शरण तुज नाहीं मरण । ठाकिसी चरण श्रीविठ्ठलाचे॥ निवृत्तिप्रसाद जोडे विठ्ठलनामै घडे । ज्ञानदेव बागडे पंढरीये ॥ - २२. प्राणास उलट मार्ग लावून अजपाजप करा. सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरी ॥ तैसे नव्हे नाम सर्वमार्गा वरिष्ठ । येथे काही कष्ट न लगती॥ अजपा जपणे उलट प्राणाचा । तेथेही मनाचा निर्धार असे ॥ ज्ञानदेवा जिणे नाविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥ २३. केवळ हरिजपानेंच प्रपंचाचे धरणे सुटेल. भावेवीण भक्ति भक्तीवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वायां ॥ सायास करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे॥ शानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचें ॥ २४. नामाकडे जिव्हा दिली असतां भाग्यास सीमाच नाही. काळ घेळ नाम उच्चारितां नाहीं। दोन्ही पक्ष पाही उद्धरती॥ रामकृष्णनाम सर्वदोषहरण । जडजीवां तारण हरि एक ॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥ ज्ञानदेवा सांग झाला नामपाठ । पूर्वजां वैकुंठमार्ग सोपा ॥ १ नाचणे. २ जप न करतां झालेला जप. ३ आईकडील व बापाकडील. ________________

२८ - संतवचनामृत : ज्ञानदेव. [६२५ ... २५, नामामृतगोडी मिळाल्यास जीवनकळा प्राप्त होईल. संतांचे संगती मनोमागे गति । आकळावा श्रीपति येणे. पंथे ॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा। आत्मा जो शिवाचा राम जप ॥ एकतत्त्वनाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥ नामामृतगोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता॥ ज्ञानदेव म्हणे नाम है सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ____ २६. हरिपाठ हीच समाधि, व हरिपाठ हीच संजीवनी. सर्वसुखगोडी सर्वशास्त्र निवडी। रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥ नाममंत्र जप कोटी जाईल पाप। कृष्णनामी संकल्प धरुनी राहे ॥ निजवृत्ति काढी सर्वमाया तोडी। इंद्रियां सवंडी लपो नको॥ तीर्थवती भाव धरी रे करुणा । शांतिदया पाहुणा हरि करी ॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥ २७. सगद्गद वाचेनें नामस्मरण केले असतां हरीस करुणा येईल. एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी॥ तें नाम सोपारे रामकृष्णगोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥ नामापरते तत्त्व नाहीरे अन्यथा। वायां आणिका पंथा जासी झणी ॥ ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरीं । धरोनि श्रीहरी जपे सदां ॥ २८. नवनीताप्रमाणे निवडून देवाचे स्मरण केल्यास.हरि हा _ घनदाट भरलेला दिसेल. चहं वेदीजाण साहीशास्त्री कारण । अठराही पुराणे हरिसी गाती॥ मंथुनि नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी माणु॥ १ सतरावी कळा. २ आधाराने, पाठीमागें. ३ सद्गदित होऊन, ________________

६३१] . संतांची योग्यता.. एक हरि आत्मा जीवशीवसमा । वायां तूं दुर्गमा न घाली मनः॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ २९. रामकृष्णटाहो फोडिला असतां वैकुंठभुवनांत घर होईल. जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटी राम भावशुद्ध ॥ न सोडी रे भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णी टाहो नित्य फोडी।। जात वित्त गोत कुळ शीळ मात । भजे कां त्वरित भावनायुक्त ॥ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनीं । तेणे वैकुंठभुवर्नी घर केले ॥ M ५. संतांची योग्यता. ३०. साधूंची भानुबिंबाप्रमाणे अलिप्तता. शर्करेची गोडी निवडावया भले । साधु निवडिले सत्संगती॥ सत्संगे प्रमाण जाणावया हरी। येर ते निर्धारी प्रपंचजात ॥ भानुबिंब पहा निर्मळ निराळ। अलिप्त सकळ तैसे साधु॥ . ज्ञानदेव हरि जपोनि निर्मळ । सदा असे सोज्वळ निवृत्तिसंगें ॥ ३१. संतांच्या अगाध देण्यापुढे चिंतामणि ठेंगणा वाटतो. संत भेटती आजि मज । तेणे जालों चतुर्भुज । दोनी भुजा स्थूळी सहज । दोनी सूक्ष्मी वाढल्या ॥ ... आलिंगने सुख वाटे। प्रेमें चिदानंद गोठे। __१ ऐक्य. २ पूर्ण. ३ हांक मारणे, ओरडणे. ४ आकाशाप्रमाणे. ५ दाटतो. - - - ________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६३१ हर्षे ब्रह्मांड उतटे । समूळ उठे मीपण ॥ या संतांसि भेटतां । हरे संसाराची व्यथा। पुढती पुढती माथां । अखंडित ठेवीन ॥ या संतांचे देणे । कल्पतरूहूनि दुणे । परिसापरिस अगाध देणे । चिंतामणि ठेंगणा ॥ या संतांपरिस उदार । त्रिभुवनीं नाहीं थोर । मायबाप सहोदर । इष्टमित्र सोयरे ॥ कृपाकटाक्षे न्याहाळिलें । आपुल्या पदी बसविलें। बाप रखुमादेवीवर विठ्ठले । भक्तां दिधले वरदान ॥ ३२. व्यासांच्या खुणेनें ज्ञानदेव सांगतात की भक्तांचे घरी देव आहे. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥ असोनि संसारौं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ शानदेव म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥ ३३. आज संतांच्या भेटीमुळे मनांत परमानंदाचा उदय झाला आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली। ती मज आजि फळासि आली ॥ परमानंदु आजि मानसीं। भेटी जाली या संतांसी ॥ मायबाप बंधु सखे सोयरे । यांते भेटावया मन न धरे॥ एक एका तीर्थीहुनि आगळे । तयामाजी परब्रह्म सांवळे ॥ निर्धनासि धनलाभ जाला । जैसा अचेतनी प्राण प्रगटला ॥ १ भरून वाहणे. २ दुप्पट. ३ पेक्षां. ४ हात. ५ खुणेनें. ________________

६३६ ] संतांची योग्यता. ३१ वत्स विघडेलियां धेनु भेटली। जैसी कुरंगिणी पाडसा मीनली ॥ है पीयूषापरते गोड वाटत । पंढरीरायाचे भक्त भेटत ॥ बाप रखुमादेवीवर विठ्ठले। संत भेटतां भवदुःख फिटले॥ ३४. हरि भक्तांच्या धांव्यास पावतो. त्रिवेणीसंगी नाना तीर्थे भ्रमी। चित्त नाहीं नामीं तरि ते व्यर्थ ॥ नामासी विन्मुख तो नर पापिया। हरिवीण धांवया नपवे कोणी॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । नाम तिन्ही लोक उद्धरती ॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥ ३५. “राजयाची कांता काय भीक मागे ?" श्रीगुरुसारिखा असतां पाठिराखा । इतरांचा लेखां कोण करी ॥ राजयाची कांता काय भीक मागे । मनाचिया जोगें सिद्धि पावे॥ कल्पतरुतळवटी जो कोणी बैसला।काय वाणी त्याला सांगिजोजी॥ शानदेव म्हणे तरलो तरलो। आतां उद्धरलो गुरुकृपे ॥ ३६. धनजेचे चिरगुट जतन करण्यास राजास कष्ट पडतात काय ? पाहे पां ध्वजेचे चिरगुट । राया जतन करितां कष्ट । तैसा मी एक पतित । परि तुझा मुद्रांकित ॥ मषीपेत्र ते केवढे । रावो चालवी आपुल्या पाडे । बाप रखुमादेवीवरदा । सांभाळी आपुल्या ब्रीदा ॥ १ वियोग झालेल्यास. २ हरिणी. ३ हरणाचे पोर. ४ अमृत. ५ धांव्यास. ६ गणना, किंमत, ७ तोटा. ८ वस्त्र. ९ दौत, व लेखणी. ________________

३२ संतवचनामृत : ज्ञानदेव. [६३५ ६. ज्ञानदेवांचे वैराग्ययुक्त बोल. ३७, जवळ असून देवाची भेट नाही. परिमळाची धांव भ्रमर ओढी। तैसी तुझी गोडी लागो मज ॥ आविट गे माय विटेना । जवळी आहे परि भेटेना॥ तृषालागलीया जीवनाते वोढी । तैसी तुझी गोडी लागो या जीवा ॥ बापरखुमादेवीवरा विठली आवडी|गोडियेसीगोडी मिळोन गेली॥ __३८. उघडया पाठीवर हीव वाजत असल्यने देव मला केव्हां घोंगडे देईल ? रात्रीदिवस वाहातसे चिंता । केधवां धडौता होईन मी ॥ खिरजट घोंगडे फाटके ते कैसे । वेचिले तैसे भोगिजे गा। वित्त नाहीं गांठी जीवित्वा आटी । उघडी पाठी ही वाजे ॥ घोंगडे देईल तो एक दाता । बापरखुमादेवीवरा मागो रे आतां। ३९. मी दूरदेशी पडले असल्याने देवाची भेट मला केव्हा होईल? पडिले दूरदेशी मज आठवें मानसीं। नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासी ॥ दिनु तैसी रजनी मज जाली गे माये । अवस्था लावुनि गेला अझुनी कां न ये ॥ गरुडवाहना गंभीरा येईगा दातारा। बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठला॥ १ पाणी. २ सवस्त्र. ३ झिजविलेलें. ४ श्रम. ५ थंडी. ________________

६४१] ज्ञानदेवांचे वैराग्ययुक्त बोल. ३३ ४०. चंदनाच्या चोळीने माझे सर्वांग पोळत आहे. घनु वाजे घुणधुणा वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा वेगी भेटावा कां॥ चांद वो चांदणे चौपे वो चंदन । देवकीनंदनेवीण नावडे वो ॥ चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी। कान्हो वनमाळी वेगी भेटावा कां ॥ सुमनाची सेज सीतळ वो निकी । पोळे आगीसारिखी वेगीं विझवा कां॥ तुम्हीं गातसां सुस्वरें ऐको नेदावी उत्तरें। कोकिळे वर्जावे तुम्ही बाईयांनी ॥ दर्पणी पाहतां रूप न दिसे वो आपुले। बाप रखुमादेवीवर विठ्ठले मज ऐसे केले ॥ ४१. ज्ञानदेवास जिणे जड होतें. तुजपासाव जन्मलो हरि पुढती सामावलो तुझ्या उदरीं। तुझिया व्यापकपणे चाले सत्कर्माची दोरी। सायखेडियाचे बाहुले कैसे हावभाव धरी । सूर्यकांतवेधे अग्निच प्रसवे सहज समंधु ऐसा धरी रया ॥ जेथे पाहे तेथे तूंचि दिससी लपोनियां अबोला कासया धरिसी। रसना रस सेवावे हे तो जीवआत्मयाची स्थिति । श्रवर्णी ऐकणे की नेत्री देखणे हे तो तुझीच नादश्रुति । घ्राणासि परिमळ घेणे की हस्तपादादिकां चळगति । १ कृष्ण. २ चंद्र. ३ चाफा. ४ भाजणें. ५ कळसूत्री. सं...३ . ________________

३४ संतवचनामृतः ज्ञानदेव. [६४१ हे तो तुझींच पांचैं तत्त्वे तरि तूं मज कां भोगवितोसि यातायाती रया॥ लाजेसी ना देवा माझे म्हणतां संन्याशासवे कैंची रे कांता। इंद्रिये दारुण जीवआत्मयासी हे तो सुखदुःखप्राप्ति । तेणे हे कारण की आत्मा पावे यातायाती। इंद्रिये दंडून तप जे करावे ऐसे बोलती वेदश्रति । साही जणांसी वेवाद लाविला हे तो तुझीच करणी सांगतीरया॥ मिथ्या हा प्रपंच की दर्पणाचे दुजे जवळी बिंब प्रकाशे। एक साचे दुजे दिसे तैसेचि दुसरे कां प्रतिभासे । लटिके म्हणों जाय तंव तेथे मन का विश्वासे। सगुण निर्गुण हे तो तुझीच माया तुझी तुजमाजी दिसे रया ॥ पुरे पुरे आतां जड जाले जिणे उरी नाही देवा लाजिरवाणे। ऐसी इंद्रिये वासनेसी आणिजती ते तुझी तुजमाजीं सामावती। समस्त जीव हे तो तुझे आकारले येरी ते लटिकीच भ्रांति । जाणसी ते करी देवा तेचि ते मागों किती। दग्धबीज तरु बीजी सामावला तैसा तुजमाजी श्रीगुरु निवृत्ति रया।। ४२. बापा विठ्ठला, त्वां मजशी अबोला कां धरिला ? नभ नभाचेनि सळे । क्षोभु वाहिजे काळिंदजिकै । सासिनले जगाचे डोळे । तें रूप पाहावया ॥ भलतैसी हांव । मना न पुरे तेथींची थाव । लावण्यसिंधु सिंव। सोडूनि जातो गे माये ॥ कटावरी ठेवुनी हात। जना दावी संकेत। भवजळाब्धीचा अंत । इतुलाची॥ १ तंटा. २ मावणे. ३ उसळणे. ४ भरास येणे, उत्सुक होणे. ५ मर्यादा. ________________

६४३ ] निवृत्तिप्रसाद. समचरणींच्या खुणा। उभा पंढरीचा राणा । तो आवडे जना मनां । दुर्लभ गे माये ॥ नेतिनेतीचेनि विरारे । उभऊनियां श्रीकरा करें। शंगाराचेनि पंडिभरें। चराचरें ॥ मेखळेचा मध्यमणी । उदो गेला ग्रहगणीं । मध्यनायकु तरणी किरणीं। विराजितु गे माये ॥ आमुची हृदयींची श्रीमूर्ति। घेऊनि विठ्ठलवेषाची बुंथी। आतां चाळविसी किती। बापा पालट नेघे ॥ बापरखुमादेवीवरा विठ्ठला। त्वां मजशी अबोला कांधरिला। जंव जीव आहे उरला । तो निघों पाहे ॥ ७. निवृत्तिप्रसाद. ४३. निवृत्तिनाथगुरूनें माझें अंधत्व नाहीसे केले. अंध पंगु दृढ जालो माया पडळभ्रांति। कर चरण विव्हळ गेले तंव भेटले निवृत्ति। ज्ञान मज उपदोशले नेले अज्ञान क्षिती। वृक्ष एक तेथे होता त्या तळी बसविले रीती॥ धर्म जागो निवृत्तीचा हरिनाम उत्सावो । कर्म धर्म लोपले माझे फिटला संदेहो। १ आतशय. २ खोळ. ३ पडदा. ४ उदय पावो, भरभराटीस येवो. ________________

। संतवचनामृत : ज्ञानदेव. [६४३ धर्म अर्थ काम पूर्ण दान मान संदेहो। नेघे मी इंद्रियवृत्ति रामकृष्णनामी टाहो ॥ कल्पना मावळली कल्पवृक्षाचे तळवटीं। चिंता हे हारपली माझी नित्य अमृताची वाटी। मन हे निमग्न जाले नित्य वसे वैकुंठीं। तापत्रय ताप गेले नाना दोषांचे थाटीं ॥ आत्माराम निर्गमले वेदशास्त्र गुह्यज्ञान । वासनाचि मोहोजाळी ते विराली नाना स्थाने । फुटले नाना घट तुटली नाना बंधने । सुटल्या जीवग्रंथि ऐसे केले त्या गुरुज्ञाने ॥ बुद्धिबोध संवगडे सजीव करचरण । । नयनी नयन जाले चक्षु मी समाधान । दिव्यदेह अमृतकळा दशदिशा परिघन । सर्व हे ब्रह्म जालें फळद फळले विज्ञान ॥ निवृत्तिगुरु माझा अंधपणा फेडिलों। सर्वत्र दृष्टि जाली एकतत्त्वे राहिलों । निरसली माया मोहो श्रीराम अंजन ले लो। ज्ञानदेव ज्ञानगंगें निवृत्तीने बुडविलो॥ ४४. ज्ञानदेव ह्मणतात की निवृत्तीने संपूर्ण वर्म माझें हाती दिले. तीर्थ बत नेम भावविण सिध्दी । वायांचि उपाधी करिसी जना॥ भावबळे आकळे येहवीं नाकळे । करतळी आंवळे तैसा हरी॥ १ समुदाय. २ प्राप्त होणे. ३ मिथुन. ४ नाहीशी होणें. ५ घालणे, ६ आंवळा, एक प्रकारचे फळ. ________________

६४.] प्रातिभश्रावणादर्श. पारियाचा रवा घेता भूमिवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधले संपूर्ण माझ्या हातीं ॥ ८. प्रातिभश्रावणादर्श. ४५. रक्त, शुभ्र, नील, पीत अर्थ समजून तुझी मौन्य धरा. सहस्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचे घर । संत्रावी निरंतर वसे जेथें ॥ रक्त शुभ्रवर्ण निळा पीत दिसे । दृष्टि शुद्ध असे तयामध्ये ॥ फार किती सांगो सज्ञान तुम्ही जन।अर्थ हा समजोन मौन्य धरा॥ गुह्याचेही गुह्य निवृत्तीने दाविलें ।मीच याचां हो बोले बोलतसे॥ ४६. नाना वर्णाचा अखंड तमाशा. अखंड तमासा डोळां देख निका । काळा निळा पारवा बाईयांनो॥ सदोदित नयनी नयन हारपे । निळ्याचे स्वरूपे मनी वसो॥ अकरा वेगळे नाही वा आणीक । माझे नेत्री देख शुद्ध ज्योती ॥ ज्ञानोबाची वाणी पूर्णरूपी घ्यावी । देहींच पाहावी आत्मज्योती॥ ४७. “बरवें रूप काळें अमोलिक." मन मुरडोनि डोळां लेइलें । काळेपणे मिरविले रूप त्याचें ॥ बरवे रूप काळे अमोलिक । म्हणोनियां सांगतसे शुद्धभावें ॥ रखुमादेवीवरु अगाध काळे । म्हणोनि सर्वत्र अर्पियले ॥ १ पारा. २ जीवनकळा, अमृतकळा. ३ तमाशा, चमत्कार. ४ मागे वळणे. ५ घालणे. ________________

३८ - संतवचनामृत : ज्ञानदेव. E&rc ४८. “काळा दादुला मज पाचारी गे माये." सुखाचा निधि सुखसागर जोडला। म्हणोनि काळा दादुला मज पाचारी गे माये ॥ प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी । काळे वनमाळी आले घरा गे माये ॥ बाप रखुमादेवीवर पुरोनि उरला। सबाह्यजू भरला माझे हृदयीं गे माये ॥ ४९, काळ्या जगजेठीचे दर्शन. आठवितां न पुरे मोवितां न मोवथे। सांगतां न सांगवे गुण त्याचे॥ परतली दृष्टि काळा देखिला जगजेठी। वेणीभागी पृष्ठीं कैसा दिसतु असे ॥ त्या गुणाच्या संगे कैसे अद्वैत जालें। मन म्हणौनि काळेपण बहु झाले गे माये ॥ पुरे पुरे बुद्धि निमाली वेदवाणी। आतां केविं वर्ण चक्रपाणी बहु काळे गे माये ॥ द्वादश मंडळे वोवाळुनी आलिये। तंव तंव काळे देखिलें रूपडे त्याचें ॥ अनुमाना नये अनुमाना नये। परतल्या श्रुती चोजवेना ॥ बुडी दिधली दाहीं हारपलीं। १ नवरा. २ बोलावणे. ३ नवाई, कोमलपणा. ४ आंतबाहेर. ५ मोजणे. ६ डोक्यावर. ७ समजणे. ________________

६५२] प्रातिभश्रावणादर्श. चोवीस मावली अगाधपंथीं ॥ प्रीतीचे पांघरूण काळे घोंगडें । रखुमादेवीवर विठ्ठले मज केले उघडे ॥ ५०. कृष्णवर्ण आत्मरूपाचे दर्शन. काळा पुरुष तोहागगनांत जो नांदे । अनुभवाच्या भेदे भेदलाजो॥ भेदून अभेद अभेदून भेद । सच्चिदानंद जेथ नाहीं ॥ ज्ञानदेव म्हणे तेथें अक्षय राहिला। आत्माम्यां पाहिला या दृष्टीसी॥ ५१, माझ्या दृष्टीने सांवळ्या रूपाचा आश्रय केला आहे. काळा लपंडाई काळे रात्री खेळे । मी स्वैसवें वेधली जाय काळ्या छंदें । काळे निळे हे अभ्र भासले । ऐसे रूप देखिले निर्गुणाचें ॥ ऐसा हा सांवळा माझिये दृष्टी मौल्हाथिला। उजरूनि गेला हा विठ्ठलु गे माये ॥ ऐसे भुलविले जाण काळेपणे आपणे । रखुमादेवीवर जाणे येर कांहीं नेणे ॥ ५२. नीळरूपाचे वर्णन. निळे हे व्योम निळे हे सप्रेम । निळेपणे सम आकारले ॥ नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥ नीळपण वत्तौ नीळपणे खातो। निळेपण पाहातों निळेपणे ॥ शानदेव आला नीळवर्ण शाळा । निळेपण गोवळा रातैलीये ॥ १ लपंडाव. २ आपोआप, आपणच. ३ आश्रय पावणे. ४ चकाकणे. ५ राहणे. ६ कृष्ण, ७ रमणे. ________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६५३ ___५३. नीळवर्णाने आकाश खाऊन टाकिलें. नीळवर्णरजें नीळवर्ण बुझे । नीळिमा सहजे आकारली ॥ नीळप्रभा दिसे नीळपणे वसे । नीलिये आकाश हारपले ॥ निळेपण ठेले निळिये गोविले । निळेपण सोविळे आम्हां जाले ॥ ज्ञानदेव निळा परब्रह्मीं गोविला। कृष्णमूर्ति सांवळा हृदयीं वसे॥ ५४. ज्ञानदेवांनी सांगितलेली अनुभवाची खूण. कैसे बोटाने दाखवू तुला । घेई अनुभव गुरुच्या मुला ॥ध्रु.॥ ज्या ठायीं चळे ना ढळे । आकळितां कोणा नाकळे । विश्व तयाचे सत्तेने चाले । कैसे बोटाने दाखवू तुला ॥ मागे पुढे सर्वे आसते । तुझ्या पायाखाली तुडवितें। तुझ्या दृष्टीपुढे दिसते गा। कैसे बोटाने दाखवू तुला ॥ ही खुण त्वां ओळखुनि ध्यावी । गुरुपुत्राला जाउनी पुसावी । ही खुण सांगितली ज्ञानदेवें । कैसे बोटाने दाखवू तुला ॥ ५५. पाहणे पाहतांच अनुभवियांस बोलणें पारुषतें. पाहाणेचि पाहासी काय पाहाणे तेथें नाहीं। पाहाणेचि पाहीं पाहाणे रया ॥ खुंटले बोलणे बोली बोला। बोलुचि मौन्ये ठेलों मौन्यामाजीं ॥ बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाचिये खुणे। अनुभविया बोलणे पारुषले ॥ १ समजणे. २ हलणे. ३ खुंटणे, ________________

६५९] प्रातिभश्रावणादर्श. ५६. अमोलिक ररनाची जोड. अमोलिक रत्न जोडले रे तुज । कां रे ब्रह्मबीज नोळखसी ॥ न बुडे न कळे न पिये चोरा । ते वस्तु चतुरा सेविजेसु ॥ ज्ञानदेवो म्हणे अविनाश जोडले। आणुनि ठेविलें गुरुमुखीं ॥ ५७. सुढाळ ढाळाचे अष्टपैलू मोती. सुढाळ ढाळाचे मोतीं । अष्टै अंगे लवै ज्योती । जया होय प्राप्ति । तोचि लाभे ॥ हातींचे निधान जाय । मग तूं करिसी काय । पोळलियावरि हाय । निवऊ पाहे ॥ अमृते भोजन घडे । कांजियाने चूळ जोडे । मग तये चरफडे । मिती नाहीं ।। अंगा आला नाहीं घावो । तंव ठाकी येक ठावो। बाप रखुमादेवीवर । विठ्ठलु नाहो ॥ ५८. लक्ष मोलाने मोत्यांच्या लेण्याची प्राप्ति. सुखसोज्वळ मोतियाचे लेणे । दिधलें जॉईजणे बाईये वो ॥ देशी नाही देशा उरी नाहीं । हार्टणी नाही ते पाटणी नाहीं॥ लक्षाचेनि लाभे जोडले निधान । बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठलु जाण ॥ ५९. ज्याने शून्य शोधिलें नाही त्याचे जिणे केवळ पशूचे होय. शुन्य शोधिले नाही जेणे । काय विवरण केले तेणें। अज्ञानपणे फुगणे । गाढव जिणे पशूचें ॥ १ सेवन कर. २ सतेज. ३ स्वरूप, आकार. ४ भरणे. ५ गणना. ६ नवरा. ७ जाणारे. ८ बाजार. ९ शहर. ________________

४२ संतवचनामृत : ज्ञानदेव. ६५९ वीकृति शून्याचार । हा नाहीं ज्या विचार । न घडे न घडे साक्षात्कार । जाण सर्वथा तया नरा॥ आधीं शून्याची शोधणी केली । मग सद्वस्तु प्राप्ति झाली। अमृतवेळाची बोली । बोलतां नये ॥ आधी शून्य ते शुभ्रवर्ण । मध्ये श्वेत रचिले जाण । अर्घ्य शून्य ते ताम्रवर्ण । प्रत्यक्ष जाण दिसतसे ॥ महाशून्याचा वर्ण निळा । अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा। ग्रासुनी ठेला भूगोळा । योगी डोळां पाहती॥ ऐसे शून्याचे नाही ज्ञान । तंववरी अवघेच अज्ञान । जनीं अवघा जनार्दन । अज्ञान सज्ञान काय बोलूं॥ ब्रह्मज्ञानाची किल्ली । सांगितली एकचि बोली। निवृत्तिराजे बोलविली बोली । तेचि बोली बोलिलों ॥ ६०. शून्याच्या भुवनांत अविनाशस्वरूपाचे दर्शन. शून्याचे भुवनीं स्वरूप अविनाश । प्रणवी पुरुष दिसतसे ॥ निळा रंग देखे सर्वांचे देखणीं । चैतन्यभुवनी समरस ॥ ज्ञानदेवा ध्यान सच्चिदानंदाचें । सर्व ब्रह्म साचे येणे येथे ॥ ६१. शून्य निरशून्य दोन्ही गेल्यावर निजवस्तूची प्राप्ति. चहूं शून्या औरुते महाशून्या परुते। सर्वांसी पहाते तेचि ते गा॥ दिसे तेही शून्य पहा तेचि शून्य । देहामाजी निरंतर भिन्न रूप ॥ शून्य निरेशून्य दोन्ही हारपली । तेथूनि पाहिली निजवस्तु ॥ ध्येय ध्यान ध्याता निरसूनि तीन्ही । झालो निरंजनी आतिलीन ॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे । गुरुमुखे खूण सांगितली॥ १ शेवटचें. २ ओंकार. ३ अलीकडचें. ४ पलीकडचें. ५ शून्याचा अभाव. . ________________

६६५] प्रातिभश्रावणादर्श. ६२. "डोळांचि पहा डोळां." डोळांची पहा डोळां शून्याचा शेवट । निळबिंदु नीट लखलखीत ॥ विसावों आले पातले चैतन्य तेथे । पाहे पां निरुते अनुभवे ॥ पार्वतीलागी आदिनाथे दाविलें। ज्ञानदेवा फावले निवृत्तिकृपा ॥ ६३. "ज्ञानदेवा नयन निवृत्ताने दाविला." स्वरूपाचे ध्यानीं निरंजन पाहिले । डोळ्याने दाविले चराचर ॥ आतां माझे नयन नयनी रिघों पाहे । नयना नयनीं राहे नयनचि ॥ नदेवा नयन निवृत्तीने दाविला । सर्वांठायीं झाला डोळां एक॥ ६४. ज्योतीपलीकडील ज्योतांचे दर्शन. डोळियांत डोळा काळियांत काळा । देखण्या निराळा निळारूप॥ ब्रह्मतत्त्व जाणे ज्योतिरूपें सगळा । ज्योतीही वेगळाज्योती वसे ॥ ज्ञानदेव म्हणे देवा ऐसी ज्योती। अर्धमात्रा उत्पत्ति सा जीवां। ६५. "माझ्या शरीरी ज्योतिलिंग उगवले." अगाधपण माझे अंगी बाणले । वरपडे देखिले मृत्तिकालिंग॥ त्यासी चैतन्य नाहीं गुण नाहीं । चळण नाहीं गुण रूप नाहीं ॥ माझ्या शरीरीज्योतिलिंग उगवलें। अगाध कवळिले हस्तेंवीण ॥ बाप रखुमादेविवरु ज्योतिलिंग विश्वनाथ । तेणे माझा मनोरथ पुरविला गे माये॥ १ चांगले, खरोखर. २ खाधीन झालेलें. ३ कवटाळणे. ________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६६६. ६६. त्रिभुवन व्यापणाऱ्या लिंगाचा साक्षात्कार. स्वर्ग जयाची साळोखा । समुद्रपाळी पिंड देखा। शेषासारिखी बैसका । जो आंधार तिही लोकां ॥ लिंग देखिले देखिले । त्रिभुवनी तिहीं लोकी विस्तारले ॥ मेघधारी तपन केलें । तारापुष्पी वरि पूजिले । चंद्रफळ ज्या वाहिले । वोवाळिले रविदी। आत्मनैवेद्य समर्पिलें । ब्रह्मानंदी मग वंदिले । ज्योतिलिंग मग ध्याइले । ज्ञानदेवी हृदयीं॥ ६७. शीत उष्ण प्रभा हेच निराकाराचे आकारणे. महावाक्यार्थ ते कैसे बापा । सत्वर नयनी पहा आत्मप्रभा ॥ प्रभा शीत उष्ण दोहींचेहीसार।प्रणव हा सारासार आरुता रया॥ ज्ञानदेव म्हणे सोपानाते ऐसें । निराकार असे आकारेसीं ॥ ६८. सहखदळरंध्रांमधील तेज काइसयासारिखें ह्मणून __ सांगावें ? सहस्रदळ बिंदु त्यांत तेज दिसे । ते हो काय ऐसे सांगा मज ॥ जेथ नाम रूप वर्ण नाहीं बा रे। ते हे रूप बारे चैतन्य बा ॥ शानदेव म्हणे अनुभवाची खूण । जाणे तो सुजाण अनुभविया ॥ ६९. चंद्रसूर्याहून आगळ्या तेजाचा साक्षात्कार. उन्मनीसंयोगे गोसावी विराजे । चहूं देहाचे ओझे निवारूनि ॥ सोहमस्मिचे छंदे परिपूर्ण । विज्ञान हे खूण जेथे नाहीं ॥ १ शाळुका. २ वलय. ३ बैठक, ४ अलीकडचा. ५ शहाणा. ________________

- - - ६७२ ] प्रातिभश्रावणादर्श. चंद्रसूर्याहुनी तेज ते आगळे । अव्यक्ते व्यापिले अनुभवे ॥ अनुभवाची खूण गुरुगम्य जाणती । ज्ञानदेवे विनंति हेचि केली ॥. ___७०. प्रकाशास दिनमाण उणा वाटतो.. धांवत धांवत आलो नयनांजनीं । प्रकाशा दिनमणी उणा वाटे ॥ निशि दिवस दोनी नाही जेथ बारे । अर्धमात्रेवरी लक्ष ठेवीं ॥ अक्षय अक्षर क्षरविरहित साजे । ज्ञानाचे जे ओझें चालेचि ना ॥ ज्ञानदेव चक्षु झाला परेवरी । यापरती बरोबरी नाहीं बापा ॥ ७१ चंद्रावांचून चांदणे व सूर्यावांचून तेज. चंचळ चांदिणे सोमेविण भासले । तेज निमाले रविबिंबविणे ॥ जगजीवनु म्हणे जगासि कारण । ते अणुप्रमाण तेथे दिसे ॥ बापरखुमादेवीवरु अणुप्रमाण भासला । सगुण निर्गुण जाला ___बाईये वो ७२. रात्रीस सूर्याचा व दिवसास चंद्राचा प्रकाश.. निशियेचे भरी भानु प्रतिबिंबी बिंबला । बिंबचि गिळुनी ठेला बिंबामाजी ।। रात्रि सूर्य वाहे दिनु चंद्र जाये। विपरीत गे माये देखियेले ॥ उदय ना अस्तु तेथे कैंचेनि त्रिगुण । आपणचि दर्पण होऊनि ठेला ॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी तोचि जाणे । संत तये खणे संतोषले ॥ १ सूर्य. २ चौथी अवस्था. ३ चंद्रावांचून. ४ स्वर्ग, मृत्यु, पाताळ या तिन्ही लोकांचे जीवन. ५ मार्ग आक्रमणे. ________________

४६ संतवचनामृत : ज्ञानदेव. [६७३ ७३ अनुपम्य तेजानें ब्रह्मांड धवळून जाते. अनुपम्य तेजें धवळले ब्रह्मांड । विश्वरूपी अखंड तदाकार ॥ रसी रस मुरे प्रेमाचे स्फुदन । एकरूपी धन हरि माझा ॥ नाद आणि ज्योति परिपूर्ण आत्मा । परोसि महात्मा उजेडला ॥ झाला अरुणोदयो उजळले सूर्यतेज । त्याहूनि सतेज तेज आले ॥ हारपल्या रश्मि देहभाव हरि । सिद्धि बुद्धि कामारी जाल्या कैशा॥ निवृत्तिउपदेश शानियां लाधला। तत्त्वी तत्त्व बोलला ज्ञानदेव ॥ ७४. अनाहतनादानें योगी आपल्या ध्येयास जातो. नासिकेचा प्राण कोणे मार्गी येत । नाद दुमदुमित अनुहाती॥ इंडे पिंगळेचा ओघ सैरां दिसे । त्यावरी प्रकाशे आत्मतेज ॥ शानदेव म्हणे अष्टांगयोगिया । साधितो उपाया याचि मार्गे॥ ७५. साधु आपलें अंतकाळचे लक्षण कसे ओळखतो ? कानी घालूनियां बोटे नाद जे पहावे। न दिसतांजाणावेंनऊ दिवस॥ भोवया पहातां न दिसे जाणा । आयुष्याची गणना सात दिवस ॥ डोळांघालोनियां बोट चक्र जे पहावान दिसतांजाणावें पांच दिवस नासाग्राचे अन न दिसे नयनी । तरि तेचि दिनी म्हणा रामकृष्ण ॥ ज्ञानदेव म्हणे हे साधुचे लक्षण । अंतकाळी आपण पहा वेगीं। १ दाट, पूर्ण भरलेला. २ दासी. ३-४ डावी व उजवी नाडी. ________________

. ६७८] स्वरूपसाक्षात्कार. ४७ ९. स्वरूपसाक्षात्कार. ७६. निवृत्तिनाथांनी नीच नवा विठ्ठल माझ्या देही दाखविला. रूप सामावले दर्शन ठाकले । अंग हारपलें तोच भावीं ॥ पाहो जाय तंव पाहाणया वेगळे। ते सुखसोहळे कोण बोले । जेथ जाय तेथे मौनचि पडिले । बोलवेना पुढे काय करूं ॥ सरिता ना संगम ओघ ना भ्रम । नाहीं क्रियाकर्म तैसे झाले ॥ जाणों जाय तंव जाणणयासारिखें। नवल विस्मय देखे कवणा सांगों बाप रखुमादेवीवरु विठ्ठलुची अंगीं । निवृत्तिराये वेगी दाखविला॥ आदिअंती तोचि सबरीभरितु । रूपनामरहितु नीचनवा ॥ ७७. देवाच्या देवास मी अनंतवेषाने अनंतरूपाने पाहिले. योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरे धणी ॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फिटला संदेहो निमाले दुजेपण । अनंतवेषे अनंतरूपे देखिले म्यां त्यासी ॥ रखुमादेवीवरी खूण बाणली कैसी ॥ ७८. आज आत्मारामास देखिल्याने दिन सोनियाचा झाला आहे. आजि देखिले रे । आजि देखिले रे ॥ सबाह्य अभ्यंतरी । अवघा व्यापकु मुरारी ॥ १ राहिले. २ संपूर्ण भरलेला. ३ नित्य नवीन. ४ गडे. ________________

. संतवचनामृत : ज्ञानदेव. [§uc दृढ विटे मन मुळीं । विराजित वनमाळी ॥ आजि सोनियाचा दिनु । वरि अमृताते वरुषे धेनु ॥ बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥ बाप रखुमादेविवरु । कृपासिंधु करुणाकरु ॥ ७९. "मुकियाचे परी आनंदु भीतरी." जाणों गेले तंव जाणणे राहिले। पाहों गेलिये तंव तेचि जाले गे माये ॥ इंद्रियांसहित चित्त ठकलौच ठेलें। मी माझे विसरले स्वये भाव ॥ ऐकोनि देखोनि मन होये आंधळे । परतोनि मावळे नाही तेथे ॥ अविद्या निरसली माया तुटली । त्रिगुण साउली तेथे रूप कैंचें ॥ चांग विचारिलें विवेके उगवले ! शान हारपले तयामाजीं ॥ मुकियाचे परी आनंदु भीतरी। अमृत जिव्हारी गोड लागे । बाप रखुमादेवीवरु विठ्ठल जागे । संत ये खुणे संतोषले ॥ ८.. आनंदमयस्वरूपाचे सर्वत्र दर्शन.. गुजगुजित रूप सांवळे सगुण । अनुभवितां मन वेडे होय ॥ भ्रमरगुंफा ब्रह्मरंध्र ते सुरेख । पहातां कौतुक त्रैलोकीं ॥ १ ढग. २ विस्मित होणे. ३ चांगलें. ________________

६८३] स्वरूपसाक्षात्कार. आनंद स्वरूप प्रसिद्ध देखिलें । निजरूप संचले सर्वा ठायीं ॥ __' शानदेव म्हणे या सुखाची गोडी। अनुभवाची आवडी सेवीरया। ८८१. विठ्ठलांमध्ये मुरून राहण्याचा आनंद संतजनांच्या माहितीचाच आहे. दुधावरिली साय निवडूनि दिधली। तैसीपरी जाली आम्हां तुम्हां। धालों मी ब्राँ उद्गारसंभ्रमे । अनुदिनी प्रेमें डुल्लतसे ॥ नाठवे आशा देहावरि उदास । मीतूंपण भास चौजवेना ॥ रखुमादेवीवरविठली मुरोनि राहिला।तो आनंदु देखिलासंतजनी॥ ८२, साधुबोधाने कापुराच्या ज्योतीप्रमाणे साधक आपल्यांतच मुरून जातो. साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभव ।। कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ति झाली जैसी॥ मोक्षरेखें आला भाग्य विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥ - ज्ञानदेवा गोडी संगति सजनीं । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं॥ ८३. जाग्रत्, स्वप्न, सुषुप्ति या अवस्थांचा विसर. माझे जीवींची आवडी । पंढरपुरा नेइन गुढी । पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रूप आनंदी आनंद सांठवे ॥ बाप रखुमादेवीवर सगुण निर्गुण । रूपं विटेवरी दाविली खूण ॥ १ भरलें. २ तृप्त होणे. ३ आवडत नाही, विचारांत येत नाही. ४ शोभला. ५ पताका. ____सं...४ . . ________________

५० संतवचनामृत : ज्ञानदेव. [६८४ ८४. जाग्रत्, स्वप्न, सुषुप्तीत उन्मनीतल्याप्रमाणेच साक्षात्कार. जागृति पुसे साजणी । कवण बोलिलें अंगणीं। निरखितां वो नयनीं । वृंदावनी देखियेला ॥ मानि वेधु तयाचा । पंढरिरायाचा ।। ध्रु.॥ स्वप्न सांगे सुषुप्ति । असे ममता हे चित्तीं। विठ्ठल होईल प्रतीति । मग गर्जती तुयें । मज बोलों नये ऐसे केले । मन उन्मनी बोधलें। बाप रखुमादेवीवर विठ्ठले । थिते नेले मी माझे ॥ ८५. निरंजनवेषांत अर्धनारीपुरुषाचे दर्शन. औटपीठावरी निरंजन देश । तेथ मी जगदीश असे बाई ॥ त्रिकुटाचा फेरा टाकिला माघारा । अर्धमात्रेवरावरी गेलों ॥ अर्धनारीपुरुष एकरूप दिसे । सर्वत्री संचले शून्य एक ॥ . ८६. जेथें नारीपुरुष एकरूपाने दिसतात तेथे देखणे पारुषतें. निशीदिवस दोघे लोपले ते ठायीं । निरंजन ते ठायीं लक्षुनी पहा ।। रविशशि ज्याचे तेजे प्रकाशले। नवल म्यां देखिले एक तेथें ॥ नारीपुरुष दोघे एकरूपें दिसती । देखणे पारुखे तया ठायीं ॥ शानदेव म्हणे शिव तेचि शक्ति । पाहातां व्यक्ती व्यक्त नाहीं ॥ . ८७. ज्ञानदेवांस विश्वरूपाचे दर्शन... विश्वरूप पाहे तंव सभोवतें रूपडे । पाहे चहूंकडे तेंचि दिसे ॥ काय करूं संये कैसा हा देव । माझा मज भाव एकतत्त्वीं॥ - १ गडे, २ स्थिर अससेलें. ३ खुंटणे, नाहीसे होणे. ४ गडे. ________________

$ ८९] स्वरूपसाक्षात्कार, सम तेज पाहे तंव एकचि वो तेज। ओंकार सहज निमाला तेथे॥ मूळचि मूळखूण न सांपडे सर्वथा।व्यांपिलें गे चित्ता तेजे येणे॥ स्वानुभव ते दिवटी उजळूनि जंव पाहे । तंव एक बिंब दाहे दिशा दिसे ॥ ज्ञानदेव निवृत्ति हे खूण पुसत । सांगावे त्वरित गुरुराजे ॥ ८८. रूप पहात असतां पात्यास पाते सुद्धा लागत नाही. तुझी गुणकीर्ति ऐकोनि आर्ते मन उचलले। आलिंगना धाविनले उतावीळ ॥ तनु मनु विगुंतले मन वाचा गुंतलें । मी माझे विसरले दर्शन गे माये ॥ उतावळेपणे भुजा दंड उचलले। नेणोनि ठकले ठेले रूप पाहतांचि बाईये॥ पातिया पाते नलगे पाहाणे तेंचि ठेलें। तैसे बाप रखुमादेवीवरविठ्ठले केले गे माये ॥ ८९. पाहता पाहतां तन्मयावस्था. चैतन्य चोरुनी नेले चित्त माझे सर्वे गेले। पाहे तंव तंव तन्मय जाले गे माये ॥ देवे नवल केले मन माझे मोहिलें। विसरूं तो आठवू जाला गे माये ॥ यासि जाणावयालागी अनुउते पाहे । तंव त्रिभुवन तन्मय जालें गे माये ॥ - १ रूप. २ उत्कट इच्छा. ३ तटस्थ. 33820 ________________

संतवचनामृतः ज्ञानदेव. [ące बाप रखुमादेवीवर विठ्ठलराये । माझे सबाह्याभ्यांतर व्यापिले गे माये ॥ ९०. देवाच्या दर्शनाने दृष्टीचा नाश. पावलो जी म्हणे देखिले देखणे । गेली आधी तेणे दृष्टि माझी ॥ उचललिया बाह्या क्षेम देईन तया । गेली माझी माया देहत्यागें॥ आनंदें स्फुदत येती अश्रुपात । अगा गुरुनाथ देवराया ॥ निवृत्तिदास म्हणे तूते जीवें वोवाळिलें । शिर निरोपिले तुझ्या चरणी॥ ९१. रूपाचा दर्पण पहात असतां द्रष्टाही नाहीसा होतो. स्वरूपाचेनि भाने बिंब हे ग्रासिलें। परि खूण न बोले काय करूं। रूपाचा दर्पण रूपैविण पाहिला। द्रष्टाही निमाला नवल कायि ॥ जिकडे जाये तिकडे दर्शन सांगाती । उदो ना अस्तु हे नाही द्वैतस्थिती ॥ध्रु.॥ पूर्वबिंब शून्य हे शब्दाच निमाले । अनाम्याचेनि भले होते सुखें । त्यासि रूप नांव ठाव संकल्प आणिला । अरूपाच्या बोला नाम ठेला ॥ वाप रखुमादेवीवरु विठ्ठलुचि एक। भोगी समसुख ऐक्यपणे। अदृश्य अंबुलो जागतां निविजे। परि सेस्वभावी दुजे नाही रया ॥ नवरा. २ शय्या. ________________

- ६९३] स्वरूपसाक्षात्कार, __ ५३ ९२. ज्याच्या भेटीस गेलें तोच मी होऊन ठेलें. भेटिसी गेलीये तंव तेंचि जालीये। भुलली ठेलीये मज न कळे काहीं॥ परतलिया दृष्टी जंव मागुता न्याहाळीं। तंव काळी ना सांवळी मूर्ति चोजवेना ॥ काय सांगों माये न कळे तयाची सोये । येणे मनाचे मोडुनि पाये वेधियेलें ॥ आंतु बाहेरी कैसी भरले निरंगें। क्षेम देऊ गेले अंगें तंव तो जडूनि ठेला ॥ वारितां नावरे काय सांगों माय गोठी । करूनि ठेला सौठी जीवित्वेसीं ॥ आशेचिये हांवे तंव तो परताचि धांवे । निराशेसि पावे वेळुन लागतां ॥ बाप रखुमादेवीवरु विठ्ठली उपावो। ज्ञानदेवा भावो निवृत्तिपायीं ॥ ९३. सर्वेश्वराच्या स्वरूपाचा निर्धार कोणास करितां येईल ? मलयानिळ शीतलु पौलवी नये गाळू। सुमनाचा परिमळु गुंफितां नये । तैसा जाणा सर्वेश्वरु म्हणों नये सान थोरु । याच्या स्वरूपाचा निर्धारु कवण जाणे ॥ मोतियाचे पाणी भरूं नये वो रांजणीं । गगनासी गवसणी घालितां नये ॥ १ मार्ग. २ रंगरहित. ३ अदलाबदल. ४ पदर. ५ खाळ. ________________

५४ संतवचनामृत : ज्ञानदेव. डोळियांतील बाहुली करूं नये वेगळी। . धांवोनि अळी धरितां नये ॥ विठ्ठलरखुमाईचे भांडणी कोण करी बुझावणी । तया विठ्ठलचरणी ज्ञानदेवो ॥ ९४. प्रपंच पाहणे आतां पुरें; स्वरूपाच्या आनंदात राहणे हेच श्रेष्ठ होय. .. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे । योगराज विनवणे मना आले वो माये ॥ देह बळी देउनी साधिलें म्यां साधनी । याने समाधान मज जोडले वो माये ॥ अनंगपण फिटले मायाछंदा सांठवलें। सकळ देखिले आत्मस्वरूप वो माये ॥ चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला। तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥ पुरे पुरे आतां प्रपंच पाहणे । निजानंदी राहणे स्वरूपी वो माये ॥ ऐसा ज्ञानसागरु रखुमादेवीवरु । विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला वो माये ॥ ९५. आंत विठ्ठल, बाहर विठ्ठल, मीच विठ्ठल असे मला वाटत आहे. मजमाजी पाहतां मीपण हारपले। उकलौच ठेले सये मन माझे ॥ आंत विठ्ठलु बाहेर विठ्ठलु । मीचि विठ्ठलु मज भासतसे ॥ मीपण माझे नुरेचि कांहीं दुजे। ऐसे केले निवृत्तिराजे म्हणे ज्ञानदेवो॥ १ अंचल, पदर. २ समजूत. ________________

९९] स्वरूपसाक्षात्कार. ९६, देवा, तूं व मी आतां एकच घोंगडें पांघरूं. तूं माझा स्वामी मी तुझा रंक । पाहतां न दिसे वेगळीक ॥ मीतूंपण जाऊं दे दुरी । येकचि घोंगडें पांघरों हरी॥ रखुमादेवीवर विठ्ठलुराया। लागेन मी पायां वेळोवेळां ॥ ___९७. मीच प्रत्यक्ष निवृत्तिरूप बनलों. निरंजनवना गेलिये साजणी । तेथें निर्गुणे माझा मनीं वेधियेले ॥ सुखाची अतिप्रीति जाहली गे ब्रह्मीं। श्रीगुरु निवृत्तिमुनि मी जाहलों गे माये ॥ .. बापरखुमादेवीवरु विठ्ठलु सहजावला । निर्गुण दाविला विसुरा गे माये॥ ९८. तत्वमसिचा साक्षात्कार. तूं तो माझे मी तो तुझें । ऐक्य जाले तेथे कैंचे दुजें ॥ तूं तो मी गा मी तो तूं गा । अज्ञाने बापुडी नेणती पैं गा॥ निर्गुण होते ते गुणासि आलें । अज्ञान निरसूनि एकचि जालें। ज्ञानदेव म्हणे परतूनि पाहीं । जीवाचा जीवनु कवणे ठायीं॥ ९९. निजब्रह्माचें चक्षुवीण पाहणे, व हातेंवीण स्पर्श करणे, चातकेंविण लक्ष अंतरीच ठसलें । तेथें एक वोळले ब्रह्ममेघ ॥ ते जीवन अमृत जीवासि आले । त्याहूनि एक आगळे गे माये ॥ रखुमादेवीवरु हातेविण स्पर्शले । चक्षुवीण देखियले निजब्रह्म . गे माये ॥ - १ दीन. २ आश्चर्यरूप. ३ प्राण. ४ वळणे, प्राप्त होणे, ________________

५६ संतवचनामृत : ज्ञानदेव. [६ १०० १००. ते दिसते पण हाती धरवत नाही. मन मुरे मग जे उरे । ते तूं कां रे सेवीसि ना ॥ दिसते परी न धरवे हाते । ते संतांते पुसावें ॥ तेथींची खूण विरळा जाणे । निवृत्तिप्रसाद ज्ञानदेवो म्हणे॥ १०१. देहावांचून देवाचें आलिंगन. कोठिची भरोवरी सरोनि गेली शरीरीं । संसाराची उरी कांही नुरेचि गे माये ॥ लक्षाचा लाभ मज घडला गे माये । कवणे उपायें चरण जोडिले वो॥ चिंतनी चिंतितां काय चिंतावें। ते अवघेचि मनी रूप गिळावें गे माये ॥ बाप रखुमादेवीवरु देहेंविण आलिंगिला। तो समर्थ माल्हाथिला बाईये वो ॥ १०२. " तें रूप देखें परी बोलवेना." देऊनियां भेटी मजसी न करी गोठी । लांचावला जीऊ पाठी न राहे वो॥ निष्ठुर म्हणों तरी आपंगितो माते। व्यापूनि जिवाते उरी उरवितो ॥ तो दाखवा वो माये धरिन त्याचे पाये। तयालागी जीऊ आहे उतावेलु ॥ १ सामुग्री. २ बाकी. ३ आश्रय करणे. ४ आपलासा म्हणणे, स्वीकार करणे. ________________

F१०४] ५७ स्वरूपसाक्षात्कार. भेटीचेनि सुखे मनचि होय मुके। ते रूप देखें परी बोलवेना ॥ अगुणगुणाचा म्हणौनि घातली मिठी। तंव तो आपणया समसाठी करुनि ठेला ॥ काय नेणों कौमाण कैसे वो जालें। चित्त चोरुनी नेले गोवळेने ॥ बाप रखुमादेवीवर विठ्ठले अंग लपवूनि । चैतन्य चोरूनि नेले गे माये ॥ १०३. " घडिये घडिये गुज बोल कारे." तुझीये निडळी कोटि चंद्र प्रकाशे । कमळनयन हास्यवदन हांसे॥ कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे । घडिये घडिये गुज बोल कां रे॥ उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो। बाप रखुमादेवीवरु . विठ्ठल नाहो ॥ १०४. ज्यास आत्मज्ञान दृष्टीस दिसत नाहीं त्यासी गोष्टी करूं नये. आत्मज्ञान जया न देखे निजदृष्टीं। तया नरा गोष्टी करूं नये ॥ तुर्यारूपे जाण प्रभा हे निःसीम । तया परता राम असे बापा ॥ ज्ञानदेवा गुज दाविले गुरूनें । मने अनन्ये काल्पतांचि ॥ १ कार्य. २ कपाळ. ३ नवरा. ________________

५८ संतवचनामृत : ज्ञानदेव. [६१०५ १०५. हा बोध मूर्खास सांगू नये. ऐका हा शेवट अभंगमाळा झाली । तुर्या हेच आली प्रत्यया गा॥ तुर्या तेचि उन्मनी क्षर ते अक्षर । निर्गुण साकार ऐसे देखा ॥ देह ते विदेह महाकारण ब्रह्म । हे निश्चयाचे वर्म ऐसें जाणा ॥ कनक तेचि नगं समुद्र तरंगी । देह हा सर्वांगी ब्रह्म जाणा ॥ अभंगा शेवट जाणे निवृत्ति एक । त्याणे मज देख कृपा केली ॥ मूर्खासी हा बोध सांगों नये बापा। अभंगकृत्याचालेश नसो हाती॥ ज्ञानदेव ह्मणे हे कृत्य हातां नये । माय देऊं नये कोणासही ॥ १ अनुभव. २ दागिना. ________________

सोपानदेव. १. हरीचें ध्यान करणारे नाना योनिरूप आपदा पावत नाहीत. मनाचे मवाळ हरिरूप चिंतिती । रामकृष्णमूर्ति नित्यकथा॥ रामकृष्णध्यान सदा पैं सर्वदा। न पवेल आपदा नाना योनी ॥ हरिध्यान जप मुक्त मैं अनंत । जीव शिवीं रत सर्वकाळ ॥ सोपान प्रेमा आनंद हरीचा । तुटला मोहाचा मोहपाश ॥ २. सर्व काही सोवळे आहे; अभक्तांचे मनच फक्त ओवळे होय. पृथ्वी सोवळी आकाश सोवळे । मन हे वोवळे अभक्तांचे ॥ ब्रह्म है सोवळ न देखो वोवळ । असो खेळमेळे इये जनीं॥ ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी । तरसी निर्धारी एक्या नामे ॥ सोपान अखंड सोवळा प्रचंड । न बोले वितंड हरिविण ॥ ३. नाम हेंच परब्रह्म आहे. आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे । नाममार्गे वेळगे निघे रया ॥ नाम परब्रह्म नाम परब्रह्म । नित्य रामनाम जपिजेसु ॥ अंतरींच्या सुखे बाहिरिलीया वैखें । परब्रह्म सुखे जपतुसे ॥ सोपान निवांत रामनाम मुखांत । नेणे दुजी मात हरीविण ॥ १ मृदु. २ कष्ट, त्रास. ३ जन्म. ४ बडबड, वितंडा. ५ चाल, जा. ६ वेषाने. ________________

मुक्ताबाई. १. मुक्ताबाईचा अनुभव. १. मी अंध वायां जात असतां निवृत्तिराजाने मजला सावध केलें. ऊर्णाचियां गळां बांधिली दोरी । पाहो जाय धरी तंव तंतु नाहीं। तैसें जाले बाई जंव एकतत्त्व नाहीं। दुजी जंव सोई तंव है अंध॥ ऐसी मी हो अंध जात होते वायां । प्रकृति सार्वया पावली तेथे ॥ मुक्ताई सावध करी निवृत्तिराज । हरिप्रेमें उमंज एकतत्त्वे ॥ २. निवृत्तीच्या तटाकाने आम्ही मूळच्या स्थानास जाऊन प्रपंचाशी अबोला धरिला. प्रारब्ध संचित आचरण गोमटें। निवृत्तितटाके निघालोआम्ही ॥ मुळींचा पदार्थ मुळीच मैं गेला । परतोनि अबोला संसारासी ॥ सत्यमिथ्याभाव सत्वर फळला । हृदयीं सामावला हरिराज ॥ अव्यक्त आकार साकार हे स्फूर्ति । जिवेशिवें प्राप्ति ऐसे केले ॥ सकाम निष्काम वृत्तीचा निजफेर । वैकुंठाकार दाखविले ॥ मुक्तलगं मुक्त मुक्ताईचे तट । अवघेचि वैकुंठ निघोटॅ रया ॥ ३. नामस्मरणामुळे देव निजानंदवैकुंठ उघडे करितों. नाममंत्रे हरि निजदासां पावे । ऐकोनियां धांवे झडकरी ॥ सुदर्शन करी पावे लवकरी। पांडवां साहाकारी श्रीकृष्ण रया। १ ऊर्णनाभि, कोळी, २ कृपा. ३ मदतीला. ४ समज. ५ भरणे, मावणे. ६ मुक्तीच्या जवळचें. ७ संपूर्ण. ८ साह्यकारी. ________________

संतवचनामृत : मुक्ताबाई. [६३ निजानंद दावी उघड 4 वैकुंठ। नामेची प्रगट आम्हांलागी॥ मुक्ताई जीवन मुक्त हा संसार । हरि पारावार केला आम्हीं ॥ ४. मुंगी आकाशात उडून तिने सूर्यास गिळिलें. मुंगी उडाली आकाशी। तिणे गिळिले सूर्यासीं ॥ थोर नवलाव जाला । वांझे पुत्र प्रसवला ॥ . विंचू पाताळासी जाय । शेष माथां वंदी पाय ॥ माशी व्याली घार झाली । देखोन मुक्ताई हांसली ॥ ५. दिवसां चांदणे व रा ना उष्ण तेज तुम्ही पाहिले आहे काय ? देउळाच्या कळशी नांदे एक ऋषी। तया घातली पुशी योगेश्वरी॥ दिवसां चांदिणे रात्रीं पडे उष्ण । कैसेनि कठिण तत्त्व जाले ॥ ऋषि म्हणे चांपे कळिकाळ पैंकापे । प्रकाश पिप निघोन जाय ॥ ठायींच्या ठायीं असे पाहतां न दिसे । मनाच्या धारसे एक होय॥ एकट एकले वायांचि पैं गुंफले । मुक्त पैं वरिले सहज असे ॥ वैकुंठ अविट असोनि प्रकट । वायांचि अडवाट मुक्ताई म्हणे ॥ ६. चंदनाने वनस्पतीस वास लागतो त्याप्रमाणे हरिपाठाने तुम्ही हरिरूपच व्हाल. सहस्त्रदळी हरि आत्माहाकुसरी। नांदे देहाभातरी अलिप्त सदा॥ रविबिंबबिंबे घटमठी सदा । ते नातळे पैं कदा तैसा आम्हां ॥ अलिप्तश्रीहरी सेवी कां झडकरी सेवितां झंडकरी हरिच होआल॥ चंदनाच्या हेती वेधल्या वनस्पती। तैसी आहे संगती या हरिपाठे॥ मुक्ताई चिंतित चिंतामणि चित्तीं। इच्छिले पावती भक्त सदा ॥ - १ प्रश्न. २ प्रवाह. ३ चातुर्याने. ४ सुवास. ________________

६] चांगदेवास उपदेश. २. मुक्ताबाईचा चांगदेवास उपदेश. ___७. मायेच्या पुराचे वर्णन उलट उलट माघारा प्राण्या फिर गोते खाशी। भरला पुर मायेचा लोंढा वाहुनियां जाशी ॥ भवनदीचे पाणी सखया मोठे ओढितें। भल्याभल्यां पोहणारा उचलुन खाली पाडीते ॥ क्षणभंगुर संसार याचा भरंवसा नाहीं। दुर्लभ नरतनु गेल्या मग तूं पडशिल पस्ताई ॥ म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरिंची खूण । धरि सद्गुरुचे पाय तुजला नेतिल उद्धरून ॥ ८. अहंकाररूप घोंगडें सांडून वटेश्वराचे ध्यान कर. अहंकार अविद्या हैचि पै घोंगडी । पांघुरतां गोडी नाहीं मज ॥ घोंगडे नेले नारायणा । अछिप होतो बोल कोणा ॥ आशा तृष्णा दोघी बहिणी । लोळती धरणी घोंगडीया ॥ हिंसा निंदा चिंता या तिघीजणी । घोंगडीया आटणी होतसे ॥ घोंगडे माझे फाडले पोरीं। कामक्रोध दोघी सहोदरीं ॥ मुक्ताई म्हणे घोंगडे सांडी। वटेश्वरी मांडी ठाणं आतां ॥ १ धक्का. २ पश्चाताप. ३ दाटणी. ४ ठिकाण. ________________

संतवचनामृत : मुक्ताबाई. [६९ ९. बोलणे झाल्यास अबोलण्याने बोल. वेदश्रुति ठक पडियेली वाचा । तेथे कवणपाड तुझिया बोलाचा॥ काही बोलसीतरी अबोलणे बोलाबोलणे बोलसीतरी तितुके खोल अनिर्वाच्य ब्रह्म न वर्णवे वाणी। बोलो म्हणती ते न लजती मनी॥ बोलणे अबोलणे वटेश्वरीं गुज। मुक्ताई म्हणे चांगया बुझे । १०. उन्मनीरुप निद्रेच वर्णन. गुणातीत डाहाळी पाळणा लाविला । तेथे सुत पहुडला मुक्ताईचा निजी निज बाळा न करी पें ऑळी । अनुहात टाळी वाजविते ॥ निद्रा ना जागृति भोगी पैं उन्मनीं । लक्ष ते भेदूनि निज पार्टी ॥ निभ्रांत आतां पाळणा विणवुनी । मन हे बोधनि पवनदोरा ॥ एकविससहस्र श्वास वेळोवेळां । बाळा तोही डोळा स्थिर करी॥... निद्रा ना जागृति निजसील काई । परियेसी चांगया बोले मुक्ताई। ११. अद्वैतानुभवांत निद्रा. आपुलिया मारूनि येई कां भेटी । मग गोल्हार्टी सांठवीन ।। शांति धाया मेळवीन तुज । मग तूं बूझ सोहंकारी ॥ सोहं सोहं सोहं हाचि धरी छंदु । मुखे निद्रा करीं अद्वैती रे॥ तेथे जाग पां जाग नीज पां नीज । मग तुज वो कैचा ॥ तेथे ओळखी नाही विसरु नाहीं। चिदानंदी पाहीं रूप तुझे। द्वैताद्वैत भासले पाहीं। वटेश्वरसुता बोले मुक्ताई ॥ १२. नोवरीच्या पोटास नावरा येतो. नोवरीचे पोटी नोवरा जन्मला । सोहळा जाला काय सांगों ॥ नोवऱ्याने नोवरी देखिलच नाहीं । सोहळा होतो सांगों काई॥ तो नोवरा नातुडे कोणा । मुक्ताई चांगया सांगतसे खुणा ॥ १ भूल. २ समज. ३ फांदी. ४ छंद. ५ ऐक. ६ दाई. ७ समज. ८ जागृति. ९ चांगदेव. १० स्वाधीन न होणे. ________________

चांगदेव १. चांगदेवास मुक्ताईने पोसणा घेतलें. चांगा जन्मला मध्यान्हकाळी । मायबापे दोन्ही नाहीशी झाली ॥ मुळीच चांगा नाहीसा झाला। मुक्ताई म्हणे चांगया भलाभला ॥ वटेश्वर चांगा मुळी लागला । पोसणा घेतला मुक्ताईने । २. चांगदेव सत्रावीचे दूध पितो. सत्रावी दोहतां कांहींच नाहीं । दोहन ते पाहीं ब्रह्मस्थानी ॥ दोस्तनी पान्हाइली तिसरेनि दोहिली।दोहन ते उरली विश्वंभरा॥ बांगा वटेश्वर विश्वंभर जाला। प्रेमें तो लाधला क्षीर देखा ।। ३. चांगदेवाचे शांतीशी लग्न लागतांना मुक्ताई करवली हळद वाटते. वहाडी आले संसारनगरा। चांगा नोवरा केळवला ॥ हाती कांकण उभा वटेश्वरीं। शांति हे नोवरी पर्णावया॥ पर्णिली शांति बैसली पाटीं । मुक्ताई करवली हळदुली वाटी॥ ४. कुडी ही नोवरी, आत्मा हा नोवरा. कुडी हे नोवरी आत्मा हा नोवरा। दोघे पणे जाती निरंतरा॥ पांचही प्राण सर्वही व-हाडी। आशा तृष्णा दोन्ही देशधडी॥ शांति निवृत्ति दोघी सुवासिनी । भक्ति करवली सखी बहिणी॥ घटेश्वर चांगा वरधंवा । तुम्ही नेऊनि मध्ये बैसवा ॥ १ दत्तक, पासण्याकरितां घेतलेला. २ दूध काढणे, ३ पान्हा फुटणे, दूध देणे. ४ केळवण झालेला. ५ लग्न लावणे, वरणे. ६ लग्न लावणे. ७ वर, नवरा. सं...५ ________________

६६ संतवचनामृत : चांगदेव. [६५ ५. जातो ममायं विशदः प्रकामं प्रत्यर्पितन्यास इवांतरात्मा. आत्मा हा नोवरा कुडी हे नोवरी। लिंबलोण करी वोहरांसी ॥ सोहळा जाला नोवरा गांवा गेला। वेगी आइती करा नोवरी बोलावा ॥ न्हाणिली धुणिली गजस्कंधी मिरविली । बोळवीत गेली चौघे जणे ॥ ज्याची नोवरी त्या हाती लाविली । चांगा म्हणे आतां निश्चित झाली ॥ ... ६. जळांतील सूर्याप्रमाणे देहांत परमात्म्याचा प्रकाश.. प्रकृतीचे पूजन प्रकृतीच्या ठायीं । असतां तोही परि चोजवेना । जळामाजी भानु बिंबला दिसे । तैसा देही दिसे परमात्मा ॥ पुष्पामाजी परिमळ राहिला निश्चळ। तैसा तो अकळ लक्षा नये॥ हे बोलणे सिद्धांतींचे शेवटीं। चांगया वेदांती कथन केले॥ ७. आकाशास मुंगीने गवसणी घातली. आकाश कवळिलें मुंगीने बाहीं । तेथे एक नवल वितले पाहीं ॥ नवल झाले नवल झाले । विश्व व्यापिले मुर्कुटाने ॥ वटेश्वरी चांगा सूक्ष्म स्थूळ । जाति ना कुळ बाईयांनों । ८. डोळ्यांवांचून स्वस्वरूपाचे देखणे. डोळे पैं दोंदीलं जाले माझे । आपुले सहजै रूप देखे ॥ सुखाची माउली भेटावया आली। स्तनपान जाली याचकासी॥ १ दांपत्य, जोडपें, २ समजणे. ३.उत्पन्न झाले. ४ धुंगुरटें. ५ दोंद निघालेले, निडारलेले. ________________

६१.] अनुभव. माझे सुख सुखेंचि भोगावे । डोळ्या पाडावे डोळेवीण ॥ वटेश्वर चांगा शून्यीं बुडाला । डोळसु जाला परब्रम्हीं ॥ ९. स्वरूपदर्शनाने वृत्तीचे ताटस्थ्य. पाहूं गेले तंव मी माझी हारपलें। ठकचि ठेले काय सांगों॥ मन ब्रह्मीं वेडावले सोहंशब्दी हारपलें । इंद्रियासहित बुडालें काय सांगा ॥ पारुषली मति अतिज्ञान ज्योति । वटेश्वरी निवृत्ति चांगा म्हणे ॥ १०. बोल बोले पण डोळां न दिसे. यंत्राची युक्ति शब्द प्रकाशे । बोल बोले तव डोळां न दिसे ॥ रुणझुण रुणझुणा कनरी वाजे । येणेंचि आनंदें त्रिभुवन गाजे ॥ चांगा वटेश्वर नादी निमाला । ब्रह्म पाहतां ब्रह्मचि जाला ॥ १ नाहीशी होणे, २ पांवा. ________________

संतवचनामृत भाग दुसरा नामदेवादिसंत । ________________

म नामदेव. १. नामदेवचरित्र. . १. बाबाजी ब्राह्मणाने लिहिलेले नामदेवाचें जन्मपत्र. माझे जन्मपत्र बाबाजीब्राह्मणे । लिहिले त्याची खूण सारु ऐका॥ अधिक ब्याण्णव गणित अकराशते । उगवतां आदित्य रोहिणीसी शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार । प्रभव संवत्सर शालिवाहन ॥ प्रसवली माता मज मळसूत्रीं । तेव्हां जिन्हेवरी लिहिले देवें॥ शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा । नाममंत्र खुणा वाचुनी पाहे ॥ ऐंशी वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण । नामसंकीर्तन नामया वृद्धि ॥ २. तुळस कुश्चळ भूमीवर उगवली तरी तिला अमंगल ह्मणतां येणार नाही. कुश्चळ भूमिवरी उगवली तुळसी। अपवित्र तयेसी म्हणों नये ॥ कार्कविष्ठेमाजी जन्मे तो पिंपळ । तया अमंगळ म्हणों नये ॥ दासीचिया पुत्रा राज्यपद आले । उपमा मागील देऊं नये ॥ नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी। उपमा जातीची देऊ नये॥ । ३. मुक्ताबाईच्या मते नामदेव कोरा राहतो. चौदाशे वरुषे शरीर केले जतन । बोधाविण शीण वाढविला ॥ नाहीं गुरुमंत्र नाहीं उपदेश । परमार्थासी दोष लावियेला ॥ स्वहिताचे कारण पाडियेलें जेव्हां। शरण आला तेव्हां अलंकापुरी १ अपवित्र, माळण. २ कावळ्याची विष्ठा. ________________

७२ संतवचनामृत : नामदेव. [६३ गैनीनाथे गुज दिले निवृत्तीला । निवृत्तीचा झाला ज्ञानदेव ॥ शानदेवी बीज वाढलेसे जनीं । तेंचि आम्ही तुम्ही संपादिले ॥ म्हणे मुक्ताबाई तिहीं लोकी ठसा । नामदेव ऐसा राहिला कां ॥ । ४. गोयाकुंभारास बोलावणे. गोरा बोलाविला जुनाट पैं जुना । हाती थापटणे अनुभवाचे ॥ परब्रह्म म्हातारा निवाला अंतरीं। वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥ सोहंशब्द विरक्ति उरली अंतरीं। पाती अणुभरी पाहिले पण ॥ म्हणे मुक्ताबाई घालू द्या लोटांगण । जाऊं द्या शरण अव्यक्तासी॥ ५, नामदेव हे केवळ कच्चे मडकें. जव्हारियापुढे मांडियेले रत्न । आतां मोला उणे येईल कैसे ॥ तैसे थापटणे पारखियांचा हात । वाफ झाल्या घात वायां जाती। प्रथम थापटणे हाणिले निवृत्तीच्या माथां । डेरा झाला निका परब्रह्म ॥ तेंचि थापटणे ज्ञानेश्वरावर । आतां कैचे कोरे उरे येथे ॥ तेंचि थापटणे सोपानाचे डोई । यांत लेश नाहीं कोरे कोठें ॥ तेचि थापटणे मुक्ताईला हाणी । अमृत संजीवनी उतो आली ॥ तेचि थापटणे नामदेवावर । डोई चोळू मोहेरे रडौ लागे॥ गोरा म्हणे कोरा राहिलागे बाई । शून्यभर नाही भाजिले कोठे॥ ६. संतमंडळी हो एक कैकाड्यांची सभाच आहे. संतसमागम फळलारे बा मला। सन्मानाचा झाला लाभ मोठा ॥ अतिथि आदर केला मुक्ताबाई । लांकडाने डोई फोडिली माझी ॥ १ प्रसिद्धि. २ विस्तारणे, ओलावणे. ३ परीक्षक, मर्मज्ञ. ४ योग्य, खरोखर. ५ प्यादें. ________________

नामदेवचरित्र. देवाने गोधळ घातला गरुडपारी । भिजली पितांबरी अश्रुपातीं। माझे माझे म्हणोनि गाइले गा-हाणे कळले संतपण हेंचि तुमचें। भरी भरोनियां आलो तुमचे जवळीं। कैकार्ड मंडळी ठावी नोहे ॥ नामा म्हणे सन्मान पावलो भरून । करितां गमन भले दिसे ॥ ७, नामदेव इंद्रायणीच्या पार जाऊन त्वरेने पंढरपुरास जातो. न पुसतां संतां निघाला तेथुनि। पैलपार इंद्रायणी प्राप्त झाला ॥ मागे पुढे पाहे पळतो तांतडी । आला उडाउडी पंढरीसी ॥ कवळोनि कंठी विठ्ठल हे मूर्ति । नको देऊ हाती निवृत्तीच्या ॥ ज्ञानदेव सोपान पाठविले कोरे । जुनाट म्हातारा जाळू आला ॥ मुक्ताबाईने तेथे माजविली कळी । हे संतमंडळी कपटी तुझी ॥ नामा म्हणे देवा आणिलो पूर्वदैवें । गेलो असतो जिवे सगळाचि ॥ ८. पंढरपुराहून विसोबा खेचराच्या दर्शनास प्रयाण. देवावरी पाय ठेवूनि खेचर । निजेला परिकर निवांतचि ॥ देखोनियां नामा पावला विस्मया । कैसा हा प्राणिया देवो नेणे ॥ उठीं उठी प्राण्या आंधळा तूं काय । देवावरी पाय ठेवियेले ॥ विसोबा खेचर बोले नामदेवा । उठविले जीवा कां रे माझ्या ॥ देवावीण ठाव रिता कोठे आहे । विचारोनि पाहे नामदेवा ॥ जेथे देव नसे तेथे माझे पाय । ठेवीं पां अन्वर्य विचारूनी ॥ नामा पाहे जिकडे तिकडे देव । कोठे रिता ठाव न देखेचि ॥ ९. दगडाच्या मूर्तीमुळे जर इच्छा पुरेल तर ती आघाताने का भंगते? पाषाणाचा देव बोलेचि ना कधी । हरी भवव्याधि केविं घडे ॥ दगडाची मूर्ति मानिला ईश्वर । परि तो साचार देव भिन्न ॥ १ टोपल्या वगैरे विणणारी एक जात. २ घाईनें. ३ आलिंगन देणे. ४ तंटा. ५ समर्थ, तयार. ६ संगति. ७ दूर करणे. ________________

७४ संतवचनामृत : नामदेव. [६९ दगडाचा देव इच्छा पुरवित । तरी कां भंगत आघाताने ॥ पाषाण देवाची करिती जे भक्ति । सर्वस्वा मुकती मूढपणे॥ प्रस्तराचा देव बोलत भक्तांते । सांगते ऐकते मूर्ख दोघे ॥ ... ऐशांचे महात्म्य जे कां वर्णिताती । आणि म्हणविती तेणे भक्त ॥ परंतु ते नर पामर जाणावे । त्यांचे नायकावे बोल कानीं ॥ धोंडा घेडोनियां देव त्याचा केला । आदर पूजिला वर्षे बहु ॥ तरी तो उतराई होय केव्हां काई । बरवे हृदयीं विचारा है। , घोडापाण्याविण नाहीं देव कोठे। होतां सानमोठे तीर्थ क्षेत्र ॥ द्वादशीचे गांवीं जाहला उपदेश । देवावीण ओस स्थळ नाहीं॥ तो देव नामया हृदयीं दाविला । खेचराने केला उपकारु हा ॥ १०. विसोबा खेचराने डोळियाचा डोळा उघडला. सद्गुरुसारिखा सोइरा जिवलग । तोडिला उद्वेग संसारींचा। काय उतराई होऊ कवण्या गुणे । जन्मा नाहीं येणें ऐसे केले ॥ माझे सुख मज दाखविले डोळा । दिधली प्रेमकळा नाममुद्रा । डोळियाचा डोळा उघडिला जेणे । लेवविले लेणे आनंदाचें ॥ नामा म्हणे निर्की सांपडली सोय । न विसबै पाय खेचराचे ॥ १ दगड. २ ठोकून तयार करणे. ३ बार्शी ? ४ दुःख. ५ दागिना. ६ चांगली, खरोखर. ७ मार्ग. ८ विसरणे. ________________

१३] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ७५ २. नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ... ११. सुवासावर भ्रमर, अगर मधावर माशी, याप्रमाणे देवावर माझे चित्त आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें । तेव्हां या विठ्ठले कृपा केली॥ जन्मोनि संसारी झाली त्याचा दास।माझा तो विश्वास पांडुरंगी। अनेक दैवतां नेघे माझे चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥ भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी माझे मन ॥ नामा म्हणे मज पंढरीस न्यारे । हर्डसोनि द्यारे विठोबासी॥ ____१२. माझे मनोरथ तुवांजचून कोण पुरविणार ? माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा। केशवा माधवा नारायणा ॥ नाहीं नाहीं मज आणिक सोयरा। न करी अव्हेरा पांडुरंगा ॥ अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा। किती वेळोवेळां प्राथू आतां॥ नामा म्हणे जीव होतो कासाविस । केली तुझी आस आतां बरी॥ १३. मी अनाथानाथ असलो तर तूं अनाथनाथ आहेस. अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें ॥ आपुले ब्रीद साच करी। भेट मज एक वेळ मुरारी॥ पतित पतित म्हणती माते । पतितपावन म्हणती तूतें ॥ . दीन दीन म्हणती माते । दीननाथ म्हणती तूते ॥ _____ १ भुंगा. २ बजावणे, ३ अनाथांचा वाली. - - - ________________

... संतवचनामृतः नामदेव.. ६१३ आर्त आर्त म्हणती माते । आर्तपरायण म्हणती तूते ॥ नामा म्हणे ऐके सुजाणा । नाइकसी तरी लाज कवणा । १४. मला येथे तुजवांचून कोणी नाही. तुवा येथे यावे की मज तेथे न्यावे । खेती माझ्या जीवे मांडियेली। माझे तुजविण येथे नाही कोणी । विचारावे मनी पांडुरंगा ॥ नामा म्हणे वेगी यावे करुणाघना । जातो माझा प्राण तुजलागीं। । १५. तुझे अमृताहून गोड नाम माझे वाचेस का येत नाही ? अमृताहूनि गोड नाम तुझे देवा । मन माझे केशवा कां बा नेघे ॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासी नये तुझे ॥ कीर्तनी बैसतां निद्रे नागविले । मन माझे गुंतले विषयसुखा । हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती। नये माझ्या चित्तीं नामा म्हणे १६. मजकडून प्रपंचास मिठी घालवून तूं स्वामिद्रोह करवितोस. उलिसा प्रपंच परि हा लटिकाँ। तेणे तुज व्यापका झांकियेलें ॥ तैसियाच्या मज घालोनियां खेा। स्वामिद्रोही देवा करिसी कैसा॥ मेरूचिया गळां बांधोनि मशंक । पाहासी कवतुक अनाथनाथा ॥ नामा म्हणे देवा कळली तुझीमाव।माझा मी उपाव करीन आतां॥ १७. जरी वेडें मुकें झालें तरी मुलाचे हित जनकास __करावेच लागते. अपत्याचे हित कीजे त्या जनके । जरी वेडे मुकें झालें देवा ॥ तैसे मी पोसणे तुझे जिवलग । अंतरींचे सांग गुज काहीं॥ १ सुज्ञाना. २ खेद, उत्कंठा. ३ आरंभणे. ४ येवढासा. ५ खोटा. ६ मिठी, आलिंगन. ७ चिलट, ८ माया. ९ पोसावयाचे मूल, १० आवडते. ________________

६२. नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. राखीन मी नांव तुझे सर्वभावें । चित्त वित्त जीव देईन पार्टी ॥ जरी देवा हीन म्हणशील मज । नामा म्हणे लाज येइल कोणा ॥ १८. चंद्रानें चकोराचा सोहळा पुरविला असता त्याच्या । कळा न्यून होतील काय ? तुझे प्रेम माझे हृदया आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥ कशासाठी शीण थोडक्याकारणे । काय तुज उणे होय देवा ॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती। नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । हृदयकमळी स्थिर राहे ॥ १९. चातकाची तहान जळधाराने पुरविली असतां तो रिता होईल काय ? तुझे रूप माझ्या दाखवीं मनाते । मग तुझ्या चरणातें न विसंबें ॥ कां मज शिणविशी थोडियाकारणे। काय तुझे उणे होईल देवा। चातकाची तहान पुरवी जळधर। काय त्याचे सरे थोरपण॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती॥ कूर्मी अवलोकी आपुलिया बाळा । काय तिच्या डोळां दृष्टि नासे॥ नामा म्हणे देवा तुझाचि भरवंसा। अनाथा कोवसा होसी तूंचि।। २०. तूं माझी कुरंगी असून मी तुझे पाडस आहे. डोळे शिणले पाहतां वाटुली । अवस्था दाटली हृदयामाजी ॥ तूं माझी जननी सरसीये सांगातिणी । विठ्ठले धांवोनि देई क्षेम ॥ तूं माझी पक्षिणी मी तुझे अंडर्ज । क्षुधै पीडलो मज विसरलीसी॥ १विसरणे. २ मेघ. ३ कांसवी. ४ माश्रय, आधार. ५ वाट, ६ पिल्लू. -________________

७८ संतवचनामृत : नामदेव, [६२० तूं माझी कुरंगी मी तुझे पाडस । गुंता भवपाश तोडी माझा ।। तूं माझी माउली मी तुझी तान्हुली। बोरसे वो घाली प्रेमपान्हा।। नामा म्हणे आस पुरवावी माझी । तान्हुलया पाजी प्रेमपान्हा॥ २१. मी चकोर, तूं चंद्र; मी सरिता, तूं सागर; मी याचक, तूं दाता आहेस. . - येई वो कृपावंते अनाथांचे नाथे। निवारी भवव्यथे पांडुरंगे ॥ मी बाळक भुकाळ तूं माउली कृपाल। करी माझा सांभाळु पंढरिनाथा ॥ माझे माहेर पैं नित्य आठवे अंतरीं। सखा विटेवरी पांडुरंग ॥ मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्थी तूं अन्न । तृषार्थी तूं जीवन पांडुरंगा ॥ मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगा॥ मी धनलोभी शुद्ध तूं पूर्ण कनककुंभ। मी मगर तूं अंभ पांडुरंगा ॥ मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तूं बोध । मी शुष्कनदी तूं ओघ पांडुरंगे ॥ मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक। मी प्रजा तूं पाळक पांडुरंगा ॥ मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी। - - १ हरिणी. २ स्नेहभरित पान्हा: ३ सोन्याचा घडा.४ पाणी. ५ सेवक. ________________

२४] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ७९ भी अपत्य तूं जननी पांडुरंगा ॥ मीभक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय । मी आडळ तूं साह्य पांडुरंगा ॥ ऐसी जे जे माझी विनंति ते तुजचि लक्ष्मीपति। नित्य सुखसांगाती पांडुरंगा ॥ शीघ्र येई वो श्रीरंगे भक्तमानसरंगें। प्रेमपान्हा देगे नामदेवा ॥ २२. पक्षिणी चाऱ्यास गेली असतां उपवाशी पिलाप्रमाणे . माझी स्थिती झाली आहे. पक्षिणी प्रभाती चारियासी जाये । पिलू वाट पाहे उपवासी॥ तैसे माझे मन करी वो तुझी आस । चरण रात्रंदिवस चिंतीतलें। तान्हें वत्स घरी बांधलेसे देवा । तया हृदयीं धांवा माउलीचा ॥ नामा म्हणे केशवातूं माझा सोईरा । झणी मज अव्हेरा अनाथनाथा॥ २३. अग्नीमध्ये पडलेल्या बालकाच्या कळवळ्याने मातेप्रमाणे तूं धांव. अग्निमाजी पडे बाळु । माता धांवे कनवाळु॥ तैसा धांवे माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ॥ सवेचि झेपावे पक्षिणी । पिली पडतांचि धरणीं। भुकेले वत्सरावें । धेनु हुबरत धांवे ॥ वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतीत हरणी॥ नामा म्हणे मेघ जैसा । विनवितो चातक तैसा॥ २४. मी स्मशानी जळत असतां मला सर्व टाकून सर्व पळून जातील, अंतकाळी मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं।. . म्हणोनियां हृषीकेशी । शरण तुजसी मी आलो ॥ १ अडचण. २ कदाचित्. ३ कार्य. ४ वासरूं.. ..... ________________

८. संतवचनामृत : नामदेव. [६२४ नवमास गर्भवासीं। कष्ट झाले त्या मातेसी। ते निष्ठुर झाली कैसी । अंती दूर राहिली॥ जीवीं बापासी आवड । मुखी घालोनि करी कोर्ड। जेव्हां लागली यमओढ । तेव्हां दूर टाकिले। बहिणीबंधूचा कळवळा । ते तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशंखळा । तेव्हां दूर राहिली॥ कन्यापुत्रादिक बाळे । हीं तव स्नेहाची स्नेहाळे । तुझ्या दर्शनाहूनि व्याकुळे । अंती दूर राहिली ॥ देहगृहाची कामिनी । ते तंव राहिली भवनों। मी तंव जळतसे स्मशानी । आग्निसवे येकला ॥ मित्र आले गोत्रज आले । तेही स्मशानी परतले । शेवटी टाकूनियां गेले । मजलागी स्मशानी ॥ ऐसा जाणोनि निर्धार । मज मग आला गहिवर। तंव दाही दिशा अंध:कार । मज कांहीं न सुचे ॥ ऐसें जाणोनि निर्वाण पाहीं। मनुष्यजन्म मागुता नाही। नामा म्हणे तुझे पायीं । ठाव देई विठोबा ॥ २५. माझी कीव कर, नाही तर माझा जीव घे. तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविसी ॥ बळे बांधोनियां देसी काळाहाती। ऐसे काय चित्ती आले तुझ्या॥ आम्ही देवा तुझी केली होती आशा । बरवे हृषीकेशा कळों आलें। नामा म्हणे देवा करा माझी कीव । नाहीं तरी जीव घ्यावा माझा॥ १ आवड. २ स्त्री. ३ शत्रुख, ________________

६२८] नामदेवांच्या अंतःकरणातील तळमळ. ८१ २६. आतां आम्ही आमच्या गांवास जातो, तुम्ही आम्हांवर कृपा असों द्याबी. बहुत दिवस तुमचे गांवीं । आतां कृपा असो द्यावी ॥ आम्ही जातो आपुल्या गांवा । विठोबा लोभ असो द्यावा ॥ तुझे पायीं माझे मन । माझे ठायीं तुझा प्राण ॥ लिखित पत्र पाठवावें। माझे स्मरण असो द्यावे ॥ नामा म्हणे जी केशवा । अखंड प्रेमभाव द्यावा ॥ २७. मला नामाची सांगड देऊन वैकुंठावर नेऊन घाल. संसारसागरी पडलो महापुरीं । सोडवण करी देवराया ॥ नामाची सांगडी देऊनियां माते । वैकुंठावरुते नेउनी घाली ॥ कामक्रोधमगर करिती माझा ग्रास । झणीं तूं उदास होसी देवा॥ नामा म्हणे झणीं मोकलिसी माते । नाम तुझे सरते धरले एक ॥ २८, दुसऱ्या पोहणाऱ्यांकडून मी बाहेर निघत नसल्याने तूं पीतांबरासकट उडी घाल. माझे मनीं ऐसे होतसे गा देवा । देह समर्पावा तुझे पायीं॥ तंव या मायामोहे मजसी केला हेवा । लोटियेले देवा भवजळामाजीं ॥ आशानदीपुरीं वाहविले दुरी। काढी मज हरी कृपाळुवा ॥ १ भोपळ्याचा ताफा. २ सुसर. ३ कदाचित्. ४ वंद्य. ५ मत्सर, द्वेष. सं...६ ________________

८२. संतवचनामृत : नामदेव. ६२८ सरितामाजी धरिलो मदनमगरौं । पुढारी मागारी होऊ नेदी ॥ न निघे न निधे आणिकां पोहणारे। सहित पितांबरे घाली उडी॥ थडीये उभया धांव गा श्रीहरी । हानी झाली थोरी सर्व गेले ॥ भक्तिनवरत्नाची बुडाली वाखोरी। काढी वेगी हरि कृपालुवा ॥ धीर आणि विचार ह्या दोन्ही सांगडीं। श्रद्धा पुढे दोरी तुटोनि गेली ॥ भावबळे सांपडलों दाटलो उभौं। वेगी घाली उडी कृपालुवा ॥ नामा म्हणे भजनेविण कोरडा गळा। नेतो रसातळां क्रोधमान ॥ २९. तुझ्या रूपाची वाट पाहतांना माझे लोचन शिणून गेले आहेत. काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥ पाहतांना वाट भागले लोचन । कठीणच मन केले तुर्वा ॥ ऐकिली म्यां कानी कीर्ति तुझी देवा । उठलासे हेवा त्याचि गुणे॥ अनाथ अन्यायी काय मी करीन । दयावंता खूण सांगसी तूं ॥ नामा म्हणे आस पूर्ण कीजे देवा । रूपडे दाखवा नेटेपाटे ॥ - १ काठावर. २ माळ. ३ पूर. ४ मासा. ५ डोळे. ६ लवकर, सत्वर. . ________________

६३१] ___ नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ८३ ३. आंसवें दाटून बाह्या पसरून नामदेव विठ्ठलाची वाट पहात आहे. केधवां भेटसी माझिया जिवलगा । ये गा पांडुरंगा मायबापा ॥ आशा धरूनि पोटी दिवस लेखी बोटीं। प्राण ठेउनि कंठी वाट पाहे॥ चित्त निरंतर ठेउनि महाद्वारीं । अखंड पंढरी हृदयीं वसे ॥ श्रीमुख साजिर कुंडले गोमटीं । तेथे माझी दृष्टि बैसलीसे ॥ आंसवे दाटुनि पसरूनि बाहे । नामा वाट पाहे विठ्ठलाची ॥ . ३१. निलाजरा नामा कंठांत प्राण धरून रात्रंदिवस तुझे ध्यान करीत आहे. भेटीचे आर्त उत्कंठित चित्त। न राहे निवांत कवणे ठायीं ॥ जया देखे तया पुसे हेचि मात । के मज पंढरिनाथ बोलावलि ॥ माहेरीची आस दसरा दिवाळी । बाहे ठेवुनि निढंळी वाट पाहे ॥ कृपेचा सागर विठो लोभापरु । परि कां माझा विसरु झाला त्यासी ॥ विटेसहित चरण देईन आलिंगन। तेणे माझी तनु कोल्हावेलें । ऐसा निलाजिरी नामा कंठी धरोनि प्राण । करितो तुझे ध्यान रात्रंदिवस ॥ १ केव्हां. २ मोजणे. ३ शोभिवंत, सुंदर. ४ अश्रु. ५ हात. ६ उत्कट इच्छा. ७ कपाळ. ८ शांत होणे. ९ निर्लज्ज. ________________

८४ संतवचनामृत : नामदेव. [६ ३२ ३२. संसारवणव्यांत जळत असलेल्या मजवर, करुणाधना, तूं आपल्या कृपेचा वर्षाव कर. तापत्रयअग्नीची जळतसे शेगडी। ओहाळोनि कोरडी झाली काया॥ केव्हां करुणाघना वोळसी अंबरी। निवविसी नरहरि कृपादृष्टी । शोकमोहाचिया झळंबलो ज्वाळीं । क्रोधाचे काजळी पोळतसे ॥ चिंतेचा वोणवा लागला चहूंकडां । जातो तळा बुडा धांव देवा॥ धांव धांव करुणाघना तुजविण । नामा म्हणे प्राण जातो माझा ॥ ३३. खुट्याभोवती फिरणाऱ्या वासराप्रमाणे मी आपआपणांस बांधून घेतले आहे. वासरूं भौवे खुंटिया भोवते । आपआपणियाते गोवियेले ॥ तैसी परी मज झाली गा देवा । गुंतला मी भावा लटिकिया। नामा म्हणे केशवा तोडी कां बंधने । मी एक पोसणे भक्त तुझा॥ ३४. मी लटिका असलो तरी तुझेच नाम गात आहे. लटिके तरी गायें तुझेचि नाम । लटिके तरी प्रेम तुझेचि आणी॥ सहजेंचि लटिके असे माझे ठायीं । तुझिया पालट नाहीं साचपणा॥ लटिकें तरी हरी करीं तुझे ध्यान । लटिके माझे मन तुजचि चिंती॥ लटिका तरी म्हणवी तुझात्रि मी दासापरिनामी विश्वास सत्य आहे लटिका तरी बैसे संतांचे संगतीं। परि आहे माझें चित्तीं ध्यान तुझे ॥ ऐसे लटिके माझे मन सफळ करी देवा। नामा म्हणे केशवाविनवित आहे॥ १ पोळणे. २ स्पर्शकरणे, पोळणे. ३ फिरणें. ४ पोसले जाणारे मूल. ________________

.३७] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ८५ ३५. मी अंगुष्ठापासून मस्तकापर्यंत पातकें आचरीत आलो आहे. काय गुण दोष माझे विचारिसी। आहे मी तो राशी अपराधांची।। अंगुष्ठापासोनि मस्तकापर्यंत । अखंड दुश्चित आचरलौ ॥ स्वप्नी देवा तुझी नाहीं घडली भक्ति। पुसशी विरक्ति कोठोनियां। तूंचि माझा गुरु तूंचि तारी स्वामी । सकळअंतर्यामी गाऊं तुज ।। नामा म्हणे माझे चुकवीं जन्ममरण । नको करूं शीण पांडुरंगा ॥ ३६. मी कंटाळून आपोआप उठून जाईन असें तुला ___ वाटते काय? वारंवार काय विनवावे आतां । समजावें चित्ता आपुलिया ॥ तूं काय म्हणसी कंटाळेल हाचि । जाईल उगाचि उठोनियां ॥ मजलागीं देवा जासी चुकवोनि । आणीन धरुनी तुजलागीं ॥ दृढ भक्तिभाव प्रेमाचा हा दोरा । बांधीन सत्वर तुझे पायीं ॥ नामा म्हणे बोल काय विठो आतां । भेटावें सर्वथा यांत बरें॥ ३७. तुला जिवंत धरून सोहंशब्दानें मार दिल्यावर तूं काकुळतीस येशील. प्रेमफांसा घालुनियां गळां । जित धरिले गोपाळा ॥ एक्या मनाची करुनि जोडी । विठ्ठलपायीं घातली बेडी ।। हृदय करुनि बंदिखाना । विठ्ठल कोंडूनि ठेविला जाणा ॥ . सोहंशब्दं मार केला । विठ्ठल काकुळती आला ॥ नामा म्हणे विठ्ठलासी । जीवे न सोडी सायासीं ॥ १ पातक, २ जाळें. ३ जिवंत. ४ प्रयत्नानें. ________________

. संतवचनामृत: नामदेव. [ ३८ ३८. तुला निष्कामकर्मयोग माहीतच नाही. उदाराचा राणा म्हणविसी आपणां । सांग त्वां कवणा काय दिल्हे ॥ उचितां उचित देसी पंढारनाथा। न बोलों सर्वथा वम तुझी ॥ वमै तुझी काही बोलेन मी आतां । क्षमा पंढरिनाथा करी बापा ॥ न घेतां न देसी आपुलेही कोणा। प्रौढी नारायणा न बोलावी ॥ बाळमित्र सुदामा विपत्ती पीडिला । भेटावया आला तुजलागीं ॥ तीन मुंष्टि पोह्यासाठी मन केले हळुवंट। मग तया उत्कृष्ट राज्य दिले ॥ छळावया पांडवां दुर्वास पातला । द्रौपदीने केला धांवा तुझा ॥ येवढिया आकांती घेउनि भाजीपान । मग दिले अन्न ऋषींलागीं ॥ बिभीषणा दिधली सुवर्णाची नगरी। हे कीर्ति तुझी हरि वाखाणती ॥ वैरियाचे घर भेदें त्वां घेतले । कर त्याचे त्यासी दिधले नवल काय ॥ ध्रुव आणि प्रल्हाद अंबऋषि नारद । । हरिश्चंद्र रुक्मांगद आदिकरुनी ॥ १ उणेपण. २ मोठेपणा. ३ मुठी. ४ हलकें. ५ फितूरी काय॥ . ________________

६४० ] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. त्याचे सेवाऋण घेऊनि अपार । मग त्या देसी वर अनिर्वाच्य ॥ एकाची शरीरसंपत्ति आणि वित्त । 'एकाचे ते चित्त हिरोनि घेसी॥ मग तया देसी आपुले तूं पद । जंगदानी हे ब्रीद मिरविसी ॥ माझे सर्वस्व तूं घेई तुझे नको कांहीं। मनोरथाची नाहीं चाड मज ॥ नामा म्हणे केशवा जन्मजन्मांतरीं। करीन मी हरि सेवाऋण ॥ ३९. हात जोडून मढ्याशी बोलावें तशी माझी स्थिति झाली आहे. कागदींचे वित्त वेश्येसी दिधलें । तैसे आम्हां केले नारायणे॥ जोडोनियां हस्त बोले मढयापाशीं । तैसें तूं मजशी केले देवा ॥ कडू भोपळ्याचा कोणता उपयोग । तैसें पांडुरंगे केले जाण ॥ नामा म्हणे ऐसे करूं नको देवा । समागम व्हावा पायांसवे॥ ४०. "घेसी तेव्हां देसी ऐसा अससी उदार." घेसी तेव्हां देसी ऐसा अससी उदार । काय जाउनियां तुझे कृपणाचे द्वारां ॥ उच्छिष्टाची शिते न टाकिसी बाहेरी। कोणी दिधली देवा एवढी भूषणाची थोरी ॥ १ सर्व जगांत श्रेष्ठ दाता. २ लोभी, कवडीचुंबक. ________________

[६४० संतवचनामृत : नामदेव. सोडी ब्रीद देवा आतां नव्हेसी अभिमानी । पतितपावन नाम तुझे ठेवियले कोणी ॥ नामा म्हणे देवा तुझे नलगे मज कांहीं। प्रेम असो द्यावे कीर्तनाचे ठायीं ॥ ४१. भक्त उदार व देव कृपण असाच डंका पुराणांत गाजला आहे. आम्ही शरणागत परि सर्वस्वे उदार । भक्तीचे सागर सत्त्वशील ॥ कायावाचामने अर्थ संपत्ति धन। दिधले तुजलागून. पांडुरंगा ॥ आम्हांऐसे वित्त तुम्हां कैचें देवा । हा बंडिवार केशवा न बोलावा ॥ सत्त्वाचा सुभ? बंळि चक्रवर्ती। पहा पहा केवढी ख्याति केली तेणें ॥ त्रिभुवनींचे वैभव जोडिले ज्यालागुनि । ते शरीर तुझ्या चरणीं समर्पिल ॥ रावणा ऐसा बंधु सांडूनि सधैर। ओळंगती परिवार ब्रह्मादिक ॥ ते सांडोनि एकसरा आलासे धांवत । झाला शरणागत बिभीषण ॥ हिरण्यकश्यपे तुझा वैरसंबंध । पाहे पां प्रल्हाद गांजियेला ॥ १ प्रतिष्ठा. २ शूर, उत्तम योद्धा. ३. बळकट. ४ चाकरी करणे. ५ दास. ६ एकदम. ________________

६४२] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. अजगर कुंजर करितां विषपान । परि तुझे स्मरण न संडीच ॥ पतिपुत्र स्नेह सांडोनि गोपिका। रासक्रीडे देखा भुललीया ॥ एकीं तुझे ध्यान करितां त्यजिले प्राण । सांग ऐसे निर्वाण कवणे केलें ॥ . ऐसे मागां पुढां झाले असंख्यात । भक्तभागवत सखे माझे ॥ त्यांचेनि सरता झालासी त्रिभुवनीं । विचारी आपुल्या मनी पांडुरंगा ॥ आतां केले उच्चारण बोलतां लाजिरवाणे । हांसती पिसुणे संसारींची ॥ नामा म्हणे केशवा अहो शिरोमणि। निकुरा जासी झी मायबापा ॥ ४२. ध्रुवाप्रमाणे अज्ञान अगर उपमन्याप्रमाणे बुद्धिमंद __ मी नाही. आम्ही शरणागती सांडिली वासना। ते त्वां नारायणा अंगिकारिली ॥ म्हणोनि प्रसन्न व्हावया आमुते । वोरसल्या चित्ते चालविसी ॥ अज्ञान बाळकु ठकविला धुंरु । तैसा मी अधीरु नव्हे जाण ॥ १ हत्ती. २ पराकाष्ठेचा प्रयत्न. ३ मान्य. ४ चहाडखोर.५ कठोरपणा. ६ पान्हा सोडणे. ७ ध्रुव. ________________

[६४२ संतवचनामृतः नामदेव.. लंकापति केला तुवां बिभीषण। झालासी उत्तीर्ण वाचाऋणे॥ उपमन्ये घेतला दुधाचाची छंद । तैसा बुद्धिमंद नव्हे जाण ॥ नामा म्हणे तैसा नव्हे मी अज्ञान । माग तुज देईन शरीर अवघे ॥ ४३. तुझा आम्ही अंगिकार केला आहे, व तूं आमच्यामुळे थोरवी भोगितोस, हे तूं विसरलास ! आम्हीं शरणागती केलासे सरता। येन्हवीं अनंता कोण जाणे ॥ वेदशास्त्रपुराणी उबंगोनि सांडिलासी। तो आम्हीं धरिलासे हृदयकमळीं ॥ चतुरां शिरोमणि अहो केशिराजा । आंगकार तुझा केला आम्हीं॥ सहस्रकनामे झालासी संपन्न । तरी हेही भूषण आमुचेनचि ॥ येन्हवीं त्या नामांची कोण जाणे सीमा। पाहे मेघश्यामा विचारोनि ॥ होतासी क्षीरसागरी अनाथाचे परी। लक्ष्मी तेथे करी चरणसेवा ॥ तेहि तंव जाण आमुची जननी । तूं तिये वांचोनि शोभसी कैसा ॥ १ कंटाळणे. ________________

__६४५] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ९१ तुज नाहीं नाम रूप जाति कुळ । अनादीचे मूळ म्हणती तुज ॥ आम्ही भक्त तरी तूं भक्तवत्सल । ऐसा प्रगट बोल जगामाजी ॥ ऐसी आमुचेनि भोगिसी थोरवि ।। आमुचा जीवभाव तुझ्या पायीं ॥ नामा म्हणे केशवा जरी होसी जाणता। तरी या बोला उचिता प्रेम देई॥ ४४. राजाने जरी आपली कांता टाकिली तरी तिची जगावर सत्ता चालत नाही काय? .. प्रीति नाहीं राय वर्जियली कांता । परि तिची सत्ता जगावरी ॥ तैसे दंभधारी आम्ही तुझे भक्त । घालू यमदूत पायांतळी ॥ रायाचा तो पुत्र अपराधी देखा। तो काय आणिकां दंडवेल ॥. बहात्तर खोडी देवमण कंठीं। आम्हां जगजेठी नामा म्हणे ॥ ४५. विषयगरळाची शेवटची लहरी येण्याच्या अगोदरच .. - तूं मला वांचीव. मज चालतां आयुष्यपंथें । तारुण्यवन पातले तेथें ॥ मदमत्सरादि श्वापदै बहुतें । आली कळकळित मजपाशीं॥ ती धांवती पाठोपाठी । पाहे तंव विषयाचे घोटीं। काम क्रोध व्याघ्रांची वाटी। देखोनि पोटी रिघाले पाय ।। मग स्वधर्ममार्गी रिघालों। तंव अहंकारतस्करें आकळिलो ___ १ टाकणे. २ घोड्याच्या गळ्यावरील शुभदायक भोवरा. ३ हिंस्र पशु.. ४. खाखाकरित. ५ घाटांत. ६ जाळी. ७ चोर. ________________

९२ संतवचनामृत : नामदेव. [६४५ राहे राहे म्हणूनि उभा केलों । तेणें अंतरलो स्वामियां ॥ जंव क्षण एक उघडिले डोळे । पाहे तंव कंठ व्यापिला व्या। मायामोहसी डंखिले । त्यांचिये गैरळे झळंबलों ॥ जंव न पावेल शेवटील लहरी । तंव धांव उपाव करी ॥ विष्णुदास नामा धांवे पुकारी । माझा कैवारी केशिराज ॥ ४६. देवाने शिरावर हात ठेवून नामदेवास प्रेमसुख ___दिल्यावर नामदेव तृप्त झाला. घे रे घे रे नाम्या दिले माझे प्रेम । घोकी माझे नाम सर्वकाळ ।। शिरावरी हात ठेवितसे माझा । अभिमान तुझा गेला म्हणुनी ॥ भक्तिसुख देवें दिले नामयातें । नामा परमामृते तृप्त झाला ॥ नामा म्हणे देवा झालो मी पावन । माझे तुजविण कोण आहे ॥ ४७. खेचरदात्यामुळे सर्व सत्ता नामदेवाचे हाती येते. बोलूं ऐसे बोल । जेणे बोले विठ्ठल डोले ॥ प्रेम सर्वांगाचे ठायीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥ नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं ॥ परेहुनी परतें घर । तेथे राहूं निरंतर ॥ सर्वसत्ता आली हातां । नामयाचा खेचर दाता ।। १ दंश करणे. २ विष. ३ व्यापणे. ________________

. ४९ ] ९३ नाम आणि भक्ति. नाम आणि भाक्ति.. ३ नाम आणि भक्ति. . ४८. तुला कपटाचे कुपथ्य झाले असल्याने तूं नामाचे औषध घे. कपटाचे कुपथ्य झाले तुझे पोटीं । स्मरावा जगजेठी कृपाळु तो॥ नाम औषध घ्यावे नाम औषध घ्यावें। संतांचे लागावेसमागमीं ॥ त्यापासीं औषध आहे नानाविध । राम कृष्ण गोविंद म्हणतीवाचे॥ पुत्रस्नेहें कैसा अजामेळ स्मरला । तेणे तो उद्धरला क्षणमात्रे । राम राम म्हणतां तारिली कुंटिणी । वैकुंठभुवनी तिये वासु ॥ तेचि हे औषध प्रल्हाद घेतले । ते तूं घे उगले म्हणे नामा ॥ ४९, माझ्या मुखांत तुझ्या नामाचे खंडण झाल्यास माझी. रसना शतधा विदीर्ण होईल. . तुझ्या चरणाचे तुटतां अनुसंधान । जाईल माझा प्राण तत्क्षणीं ॥ मग हे ब्रह्मज्ञान कोणाते सांगसी। विचारी मानसी पांडुरंगा ॥ वदनीं तुझे नाम होतांचि खंडणा । शतखंड रसना होईल माझी ॥ सांवळे सुंदर रूप पाहतां तुझे दृष्टि । न देखतां उन्मळेती नयन हे ॥ तुज परतें साध्य आणीक नाहीं साधन । साधक माझे मन होईल भ्रांत ॥ १ शांत, मुकाट्याने. २ समूळ बाहेर यणे. ________________

[६४९ संतवचनामृत : नामदेव. नामा म्हणे केशवा अनाथाचा नाथ। झणी माझा अंत पाहसी देवा ॥ ५०. एकतत्त्वनामावर तूं निर्धार धरिलास तर प्रपंच आपोआप ओसरेल. एकतत्त्व हरि निर्धार तूं धरीं । प्रपंच बोहरी एका नामें ॥ अच्युत गोविंद परमानंद छेद । नित्य तो आल्हाद हरिनामीं ॥ ऐसा तूं विनटे हरिनामपाठे । जाशील वैकुंठे नश्वरितां ॥ नामा म्हणे तत्त्व नाम गोविंदाचें । हेचि धरी साचे येर वृथा ॥ ५१. अनुभवानें, भावानें, अगर कपटाने कसेंही नाम वाचेस येऊ दे. “आगमी नाम निगमी नाम | पुराणी नाम केशवाचें ॥ अर्थी नाम पदी नाम । धृपदी नाम त्या केशवाचें ॥ अनुभवें भावें कपटे प्रपंचे । परि हरिचे नाम येऊं दे वाचे। नाम व्हावे नाम व्हावें । नाम व्हावे त्या केशवाचे । ऐसे नाम बहु सुंदर । नामीं तरले लहान थोर । नामा म्हणे अंतर । पडो नेदी याउपर ।। ५२. देहास क्लेश झाले असतांही वाचे हरिनाम उच्चारावें. देह जावो हेचि घडी। पाय हरीचे न सोडी ॥ क्लेश हो नानापरी । मुखी रामकृष्ण हरि। क्रीडा वैष्णवांचे मेळीं। हांक केशव आरोळी॥ नामा म्हणे विठोबासी । जे ते घडो या देहासी॥ १ नाश होणे. २ तल्लीन होणे. ३ देहावसान झाल्यावर. ४ शास्त्र. ५ वेद. ________________

६५५] नाम आणि भक्ति. ९५. ५३. सर्व कर्माचे प्रारंभी नामच सांगितले आहे. नामाचा महिमा नेणेचि पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ।। नाम हेचि कर्म नाम हेचि धर्म । केशव हेचि वर्म सांगितले ॥ . नाम शुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणे वेद आणिक नाहीं॥ करितां आचमन केशव नारायण । करितां उच्चारण आधी हेचि॥ लग्नाचिये काळी म्हणती सावधान । लक्ष्मीनारायणचिंतन करा॥ देहाचिये अंती प्रायश्चित्त देती । शेवटीं वदविती रामनाम ॥ ऐसिया नामापरतें नाहीं सार । गिरिजेसी शंकर उपदेशी ॥ करिती पितृश्राद्ध कर्म आचरती । शेवटी म्हणती एको विष्णु ॥ नामें होय गति नामें होय मुक्ति । नामयाचे चित्ती रामनाम ॥ . ५४. सदा सर्वकाळ नाम कंठी धरल्यास गोपाळ सांभाळ करील. काळेवळ नसे नामसंकीर्तनीं। उंच नीच योनि हही नसे॥ धरा नाम कंठी सदा सर्वकाळ । मग तो गोपाळ सांभाळील ॥ कृपाळु कोवसा सुखाचा सागर । करील उद्धार भाविकांसी॥ नामा म्हणे फार सोपे हे साधन । वाचे नाम घेणे इतुकेंचि ॥ ५५. " अठरा पुराणांच्या पोटी, नामाविण नाही गोष्टी. " शिव हालाहले तापला । तोही नामें शीतळ झाला। नाम पावन पावन । याहूनि पवित्र आहे कोण ॥ १ जन्म. २ आश्रय, कैवारी. ३ विष. . ________________

संतवचनामृत : नामदेव. [६५५ शिवासी नामाचा आधार । केला कळिकाळ किंकर ॥ मरण झाले काशीपुरीं । तेथें नामचि उद्धारी ॥ अठरा पुराणांच्या पोटीं । नामाविण नाही गोष्टी ॥ नामा म्हणे अवघी चोरें । एक हरिनाम सोईरें ॥ ५६. नामावर श्रद्धा नसलेले वेदज्ञ, पंडित, व हरिदास घेऊन काय करावयाचे ? वेदपरायण मनी तो ब्राह्मण । चित्त समाधान संतुष्ट सदा॥ येरां माझं नमन सर्वसाधारण । ग्रंथाचे राखण म्हणोनियां ॥ शास्त्रपंडित तोचि मी बहु मानी। जो आपणांत जाणोनि तन्मय झाला ॥ पुराणिक ऐसा मानिता कृतार्थ । विषयी विरक्त विधि पाळी ॥ मानी तो हरिदास ज्या नामी विश्वास । मी त्याचा दास देहभावें॥ नामा म्हणे ऐसे कई भेटविसी विठ्ठला। त्यालागीं फुटला प्राण माझा ॥ ५७. पुंडलीकानें रचिलेल्या पेठेत नामद्राक्षांचे अपार घड आले आहेत. पुंडलिके रचिली पेठ । संत ग्राहिक चोखट ॥ प्रेमसांखरा वाटिती । नेघे त्यांचे तोडी माती ॥ १ दास. २ गि-हाईक, उमाण माझा ॥ ________________

६६.] नाम आणि भक्ति. समतेचे फणस गरे । आंबे पिकले पडिभरें। नामद्राक्षाचे घड । अपार रस आले गोड ॥ नामा म्हणे भावे ध्यावें । अभक्तांचे मढे जावे ॥ ५८. शेतास थोडे बाज नेऊन गाडाभर धान्य परत आणितात. शेती बजि नेतां थोडे । मोटे आणिताती गाडे ॥ एक्या नामें हरि जोडे। फिटे जन्माचे सांकडे ॥ बाळे भोळे जन । सर्व तरती कीर्तने ॥ नामा म्हणे नेणे मूढ । नाम स्मरावे सांबडें ॥ ५९. नामापुढे सर्वभक्षक अग्नीचे सामर्थ्य चालत नाही. अग्नि जाळी तरी न जळती पांडव । हृदयीं माधवधरिला म्हणोनि॥ अग्निजाळी तरी न जळती गोपाळाहृदयीं देवबोलधरिलाम्हणोनि॥ अग्नि जाळी तरी न जळे हनुमंत। हृदयीं सीताकांत ह्मणोनियां ॥ अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद । हृदयीं गोविंद म्हणोनियां ॥ अग्नि जाळी तरीन जळे पैं सीता । हृदयी रघुनाथ धरिले म्हणोनि ॥ लंकेसि उरले बिभीषणाचे घर हृदयीं सीतावरधरिलाम्हणोनि ॥ नामा म्हणे स्वामी स्मरावे गोविंदा । चुके भवबाधा संसाराची ॥ ६०. ज्या माउलीच्या ओठांवर विठ्ठलाचें नाम आहे तिचे पोटी देव जन्म घेतो. . विठ्ठलाचे नाम जे माउलीचे ओंठी । विठो तिचे पोटी गर्भवासी॥ जयाचिये कुळी पंढरीची वारी । विठो त्याचे घरी बाळलीला ॥ नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । असत्य केशवा वचन होता। १ जोराने. २ भोळे. सं....७ ________________

९८ . संतवचनामृत : नामदेव. [६६१ ६१. हरिनामामृताने वाचेवर बसलेले असल्याचे मळ धुवून जातात. असत्याचे मळ बैसले ये वाचे। ते न फिटती साचे तीर्थोदके। हरिनामामृत प्रक्षाळी जिव्हेते। पाणिये बहुते काय करिती ॥ गंगासागरादि तीर्थ कोडिवरी। हरिनामाची सरी न पवती ॥ हरिनामगंगे सुस्नात पैं झाला । नाम्याजवळी आला केशिराज ॥ ६२. नामानें भक्ति जोडते, नामाने कीर्ति वाढते. नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशी असे भक्तिमुक्ति ।। नामा ऐसे सोपे नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी॥ नामें भक्ति जोडे नामे कीर्ति वाढे । नामें सदा चढे मोक्ष हातां ॥ यशदानतप नामें आली हातां । नामें सर्व सत्ता प्राप्त होय ॥ नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं । नाही याच्या तुकी दुजा कोणी॥ ६३. तुझे नाम म्हणजे केवळ अमृताची खाणीच होय. गोक्षीर लाविले आंधळिया मुखीं। तेथील पारखी जिव्हा जाणे ॥ तैसे देवा तुझे नाम निरंतर । जिव्हेसी पाझर अमृताचे ॥ सोलूनियां केळे साखर घोळिलें। अंधारी खादले तरी गोड । द्राक्षफळां घड सेवितां चोखड । तयाहूनि गोड नाम तुझे। आळूनियां क्षीर तुपाचिये आळे । कालविले गुळे गोड जैसे ॥ जाणोनियां नामा करी विनवणी । अमृताची खाणी नाम तुझे ॥ 1. ६४ नामांत व रूपांत भेद नाही. नाम तेचि रूप रूप तेंचि नाम । नामरूपा भिन्न नाहीं नाहीं ॥ आकारला देव नामरूपा आला । म्हणोनि स्थापिले नाम वेदीं ॥ १ जीवन देणारी. २ वजनांत, तुलनेस. ३ गाईचे दूध.. . ________________

६६७] नाम आणि भक्ति... नामापरता मंत्र नाहीं हो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥ नामा म्हणे नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ भक्त भले ॥ ६५. मी निर्विकल्पनाम गाइलें असतां तूं आपोआप मला हुडकीत येशील. नलगे तुझी मुक्ति नलगे तुझी भक्ति । मज आहे विश्रांति वेगळीच ॥ माझे मज कळले माझे मज कळलें ।माझे मज कळले प्रेमसुख ॥ न करीं तुझे ध्यान नलगे ब्रह्मज्ञान । माझी आहे खूण वेगळीच ॥ न करी तुझी स्तुति न वाखाणी कीर्ति। धरिलीसे ते युक्ति वेगळीच।। न करी कायाक्लेश इंद्रियां निरोध ! माझा आहे बोध वेगळाचि ॥ नामा म्हणे नाम गाईन निर्विकल्प । येसी आपोआप गिवसीत ॥ ६६. तूं लपलास तर तूं आपलें नाम कोठे नेतोस ? लपालासी तरी नाम कैसे नेसी । आम्ही अहर्निशीं नाम नाऊं ॥ आम्हांपासूनियां जातां नये तुज । ते हे वर्म बीज नाम घोकूँ॥ आम्हांसी तो तुझे नामचि पाहिजे । मग भेटी सहजें देणे लागे । भोळी भक्ते आम्ही चुकलो होतो वर्म। सांपडले नाम नामयासी॥ ६७. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव ठेवावा. देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥ चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥ वदनीं तुझे मंगळ नाम । हृदयीं अखंडित प्रेम ॥ नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥ १ कल्पना टाकून. २ शोधीत. ________________

संतवचनामृत : नामदेव. [६६८ ६८. तुझ्या नामाच्या अनुसंधानाने असतां प्रारब्ध भोगणें गोड वाटते. देवा माझे मन आणि तुझे चरण । एकत्र करोनि दिधली गांठी ॥ होणार ते हो गा सुखे पंढरिनाथा। कासया शिणतां वायांवीण ॥ माझिया अदृष्टी ऐसेंचि पैं आहे । सेवावे तुझे पाय जन्मोजन्मीं ॥ असतां निरंतर येणे अनुसंधाने । प्रारब्ध भोगणे गोड वाटे॥ . हृदयीं तुझे रूप वदनीं तुझे नाम । बुद्धि हे निष्काम धरिली देवा॥ नामा म्हणे तुझीं पाऊलें चिंतितां । झाली कृतकृत्यता जन्मोजन्मीं।। ६९. अखंड खंडेना असा जप कर, धरी रे मना तूं विश्वास या नामी । अखंड रामनामी ओळखी धरी।। जप करीं ऐसा अखंड खंडेना । निशिदिनी मना होय जागा ॥ नामा म्हणे मना होई रामरूप । अखंडित जप सोहं सोहं ॥ ७०. केशवाचे नाम घेशील तरच तूं वैष्णव होशील. वेदाध्ययन करिसी तरि वैदिकचि होसी। परि वैष्णव न होसी अरे जना ॥ गायन करिसी तरी गुणिजन होसी। परि वैष्णव न होसी अरे जना॥ पुराण सांगसी तरी पुराणिकचि होसी। परि वैष्णव न होसी अरे जना॥ कर्म आचरसी तरी कर्मठचि होसी। परि वैष्णव न होसी अरे जना॥. - १ प्रारब्ध. ________________

६७२] नाम आणि भक्ति. यज्ञ करिसी तरि याक्षिकचि होसी । परि वैष्णव न होसी अरे जना॥ तीर्थ करिसी तरी कोपडीच होसी। परि वैष्णव न होसी अरे जना॥ नामा म्हणे नाम केशवाचे घेसी । तरीच वैष्णव होसी अरे जना ।। ७१. तूं केशवाचें ध्यान करशील तर तूं केशवच होशील. पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीचि होसी । केशव न होसी अरे मना॥ आप ध्यासी तरी आपचि होसी । केशव न होसी अरे मना । वायु ध्यासी तरी वायुचि होसी । परि केशव न होसी अरे मना॥ आकाश ध्यासी तरी आकाशचि होसी । परि केशव न होसी __अरे मना॥ नामा म्हणे जरी केशवासीध्यासी ।तरी केशवचि होसी अरे मना॥ ७२. नारायणास मनी दृढ धरण्याबद्दल मी लहानथोरांची प्रार्थना करीत आहे. ब्राह्मणां न कळे आपुले ते वर्म । गंवसे परब्रह्म नामे एका ॥ ... लहान थोरांसी करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनी धरा ॥ सर्वोप्रति माझी हेचि पैं विनंति । आठवा श्रीपति आपुले मनीं ॥ केशव नारायण करावे आचमन । तेचि संध्यास्नान कर्म तया ।। नामा म्हणे हेचि करा नित्य भजन । ब्रह्मार्पण साधन याचे पायीं॥ - १ यात्रकरु. २ पाणी, जल. ३ सांपडणे. ________________

१०२ संतवचनामृत: नामदेव. [६७३ ७३. जपतपध्यानापेक्षां भक्ति श्रेष्ठ आहे. भक्तिप्रतापे पावलो मी सुपंथ । सफळ निश्चित परमार्थ ॥ देव सर्वांभूती असतां प्रगट । निर्वाणी चोखट भक्ति जाण ॥ धरूनियां मनी जपसील नाम । तेणे निजधाम पावसील ॥ जप तप ध्यान नलगे साधन । भक्ति ते कारण नामा म्हणे ॥ ७४, प्रेमाच्या जिव्हाळ्याने काया पालटून कैवल्य मिळेल, अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध । साधिल्या विविध नाना कळा ॥ प्रेमाचा जिव्हाळा जंव नाहीं अंतरीं। तंव कैसा श्रीहरि करील कृपा। हित ते आचरा हित ते विचारा । नामी भाव धरा जाणतेनो॥ अनंत हा मूर्ति पाहिल्या लोचनी।त्यांतील कोण ध्यानीं प्रतिबिंबली। स्वमींचिया परी देखसी आभास । न धरीच विश्वास चित्त तुझे। दृष्टीचे देखणे श्रवणींचे ऐकणे । मनाचे बैसणे एक होय ॥ नामा म्हणे तरी विठो येऊनि भेटे । कायाच पालटे कैवल्य होय॥ ७५. प्रेमावांचून कीर्तनाचा काय उपयोग? चंद्रसूर्यादि बिवे लिहिताती सांग । परि प्रकाशाचे अंग लिहितां न ये॥ संन्याशाची सोगे आणिताती सांग। परि वैराग्याचे अंग आणितां र नये ॥ नामा म्हणे कीर्तन करिताती सांग। प्रेमाचे ते अंग आणितां न ये॥ १ ओलावा. ________________

८] नाम आणि भक्ति. ७६. माझ्या मनाने गोपाळ धरला आहे तो ते सोडीतच नाही. बेडूक म्हणजे चिखलाचा भोक्ता। क्षीर सांडूनि रक्ता गोचिड झोंबे॥ जयाची वासना तयासीच गोड । प्रमसुखचाड नाहीं तया ॥ वांझ म्हणे मी वाढविते जोझारे । उघडावया कैवाड नाहींकोणी॥ अस्वलाचे तेल माखियेलें कानीं । ते म्हणे रानी थोर सुख ॥ स्वामीचिया कानी खोविली लेखणी । ते घेत असे धणी घरोघर॥ गाढवासी लाविली तूप पोळी डाळ । के आळोआळ लाज नाहीं॥ सूकरी कस्तूरी चंदन लाविला । तो तेथोनि पळाला विष्ठाखाया ॥ नामा म्हणे माझे मन हे वोळले । धरिलासे गोपाळ सोडीचिना॥ ७७. अन्न उदक सोडून स्त्रीपुलांचा विसर पडून तुझें ध्यान लागो इतकेंच मला दे. हाती वीणा मुखी हरी। गाये राउळी भीतरीं ॥ अन उदक सोडिलें। ध्यान देवाचे लागले ॥ स्त्रीपुत्र बापमाय । यांचा आठव न होय ॥ देहभाव विसरला । छंद हरीचा लागला ॥ नामा म्हणे हेचि देई । तुझे पाय माझे डोई ॥ ७८.हाती वीणा घेऊन राउळांत उभ्याने कीर्तन करावें _ इतकेंच मला दे. विणा घेउनियां करीं । उभा राउळामाझारी॥ तहान भूक हारपली । छंद लागला विठ्ठलीं ॥ कन्या पुत्र बाप माय । त्यांचा आठव तो न ये॥ नामा म्हणे हेचि देई । तुझे पाय माझे डोई॥ १ भार. २ डुक्कर. ३ देउळांत. ________________

संतवचनामृत : नामदेव. [६९ ७९. माझ्या वाचेस, श्रवणास, अगर दृष्टीस तुझ्यावांचून दुसरा विषयच नाही. श्रीहरि श्रीहरि ऐसे वाचे म्हणेन । वाचा धरिसी तरी मी श्रवणी ऐकेन ॥ श्रवणी दाटसी तरी मी नयनी पाहनि । ध्यानी मी ध्याईन जेथे तेथे ॥ जेथे जाये तेथे लागला हा आम्हां। न संडी तुझे वर्म म्हणे नामा ॥ ८०. काळ देहास खाण्यास आला असतां आम्ही आनंदाने गाऊं नाचूं. काळ देहासी आला खाऊं। आम्ही आनंदे नाचूं गाऊं ॥ कोणे वेळे काय गाणे । हे तो भगवंता मी नेणे ॥ टाळ मृदंग दक्षिणेकडे । माझे गाणे पश्चिमेकडे ॥ नामा म्हणे बा केशवा । जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥ ४. उपदेश. __८१. सर्वांगसाजिरी इंद्रिये आहेत तोपर्यंतच सावधान हो. सर्वांगसाजिरी आहेती इंद्रिये । तंव सावध होय हरिकथे। कीर्तन नर्तन वाचे जनार्दन । न पवसी पतन येरझारी॥ १ सुशोभित, टवटवीत. २ जन्ममरणाच्या खेपा. ________________

- ६८४] उपदेश. १०५ पूर्ण मनोरथ घडती एका नाम । दाटेल सप्रेमें जीवनहेतु ॥ नामा म्हणे विलास न करीतूं आणिक। सर्वी सर्वो एक नाम असे।। ८२. संसारसागरांतून विवेकाने पोहणारा विरळा. संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरळा संत ॥ कामाचिया लाटा अंगी आदळती। नेणों गेले किती पोहोनियां ॥ भ्रम हा भोवरा फिरवी गरगरा। एक पडिले घरा चोऱ्यांशीच्या॥ नावाड्या विठ्ठल भवसिंधु तारूं । भक्तां पैलपारू उतरितो॥ नामा म्हणे नाम स्मराश्रीरामाचें । भय कळिकाळाचं नाहीं तुम्हां। ८३. संसार करीत असतां परमार्थाचें वर्म सांपडणे शक्य नाही. संसार करितां देव जैं सांपडे। तरि क झाले वेडे सनकादिक ॥ संसारी असतां जरी देव भेटतांशुकदेव कासया जातांतयालागीं। घराश्रमी जरी जोडे परब्रह्म । तरि कां घराश्रम त्याग केला ॥ शातीच्या आचार सांपडे जरी सार तरिकां निरहंकार झाले साधु। नामा म्हणे आतां सकळ सांडोन। आलोसे शरण विठोबासी॥ ८४. अवळ क्षीर असतां गोचिडाप्रमाणे रुधिराचे सेवन कां करितोस ? परब्रह्मींची गोडी नेणती ती बापुडी। संसारसांकडी विषयभरित।। तूंते चुकली रे जगजीवनरक्षा।अनुभवावीण लक्षा नयेचिरे कोणा॥ जवळी असतांचि क्षीर नव्हेसी वरपडौ। रुधिर सेवितां गोचिडा जन्म गेला॥ दर्दुरी कमळिणी एके ठायीं बिढारं। वास तोमधुकर घेवोनि गेला॥ १ एकादाः २ गृहस्थाश्रम. ३ प्राप्त. ४ रक्त. ५ बेडूक, ६ वस्ति. ७ भ्रमर. ________________

१०६ संतवचनामृत: नामदेव. [६८४ मधुमक्षियां मोहोळ रचितां रात्रंदिवसाभाग्यवंत रस घेउनि गेला शेळीस घातली उसांची वैरणी। घेऊं नेणे धणी त्या रसाची ॥ नामा म्हणे ऐसी चुकली बापुडीं। अमृत सेवितां पुढी चवी नेणे॥ ८५. सर्वेश्वरावर लक्ष ठेवून कोणताही व्यापार कर. वावेडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरी। हाती असे दोरी परि लक्ष तेथे॥ दुडी वरि दुडी पाण्या निघाली गुजरी। चाले मोकळ्या करीं परि लक्ष तेथे ॥ व्यभिचारी नारी परपुरुष जिव्हारी। वर्ते घराचारी परि लक्ष तेथे ॥ तस्कर नगरी परद्रव्य जिव्हारी। वर्ते घरोघरी परि लक्ष तेथे ॥ धनलोभ्याने धन ठेवियेले दुरी । वर्ते चराचरी परि लक्ष तेथें ॥ नामा म्हणे असावे भलतियां व्यापारीं। लक्ष सर्वेश्वरी ठेऊनियां। ८६. कलियुगींच्या अधर्माचा महिमा. ऐका कलियुगींचा आचार । अधर्मपर झाले नर ॥ मंचकावरि बैसे राणी। माता वाहतसे पाणी ॥ स्त्रियेसी अलंकार भूषण । माता वळीतसे शेण ॥ स्त्रियेसी पाटावाची साडी । माता नेसे चिंध्या लुगडी॥ सासुसासां योग्य मान । मायबापां न घाली अन्न ॥ म्हणे विष्णुदास नामा। ऐसा कलियुगींचा महिमा ॥ ___८७. पोट माझी माता, पोट माझा पिता... वीतभर पोट लागलेसे पाठीं। साधुसंगे गोष्टी सांगू न देई ॥ पोट माझी माता पोट माझा पिता। पोटाने ही चिंता लाविलीसे॥ १ पतंग. २ कळशी व घागर यांची जोडी. ३ गुजराथी स्त्री. ४ अंतःकरणांत. ५ घरांतील धंदा. ६ चौर. ७ रेशमी उंची वस्त्र. ________________

६ ८९ उपदेश. १०७ पोट माझा बंधु पोट माझी बहीण । पोटाने हे दैन्य मांडिलेसे॥ विष्णुदास नामा पोटाकडे पाहे । अझून किती ठाये हिंडविसी ॥ ८८. संगतीचा परिणाम.. बहुरूप्या ब्राह्मणा पडियेलें मैत्र । दोहींचे ते गोत्र एक झाले ॥ वेश्या पतिव्रते पडियला शेजार । दोहींचा आचार एक झाला॥ संग तोचि बाधी संग तोचि बाधी। कुसंग तो बाधी नारायणा॥ नामा विष्णुदासा सत्संगती बोधिला। आत्मा हालाधला पांडुरंग॥ ८९. प्रारब्धाचे सामर्थ्य. कृष्ण सहाय पांडवांसी । ते भोगिती नष्टचर्यासी। साह्य केले हरिहरासी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥ ऐसी प्रारब्धाची ठेव । झाले भिक्षुक पांडव । राज्य घोडे भाग्य सर्व । सांडियेला ठाव प्रारब्धं ॥ शरीर संचिता आधीन । धर्मराज हिंडे वन । कम बुडाला रावण । आणि दुर्योधन प्रारब्धे ॥ अभिमाने शिशुपाळ । कृष्णहस्ते झाला काळ । यादव निमाले सकळ । केले निर्मूळ प्रारब्धे । कर्मरेखा टळेना । बाण लागला जगज्जीवना। कृष्णे सांडिल्या गोपांगना । हे नारायणा प्रारब्ध ॥ कामबुद्धीचे सुख । अति मानिती ते मूर्ख । चंद्रासी लागला कलंक । इंद्रासी दुःख प्रारब्धं ॥ हरिश्चंद्र तारामती । घोर जन्मांतर भोगिती। १ ठिकाण. २ दुर्दैव. ________________

माया संतवचनामृत : नामदेव. [६८९ नळराव पुरुषार्थी । तयाच्या विपत्ति प्रारब्धं ॥ पतिव्रता सुशीळ । दमयंती पाये पोळे । ऐसे अनिवार कपाळ । भोगी दुष्काळ प्रारब्धे ॥ ऐसी अनिवार जन्मांतरे । राज्य सांडिले रघुवीरें । सर्वै मेळवूनि वानरें । फिरवी दिगांतरे प्रारब्धे ॥ फिरत असतां काय झालें । पुढे प्रारब्ध ओढवलें। जानकीस राक्षसे नेलें । कष्ट भोगविले प्रारब्धे ॥ कर्मा आधीन शरीर । पूर्ण ब्रह्म रामचंद्र। रघुपति विष्णूचा अवतार । पाठी जन्मांतर नामा म्हणे ॥ ९०, चोर शूळाकडे जात असतां पावलोपावली त्यास मृत्यु . सन्मुख येतो. चोरां ओढोनियां नेईजे 5 शूळीं। चालतां पाउली मृत्यु जैसा ॥ तैसी परी मज झाली नारायणा । दिवसे दिवस उणा होत असे ।। वृक्षाचिये मुळी घालितां कु-हाडी। वेचे तैसी घडी आयुष्याची॥ नामा म्हणे हेही लहरीचे जळ । आदत सकळ भानुतेजें ॥ ९१. पायांस स्वर्ग लागो, अगर अंगावर आग्नि पडो, आत्मस्थितीचा _ भंग होऊ देऊ नये. निद्रिस्ताचे सेजे सर्प कां उर्वशी । पाहों विषयासी तैसे आम्हीं ॥ ऐसी कृपा केली माझ्या केशिराजै। प्रतीतीचे भौजे एकसरां॥ शेण आणि सोने भासते समान । रत्न कां पाषाण एकरूप ॥ पायां लागो स्वर्ग वरिपडो आग। आत्मस्थिति भंग नोहे नोहे ॥ नामाम्हणे कोणी निंदा आणि वंदा । झालो ब्रह्मानंदाकार आम्हीं॥ १ घटका. २ अनुभव. ३ कौतुक, मोठेपणा. ४ प्राप्त होवो. ________________

$ ९५] __ उपदेश. १०९ ९२. आमच्या कर्माकडे दोष असून, नारायणा, तुझ्याकडे शब्द नाही. पापाचे संचित देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥ सुख अथवा दुःख भोगणे देहासी । सोस वासनेसी वाउंगाचि ॥ पेरी कडु जीरे इच्छी अमृतफळ । अर्कवृक्षा केळी केविं येती ॥ मुसळाचे धनु न होय सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ॥ नामदेव म्हणे देवा का रुसावे । मनाला पुसावे आपुलिया ॥ ९३. श्रीमुख हृदयांत बिंबेल तरच देहबुद्धि पालटेल. सांवळी श्रीमूर्ति हृदयीं बिंबली। तरी पालटली देहबुद्धि ॥ धन्य माझा जन्म धन्य माझा भाव । ध्यानी केशिराज नांदतसे ॥ आशा तृष्णा कैशा मावळल्या देहीं । बुडोनियां पायीं ठेले चित्त ॥ नामा म्हणे ऐसी विश्रांति पैं झाली। हृदयीं न्याहाळी केशिराज || ९४. दगडाचा देव व मायेचा भक्त या उभयतांचा संदेह कशाने फिटणार ? देव दगडाचा भक्त हा मावेचा। संदेह दोघांचा फिटे कैसा ॥ ऐसे देव देही फोडिले तुरकी। घातले उदकी बोभातीना ॥ ऐसी लोहंदैवते नको दावू देवा । नामा म्हणे केशवा विनवीतसे ॥ ९५, सजीव तुळस तोडून निर्जीव दगडाची पूजा का करतोस ? पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥ भजन चालिले उफराटे । कोण जाणे खरे खोटें ॥ १ व्यर्थ. २ रुईचे झाड, ३ देहधारी, सगुण. ४ मुसलमान. ५ ओरडणे. ६ लोखंडादिक धातूंची. ________________

११० संतवचनामृत : नामदेव. [९९५ सजीवासी हाणी लाथा। निर्जीवपायीं ठेवीं माथा ॥ . सजीव तुळसी तोडा। पूजा निर्जीव दगडा॥ बेला करी तोडातोडी। शिवा लाखोली रोकडी ॥ तोंड धरून मेंढा मारा। म्हणती सोमयाग करा॥ सिंदूर माखूनियां धोडा । त्यासि भजती पोरे रांडा ॥ अग्निहोत्राचा सुकाळ । कुशपिंपळाचा काळ ॥ मृत्तिकेची पूजा नागा। जित्या नागा घेती डांगा। नामा म्हणे अवघे खोटे। एक हरिनाम गोमटें॥ ९६. मनाचा आरसा निर्मळ करून तूं त्यांत आपले रूप पहा. भुजंग विखारे पवनाचा आहार । परि योगेश्वर म्हणों नये ॥ पवनाच्या अभ्यासे काया पालटी । परि तो वैकुंठी सरता नव्हे ॥ शुद्ध करी मन समता धरोनि ध्यान । तरीच भवबंधन तुटेल रे॥ 'पवित्र गंगाजळ मीन सेवी निर्मळ । परि दुष्ट केवळ कर्म त्याचे॥ अवचितां हेतु सांपडला गळीं । न सुटे तयेवेळी तीर्थोदकें । 'घर सांडोनियां वन सेविताती । वनीं कां नसती रोस व्याघ्र ।। काम क्रोध लोभ न संडवे मनीं । असोनियां वनी कोण काज ॥ बहुरूप्याचा नटा माथां भार जटा। भस्म राख सोटा हाती दंड ॥ धोती पोति कर्मावेगळा आँसे । हुंबरत असे अंगबळे ॥ त्रिपुंड्र टिळे अंगीं चंदनाची उटी। घालोनियां कंठी तुळसीमाळा॥ व्यापक हा हरि न धरिती चित्तौं । लटकियाची गती गातु असे ॥ मीतूंपण जरी ही दोन्ही सांडी।राखिसी तरी शेंडी हेचि कर्म ॥ मानसीं तूं मुंडी देहभाव सांडी। वासनेसी दंडी आत्ममये॥ . १ काठी. २ विष. ३ मान्य. ४ मासा. ५ अस्वल, ६ योगांतील क्रिया. ७ आदेश. ८ आत्मरूप होऊन. . ________________

६९८] उपदेश... मन है दर्पणं करोनि निर्मळ । पाहे पां केवळ आत्मा स्वये ॥ तुझा तूं केवळ तुजमाजी पाहीं। नामा म्हणे ध्यायी केशिराजु ॥ ९७. जोपर्यंत विषयावर मन विटले नाही तोपर्यंत नित्यसुख कसें सांपडणार ? देहाचे ममत्व नाहीं जो तुटले । विषयों विटले मन नाहीं॥ तंव नित्य सुख कैसेनि आतुडे । नेणती बापुडे प्रेमसुख ॥ मीच एक भक्त मीच एक मुक्त । म्हणवी पतित दुराचारी ॥ नामा म्हणे तुझे कृपेंविण देवा । केवि जोडे ठेवा विश्रांतीचा ॥ २८. मांजराने उपवास केला तरी त्यास पारण्यास उंदौर पाहिजे. मांजरे केली एकादशी। इळवर होते उपवासी । यत्न करितां पारण्यासी । धांऊनि गिवसी उंदिरू॥ लांडगा बैसला ध्यानस्थ । तोवरि असे निवांत । जंव पेट सुटे जीवांत । मग घात करी वत्साचा ॥ श्वान गेले मलकार्जुना । देह कर्वती घातले जाणा । 'आले मनुष्यदेहपणा । परी खोडी न संडी आपुली । श्वाने देखिला स्वयंपाक । जोवरि जागे होते लोक! मग निजलिया निःशंक । चारौं मडकी फोडिली॥ वेश्या झाली पतिव्रता। तिचा भाव असे दुश्चिता! तिसी नाही आणिक चिंता । परद्वारावांचुनी ॥ दात्याने केली समाराधना। बहुत लोक जेविले जाणा। परि न संडी वोखटी वासना। खटनेट चाळितसे ॥ १ आरसा. २ सांपडणे.३ आतापर्यंत, इतका वेळ. ४ हुडकणे. ५ वाईट साईट.६ गाळणे. . ________________

११२ संतवचनामृतः नामदेव. [६१८ ऐशा प्रकारच्या भक्ती। असती त्या नेणों किती। एक ओळगा लक्ष्मीपती । म्हणे विष्णुदास नामा ॥ __९९. वेश्या पाटाची राणी झाली तरी तिला मागील करणी आठवतेच. डोई बोडून केली खोडी । काया वागविली बापुडी॥ ऐसा नव्हे तो संन्यास । विषय देखोनि उदास ॥ मांजराचे गेले डोळे । उंदीर देखोनि तळमळे॥ वेश्या झाली पाटाचीरोणी। तिला आठवे मागील करणी॥ नामा म्हणे वेष पालटे । परि अंतरीचे ओसपण न तुटे॥ १००. लावण्याने सुंदर व रूपाने बरवी असलेल्या पापिणीचे तोंड पाहूं नये. लावण्य सुंदर रूपाने बरवी । पापीण जाणावी ते कामिनी ॥ देखतां होतसे संगाची वासना । भक्ताच्या भजना नाश होये ॥ ऐसी जे घातकी जन्म कासयाची । चांडाळीण तिसीनरक प्राप्त। नामा म्हणे तिचे पाहूं नये तोंड । पापीण ते रांड बुडवी नरा॥ ___१०१. जिचे रूप अतिहीनवर अशा परोपकारी माउलचेि चरण वंदावे कायारूप जिचे हिनवटै अती। माउली धन्य ती आहे नारी॥ तियेवरी मन कदापि नव जाये। भजना न होये कदा चळ ॥ ऐसिये माउली परउपकारी। घात हा न करी भजनाचा॥ नामा म्हणे तिचे चरण वंदावे । वदन पहावे माउलीचें ॥ १ पदाभिषिक्त राणी. २ हीन. A ________________

६१०४] . उपदेश.. ११३ १०२. विषयसंगाने इंद्राअंगीं सहस्रभगे पडली आहेत. संग खोटा परनारीचा । नाश होईल या देहाचा ॥ रावण प्राणासी मुकला। भस्मासुर भस्म झाला॥ गुरुपत्नीशी रतला। क्षयरोग त्या चंद्राला ॥ इंद्राअंगी सहस्रभगे। नामा म्हणे विषयासंगें ॥ १०३. जोपर्यंत कामिनीकटाक्षबाण लागले नाहीत तोपर्यंतच वैराग्याच्या गोष्टी! तोवरि रे. तावरि वैराग्याचे ठाण । जंव कामिनीकटाक्षबाण लागले नाहीं॥ तोवरिरे तोवरि आत्मज्ञानबोध । जोवरि अंतरि कामक्रोध उठले नाहीं॥ तोवरि रे तोवरि निरभिमान । जंव देहा अपमान झाला नाहीं॥ नामा म्हणे अवघी बचबच गाळी। विरळा तो जाळी द्वैतबुद्धी ।। १०४. संकल्पस्वरूपे वासने, तूं मला सोडणार नाहीस . तर केशिराज मला सोडवितील. परियसि वासने संकल्पस्वरूपे । विश्व त्वां आटोपे वश केले॥ ब्रह्मादिक तुझे इच्छेचे खेळणे । विषयाकारणे लोलिंगत ॥ परि माझ्या मना सांडी वो समर्थे । देई मज दीनाते कृपादान ॥ वेदशास्त्रवक्ते व्युत्पन्न थोरले । तृणापरिस केले हळुवट॥ कृपणाचे द्वारी होऊनि याचक । विसरले सकळिक आत्महित ॥ एकांते लाविला पुत्रकलबधंदा । नेणती ते कदां सुखगोष्टी ।। जन्ममरणाचे जंपियेले पाती। आकल्प भोगिती नाना योनी ॥ ऐसे तुझे संगे बहु झाले हिंपुटी । म्हणोनि पाडिली तुटी संतसंगा नामा म्हणे पुढती गांजिसील मज । येईल केशिराज सोडवणे ॥ १ स्थिति. २ आसक्त. ३ विद्वान्, ४ हलकट, ५ पंगत. ६ खिन्न, सं...८ ________________

संतवचनामृत : नामदेव. [६१०५ १०५. एकावांचून एक कोणत्या गोष्टी शोभा पावत नाहीत ? त्यागेणि विरक्ति प्रेमावांचूनि भक्ति । शांति नसतां शप्ति शोभा न पवे ॥ दमनेवांचूनि यति मानाविण भूपति। योगी नसत युक्ति शोभा न पवे॥ बहिर्मुख लावी मति नेमावांचूनि वृत्ति । बोधेविण महंती शोभा न पवे ॥ अनधिकारी व्युत्पत्ति गुरु तो कनिष्ठ याती। माता नीच शिश्नवृत्ति शोभा न पवे । हेतूवांचूनि प्रीति गुणरहित स्तुति । करणीवांचूनि कीर्ति शोभा न पवे ॥ सत्समागमसंगति बाणली नसतां चित्तीं। नामा म्हणे क्षितीं शोभा न पवे सर्वथा ॥ १०६. दुर्लभ द्वंद्वे. सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ। योगी आणि निर्मळ । हे दुर्लभ जी दातारा ।। देव जरी बोलता । जरी कल्पतरू चालता। गज जरी दुभता। हे दुर्लभ जी दातारा॥ धनवंत आणि दयाल । व्याघ्न आणि कृपाल। अग्नि आणि सीतलु । हे दुर्लभ जी दातार ॥ सुंदर आणि पतिव्रता । सावधान होय श्रोता। पुराणिक आणि ज्ञाता। है दुर्लभ जी दातारा ॥ क्षत्रिय आणि शूर भला । चंदन फुली फुलला। स्वरूपी गुणव्यापिला। हे दुर्लभ जी दातारा॥ १ज्ञान. २ सुरूप. ३ गुणयुक्त. ________________

६१०८] - संतमहिमा. ११५ ऐसा संपूर्ण सर्वगुणीं। केविपाविजे शारंगपाणी। विष्णुदास नामा करी विनवणी। मुक्ति चरणी त्याचिया॥ ___१०७. देवास मागणे. तुझे नित्य सुख ध्यावे येणे मने । असावै संधाने चरणाचेनि ॥ वासनेविरहित होऊनि एकवट । असावे निकट संतसंगे। ऐशी मज कृपा करी गा विठ्ठला । म्हणविसी आपुला दास जरी॥ श्रवणीं तुझे नाम ऐकावे आवडी। चित्तें देउनि बुडी प्रेमडोहीं॥ नयनीं तुझे रूप देखावे सर्वत्र । व्हावे भूतमात्र सखे माझे ॥ वदनीं तुझे नाम गावे निर्विकल्प। धरोनि तुझे रूप हृदयकमळीं। काया संतांपायी जावी लोटांगणी । ते भाग्य अनुदिनी देई बापा। हेचि माझे व्रत हेचि तपतीर्थ । करावे दास्यत्व संतांचे हैं। अनुदिनी व्हावा संतांचा हा संग । असावा अनुराग कीर्तनाचा॥ मानाचा मज ओस अपमानी उल्हास । देई तुझा ध्यास सर्वकाळ ॥ ५, संतमहिमा. १०८. साधूंची लक्षणे. सर्वांभूती पाहे एक वासुदेव । पुसोनियां ठाव अहंतेचा ॥ तोचि संत साधु ओळखावा निका । येर ते आइका मायाबद्ध ॥ देखिलिया धन मृत्तिकेसमान । नवविधारत्न जैसे धोंडे ॥ १ उदासपणा. २ नाहीसा करणे. ________________

११६ संतवचनामृत : नामदेव. [६१.४ काम क्रोध दोघे घातले बाहेरी। शांति क्षमा घरी राबवीत ॥ नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे। विसंबेनी त्याचे क्षणमात्र ॥ १०९. मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । जैसा वृक्ष नेणे मान अपमान । तैसे ते सजन वर्तताती ॥ येऊनियां पूजा प्राणी जे करीती। त्याचे सुख चित्ती तयां नाहीं॥ अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती। तयां न म्हणती छेदं नका।। निंदास्तुति सम मानिती जे संत । पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ॥ नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी। तरी जीवा शिवा गांठी पडुनि जाय। .. ११०.. वैष्णवांच्या कुळींचा कुळधर्म.. आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचासर्वभावें॥ तरी त्याचे दास म्हणतांलाधिजे । निर्वासन कीजे चित्त आधीं॥ गाऊंनाचूं आम्ही आनंदें कीर्तनीं। भक्ति मुक्ति दोन्ही मागू देवा ॥ वृत्तिसहित मन बुडे प्रेमडोहीं। नाठवती देहीं देहभाव ॥ सगुणी निर्गुणी एकच आवडी । मने दिली बुडी चिदाकाशी ॥ नामा म्हणे देवा ऐसी मज सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥ १११. खऱ्या भक्ताच्या योगानें तीन्ही लोक पावन होतात. निदील हे जन सुखे निदू द्यावें । सजनी क्षोभावे न ये बापा। निंदा स्तुति 'ज्याला समान पैं झाली। त्याची स्थिति आली PARAN समाधीला ॥ शत्रुमिन ज्याला समसमानत्वं । तोचि देवाते आवडला ॥ १ विसर पावणे. २ आनंद पावणे, ________________

६.११४] _ संतमहिमाः ११७ माती आणि सोने ज्या भासे समान। तो एक निधान योगिराज ॥ नामा म्हणे ऐसे भक्त जे असती। तेणे पावन होती लोक तीन्ही॥ ११२. संताच्या संगतीने अधमासही काळांतरीं गति मिळेल. कडु वृंदावन साखर घोळिलें । तरी काय गेले कडूपण ॥ तैसा तो अधम करो तीर्थाटण । नोहे त्याचे मन निर्मळत्व ॥ बचनाग रवा दुग्धी शिजविला । तरी काय गेला त्याचा गुण ॥ नामा म्हणे संतसज्जनसंगतीं । ऐशासही गती काळांतरीं ॥ . ११३. संतांचे चरण देखिल्यास कल्पकोटी पापराशि दग्ध होतील. संताचे लक्षण ओळखावया खूण । जो दिसे उदासीन देहभावा॥ सतत अंतरी प्रेमाचा जिव्हाळा । वाचे वसे चाळा रामकृष्ण ॥ त्या संताचे चरण देखिले म्या दृष्टीं। जळती कल्पकोटी पापराशी॥ जयांच्या हृदयी प्रेमाचा जिव्हाळा जीवेभावेगोपाळा न विसंबती॥ त्यांचे अंगणींचा होईन सांडोवा । मग तूं केशवा नुपेक्षिसी ॥ तुझ्या ध्यानी ज्यांचं सदा भरले मनाविश्व तूंचि म्हणोन भजतीभावे त्यांच्या उष्टावळीचा होईन मागता । तरीच पंढरीनाथा भेटी देसी॥ ऐसे नित्यानंद बोधे जे निवाले। ते जिवावेगळे न करी नाम्या ॥ ११४. दुराचारी असला तरी तो संतकृपेनें लवकर उद्धरतो. ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले । उद्धरावया आले दीन जनां ॥ ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घेतां वदनी दोष जाती॥ हो कां दुराचारी विषयी आसक्त । संतकृपे त्वरित उद्धरतो ॥ अखंडित नामा त्यांची वास पाहे । निशिदिनी ध्याये सत्संगती॥ १ ओलावा. २ पाण्याचा पाट, ओवाळन टाकलेला पदार्थ, ३ चरणतीर्थ. ________________

११८ संतवचनामृत : नामदेव. [६११५ ११५. बोधसाबणाने संतरूपी परीट पापाचे डाग उडवितात. आह्मीं परीट चोखट । शुद्ध केले खटनट ॥ बोधसाबण लावुनी ठायीं । डाग उडविला पाहीं । शांतिशिळेवरी धुतलें । शानगंगे निर्मळ झाले ॥ परब्रह्म होउनि ठेलों । नामा म्हणे सुखरूप झालो । ११६. कृपा करून अशा जीवास, केशवा, तूं सोडीव. आतां आहे नाही पहातां क्षण एक । संपत्तीचे सुख विषय हा॥ हित ते आचरा हित ते विचारा। नामी भाव धरा जाणतेनो॥ संपत्तीच्या बळे एक झाले आंधळे । वेदिले कळिकाळे स्मरण नाहीं एक विद्यावंत जातीच्या अभिमाने। नेले तमोगुणे रसातळा ॥ मिथ्या माया मोह करोनि हव्यास । चिले आयुष्य वायांविण ॥ नामा म्हणे कृपा करूनि ऐशा जीवा। सोडवी केशवा मायबापा ॥ की ११७. हरिदासांना आकल्प आयुष्य व्हावें. आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळां।माझिया सकळां हरिच्या दासांग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संतमंडळी सुखी असो॥ अहंकाराचा वारान लागोराजस। माझ्या विष्णुदासांभाविकांसी॥ नामा म्हणे तयां असावे कल्याण ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥ ११८. एकमेकांस सावध करून नामाचे अनुसंधान आम्ही तुटूं .. देणार नाही. ' दुर्लभ नरदेह झाला तुम्हां आम्हां । येणे साधूं प्रमा राघोबाचा अवघे हातोहातीं तरों भवसिंधू । आवडी गोविंदु गाऊंगीतीं। . १ सुकुमार. ________________

६१२१ ] संतमहिमा. हिताचिया गोष्टी सांगू एकमेकां । शोक मोह दुःखा निरसं तेणे॥ एकमेकां करूं सदा सावधान । नामीं अनुसंधान तुटों नेदूं ॥ - घेऊं सर्वभावे रामनामदीक्षा । विश्वासें सकळिकां हेचि सांगों ॥ नामा म्हणे शरण रिधी पंढरिनाथा । नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥ __ ११९. साधु हे तीर्थाचे तीर्थ होत. जयांचेनि तीर्था आले तीर्थपण । केली सांठवण हृदयीं ती॥ नवल महिमा हरिदासां जीवीं । तीर्थे उपजवी त्यांचे कुसीं ॥ वाराणसी प्राणी मरे अंती कोणी । तया चक्रपाणी नामें तारी॥ नामा म्हणे तीथै तया येती भेटी । वोळंगती दृष्टी त्रिभुवना ॥ १२०. धिक् तो ग्राम की जेथे संतसंगति नाही ! धिग् धिग तो ग्राम धिग् धिग तोआश्रम।संतसमागम नाही जेथे॥ धिर धिग् ते संपत्ति धिग् धिग् ते संतति । भजन सर्वांभूती नाही जेथे ॥ धिग तो आचार घिग् तो विचार । वाचे सर्वेश्वर नाही जेथें ॥ धिर तो वक्ता धिर तो श्रोता। पांडुरंग कथा नाही जेथें ॥ धिग् ते गाणे धिग् ते पठणे । विठ्ठल नामबाण नाहीं जेथे ॥ नामा म्हणे धिर धिर त्यांचे जिणे । एका नारायणेवांचूनियां ॥ - १२१. तूं संतांवर विश्वास टाकशील, तर तुला देव आपोआप भेटेल. संतपायीं माया धरितां सद्भावें । तेणे भेटें देव आपआप ॥ म्हणवूनि संतां अखंड भजावें । तेणे भेटे देव आआप ॥ . १ दूर करणे... २ काशीक्षेत्र. ________________

१२० संतवचनामृत : नामदेव. [६१२१ साधुपाशी देव कामधंदा करी । पीतांबर धरी वरी छाया ॥ नामा म्हणे देव इच्छी संतसंग । आम्हां जिवलग जन्मोजन्मीं ॥ १२२. तूं संतांचा प्रसाद सेविशील तर तुझे आयुष्य दुणावेल. संतांच्या चरणा द्यावे आलिंगन । जीवें निंबलोणं उतरावे ॥ तेथे तूं निश्चळ राहे माझ्या मना। मग तुज यातना न होती कांही संतांचे द्वारींचा होई द्वारपाळ । तुटे मायाजाळ मोहपाश ॥ संतांचे प्रसाद सेविसी उरले । आयुष्य सरले दुणावेल॥ नामा म्हणे संत आहेत कृपासिंधु । देती भक्तिबोधु प्रेमसुख ॥ ___ १२३. " तैसा भेटे नारायण संतसंगे." परिसाचेनि संगे लोह होय सुवर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगे। कीटकी ध्यातां भृग झाली तोचि वर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगें। वनस्पति परिमळुचंदन झाला जाण । तैसा भेटे नारायण संतसंगे। अग्नीस मिळे ते न ये परतोन । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥ सरिता ओघ जाय सिंधूसि मिळून । तैसा भेटे नारायण संतसंगे। नामा म्हणे केशवा मजदई संतसंग। आणिक कांहीं तुज न मागे बापा॥ १२४. ज्याने तुला पाहिले त्याचा चरणरज मिळाल्यास मी आपल्यास धन्य समजेन. ज्याचिया रे मने देखियेले तुज । त्याची लोकलाज मावळली ॥ नाहीं तया क्रिया नाहीं तया कर्म । वर्णाश्रमधर्म सुखदुःख ॥ १ उतरून टाकण्याचा पदार्थ. २ दुप्पट होईल. ३ किडा. ४ भुंगा. ________________

६१२७] संतमहिमा. .१२१ नाही देहस्फूर्ति जातिकुळभेद । अखंड आनंद ऐक्यतेचा ॥ नामा म्हणे त्याचे चरणरज व्हावें । हेचि भाग्य द्यावे केशिराजा॥ १२५. जो मला राम प्रत्यक्ष दाखवील त्याचे मी पाय घरीन. मंत्रतंत्र दीक्षा सांगतील लक्ष। परि राम प्रत्यक्ष न करी कोणी॥ प्रत्यक्ष दावील राम धरीन त्याचे पाय। आणिकांची काय चाड मज॥ सर्व कामी राम भेटविती माते । जीवभावे त्यांते ओवाळीन ॥ नामा म्हणे आम्हां थोर लाभ झाला । सोइरा भेटला अंतरींचा। १२६. सद्गुरु नानाप्रकारे साक्षीला पाहिजे. भक्तीविण मोक्ष नाही हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ॥ तरी तेचि ज्ञान जाणायालागुनी । संतां वोळगोनि वश्य कीजे ॥ प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला। पाहिजे साक्षीला सद्गुरु तो॥ नामा म्हणे सेवा घडावी संतांची। घ्यावी कृपा त्यांची तेंचि शान॥ १२७, नाम जरी स्वतःसिद्ध असले तरी सद्गुरुवांचून वर्म हाती येत नाही. .. करितां वेदाध्ययन ज्योतिष । नामाचा तो लेश नये हातां ॥ बहुत व्युत्पत्ति पुराण । व्यर्थ ते स्मरण नाम नव्हे ॥ अनंत हे नाम जयांतूनि आले। त्यांतचि जिराले जळी जळ ॥ सद्गुरु ते नाम सद्गुरुकृपेंविण कोणा । साधन साधेना जपें तपें॥ नामदेव म्हणे स्वतःसिद्ध नाम । गुरूविण वर्म हातां नये ॥ ________________

१२२ संतवचनामृत: नामदेव. [$ १२८ - १२८. साधूची भेट होण्यास भाग्य लागते. रविरश्मि धरोनि स्वर्गी जाऊं येईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥ वैतरणी उतरोनि वैकुंठा जाऊं येईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे॥ स्वमींचा हा ठेवा साचही होईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥ मायबाप बंधु भगिनी मिळे योनि । परि साधूची मिळणी भाग्य योगें ॥ त व्रते दाने गोविंद पैं भेटे। परि साधु तंव न भेटे भाग्यविण ॥ नामा म्हणे केशवा बरा साधुसंग। यावेगळा भवरोगन तुटे न तुटे॥ १२९. ज्यास दया माया नाही असा हरिदास घेऊन काय _करावयाचा ? मुखी नाम हाती टाळी । दया नुपजे कोणे काळी ॥ काय करावे ते गाणे । धिक धिक् ते लाजिरवाणे ॥ हरिदास म्हणोनि हालवी मान । कवडीसाठी घेतो प्राण ॥ हरिदासाचे पायीं लोळे । केशी धरोनि कापी गळे ॥ नामा म्हणे अवघे चोर । हरिनाम है थोर ॥ १३०. कोणाचा अंकित न होईन अशी प्रतिज्ञा एका भक्तासच साजते. आणिक न मागे हे ब्रीद साजे चातका। भूमीच्या उदका न खालवी माथा ॥ १ परलोकांतील नदी. . ________________

६१३१] संतमहिमा. १२३ आणिकापुढे न गाय हे ब्रीद साजे कोकिळिये । वसंत ऋतु स्वये ओळखीतसे ॥ आणिकापुढे न नाचे हे ब्रीद साजे मयूरा। वर्षला घन सारा वळोनियां ॥ एका लक्ष्मीपतिवांचूनि न बैसे आणि कापुढे। है ब्रीद साजे रोकडे गरुडासी ॥ आणिकांचा पांगिलो न करी गा देवा । नामा म्हणे केशवा रंक तुझा ॥ १३१. येथे एका पुंडलीकानेंच राज्य केले आहे. जन्मजन्मांतरी असेल सामुग्री । तरिच नाम जिव्हाग्री येईल वाचे॥ कर जोडुनी दोन्ही मोक्ष पाहे वास। म्हणे होइन दास हरिदासांचा॥ तरि हे तुच्छ करूनि न पाहती दृष्टी। आपगिले शेवटी ब्रह्मज्ञानी। नामाचेनि बळे उडविली साधने । तोडिली बंधने संसाराची॥ मुक्तिपद कोणी न घेती फुकासाठीं । हिंडे वाळुवंटी दीनरूपे । योगियाचे घर रिघे काकुलती । अव्हेरिल संती म्हणोनियां ॥ रिद्धिसिद्धि म्हणती आमुची कवण गती । यावे काकुलती कवणा - आम्हीं॥ मोक्षमुक्ति जिहीं हाणितल्या लाथीं। ते काय धरिती आमुची सोय ॥ ऐसे सर्व देवांसी श्रीदेव ते पूज्य । केलें एक राज्य पुंडलीके ॥ हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारीं । मुखीं निरंतरी नामघोष ॥ १ मेघ. २ अंकित. ३ स्वीकारिलें. . ________________

१२४ संतवचनामृतः नामदेव. [६ १३२ १३२. पांडुरंग आपली पदवी सेवकास देतो. आपली पदवी सेवकासी द्यावी। तो एक गोलावी पांडुरंग ॥ भावाचा आलुका भुलला भक्तिसुखा । सांपडला फुका नामासाठी प्रेमाचा जिव्हाळा नामाची आवडी ।क्षण एक न सोडी संग त्याचा॥ नामा म्हणे आम्हां दीनाचे माहेर । तो एक उदार पांडुरंग ॥ १३३. जे भक्त संसाराची सोय सोडतात त्यासच देव मागे पुढे सांभाळितो. संसाराची सोयें चुकले बापुडे । केशव मागे पुढे सांभाळीत ॥ आळीकार नामे खेळे महाद्वारीं । आंतून बाहेरौं न वचे कांहीं ॥ संतांते देखोनि मिठी घाली चरणीं । कुरवंडी करूनि देह टाकी॥ ऐसे निजबोधे राहिले निवांत । नामा राहे एक केशवचरणीं ॥ १३४. नानाप्रकारच्या खेळियांचे वर्णन. नव्हे तेचि कैसे झालेरे खेळिया । नाहीं तेचि दिसू लागलेरे । अरूप होते ते रूपासि आले । जीव शीव नाम पावले रे ॥ आपलिच आवडी धरून खेळिया। आपआपणातें व्याले रे।' जोपनाकारणे केली बायको । तिणे एवढे वाढविले रे॥ ऐक खेळिया तुज सांगितले ऐसें । जाणुनि खेळ खेळेरे ॥धु०॥ ब्राह्मणाचे पोर एक खेळासि भ्याले । ते बारा वर्षे लपालेरे। कांपत कांपत बाहेर आले । ते नागवेचि पळून गेलेरे ॥ सहातोड्या एक संभूचे बाळ त्याने । बहूतचि बळ आथियेलें रे। खेळ खेळतां दगदगी व्याले। ते कपाट फोडुनी गेले रे॥ १ भुकेला. २ मार्ग, सबंध. ३ हट्ट घेणारे. ________________

६ १३५] अनुभव. १२५ . चहूं तोड्याचा पोर एक नारयाहि जाण। तो खोळयामाजी आगळारे। कुचालि करुनी पोरे भांडवी। आपण राहे वेगळारे ॥ गंगा गौरी दोघी भांडवी । संभ्यासि धाडिले राना रे। खेळ खेळे परि डायीं न सांपडे । तो एक खेळिया शाहणारे ॥ स्नेळियामाजी हनुम्या शहाणा । न पडे कामव्यसनी रे । कामचि नाही तेथें क्रोधचि कैंचा तेथे कैंचे भांडणरे। रामागड्याची __ आवडि मोठी म्हणूनि लंके पेणे रे ॥ यादवांचा पोर एक गोप्या भला । तो बहुतचि खेळ खेळलारे । लहान थोर अवघी मारिली । खेळचि मोडुनि गेला रे॥ ऐसे खेळिये कोट्यानकोटी । गणित नाही त्यालारे । विष्णुदास नामा म्हणे वडिल हो । पहा देहीं शोधुनि रे ॥ ६. अनुभव. १३५. ईश्वरास जाणण्याची कळा ही एक निसर्गदत्त देणगी आहे.. धेनु विये वनी तिसी कैची सुइणी।तरी ने वत्स स्तनी लावी कवण भुजंगाची पिली उपजतांचि वेगळी । त्यांसि डंखू शिकविले हो कोणी॥ सहज लक्षण जयाचिये ठायीं। तो आपुलिये सोयी धांवतसे ॥ १कुचेष्ट. २ मुक्काम. ३ दंश करणे. .. .. ________________

१२६ - संतवचनामृत : नामदेव. [१३५ उपजतांचि फूल मोग-याच्या माथां । त्यासी परिमलता कोणे लावियेली ॥ कडू दुध्याच्या आळ्यांसी साखर दूध घातले । ते अधिकचि कहवाळे कवणे केले॥ गिळिला तोडिला खंडविखंडी। ऊस न संडी सोय गोडीसी ॥ नामा म्हणे तैसे आहे गा श्रीहरि । सोईचे व्यापारी घेईन तूंते ॥ ____ १३६. चरणांवर लोटांगण घालून मी तुझें रूप पाहीन. घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहनि रूप तुझे ॥ प्रेमें आलिंगीन आनंदे पूजीन । भावे ओवाळीन म्हणे नामा ॥ ___१३७. एकवेळ नयनी पाहून तुम्ही भलत्या गांवास गेला तरी हरकत नाही. 'एकवेळ नयनी पहावा । मग जाइजे भलत्या गांवा ॥ आठवाल वेळोवेळां । विठोबा आहे रे जवळां ॥ हृदयीं मांडूनिया ठसा । नामा म्हणे केशव असा ॥ ____१३८, मुक्याने गूळ खादला । गोडी न ये सांगायाला. गूळ गोड न लगे म्हणावां । तैसा देव न लगे वानावा ॥ सेवी तोचि चवी जाणे । येरां सांगतां लाजिरवाणे ॥ नामा म्हणे या खुणा। तुम्हीं ओळखा पंढरिराणा ॥ १३९. अमृतलिंग केशव चित्ती असल्याने आम्ही अखंड __ तृप्तीचा उपभोग घेत आहों. तान्हेलो भुकेलो । तुझेनि नामें निवालों॥ तहान नेणे भूक नेणे । अखंड पारणे नामी तुझ्या ॥ अमृतलिंग केशव हा चित्ती । तेणे नामया तृप्ति अखंडित ॥ ________________

६१४३ ] अनुभव. १२७ १४०. डावीउजवीकडे आणि मागेपुढे तुझे चरण जोडतील असें कर. मने ध्यान करणे वाचे उच्चारणे । नयने तुज पाहणे हेचि देई ॥ करें पूजा करणे माथा चरणी ठेवणे श्रवणीं गुण ऐकणे हेचि देई । मनसा वाचा कर्म आणि दश इंद्रियें । तुझ्या चरणी दृढ होय ऐसे करी॥ डावी उजवीकडे आणि मागे पुढे। अंती चरण जोडे ऐसे करीं ॥ नामा म्हणे केशवा तुझी मज गोडी। जन्मोजन्मी जोडी हेचि देई॥ १४१. देव चहूंबाही उभा असून सर्व दिशा व्यापून राहिला आहे मन झाले उन्मन वासना तल्लीन । देखिले हरिचरण सर्वी ठायीं ॥ गुरुशिष्यमत हारपला दृष्टांत । प्रत्यक्ष त्वरित हरि झाला ॥ नामा पाहे देहीं तंव उभा चहूं बाहीं। दिशाद्रुमित दाही हरि दिसे॥ १४२. आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिलें, आंधळ्याने स्वरूप देखियेले नयनीं। मुके बहिया कानी गोष्टी सांगे ॥ कांसवीचे दूध दुहितां भरणा । दुही त्याला जाणा हात नाहीं॥ वारियाच्या लोथा बांधोनियां माथां । वांझेचिया सुताबळिवंता॥ मुंगीने त्रैलोक्य धरियेले तोडी । नामा म्हणे पिंडी प्रचित आहे ॥ १४३. सहस्रदळांतून उठणाऱ्या अनाहतनादाच्या गजराने पातकें . कपार्टी रिघतात.. सहस्रदळांमधून अनुहात ध्वनि उठीं। नामाचेनि गजरे पातके रिघाली कपाटीं। १ काढणे. २ मोट. . ________________

१२८ संतवचनामृत : नामदेव. [६१४३ जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। कळिकाळ एका नामें महादोष जाती भंगा॥ .. दशमी एकव्रत दिंडीचे करा दर्शन । एकादशी उपवास तुम्ही करा जागरण ॥ द्वादशी साधने जळतीपातकांच्या कोटी। नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठीं ॥ १४४. नाम घेतांच देव सामोरा येणार नाही तर माझे मस्तक छेदा. ___ हडबडली पातकें । घेतां रामनाम एक ॥ 'नाम घेतां तत्क्षणी । चित्रगुप्ते सांडिली लेखणी ॥ घेउनि पूजेचा संभार । ब्रह्म येतसे सामोर ॥ . नामा म्हणे जरि हे लटके। तरि माझे छेदावे मस्तक ॥ ___ १४५. बसून नाम घेतल्यास देव उभा राहतो, उभ्याने नाम का घेतल्यास देव नाचतो. कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव । कोणते वैभव वाणी आतां ॥ अंत्यज आणि जातिवंता। मुखी राम घेतां उडी घाली ॥ . बैसोनि आसनी आळवितां नाम। उभा सर्वोत्तम तयापुढे ॥ ... प्रेमाचिया भरे उभ्याने गर्जतां । नाचे हा अनंत तयासवें ॥ नामा म्हणे तया कीर्तनाची गोडी। घालीतसे उडी नेटेपाटे । १४६. नामयाचा स्वामी आला. कोटी दिवाळ्या दसरे। आम्हां हेचि झाले पुरे ॥ घरोघरी ओवाळणी । विठ्ठल देखिला नयनीं ॥ १ गोंधळून जाणे. २ साहित्य. ३ लबकर. ________________

१४८ अनुभव. झाला सुखाचा शेजार । करा नामाचा गजर ॥ नामयाचा स्वामी आला । ब्रह्मादिकां आनंद झाला ॥ १४७. गरुडासमवेत सुदर्शनधारी देदीप्यमान देवाचे दर्शन. कोटिसूर्य प्रभादीप्ति । गगनीं झळकली अवचिती॥ संत नामया सांगती। पैल आला कमलापति ॥ वत्सालागी जैसी धेनु । तैसा धांवे जगज्जीवनु ॥ गरुडाचे धुंदुवाती । दाही दिशा आक्रंदती ॥ हरिकंठींची सुमनमाळा । सुटोनि आली भूमंडळा ॥ सवे चाले सुदर्शन । भक्त कराया रक्षण ॥ उचलोनि दोन्ही बाही। नामा धरिला हृदयीं ॥ १४८. महाप्रळयांत सप्तसागर एकवटतात तसा विश्वव्यापित्वाने .. स्वरूपसाक्षात्कार. चेइला तो जाणरे सद्गुरुववर्ती निर्धारें । विपरीत भावना विसर पडला कंठी जया परिहार रे॥ आपणा 4 पहावया कवण लावू दिवारे । चंद्रसूर्य जेणे प्रकाशे तो मी कैसा पाहूं येई रे॥ अंत त्यासी नाही रे स्थान मान कांही रे।। चेइला तेणे ओळखिला येरांसी अगम्य भाई रे ॥ पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाही दाही दिशा रे। महाप्रळई सप्त सागर एक होती अनुभविया तो तैसा रे॥ । १ संचार. ________________

[६१४८ संतवचनामृत : नामदेव. दाही दिशा व्यापूनियां तो अंधःकार महा रे। रविप्रकाश जाहल्या आपेआप निरसला रे॥ काष्ठी पावक उपजला तोही तयासम रे । नामा म्हणे केशिराजा चेईल्या आम्हां तुम्ही रे॥ - १४९. उन्मन्यवस्थेत स्वरूपसाक्षात्कार. देहमंदिराभीतरी । शेजे सूदला श्रीहरि ॥ निद्रा उन्मनीचे भरीं । तें म्यां स्वम देखिलें। स्वी भुलले बाई । मागील नाठवेचि काई ॥ हा जीव परवस्तूच्या ठाई । तनुमने आटला ॥ स्वम सांगू कोणासी । विवेक करिती तयासी ॥ है कोडे अजानासी । संतावांचुनी नुगवे ॥ ध्यानी पहुडला सांवळा । जवळी नारी बारा सोळा ।। विजणे वारिती सकळां । सोहंशब्दजागरणी । धिं धिं तुरे वाजती । अनुहात ध्वनि गर्जती ॥ तेथे निद्रा ना सुषुप्ति । चंद्रसूर्य मावळले ॥ .मना पवना नाही भद । तया ठायीं हा गोविंद । तेथे खुंटला अनुवाद । वेदश्रुति आटल्या ॥ म्हणे विष्णुदास नामा। जन्ममरण नाहीं आम्हां । कृपा केली मेघश्यामा । संतसंगे तारिलो॥ १५० "केशव तोचि नामा, नामा तौच केशव." नामयाचे प्रेम केशवाचे जाणे । केशवासी राहणे नाम्यापाशीं ॥ केशव तोचि नामा नामा तोचि केशव प्रेमभक्तिभाव मागतसे। विष्णुदास नामा उभा केशवद्वारी । प्रेमाची शिदोरी मागतसे ॥ १ घालणे. २ निजणें. ३ पंखा. ________________

गोराकुंभार. १. नाम्या, तुम्हां आम्हां यावर तुटी उरली नाही. स्थूल होते तेंचि सूक्ष्म पैं झालें । मन हे बुडाले महासुखीं॥ माझे रूप माझे विरालेसे डोळां । सामाविले बुबुळां माझे शान ॥ म्हणे गोरा कुंभार नवल जाहली भेटी । नाम्या तुम्हां आम्हां तुटी व उरली नाहीं॥ २. पाहता पाहतां माझी खेचरी मुद्रा लागून गेली. निर्गुणाचे भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगें गुणातीत ॥ मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला काई बाई बोलूं नये ॥ बोलतां आपुली जिन्हापै खादली खेचरी लागली पाहता पाहतां॥ म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझीभेटी।सुखासुखी मिठी पडली कैसी॥ ३. जयजय झनकून झांगट वाजते. अंतरींचे गुज बोलूं ऐसे कांहीं । वर्ण व्यक्ति नाही शब्द शून्य ॥ जय जय झनकून जयजय झनकून । अनुहात जंगटे नाद गर्जे ॥ परतल्या श्रुति म्हणती नेति नेति। त्याही नादाअंतीस्थिर राहती॥ म्हणे गोरा कुंभार सत्रावीचे नीर । सेवी निरंतर नामदेवा ॥ ४. मजवर झडपणी होऊन आदिरूप मनांत संचरलें आहे. केशवाचे भेटी लागले ते पिसे । विसरले कैसे देहभाव ॥ झाली झडपणी झाली झडपणी। संचरलें मनी आदिरूप ॥ - १ मावणे. २ भेद. ३ एक मुद्रा. ४ गुप्त गोष्ट. ५ काशाचे एक वाद्य. ६ वेद, ७ अमृत, ८ वेड. ९ भूताने पछाडले जाणे. ________________

१३२ संतवचनामृत : गोराकुंभार. [$r नलिंपेचि कर्मी न लिंपेचि की। न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ।। म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त । सुखरूप अद्वैत नामदेवा ॥ ५. मन हे मुकें होऊन नेत्रपाती निवांत राहिली आहेत. कवण स्तुति करूं कवणिया वाचे। वोध संकल्पाचे गिळिलें चित्त। मन हे झाले मुके मन हे झाले मुके । अनुभवाचे हे सुख हेलावले। दृष्टीचे पाहणे परतले मागुती। राहिली निवांत नेत्रपाती । म्हणे गोरा कुंभार मौन्यसुख ध्यावे । जीवें ओवाळावे नामयास। ६. आपण जीवन्मुक्त होऊन जगास शाहणें न करणे हे बरें. मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतां हे बोली बोलवेना। ते काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधारा या ॥ आनंदी आनंद गिळुनी राहणे । अखंडित होणे न होनियां ॥ म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणे । जग हे न करणे शहाणे बापा। १डोलणे. २ पापण्या. ________________

विसोबाखेचर. १. देव देखिला म्हणसील तर, नामदेवा, हा बोल बरा नव्हे. जरी म्हणसी देव देखिला । तरी बोल भला नव्हे नाम्या । जावरि मी माझे न तुटे । तंव आत्माराम कैसेनि भेटे॥ खेचरसाह्याने मी काही नेणे । जीवाया जीव इतले मी जाणे ॥ २. तुझें निजसुख तुझ्यापाशीच आहे. तुझे निजसुख तुजपासी आहे। विचारूनि पाहे मनामाजी ॥ विवेकवैराग्य शोधूनियां पाहे । तेणे तुज होय ब्रह्मप्राप्ति ॥ ज्ञानाचा प्रकार सहजचि झाला । आहे भाव गेला गळोनियां ॥ खेचर विसाम्हणे जेथे ओंकार निमाला सहजचि झाला ब्रह्ममूर्ति। ३. असा अनकळित मार्ग तुला साधेल तर पर्वतप्राय पापराशि दग्ध होतील. पर्वतप्राय पापराशि होती दग्ध । वाचेसी मुकुंद उच्चारितां ॥ अच्युत हरे केशव हरे । माधव हरे रामकृष्ण ॥ नामाचे साधन करिशील पूर्ण । तें प्रपंचभान उरों नेदी ॥ उदासीनवृत्ति आवरावे मन । नाहीं गुणधर्म मायालोभ ॥ ऐसा अनकळित मार्ग साधेल जरी तुज। खेचर विसा गुज सांगें नाम्या॥ - १ इतके. २ समन. ________________

१३४ संतवचनामृत: विसोबाखेचर. [४ ४. खेचराचे गुरु ज्ञानराज, व खेचराचे शिष्य नामदेव. जळ स्थळ काष्ठ पाषाणु । पिंडब्रह्मांड अणुरेणु । सर्वस्वे आपणु । साक्ष असें॥ हे जाणूनियां यापरतें । जाणे आप आपणियाते।। खेचर म्हणे नामयाते । अवघाचि देव ॥ श्रवणी सांगितली मात । मस्तकी ठेविला हात। पदपिंडविवर्जित । केला नामा॥ खेचर विसा । प्रेमाचा हो पिसा। नामा कैसा । उपदेशिला ॥ सांगितले गुज । दाखविले निज। पाल्हाळी हो तुज । काय चाड ॥ खेचर म्हणे मज । ज्ञानराज हे गुरु । तेणे अगोचरु । नामा हा केला ॥ १ ब्रह्म व जीव. २ या वेगळा. विस्तार. ________________

सांवतामाळी. १. संसाराची बोहरी करण्याविषयीं देवाजवळ सांवत्याची प्रार्थना. ऐकावे विठ्ठल धुरे। विनंति माझी हो सत्वरें ॥ करी संसाराची बोहरी । इतुके मागतो श्रीहरि ॥ कप्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ माळी सांवता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ २. ब्राह्मणजन्म असता तर मी कांतच गुंतलों असतो. मली केली हीन याति । नाहीं वाढली महंती ॥ जरी असतां ब्राह्मणजन्म । तरी हे अंगी लागते कर्म ॥ स्नान नाहीं संध्या नाहीं । याति कुळ संबंध नाहीं ॥ सांवता म्हणे हीन याति । कृपा करावी श्रीपति ॥ ३. मला अनाथाला येथे न ठेवितां मला उचलून न्या असें. __ सांवता माळी म्हणतो. कां बा रुसलासी कृपालुवा हरि। तुजविण दुसरी भाकू ती कोण ॥ दीन रकै पापी हीन माझी याति । सांभाळा श्रीपति पांडुरंगा ॥ मोह आशा माझ्या लागलीसे पाठी । काळ क्रूरदृष्टि पाहात असे॥ सांवता म्हणे देवा नका ठेवू येथे । उचलोनि अनाथा न्यावे मजा ४. सुखांत व दुःखांत देव ठेवील तसे रहावें. समयासी साँदर व्हावें । देव ठोविल तैसे रहावें ॥ कोणे दिवशी बसून हत्तीवर । कोणे दिवशी पालखी सुभेदार॥ १ श्रेष्ठ. २ राखरांगोळी. ३ दरिद्री. ४ तयार, तत्पर. ________________

१३६ संतवचनामृत : सावतामाळी. [६४ कोणे दिवशी पायांचा चाकर । चालून जावें ॥ कोणे दिवशी बसून याची मन । कोणे दिवशी घरांत नाही धान्य॥ कोणे दिवशी द्रव्याचे सांठवण । कोठे सांठवावे ॥ कोणे दिवशी यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन॥ कोणे दिवशी स्मशानी जाऊन । एकटे रहावें ॥ कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा॥ कोणे दिवशी सांवत्याच्या बापा । दर्शन द्यावे ॥ ____५. देवाची सांवत्यास भेट. विकासिले नयन स्फुरण आले बाही। दाटले हृदयीं करुणाभरिते॥ जातां मार्गी भक्त सांवता तो माळी । आला तयाजवळी पांडुरंग। नामा शानदेव राहिले बाहेरौं । मळियाभीतरी गेला देव ॥ माथां ठेऊनि हात केला सावधान | दिले आलिंगन चहूं भुजी ॥ चरणी ठेऊनि माथां विनवितो सांवता। बैसा पंढरिनाथा करीन पूजा ॥ ६. नामाच्या बळाने न भितां आम्ही कळिकाळाच्या का .. माथ्यावर सोटे मारूं. नामाचियाबळे न भिऊं सर्वथा। कळिकाळाच्या माथां सोटे मारू। वैकुंठचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनि नाची रंगी॥ सुखाचा सोहळा करूनि दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥ सांवता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा। तेणें भाक्ति द्वारा वोळंगती॥ १भरून येणे. २ सेवा करणे, आश्रय करणे. ________________

a नरहरिसोनार. १. चितारी जशी भिंतीवर चित्रे रंगवितो तसे हे सर्व जग आहे. चिताया चितरे काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे है ॥ पोरे हो खेळती शेवटीं मोडिती । टाकूनियां जाती आपुल्या घरा॥ तैसे जन सारे करिती संसार । मोहगुणे फार खरे म्हणती ॥ कांही साध्य करा साधुसंग धरा । नाम है उच्चारा नरहरि म्हणे॥ २. ऐरावत ज्या प्रमाणे अंकुशाच्या ताब्यात आहे त्याप्रमाणे नरहरि गैबीनाथाच्या अंकित आहे. ऐरावती बहु थोर । त्याला अंकुशाचा मार ॥ व्याघ्र बहु भयंकर । त्याला सांपळा हो थोर ॥ सर्पविष हा विखार । मंत्रवल्ली केली थोर ॥ देह जठराग्नि भारी। अन्नपाणी शांत करी॥ गुरु गैबीनाथ । नरहरिदास हा अंकित ॥ ३. नाम हे फुकाचे असून परिणामी अमृताप्रमाणे गोड आहे. नाम फुकाचे फुकाचें । देवा पंढरिरायाचें ॥ नाम अमृत हे सार । हृदयीं जपा निरंतर ॥ नाम संतांचे माहेर । प्रेम सुखाचे आगर ॥ नाम सीमध्ये सार । नरहरि जपे निरंतर ॥ त॥ १ भयंकर. ________________

- - १३८ संतवचनामृत : नरहरिसोनार. [४ ४. निशिदिनी होणाऱ्या अनाहतनादाला मन लुब्ध होऊन गेलें आहे. अनुहात ध्वनि करित निशिदिनीं । मन हे लुन्धुनि गेले तया ॥ अखंड हे मनीं स्मरा चिंतामणी । हृदयीं हो ध्यानी सर्वकाळ ॥ अखंड हे खेळे जपे सर्वकाळीं । हृदयकमळी आनंदला॥ प्रेम अखंडित निशिदिनी ध्यात । नरहरिसी पंथ दाखविला ॥ ५. नरहरि हा परमार्थात सुद्धा सोनाराचा धंदा करितो. देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥ देह बागेसरी जाण । अंतरात्मा नाम सोने ॥ त्रिगुणाची करुनि मूस। आंत ओतिला ब्रह्मरस ॥ जीव शिव करुनि फुकी। रात्रंदिवस ठोकाठोकी । विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केले चूर्ण ॥ मनबुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी॥ शान ताजवा घेऊनि हातीं। दोन्ही अक्षरे जोखिंती॥ खांद्या वाहोनि पोतडी । उतरला पैलथंडी ॥ नरहरि सोनार हरिचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥ १ रात्रंदिवस. २ सोनाराची शेगडी. ३ घातूंचा रस करण्याचे पात. ४ फुकणी. ५ तराजू. ६ वजन करणे. ७ पलीकडचे तीर. ________________

चोखामेळा. १. मला दूर हो, दूर हो, म्हणतात तर मी तुला कसा भेदूं ? हीन याति माझी देवा । कैसी घडेल तुझी सेवा ॥ मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीतीं ॥ माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥ माझ्या गोविंदा गोपाळा । करुणा भाकी चोखामेळा ॥ २. विठोबाचा हार तुझे कंठी कसा आला असे मला. बडवे विचारतात. धांव घाली विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिती ऐसा काही तरी अपराध ॥ विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला । शिव्या देउनी म्हणती महारा देव बाटवीला ॥ अहो जी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा। नका जी मोकलूं चक्रपाणी दुजे द्वारां ॥ जोडुनियां कर चोखा विनवितो देवा । बोलिला उत्तरी परि राग नसावा ॥ ३. मी देहांतच पंढरी पाहिल्याने अविनाश आत्मा विठ्ठलरूपाने मला दिसत आहे. देही देखिली पंढरी । आत्मा अविनाश विटेवरी॥ .. तो पहा पांडुरंग जाणा । शांति रुक्मिणी निजांगना॥ ___ १ हाकलणे. २ दुसऱ्या. ________________

[६३ १४० संतवचनामृत: चोखामेळा. आकारले तितुके नासे । आत्मा आविनाश विठ्ठल दिसे ॥ ऐसा विठ्ठल हृदयीं ध्यायी । चोखामेळा जडला पायीं ॥ ४. चोखा डोंगा असला तरी त्याचा आत्मा काही डोंगा नाही. ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा॥ कमान डोंगी परी तीरे नाही डॉगा। काय भुललासी वरलिया रंगा॥ नदी डॉगी परी जळ नोहे डोंगे । काय भुललासी वरलिया रंगे॥ चोखाडोंगा परीभाव नाही डोंगा। काय भुललासी वरलियारंगा॥ ५. देणार असशील तर भक्तियुक्त कन्यापुत्र दे; नाही तर माझें निःसंतान कर. ऐसा पुत्र दे गा देवा । जग म्हणे त्याला बावा ॥ कन्या ऐसी तरी देई । जैसी मिरौं मुक्ताबाई ॥ ऐसा भक्तराज गुंडा । त्याचा तिहीं लोकी झेंडा ॥ इतके न देवे तुझ्याने । माझे करीं गा निःसंतान ॥ दोही माजी एक लेखा। बोले केशवदास चोखा ॥ ६. खटनटांनी येऊन येथून शुद्ध होऊन जावे अशी चोखामेळा दवंडी पिटितो. टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट ते चालावी पंढरीची ॥ हरिनाम गर्जतां नाहीं भयचिंता। ऐसे बोले गीता भागवत ॥ पातकाचे भार मिळाले अपार । जयजयकारे भरले भीमातीर॥ पंढरीचा हाट कवुलाची पर्ट 4 मिळाले चतुष्टं वारकरी ॥ बटनेंट यावे शुद्ध होउनी जावे । दवंडी पिटी भावे चोखामेळा ॥ १ वांकडा. २ बाण. ३ मिराबाई. ४ पताका, ५ बाजार. ६ पेठ. ७ चार. ८ वाईटसाईट. ________________

६.] भाक्ति. ७. आमच्या घरास विठोबा पाहुणा आला असल्याने षड्रस पक्वान्न वाढून आम्ही त्याशी एकवट होऊन जेवू. विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें। पंचप्राण ज्योति ओवाळुनी आरती। ओवाळिला पति रखुमाईचा ॥ षड्रस पक्वान्न विस्तारिले ताट । जेवू एकवट चोखा म्हणे ॥ ८. विदुरद्रौपदीच्या घराप्रमाणे येथेही गोड करून जेवा असे चोखामेळ्याची म्हारी म्हणते. येई येई गरुडध्वजा । विटे सहित करीन पूजा ॥ धूपदीप पुष्पमाळा । तुज समर्पू गोपाळा ॥ पुढे ठेवोनियां पान । वाढी कुटुंबी ते अन्न ॥ तुम्हां योग्य नव्हे देवा । गोड करूनियां जेवा ॥ विदुराघरच्या पातळ कण्या। खासी मायबापा धन्या ॥ द्रौपदीच्या भाजीपाना । तृप्ति झाली नारायणा ॥ तैसी झाली येथे परी । म्हणे चोखयाची म्हारी॥ १बायको. ________________

जनाबाई. १. पतंगानें सुखावून दीपावर उडी घातली असतां . त्याचे सुखही जाईल व देहही जाईल. 'पतंग सुखावला भारी। उडी घाली दीपावरी ॥ परि तो देहांती मुकला । दोही पदार्थी नाडिला ॥ विषयाचे संगतीं । बहु गेले अधोगती ॥ ऐसे विषयाने भुलविले । जनी म्हणे वायां गेले ॥ २. देहांत असून छायापुरुषाप्रमाणे वर्तन करावें, सुखे संसार करावा । माजी विठ्ठल आठवावा ॥ असोनियां देहीं । छायापुरुष जैसा पाहीं॥ जैसा सूर्य घटाकाशीं । तैसी देही जनी दासी॥ ३. साधकाचे गुण. माक्रोशे ध्यानासी आणी पुरुषोत्तमा। पृथ्वीयेसीक्षमा उणी आणी॥ अखंडित शुद्ध असावे अंतर । लोणिया कठोर वाटे मनीं ॥ बोले ते वचन बहु हळुवट । सुमना अंगी दाट जडभार ॥ नाम ते स्मरण अमृतसंजीवनी । म्हणे दासी जनी हेचि करा॥ ४. अभिमानत्यागावांचून देव हाती येणार नाही. शूराचे ते शस्त्र कृपणाचे धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥ गजमाथां मोती सर्पाचा तो मान । गेलियांही प्राण हातां नये ॥ १ फसणे. २ हलके, कोमळ. ३ लोभी. ४ नाश करणे. ________________

भक्तांचे स्वरूप. सिंहाचे ते नख पतिव्रतेचे स्तन । गेलियाही प्राण हातां नये ॥ विराल्यावांचून देह अहंभाव । जनी म्हणे देव हातां नये ॥ ५. काया, वाचा, मन सद्गुरूस देऊन त्याजपासून वस्तु मागून घ्यावी. संसारीं निधान लाधले जना । सद्गुरुचरणा सेवी बापा ॥ कायावाचामने तयास देयावी । वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥ तें गोचर नव्हे जाण गुरुकृपवीण । एन्हवीं ते आपणामाजी आहे॥ माळ वेष्टण करीं टापार घेती शिरीं । नेम अष्टोत्तरी करिताती॥ जो माळ करविता वाचेसी वदविता । तया हृदयस्था नेणे कोणी सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट । सद्गुरु वरिष्ठ तोचि जाणा॥ तया उत्तीर्णता दहावया पदार्था । न देखो सर्वथा जनी म्हणे ॥ ६. इंगळाच्या खाईप्रमाणे, विषाच्या प्रासाप्रमाणे, अगर खड्गाच्या धारेप्रमाणे भक्ति कठीण आहे. भक्ति ते कठीण इंगळाची खाँई । रिघणे त्या डोही कठीण असे ॥ भक्ति ते कठीण विषमास घेणे । उदास पैं होणे जीवेभावें ॥ भक्ति ते कठीण भक्ति ते कठीण | खड्गाची धार बाण न सोसी . तया ॥ भक्ति ते कठीण विचारून पाहे जनी । भक्तियोगे संतसमागमीं सर्वसिद्धि ॥ । १ ठेवा. २ हातांत. ३ डोळ्याभोवती गुंडाळलेलें वन. ४ ऋणंतून मुक्तता. ५ निखारा. ६ खाच. ७ तरवार. ________________

१४४ - - - - - संतवचनामृत : जनाबाई. [६ . • ७. घार पिलांवर झाभ घालते, त्याप्रमाणे आम्ही तुजवर - आसक्ति ठेवितो. पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा॥ घार हिंडते आकाशीं । झाप घाली पिल्लापाशीं॥ माता गुंतली कामासी । चित्त तिचे बाळापाशीं॥ वानर हिंडे झाडांवरी। पिली बांधुनी उदरीं॥ तैसी आम्हांसी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥ ८. दळत कांडत असतां नामयाची जनी देवाचे नाम घेते. नाम विठोबाचे घ्यावे । मग पाऊल टाकावें ॥ नाम तारक हे थोर । नामें तारिले अपार ॥ अजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ।। नाम दळणीं कांडणी । म्हणे नामयाची जनी॥ ९. गंगा सागराजवळ गेली असता त्याने तिचा अव्हेर र केला आहे काय ? . . . गंगा गेली सिंधूपाशीं । त्याणे अहेरिले तिसी ॥ तरी ते सांगावे कवणाला । ऐसे बोले बा विठ्ठला॥ जळ काय जळचरी। माता अव्हेरी लेकुरा॥ जनी म्हणे शरण आले । अव्हेरितां ब्रीद गेले॥ १०. विठया, तुझी रांड रंडकी होऊन ती जन्मसावित्रीच्या का चुडा ल्याली आहे. अरे विठ्या विठया । मूळ मायेच्या कारट्या ॥ तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्रीचुडाँ ल्याली। - १ सर्व पृर्वावर. २ तारणारें. ३ त्याग करणे. ४ मासे.५ प्रतिज्ञा, ६ बायको. ७ बांगडी, सौभाग्यचिन्ह. ________________

व ६१३] अनुभव. १४५ तुझे गेलें मढे । तुला पाहून काळ रडे ॥ उभी राहुनी अंगणीं । शिव्या देती दासी जनी ॥ ११. पंढरचिा चोर धरून त्यास सोहं शब्दाचा मारा केल्याबरोबर देव काकुळतीस येतो. धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥ हृदय बंदिखाना केला। आंत विठ्ठल कोंडिला ॥ शब्द केली जडाजुडी । विठ्ठलपायीं घातली बेडी। सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ॥ जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुजला ॥ १२. नवऱ्यामुलाबरोबर व-हाड्यांस पक्कान्न मिळते, त्याप्रमाणे नामदेवाबरोबर जनाबाईस देव मिळाला. नोवरिया संगे व-हाडियां सोहोळा। मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥ परिसाचेनि संगै लोहो होय सोने । तयाची भूषणे श्रीमंतांसी ॥ जनी म्हणे जोड झाली विठोबाची। दासी नामयाची ह्मणोनियां ॥ १३. रक्तश्वेत, श्यामनीळ, शून्ये पहात असतांच जनीचे अनाहतनादश्रवण. शून्यावरि शून्य पाहे । तयावरि शून्य आहे॥ प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचे नांव अधःशून्य ॥ १जोड. २ लाखंड, १. ________________

१४६ संतवचनामृत : जनाबाई. [१३ उर्वशून्य श्वतवर्ण । मध्यशून्य श्यामवर्ण ॥ महाशून्य वर्ण नाळ । त्यति स्वरूप केवळ ॥ अनुहातघंटा श्रवणीं । ऐकुनि विस्मय जाहली जनी ।। १४. चारी वाचेपलीकडच्या सोहंज्योतीचा नवलाव. जोत पहा झमकली । काय सांगू त्याची बोली ॥ प्रवृत्ति निवृति दोघीजणी । लीन होती त्याच्या चरणीं ॥ परा पश्यंती मध्यमा । वैखरेची झाली सीमा ।। चार वाचा कुंठित जाहाली । सोहंज्योति उभारली॥ जोत परब्रह्मीं जाणा । जनी म्हणे निरंजना॥ १५. त्रिकूट शिखरावर भ्रमरगुंफेत जनीने देवाचे दर्शन घेतले. रक्तवर्ण त्रिकूट स्नान । श्रीहाट पाहे श्वेतवर्ण ॥ श्यामवर्ण ते गोलाट । नीळबिंदु और्टपीठ ॥ वरि भ्रमरगुंफा पाहे । दशमद्वारी गुरु आहे ॥ नवद्वारांत भेदुनी । दशमद्वारी गेली जनी ॥ १६. वामसव्य, अधोल, चराचरी, देवाचे दर्शन. वामसव्य दोहींकडे । देखू कृष्णाचे रूपडे ॥ आतां खाली पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरि ॥ चराचरी जे जे दिसे। ते ते अविद्याचि नासे ॥ माझे नाठवे मीपण । तेथे कैंचे दुजेपण ॥ सर्वोठायीं पूर्णकळा । दासी जनी पाहे डोळां ॥ १ पांढऱ्या रंगाचें. २ चमकली. ३ रजोगुणात्मक चक्र. ४ सत्वगुणात्मक चक्र. ५ तमोगुणात्मक चक्र. ६ अर्धमात्रात्मक ब्रह्मरंध्रचक्र. ७ डावी उजवीकडे. H ________________

१४७ $२० ] साक्षात्कार. १७. स्वरूपाचा पूर डोळ्यांवर आल्याने डोळे झांकुळतात. नित्य हाताने वारावे। हृदय अंतरीं प्रेरित जावें ॥ ऐसा स्वरूपाचा पूर । आला असे नेत्रांवर ॥ स्वरूपाचा पूर आला । पाहतां डोळा झांकुळला ॥ जनी म्हणे ऐसा पूर। पाहे तोचि रघुवीर ॥ १८. तुला पाहतांच माझा शीण गेला. माझा शीणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला ॥ पाप ताप जाती । तुझे नाम ज्याचे चित्ती । अखंडित नामस्मरण । बाबूं न शके तया विन्न । जनी म्हणे हरिहर । भजतां वैकुंठी त्या घर ॥ १९. देहभाव गेल्यावर विदेहसुखाची प्राप्ति. देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय ॥ तया निद्रे जे पहुडैले । भवजागृती नाही आले ॥ ऐसी विश्रांति लाधली। आनंदकळा संचरली। त्या ऐक्यों एक होतां । दासी जनी कैंची आतां ॥ _____२०. " नवल वर्तलें, नवल वर्तले." नवल वर्तले नवल वर्तले नवल गुरुचे पायीं। कापुर जळुनि गेला तेथे काजळी उरली नाहीं॥ साखर पेरुनि ऊंस काढिला कान झाला डोळा। निबर बायको भ्रतार तान्हा सासरा तो भोळा ।। ) झांकणे, चकित होणे. २ श्रम. ३ निजले. ४ मोठी, वृद्ध.. ________________

१४८ [६२. __संतवचनामृत : जनाबाई. नवल वर्तले नवल वर्तले नवल चोजवेना। डोहामाजी मासोळीने वाचविले जीवना॥ नवल वर्तले नवल वर्तले अनाम चक्रपाणी। गोकुळ चोरुनि नेले तेथे कैंची दासी जनी॥ २१. माझ्या मनांत जें जें होतें तें तें देवाने पुरविलें. माझे मनी जे जे होते । ते ते दिधले अनंते ॥ देह नेऊनि विदेही केले । शांति देऊनि मीपण नेले। मूळ हे दिले क्रोधाचें । ठाणे केले विवेकाचें ॥ निजपदी दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ॥ २२. द्वारांत उभ्या असलेल्या विठ्ठलास जनी पाहते. श्रीमूर्ति असे विंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥ धन्य माझा इहजन्म । हृदई विठोबाचे नाम ॥ तृष्णा आणि आशा । पळोनि गेल्या दाही दिशा॥ नामा म्हणे जनी पाहे । द्वारी विठल उभा आहे॥ ___ २३. मी देव खाते, देव पिते. देव खाते देव पिते । देवावरि मी निजते ॥ देव देते देव घेते । देवासवे व्यवहारिते॥ देव येथे देव तेथे । देवाविण नाहीं रिते ॥ जनी म्हणे विठाबाई । भरुनी उरले अंतरबाहीं॥ १ समजेना. २ पाणी.. ________________

६२७] संतांस देवाचें साह्य. १४९ २४. जनाबाईच्या मागे जाऊन देव तिचे धुणे धुतो. धुणे घेउनी काखेसीं । जनी गेली उपवासी ॥ मागे विठ्ठल धांवला । म्हणे का टाकिले मला ॥ कांगा धांवोनि आलासी। जाय जाय राऊळासी ॥ चहूं हाती धुणे केले। जनी म्हणे बरे झाले ॥ २५. जनीने झाडलोट केली तर चक्रपाणी केर भरितो. झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ।। पाटी घेउनीयां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी॥ ऐसा भक्तीसी भूलला । नीच कामे करूं लागला ॥ जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊं तुला ॥ ____२६. देवाने संतांस कसे साह्य केलें आहे? द्रौपदीकारणे । पाठीराखा नारायण ॥ गोरा कुंभाराच्या संगें। चिखल तुडवू लागे अंगे। कबिराच्या बैलोनि पाठीं। शेले विणितां सांगे गोष्टी॥ चोखामेळ्यासाठी। ढोरे ओढी जगजेठी ॥ जनीसंगे दडूं लागे। सुरवर म्हणती धन्य भाग्य ॥ २७. चोखामेळा देवास आपल्या भक्तीने भुलवितो. चोखामेळा संत भला। तेणे देव भुलविला ॥ भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकीं॥ १ देऊळ. २ रक्षण करणारा. ३ देवश्रेष्ठ. ________________

१५० संतवचनामृत : जनाबाई. [६२७ चोखामेळ्याची करणी। तेणे देव केला ऋणी॥ लागा विठ्ठलचरणीं । म्हणे नामयाची जनी॥ २८. देव आणि संत दोन काय ? आम्ही आणि संत संत आणि आम्हीं। सूर्य आणि रश्मि काय दोन॥ दीप आणि सारंगसारंग आणि दपि। ध्यान आणि जप काय दोन॥ शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांति।समाधान तृप्ति काय दोन रोग आणि व्याधि व्याधि आणि रोग। देह आणि अंग काय दोन॥ कान आणि श्रोत्र श्रोत्र आणि कान । यश आणि मान काय दोन॥ देव आणि संत संत आणि देव । म्हणे जनी भाव एक ऐसा॥ .. २९. जो संत आणि देव निराळे मानितो त्याचा विटाळ रजस्वलाही मानितो. संत आणि देव मानी जो वेगळे । तेणे येथे आगळे केले दोष ॥ माता ते वेगळी कुचं ते उरींचे । म्हणोनियां त्यांचे मर्दन करी ॥ पाप ते वेगळे पुण्य ते आगळे । म्हणोनि गरळ पितो मद ॥ तयाचा विटाळ वाहे रजस्वला । म्हणे जनी चांडाळा बोलावूनका। ३०. ज्याचा हरि सखा झाला त्यास सर्व विश्वही साह्य करते. ज्याचा सखा हरी । त्यावरि विश्व कृपा करी॥ उणे पडो नेदी त्याचे । वारे सोसी आघांताचें ॥ तयावीण क्षणभरी। कदा आपण नव्हे दुरी॥ अंगा आपुले ओढोनि । त्याला राखे जो निर्वाणीं ॥ ऐसा अंकित भक्तांसी । म्हणे नामयाची दासी॥ १ सहा रंग. २ अधिक. ३ स्तन .४ विष. ५ मानणे. ६ विटाळशी. ७ धक्का. ८ संकट. ________________

सेनान्हावी. १, दुर्जनाची सुखाने मानखंडणा करावी. मान करावा खंडण । दुर्जनाचा सुखे करून॥ लाथा हाणुनि घाला दुरी। निंदकासी झडकरी॥ त्याचा जाणावा विटाळ । लोकां पीडितो चांडाळ ॥ त्याची संगती जयास । सेना म्हणे नर्कवास ॥ २. धूम्रपान, पंचाग्निसाधन, न करितां केवळ नामाचेच चिंतन करा. नामाचे चिंतन श्रेष्ठ पैं साधन । जातील जळोनि महापापें ॥ न लगे धूम्रपान पंचाग्निसाधन । करितां चिंतन हरि भेटे ॥ बैसुनि निवांत करा एकचित्त । आवडी गावे गीत विठोबाचें ॥ सकळाहुनि सोपे हेचि पैं साधन । सेना म्हणे आण विठोबाची ॥ ३. क्षण एक वायां जाऊ न देता नारायणाचे स्मरण करावें. असाल तेथें नामाचे चिंतन । याहुनि साधन आणिक नाहीं ॥ सोडवील माझा भक्ताचा कैवारी । प्रतिज्ञा निर्धारी केली आम्हीं। गुण दोष याति न विचारी कांहीं । धांवे लवलाही भक्तकाजा॥ अवघे काळी वाचे म्हणा नारायण । सेना म्हणे क्षण जाऊन द्या। १ साह्यकर्ता. २ निश्चयपूर्वक. ३ लवकर. ________________

१५२ संतवचनामृत : सेनान्हावी. ४. गिरिकाननास जाल तर विभांडकाप्रमाणे रंभेकडून नागवून घ्याल. कशासाठी करितां खटपट । तप तीर्थ व्रतें अचाट ॥ नलगे शोधावें गिरिकानन । भावे रिघा विठ्ठला शरण ॥ विभांडक शृंगी तपस्वी आगळा । क्षण न लागता रभेन नागविला॥ जाणोनि सेना निवांत बैसला । केशवराजा शरण रिघाला ॥ ५. सेना पापाचा पुतळा असला तरी तूं उदाराचा राणा आहेस. अन्यायी अन्यायी । किती म्हणोनि सांगों काई ॥ तूं तो उदाराचा राणा । क्षमा करी नारायणा ॥ काम क्रोध लोभ मोहो । नाडिला यांचनि पहाहो॥ नावडे संतसंगति । नाहीं केली हरिभक्ति ॥ . निंदा केली भाविकांची। चित्ती आस धनाची ॥ सेना पापाचा पुतळा । तुज शरण जो दयाळा ॥ ६. माझ्या मनांत जोभाव मी धरला आहे तो तूं सिद्धीस ने. आतां ऐसे करी गा देवा । तुझी घडो पायसेवा॥ मनामाजीं दुर्बुद्धि । न यावी माउलिये कधी ॥ चित्ती भाव जो धरिला । सिद्धि न्यावा जी विठ्ठला ॥ सेना ह्मणे याविण कांहीं । लाभ दुसरा नाहीं॥ ७. तुमचे पाऊल देखिले या माझ्या भाग्यास आज - सीमाच नाही. धन्य धन्य दिन । तुमचे झाले दरुषण । आजि भाग्य उदया आले । तुमचे पाऊल देखिले ॥ १ पर्वतांतील अरण्य. २ श्रेष्ठ. ३ फसवणे. ४ हेतु, इच्छा. ________________

६.] संतांची कृपा. १५३ पूर्वपुण्य फळा आलें । माझे माहरे भेटले ॥ सेना म्हणे झाला । धन्य दिवस आजि भला ॥ ८. माझ्यासारख्या जडजीवांचा उद्धार केला ही संतांची कृपा मी किती म्हणून वणू ! उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥ केवढा केला उपकार । काय वानूं मी पामरे ॥ जडजीवां उद्धार केला । मार्ग सुपंथ दाविला ॥ सेना म्हणे उतराई । होतां न दिसे कांहीं ॥ ९. आज संतास पाहिले हा सोन्याचाच दिवस होय. आजि सोनियाचा दिवस । दृष्टी देखिले संतांस ॥ जीवां सुख थोर झाले । माझे माहेर भेटले॥ अवघा निरसला शीण । देखतां संतचरण ॥ आजि दिवाळी दसरा । सेना ह्मणे आले घरा ॥ १०. समर्थाचे बाळ समर्थ नसते काय ? अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा। तेथे कळिकाळाचा रीघे नाहीं ॥ समर्थाचे बाळ समर्थचि जाण। .. वागवी अभिमान म्हणतां त्याचे ॥ अन्यायाच्या राशी उदंड केल्या जरी। तरी क्षमा करी मायबापा ॥ कल्पतरुछाया बैसला सेना न्हावी।। दया ते वागवी बहु पोटीं॥ १ आईबाप, १ हीन, दीन. ३ अडाणी प्राणी. ४ दूर होणे. ५ प्रवेश. ________________

- - १५४ संतवचनामृत : सेनान्हावी. [६११ ११. सेना परमार्थामध्ये सुद्धा न्हावीच आहे. आम्हीं वारिक वारिक । करूं हजामत बारीक ॥ विवेक दर्पण अयना दावू । वैराग्य चिमटा हालवू ॥ उदक शांति डोई घोलूं। अहंकाराची शेंडी पिलूं॥ भावार्थाच्या बगला झाडूं। काम क्रोध नखे काढूं। चौंवर्णो देउनि हात । सेना राहिला निवांत ॥ १२. पांडुरंग बोलावीत आहे असें सेना सांगतो. करितो विनवणी । हात जोडूनियां दोन्ही ॥ हेचि द्यावे मज दान । करा हरीचें चिंतन ॥ जातो सांगूनियां मात । पांडुरंग बोलावित॥ सोडा द्वादशी पारणे । सुखे करावे कीर्तन ॥ दिवस माध्यान्हीं आला। सेना वैकुंठासी गेला ।' १३. श्रावण वद्य द्वादशी दिवशी सेना समाप्त झाला. माझे झाले स्वहित । तुम्हां सांगतो निश्चित ॥ करा हरीचे चिंतन। गावे उत्तम हे गुण ॥ श्रावण वद्य द्वादशी। सेना समाप्त त्या दिवशी . . . - १ आरसा. २ गोष्ट. ________________

कान्होपात्रा. १. विषयाच्या संगतीने इंद्रचंद्रांची कोण गति झाली? विषयाचे संगती । नाश पावले निश्चितीं। भगे पडली इंद्राला । भस्मासुर भस्म झाला। चंद्रा लागला कलंक । गुरुपत्नीसी रतला देख ॥ रावण मुकला प्राणांसी। कान्होपात्रा म्हणे दासी॥ २. तुझ्या चरणापाशी ठाव दे इतकेच कान्होपात्रा दासी. विठ्ठलाजवळ मागते. दीन पतित अन्यायी। शरण आल्ये विठाबाई ॥ मी तो आहे यातिहीन । नकळे कांहीं आचरण मज अधिकार नाहीं। भेटी देई विठाबाई ॥ ठाव देई चरणापाशीं । तुझी कान्होपात्रा दासी॥ ३. तुझी म्हणवीत असतां दुसऱ्याचा अंगसंग झाल्यास त्यांत उणेपणा कोणाकडे ? पतितपावन म्हणविसी आधीं । तरी को उपाधि भक्तांमागे ॥ तुझे म्हणवितां दुजे अंगसंग । उणेपणा सांग कोणाकडे ॥ सिंहाचें भौतुक जंबुक मैं नेतां । थोराचिया माथां लाज वाटे॥ म्हणे कान्होपात्रा देहसमर्पणे । करावे जतन ब्रीदासाठी॥ १ पामर. २ खाद्य, खाऊ. ३ कोल्हा. ________________

१५६ संतवचनामृत : कान्होपात्रा. तवचनामृत: कान्होपात्रा. [६४ ४. जन्मोजन्मी विठ्ठलचरण पहावयास मिळाले तर आनंदाने मी जन्म घेईन. जन्मांतरीचे सुकृत आजी फळासी आले। म्हणोनि दाखिले विठ्ठलचरण ॥ धन्य भाग आजि डोळियां लाधले। म्हणोनि देखिले विठ्ठलचरण ॥ धन्य चरण माझे या पंथी चालिले। म्हणोनि देखिले विठ्ठलचरण ॥ येउनियां देहासी धन्य झालें। म्हणुनि देखिल विठ्ठलचरण ॥ घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे । जन्मोजन्मी देखेन विठ्ठलचरण ॥ ५. नष्ट दुराचायांचा उद्धार करणाऱ्या नामाची माळा ___ कान्होपात्रा गळ्यांत घालते. ज्याचे घेतां मुखीं नाम । धाकी पडे काळ यम ॥ ऐशी नामाची थोरी । उद्धरिले दुराचारी ॥ नष्ट गणिका अजामेळ । वाल्मिकी झाला तो सोज्वळ ॥ ऐशी नाममाळा । कान्होपात्रा ल्याली गळां ॥ HEASTIVi+ १ पुण्य. २ शुद्ध, पवित्र. ३ धारण करणे, घालणे. ________________

संतवचनामृत भाग तिसरा एकनाथादिसंत ________________

भानुदास. १. आमच्या कुळांत पंढरीच्या विठ्ठलाचे नाम घेणे इतकाच नेम आहे. आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठ्ठलाचें ॥ न कळे आचार न कळे विचार । न कळे वेव्हार प्रपंचाचा ॥ असों भलते ठायीं जपूं नामावळी ! कर्माकर्मा होळी होय तेणें ॥ भानुदास म्हणे उपदेश आम्हां । जोडिला परमात्मा श्रीराम हा॥ २. पंढरपूर ही नीळांमाणिकांची खाणी कितीहि लुटली तरी ... आगरांत जशीच्या तशीच शिल्लक आहे. माणिकाचे तारूं चंद्रभागे आले। भूषण ते जाले सनकादिकां ॥ पंढरपुर हे नीळियाची खाणी । नवलाव साजणी देखियेला ॥ अवघिया देशांसी न्यावया पुरले। आगरी उरलें जैसे तैसें। भानुदास म्हणे नीळ हा चोखडा। सुजडु हा जडां जीवनमुद्रा।। ____३. उन्मनी समाधि मनास नाठवून विठोबास पाहणे यांतच सुख वाटते. उन्मनी समाधि नाठवे मनासी । पाहतां विठोबासी सुख बहु ॥ मानंदी आनंद अवघा परमानंद । आनंदाचा कंद विठोबा दिसे।। 'जाग्रती स्वम सुषुप्ति नाठवे । पाहतां सांठवे रूप मनीं ॥ १ मैत्रीण. २ खाण, खजिना. ३ जडलेला, शोभायमान. ४ अज्ञानी जीव. ५ जीवनकला. ________________

१६० संतवचनामृत : भानुदास. नित्यता दिवाळी नित्यता दसरा । पाहतां साजिरा विठ्ठलदेव ॥ भानुदास म्हणे विश्रांतीचे स्थान । विठ्ठल निधान सांपडले ॥ ४. भानुदासास सुळावर देण्यास नल असतां तो देवाचें चिंतन करितो. राये कंठमाळ देवासी घातली । देवे त्या दिधली भानुदासा ॥ कोणी नेली माळ करती त्याचा शोध । देखिली प्रसिद्ध याचे गळां॥ राजदूतीं नेला म्हणती गे हा चोर । रायाने विचार नाही केला। शूळी हावया भानुदास नेला । तेणे आठविला पांडुरंग ॥ ५. माझा प्राण कंठांत आला असल्याने तूं आतां अंत पाहूं नकोस. देवा कोठवरी अंत पाहतोसी । प्राण कंठापाशी ठेवियेला ॥ पळमात्र चित्ता नाहीं समाधान । चिंतेने व्यापून घेतलेसे ॥ नानापरीचे दुःख येवोनि आदळत।शोके व्याकुळ चित्त होत असे ।। यासी तो उपाय न कळेचि मज । शरण आलो तुज देवराया। इच्छा पुरवूनि सुखरूप ठेवीं । भानुदास पायीं ठाव मागे॥ ६. वर आकाश तुटून पडले तरी मी तुझीच वाट पाहीन. जरि आकाश वर पडों पाहे । ब्रह्मगोळे भंगा जाये। वडवानळ त्रिभुवन खाय। तरी तुझीच वाट पाहे गा विठोबा ॥ न करी आणिकाचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥ध्रु.॥ सप्तसागर एकवट होती। जै हे विरुनी जाय क्षिती। १ सुंदर. २ ठेवा. ३ ब्रह्मांड. ४ समुद्राच्या पोटांत राहून समुद्राचे पाणी जाळून टाकणारा अमि. ५ आंकत. ६ पृथ्वी. ________________

६.] निश्चयाची भाक्त. पंचमहाभूते प्रळय पावती । परि मी तुझाचि सांगाती गा विठोबा।। भलतैसे वरपडों भारी। नाम न संडों न टळो निर्धारी । जैसी पतिव्रता प्राणेश्वरी। विनवी भानुदास म्हणे आधारी गा विठोबा ॥ ७. समर्थाच्या कृपेनें कोरड्या काष्ठासही अंकुर फुटतात. कोरडियां काष्ठी अंकुर फुटले। येणे येथे झाले विठोबाचें ॥ समर्थाचा आम्ही धरिला आधार ।तरीच सत्वर आला येथे ॥ माझिये संकटी आलासी धाऊनि । भानुदास चरणी लागतसे ॥ --- - TIMITEST - . १ पति. सं...११ ________________

जनार्दनस्वामी. १ जनार्दनस्वामींचा अनुभव. १. औदुंबरवासी गुरूंच्या ध्यानाचे वर्णन. अनंत निर्गुण सर्वांठायौं पूर्ण । न करी निर्वाण दासालागीं ॥ हांके बरोबरी धांवोनि सत्वरौं । भक्तालागीं तारी गुरुनाथ ॥ सुंदर ते ध्यान वसे औदुंबरीं । व्याघ्रचर्मधारी शोभतसे ॥ काषायें अंबर दंडकमंडलु । डमरु त्रिशूलु शंखचक्र ॥ किरीट कुंडले रुद्राक्षांच्या माळा । वैजयंती गळां हार रुळे ॥ सूर्यचंद्र नेत्र शेषफणी चक्र । पीतांबर वस्त्र परिधान ॥ गुरुचरणीं सर्व तीर्थाची मिरासी । म्हणोनि जगासी उद्धरिती॥ जनार्दन म्हणे न लगे ब्रह्मज्ञान । गुरुचरणीं मन राहो सदा ॥ 17 २. पापराशीतून तारण्याची जनार्दनस्वामींनी केलेली गुरूची याचना. जन्मा आलो मी संसारीं । सखी मानिली अंतुरीं । निंदा केली द्विजवरी । कैसा सद्गुरु जोडेल ॥ नाहीं पूजिलें गुरुवरा । नाहीं नमिले द्विजवरां । नाही केले भजन सारा । कैसा भव हा आटेल ॥ जालो परधर्मी रत । अधर्म करितां वाटे हित । १ नाश. २ कातडे. ३ भगवे. ४ हालणे. ५ हक्काची जागा.. HTTTTTTA ________________

जनार्दनस्वामींचा अनुभव. जन्ममरणाची खंत । कैसी आतां वाटेल ॥ संसारी मी दुखावलो । त्रिविधता मी पोळलों। दुःखी होऊनियां आलो। औदुंबरी या ठाया । आंकलखोप कृष्णातीरीं । गुरु वसती औदुंबरी। भक्तवत्सल तारी तारी। म्हणऊनि चरण वंदिले॥ जनार्दन पापरासी । करुनि आलो तुजपासी। तारिसील या भरंवसी । धरणे घेतले दारांत ॥ ३. " तरी आम्ही कोठे जावें । कवण्या देवा आराधावें ?" नरहरि गुरुराया। दीनबंधु सखया। करिसी दासां अंतराया। काय वाटे बडिवार। निशिदिनी हाका। वियोगाने वाढे शोका। निराश वाटे सेवका। निद्रा आली तुज काय॥ किंवा कोठे गुंतलासी। किंवा येथूनि गेलासी। काय आम्ही पापराशी । म्हणउनि लपसी गुरुराया ॥ तरि आम्ही कोठे जावें । कवण्या देवा आराधावें। दत्ता कृपावंता अवघे । शून्याकार त्रैलोक्य | गुरो मौन त्वां धरिलें । आम्हां दुःखाने व्यापिलें। जनार्दनास आवरिले । नाहीं सद्गुरु दीनबंधु ॥' ४. आता तुमच्या पायांवाचून मी काहीच जाणत नाही. आतां गुरुराया परिसा विज्ञापना । दासाची करुणा येऊ द्यावी ॥ नेणोनियां सोय फिरलो दिशा दाहीं । झाले दुःख देही बहुसाल॥ तुमची ब्रिावळी पतितपावन । कीर्ति हे ऐकोन शरण आलो । १ डौल. २ अतिशय. ३ प्रतिज्ञ, शोभा. ________________

- - १६४ संतवचनामृत : जनार्दनस्वामो. [६४ माझा मायबाप गणगोत बंधु । तूंचि कृपासिंधु गुरुराया ॥ आतां कांहीं नेणे तुमच्या पायांविणे। संसाराचे पेणे दूर केले ॥ . जोडोनियां हात शिर पायांवरी। ठेविले निर्धारी जनार्दने ॥ ५. तूं लवकर भेट देऊन माझे प्राण वाचविण्याचे यश घे. गुरुसख्या तुजविण । जाऊ पाहे माझा प्राण ॥ कांहो कठिण केलें मन । पाहे नेत्र उघडून ॥ माता पिता म्हणविलें । तरि का निर्वाण मांडिले ॥ आतां यावे लवकरी । भेट द्यावी बा सत्वरीं ॥ यश घेई गुरुराया। जनार्दन ठेवीं पायां ॥ - - ६. गुरुयात्रेस जाऊन अगर चरित्र वाचूनही भवाचे निर्मूलन - होईल. धन्य कृष्णातीर धन्य औदुंबर । जेथे गुरुवर वसतसे ॥ धन्य तेचि नर येती जे यात्रेसी । दर्शनमात्रे त्यांसी मोक्ष जोडे । अनंत जन्माची पातकें संचित । नुरती किंचित् तीर्थ घेतां ॥ वाचितां चरित्र सद्गुरु स्वामीचें । निर्मूलन भवाचे सत्य होय ॥ नामस्मरण ज्याच्या सद्गुरुचि होणे।व्यर्थ चिंतावाहणे संसाराची गुरु गीती गावा भावे चित्तीं ध्यावा । सगुण पहावा डोळेभरी। जनार्दन म्हणे तीर्थ त्याचे पासी।चारीमुक्ति दासी होती त्याच्या ॥ १ नातेवाईक. २ मुक्काम. ३ अंत पाहणे. ४ उरत नाहीत. ________________

dhamala - ६१.] जनार्दनस्वामींचा एकनाथास उपदेश. १६५ ____२ जनार्दनस्वामींचा एकनाथास उपदेश. ७. तूं पंढरीचा सोपा मार्ग पतकर असें जनार्दन एकनाथास सांगतात. नको गुंतूं लटिक्या प्रपंचासी बापा । मार्ग आहे सोपा पंढरीचा। न लगे पुसावे आटाआटी कांहीं । आणिके प्रवाही गुंतूं नको ॥ भांबावल्यापरि जन झाले मूढ । विसरले दृढ विठोबासी ॥ म्हणे जनार्दन एकनाथा निके। साधी तूं कौतुके हेचि वर्म ॥ ८. विठ्ठलाचा मंत्र जपण्याविषयी जनार्दनांची एकनाथास आज्ञा. आणिक या सृष्टी साधन पैं नाहीं ।घेई पां लवलाही नाम वाचे ॥ उभा दिगंबर कटी ठेवुनी कर । शोभतसे तीर चंद्रभागा ॥ पुंडलिके निज साधिले साधन । ते तूं हृदयीं जाण धरी भावे ॥ म्हणे जनार्दन एकनाथा हृदयीं । विठ्ठल मंत्र ध्यायी सर्वकाळ ॥ ९. संतांस नमन कर, व आलेल्यांस अन्न दे. सर्वांभूती भाव ठेवू नको दुजा । तेणें गरुडध्वजा समाधान ॥ संतांसी नमन आलिया अन्नदान । यापरते कारण आणिक नाहीं॥ सर्वभावे वारी पंढरीची करी । आणिक व्यापारी गुंतूं नको ॥ म्हणे जनार्दन घेई हाचि बोध । सांडोनि सर्वथा द्वेषभेद ॥ ___१०. अन्न परब्रह्म असल्याने जातीचा विचार करूं नको. आलिया अतिर्थी द्यावे अन्नदान । याहुनी साधन आणिक नाहीं ॥ ज्ञातीसी कारण नाहीं पैं तत्त्वतां । असो मैं भलता अन्न द्यावे ॥ १ श्रम. २ चांगलें. ३ आपलें, निकट, ४ दुसरा. ५ याचक. ६ जात. - HTTTTTTTT ________________

१६६ संतवचनामृत : जनार्दनस्वामी. [६१० अन्न परब्रह्म वेदांती विचार । साधी हाचि निर्धार प्रेमतत्त्वे ॥ म्हणे जनार्दन यापरते आणिक । नाहीं दुजें देख एकनाथा ॥ ११. जडभारी पडतां संतच तुला सहाकारी होतील. संकल्प विकल्प यावरी घाली शून्य । मन करी निमग्न हरिपायीं। उपासना दृढ संतांचे चरणी । तेचि पैं निर्वाणी तारक तुज ॥ पडतां जडभारी संत साहांकारी । सर्वभावें हरि तेचि होती ॥ म्हणे जनार्दन एकनाथा न विसंबें । सोपा मार्ग ऐके सर्वभावें ॥ १२. मन शुद्ध झाल्यास भाविकांस देव बसल्याठायींच दिसतो. तीर्थपर्यटन कासया करणें । मन शुद्ध होणे आधी बापा ॥ तीर्था जाऊनि कायमन शुद्ध नाहीं । निवांतचि पाही ठायीं बैसे ॥ मन शुद्ध जालिया गृहींच देव असे । भाविकांसी दिसे बैसल्या ठायीं॥ म्हणे जनार्दन हाचि बोध एकनाथा । याहूनि सर्वथा श्रेष्ठ नाहीं॥ १३. मोत्यांची चौकडी, मण्याची ज्योत, अगर तेलावांचून दीप्तीचा प्रकाश. उदयेचे तीन द्वितीयेचे तीन । अविनाश देखणे संध्याकाळी ॥ संध्याकाळी भावना टाकुनियां द्यावी । तेणेचि हो ध्यावी समाधि - सुखें ॥ एक एक चक्रे आकाशाएवढी । त्यामध्ये चौकडी मोतियांची ॥ मणियाची ज्योति संध्याकाळी वाती। तेलाविण दीप्तिपाजाळल्या॥ जनार्दन म्हणे एकनाथा घेई । समाधि हे पायीं सद्गुरूच्या ॥ १ संकट. २ सहाय ३ विसरणे. ४ सकाळ. ५ दोन प्रहर. ________________

$ १५] जनार्दनस्वामींचा एकनाथास उपदेश. १६७ ..... १४. समाधीच्या तीन्ही निरनिराळ्या वेळेस निरनिराळे देखणे. उदय समाधि लागो तीन वेळ । अवघा ब्रह्मांडगोळ उदयो होतो चकामध्ये चक्र येती व्योमाकार । आदि मध्य हेर ज्योति त्याची॥ द्वितीयप्रहरी समाधि कैसी परी । गुरुपुत्रा होरी येणे रूपे ॥ प्रथम समाधि निबिड सर्पाकार । त्यामध्ये आकार चक्राचे ते ॥ झळकती माणिक दिव्य रत्नखाणी । अविनाश देखणी चिन्मयाची उदयाची ज्योति द्वितीयेचा मणि । ही दोन्ही देखणी झाली बापा उदयाच्या तीन द्वितीयेच्या तीन । आविनाश देखणे संध्याकाळी॥ संध्याकाळी संदेह टाकुनियां द्यावें । त्याचेनि पैं ध्यावे समाधिसुख एक चक्र येती आकाशाएवढी । त्यामध्ये चौकडी मोतियांची ॥ भणियाचीज्योति संध्याकाळीजे वानितीतेलाविण दीप्तिपाजळल्या जनार्दन म्हणे एकनाथा घेई । सोहं याचि देहीं समाधिसुख ॥ १५. कानडोळे धरतांच आदित्याचे उमाळे पाहणे हे __ समाधीच्या अपूर्णत्वाचे चिन्ह होय. . देहाची समाधि लागे तीन वेळां। आपुली जीवनकळा शोधावी हे। कर्णी घालूनियां बाटें अंगुळ्या नेत्रांत निकटे । तेणे विकाशुनि भेटे शुभ्रवर्ण ॥ तयाचे हे नाम बिंब जीवदशा । तेणे स्वरूप दिशा भरुनि येती ॥ तितक्यामध्ये न सोडावी समाधि । त्याचेपुढे शोधी गुरुपुत्रा॥ स्वामीने पुसिलें कैसे काय झालें। कैसे तुज भासले आत्मरूप ॥ शिष्य म्हणे स्वामी धरितां कान डोळे । एकाएकी उमाळे आदि त्याचे ॥ १ पहा. २ पंक्ति, ओळ. । ________________

१६८ संतवचनामृत : जनार्दनस्वामी. ... [६ १७ विकासिला निर्मळ जैसा चंद्र दिसे । येताहे प्रकाशे आत्माराम॥ म्हणे जनार्दन नव्हे एकनाथा। समाधि पहातां आळस केला ॥ १६. स्वरूपदर्शनापर्यंत समाधि सोडूं नये. शिष्य म्हणे स्वामी पुढे कैसे पहावे । रिघत हे जावें अभ्यासासी॥ स्वामी म्हणे बापा समाधि घेई आतां। तुझिया विकल्पता निववीतों आशंका जे झाली तुझी तुज ठेली। आम्ही नाहीं विचारिलो समाधि तुज ॥ प्रथम विकास पहावा शुभ्रवर्ण । त्याचे पुढे चांदणे चकचकित ॥ खद्योताचे वाणी सूर्य तारागण । पुढे शोध जाण घेत जावा ॥ बैसावे निश्चळ त्याचे अनी डोळे । पहावे केवळ हसु तैसें ॥ त्यामध्ये रिघावे स्वरूप पहावें । परि समाधि ही जीवें सोडूं नये॥ जिवाचा हा शिव देहाचा कुळस्वामी। तो अविनाशखाणी प्रगटतो म्हणे जनार्दन त्या पोटी रिघावें । एकनाथा पहावे आत्मरूप॥ १७, यापुढे जो बोलेल त्यास पतन होईल. मन स्वस्थ चित्ती निश्चल मध्यरात्री। गुरुगुह्याचे एकांती रिघावे हो॥ हंसा अंगींचा डोळा विकाशुनी कमला। त्याचे मध्यस्थला हेरीत जावे ॥ चिन्मय अविनाश प्रगटती ज्योत। तोचि प्राणनाथ देहाचा हा ॥ त्यापुढे आभास दिसे नीलवर्ण। तेंचि स्वरूप जाण विराटाचें ॥ १ संशय. २ अविनाश स्वरूपाचा. ३ पाहणे, ________________

६१७] १६९ जनार्दनस्वामींचा एकनाथास उपदेश. जे ब्रह्मांडी असे तेचि पिंडी दिसे। बोलायाचा भास नाही पुढे ॥ प्रथम समाधि बाहेर ध्यावी आधीं। तेही स्वरूप वेधी समरसावें ॥ यापुढे समाधि दुजी सांगेल कोण । त्यासी होईल पतन निश्चयेसी॥ म्हणे जनार्दन एकनाथापासीं । हचि भरूनि घेसी ओहं सोहं॥ 1 ________________

एकनाथ १ गुरुस्तुति. १. एकनाथांची गुरुपरंपरा. जो निर्गुण निराभास । जेथून उद्भव शबल ब्रह्मास । आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वोस आदिगुरु ।। तयाचा ब्रह्मा अनुगृहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । आत्रिपाद प्रसादित । श्रीअवधून दत्तात्रय ॥ दत्तात्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा। जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगी॥ जनार्दनकृपेस्तव जाण । समूळ निरसले भवबंधन । एकाजनार्दना शरण । झाली संपूर्ण परंपरा ॥ २. एकनाथाची गुरुपूजा. मनोभाव जाणोनि माझा । सगुणरूप धरिले वोजाँ। पाहुणा सद्गुरुराजा। आला वो माय॥ प्रथम अंतःकरण जाण । चित्त शुद्ध आणि मन । चोखाळोनि आसन | स्वामीसी केले॥ अनन्य आवडीचे जळ । प्रक्षाळिले चरणकमळ । वासना समूळ । चंदन लावी॥ . अहं जाळियला धूप । सद्भाव उजळिला दीप।.. पंचप्राण हे अमूप । नैवेद्य केला ॥ रजतम सांडोनि दोन्ही । विडा दिला सत्त्वगुणी। खानुभवें रंगोनि । सुरंग दावी ॥ १ मायायुक्त. २ उपदेशित. ३ सुंदर रीतीचें. ४ उत्तम रंग. ________________

६६] गुरुस्तुति. १७१ एकाजनार्दनीं पूजा । देवभक्त नाही दुजा। . अवघाचि सद्गुरुराजा। होवोनि ठेला॥ ३. परमार्थ साधावयास एका सद्गुरूचेच साह्य पाहिजे, साधावया परमार्था । साह्य नव्हती माता पिता॥ साह्य न होत व्याही जांवई । आपणां आपण साह्य पाहीir साह्य सद्गुरु समर्थ । तेचि करिती स्वहित। एका जनार्दनीं शरण । नोहे एकपणावांचून ॥ ४. गुरूने मला उदयअस्तावांचून प्रकाश दाखविला. अभिनव गुरूने दाखविलें । अहं सोहं माझे गिळिले ॥ प्रपंचाचे उगवोनि जाळे । केले षड्वैरियाँचे तोंड काळें। उदयो अस्ताविण प्रकाश । स्वयें देहीं दाविला भास ॥ मीपण नाही उरले । एकाजनार्दनीं मन रमले ॥ ५. जनार्दनानी मला देव दाखविला हा माझा अनुभव घ्या. साँचपणे देवा शरण पैं जाती। तया वैकुंठपति विसरेना ॥ जैसी कन्या दूरदेशी एकटी। रात्रंदिवस संकटीं घोकी मायबाप. पतिव्रतेचे सर्व मन पतिपायीं। तैसा देव ठायीं तिष्ठतसे ॥ एकाजनार्दनीं मज हा अनुभव । जनार्दने देव दाखविला ॥ ६. साधनाच्या कोणत्याही आटी न करितां जनार्दनाने माझ्या देहींच मला देव दाखविला. अभिनव सांगतां विस्मयो दाटला देहींच भासला देव माझ्या ॥ नवल कृपेचे विंदान कैसें । जनार्दन सँरसे केले मज ॥ १ कौतुक. २ सोडवणे. ३ कामकोधादिक सहा. ४ खरोखर. ५ उभा रहाणे. ६ कौतुक. ७ सारखे, बरोबर. ________________

१७२ ___ संतवचनामृत : एकनाथ. साधनाची आंटी न करितां गोष्टी । हृद्यसंपुष्टी दाविला देव॥ एकाजनार्दनीं एकपणे शरण । नकळे महिमान कांहीं मज ॥ ७. जनार्दनाच्या कृपेने मी उघडे परब्रह्म अनुभवीत आहे. सर्वभावे दास झालो मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें ॥ माझे मज दावियले माझे मज दावियले । उघडे,अनुभविले परब्रह्म॥ रविबिंबापरी प्रकाश तो केला । अंधार पळविला कामक्रोध ॥ एकाजनार्दनी उघडा बोध दिला। तोचि ठसावला हृदयामाजीं॥ ८. जग परब्रह्म पाहणे हेच गुरुकृपेचें वर्म होय. दृष्टी देखे परब्रह्म । श्रवणी ऐके परब्रह्म ॥ रसना सेवी ब्रह्मरस । सदा आनंद उल्हास ॥ गुरुकृपेचे हे वर्म । जग देखे परब्रह्म ॥ एकाजनार्दनी चराचर। अवघे ज्यासी परात्पर ॥ ९. गुरु हाच परमात्मा परेश असा ज्याचा विश्वास त्याचे घरी देव राबतो. गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥ देव तयाचा अंकिला। स्वये संचला त्याचे घरीं ॥ एकाजनार्दनीं गुरु देव । येथे नाहीं बा संशय ॥ १ त्रास. २ देव ठेवण्याची संबळी. ३ बिंबणे, बाणणे. ४ श्रेष्ठ देव. ५भरला. ________________

६१३] १७३ उपदेश. २. उपदेश. १०. गोड परमार्थ कडू वाटतो हे विषयरोगाचे विचित्र. विदान नव्हे काय ? नवल रोग पडिपाडे । गोड परमार्थ झाला कडू ॥ विषयव्याधीचा उफोडा । हरिकथेचा घ्यावा काढा ॥ ऐसा रोग देखोनि गाढा । एकाजनार्दन धांवे पुढां ॥ ११. निरपेक्षता. आधी घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथां ॥ निरपेक्ष जेथे घडे । यमकाळ पायीं जोडे । निरपेक्षाची आवडी । ब्रह्मशान घाली उडी ॥ निरपेक्षेवांचून । नाहीं नाहीं रे साधन ॥ एकाजनार्दनीं शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान । है . । . १२. “ अनुताप जाहलिया सहज समाधि." अनुतापावांचुनी नाम नये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ॥ मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुद्ध तेणे ॥ अनुताप जाहलिया सहज समाधि । तुटेल उपाधि सहजचि ॥ एकाजनार्दनीं अनुतापे पाहे । मग देव आहे जवळी तया ।। १३. अनुतापाने त्रिविधताप जातील. अनुताप नाहीं ज्यासी । विवेक नुपजे मानसीं ॥ मुख्य पाविजे अनुताप। तेणें निरसे त्रिविध ताप ॥ १ थोरवी. २ जोर. ३ पश्चात्ताप, ४ दूर होणे, नाहीसे होणे. ________________

[६ १३ १७४ संतवचनामृत : एकनाथ. अनुतापावांचून । ब्रह्मज्ञान होय दीन ॥ एकाजनार्दनीं शरण । तैंच अनुताप बाणे पूर्ण ॥ १४. अविश्वास हा दोषांचा मुकुटमाण आहे. अविश्वासापुढे । परमार्थ कायसे बापुडें ॥ अविश्वासाची राशि । अभिमान येतसे भेटीसी ॥ सदा पोटी जो अविश्वासी । तोचि देखे गुणदोषांसी ॥ सकळदोषां मुकुटमणी । अविश्वास तोचि जनीं ॥ 'एकाजनार्दनीं विश्वास । नाहीं त्यास भय कांहीं ॥ १५. लोखंडाची बेडी तोडून सोन्याची घालून घेण्यांत ___ काय अर्थ ? लोखंडाची बेडी तोडी। आवडी सोनियाची घडी ॥ मी ब्रह्म म्हणतां अभिमान । तेथें शुद्ध नोहे ब्रह्मज्ञान ॥ जैसी देखिली जळगार । शेवटी जळाच निर्धार ॥ मुक्तपणे मोला चढले । शेवटीं सोनियाचे फांसी पडिले ॥ एकाजनार्दनी शरण । बद्धमुक्ता ऐसा शीण ॥ १६. “एक ते करूं करूं म्हणतांचि गेले." एक नरदेह नेणोनि वायां गेले । एक न ठेके म्हणोनि उपेक्षिले। एक ते गिळिले ज्ञानगर्दै ॥ एक ते साधनी ठकिले । एक ते करूं करूं म्हणतांचि गेले।। करणे राहिलेसे तैसे॥ १ पाण्याची गार. २ पाश. ३ घडणे. ४ त्यागणे. ५ फसणे. ________________

६१९] , उपदेश. १७५ शाने व्हावी ब्रह्मप्राप्ति । ते ज्ञान वैची विषयासक्तीं। . ... भांडवल नाहीं हातीं। मा मुक्ति कैंची ॥ स्वप्नींचे निजधने । जानतीं नोहे धर्म। ब्रह्माहमस्मि हेही समाधान । सोलीव भ्रम ॥ अभिमानाचिया स्थिती। ब्रह्मादिकां पुनरावृत्ति। ऐसी वेदश्रुति । निश्चयें बोले ॥ एकाजनार्दनी एकपण अनादि ।अहं आत्मा तेथे समूळ उपाधि॥ १७. दोन साधनाखेरीज तिसरें साधन नको. हींचि दोनी पैं साधनें । साधके निरंतर साधणे ॥ परद्रव्य परनारी । यांचा विटाळ मने धरीं ॥ नको आणिक उपाय । सेवीं सद्गुरूचे पाय ॥ म्हणे एकाजनार्दन । न लगे आन ते साधन ॥ १८. जेथें अर्थ आहे तेथें परमार्थ नाही. अर्थ नाहीं जयापाशीं । असत्य स्पर्शना तयासी ॥ अर्थापाशी असत्य जाण । अर्थापाशी दंभ पूर्ण ॥ अर्थापोटीं नाहीं परमार्थ । अर्थापोटीं स्वार्थ घडतसे ॥ अर्थ नको माझे मनीं । म्हणे एकाजनार्दनीं ॥ १९. हिंगाच्या संगतीने कस्तुरीचा वास नाहीसा होत नाहीं काय? कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग जाणिजेती॥ साकरेचे आळी निंब जो पेरिला । शेवटी कडू त्याला फळे पत्रे॥ १ पुनर्जन्म. २ पैसा. ३ सुवास. ४ आ. 1 ________________

१७६ संतवचनामृत : एकनाथ. [६१९ चंदनाचे संगें हिंगण वसती । परि चंदनाची याती वेगळीच ॥ एकाजनार्दनी हा अभाविकाचा गुण । वमनासमान लेखू आम्हीं॥ २०, अरण्यांत सूकराप्रमाणे मठ करून कां राहतोस ? वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्त्वतां थेंब नाहीं॥ वायां तो प्राणी आला नरदेहा। गेला वायां पहा भक्तिवीण ॥ अरण्यांत जैशी सूकरें बैसतीं । तैसें मठाप्रति करूनि बैसे ॥ उदय होतांचि लपते उलूक । तैसा तो मूर्ख समाधि बैसे ॥ एकाजनार्दनी वायां गेले सर्व । संसार ना देव दोन्ही शून्य ॥ २१. मानभावाप्रमाणे आंतबाहेर काळेपण कां स्वीकारतोस ? होउनी मानभाव । अवघा बुडविला ठाव ॥ नाही चित्त शुद्ध गति । द्वेष देवाचा करती ॥ धरती उफराटी काठी । रांडापोरे भोंदी वाटीं ॥ नेसोनियां काळेपण । अंगा लाविती दूषण ॥ एकाजनार्दनी देवा । जळो जळो त्यांची सेवा ॥ २२. बोकडाचे वैराग्य, कुक्कुटाची समाधि, व मर्कटाच्या चेष्टा घेऊन काय करावयाच्या ? काय ते वैराग्य बोकडाचे परी। भलतिया भरी पडतसे ॥ काय ती समाधि कुक्कुटाचे परी। पुचि उकरी लाभ नेणें ॥ बैसोनि आसनी वाउगें ते ध्यान । सदा लक्षी मान आपुलाचि॥ घालूनियां जेठा बैसतो करंटा। करितसे चेष्टा मर्कटापरी॥ १ ओक. २ मानणे. ३ डुकर. ४ घुबड. ५ काळी वस्त्रे वापरणारा एक पंथ. ६ फसवणे. ७ कोंबडा. ________________

६२४] उपदेश. १७७ नाहीं शुद्ध कर्म योगाचा विचार । सदा परद्वार लक्षितसे ॥ ऐशिया पामरा कायसा तो बोध । एकाजनार्दनी शुद्ध खडक जैसा॥ २३. जो अठरा गुण सोडील तोच शुद्ध होय. काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्वरी तत्पर हेचि येथे ॥ . क्षुधा तृषा मोह शोक जरा मरण । षडू पूर्ण देही हेचि ॥ आशा मनीशा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे अठरागुण जाणा देहामाजीं॥ एकाजनार्दनीं त्यजोनि अठरा । तोचि संसारामाजी शुध्द ॥ २४. बीज अग्नीत पेरिले असता त्यास कोंभ कसे येतील ? करितां हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच नये दारुण । रुका वेचितां प्राण । जाऊ पाहे ।। द्रव्यदारा लोभ अंतरीं । हरिकथा वरि वरि। बीज अग्नी माझारी । विरूढे कैसे ॥ टाळी लावूनियां जाण । दृढ घालिती आसन । अंतरीं तो ध्यान । वल्लभेचें ॥ धनलोभाचा वोणवा । तेणे जाळिले जीवभावा । हरिकथेचा करी हेवा । लोकरूढी ॥ धनलोभी आसक्तता । हरिकथा करी वृथा। तयासी तो परमार्थ तत्त्वतां । न घडे जाणा ॥ एकलीच कांता । नाश करी परमार्था । .१ परस्त्री, २ इच्छा. ३ पैसा. ४ दरवाजा. ५ स्त्री. ६ वणवा. सं...१२ ________________

१७८ संतवचनामृत : एकनाथ, तेथें धनलोभ येतां । अनर्थाचे होय " एकाजनार्दनीं । काम क्रोध लोभ तीन्ही । द्रव्यदारा त्यजोनि । नित्य तो मुक्त ॥ २५. एकाजनार्दनांत मीपण तूंपण नाही. देहबुद्धि सांडी कल्पना दंडी। वासनेची शेंडी वाढवू नको॥ तूंते तूंचि पाहीं तूंते तूंचि पाहीं। पाहुनियां राही जेथीच्या तेथे ॥ तूंते तूंचि पाहीं जेथे देहो नाहीं। मीपणे कां वायां गुंतलासी॥ एकाजनार्दनीं मीपण तूंपण । नाहीं नाहीं मज तुझीच आण ॥ २६. गजाचे ओझें गाढव वाहूं शकणार नाही. गजाचे ते वोझे गाढवासी न सोजे । भाविकाचे भजन अभाविकां न विराजे ॥ पतिव्रतेची राहाटी सिंदळीसी न साजे । श्रोत्रियाचे कर्म हिंसका लाजे ॥ एकाजनार्दनाचे कवित्व सर्वांसी साजे । वाचे श्रीगुरु म्हणतां कदा न लाजे ॥ २७. सर्व वाणी ईश्वरास सारख्याच प्रिय आहेत. वेदवाणी देवे केली । येर काय चोरापासुनी झाली ॥ सकळ वाचा वदवी देव । कां वाढवा अहंभाव ॥ ज्या ज्या वाणी स्तुति केली। ते ते देवासी पावली ॥ एकाजनार्दनीं मातु । वाचा-वाचक जगन्नाथु ॥ १ नाहीशी करणे. २ शोभणे.३ शोभणे. ४ चालणूक. ५ यज्ञ करणारे दीक्षित. ६ गोष्ट, ________________

१२९] उपदेश. २८. अदृष्टाचे सामर्थ्य. अधमै अदृष्टाचे चिन्ह । विपरीत वचन ते ऐका॥ भांडारी ठेविला कापूर उडे । समुद्रामाजी तारूं बुडे ॥ ठक येवोनि येकांती। मुलाम्याचे नाणे देती॥ स्वच परचक्र विरोध धाडी।खणीत लावुनि तळघरे फोडी पाणी भरे पेवा आंत । तेणे धान्य नासे समस्त ॥ गोठणी शेळ्या रोग पडे। निमती गाईम्हशीचे वाडे ॥ भूमिनिक्षेप करूं जाती। ते आपुल्याकडे धुळी वोढिती॥ बुद्धि सांगे वाडोवाड । तेथोनि तोंडी घाला दगड ॥ ऐशी कर्माची अधर्म स्थिती। एकाजनार्दनीं सोशी फजिती॥ २९. मागेपुढे कुटाकुटी । सकळांस होतसे. फूल झडे तंव फळ सेसे । तया पाठी तेही नासे॥ एका मागे एक पुढे। मरण विसरले बापुडे ॥ शेजारी निमाले कोणाचे खांदी।लपों गेला सा खादली मोंदी॥ मरण ऐकतां परता पळे । पळे तोही मसणी जळे ॥ प्रेत देखोनी वोझाच्या जाती। वोझे म्हणती तेही मरती॥ मरण म्हणतां धूं धूं म्हणती । धुंकते तोडे मसणी जळती ॥ पळे ना चळे तोचि सांपडे। जाणतां जाणतां होताती वेडे ॥ एका जनार्दनीं शरण । काळ वेळ तेथे न रिगे मरण ॥ १चोर, लुच्चा. २ खोटे. ३ आपले व परक्यांचे हल्ले. ४ हल्ला. ५ खणून. 1६ जनावरें राहण्याची जागा. ७ नष्ट होणे. ८ धरले जाते. ९ समुदाय. १० स्मशान. ११ ओझें वाहणारा. ________________

१८० संतवचनामृत : एकनाथ. [६३० ३०, प्राचीनाची दोरी असेपर्यंत एखाद्या पांथस्थाप्रमाणे या संसारांत असावें. पांथस्थ घरासी आला । प्रातःकाळी उठोनि गेला ॥ तैसे असावे संसारीं । जैसी प्राचीनाची दोरी ॥ बाळी घराचार मांडिला । तो सवेचि मोडुनि गेला ॥ एका विनवी जनार्दना । ऐसें करी गा माझ्या मना ।। ३१. पक्षी अंगणांत उतरतात व सवेंच उडून जातात. पक्षी अंगणीं उतरती । ते कां गुतोनियां राहती॥ तैसे असावे संसारीं । जोवरी प्राचीनाची दोरी॥ वस्तीकर वस्ती आला । प्रातःकाळी उठोनि गेला॥ शरण एकाजनार्दन । ऐसे असतां भय कवण ॥ . ३२. “ मन म्हणे तें न करावें." वैर करुनी मन मारावें । मनाधीन पैं न व्हावें ॥ मनामागे जाऊं नये । मन आकळुनि मन पाहे ॥ मन म्हणे ते न करावे । मनीं मनासी बांधावें ॥ मन म्हणेल ते सुख । परि पाहतां अवघे दुःख ॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावे आकळून ॥ ३३. मन देवाच्या चरणी बांधून ठेविलें असतां तें इकडे तिकडे जाणार नाही. माझ्या मनाचे ते मन । चरणी ठेवावे बांधून ॥ मग ते जाऊ न शके कोठे । राहे तुमच्या नेहेटे ॥ - १ वाटसरूं. २ खेळ. ३ प्रारब्ध. ४ वाटसरूं. ५ बळाने. ________________

६३५] उपदेश. १८१ मनासी ते बळ । देवा तुमचे सकळ ॥ एकाजनार्दनी देवा । मन दृढ पायीं ठेवा ॥ ३४. अलक्षपुरचा जोशी सांगतो की मनामागे जाऊ नका. आम्ही अलक्षपुरचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसीं । तेणे चुकती चौयांशी । मी निर्गुणपुरींचा जोशी ॥ होरा ऐका दादांनो । होरा ऐका दादांनों ॥ध्रु०॥ नका जाऊं मनामागे । थोर थोरां जाहले दगे। मी बोलत नाहीं वाउगें। सावध रहा दादानों। वासना वाईट ही बा थोर । भुलविले लहान थोर । फिरती चौऱ्यांशी लक्ष घरे। पडाल फशी दादांनो॥ एका जनार्दनी जोशी । सांगेन शकुन सर्वत्रांसी। रामनाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनी ॥ ३५. एडक्या मदनास शुकदेवाने आणून एकाजनार्दनाचे - चरणी बांधिलें. एडका मदन । तो केवळ पंचानन ॥ध्रु०॥ धडक मारिली शंकरा। केला ब्रह्मयाचा मातेरी। इंद्रचंद्रासी दरारीं । लाविला जेणे॥ धडक मारिली नारदा। केला रावणाचा चंदा । दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण ॥ भस्मासुर मुकला प्राणांसी । तेचि गति झाली वालीसी । विश्वामित्रासारिखा ऋषी । नाडिला जेणे॥ शुकदवान ध्यान धरोनि । एडका आणिला आकळोनि । एकाजनार्दनाचे चरणीं। बांधिला जेणे ॥ १ लक्ष्यातीत परब्रह्म हेंच कोणीएक शहर. २ ज्योतिष, भावष्य, ३ व्यर्थ, ४ सिंह. ५ धक्का. ६ फजिती. ७ भीति, धाक. ८ फसवणे. ________________

१८२ संतवचनामृत: एकनाथ. [६३६ ३. नामस्मरण आणि भाक्त. ३६. " आठव तो परब्रह्म । नाठव तो भवभ्रम." भगवद्भावो सर्वांभूती । हेचि ज्ञान हेचि भक्ति । विवेक विरक्ति । याचि नांवें ॥ हे सांडूनी विषयध्यान । तेचि मुख्यत्वे अज्ञान । जीवीं जीवा बंधन । येणेचि दृढ ॥ आठव तो परब्रह्म । नाठव तो भवभ्रम । दोहींचे निजवर्म । जाण बापा ॥ आठव विसर चित्तीं । जेणे जाणिजेती। तेचि एक निश्चिती । निजरूप ॥ स्मरण ते निजमुक्ति । विस्मरण तेचि अधोगती। ऐसे पुराणे गर्जती । बाह्या उभारूनि ॥ एकाजनार्दनीं । सहज निजबोधनी। सबाह्याभ्यंतरी । पूर्ण परमानंद ॥ ३७. नामाचा उच्चार हीच भक्ति. सेवेचे कारण मुख्य तो सद्भाव।। इतर ते वाव इंद्रियबाधा ॥ साधन हेचि आधीं तोडी तूं उपाधि । नको नको ऋद्धिसिद्धि आणिक कांहीं ॥ नामाचा उच्चार मुख्य हेचि भक्ति। एकाजनार्दनीं विरक्ति तेणे जोडे । १ हात. २ आंतबाहेर. ३ व्यर्थ. ________________

६४१] नामस्मरण आणि भक्ति. . १८३ ३८. या जगांत सर्व वस्तु नाशिवंत असून एक हरिनामच शाश्वत आहे. नाशिवंत धन नाशिवंत मान । नाशिवंत जाण काया सर्व ॥ . नाशिवंत देह नाशिवंत संसार । नाशिवंत विचार न करिती ॥ नाशिवंत स्त्रीपुत्रादिक बाळे । नाशिवंत बळे गळां पडती ॥ एकाजनार्दनी सर्व नाशिवंत । एकचि शाश्वत हरिनाम ॥ ३९. नामजप मनींचे सर्व हेतु पूर्ण करतो. आपुले कल्याण इच्छिणे जयांसी। तेणें या नामासी विसंबूं नये ॥ करील परिपूर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामापाशीं ॥ भुक्ति आणि मुक्ति वोळंगती सिद्धि । होईल की वृद्धी आत्मनिष्ठे॥ एकाजनार्दनी जपतां हे नाम । पुरवील काम जो जो हेतु ॥ ४०. अनुभव आल्यावर नामावरील श्रद्धा दुणावते. नाहीं जया भाव पोटीं । तया चावटी वाटे नाम ॥ परी येतां अनुभव । चुकवी हाव संसार ॥ वेरझोरीं पडे चिरी । नाहीं थारा जन्माचा॥ एकाजनार्दनी खंडे कर्म । सोपें वर्म हातां लागे। ४१. नामरूपाला मेळ न घालतां तुम्ही केवळ वाचेचा ___गोंधळ कां करितां ? नाम घेतां हे वैखरी । चित्त धांवे विषयावरी ॥ कैसे होताहे स्मरण । स्मरणामाजी विस्मरण ॥ नामरूपा नव्हता मेळ । नुसता वाचेचा गोंधळ ॥ एकाजनार्दनी छंद । बोलामाजी परमानंद ॥ १ आविनाश, सतत टिकणारें. २ आश्रयकरणे. ३ श्रद्धा. ४ व्यर्थ बडबड, ५ येणेजाणे, खेपा, जन्ममृत्यु. ६ दगड. ७ आश्रय. ________________

१८४ संतवचनामृत : एकनाथ. [8 ४२ ४२. हरिनाम ऐकून तुला सुख वाटणार नाही तर तुझ्या अंतरीं पाप आहे असे समज. हरिनाम ऐकतां न वाटे सुख । अंतरीं तूं देख पाप आहे ॥ कस्तुरीचे आळांपेरिला पलांडूं। सुवास लोपोनि कैसा वाढे दुर्गधु॥ धारोष्ण पय परिज्वरिताचे मुखाधुंकोनि सांडी म्हणे कडू विख ॥ पान लागलीया गूळ न म्हणे गोडु । गोडाचे गोड ते झाले कडु ॥ एकाजनार्दनीं भाव नुपजे नरा। नरदेही आयुष्य तेंही केला मातेरी॥ ४३. नामधारक हा सर्वापेक्षा कोटिगुणाने श्रेष्ठ आहे. गांवढे सहस्र ब्राह्मण । तृप्त केलिया भोजन । पुण्यक्षेत्रींचा एकचि जाण । सुकृत तितुकेंचि जोडे । ऐसे पुण्यक्षेत्रींचे दशशतक । तृप्त केलिया पाठक। पहातां सुकृत । तितुकेंचि जोडे । ऐसे सहस्र वेदपाठक । तृप्त केलिया पंडित एक। पहातां सुकृत । तितुकेंचि जोडे । तैसेच पंडित सहस्र एक । तृप्त केलिया संन्यासी देख । तरी ते सुकृत । तितुकेंचि जोडे ॥ तैसे सहस्र संन्यासी । गणित एक परमहंसी। पहातां सुकृतासी । एक तृप्त केलिया ॥ परमहंसी सहस्रगणी । तैसीच ब्रह्मज्ञानाची मांडणी । जोडे सुकृत तृप्तकरणी । एक ब्रह्मवेत्ता॥ ऐसे वेत्ते अपरंपार । न ये नामधारकाबरोबर। नामधारका सादर । पाहे एका जनार्दनीं ॥ १ कांदा. २ ताजें. ३ सर्पदंश झाला असता. ४ नाश. ५ गांवढळ. ६ पठण करणारा. ________________

नामस्मरण आणि भक्ति. . ४४. चिंतनाने सर्व कार्य सिद्ध होते. चिंतने नासतसे चिंता । चिंतने सर्व कार्य ये हातां।.. चितने मोक्ष सायुज्यता । घर शोधीतसे ॥ ऐसे चिंतनाचे महिमान । तारिले अधम खळ जन । चिंतने समाधान । प्राणिमात्रां होतसे ॥ चिंतन तुटे आधिव्याधी । चिंतने तुटतसे उपाधि। चिंतने होय सर्व सिद्धि । एका जनार्दनाचे चरणीं ॥ ४५. चिंतनाने काळाचे भय नाहींसें होतें. हरे भवभय व्यथा चिंतने । दूर पळती नाना विघ्ने। कलिकल्मष बंधने । न बाधी चिंतने ॥ करा करा म्हणोनि लौहो। चिंतनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहों। दूर पळे चिंतने ॥ हीच माझी विनवणी । चिंतन करा रात्रंदिनीं । शरण एका जनार्दनीं । रामनाम चिंतावे॥ ४६. चिंतनाने देवाचें साहाय्य प्राप्त होतें. चिंतन ते सोपे जगीं। रामकृष्ण म्हणा सत्संगी। उणे पडों नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतने ॥ चिंतन करितां द्रौपदी। पावलासे भलते संधीं। ऋषीश्वरांची मांदी । तृप्त केली क्षणमात्रे ॥ चिंतने रक्षिले अर्जुना । लागों नेदी शक्तिबाणा । होउनी अंकणों । रथारूढ बैसला॥ चिंतने प्रल्हाद तारिला । जळी स्थळी सांभाळिला । एकाजनार्दनीं भला । चिंतनाचा अंकित ॥ १ मोठेपणा. २ मानसिक चिंता, व रोग. ३ दूर होणे. ४ कलीतील पाप. ... ५ छंद. ६ व्यवसाय. ७ भय. ८ समुदाय. ९ अंकित. ________________

१८६ संतवचनामृत: एकनाथ. [६४७ ४७. भक्ति ही माता असून मुक्ति ही तिची दुहिता आहे. भक्तीच्या पोटा मुक्ति 4 आली। भक्तीने मुक्ती वाढावलें ॥ भक्ति ते माता मुक्ति ते दुहितां । जाणोनि तत्त्वतां भजन करी॥ भक्ति सोडोनि मुक्ति वांछिती वेडी। गूळ सोडोनि कैसी ये गोडी। संतोषोनि भक्ति ज्यासी दे मुक्ति। तोचि लाभे येर व्यर्थ कां शिणती॥ एकाजनार्दनीं एक भाव खरा। भक्ति मुक्ति दानी आलिया घरा॥ ४८. प्रेमावांचून ज्ञानी शृंगारलेल्या रांडेप्रमाणे दिसतो. भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥ प्रेमसुख देई प्रेमसुख देई । प्रेमेविण नाहीं समाधान ॥ रौडिवेने जेविं गंगारु केला । प्रेमेविण जाला शानी तैसा ॥ एकाजनार्दनीं प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥ __ ४९. भक्ति हे मूळ, वैराग्य हे फूल, व ज्ञान हे फळ होय. भक्तीचे उदरीं जन्मले शान । भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान ॥ भक्ति ते मूळ ज्ञान ते फळ । वैराग्य केवळ तेथींचे फूल ॥ फूल फळ दोनी येरयेरां पाठीं। शान वैराग्य तेविं भक्तीचे पोटीं । भक्तीविण ज्ञान गिवर्सिती वेडे । मूळ नाही तेथे फळ केवि जोडे । भक्तियुक्त ज्ञान तेथे नाहीं पतन । भक्ति माता तया करितसेजतन॥ शुद्ध भाक्तिभाव तेथे तिष्ठे देव। ज्ञानासी तो ठाव सुखवस्तीसी॥ शुद्धभाव तेथे भक्तियुक्त ज्ञान । तयाचेनि अंगें समाधि समाधान ॥ एकाजनार्दनी शुद्ध भाक्ति क्रिया। ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पायां। १ मुलगी. २ आपण होऊन. ३ विधवा, वेश्या. ४ सुख. ५ शोधणे. ________________

६५२ } नामस्मरण आणि भक्ति. . १८७ ५० भावभक्तीवांचून केलेले सर्व पुण्य म्हणजे विटंबनाच होय. राजाला आळस संन्याशाला सायास।विधवेसी विलास विटंबना। व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी हरिकथा विटंबना ॥ दानेविण पाणि घ्राणेंविण घोणी । नामेविण वाणी विटंबना ॥ एकाजनार्दनीं भावभक्तीविना । पुण्य केले नाना विटंबना ॥ ५१. नित्य नवा कीर्तनांत कसा रंग वोढवत आहे !' नित्य नवा कीर्तनी कैसा वोढवला रंग। श्रोता आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग ॥ आल्हाद वैष्णव करिती नामाचा घोष। हरिनाम गर्जतां गगनीं न माये हरुष । पदोपदी कीर्तनी निवताहे जन मन । आवडी भुकेली तिने गिळिले गगन ॥ एकाजनार्दनीं गातां हरिचे नाम। निमाली इंद्रिये विषय विसरली काम ॥ ५२. हरिकीर्तन चाललें असतां आंतबाहेर देव उभा राहतो. आवडी करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे जनार्दन ॥ थोर कीर्तनाचे सुख । स्वयं तिष्ठे आपण देख ॥ घातं आलिया निवारी । चक्र गदा घेउनि करीं ॥ कीर्तनी होऊन सादर । एका जनार्दनी तत्पर ॥ १ हात. २ नाक. ३ प्राप्त होणे. ४ आनंद. ५ हल्ला, संकट. ________________

१८८ संतवचनामृत: एकनाथ. ६५३ ५३. योगसाधनाने जो सांपडत नाही तो आज कीर्तनांत नाचत आहे. आजि नवल झाले वो माय । पाहण्या पाहणे दृष्टि धाये ॥ ऐसा लाघवी सुखकर मूर्ति । संतसंगें जाली मज विश्रांति ॥ योगीश्वर जया चिंतिती। सनकादिक जया ध्याती ॥ योगसाधने नातुडे जो माये । एकाजनार्दनी कीर्तनी नाचतु आहे॥ ५४. कीर्तनाने चराचर पावन होतें. मागणे ते आम्ही मागू देवा । देई हेवा कीर्तनीं ॥ दुजा हेत नाहीं मनीं । कीर्तनावांचुनी तुमचीया ॥ प्रेमें हरिदास नाचत । कीर्तन होत गजरौं । एकाजनार्दनी कीर्तन । पावन होती चराचर जाण ॥ ५५. कामनिक कीर्तन केले असतां जन्मोजन्मीं पतनास कारण होईल. करुनी कीर्तन मागती जे द्रव्य । ते जाणावे वैधव्य विधवेचें ॥ सर्व अलंकार शरीर शोभले । वायांपरी गेले कुंकूहीन ॥ मानवाने भावे करावे कीर्तन । आनंदें नर्तन वैष्णवांपुढे ॥ एकाजनार्दनी कामनिकै कीर्तन । करितां पतन जन्मोजन्मीं ॥ ५६, कोणास काही सांकडे न घालितां कीर्तन करावें. कीर्तनाची मर्यादा कैसी। देव सांगे उद्धवासी ॥ गावे नाचावे सांबडे। न घालावे को. त्या कांहीं ॥ १ तृप्त होणे. २ सांपडत नाही. ३ आवडी, छंद. ४ हेतु. ५ मनांत इच्छा . न, सकाम, ६ भोळेपणाने, प्रेमळपणानें: ७ संकट. ________________

६५८] नामस्मरण आणि भक्ति. मिळेल तरी खावे अन्न । अथवा पण ती भक्षून ॥ जाईल तरी जावो प्राण । परि न संडावें कीर्तन ॥ किरकिर आणूं नये पाठीं। बोलूं नये भलती गोष्टी ॥ स्वये उभा राहून । तेथें करी मी कीर्तन ॥ घातं आलिया निवारी। माता जैसी बाळावरी ।। बोले उद्धवासी गुज । एकाजनार्दनी बीज ॥ ५७. परमपावन सगुणचरित्रांचे वर्णन करावें. सगुणचरित्रं परम पवित्रे सादर वर्णावीं । सज्जनवृंदें मनोभावें आधी वंदावी ॥ संतसंगे अंतरंगे नाम बोलावें। कीर्तनरंगी देवासन्निध सुखे डोलावें ॥ भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या। प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या॥ जेणेकरूनि मूर्ति ठसावे अंतरि श्रीहरिची । ऐशी कीर्तनमर्यादा हे संतांच्या घरची ॥ अद्वयभजने अखंडस्मरणे वाजवी करटाळी। एकाजनार्दनी मुक्ति होय तात्काळी ॥ ५८. नवविधाभजनाने कोण कोण पावन झाले ? नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगूं आतां ॥ एक एक नाम घेतां प्रातःकाळीं। पापा होय होळी क्षणमात्रे ॥ श्रवणे परीक्षिति तरला भूपति । सात दिवसां मुक्ति जाली तया ॥ A nthemuner १ संकट. २ आदरयुक्तः ३ समुदाय.. ४ विवरणकरणे, स्पष्ट करणे.. ________________

१९० [६५८ संतवचनामृत : एकनाथ. महाभागवत करुनि श्रवण । सर्वांगाचे कान केले तेणे॥ श्रीशुक आपण करूनि कीर्तन । उदारला जाण परीक्षिति ॥ हरिनामघोष गर्जे तो प्रल्हाद । स्वानंद प्रबोध जाला त्यासी ॥ स्तंभी अवतार हरि प्रगटला । दैत्य विदारिला तयालागीं॥ पायाचा महिमा स्वये जाणे रमा। प्रिय पुरुषोत्तमा जाली तेणें ॥ हरिपदांबुज सुकुमार कोवळे । तेथे करकमळे अखंडित ॥ गाईचिया मागे श्रीकृष्णपाउले। अक्रूरे घातले दंडवत ॥ करूनि वंदन घाली लोटांगण। स्वानंदें निमग्न जाला तेणे ॥ दास्यत्व मारुति अर्चे देहस्थिति। सीताशुद्धि कीर्ति केली तेणे॥ सेव्यसवक भाव जाणे तो मारुति । स्वामी सीतापति संतोषला। सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्वभावें प्रीति अर्जुनासी॥ 'उपदेशिली गीता सुखी केले पार्थी। जन्ममरणवाता खुंटविली॥ आत्मनिवेदन करूनियां बळी। जाला वनमाळी द्वारपाळ। औटै पाऊल भूमि घेऊनि दान । याचक आपण स्वयें झाला ॥ नवविधा भक्ति नवजणे केली । पूर्ण प्राप्ति जाली तयांलागीं ॥ 'एकाजनार्दनी आत्मनिवेदन । भक्ति दुजेपण उरले नाहीं॥ ४. संतांची लक्षणे. ५९. " ऐसे कैसियाने भेटती ते साधु." ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । ऐसे जाणती ते अतिदुर्गमे । तयांची भेटी जालिया भाग्य परम । १ खांब. २ साडेतीन. ३ दुसरें. ४ भिन्नजातीचं. ५ कळण्यास अतिशय कठिण. ________________

६६.] - संतांची लक्षणे. १९१ ऐसे कैसियाने भेटती ते साधु । ज्यांचा अतयं तर्कवेना बोधु । ज्यासि निजानंदी आनंदु । ज्यांचा परमानंदी उद्बोधु ॥ पवना घालवेल पालाण | पायीं चढवेल गगन । . भूत भविष्य कळो येईल वर्तमान । परि त्या साधूचें न कळे भहिमान॥ चंद्रामृत सुखे सेववेल । रवि अस्ता जातां धरवेल । बाह्यो हेळी सागर तरवेल । परि त्या साधूची भेटी न होईल ॥ जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल निजध्यान ।। ज्ञेय शाता विवर्जित ज्ञान । ज्ञानाध्यानाचे मूळ हे साधुजन ॥ निजवृत्तीचा करवेल निरोधु । जिवाशिवाचा भोगवेल आनंदु। 'एकाजनार्दनीं निजसाधु । त्यांच्या दर्शने तुटे भवबंधु ॥ . HTTA ६०. ब्रह्मज्ञान्याची लक्षणे. वर्म जाणे तो विरळा । तयांची लक्षणे पैं सोळा । देही देव पाहे डोळां । तोचि ब्रह्मज्ञानी ॥ जन निंदो अथवा वंदो । जया नाही भेदाभेद । . विधिनिषेधांचे शब्द । अंगी न बाणती ॥ कार्य कारण कर्तव्यता। है पिस नाहीं सर्वथा । उन्मनी समाधि अवस्था । न मोडे जयाची ॥ कर्म अकर्माचा ताठौ। न बाणेचि अंगी वोर्खटा। वाउग्या त्या चेष्टा । करीना कांहीं । शरण एका जनार्दनीं । तोचि एक ब्रह्मज्ञानी। तयाचे दरुशनीं । प्राणियांसी उध्दार ॥ १ खोगीर. २ हातांनी. ३ सहज, लीलेनें. ४ वेड. ५ अभिमान. ६ वाईट. ________________

१९२ संतवचनामृत : एकनाथ. [६६१. ६१. क्रोध, शोक, मोह साधूंचे मनास स्पर्शत नाहीत. आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा । क्रोधाचा थारा अंतरीं नये आपुलंच धन तस्करें नेतां जाण । जयाचें मन उद्विग्न नव्हे ॥ आपुलाचि पुत्र वधेोनि जाय शत्रु । परि मोहाचा पाझरू नेत्रीं नये॥ आपुले शरीर गांजितां परनरें । परि शांतीचे घर चळो नेदी ॥ एकाजनार्दनी जया पूर्ण बोधु । तोचि एक साधु जगामाजी ॥ ६२. निंदास्तुति मुखांत नसून संत केवळ आत्मस्थितीने वर्ततात. मुखीं नाहीं निंदास्तुति । साधु वर्ते आत्मस्थिति ॥ राग द्वेष समूळ गेले । द्वैताद्वैत हारपले ॥ घेणे देणे हा पसारा । नाहीं जयासी दुसरा॥ एकाजनार्दनीं संत । हा ज्याचे हृदयीं भगवंत ॥ ६३. संसारी आपदा असून वाचेने सदोदित विठ्ठल म्हणणारा विरळा. असोनि संसारी आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा॥ नाहीं मानसी तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥ असोनियां अकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥ एकाजनार्दनीं ऐसे थोडे । लक्षांमध्ये एक निवडे ॥ ६५. वरवर गुरुपण मिरवून काय उपयोग ? जळतिया घरा । कोण वसती करी थारा ॥ तैसे अभागी पामर । गुरुपण मिरविती वरवर ॥ नाहीं मंत्रशुध्दीचे ज्ञान । भलतियाचे फुकिती कान ॥ मनुष्य असोनि गुरूं पाही । एकाजनार्दनीं ते नाहीं ॥ १ स्त्री. २ आश्रय. ३ चोर. ४ निर्दव्य, गरीब. ५ जनावर. ________________

६६८] संतांची लक्षणे. 20३ ६५. जे पोटासाठी संत होतात त्यांचा उपदेश कामास येत नाही. होती पोटासाठी संत । नाहीं हेत विठ्ठली ॥ तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥ घालुनी माळा मुद्रा गळां । दाविती जिव्हाळा परिवरी॥ एकाजनार्दनी ते पामरे । भोगिती अघोर यातना ॥ ६६. जे आम्हांस गुरु करा म्हणतात त्यांजजवळ गोविंद नाहीं असे समजावें. लावुनियां अंगा राख । म्हणती सुख आम्हांपाशीं ॥ भोळ्यां भाविकां भौदिती। भलते मंत्र तया देती॥ म्हणति आम्हां करा गुरु । उपचारु पूजेचा॥ एकाजनार्दनीं ते मैंद । नाहीं गोविंद तांपाशीं ॥ ६७. शिष्यापासून सेवा घेणे हे अधम लक्षण होय. शिष्यापासून सेवा घेणे । है तो लक्षण अधमाचें ॥ ऐसे असती गुरु बहु । नव्होच साहूं भार त्यांचा ॥ एकपणे समानता । गुरुशिष्य उरतां उपदेश । एकाजनार्दनी शरण । गुरु माझा जनार्दन ॥ ६८. मजला एकदा हरि दाखवा एवढीच कृपा तुम्ही संत मजवर करा. तुम्हीं संतजन । माझे ऐका हो वचन ॥ करा कृपा मजवरी । एकदां दाखवा तो हरि ॥ .१ हेतु, प्रेम. २ क्षुद्र. ३ फसवणे. ४ लुच्चा. सं...१३ HAL ________________

१९४ संतवचनामृत : एकनाथ. [६६८ आहे तुमचे हातीं । म्हणोनि येतो काकुलती ॥ एकाजनार्दनी म्हणे थारा । संती द्यावा मज पामरा ।। ६९. संतांच्या सेवेवांचून मला दुसरा हेतूच नाही. संताचिये द्वारी होईन द्वारपाळ। न सांगतां सकळ करीन काम ॥ तेणे माझ्या जीवा होईल समाधान। यापरते साधन आणिक नाहीं॥ शेष उष्टावळी काढीन पत्रावळी । पूर्वकर्मा होळी सहज होय ॥ एकाजनार्दनी हेचि पैं मागत । नाही दुजा हेत सेवेविण ॥ ७०, संतसेवा हेच नामश्रद्धेचे वर्म होय. वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा तो लेश तेथे नाहीं॥ बहुत व्युत्पत्ति सांगसी पुराण । व्यर्थ ते स्मरण नाम नाहीं॥ अनंत है नाम जयापासुनि जाले । ते वर्म चुकले संतसेवा ।। संतांसी शरण गेलियावांचुनि । एकाजनार्दनीं न कळे नाम ॥ ७१. भलत्या भावाने संतांची सेवा केली तरी ती देवास मान्य होते. जया जैसा हेत । तैसा संत पुरविती ॥ उदारपणे सम देणे । नाहीं उणे कोणासी ॥ भलतिया भावे संतसेवा । करितां देवा माने ते ॥ एकाजनार्दनी त्यांचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ।। ७२. संतसमुदाय भेटला हा आजचा भाग्याचा दिवस ! धन्य दिवस जाहला । संतसमुदाव भेटला ॥ ज्ञान.२पान्हा. ________________

संतांची लक्षणे. १९५ _ कोडे फिटले जन्मांचे । सार्थक जाहलें पैं साचें ॥ आज दिवाळी दसरा । संतपाय आले घरा ॥ एकाजनार्दनी जाहला । धन्य दिवस तो भला ॥ ७३. वैष्णवांचे चरण देखिले असतां त्रिविधतापांची बोळवण होते. धन्य आज दिन संतद्रुशनाचा। अनंतजन्मांचा शीण गेला॥ मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावें। कदा न सोडावे चरण त्यांचे ॥ त्रिविधतापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥ एकाजनार्दनीं घडो त्यांचा संगान व्हावा वियोग माझ्या चित्ता॥ ७४ संतसंगाने आनंदाचे पूर लोटतात. भाग्याचा उदय झाला। संतसंग मज घडला॥ तेणे आनंदाचे पूर लोटताती निरंतर ॥ प्रेम सप्रेम भरते। अंगी उतार चढते ॥ आली आनंदलहरी । एकाजनार्दनीं निर्धारी॥ ७५. संतसंग हीच कैवल्याची राशि होय. आजी सुदिन आझांसी । संतसंग कैवल्यरासी॥ हचि आमुचे साधन । आणिक नको आम्हां पठन ॥ वेदश्रुति पुराण मत । संतसेवा ते सांगत ॥ जाणोनि विश्वासिलो मनीं । शरण एका जनार्दनीं। १ सांकडे, इच्छा. २ निरसन. ३ लाट, ________________

संतवचनामृत : एकनाथ. [६७६ ७६. संतास शरण गेलें असतां ते काळाचा घाव चुकवितील. मेघापरिस उदार संत ! मनोगत पुरविती ॥ आलिया शरण मर्ने वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥ लिगाड उपाधि तोडिती । सरते करती आपणामाजी॥ काळाचा तो चुकविती घाव । येऊ न देती डाव अंगासी॥ शरण एकाजनार्दनीं । तारिले जनी मूढ सर्व ॥ ७७. संकट पडले असता त्याचे निवारण करणारा संतांवांचून दुसरा कोणी नाही. देवाचे सोइरे संत ते जाणावे । यापरते जीवें नाठवी कोणा ॥ पडतां संकट आठवितसे संतां । त्याहुनी वारिता नाही दुजा । म्हणोनि घरटी फिरे तया गांवीं। सुदर्शनादिमिरवी आयुधे हातीं। लाडिके डिंगर वैष्णव ते साचे। एकाजनार्दनीं त्यांचे वंदी पाय ॥ ____७८. संतांच्या दारीचा मी कुतराही हाईन; संतांचिये घरी होईन श्वानयाती। उच्छिष्ट ते प्रीती मिळेल मज ॥ तेणे या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥ आशापाश सर्व जातील तुटोनि । जीव हा बंधनी मुक्त होय ॥ एकाजनार्दनीं भाकीन करुणः। श्रीसंतचरणां वारवार ॥ ७९. कारण कुतऱ्याच्या गळ्यांतली सांखळी ते सोडवितील. ____संतद्वारी कुतरा जालो । प्रेमरसासी सोकलों॥ भुंकत भुंकत द्वारा आलो । ज्ञान थारुळया बैसलों॥ १ पेक्षां. २ लचांड. ३ मान्य. ४ निवारण करणारा. ५ सभोवार. ६ बालक.. ७ कु. ८ खळी. E ________________

६८२] संतांची लक्षणे कुतरा भुंकत आला हिता। संती हात ठावला थां ॥ कुतन्या गळ्याची साखळी । केली संतांनी कळ ॥ एकाजनार्दनी कुतरा। दांत पाडुनी कला बे थेगा । ८०. अभक्तांस देव कंटाळतात, पण संत त्यांचा उद्धार करितात. अभक्तां देव कंटाळती । परि सरते करिती संत त्यां ॥ म्हणोनि महिमा त्यांचा जगीं। वागविती अगी सामर्थ्य ॥ आँगमानिगमांची पसारा । उगाचि भारा चिंध्यांचा ॥ वेदशास्त्रांची घोकणी । ती तो काहणी जुनाट ॥ पुरातन वाटा असती बहु । त्या त्या न घेऊ यामाजी ॥ एकाजनार्दनीं सोपा मार्ग। संतसंग चोखडा ॥ ८१. मायबाप हे जन्मास घालतात; संत हे जन्म चुकवितात. संत मायबाप म्हणतां । लाज वाटे बहु चित्ता॥ मायबाप जन्म देती । संत चुकविती जन्मपंक्ति ॥ मायबापांपरीस थोर । वेदशास्त्री हा निर्धार ॥ शरण एका जनार्दनीं । संत शोभती मुकुटमणि ॥ ८२. संतांच्या कृपेस सीमाच नाही. रवि न लपचि अंधारी । तैशी तुमची जगी थोरी॥ कृपावंत तुम्हीं संत । यावरि हेत दुजा नाहीं ॥ एकाजनार्दनी शरण । संत परिपूर्ण दयाळु । १ दंतरहित, बोचरा. २ मान्य. ४ शास्त्र. ५ वेद. ________________

१९८ संतवचनामृत : एकनाथ. [६८ ८३. संत उदार असून सुरवाडसुखाची प्राप्ति करून देतात. वैकुंठीचे वैभव । संतांपायीं वसे सर्व ॥ संत उदार उदार । देती मोक्षाचे भांडार ॥ अनन्यभावें धरा चाड । मग सुरवाड सुख पुढे । एकाजनार्दनी ठाव । नोहे भाव पालट ॥ ८४. भक्तच देव होतो हा भजनाचा नवलाव किती म्हणून सांगावा? नवल भजनाचा भावो । स्वतां भक्तचि होय दवो । वाचे करिती हरिकीर्तन । उन्मनी मन निशिदिनी ॥ नाहीं प्रपंचाचे भान । वाचे सदा नारायण ॥ एकाजनार्दनीं मुक्त । सबाह्यअभ्यंतरीं पुनीत ॥ ८५. जो संतांस आवडतो तो देवाचाही देव होतो. संतांसी आवडे तो देवाचाही देव। कळिकाळाचें भेव पायांती।। आणिकाची चाड नसेचि वासना । संतांचिया चरणा वांचूनियां। ऐसे ज्याचे प्रेम ऐशी ज्याची भाक्ति । एकाजनार्दनीं मुक्ति तेथे राबे॥ ८६, आमचे जे सोयरे झाले ते यातिकुळाबाहेर गेले. आम्ही ब्रह्मपुरींचे ब्राह्मण । याति कुळ नाही लहान ॥ आम्हां सोवळे ओवळे नाहीं। विटाळ न देखो कवणे ठाई ॥ आम्हां सोयरे जे जाहाले। ते यातिकुळावेगळे केले ॥ एकाजनार्दनीं बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥ १ सुखकर, अलोट. २ पवित्र. ३ भय. ________________

. ९] देव आणि भक्त. - १९९ देव आणि भक्त. ८७ देव आपला देवपणा विसरून भक्तांच्या सर्व वासना पुरवितो. देवो विसरे देवपणा । अपी वासना भक्तांसी ॥ भक्तदेहीं सदा वसे । धर्म अर्थ अर्पितसे ॥ जे जे भक्ताची वासना । पुरवी आपण त्याचि क्षणा ॥ एकाजनार्दनीं अंकित । उभा तेथेचि तिष्ठत ॥ ८८, भाळ्याभोळ्यांस सुख देऊन देव आपण त्याचे दुःख घेतो. कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहूनि घाली धांवा ॥ नवल वैकुंठीच नसे। तो कीर्तनीं नाचतसे ॥ भाळ्याभोळयांसाठी । धांवे त्यांच्या पाठोपाठीं। आपुले सुख तया द्यावें । दुःख आपण भोगावें ॥ दीनानाथ पतितपावन । एकाजनार्दनीं वचन ॥ ८९. देवावर भार घातला असतां तो निर्धाराने योगक्षेम चालवील. घाली देवावरी भार । आणिक न करी विचार। योगक्षम निर्धार । चालवील तुझा ॥ वाचे गाय नामावळी । वासुदेवीं वाहे टाळी। प्रेमाचे कल्लोळी । नित्यानंदं सर्वथा ॥ सोस घेई कारे वाचे । रामकृष्ण वदतां साचें। धरणे उठते यमाचें । निःसंदेह ॥ १ पापी लोकांना पावन करणारा. २ अप्रप्ताची प्राप्ति यास योग म्हणतात; व प्राप्तवस्तूच्या रक्षणास क्षेम म्हणतात. ३ वाजवणे. ४ छं द. ________________

L a mm -JLLLLLLLLL...


माना

- २०० संतवचनामृत : एकनाथ. [६८९ . र एका जनार्दनीं । करी रामनामध्वनि । कवल्याचा दांनी । रक्षी तुज निर्धारे ॥ ९०. भक्तांचे सर्व दुःख देव निवारण करितो. भक्तालागी अणुमात्र व्यथा। ते न साहवे भगवंता॥ करुनी सर्वांगाचा वोढा । निवारीतसे भक्तपीडा ॥ होउनी भक्ताचा अंकितु । सारथीपणे तो करीतु ॥ प्रल्हादासी दुःख मोठे । होतांची काष्टी प्रगटे ॥ ऐसा अंकित चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं ॥ ९१. दासास जडभारी पडले असतां नानाप्रकारें देव संरक्षणास धांवतो. दासासी संकट पडतां जडभारी । धांवे नानापरी रक्षणार्थ ॥ पडतां संकटी द्रौपदी बहीण । धांवे नारायण लवलाहे ॥ सुदामियांच दरिद्र निवेटिलें। द्वारकेतुल्य दिले ग्राम त्यासी। अंबऋषीसाठी गर्भवास सोशी । परिक्षितीसी रक्षी गर्भामाजी ॥ अर्जुनाचे रथीं होउनी सारथी । उच्छिष्ट भक्षिती गोवळ्याचें ॥ राखितां गोधने मेघ वरुषला । गोवर्धन उचलिला निजबळे ॥ मारुनि कलासुर सोडिले पितर । रक्षिले निर्धारे भक्तजन ॥ एकाजनार्दनीं आपुले म्हणवितां । धांवे हरि सर्वथा तयालागीं ॥ ९२. ज्ञानदेवादिसंतांबद्दल देवानें कोणकोणते चमत्कार केले ? ज्ञानराजासाठी स्वयं भिंत वोढी। विसरूनि प्रौढी थोरपण ॥ तो हा महाराज चंद्रभागेतीरीं । कट धरुनि करीं तिष्ठतसे ॥ १ दान देणारा. २ नाहींसें करणे. - - ________________

२०१ openvirtinia aathi ६९५] देव आणि भक्त. नामदेवासाठी जेवी दहीभात । न पाहे उचित आन दुजें ॥ गोरियाचे घरीं स्वये मडकी घडी। चोखियाची वोढी गुरेढोरे ॥ सांवत्या माळ्यासी खुरपूं लागे अंगें । कबीराचे मार्गे शेले विणा॥ रोहिदासासवें चर्म रंगू लागे । सजनकसायाचे अंगे मांस विकी॥ नरहरि सोनारा धडूं कुंकू लागे । दामाजाचा वेगें पाडेवार ॥ जनाबाईसाठी वेचितसे शेणी । एकाजनार्दनी धन्य महिमा ॥ ९३. सांवता, चोखामेळा इत्यादि संतांचा उल्लेख. खुर्पू लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥ घडी मडके कुंभाराचें। चोखामेळ्याचे ढोर वोढी ॥ सजनकसायाचे विकी मांस । दामाजीचा दास स्वये होय ॥ एकाजनार्दनीं जनीसंगें। दळू कांडूं लागे आपण ॥ ९४. भक्तांच्या अगोदर देव कोठे होता ? आधीं देव पाठी भक्त । ऐसें मागे आले चालत ॥ हेही बोलणेची वावं। भक्ता आधी कैंचा देव॥ भक्त शिरोमणि भावाचा । देव लंपट जाला साचा ॥ भक्तासाठी अवतार । ऐसा आहे निर्धार ॥ वडील भक्त धाकुला देव । एकाजनार्दनीं नाहीं संदेह ।। ९५. " भक्त वडील देव धाकुला." भजन भावाते उपजवी । देव भक्तांत निपजवी ॥ ऐसा भजनेंचि देव केला । भक्त वडिल देव धाकुला ॥ भक्ताकारणे हा संकल्प । भक्त देवाचाहि बाप ॥... । १ महार. २ व्यर्थ. ३ आसक्तं. ________________

२०२ संतवचनामृत : एकनाथ. [६९५ देव भक्ताचिये पोटीं । जाला म्हणोनि आवड मोठो ॥ एकाजनार्दनी नवलावो । भक्तचि कैसा जाला देवो ॥ ९६. जसें सगुणानंतर निर्गुण, तसाच संतानंतर देव. संत आधीं देव मग । हाचि उमग आणा मना ॥ देव निर्गुण संत सगुण । म्हणोनि माहिमान देवासी ॥ नामरूप अचिंत्य जाण । संती सगुण वर्णिले ॥ मुळी अलक्ष लक्षा नये । संती सोय दाविली ॥ एकाजनार्दनीं संत थोर । देव निर्धार धाकुला ॥ ९७. संतांच्या पोटांत देव वसतो; देवाच्या पोटांत संत असतात. संतापोटी देव वसे । देवापोटी संत असे ॥ ऐसा परस्पर मेळा । देव संताचा अंकिला ॥ संताठाई देव तिष्ठे । देव तेथे संत वसे ॥ .. एकाजनार्दनीं संत । देव तयाचा अंकितै ॥ ९८. संतांच्या अंकावर देव वसतो; व देवाच्या अंकावर संत बसतात. संताअंकी देव वसे । देवाअकी संत बैसे ।। ऐशा परस्परे मिळणी । समुद्र तरंग तैसे दोन्ही ॥ हेमअलंकारवत । तैसे देव भक्त भासत । पुष्पी तो परिमळ असे । एकाजनार्दनी देव दिसे ॥ ९९. भक्तांचे चरण चुरावयास देव घांवतो. मिठी घालूनियां भक्तां । म्हणे शिणलेती आतां ॥ धांवे चुरावयाँ चरण । ऐसा लाघवी आपण ॥ १ मार्ग. २ स्वाधीन. ३ सोनें. ४ सुवास. ५ चेपणें, दाबणे. ________________

६१०२] देव आणि भक्त. . २०३ योगियासी भेटी नाहीं। तो आवडीने कवळी बाहीं॥ एकाजनार्दनीं भोळा । भक्तां आलिंगी सांवळा॥ १००. भक्तपणा लहान नाही; भक्ताचे पाय देव हृदयांत बाळगितो. भक्तपणा साने नव्हे रे भाई। भक्ताचे पाय देवाचे हृदयीं। भक्त तोचि देव, भक्त तोचि देव । जाणती हा भाव अनुभवी।। दान सर्वस्वं उदार बळी । त्याचे द्वार राखे सदा वनमाळी ॥ एकाजनार्दनी मिती नाही भावा। देवचि करितोभक्ताची सेवा ॥ . १.१. कृष्णाची निंदा करून, व नारदाचा सन्मान करून कंस सायुज्यास गेला. संतांसी जो निंदी देवासी जो वंदी। तो नर आपदी आपदा पावे॥ देवासी जो निंदी संतांसी जो वंदीं। तो नर गोविंदी सरता होय ॥ कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्यसदनी पदवी पावे ॥... एकाजनार्दनीं गुज सांगें कानी । रहा अनुदिनीं संतसंगे॥ १०२. संताचा महिमा देवासच माहित, देवाची गोडी सतासच माहित. संतांचा महिमा देवचि जाणे । देवाची गोडी संतांसी पुसणे॥ ऐसी आवडी एकमेकां । परस्पर नोहे सुटिका ।। बहुत रंग उदक एक । यापरि देव संत दोन्ही देख ॥ संतांविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥ मागे पुढे न हो कोण्ही । शरण एका जनार्दनीं ॥ १ लहान. २ गणना. ३ दुःख. ४ घटिका. ________________

२०४ संतवचनामृत : एकनाथ. । १०३ १०३. मी तुमचा नोकर आहे असें देव भक्तांस म्हणतो. देव म्हणे भक्तांसी आवडीं। मी झालो तुमचा गडी ॥ सांगाल ते करीन काम । मजवर ठेवा तुमचे प्रेम ॥ भाव मज द्यावा । आणिक मज नाहीं हेवा ॥ आवडीने देव बोले । भक्तांमाजि स्वये खेळे ॥ खेळतां गोपाळी । एकाजनार्दनीं गोकुळीं ॥ १०४. भक्तांचे घरीं देव स्वयमेव उभा असतो. भाग्याचे भाग्य धन्य ते संसारीं । सांठविती हरी हृदयामाजी ॥ धन्य त्यांचे कुळ धन्य त्यांचे कर्म । धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखी संकटीं सुखांत नाम सदा गाय । न विसंबे देवराय एक क्षण ॥ एकाजनार्दनीं धन्य त्यांचे दैव । उभा स्वयमेव देव घरी॥ १०५. मी देह, व भक्त माझा आत्मा, असें देव म्हणतो. बहु बोलाचे नाही कारण । मी देह, भक्त आत्मा जाण ॥ माझा देह शरीर जाण । भक्त आंत पंचप्राण ॥ नांदे सहज भक्त आंत । मी देह, भक्त देहातीत ॥ एकाजनार्दनीं भक्त । देवपणा मी भक्तांकित ॥ १०६. भक्त हेच माझें आराध्यदैवत होत. ऐके उद्धवा प्रेमळा । सांगतो जीवाचा जिव्हाळा । तूं भक्तराज निर्मळा | सुचिते ऐके ॥ मी बैसोनि आसनीं । पूजा करितो निशिदिनीं। ते पूज्य मूर्ति तुजलागुनि । नाहीं ठाउकी उद्धवा ॥ जयाचेनि माते थोरपण । वैकुंठादि हे भूषण । . १ लक्ष लाऊन. ________________

- - - - - - ६१०८] देव आणि भक्त. तयाचे पूजेचे महिमान । एक शिव जाणे ॥ येरां न कळेचि कांहीं । वाउगे पडती प्रवाही। उद्धवा तूं पुशिले पाहीं । म्हणोनि तुज सांगतो॥ माझे जे आराध्यदैवत । ते कोण म्हणसी सत्य । भक्त माझे जीवींचे हेत । जाणती ते ॥ तयांविण मज आवड । नाहीं कोणता पोवार्ड । माझा भक्त मज वरपड । काया वाचा मनेसी॥ माझे विश्रांतीचे स्थान । माझे भक्त सुखनिधान ।। कायावाचामन । मी विकिलो तयांसी ॥ ते हे भक्त परियेसी । उद्धवा सांगे हृषिकेशी। एकाजनार्दनी सर्वीसी। तेचि वदतसे ॥ १०७. माझा शरणागत केविलवाणा दिसेल तर ती लाज कोणास ? माझा शरणागत दिसे केविलवाणाही तो लाज जाणा माझीमज ॥ एकविध भावे आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचे॥ समर्थाचेमुला काय खावयाची चिंतातैसें मी त्या तत्वतांन विसंबे॥ एकाजनार्दनी हा माझा नेम । आणिक नाहीं वर्म भावेविण ॥ ____१०८. तुमचे बोल वायां गेले तर माझें जीवित घेऊन काय करावयाचे ? तुमचे अप्रमाण होतां बोल। मग फोल जीवित्व माझे॥ कासया वागवू सुदर्शन । नाहीं कारण गदेचें ॥ तुमचा बोल व्हावा निको । हेचि देखा मज प्रिय ॥ . . मज या उणेपण.। तुमचे थोरपण प्रकाशू द्या ॥ एकाजनार्दनी देव । स्वयमेव बोलती॥ १ कार्य. २ स्वाधीन. ३ दीन. ४ व्यर्थ. ५ खरा. ________________

. २०६ संतवचनामृत : एकनाथ. [६१०९ १०९. जे कायावाचामनाने मला अनुसरतात त्यांचे मी ऋणवैपण पत्करतो. मज जे अनुसरले काया वाचा मनें । त्यांचे चालवणे सर्व मज ॥ ऋणवई त्यांचा अनंत जन्मांचा ।जे गाती वाचा कीर्ति माझी ॥ तयांचिया द्वारी लक्ष्मीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणे ॥ सर्व जडभारी जाणे योगक्षम । एकाजनार्दनी नेम जाणा माझा॥ ११०, त्याच्या द्वारांत तिष्ठत राहून त्याचे व्यंग मी पडू देत नाही. मजसी जेणे विकिले शरीर । जाणे मी निर्धार अंकित त्याचा ॥ त्याचे सर्व काम करीन मी अंग । पडो नेदी व्यंगे सहसा कोठे॥ एकाजनार्दनी त्याचा मी अंकित । राहे पैं तिष्ठत त्याचे द्वारीं ॥ १११. धर्माची वाट मोडून अधर्माची सीग चढते तेव्हां आम्हांस जन्म घ्यावा लागतो. धर्माची वाट मोडे । अधर्मा बी शीग चढे । तैं आम्हां येणे घडे । संसारीस्थति ॥ आम्हां का संसारा येणे । हरिभक्ति नामस्मरणे । जडजीव उद्धरणे । नामस्मरण करूनि ॥ सर्वकर्म ब्रह्मस्थिति । प्रतिपादाव्या वेदोक्ति । हचि एक निश्चिती करणे आम्हां।। नाना मते पाषांड। कर्मठता अति बंड। तयाचे ठेचणे तोंड । हरिभजने ॥ विश्वरूप सृष्टि । अर्जुना दाविली दृष्टी । भित्रभेदाची गोष्टी । बोलूं नये ॥ १ कर्जदार. २ संकट. ३कमान,माप भरल्यावर मग आणखी ढीग करतात तो. ४ नास्तिक मत. ________________

६११४] साक्षात्कार. २०७ एकाजनार्दनीं । धरिती भेद मनीं ॥ दुहावले येथुनी । निंदक जाण ॥ ११२. तुम्हीं सडासंमार्जन करून गंध उगाळलेत हा मजकडून मोठा अपराध झाला. तुम्हीं कृपालु जी देवा । केली सेवा आवडी॥ करुनि सडासंमार्जन । पाढिले वचन प्रमाण ॥ उगाळूनि गंध पुरविले । सोहोळे केले दासांचे ॥ ऐसा अपराधी पतित । एकाजनार्दनीं म्हणत ॥ ११३. संतसंगतीनें माझें कार्य झाले. संतसंगतीने झाले माझे काज । अंतरीं तें निज प्रगटले ॥ बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रम । दैन्यदरिद्र दूर गेले । संतपाउले देखतां ॥ . . एकाजनार्दनीं सेवा । करीन मी आपुल्या भावा ॥ ६. साक्षात्कार. ११४, अष्टसात्त्विकभाव उत्पन्न होतांच देव कृपा करतो. सात्त्विका भरणे रोमासी दाटणे । स्वेदाचे जीवन येऊ लागे॥ कांपे तो थरारी स्वरूप देखे नेत्रीं। अश्रु त्या भीतरी वाहताती ॥ आनंद होय पोटीं स्तब्ध जाला कंठीं। मौन्य वाक्पुटी धरुनि राहे ॥ १ दूर झाले. २ स्वरूप. ३ भरती. ४ अंगावरील केस. ५ घाम.. ________________

Tala २०८ संतवचनामृत : एकनाथ. [६११४ टाकी श्वासोच्छास अश्रुभाव देखा । जिरवुनी एका स्वरूप होय ॥ एकाजनार्दनीं ऐसे अष्टभाव । उत्पन्न होतां देव कृपा करी ॥ ११५, कानावाटे मी नयनास येऊन शेवटी नयनाचा नयन झालो. कानावाटे मी नयनासी आलो शेखी नयनाचानयन मी जाहालो। दृष्टिद्वारा मी पाहे सृष्टी । सृष्टि हारपली माझे पोटीं॥ ऐसे जनार्दने मज केलें । माझे चित्ताचे जीवपण नेले ॥ एकाजनार्दनीं जाणोनि भोळा । माझा सर्वांग जाहला डोळा ॥ ११६. एकाजनार्दनी सर्वांग डोळा बनतो. चक्षुदर्पणी जग हे पाहा । जगजीवनी मुरुनी रहा । तुर्या कालिंदीतीर्थी नाहा । पापपुण्यासी तिळांजुलि वहा ॥ डोळ्यांना सत्य गुरुची खूण | आपुलें स्वरूप घ्या ओळखून ॥ध्रु.॥ तिही अवस्था सांडुनि मागे।अर्धचंद्राच्या चांदण्यांत वागे । चांदणे ग्रासुनि त्या ठायीं जागे । गड उन्मनी झडकरी वेगें। एवढे ब्रह्मांडफळ ज्या देहीं। ते आटले देखण्याचे पोटी। त्याली पहातां पाठी ना पोटी। मीतूंपणाची पडली तुटी॥ चहूंशून्याचा निरसी जेणे । शून्य नाही ते शून्यपणे। शून्यातीताचे स्वयंभ होणे। शून्य गाळूनि निरशून्यपणे ॥ चार सहा दहा बारा सोळा। ह्या तो आटल्या देखण्याच्या कळा। कळातीत स्वयंभ निराळा । एकाजनार्दनी सर्वांग डोळा ।। १ डोळा. २ आरसा. ३ चवथी अवस्था. ४ स्नान करणे. ५ वियोग, ६ अत्यंत शून्य.. --________________

$ १२०] . साक्षात्कार. २०१ ११७. डोळ्याचा डोळा उघडा पाहिल्यावर जन्ममरणास पुनः .. येणार नाही अशी खात्री पटली.. जन्ममरणाचे तुटले सांकडे । कैवल्य रोकडे उभे असे ॥ डोळियाचा डोळा उघड दाविला। संदेह फिटला उरी नुरे॥ एकाजनार्दनीं संशयचि नाहीं। जन्ममरण देही पुन्हां न ये॥ ११८. चिन्मय आत्मज्योत पाहून एकाजनार्दनाची भ्रांति निरसली. त्रिभुवनींचा दीपप्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दन ॥ दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीपदेही दिसे॥ चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योति। एकाजनार्दनींभ्रांति निरसली॥ ११९. एकाजनार्दनास सर्वत्र पहाट होऊन अवघा लखलखाट झाला आहे. पाहले रे मना पाहले रे। बुद्धिबोधे इंद्रिया सम जाले रे ॥ नयनी पहातां न दिसे बिंब । अवघा प्रकाश स्वयंभ ॥ एकाजनार्दनीं पहांट । जनीं वनीं अवनी लखलखाट ॥ १२०. जिकडे पाहे तिकडे बोधभानूचा उदय होऊन अस्त मानाचे आडनावही उरले नाही. बोधभानु तया नाही माध्यान्ह । सायंप्रात ही तेथे कैंचा अस्तमान॥ १ संकट, २ मूर्तिमंत. ३ बाकी. ४ ज्योतिरूप. ५ उजाडलें. ६ पृथ्वी. सं...१४ ________________

२१० संतवचनामृत : एकनाथ. [६१२. कर्मचि खुंटले करणोंच हारपलें । अस्तमान गेले अस्तमाना ॥ जिकडे पाहे तिकडे उदयोचि दिसे । पूर्वपश्चिम तेथे कैंचाभासे ॥ एकाजनार्दनीं नित्य प्रकाशा । कर्माकर्म जाले दिवसा वंद्र जैसा॥ १२१. एकनाथाने गंगेंत बुडी दिल्याबरोबर जळांत चिन्मयस्वरूप ____दिसल्याने गंगा पावन झाली. जळ स्पर्णी जातां स्नानी । तंव चिन्मात्र भासे जीवनी ॥ कैसी वाहताहे गंगा। मानी हारपले अंगा॥ अंगत्व मुकले अंगा। स्नानी सोवळी जाली गंगा ॥ एकाजनार्दनी मज्जन । सकळ तीर्थं जाली पावन ॥ . ।१२२. स्वयंप्रकाशांत स्नान करून एकभावाने सर्व भूतांस नमन ___ करणे हीच संध्या. स्वयंप्रकाशामाजी केले असें स्नान।द्वैतार्थ त्यागून निर्मळ जाहलों॥ सुविद्येचे वस्त्र गुंडोनि बैसलो। भूतदया ल्यालो विभूति अंगीं ॥ संसारासी तीन वोजळी घातले पाणी। आत्मत्वालागुनि अध्य दिले एका भावे नमन भूतां एकपणीं । एकाजनार्दनीं संध्या जाहली ॥ १२३. एकनाथाची संध्या होऊन त्याचा संदेह गेला. झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं शेजे आला ॥ गुरुकृपा निर्मळ भागीरथी। शांति क्षमा यमुना सरस्वती। असीं पदे एकत्र जेथे होती । स्वानुभव नान हे मुक्त स्थिति ॥ सद्बुद्धीचे घालूनि शुद्धासन । वरी सद्गुरुची दया परिपूर्ण । शमदम विभूति चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केशव नारायण ॥ १ स्नान, बुडी. २ अंथरूण. ३ स्थाने. TI -- - -- - - - - - ________________

६१२६] साक्षात्कार. २११ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां। ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां भक्ति बहीण धाउनि आली गांवा।आतां संध्या करूं मी कैशी केव्हां। सहज कमैं झाली ती ब्रह्मार्पण । जन नोहे अवघा हा जनार्दन । ऐसे ऐकतां निवती साधुजन । एकाजनार्दनीं बाणली निजखूण ॥ १२४. एकनाथाची घनगर्जना ऐकल्याबरोबर जनार्दनसागरास पूर आला. वेणुनादाचिया किळी । पान्हा फुटला निराळा ।। आर्तभूत जीव तिन्ही । चातक निवाले जीवनी ॥ स्वानुभवाचे सरिते । जेविं जीवना दाटे भरते ॥ एका एक गर्जे घनीं। पूर आला जनार्दनीं ॥ १२५. देव विटाळेंवीण पोटा आला. विटाविण पोटा आला । अवघा संसार मिधा केला ॥ लग्न लागतां आला पोटा। मग सोडिले अंतरपटा, वोकारेसी बुडाली घेडी । लग्न लाविले औटावे घडर्डी । एकाजनार्दनी लग्न समरसे । पाहीं गेलिया त्या लाविले पिसे। १२६. चतुर्भुजरूपाचे दर्शन होऊन संसाराचा ठाव पुसतो. चतुर्भुज श्याममूर्ति । शंख चक्र ते शोभती। पीतांबर वैजयंती। रुळती गळां ॥ देव देखिला देखिला । तेणे संसाराचा ठावो पुशिला। विदेही तो भेटला । भक्त तयाते ॥ १ किरण. २ नदी. ३ पाणी. ४ आधीन. ५ घटका. ६ वेड. ७ रत्नांची माळ, ________________

२१२ संतवचनामृत : एकनाथ. [६१२६ दोघां होतांचि मिळणी । नुरे देव भक्तपणीं। फिटली आयणी । सर्व कोड कठीण ॥ छंद पाहिजे नामाचा । निश्चयो कायामने वाचा । एकाजनार्दनी त्याचा । देव होय अंकित ॥ १२७. चतुर्भुज देवास हृदयांतच पाहिल्याने एकनाथाचा संशय फिटला. सायासाचे बळ । ते आजि जाहले अनुकूळ ॥ धन्य जाहलें धन्य जाहले । देवा देखिले हृदयीं ॥ एकाजनार्दनीं संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ॥ १२८, ध्यानी, मी, शयनी एकनाथास देवाचे दर्शन. एक धरलिया भाव । आपणचि होय देव ॥ नको आणिक सायास । जाय जिकडे देव भासे भ्यानी मनी शयनी । देव पाहे जनीं वनीं ॥ अवलोकी जिकडे । एकाजनार्दनी देव तिकडे ॥ .. १२९. "जागत राम सोवत राम." गुरुकृपांजन पायो मेरे भाई । रामबिना कछु जानत नाहीं ॥ अंदर राम भीतर राम । ज्या देखो व्हां रामही राम ॥ जागत राम सोवतै राम । सपनोंमे दे तो रामही राम ॥ एकाजनार्दनीं भावही निका । जो देखो सो राम सरीका ॥ १ त्रास, क्लेश. २ लेहणे, घालणे. ३कांहीं. ४ आंत. पनिजले असता. स्वप्नांत. TEETHTT ________________

६ १३३] साक्षात्कार. २१३ १३०, विठ्ठलावांचून रिता ठाव आता उरला नाही. मागे पुढे विठ्ठल भरला । रिता ठाव नाही उरला ॥ जिकडे पहावे तिकडे आहे । दिशाद्रुम भरला पाहे ॥ एकाजनार्दनीं सर्वदेशी । विठ्ठल व्यापक निश्चयेशीं ॥ १३१. देवाचा कसा नवलावो पहा की जिकडे पाहीन तिकडे देवच दिसतो. पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो । पहाणे परतले देवे नवल केले । सर्वही व्यापिले काय पाहो ॥ पहाणियाचा ठाव समूळ फिटला । अवघा देही दाटला देव माझ्या ॥ एकाजनार्दनी कैसे नवल जाहले । दिशादुम दाटले देहें सहजीं ॥ १३२. जेथे तेथे देव उघडाच दिसत असल्याने निलाजरासा वाटतो. देवासी कांही नेसणे नसे । जेथे तेथे देव उघडाचि दिसे ॥ देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पहा तुम्हीं॥ न लाजे जेथें नाहीं गांव । पांढरा डुकर झाला देव ॥ एकाजनार्दनीं एकल्या काज । भाक्ति तेणेचि नेली लाज ॥ १३३. देवास नेऊन बाहेर धातले तरी तो परतून घरांमध्ये येतो. वैष्णवा घरी देव सुखावला । बाहेरी नवजे दवंडोनि घातिला ॥ देव म्हणे माझे पुरतसे कोड । संगती गोड या वैष्णवांची ॥ १ रिकामा. २ वृक्ष. ३ गच्च भरणे. ४ जात नाही. ५ हांकलणे. ________________

२१४ संतवचनामृत : एकनाथ. [६१३३ जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनि पाहे तंव घराभीतरीं ॥ कीर्तनाची देवा आवडी मोठी । एकाजनार्दनीं पडली मिठी ॥ १३४. घर सोडून परदेशास गेलो असतां कड्याकपाटांवर _ श्रीहरि दिसून माझा एकांत नाहीसा झाला. घर सोडोनि जावे परदेशा । मजसवें देव सरिसा ॥ कडेकपाटेंसी वरी। जिकडे पाहे तिकडे हरी ॥ आतां कोणीकडे जावे। जिकडे पाहे तिकडे देव ।।. एका बैसला निरंजनी । न जाइजे जनीं वनीं ।। - १३५, अंतरी बाहेरी एकमय होऊन गेले. जिकडे जावे तिकडे देवचि सांगाते । ऐसे केले नाथे पंढरीच्या॥ शब्द तेथे जाला समूळचि वाव । गेला देहभाव हारपोनि॥ अंतरी बाहेरी एकमय जाहले । अवघे कोदाटले परब्रह्म ॥ एकाजनार्दनीं ऐसी जाहली वृत्ति । वृत्तीची निवृत्ति चिदानंदी ॥ . १३६, मन रामांत रंगून रामरूपच होऊन गेले. मन रामी रंगले अवघे मनचि राम झालें। सबाह्य अभ्यंतरी अवघे रामरूप कोंदले ॥ध्रु॥ चित्तचि हारपले अवघे चैतन्याच झाले । देखतां देखतां अवघे विश्व मावळले। पहातां पहातां अवधै सर्वस्व ठकले ॥१॥ १ गुहा. २ देव. ३ व्यर्थ. ४ भरलें. ________________

११३८] साक्षात्कार. २१५ आत्मयारामाचे ध्यान लागले मज कैसे। क्रियाकर्म धर्म अवघे येणेचि प्रकाशे। सत्य मिथ्या प्रकृति-पर रामचि अवघा भासे ॥२॥ भक्ति अथवा ज्ञान शांति आणिक योग स्थिति । निर्धारितां न कळे रामस्वरूपी जडली प्रीति । एकाजनार्दनी अवघा रामचि आदिअंतीं ॥३॥ १३७. एकनाथाची स्वराज्यप्राप्ति. हरिखाची गुढी बोधावा आला। अहंकार गर्जतु अविवेकुमारिला ॥ संतोष विवेक आपआपणिया विसरला। लाजुनी महा हारुष आनंदासी गेला ॥ मारविला क्रोध ममता सती निघाली। तुटला मत्सर शांति सुखें सुखावली ॥ एकाजनार्दनीं पाहतां सहजी पैं सहजे । स्वराज्य सौग तेथें नाहीं पैं दुजे ॥ m १३८. आम्ही मरून जिवावांचून जिवंत राहिलो. देह जाईल तरी जावो राहील तरी राहो। दोराचियां सर्पा जिणे मरण ना वावो ॥ आम्ही जितांचि मेलों जितांचि मेलों। मरोनियां जालो जीवेविण ॥ मृगजळाचे जळ भरले असतां नाहीं। १ बोध, २ संपूर्ण. ३ जगणे. ________________

[६१३८ संतवचनामृत : एकनाथ. आटलिया तेथे कोरडे होईल काई ॥ एकाजनार्दनीं जगचि जनार्दन । जिणे मरणे तेथे सहज चैतन्यधन ॥ १३९, आता आम्हांस अवधैं त्रैलोक्यच आनंदाचे झाले आहे. अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आतां । चरणी जगन्नाथा चित्त ठेले ।। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथाचा नाथ जनार्दन ॥ एकाजनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभलीसे ॥ १४०. एकाजनार्दनापुढे देव स्वयमेव उभा असल्याने देवभक्त . ही भाषा निरसून गेली. अभेद भजनाचा हरिख । देव भक्त जाहले एक ॥ कोठे न दिसे भेववाणी । अवघी कहाणी बुडाली। हारपले देवभक्तपण | जनी जाहला जनार्दन ॥ देव भक्त नाहीं मात । मुळीच खुंटला शब्दार्थ ॥ एकाजनार्दनी देव । पुढे उभा स्वयमेव ॥ १४१. डोळे भरून परब्रह्माच्या सुखाचा सोहळा मी पाहिला. माझे मीपण देहींच मुराले । प्रत्यक्ष देखिले परब्रह्म ॥ परब्रह्म सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरुनी ॥ १ आनंद. २ कथा. ३ नाहीसे झाले. । TTTER - - ________________

२१७ ६ १४४ साक्षात्कार. ब्रह्मज्ञानाची ते उघडली पेटी । जाहले पोटी शीतळ जाणा ॥ एकाजनार्दनी ज्ञानाचे ते ज्ञान । उघड समाधान जाहले जीवा ॥ . १४२. एकानेक जनार्दनाच्या ठायीं एका एकपणे जडून गेला. पाहों गेलो देवालागीं । देवरूप जालों अंगीं ॥ आतां मीतूपणा ठाव । उरला नाही अवघा देव ॥ सुवर्णाची झाली लेणीं। देव झाला जगपणीं ॥ घटीं मृत्तिका वर्तत । जगी देव तैसा व्याप्त ॥ एकानेक जनार्दनीं । एका जडला एकपणे ॥ १४३. आता मी पूजा करूं गेल्यास माझी मीच सेवा केल्याप्रमाणे होईल. देवपूजे ठेवितां भावो । तो स्वयेंचि जाला देवो॥ आतां कैसेनि पूजू देवा । माझी मज होतसे सेवा ॥ . अत्र गंध धूप दीप । तेही माझंचि स्वरूप ॥ एकाजनार्दनीं करी पूजा । तेथे पूज्य पूजकु नाही दुजा ॥ १४४. जोपर्यंत आपली आपण पूजा करण्याची राहाटी नाही ___ तोपर्यंत आपली पूजा करणाऱ्यापेक्षां अज्ञान बरा. आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहाटी नाहीं॥ कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ॥ एकाजनार्दनी ज्ञानाशाने । पूजावे श्रीचरण विठोबाचे ॥ १ अत्तर. २ व्यवहार. ________________

२१८ संतवचनामृत : एकनाथ. [ ६१४५ १४५. अहं ब्रह्मास्मि. मी तो स्वये परब्रह्म । मीचि स्वयें आत्माराम ॥ मी तो असें निरुपाधि । मज नाहों आधिव्याधि । मी तो एकट एकला। द्वैतभाव मावळला ॥ मजविण नाही कोणी । एका शरण जनार्दनीं॥ १४६. " कोहं ओह सोहं " पलीकडचा बोध. नामपाठे निवृत्ति ज्ञानदेवा उपदेशी । ओहं सोहं कोहं साक्षी केले॥ तिन्हीपरता बोध तयासि बोधिला । नामपाठे झाला शांतरूप ॥ जनार्दनाचा एका गमोनि मनासी । लागतो चरणांसी जनार्दना ॥ १४७. जें जें दृष्टीस दिखें तें तें ब्रह्मरूप आहे. कैवल्यनिधान तुम्हीं संतजन । कायावाचा मन जडले पायीं ॥: सर्वभावे दास अंकित अंकिला । पूर्णपणे जाहला बोध देहीं । जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मरूप । एकाजनार्दनीं दीप प्रज्वाळिला॥ १४८. सर्वं खल्विदं ब्रह्म । मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥ हीच उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती ॥ मीच गंध मीच अक्षता । मीच वाहे मीच पुती ॥ मीच धूप मीच दीप । मी माझे देखे स्वरूप ॥ मीच माझी करी पूजा । एकाजनार्दनीं नाहीं दुजा॥ १ चिंता, व शारीरिक रोग. २ मोक्षाचा ठेवा. ३ साहित्य. ________________

$ १५०] साक्षात्कार. . २१९ १४९, अष्टही दिशांस देव परिपूर्ण भरल्याने पूर्वपश्चिमभाव उरला नाहीं. अष्टही दिशा पूर्ण भरला देव । मा पूर्व पश्चिम भाव तेथे कैचा ॥ पाहे तिकडे देव व्यापुनि भरला । रिता ठाँव उरला कोठे नाहीं ॥ समाधि समाधान मनाचे उन्मन । मीदेवा भिन्नपण नाहीं नाहीं॥ एकाजनार्दनीं एकपणासाठी। देव पाठी पोटीं भक्तामागे ॥ १५०. उत्तम भूमि शोधून गुरुवचनबोज पेरिल्यावर आलेल्या अनंत पिकाची गणती करणारा कोण ? भूमि शोधोनि साधिले काज । गुरुवचन बीज पेरियेले ॥ कैसे पीक पिकले प्रेमाचें । साठवितां गगन टोचे ॥ सहा चारी शिणले मापारी । सकळ नव्हे अद्याप वरी ॥ एकाजनार्दनीं निजभाव । देही पिकला अवघा देव ॥ १ मग. २ लहान. ३ सहा शास्त्रं. ४ चार वेद. ५ मोजणारा. ६ संपूर्ण, ________________

अनुभवाच्या गांवीं अनंत ब्रह्मांडे अपशब्द कानी आदिनाथ उमा आम्ही किरण आम्ही चकोर उन्मनी अवस्था अंधारिये राती कमळाच्या स्कंधी कल्पना को डूनि गगनी अभ्र चाले गगनी वोळलें गोविली चरणी चंदनाचे झाड जेथें पाहे तेथे ज्याचे मुखी नाम तंत आणि वितंत त्रैलोक्यपावन दिननिशी नाही दिहाची दिवटी दीपाची कळिका देहाच्या दीपकी संतवचनामृत अभंगसूचि * निवृत्तिनाथ पृष्ठ. ५/देही देव आहे १४ धन्य हा खचर ६ न जाणती कळा नाम मुखीं सदा १२ नाही जनी विजनी १२ निरशून्य गगनी १४ परापवाद कानी परेसि परता भरतें ना रितें म्हणवितो नंदाचा विकट विकास १३ सजीव साजिरी सप्त पाताळें एकवीस सर्व परिपूर्ण सर्व भूती दया सर्वा घटी बसे सुमनाची लता सोपान संवगडा १४ संसारभ्रमें भ्रमले १२ हरिदाससंगें हरिरूप ६ हरीविण न दिसे ________________

HTTERT अभंगसूचि. Aur ज्ञानदेव पृष्ठ. अखंड तमासा अगाधपण माझे अंगी अधिक देखणे अनुपम्य तेजें अमालिक रत्न अरे मना तूं आजि देखिलें रे आठवितां न पुरे मात्मज्ञान जया उन्मनीसंयोगें उपजोनि संसारी एकतत्त्व नाम ऐका हा शेवट औटपीठावरी अंडज जारज अध पंगु दृढ नालों काचिया रेखा कानी घालूनियां कां सांडिसी गृहाश्रम काळवेळ नाम काळा पुरुष तो काळा लपंडाई कैसे बोटाने दाखवू कोठिची भरोवरी गुनगुजित रूप गुरु हा संतकुळींचा ३७ घनु वाजे ४३ चचळ चांदिणे ५४ चहूं वेदी जाण ४६ चहूं शून्या आरुतें ४१ चातकेंविण लक्ष २० चैतन्य चोरुनी ४७ जपतप कर्म ३८ जन्म जन्मांतरी ५७ जागृति पुसे ४४ जाणीव नेणीव १७ जाणों गेलें तंव २८ डोळांची पहा डोळा ५८ डोळीयांत डोळा ५० तीर्थ वत नेम २५ तुजपासाव जन्मलों ३५ तुझी गुणकीर्ति २६ तुझीय निडळी ४६ तूं तो माझें २१ तूं माझा स्वामी २७ त्रिवेणीसंगमीं ३९ देखिले तुमचे चरण ३९ / देवाचिये द्वारी ४० देऊनियां भेटी ५६ दुधावरिली साय ४० धांवत धांवत आलों २१ नभ नभाचेनि सळे ________________

२२२ संतवचनामृत. PurururuPurunmun - - -- २४ नाम प्रल्हाद नासिकेचा प्राण 'नित्यनेम नार्मी निळे हे व्योम निरंजनवना गेलिये निशियेचे भरी निशीदिवस दोघे नीळवर्ण रजें भडिलें दूरदेशी परिमळाची धांव पावलों जी म्हणे पाहाणेचि पाहासि पाहे पां ध्वजेचें पूर्वजन्मी सुकृतें भावेंवीण भाक्त भेटिसी गेलिये मजमाजी पाहतां मन मुरडोनि मन मुरे मग मलयानिल शीतळु महावाक्यार्थ तें कैसे माझे जीवींची योगयागविधि योगियां दुर्लभ रात्रीदिवस वाहातसे रूप पाहता लोचनी रूम सामावले २५ विश्वरूप पाहे ४६ शरीर वरि वरि शर्करेची गोडी ३९ शून्य शोधिलें नाहीं ५५ शून्याच भुवनी ४५ श्रवण घ्राण रसना ५० श्री गुरु देवराया ४०. श्रीगुरुसारिखा असतां ३२ सकळ नेणोनियां ३२ सकळ मंगळनिधी ५२ सर्वसुखगोडी ९° सहस्रदल बिंदू ३१ सहस्रदळ ब्रह्मरंध्र २० सात पांच तीन साधुबोध झाला ५३ सार सार सार विठोबा ५४ सुख सोज्वल ३७ सुखाचा निधि ५६ सुढाळ ढाळाचें ५३ संत भेटती आणि ४४ संतांचे संगती ४९ संसारयात्रा भरली स्वरूपाचे ध्यानीं .३३ स्वरूपाचेंनि भाने १६ स्वर्ग जयाची साळोखा ४७ हारिउच्चारणी ________________

अभंगसूचि. २२३ HALALPULAULA पृष्ठ. सोपानदेव पृष्ठ. ५९ मनाचे मवाळ ६० सागरीचें तोय आवडीचे मागे चलारे वैष्णवही पृथ्वी सोवळी मुक्ताबाई TETTTTTTA अहंकार श्रीवद्या आपुलियां मारूनि उलट उलट ऊर्णाचियां गळां गुणातीत डाहाळी देउळाच्या कळशी ६ आकाश कवळिलें आत्मा हा नोवरा कुडी हे नोवरी चांगा जन्मला डोळे पैं दोंदील ६३ नाममंत्रे हरि ६४ नोवरीचे पोटी ६३ | प्रारब्ध संचित ६१ मुंगी उडाली ६४ वेदश्रुति ठक ६२ सहस्रदळी हरि चांगदेव ६६ पाहूं गेलें तंव ६६ प्रकृतीचे पूजन ..६५ यंत्राची युक्ति ६५/ व-हाडी आले ६६) सत्रावी दोहतां नामदेव ९७/ अमृताहूनि गोड ७९ असत्याचे मळ ७५ आकल्प आयुष्य व्हावें ७६ आगमीं नाम १०२ आणिक न मागे अग्नि जाळी तरी अग्निमाजी पडे अनाथ अनाथ अपत्याचे हित अभ्यासिले वेद । ________________

૨૨૪ संतवचनामृत. पृष्ठ. १२९ १२८ १२६ १२९ १०८ पृष्ठ. ११८ कोटिसूर्य प्रभादीप्ति १२४ कोटी दिवाळ्या ११६ गूळ गोड न लगे ११८ गोरा बोलाविला ८८ गोक्षीर लाविलें ९० घालीन लोटांगण ८८ घे रे घे रे नाम्या १२७ घेसी तेव्हां देसी चेइला तो जाणरे चोरां आढोनियां ९४ चौदाशें वरुणे १२६ चंद्रसूर्यादि बिबें १०६ जन्मजन्मांतरी असेल जन्मोजन्मी आम्ही जयांचेनि तीर्था जव्हारियापुढे मांडियेलें जैसा वृक्ष नेणे ज्याचिया रे मने डोई बोडून केली डोळे शिणले पाहता तान्हेलों भुकेलों तापत्रयअमीची १२८ तुझा माझा देवा ७१॥ तुझ नित्य सुख १०७ तुझे प्रेम माझे ८३ तुझें रूप माझ्या आतां आहे नाहीं आपली पदवी सेवकासी आह्मां वैष्णवांचा कुळधर्म आह्मी परीट चोखट आह्मी शरणागत परि आह्मी शरणागती केलासे आह्मी शरणागती सांडिली आंधळ्याने स्वरूप उदाराचा राणा उलिसा प्रपंच एकतत्त्व हरि एकवेळ नयनी ऐका कलियुगींचा आचार अंतकाळी मी परदेशी कडु वृंदावन कपटाचें कुपथ्य करितां वेदाध्ययन कागदीच वित्त काय गुणदोष काय पांडुरंगा काया रूप जिचें काळ देहासी काळवेळ नसे ... कीर्तनाच्या सुखें कुश्चळ भूमिवरी कृष्ण सहाय पांडबांसी केधवां भेटसी १२३ ११९ ७२ १२० . . . ________________

अभंगसूचि २२५ POL - - तुझ्या चरणाचे १०९ - १०७ तुवां येथे यावें तेंचि थापटणे ज्ञानेश्वरावर तोवरि रे तोंवरि वैराग्याचे त्यागेंवीण विरक्ति दुर्लभ नरदेह झाला तुह्मा देव दगडाचा भक्त . देवा माझें मन देवावरी पाय ठेवूनि देहमंदिरा भीतरी देह जावो अथवा राहो देह जावो हेचि घडी देहाचें ममत्व धरी रे मना तूं धिग धिग् तो ग्राम धेनु विये वनी न पुसतां संतां न लगे तुझी मुक्ति नव्हे तच कैसे नाम तेंचि रूप नामयाचे प्रेम नामाचा महिमा नामें सदा शुद्धि निद्रिस्ताचे सेजे निंदील हे जन परब्रह्मींची गोडी सं...१५ पृष्ठ. | परियसि वासने ११३ | परिसाचेनि संगें १२० ७२ पक्षिणी प्रभाती ११३ पापाचे संचित ११४ पाषाणाचा देव ११८ पुंडलिके रचिली पेठ १.१ पोर्टी अहंतेसी ठाव १०९ १०० पृथ्वी ध्यासी तरी १०१ प्रीति नाही रायें १३० प्रेमफांसा घालुनियां गळां ९९ | बहुत दिवस तुमचे गांवीं ८१ ९४ | बहुरूप्या ब्राह्मणा १११ बेडूक ह्मणजे चिखलाचा . १०३ १०० | बोलू ऐसे बोल ११९ ब्रह्ममूर्ति संत ११७ १२५ ब्राह्मणां न कळे १०१ ७३ भक्तिप्रता पावलों १०२ भक्तीविण मोक्ष १२१ १२४ भुजंग विखार ९८ भेटीचे आर्त १३० | मज चालतां आयुष्यपंथें ९५ मन झाले उन्मन ९८. मनें ध्यान करणे . १२७ १०८ | मंत्रतंत्रदीक्षा १२१ ११६ माझें जन्मपत्र १०५ ( माझे मनीं ऐसे ९९ ११० ८३ १२७ ________________

२२६ संतवचनामृत पृष्ठ. १०४ ७४ १०४ ११५ १२७ ११४ १४१ ११९ ११७ - १२० पृष्ठ. माझे मनोरथ पूर्ण ७५ श्रीहरि श्रीहरि ऐसे मांजरें केली एकादशी १११ सद्गुरुसारिखा सोइरा. . मुखी नाम हाती १२२ सांगसानिरी येई वो कृपावंते ७८ सर्वांभूती पाहे रवि रश्मि धरोनि स्वर्गी १२२ सहस्रदळांमधून लटिङ तरी गायें ८४ सांवळी श्रीमति लपलासी तरी ९९ सुवर्ण आणि परिमळ लावण्य सुंदर ११२ | संग खोटा परनारीचा पारंवार काय | संतपायीं माया वावडी दुरीच्या दुरी १०६ | संतसमागम फळला रे वासरूं भोंवे ८४ | संताचे लक्षण विठ्ठलाचें नाम जे माउलीचे | संतांच्या चरणा विणा घेउनियां करी १०३ संसार करिता देव में सांपडे वीतभर पोट १०६ | संसारसागर भरला वेदपरायण मनी ९६ संसारसागरी पडलों वेदाध्ययन करिसी १०० । संसाराची सोय शिव हालाहले तापला - ९५ | हडपडली पात शेती बोज नेता थोडे ९७ हाती वीणा मुखी हरी . गोरा कुंभार अंतरीचें गुज १३१ / निर्गुणाचे भेटी कवण स्तुति करूं १३२ मुकिया साखर केशवाचे भेटी लागले १३१ स्थूल होतें तेंचि विसोबा खेचर जरी म्हणसी देव १३३ | तुझें निजसुख जळ स्थळ काष्ठ १३४ पर्वतप्राय पापराशि १०५ १०५ . ८१ २४. १२८ १०३ १३१ १३२ १३१ ________________

अभंगसूचि ऐकावे विठ्ठल धुरे कां बा रुसलासी नामाचिया बळें १३५ १३६ १३५ १३८ - - अनुहात ध्वनि करित ऐरावती बहु थोर चिताया चितरें काढी ऊस डोंगा परी ऐसा पुत्र दे टाळी वाजवावी देही देखिली सावता माळी पृष्ठ. . १३५ भली केली हीन १३५ विकासिले नयन १३६ । समयासी सादर नरहरि सोनार १३८ | देवा तुझा मी १३७ नाम फुकाचें १३७ चोखामेळा १४० | धांव घाली १४० | येई येई गरुडध्वजा १४० विठोबा पाहुणा १३९/ हीन याति माझी जनाबाई १४४ देहभाव सर्व जाय १४२ द्रौपदीकारणे पाठीराखा १५० धरिला पंढरीचा १४४ धुणे घेऊनी . १४९ नवल वर्तलें १४६ नाम विठोबाचें १५० नित्य हाताने १४९ नोवरिया संगें १४८ पतंग सुखावला - १४१ १३९ १४९ अरे विठ्या आक्रोशें ध्यानासी आम्ही आणि संत गंगा गेली सिंधुपाशी चोखामेळा संत जोत पहा झमकली ज्याचा सखा हरी झाडलोट करी देव खाते १४५ १४९ १४७ १४४ १४७ १४५ १४२ ________________

२२८ संतवचनामृत पृष्ठ. १४२ १४८ पक्षी जाय दिगंतरा भक्ति ते कठीण माझा शीणभाग माझे मनी में रक्तवर्ण त्रिकूट वामसव्य दोहींकडे १४४ शून्यावरी शून्य . १४३ शूराचें तें शस्त्र १४७ श्रीमूर्ति असे १४८ सुखें संसार करावा १४६ संत आणि देव १४६ | संसारीं निधान १४२ १५० अन्यायी अन्यायी अन्यायी अपराधी असाल तेथे आजि सोनियाचा दिवस आतां ऐसे करी आम्ही वारिक उदार तुम्ही संत सेना न्हावी १५२/ कारतो विनवणी १५३ कशासाठी करितां १५१ धन्य धन्य दिन १५३ नामाचें चितन १५२ मान करावा खंडन १५४ माझे झालें स्वहित १५३ १५४ १५२ १५२ १५१ १५१ १५४ जन्मांतरीचे सुकृत ज्याचे घेता मुखी दीन पतित कान्होपात्रा १५६ पतितपावन म्हणविसी १५६ विषयाचे संगती १५५ १५५ १५५ १६० भानुदास १५९) देवा कोठवरी १५९ माणिकाचें तारूं १६१ रायें कंठमाळ १६० । आमुचिये कुळी उन्मनी समाधि कोरडियां काठी जरि आकाश वर १५९ ________________

अभंगसूचि जनार्दन स्वामी १६५ पृष्ट. १६२ देहाची समाधि धन्य कृष्णातार १६३ नको गुंतूं लटिक्या १६५/ नरहरि गुरुराया। १६७ मन स्वस्थ चित्ती १६६ शिष्य म्हणे स्वामी १६४ सर्वांभूती भाव १६२ संकल्प विकल्प १६६ पृष्ठ १६७ १६४ १६५ १६३ अनंत निर्गुण आणिक या सृष्टी आतां गुरुराया परिसा आलिया अतिथा उदय समाधि लागो उदयचे तीन गुरुसख्या तुजविण जन्मा आलों मी तीर्थपर्यटन कासया १६८ १६८ २१७ १८१ अधर्मे अदृष्टाचे अनुताप नाहीं ज्यासी अनुतापावांचुनी नाम अभक्तां देव कंटाळती अभिनव गुरूनें अभिनव सांगतां अभेद' भजनाचा हरिख अर्थ नाही जयापाशी अवघोंच त्रैलोक्य अविश्वासापुढे परमार्थ अष्टही दिशा पूर्ण असोनि संसारी आपदा आजि नवल झालें आजी सुदिन आम्हांसी एकनाथ १७९ | आधी घेई निरपेक्षता १७३ १७३ | आधी देव पाठी भक २०१ १७३ | आपुलीच दारा जरी १९२ १९७ आपुली पूजा आपण १७१ आपुलें कल्याण १८३ १७१ आम्ही अलक्षपुरचे जोशी २१६ आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण १९८ १७५ आवडी करितां हरिकीर्तन १८७ २१६ एक धरलिया भाव २१२ १७४ एक नरदेह नेणोनि १७४ २१९ एडका मदन १८१ १९२ ऐके उद्धवा प्रेमळा १८८ करितां हरिकथा .. १७७ १९५ करुनी कीर्तन मागती... १८८ ________________

२३० संतवचनामृत - - - - १९३ १७७ १७२ १९६ २१३ १९९ २१५ १७८ १९४ कस्तुरी परिमळ कानावाटे मी नयनासी काम क्रोध लोभ काय तें वैराग्य कीर्तनाची आवडी देवा कीर्तनाची मर्यादा कैसी कैवल्यनिधान तुम्ही खुर्पू लागे गजाचें तें ओझें गांवढे सहस्र ब्राह्मण गुरुकृपांजन पायो गुरु परमात्मा परशु घर सोडोनि जावें घाली देवावरी भार चतुर्भुज श्याममूर्ति चक्षुदर्पणी जग हे पहा चिंतन तें सो चिंतने नासतसे जन्ममरणाचे तुटले सांकडे जया जैसा हेत. जळतिया घरा जळ स्पर्शों जातां जिकडे जावे तिकडे जो निर्गुण निराभास झाली संध्या तुमचे अप्रमाण होतां बोल तुम्ही कृपाळु जो देवा पृष्ठ. १७५ तुम्ही संतजन २०८ | त्रिभुवनींचा दीपप्रकाशु दासासी संकट पडतां १७६ दृष्टी देख परब्रह्म १९९ देवपूजे ठेवितां भावो १८८ देव म्हणे भक्तांसी २१८ देवाचे सोयिरे संत २०१ | देवासी कांही नेसणे नसे १७८ | देवो विसरे देवपणा १८४ देह जाईल तरी जावे. २१२ देहबुद्धी सांडी १७२ धन्य आज दिन २१४ धन्य दिवस जाहला १९९ धर्माची वाट माडे २११ | नवल भजनाचा भावो २०८ नवल रोगपडिपाडु १८५ नवविधा भक्ति नव १८५ नाम घेतां हे वैखरी नामपाठे निवृत्ति ज्ञानदेवा . १९४ नाशिवंत धन १९२ नाहीं जया भाव २१० नित्य नवा कीर्तनी २१४ | पहा कैसा देवाचा १७० | पक्षी अंगणीं उतरती २१० | पांथस्थ घरासी आला २०५ पाहले रे मना । २०७ पाहों गेलों देवालागीं २०६ १९८ २०९ - २१३ १९० ________________

अभंगसूचि २३१ and UA R uruRURU पृष्ठ. १९६ १९७ १८७ । १९० १९३ १७४ १७६ फूल झडे तंव बहु बोलाचे नाही बोधभानु तया नाहीं ब्रह्म सर्वगत सदा भक्तपणा सान नव्हे भक्तालागी अणुमान व्यथा भक्तिप्रेमाविण ज्ञान भक्तीचे उदरीं जन्मलें ज्ञान भक्तीच्या पोटा मुक्ति भगवद्भावो सर्वांभूती भजन भावातें उपजवी भाग्याचा उदय झाला भाग्याचे भाग्य भूमि शोधोनि मज जै अनुसरले मजसी जेणे विकिलें मन रामी रंगले मनोभाव जाणोनि मागणें तें आमी मार्गे पुढे विठ्ठल भरला माझा शरणागत माझें मीपण माझ्या मनाचें तें मन मिठी घालुनियां भक्तां मीच देवो मीच भक्त मी तों स्वयें परब्रह्म मुखीं नाहीं निंदास्तुति | मेघापरिस उदार | रवि न लपेंचि अंधारी राजाला आळस लावुनियां अंगा राख लोखंडाची बेडी वरूषला मेघ वर्म जाणे तो विरळा विटाळेंविण पोटा आला वेणुनादाचिया किळा वेदवाणी देवें केली वेदाभ्यास नको १९५ / वैकुंठींचे वैभव २०४ वैर करुनी मन वैष्णवांघरी देव सुखावला शिष्यापासून सेवा घेणे २०६ सगुणचरित्रं परम २१४ सर्वभावें दास झालों साचपणे देवा शरण सात्त्विका भरणे रोमांसी साधावया परमार्था | सायासाचे बळ २१६ सेवेचे कारण संत आधी देव मग २०२) संतद्वारी कुतरा जालों २१८ | संत मायबाप २१८ संतसंगतीने झाले १९३ संतां अंकी देव वसे १९१ २११ २११ १७८ १९४ १९८ १८० २१३ १९३ १८९ १७२ १७१ १७० १८८ २०७ १७१ २१२ १८२ १८० . Tam ________________

२३२ संतवचनामृत संतांचा महिमा देवचि जाणे संतांचिये घरी होईन संताचिये द्वारी होईन संतापोटी देव वसे संतांसी आवडे तो संतांसी जो निंदी स्वयंप्रकाशामाजी केले पृष्ठः २०३ हरिखाची गुढी १९६ हरिनाम ऐकतां १९४ | हरे भवभयव्यथा २०२ हीचि दोनी पैं साधने १९७ होउनी मानभाव २०३ होती पोटासाठी संत २१० | ज्ञानराजासाठी स्वयें ________________

Central Archaeological Library, NEW DELHI. to 35828 Call No. 891.461) Sail Ram Author – Ranade, R.D Title- Santa Vacanamrita Borrower'No. Date of Issue Date of Return “A book that is shut is but a block" CHAEOLOG, GICAL L TRAL ARC, CENTR GOVT. OF INDIA Department of Archaeology NEW DELHI. 1. LIBRARY Please help us to keep the book clean and moving, 6. B., 14B. N. DELHI.