सत्यार्थ प्रकाश/१५. बारावा समुल्लास

बारावा समुल्लास

नास्तिक पंथाची समीक्षा

चार्वाक मत-समक्षा

     बृहस्पती नावाचा एक गृहस्थ होऊन गेला. तो वेदईश्वर व यज्ञादी उत्तम कर्में यापैकी काहीही मानीत

नव्हता. त्याचे म्हणणे असे:-

(प्रश्न) यावज्जीवं सुखं जीवेन्नास्ति मृत्योरगोचर । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत ।। सर्वदर्शनसंग्रह, चार्वाक० द० पृ० २।।

     कोणीही मनुष्यादी प्राणी मृत्यूला अगोचर नाही; म्हणजे मरण कोणालाही चुकत नाही. सर्वांनाच मरावे लागते. म्हणून जोपर्यत शरीरात जीव आहे तोपर्यंत सुखाने राहावे. जर कोणी असे म्हणेल की, अधर्माचरणाने त्रास भोगावा लागतो आणि धर्माचा त्याग केल्यास पुढील जन्मी खूप दु:ख भोगावे लागते, तर त्याला चार्वाकाचे असे उत्तर आहे की, "भोळ्या माणसा मेल्यानंतर शरीराची राख होऊन जाते.खाणे, पिणे, मौजमजा करणारा (शरीर) तो काही पुनः या जगात येणार नाही. म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे मजेत राहावे. इहलोकी नीतीने चालावे. ऐश्वर्य वाढवावे आणि त्याचा यथेष्ट उपभोग घ्यावा. हाच लोक खरा आहे. परलोक वगैरे काही नाही.
     पाहा ! पृथ्वी, जल, अग्नी, वायू या चार भूतांच्या संयोगाने हे शरीर बनले आहे. त्यांच्या योगाने शरीरात चैतन्य उत्पन्न होते. ज्याप्रमाणे मादक पदार्थाच्या सेवनाने नशा उत्पन्न होते त्याचप्रमाणे शरीराच्या उत्पत्तीबरोबर जीव उत्पन्न होतो आणि शरीराच्या नाशाबरोबर स्वत: नष्ट होतो. मग पापपुण्याचे फळ कोणाला मिळणार?

तच्चैतन्यविशिष्टदेह एव आत्मा देहातिरिक्त आत्मनि प्रमाणाभावात्।। चार्वाक दर्शन पृ० ३।।

      या शरीरामध्ये चारही भूतांच्या संयोगाने जीवात्मा उत्पन्न होऊन त्यांच्या वियोगाने तो नष्ट होतो. कारण मेल्यानंतर कोणताही जीव साकार रूपात प्रत्यक्ष दिसू शकत नाही. आम्ही फक्त प्रत्यक्ष प्रमाणच

4 मानतो. कारण प्रत्यक्ष नसेल तर अनुमानादी प्रमाणे टिकूच शकत नाहीत. म्हणून मुख्य प्रत्यक्षासमोर अनुमानादी प्रमाणे गौण असल्यामुळे आम्ही त्याचे ग्रहण करीत नाही. सुंदर स्त्रीच्या अलिंगनाने आनंद मिळविणे हे पुरुषार्थाचे फळ आहे.

(उत्तर) ही पृथ्वी आदी भूते जड(अचेतन) आहेत. त्यांतून चेतनाची उत्पत्ती कधीही होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आता मातापित्यांच्या संयोगातून देहाची उत्पत्ती होते त्याचप्रमाणे आदिसृष्टीमध्ये मनुष्यादिकांच्या शरीराची आकृती सृष्टिकर्ता परमेश्वरावाचून निर्माण होऊ शकत नाही. मद (नशा) चढतो व नाहीसा होतो (उतरतो) त्याचप्रमाणे चेतनाची उत्पत्ती व नाश होत नाही. कारण मद हा चेतनाला होतो; जडाला (अचेतनाला) नव्हे, पदार्थ नष्ट म्हणजे अदृश्य होतात. पंतु अभाव कोणाचाच होत नाही. त्याचप्रमाणे जीव अदृश्य झाला की त्याचा अभाव झाला असे मानता कामा नये. जेव्हा जीवात्मा सदेह असतो तेव्हाच तो प्रकट असतो. जेव्हा तो शरीराला सोडून देतो तेव्हा हे शरीर मृत्यूला प्राप्त होत असल्यामुळे पूर्वीसारखे चेतनयुक्त होऊ शकत नाही. हीच गोष्ट बृहदारण्यकात सांगितली आहे:-

नाहं मोहं ब्रवीमि अनुच्छित्तिधर्मायमात्मेति।। बृहदा० उप० प्रपा० ४।। खं० ५।। व०१४।।

     याज्ञवल्क्य म्हणतात की, “हे मैत्रेयी ! मी हे मोहाने बोलत नाही. परंतु आत्मा अविनाशी आहे. त्याच्या योगानेच शरीर हालचाल करीत असते. जेव्हा जीव शरीरापासून वेगळा होतो तेव्हा शरीरामध्ये कसलीही चेतना उरत नाही. जर देहापासून आत्मा वेगळा नसेल तर ज्याच्या संयोगाने चेतनता व वियोगाने जडता प्राप्त होते तो देहापासून वेगळा आहे, असे कसे म्हणता येईल? ज्याप्रमाणे डोळा सर्वांना पाहातो परंतु स्वतला पाहू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्यक्षाचे ज्ञान प्राप्त करणारा जीव स्वत:ला प्रत्यक्ष पाहू शकत नाही. जीव आपल्या डोळ्यांनी सर्व घटपटादी पदार्थ पाहतो त्याप्रमाणे तो आपल्या डोळ्यांना ज्ञानाने पाहातो. जो द्रष्टा आहे तो द्रष्टाच राहतो. तो केव्हाही दृश्य होत नाही. ज्याप्रमाणे आधारावाचून आधेय, कारणावाचून कार्य, अवयवीवाचून अवयव आणि कर्त्यावाचून कर्म राहू शकत नाही त्याप्रमाणे कर्त्यावाचून (पाहणाऱ्या वाचून) प्रत्यक्ष दर्शन कसे होऊ शकेल?"
      सुंदर स्त्रीशी समागम करणे हेच पुरुषार्थाचे फळ आहे, असे तुम्ही मानीत असाल तर ते क्षणिक सुख असून त्यापासून नंतर दुःखही होते. तेही पुरुषार्थाचे फळ मानावे लागेल. स्वर्गातील निवासी अंतिमतः दुखदायक ठरतो. यावर तुम्ही असे म्हणाल की, दुःख दूर करण्याच्या व सुख वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ असा की, ते मुक्तीचे सुख नव्हेच आणि म्हणून ते पुरुषार्थाचे फळ होऊ शकत नाही.

(चार्वाक) जे लोक दु:खाने युक्त असलेल्या सुखाचा त्याग करतात, ते मूढे आहेत. ज्याप्रमाणे धान्यार्थी माणूस धान्य ग्रहण करून कोंडा टाकून देतो त्याप्रमाणे जगामध्ये बुद्धिमंतांनी सुखाचे ग्रहण व दु:खाचा त्याग करावा. इहलोकी प्रत्यक्ष उपस्थित (निश्चित) असलेले सुख सोडून स्वर्गातील अनुपस्थित (अनिश्चित) सुखाची इच्छा बाळगून धूर्त लोकांनी सांगितलेली वेदोक्त अग्नीहोत्रादी कर्में, उपासना आणि ज्ञानकांडाचे अनुष्ठान जे

5 परलोक प्राप्तीसाठी करतात ते अज्ञानी होत. मुळात परलोकच नाही. तेव्हा त्याची आशा करणे हा मूर्खपणाच होय. कारण,


अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम् । बुद्धिपौरुषहीनानां जीविकेति बृहस्पति ।। चार्वाक दर्शन पृ० ५।।

      चार्वाकमतप्रचारक बृहस्पती म्हणतो की, अग्निहोत्र, तीन वेद, तीन दण्ड आणि भस्म फासणे या गोष्टीद्वारे बुद्धिहीन व पुरुषार्थ-रहित लोकांनी पोटापाण्याचा धंदा बनविला आहे. परंतु काटा बोचणे व तदितर कारणांनी उत्पन्न होणाऱ्या दुःखाचे नांव नरक असून लोकसिद्ध राजा हाच परमेश्वर आहे व शरीराचा नाश होणे हाच मोक्ष होय. अन्य काही नाही.

(उत्तर) विषयसुखालावपुरुषाथचे फळ मानून विषयटुखनिवारणामध्येच कृतकृत्यताव स्वर्ग मानणे हा मूर्खपणा आहे. अग्निहोत्रादी यज्ञांनी वायु, वृष्टि, पाणी यांची शुद्धी होऊन आरोग्य प्राप्त होते. त्यायोगे धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांची सिद्धी होते. हे सारे न जाणता वेद, ईश्वर व वेदोक्त धर्म यांची निंदा करणे हे लबाड लोकांचे काम आहे.

      यामध्ये त्रिदंड आणि भस्मधारण यांचे जे खंडन करण्यात आले आहे, ते बरोबर आहे. काटे बोचल्यामुळे होणाऱ्या दुःखाचे नाव नरक असेल तर त्याहून अधिक दुःख देणारे महारोग वगैरे नरक का नाहीत ?
      राजा ऐश्वर्यवान व प्रजापालनतत्पर असेल तर त्याला श्रेष्ठ मानणे हे बरोबर आहे. परंतु राजा अन्याय करणारा व पापी असेल तर त्यालाही तुम्ही परमेश्वरासमान मानीत असाल तर तुमच्या सारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. शरीराचा नाश होणे हाच मोक्ष असेल तर गाढवे, कुत्री इत्यादी आणि तुम्ही यांच्यामध्ये काय फरक राहिला? फक्त बाह्य आकारांमध्येच फरक असतो, असे म्हणावे लागेल.

(चार्वाक) अग्निरुष्णो जलं शीतं समस्पर्शस्तथाऽनिल ।

            केनेदं चित्रितं तस्मात् स्वभावात्तदव्यवस्थिति ।।१।।
     चार्वाक, आभाणक, बौद्ध व जैन हे चार नास्तिक संप्रदाय जगाची उत्पत्ती स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहे असे मानतात. जे-जे स्वाभाविक गुण आहेत. त्या-त्या गुणांशी द्रव्यांचा संयोग होऊन सर्व पदार्थ बनतात जगाचा कर्ता असा कोणीही नाही. ॥१॥

न स्वर्गो नाऽपवर्गो वा नैवात्मा पारलौकिक । नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिका ।।२।।

      हे चार्वाकाचे मत आहे. पण बौद्ध व जैन हे परलोक व जीवात्मा मानतात. चार्वाक ते मानीत नाही. इतर काही बाबतीत या लोकांच्या मतांत फरक असला तरी बाकीच्या सर्व बाबतीत या तिघांची मते सारखीच आहेत. त्यांच्या मते स्वर्ग, नरक वगैरे काहीही नाही अथवा परलोकात जाणारा आत्माही नाही. तसेच वर्णाश्रमाची कर्में केल्याने कोणतेही फळ मिळत नाही. ॥२॥

6 पशुश्चेन्निहत स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति । स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिस्यते।।३।।

यज्ञामध्ये पशुला मारून त्याचा होम केल्याने तो स्वर्गाला जात असेल तर यजमान आपल्या आईबापांना मारून व त्यांचा होम करून त्यांना स्वर्गाला का पाठवात नाही.॥३॥

मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम् । गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम्।।४।।

जर मेलेल्या जीवांच्या नावाने श्राद्ध व तर्पण केल्याने त्यांची तृप्ती होत असेल तर परेदशी जाणारे लोक वाटेत उपयोगी पडावे म्हणून अन्न, वस्त्र, धन वगैरै बरोबर कशाला घेऊन जातात? मृत व्यक्तीच्या नावाने अर्पण केलेला पदार्थ जर स्वर्गात जाऊन पोहचतो तर परदेशी जाणाऱ्यांसाठी त्यांच्या आप्तेष्टांनी आपल्या घरामध्ये त्यांच्या नावाने अर्पण केलेले पदार्थ परदेशी गेलेल्यांना मिळाले पाहिजेत. पण अशा प्रकारे अर्पण केलेले पदार्थ पोहचत नाही. मग ते स्वर्गात जाऊन कसे पोहचणार? ॥४॥

स्वर्गस्थिता यदा तृपिंत गच्छेयुस्तत्र दानत । प्रासादस्योपरिस्थानामत्र कस्मान्न दीयते।।५।।

जर मर्त्यलोकात दान केल्याने स्वर्गवासी आत्मे तृप्त होत असतील तर तळमजल्यावर दान केले असता वरच्या मजल्यावर राहणारा माणूस तृप्त का होत नाही? ॥५॥

यावज्जीवेत्सुखं जीवेदृणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत ।।६।।

म्हणून जिवात जीव असेपर्यंत मजेत जगावे. घरात पदार्थ नसतील तर ऋण काढून सण साजरा करावा. काढलेले कर्ज फेडावे लागणार नाही. कारण ज्या शरीरातील जीवाने खाणे-पिणे केले असेल त्या दोघांचेही पुनरागमन होत नसल्याने मागणार कोण व देणार कोण?

यदि गच्छेत्परं लोकं देहादेष विनिर्गत । कस्माद् भूयो न चायाति बन्धुस्नेहसमाकुल ।।७।।

लोक असे म्हणतात की, मरणकाळी जीव शरीरातून बाहेर पडून परलोकात जातो. हे सारे खोटे आहे. कारण तसे असते तर कुटुंबाच्या मोहात अडकून तो पुन: घरी परत का येत नाही ? ॥७॥

ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहितस्त्विह । मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित्।।८।।

सारांश या साऱ्या क्लृप्त्या, ब्राह्मणांनी आपले पोट भरण्यासाठी वापरात आणलेल्या आहेत. हे लोक दशगात्रादी जी क्रियाकमें करतात ती सारी पोटापाण्याची साधने आहेत.॥८॥

त्रयो वेदस्य कर्त्तारो भण्डधूर्तनिशाचरा । जर्फरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वच स्मृतम्।।९।।

7 वेदांचे कर्ते हे विदूषक, लबाड व निशाचर म्हणजे राक्षस हे तिघे आहेत. 'जर्जरी' 'तुर्फरी’ इत्यादी पंडितांची वचने (शब्द) लबाडीने भरलेली आहेत. ॥९॥

अश्वस्यात्र हि शिश्नन्तु पत्नीग्राह्यं प्रकीर्त्तितम् । भण्डैस्तद्वत्परं चैव ग्राह्यजातं प्रकीर्त्तितम्।।१०।।

या बदमाशांची शिकवण कशी आहे पाहा ! घोड्याचे लिग स्त्रीने ग्रहण करावे, यजमान पत्नीचा घोड्याशी संभोग करवावा, आणि नवऱ्यामुलीशी थट्टा, वात्रटपणा करावा, असल्या गोष्टी लबाड लोकांशिवाय कोण लिहिणार? ॥१०॥

मांसानां खादनं तद्वन्निशाचरसमीरितम्।।११।। चार्वाक दर्शन पृ० १३, १४, १५।। वेदांमध्ये मांसभक्षणाचा जो भाग आलेला आहेतो तर राक्षसांनीच लिहिलेला आहे. ॥११॥

(उत्तर) चैतन्यस्वरूप परमेश्वराने उत्पन्नकेल्याखेरीज जड (अचेतन) पदार्थ स्वतः आपापसात स्वभावानेच नियमपूर्वक एकत्र येऊन उत्पन्न होऊ शकत नाहीत. म्हणून सृष्टीचा कर्ता अवश्य असला पाहिजे. जर सगळे पदार्थ आपोआप स्वभावतया उत्पन्न होत असते तर दुसरे सूर्य, चंद्र, पृथ्वी, नक्षत्रादी लोक आपोआप का उत्पन्न होत नाहीत? ॥१॥

      स्वर्ग हे सुखोपभोगाचे आणि नरक हे दुःखोपभोगाचे नाव आहे. जीवात्मा नसता तर सुखदुःखाचा उपभोग घेणारा कोण झाला असता? जसा यावेळी सुखदुःखाचा भोक्ता जीव आहे तसाच परजन्मामध्ये तोच असतो. सत्यभाषण व परोपकारादी क्रियाही वर्णाश्रमधर्मियांच्या असल्यामुळे निष्फळ व निरर्थक ठरतील काय? मुळीच नाही. ॥२॥
       पशूंना मारून त्यांचा हम करावा असे वेदादी सत्यशास्त्रात कोठेही लिहिलेले नाही. तसेच मृतकांचे श्राद्ध, तर्पण करणे हेही कपोलकल्पित आहे. कारण ते वेदादी सत्यशास्त्रांच्या विरुद्ध असून भागवतादी पुराणकारांचे ते मत आहे. म्हणून चार्वाकाने या गोष्टीचे केलेले खंडन अखंडनीय आहे.॥३-५॥
       जी वस्तू असते तिचा अभाव केव्हाही होऊ शकत नाही. विद्यमान जीवाचा अभाव होऊ शकत नाही. देहे भस्म होतो व जीव भस्म होत नाही. जीव तर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. म्हणून जे कोणी इतरांकडून कर्ज काढून इहलोकी चैन करतात आणि घेतलेले कर्ज परत देत नाहीत, ते नक्कीच पापी बनतात आणि दुसऱ्या जन्मात दुःखरूपी नरक भोगतात. यात मुळीच शंका नाही. ॥६॥
      देहातून बाहेर पडल्यावर जीव स्थलांतर व शरीरांतर प्राप्त करतो. त्याला आपला पूर्वजन्म व कुटुंब वगैरे आठवत नाही. त्यामुळे तो पुन: पूर्वीच्या कुटुंबात परत येत नाही. ॥७॥
      होय ! मृत्यूनंतरची क्रियाकमें या साऱ्या गोष्टी ब्राह्मणांची गुणकर्म नसलेल्या, ब्राह्मण हे नाव व्यर्थ धारण करणाऱ्या ब्राह्मणांनी आपल्या पोटापाण्याची सोय लावण्यासाठी रचल्या आहेत. त्या वेदोक्त नसल्यामुळे खंडनीय आहेत. ॥८॥
       आता तुम्हीच सांगा ! चार्वाक वगैरे मंडळींनी वेदादी सत्यशास्त्रे पाहिली, ऐकली अथवा वाचली असती

8 तर त्यांनी वेदांची निंदा कधीच केली नसती. वेदहे विदूषक, लबाड व निशाचरांसारख्या पुरुषांनी रचले आहेत, असे उद्धार त्यांनी कधीच काढले नसते. हां ! महीधरादी टीकाकार विदूषक, लबाड व निशाचरांसारखे यावश्य होते. सारी लबाडी त्यांची आहे, वेदांची नव्हे, परंतु दुःखाची गोष्ट अशी की, चार्वाक, आभाणक, बौद्ध व जैन यांच्यापैकी कोणीही चार वेदांच्या मूळ संहिता ऐकल्या नाहीत, पाहिल्या नाहीत अथवा विद्वानांजवळ त्यांचे अध्ययनही केले नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी नष्ट-भ्रष्ट झाली आणि ते वेडपटपणाने वेदांची अर्थशून्य निंदा करू लागले. दुष्ट वाममार्गी लोकांच्या प्रमाणशून्य कपोलकल्पित वाह्यात टीका वाचून हे लोक वेदांचे विरोधक बनलेआणि अविद्यारूपी अगाध समुद्रात जाऊन बुडाले. ॥९॥

        आता तुम्हीच विचार करा की, यजमानाच्या पत्नीला घोड्याचे लिंग हातात घ्यायला लावून त्या घोड्याशी संभोग करण्यास तिला भाग पाडणे आणि यजमानाच्या मुलीशी थट्टा, मस्करी करणे; यासारख्या गोष्टी हे वाममार्गी लोकांखेरीज इतरांचे काम कसे असू शकेल? या महापापी वाममार्गी लोकांखेरीज वेदांचे असे भ्रष्ट, वेदार्थांहून विपरीत व अशुद्ध निरूपण दुसरा कोण करील? हे चार्वाक वेदांची निंदा करण्यास उद्युक्त झालेही अत्यंत शोचनीय गोष्ट आहे. त्यांनी आपल्या बुद्धीचा थोडा तरी वापर करायला हवा होता. काय करतील बिचारे? सत्यासत्याचा विचार करून सत्याचे मंडन व असत्याचे खंडन करण्याइतकी विद्याच त्यांच्याजवळ नव्हती.॥१०॥
      वेदांमध्ये मांसभक्षणाचे समर्थन करण्यात आले आहे, असे म्हटले जाते तीही या वाममार्गी टीकाकारांचीच अगाध लीला आहे. म्हणून त्यांना राक्षस म्हणणे उचित होईल. वेदांमध्ये कोठेही मांस खावे असे सांगितलेले नाही. त्यामुळे या खोट्या प्रचाराचे पाप त्या टीकाकारांना आणि ज्यांनी वेदांची माहिती करून न घेताच त्यांची मनसोक्त निंदा केली आहे, त्यांनाच लागेल यात शंका नाही. खरी गोष्ट अशी आहे की, ज्यांनी वेदांना विरोध केला, आज करीत आहेत व पुढे करीत राहतील, ते सर्व निश्चितपणे अविद्यारूपी अंधकारात पडतील आणि सुखाऐवजी दारुण दु:ख भोगतीलत्यांना जेवढे दुःख मिळेल तेवढे थोडेच होईल. म्हणून मनुष्यमात्रांनी वेदानुकूल आचरण ठेवणे उचित होय. ॥११॥
       वाममार्गियांनी मिथ्या कपोलकल्पना करून वेदांच्या नावावर आपले उद्दिष्ट साधले. अर्थात यथेष्ट मद्यपान, मांसभक्षण व परस्त्रीगमन इत्यादी दुष्कृत्यांकडे त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे या गोष्टी वेदांत सांगितल्या आहेत, असे त्यांनी दडपून सांगितले व अशा प्रकारे वेदांना कलंक लावला. त्यांच्या या गोष्टी ऐकून चार्वाक, बौद्ध व जैन हेही वेदांची निंदा करू लागले आणि त्यांनी एक वेगळा वेदविरोधी अनीश्वरवादी म्हणजे नास्तिक संप्रदाय सुरू केला. चार्वाकादी लोकांनी वेदांचा मूळ अर्थ समजून घेतला असता तर चुकीच्या टीका वाचून खऱ्या वेदोक्त-धर्मापासून ते दूर कशाला गेले असते? काय करणार विचारे? ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः'। जेव्हा माणसाचा विनाश होण्याची वेळ येते तेव्हा त्याची बुद्धी उलटी चालू लागते.
        आता चार्वाकादिकांमध्ये आपसात भेद आहेत. त्याविषयी लिहितो. हे चार्वाकादी पंथ अनेक गोष्टींच्या बाबतीत एकमत आहेत. परंतु चार्वाक हा देहाच्या उत्पत्तीबरोबर जीव उत्पन्न होतो आणि देहाच्या नाशा बरोबर

9 जीवाचाही नाश होतो असे मानतो. तो पुनर्जन्म व परलोक मानीत नाही. केवळ प्रत्यक्ष प्रमाणाखेरीज अनुमानादी इतर प्रमाणे तो मानीत नाही. ‘चार्वाक' या शब्दाचा अर्थ 'बोलण्यात पटाईत’ असा असून विशेष अर्थ वितंडवाद असा आहे. बौद्ध व जैन हे प्रत्यक्षादी चारही प्रमाणे मानतात अनादी जीव, पुनर्जन्म, परलोक व मुक्तीही ते मानतात. एवढाच चार्वाक आणि बौद्ध-जैन यांच्यात भेद आहे. परंतु नास्तिकता, वेद व ईश्वर यांची निंदा, परमत द्वेष, षड यातना (पुढे सांगितलेली सहा कर्मे) आणि जगाचा कर्ता कोणी नाही असे मानणे, इत्यादी बाबतीत त्या सर्वांचे एकमत आहे. अशा प्रकारे चार्वाकाच्या मताविषयी आम्ही थोडक्यात विवेचन केले. आता बौद्ध मताविषयी विचार करू.

बौद्धमत-समीक्षा

कार्य्यकारणभावाद्वा स्वभावाद्वा नियामकात् । अविनाभावनियमो दर्शनान्तरदर्शनात्।।१।। सर्वदर्शन-संग्रह, बौद्धमत पृ० १६।।

      कार्यकारणभाव म्हणजे कार्याच्या दर्शनाने कारणाचा व कारणाच्या दर्शनाने कार्यादींचा साक्षात्कार होत असतो. म्हणजेच तत्संबंधी शेष भागाचे अनुमान होत असते. या कार्यकारणभावाच्या ज्ञानावाचून प्राण्यांचे सारे व्यवहार पूर्ण होऊ शकत नाहीत. इत्यादी कारणांनी अनुमानाला अधिक मानून चार्वाकाहून भिन्न शाखा बौद्धांची झाली. बौद्धांचे चार प्रकार आहेत:-
      (१) माध्यमिक (२) योगाचार (३) सौत्रान्तिक (४) वैभाषिक. ‘बुद्ध्या निर्वतते सः बौद्ध' म्हणजे जी गोष्ट बुद्धीने सिद्ध होते म्हणजे जी गोष्ट बुद्धीच्या आवाक्यात येते, ती मानणारा व जी बुद्धीच्या कसोटीवर उतरत नाही, तीन मानणारा तो बौद्ध होय
      या चार प्रकारांपैकी माध्यमिक बौद्ध हे सर्व शून्य मानतात. अर्थात जेवढे पदार्थ आहेत, ते सर्व शून्य आहेत. म्हणजे ते प्रारंभी नसतात, अंतीही नसतात आणि मध्यकाळी ते असल्याचे जे प्रतीत होते, तेही तो प्रतीतीचा क्षण गेल्यानंतर शून्यरूप होऊन जातात. जसे उत्पत्तीच्या पूर्वी घट गव्हता. त्याचा नाश झाल्यावरही तो राहत नाही. घटज्ञान समयीच तो भासतो; आणि इतर पदार्थाचे ज्ञान होण्याच्या वेळी घटाचे ज्ञान राहत नाही. म्हणून शून्य हेच एकमेव तत्त्व आहे.
       दुसरे योगाचार बौद्ध बाह्य शून्य मानतात. सर्व पदार्थ आंतरिक ज्ञानामुळे भासमान होतात. बाह्यतः त्याचे अस्तित्व नाही. उदाहरणार्थ, घटज्ञान हे आत्म्यामध्ये असते. म्हणूनच माणूस म्हणतो की घट आहे. त्याला आंतरिक ज्ञान नसेल तर तो असे म्हणू शकत नाही. यावरून वस्तुतः बाह्य पदार्थाचे अस्तित्व नाही. यामुळेच आत्म्यामध्ये अस्तित्व सिद्ध होते. म्हणून बाह्य पदार्थाचा अभाव म्हणजे 'बाह्य-शून्य' असे ते मानतात.
         तिसरे सौत्रान्तिक बौद्ध असे मानतात की, बाहेरील पदार्थ अनुमानाने जाणला जातो. कारण कोणताही पदार्थ बाहेरून सांगोपांग दिसत नाही. त्याचा काही भाग दिसतो त्यावरून उरलेल्या भागाचे अनुमान केले जाते, असे या लोकांचे मत आहे.

10

       चौथे वैभाषिक बौद्ध असे मानतात की, पदार्थाची प्रतीती बाहेरूनच होते, आतून नाहीजसे 'अयं नीलो घटः' म्हणजे हा निळा घट आहे असे म्हटले जाते तेव्हा निळ्या घटाची आकृती बाहेरून प्रतीत होते, ती प्रतीती आतून होत नाही.
      वस्तुतः या सर्वांचा आचार्य बुद्ध एकच आहे. परंतु शिष्यांमधील बुद्धिभेदामुळे त्यांच्या चार शाखा झाल्या आहेत. ज्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतर जारकर्म करणारा पुरुष परस्त्रीगमन करत आणि विद्वान लोक सत्यभाषणादी श्रेष्ठ कर्म करतात, त्याप्रमाणे वेळ एकच असली तरी वेगवेगळी माणसे आपापल्या बुद्धीप्रमाणे वेगवेगळी कृत्ये करीत असतात.
      वर उल्लेखिलेल्या चार प्रकारच्या बौद्धांमधील माध्यमिक बौद्ध हे, सारेच क्षणिक आहे असे मानतात. प्रत्येक क्षणी बुद्धीमध्ये परिवर्तन होत असल्यामुळे जो पदार्थ पूर्वीच्या क्षणी ज्ञात होता, जो नंतरच्या क्षणी तसा राहत नाही. म्हणून सर्वच क्षणिक आहे, असे मानतात.
        योगाचार बौद्धांचे म्हणणे असे की, सारीच प्रवृत्ती दुःखरूप आहे. कारण प्राप्तीमध्ये कोणीही संतुष्ट राहत नसतो. एकाच्या प्राप्तीमध्ये दुसऱ्याची इच्छा विद्यमानच असते, याप्रकारे मानतात.
       सौत्रांतिक बौद्धांचे म्हणणे असे की, सर्व पदार्थ आपापल्या लक्षणांनी लक्षित होत असतात. जसे गायीच्या लक्षणांनी गाय व घोड्याच्या चिह्नांनी घोडा ज्ञात होत असतो. अशी लक्षणे लक्ष्य वस्तूमध्ये नेहमीच असतात, असे ते मानतात.
      वैभाषिक बौद्ध शून्यालाच एक पदार्थ मानतात. पहिला माध्यमिक सर्वाला शून्य मानीत होता. तोच पक्ष व वैभाषिकांचाही आहे.
    इत्यादी तसे बौद्धांमध्ये पुष्कळसे विवाद पक्ष आहेत. याप्रकारे चार प्रकारची भावना मानतात.

(उत्तर) जर सर्व शून्य असेल तर शून्याला जाणणारा शून्य असू शकत नाही. आणि जर सर्व शून्य असेल तर शून्याला शून्य जाणू शकणार नाही. म्हणून शून्याचा ज्ञाता व ज्ञेय असे दोन पदार्थ असल्याचे सिद्ध होते. जर योगाचार बौद्ध बाह्यशून्यत्व मानत असतील तर पर्वत त्यांच्यामध्ये असला पाहिजे. पर्वत आमच्या हृदयात आहे असे ते म्हणत असतील तर पर्वत राहण्या एवढी जागा त्यांच्या हृदयात कोठे आहे ? म्हणून पर्वत बाहेर असतो आणि पर्वताचे ज्ञान आत्म्यामध्ये असते.

       सौत्रान्तिक बौद्ध कोणत्याही पदार्थाला प्रत्यक्ष मानीत नाहीततर मग ते स्वतः आणि त्यांचे वचनही प्रत्यक्ष नसून अनुमेय असले पाहिजे. जर पदार्थ प्रत्यक्ष असू शकत नसतील तर 'अयं घटः’ असा प्रयोगही होता कामा नये. त्या ऐवजी ’अयं घटैकदेश' म्हणजे हा माठाचा एक भाग आहे असे म्हटले पाहिजे. परंतु माठाच्या एका भागाचे नाव माठ असे नसून सर्व भागांच्या समुदायाचे नाव माठ आहे. 'हा माठ आहे’ हे प्रत्यक्ष आहे. ते अनुमेय नाही. कारण सर्व अवयवांमध्ये अवयवी एकच असतो. त्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर मठाचे सर्व अवयवही प्रत्यक्ष होतात. म्हणजेच सावयव माठप्रत्यक्ष होतो.
      वैभाषिक बौद्ध बाह्य पदार्थाना प्रत्यक्ष मानतात तेही बरोबर नाही. कारण जेथे ज्ञाता व ज्ञान असते तेथेच

11 प्रत्यक्ष जाणीव होते. अर्थात आत्म्यामध्ये सर्व गोष्टीचे ज्ञान असते. प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय बाहेर असला तरी तदाकार ज्ञान आत्म्याला होते. जर पदार्थ क्षणिक असतात व त्यांचे ज्ञानही क्षणिक असते, असे मानले तर 'प्रत्यभिज्ञा' असू शकत नाही. (पूर्वी कधीतरी पाहिलेली व्यक्ति किंवा पदार्थ पुन्हा दिसल्यानंतर ही अमूक व्यक्ती किंवा पदार्थ आहे. असे ज्ञान किंवा स्मरण होणे याला प्रत्यभिज्ञा असे म्हणतात.) परंतु पूर्वी पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टीचे स्मरण होत असते. म्हणून क्षणिक वादही बरोबर नाही. सर्वच दुःखमय असेल आणि सुख मुळीच नसेल अशा स्थितीची कल्पनाच करता येणार नाही. कारण सुख-दु:ख हे सापेक्ष असल्यामुळे सुखाच्या अपेक्षेशिवाय दुःख सिद्ध होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे रात्रीच्या अपेक्षेने (संदर्भात) दिवस व दिवसाच्या अपेक्षेने रात्र ज्ञात होते त्याचप्रमाणे सुख व दु:ख यांच्या बाबतीत समजावे. म्हणून सारे दुःखमय आहे, असे मानणे बरोबर नाही. बौद्धांचा स्वलक्षणवादही बरोबर नाही. कारण स्वलक्षण मानल्यास नेत्रग्राह्यत्व हे रूपाचे लक्षण आहे आणि रूप हे लक्ष्य आहे. मठाचे रूप हे लक्ष्य व नेत्रग्राह्यत्व लक्षण असून ती दोन्ही परस्पर भिन्न आहेत. तसेच गंध हे पृथ्वीचे लक्षण असून तो पृथ्वीहून अभिन्न आहे. सारांश, लक्ष्य व लक्षण ही परस्परांहून भिन्नही आहेत व अभिन्नही आहेत, असे मानले पाहिजे. शून्यवादाला उत्तर पूर्वी दिलेच आहे की, शून्याला जाणणारा शून्याहून वेगळा असतो.

सर्वस्य संसारस्य दुखात्मकत्वं सर्वतीर्थंकरसम्मतम् ।। बौद्धदर्शन पृ० २८।। पं० ३।।

      जग हे दुःखरूपदुखाचे साधनरूप आहेअशी भावना करून जगातून सुटका करून घ्यावी, असे बौद्ध मानतात. मुक्ती, अनुमान व जीवाचे अस्तित्व यांचा निषेध हे चार्वाकांमध्ये विशेष अधिक आहेत. ज्यांना बौद्ध लोक तीर्थङ्कर मानतात त्यांनाच जैनही मानतात. म्हणून या बाबतीत हे दोन्ही पंथ एक आहेत. पूर्वोक्त भावगचतुष्टयाने म्हणजे चार भावनांच्या योगाने सर्व वासनांपासून निवृत्त होऊन माणूस शून्यरूप निर्वाण म्हणजे मुक्ती प्राप्त करतो, असे ते मानतात. ते आपल्या शिष्यांना योग व आचार यांचा उपदेश करतात. गुरूचे वचन प्रमाण मानावयास सांगतात. अनादी बुद्धीमध्ये वासना असल्यामुळे बुद्धीच अनेकाकार भासते, असे ते सांगतात. चित्त-चैतात्मक स्कन्ध पाच प्रकारचे असतात, असे ते मानतातः-

रूपविज्ञानवेदनासंज्ञासंस्कारसंज्ञक ।। बौद्धदर्शन पृ० ३९।। पं० ११।।

      त्यांतील (पहिला) इंद्रियांकडून रूपादी विषयांचे जे ग्रहण केले जाते तो 'रूपस्कंध' होय. (दुसरा) आलयविज्ञान प्रवृत्तीच्या ज्ञानरूप व्यवहाराला 'विज्ञानस्कंध' म्हणतात. (तिसरा) रूपस्कंध व विज्ञानस्कंध यांच्यापासून उत्पन्न झालेला सुखदुःखादी प्रतीतिरूप व्यवहार हा 'वेदना स्कंध' होय(चौथ) गाय आदी संज्ञांचा संबंध अर्थात नामांचा नामीशी असणारा संबंध हा संस्कंध होय. (पाचवा) वेदना स्कंधापासून राग (मोह) द्वेषादि क्लेश आणि क्षुधातृषादी उपक्लेश, मद, प्रमाद, अभिमान, धर्म व अधर्मरूप व्यवहार हा 'संस्कारस्कंध' आहे असे ते मानतात. सर्व संसारात दुःखरूप दुःखाचे घर, दुःखाचे साधनरूप भावना करून संसारातून सुटणे, चार्वाकात अधिक मुक्ती व अनुदान तथा जीवांचे अस्तित्व न मानणे असे बौद्ध मानतात.


12 देशना लोकनाथानां सत्त्वाशयवशानुगा । भिद्यन्ते बहुधा लोके उपायैर्बहुभि किल।।१।। बौद्धदर्शन पृ० ४५,४६।।

अर्थात जो ज्ञानी, विरक्त, जीवनमुक्त लोकांचे नाव असणाऱ्या बुद्ध आणि तीर्थंकरांच्या पदार्थाचे स्वरूप जाणविणारा, भिन्नभिन्न पदार्थाचा उपदेशक पुष्कळ रहस्ये जाणणारा, अनेक उपायांनी वर्णन करण्यात आलेला आहे, त्याच्यावर बौद्धांनी श्रद्धा ठेवावी. ॥१॥

गम्भीरोत्तानभेदेन क्वचिच्चोभयलक्षणा। भिन्ना हि देशनाऽभिन्ना शून्यताऽद्वयलक्षणा।।२।। बौद्धदर्शन पृ० ४५, ४६।।

खूप गंभीर व प्रसिद्ध अशा रहस्यांनी कोठे-कोठे गुप्तपणे व प्रकटपणे भिन्न-भिन्न गुरूंचे उपदेश, जे शून्य लक्षणांनी युक्त पूर्वी सागितले आहेत, त्यांच्यावरही श्रद्धा ठेवावी. ॥२॥

द्वादशायतनपूजा श्रेयस्करीति बौद्धा मन्यन्ते– अर्थानुपार्ज्य बहुशो द्वादशायतनानि वै। परित पूजनीयानि किमन्यैरिह पूजितै ।।३।। बौद्धदर्शन पृ० ४५, ४६।।

जी द्वादशायतन पूजा आहे, तीच मोक्ष देणारी आहे. त्या पूजेसाठी पुष्कळ द्रव्यादी पदार्थ मिळवून द्वादशायतन म्हणजे बारा प्रकारची विशिष्ट स्थाने बनवून सर्व प्रकारे पूजा करावी. इतरांची पूजा करण्याचे काय प्रयोजन? ॥३॥

ज्ञानेन्द्रियाणि पञ्चैव तथा कर्मेन्द्रियाणि च। मनो बुद्धिरिति प्रोक्तं द्वादशायतनं बुधै ।।४।। बौद्धदर्शन पृ० ४५, ४६।।

यांची द्वादशायतन पूजा अशी आहे: श्रोत्र, त्वक्, चक्षु, जिव्हा व नासिका ही पाच ज्ञानेंद्रिये, वाक्, हस्त, पाद, गुहा व उपस्थ ही पाच कर्मेद्रिये, म्हणजे दहा इंद्रिये आणि मन व बुद्धी या बारांचा सत्कार करणे म्हणजे त्यांना आनंदात ठेवणे, ही त्यांची पूजा आहे. हेच बौद्ध मत आहे.॥४॥

(उत्तर) जर सारे जग खरोखरीच दुखमय असते तर कोणत्याही जीवाला जगाविषयी कसलेच आकर्षण वाटले नसते. परंतु आपण दैनंदिन जीवनात असे प्रत्यक्ष पाहतो की, सारे जीव काही ना काही मिळविण्यासाठी सतत प्रवृत्तीत मग्न असतात. म्हणून सारे जग दुःखरूप असू शकत नाही. वस्तुत: जगामध्ये सुख व दुःख दोन्ही आहेत. बौद्ध लोक हे जग दुःखमय असल्याचा सिद्धांत मानीत असतील तर खाणेपिणे, पध्य-पाणी, औषध-सेवन यांद्वारे शरीररक्षण करून त्यामध्ये ते सुख का मानतात ? जर ते म्हणत असतील की, आम्ही या गोष्टी करण्यास प्रवृत्त होतो खरे; परंतु त्याला दु:खच मानतो, तरते ही शक्य नाही कारण जीव हा सुखाच्या बाबतीत प्रवृत्त आणि दुःखाच्या बाबतीत निवृत्त होऊ इच्छितो. जगामध्ये धर्मकृत्ये, विद्या, सत्संग इत्यादी श्रेष्ठ व्यवहार सुखकारक असतात. त्यांना कोणताही विद्वान दु:खाचे कारण मानू शकणार नाही. फक्त बौद्ध लोकच तसे मानतात. त्यांचे जे पाच स्कंध आहेत तेही अपूर्ण आहेत. कारण अशा प्रकारे स्कंधांचा विचार करू गेल्यास

13 त्यांच्यापैकी प्रत्येकाचे अनेक भेद होऊ शकतात. हे लोक तीर्थकरांना उपदेशक व लोकनाथ मानतात. परंतु सर्व नाथांचा नाथ जो अनादी परमात्मा त्याला मात्र ते मानीत नाहीत. जर तो परमात्मा नसेल तर त्या तीर्थकरांनी कोणाकडून उपदेश घेतला? त्यांना स्वयंभू (स्वयंसिद्ध) ज्ञान झाले, असे जर त्यांचे म्हणणे असेल तर ते शक्य नाही. कारण, कार्य हे कारणावाचून होऊ शकत नाही. अथवा त्यांच्या म्हणण्यानुसार तसेच घडत असते तर आता त्यांच्यामध्ये अध्ययन-अध्यापन, श्रवण-कीर्तन आणि ज्ञानी लोकांचा सत्संग केल्याशिवाय ज्ञानी का निर्माण होत नाहीत ? जर तसे निर्माण होत नाहीत तर अशा प्रकारचे कथन पूर्णपणे निराधार व तर्कशून्य, सन्निपात रोगग्रस्त माणसाच्या बरळण्यासारखे ठरते.

      शून्यरूप अद्वैत हाच बौद्धांचा उपदेश असेल तर तो खरा नाही. कारण, विद्यमान वस्तू कधीच शून्यरूप असू शकत नाही. हां ! ती सूक्ष्म कारणरूप होते. म्हणून हे विधान भ्रामक आहे. जर द्रव्यांचा उपार्जनामुळेच पूर्वोक्त द्वादशायतनपूजा, हे मोक्षाचे साधन आहे असे ते मानतात तर दहा प्राण आणि अकरावा जीवात्मा यांची पूजा ते का करीत नाहीत? जर इंद्रिये व अंत:करण यांची पूजाही मोक्षप्रद असेल तर या बौद्धांमध्ये आणि विषयी जनांमध्ये काय फरक ठरला? विषयवासनांच्या गुलामगिरीतून बौद्ध लोक आपली सुटका करून घेऊ शकले नाहीत. मग तेथे मुक्ती कोठून येणार?
       या लोकांनी अविद्येच्या बाबतीत केवढी प्रगती केली आहे, पहा ! त्यात ते अद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकेल असे इतर कोणी नाहीत. यावरून असेच सिद्ध होते की, यांना वेद व ईश्वर यांचा विरोध करण्याचेच हे फळ मिळाले आहे. त्यांनी प्रथमतः सारे जग दु:खमय असल्याची कल्पना केली आणि मग तिच्यात द्वादशायतनपूजा घुसवून दिली. यांची ही द्वादशायतनपूजा जगातील पदार्थाच्या बाहेरची आहे काय की जी मुक्ती देणारी व्हावी ? जर कोणी डोळे मिटून रत्न शोधू लागला तर त्याला ते कधीतरी मिळू शकेल काय? वेद व ईश्वर न मानल्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. अजूनही त्यांना सुख हवे असेल तर वेद व ईश्वर यांचा आश्रय घेऊन त्यांनी आपला जन्म सार्थक करावा. 'विवेक विलास' या ग्रंथामध्ये बौद्धांचे तत्वज्ञान पुढील शब्दात सांगितले आहे.

बौद्धानां सुगतो देवो विश्वं च क्षणभङ्गुरम् । आर्य्यसत्त्वाख्यया तत्त्वचतुष्टयमिदं क्रमात्।।१।। विवेकविलास अ० ८।। श्लो० २६५।।

बौद्धांचा सुगत देव बुद्ध भगवान हा पूजनीय देव आहे. जरा क्षणभंगुर आहे, सर्व पुरुष व स्त्रिया यांनी आर्य म्हणजे सज्जन बनण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करावेत, आणि सर्वांनी तत्वांच्या अथवा खन्या सिद्धांतांच्या विज्ञानाचे अध्ययन करावे, हे चार मूळ सिद्धांत ही बौद्धांची (मानवीय) श्रद्धा-स्थाने आहेत. ॥१॥

दुःखम् आयतनं चैव तत समुदयो मत । मार्गश्चेत्यस्य च व्याख्या क्रमेण श्रूयतामत ।।२।।विवेकविलास अ० ८।। श्लो० २६६।।

या विश्वाला दुःखाचे घर जाणावे. त्यामुळे समुदय म्हणजे (मोह, वेष वगैरे दोषांची) उत्पत्ती होते. आता त्या मार्गाचे क्रमशः विवेचन ऐका. ॥२॥

14 दुःखसंसारिण स्कन्धास्ते च पञ्च प्रकीर्त्तिता । विज्ञानं वेदना संज्ञा संस्कारो रूपमेव च।।३।।विवेकविलास अ० ८।। श्लो० २६७।।

जगामध्ये केवळ दु:ख आहे. यापूर्वी ज्या पंच स्कंधाची चर्चा केली आहे ते जाणून घ्यावेत.॥३॥

पञ्चेन्द्रियाणि शब्दाद्या विषया पञ्च मानसम् । धर्मायतनम् एतानि द्वादशायतनानि तु।।४।।विवेकविलास अ० ८।। श्लो० २६८।।

पाच ज्ञानेंद्रिये, त्यांचे शब्दादी पाच विषय, मन, बुद्धी व अंत:करण ही धर्माची बारा स्थाने (आयतने) आहेत. ।।४।।

रागादीनां गणो य स्यात्समुदेति नृणां हृदि। आत्मात्मीयस्वभावाख्य स स्यात्समुदय पुन ।।५।। विवेकविलास अ० ८।। श्लो० २६९।।

माणसांच्या हृदयामध्ये राग (मोहे) द्वेषादी समूहाची जी उत्पत्ती होते, तिला समुदय तसेच, आत्मा, आत्म्याचे संबंधी व स्वभाव यांना आख्या असे म्हणतात. त्यांच्यापासून पुन: समुदाय होत असतो. ॥५॥

क्षणिका सर्वसंस्कारा इति या वासना स्थिरा। स मार्ग इति विज्ञेय स च मोक्षोऽभिधीयते।।६।। विवेकविलास अ० ८।। श्लो० २७०।।

सर्व संस्कार क्षणिक आहेत, ही वासना स्थिर करणे हा बौद्धांचा मार्ग आहे आणि तेच शुन्य तत्व, शन्यरूप होणे हा मोक्ष आहे॥६॥

प्रत्यक्षम् अनुमानं च प्रमाणद्वितयं तथा। चतु प्रस्थानिका बौद्धा ख्याता वैभाषिकादय ।।७।। विवेकविलास अ० ८।। श्लो० २७१।।

बौद्ध लोक प्रत्यक्ष व अनुमान ही दोनच प्रमाणे मानतात.त्यांच्यामध्ये वैभाषिक, सौत्रांतिक, योगाचार व माध्यमिक असे त्यांचे चार भेद आहेत. ॥७॥

अर्थो ज्ञानान्वितो वैभाषिकेण बहु मन्यते। सौत्रन्तिकेन प्रत्यक्षग्राह्योऽर्थो न बहिर्मत ।।८।। विवेकविलास अ० ८।। श्लो० २७२।।

ज्ञानामध्ये असणारा अर्थ (पदार्थ) विद्यमान असतो असे वैभाषिक मानतात. कारण जो ज्ञानामध्ये नसतो तो अर्थ (पदार्थ) सिद्ध आहे असे कोणीही पुरुष मानू शकत नाही. सौत्रांतिक लोक आल्यात जो प्रत्यक्ष पदार्थ असतो तोच मानतात. बाहेरचा पदार्थ ते मानीत नाहीत.॥८॥

आकारसहिता बुद्धिर्योगाचारस्य सम्मता। केवलां संविदं स्वस्थां मन्यन्ते मध्यमा पुन ।।९।। विवेकविलास अ० ८।। श्लो० २७३।।

योगाचार लोक आकारसहित, विज्ञानयुक्त बुद्धीला मानतात आणि माध्यमिक लोक केवळ आपल्यामधील पदार्थाच्या ज्ञानालाच मानतात. (बाहेरच्या) पदार्थाना मानीत नाहीत. ॥९॥

रागादि – ज्ञानसन्तानवासनाच्छेद – सम्भवा। चतुर्णामपि बौद्धानां मुक्तिरेषा प्रकीर्तिता।।१०।। विवेकविलास अ० ८।। श्लो० २७४।।

15 रागादी (मोहादी) ज्ञानाच्या प्रवाहरूप वासनेच्या नाशातून उत्पन्न होणारी मुक्ती किंवा मोक्ष चारही प्रकारचे बोद्ध मानतात. ॥१०॥

कृत्ति कमण्डलुर्मौण्ड्यं चीरं पूर्वाह्णभोजनम्। संघो रक्ताम्बरत्वं च शिश्रिये बौद्धभिक्षुभि ।।११।। विवेकविलास अ० ८।। श्लो० २७५।।

मृगादिकांचे कातडे (मृगचर्म), कमंडलू, मुंडन, वल्कल वस्त्रे, पूर्वी म्हणजे सकाळी ९ वाजण्याच्या आधी भोजन, एकटे न राहणे (एकांत टाळणे )लाल वस्त्रे धारण करणे हा बौद्ध साधूंचा वेश आहे. ॥११॥


(उत्तर) सुगत बुद्ध हाच बौद्धांचा देव असेल तर मग त्याचा गुरू कोण होता? आणि जर विश्व क्षणभंगुर असेल तर पूर्वी पाहिलेल्या पदार्थाचे 'हाच तो आहे' असे स्मरण होता कामा नये. विश्व क्षणभंगुर असते तर तो पदार्थच राहिला नसता. मग स्मरण कशाचे होणार? क्षणिकवाद हाच बौद्धांचा मार्ग असेल तर त्यांचा मोक्षही क्षणभंगुर असणार ! जर ज्ञानाने मुक्त असणारा अर्थच द्रव्य असेल तर जड (अचेतन) द्रव्यामध्येही ज्ञान असले पाहिजे. म्हणून ज्ञानामध्ये अर्थाचे प्रतिबिंब असते. जर आतील ज्ञानामध्ये द्रव्य असेल तर ते बाहेर असता कामा नये. मग ते चालनादी क्रिया कोणावर करते ? जे बाहेर दिसते ते खोटे कसे असू शकेल ? जर बुद्धी साकार असेल तर ती दिसली पाहिजे. जर केवळ ज्ञानच हृदयात आत्मस्थ असेल व बाह्य पदार्थाना केवळ ज्ञानच मानले तर ज्ञेय पदार्थाशिवाय ज्ञानच होऊ शकत नाही. वासनांचा नाश हीच मुक्ती असेल तर सुषुप्ती (स्वप्नरहित निद्रा) हीही भक्ती समजली पाहिजे. तसे मानणे विद्येच्या विरुद्ध असल्याने ते तिरस्कारणीय आहे.

       अशा प्रकारे बौद्ध लोकांची मते थोडक्यांत सांगितली. यावरून यांची विद्या कशी आहे व त्यांचा पंथ कसा आहे हे बुद्धिमान विचारशील पुरुष विचार करून समजून घेतील.
       आता आम्ही जैनमताचे वर्णन करतो. प्रकरण रत्नाकर भाग १, 'नयचक्रसार' या ग्रंथात खालील गोष्टी सांगितल्या आहेत :
        बौद्ध लोक वेळोवेळी नवनवीन अशी (१) आकाश, (२) काळ (३) जीव, (४) पुद्गल ही चार द्रव्ये नतात आणि जैन लोक धर्मास्तिकाय, अधर्मास्तिकाय, आकाशास्तिकाय, पुद्गलास्तिकाय, जीवास्तिकाय व काळ ही सहा द्रव्ये मानतातयापैकी काळाला ते ‘अस्तिकाय' मानीत नाहीत. त्यांचे म्हणणे असे की काळ हे औपचारिक (व्यवहारदृष्टया) द्रव्य आहे. ते वस्तुतः तसे नाही. यापैकी ‘धर्मास्तिकाय' हे द्रव्य गतिपरिणामीपणामुळे परिणामाला प्राप्त होऊन जीव व पुद्गल (परमाणु; ज्या द्रव्यांच्या संघाताने शरीर, मन, प्राण इत्यादी निर्माण होतात) यांच्या गतीच्या समीप स्तंभन करण्याला हेतुभूत आहे. ते असंख्य प्रदेश, परिणाम व लोक यांमध्ये व्यापक आहे. दुसरे ‘अधर्मास्तिकाय' हे आहे की, ते स्थिरतेच्या योगाने परिणामी झालेला जीव पुद्गल यांच्या स्थितीच्या आश्रयाचा हेतू आहे. तिसरे 'आकाशास्तिकाय' हे सर्व द्रव्यांचा आधार आहे. त्यामध्ये अवगाहन, प्रवेश, निर्गम आदी क्रिया करणारे जीव व पुद्गल यांच्या अवगाहनाचा हेतू असून ते सर्वव्यापी आहे. चौथे 'पुद्गलास्तिकाय' हे आहे की, ते कारणरूप सूक्ष्म, नित्य, एकरस असून वर्ण, गंध, स्पर्श, कार्य यांचे चिह्न पूर्ण करणे व गळून पडणे हा त्याचा स्वभाव आहे. पाचवे 'जीवास्तिकाय' हे चेतनालक्षण

16 असून ज्ञान दर्शन मध्ये उपयुक्त आहे. अनंत पर्यायांनी परिणामी होणारा कर्ता व भोक्ता आहे. सहावा 'काळ' हा पूर्वोक्त पाच अस्तिकायांचे परत्व, अपरत्व, नवीनत्व, प्राचीनत्व यांचे चिह्नरूप व प्रसिद्ध वर्तमानरूप या पर्यायांनी युक्त आहे. म्हणून त्याला काळ असे म्हणतात.

(समीक्षक) बौद्धांनी जी चार द्रव्ये प्रतिसमयी नवीन नवीन मानली आहेत ती खोटी आहेत. कारण आकाश, काळ, जीव व परमाणू हे कधीच नवे अथवा जुने होऊ शकत नाही. ते अनादी व कारणरूपाने अविनाशी आहेत. मग त्यांना नवीनपणा किंवा जुनेपणा कसा चिकटविता येईल ? तसेच, जैनांचे मानणेही बरोबर नाही. कारण धर्म व अथर्म ही द्रव्ये नसून ते गुण आहेत. हे दोन्ही जीवास्तिकायामध्ये येतात. म्हणून आकाश, परमाणु, जीव व काळ त्यांनी मानले असते तर ते बरोबर झाले असते. वैशेषिकांनी मानलेली नऊ द्रव्येच बरोबर आहेत. कारण पृथ्वी आदी पाच तत्वे काळ, दिशा, आत्मा व मन हे नऊ वेगवेगळे पदार्थ निश्चितच आहेत. एका जीवाला चेतन मानून ईश्वराला न मानणे ही जैन व बौद्ध यांची मिथ्या पक्षपाताची गोष्ट आहे.

बौद्ध व जैन पंथाचे ऐक्य

बौद्ध व जैन लोक सप्तभंगी व स्याद्वाद मानताततो असा आहे:- (१) ‘सन् घटः' याला ते प्रथम भंग म्हणतात. कारण माठ आपल्या विद्यमानत्वाने युक्त आहे. म्हणजे 'माठ आहे', या वाक्याने त्याच्या अभावाचा निषेध (विरोध ) केला आहे. (२) दुसरा भंग 'असन् घटः' म्हणजे 'माठनाही,' पहिला भंग हा मठाच्या अस्तित्वामुळे (भावामुळे) व दुसरा भंग त्याच्या अभावामुळे मानलेला आहे. (३) तिसरा भंग 'सन्नसन् घटः' हा आहे. याचा अर्थ असा की, हा माठ आहे खरा परंतु तो पट (कपडा) नाही. कारण त्या दोहोंपासून तो वेगळा झाला आहे. (४) चौथा भंग ’घटोऽघटः' 'अघटःपटः' दुसऱ्या पटाच्या (वस्त्राच्या) अभावाची अपेक्षा आपणामध्ये असल्यामुळे घटाला अघट म्हणतात. त्याच्या दोन संज्ञा घट व अघटअशा युगपत (एकाच वेळी) होतात. (५) पाचवा भंग असा की, घटाला पट म्हणणे अयोग्य आहे अर्थात त्यामध्ये घटत्व (घटपण) वक्तव्य आहे आणि पटत्व हे अवक्तव्य आहे. (६) सहावा भंग हा आहे की, जर घट नाही तर त्या विषयी बोलणेही योग्य नाही. व जर तो असेल तर त्याविषयी बोलणेही योग्य आहे. (७) सातवा भंग हा आहे की, जे वक्तव्यासाठी योग्य आहे परंतु जे नाही व वक्तव्यासाठी योग्य ही घट नाही. याला सातवा भंग म्हणतात. याच प्रकारे,

स्यादस्ति जीवोऽयं प्रथमो भंगः।।१।। स्यान्नास्ति जीवो द्वितीयो भंगः।।२।। स्यादवक्तव्यो जीवस्तृतीयो भंगः।।३।। स्यादस्ति नास्तिरूपो जीवश्चतुर्थो भंगः।।४।। स्यादस्ति (च) अवक्तव्यो जीव पञ्चमो भंगः।।५।। स्यान्नास्ति (च) अवक्तव्यो जीव षष्ठो भंगः।।६।। स्यादस्ति नास्ति अवक्तव्यो जीव इति सप्तमो भंगः।।७।।

17

        हे लोक जीवाखेरीज ईश्वर हे दुसरे चेतन तत्व आहे, असे मानीत नाहीत. कोणीही अनादी सिद्ध ईश्वर नाही, असे बौद्ध व जैन लोक मानतात.
        अर्थ: जीव आहे, असे म्हटले असता जीवाच्या विरोधी जड पदार्थांच्या जीवामध्ये अभाव होतो. हा प्रथम भंग होय. जडा मध्ये जीव नाही, असे म्हणणे हा दुसरा भंग होय. जीव आहे परंतु तो अवर्णनीय आहे, हा तिसरा भंग होय. जेव्हा जीव शरीर धारण करतो तेव्हा तो प्रकट असतो आणि जेव्हा तो शरीरापासून वेगळा होतो तेव्हा अप्रकट राहतो, असे म्हणणे हाच चतुर्थ भंग होय. जीव नक्की आहे परंतु त्याचे वर्णन करणे अशक्य आहे, असे म्हणणे हा पाचवा भंग होय. जीव प्रत्यक्ष प्रमाणाने दाखविता येत नाही म्हणून तो डोळ्यांना दिसत नाही, असे म्हणणे हा सहावा भंग होय. एका वेळी अनुमानाने जीवाचे असणे व अदृश्यत्वामुळे त्याचे नसणे, समान स्थितीत न राहणे परंतु क्षणोक्षणी परिणामाला प्राप्त होणे. अस्ति-नास्ति न होणे व नास्ति-अस्ति असा व्यवहारही न होणे हा सातवा भंग होय.
       अशा प्रकारे ही नित्यत्व सप्तभंगी व अनित्यत्व सप्तभंगी आहे. तसेच सामान्य धर्म, विशेष धर्म, गुण व पर्याय या प्रत्येक वस्तू मध्ये सप्तभंगी असते. तसेच द्रव्य, गुण, स्वभाव व पर्याय अनंत असल्यामुळे सप्तभंगीही अनंत असते. हा असा बौद्ध व जैन लोकांचा स्याद्वाद आणि सप्तभंगी न्याय म्हटला जातो.

(समीक्षक) हे म्हणणे एका अन्योन्यभावातील साधर्य व वैधर्म्य यांना लागू पडू शकते. हे सरळ प्रकरण सोडून अवघड जाळे रचणे, हे केवळ अज्ञानी लोकांना फसविण्यासाठी असते. पाहा ! जीवाचा अजीवामध्ये अजीवाचा जीवामध्ये अभाव असतोच. जीव आणि जड (अचेतन) दोहोंमध्ये वर्तमानत्व (विद्यमानत्व) असल्यामुळे त्यांच्यात साधर्म्य आहे आणि एक चेतन व दुसरा जड (अचेतन) असल्यामुळे त्यांच्यात वैधर्म्य आहे. अर्थात जीवामध्ये चेतन (अस्तित्व) आहे व जडत्व (अचेतनत्व) नाही. याचप्रकारे जड़ामध्ये जडत्व (अचेतनत्व) आहे आणि चेतनत्व नाही. यावरून हे स्पष्ट होते की, गुणकर्मस्वभावाचे समान धर्म व विरुद्ध धर्म यांच्या विचाराच्या योगाने या लोकांचे सप्तभंगी व स्याद्वाद सहज लक्षात येऊ शकतात. मग एवढे सारे अवडंबर कशासाठी? या बाबतीत बौद्ध व जैन यांचे एक मत आहे. थोडासा वेगळेपणा असल्याने भिन्न भावही असतो.

        आता यानंतर केवळ जैनमताचे विवेचन करतो.

चिदचिद् द्वे परे तत्त्वे विवेकस्तद्विवेचनम्। उपादेयमुपादेयं हेयं हेयं च कुर्वत ।।१।। सर्वदर्शन संग्रह, आर्हत जैन दर्शन।।

जैन लोक चित्' आणि 'अचित्' म्हणजे चेतन व जड (अचेतन) ही दोनच परतत्वे मानतात. या दोहोंच्या विवेचनाचे नाव विवेक असे आहे. जे-जे ग्रहण करण्यास योग्य आहे त्याचे ग्रहण करणे आणि जे-जे त्याज्य आहे त्याचा त्याग करणे, हे जो करतो त्याला विवेकी असे म्हणतात. ॥१॥

हेयं हि कर्तृरागादि तत्कार्य्यमविवेकिन । उपादेयं परं ज्योतिरुपयोगैकलक्षणम्।।२।। सर्वदर्शन संग्रह, आर्हत जैन दर्शन पृ० १६।।

18

       जगाचा कर्ता, रागादी विकार आणि 'ईश्वराने जग निर्माण केले' या अविवेकी मताचा त्याग करणे, तसेच योगाने लक्षित होणाऱ्या परमज्योतिस्वरूप जीवाचे ग्रहण करणे हे उत्तम आहे.॥२॥
       हे लोक जीवाखेरीज ईश्वर हे दुसरे चेतन तत्त्व आहे, असे मानीत नाहीत. कोणीही अगदी सिद्ध ईश्वर नाही, असे बौद्ध व जैन लोक मानतात.
       या विषयी राजा शिवप्रसादजी 'इतिहासतिमिर नाशक' ग्रंथात लिहितात की, यांची दोन नावे आहेत: एक जैन व दुसरे बौद्ध. हे दोन्ही पर्यायवाची शब्द आहेत. बौद्धांमध्ये वाममार्गी, मद्यमांसाहारी बौद्ध आहेत. त्यांना जैनांचा विरोध आहे. परंतु महावीर व गौतम गणधर आहेत. त्यांचे नाव बौद्धांनी बुद्ध ठेवले आहे आणि जैनांनी गणधर व जिनवर असे ठेवले आहे. यांतील जिन यांची परंपरा जैनमताची आहे त्या राजा शिवप्रसादजींनी आपल्या 'इतिहासतिमिरनाशक' ग्रंथाच्या तिसन्या खंडात असे लिहिले आहे की,"स्वामी शंकराचार्यांच्या आधी संपूर्ण भारतवर्षात बौद्ध अथवा जैन पंथ पसरलेला होता. शंकराचार्य हे सुमारे एक हजार वर्षांपूर्वी होऊन गेले आहेत." यावर त्यांची टिप्पणी अशी आहे. "आम्ही जेव्हा बौद्धमत असे म्हणतो तेव्हा त्यांचा अर्थ असा की, गणधर महावीर अथवा गौतम स्वामी यांच्या काळापासून स्वामी शंकर यांच्या काळापर्यंत जो वेद विरोधी धर्म संपूर्ण भारत वर्षात पसरलेला होता त्याला उद्देशून आम्ही तो शब्द वापरला आहे. सम्राट अशोक व संप्रती महाराज हे त्या पंथाचे अनुयायी आहेत. जैन लोक या पंथामधून कोणत्याही प्रकारे बाहेर पडू शकत नाहीत किंवा अलिप्त राहू शकत नाहीत. जिन या शब्दापासून जैन आणि बुद्ध शब्दापासून बौद्ध हा शब्द तयार झाला आहे. जिन व बुद्ध हे दोन्ही पर्यायवाची शब्द आहेत. शब्दकोशामध्ये त्या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ सांगितलेला आहे आणि गौतमाला दोन्ही पंथाचे लोक मानतात. एवढेच नव्हे तर दीपवंश वगैरे प्राचीन बौद्ध ग्रंथांमध्ये शाक्यमुनी गौतमबुद्ध यांचा उल्लेख बहुतेक ठिकाणी महावीर या नावानेच केला आहे. यावरून त्यांच्या काळी त्या दोघांचा एकच संप्रदाय चालू असावा असे दिसते. आम्ही गौतमांच्या अनुयायांना उद्देशून जैन हा शब्द वापरता बौद्ध हा शब्द वापरला आहे, याचे कारण एवढेच आहे की, इतर देशांतील लोकांनी त्यांना उद्देशून बौद्ध हाच शब्द वापरला आहे. 'अमरकोशातही' असेच लिहिले आहे:-

सर्वज्ञ सुगतो बुद्धो धर्मराजस्तथागत । समन्तभद्रो भगवान्मारजिल्लोकजिज्जिन ।।१।। षडभिज्ञो दशबलोऽद्वयवादी विनायक । मुनीन्द्र श्रीघन शास्ता मुनि शाक्यमुनिस्तु य ।।२।। स शाक्यसिह सर्वार्थ सिद्धश्शौद्धोदनिश्च स । गौतमश्चार्कबन्धुश्च मायादेवीसुतश्च स ।।३।।-अमरकोश कां० १। वर्ग १। श्लोक ८-१०।।

        आता तुम्हीच पाहा. बुद्ध, जिन आणि बौद्ध व जैन ही एकाचीच नावे आहेत की नाहीत? अमरसिंहही बुद्ध व जिन एक आहेत, असे लिहिण्यामध्ये चुकला काय? जे अविद्वान जैन आहेत ते आपलेही जाणत नाहीत आणि दुसऱ्याचेही जाणत नाहीत. ते केवळ हठ्ठाने  बरळत असतात. परंतु जैनांमध्ये जे विद्वान आहेत ते सर्व जाणतात की 'बुद्ध व जिन' आणि 'बौद्ध व जैन' हे पर्यायवाची शब्द आहेत, यात मुळीच संशय नाही.

19

      जैन लोक असे म्हणतात की, जीवच परमेश्वर होतो. ते आपल्या तीर्थकरांनाच केवली, मुक्तिप्राप्त व परमेश्वर मानतात. अगदी परमेश्वर असा कोणी नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सर्वज्ञ, वीतराग, अर्हन, केवली, तीर्थकृत, जिन ही सहा नास्तिकांच्या देवांची नावे आहेत. आदिदेवाचे स्वरूप चंद्रसूरीने 'आप्तनिश्चयालङ्कर' या ग्रंथात असे लिहिले आहे:-

सर्वज्ञो वीतरागादिदोषस्त्रैलोक्यपूजित । यथास्थितार्थवादी च देवोऽर्हन् परमेश्वर ।।१।। स०स०आ०द०पृ० ५६।।

जो रागादी (मोहादि) दोषांनी रहित, लोक्यामध्ये पूजनीय, यथावत पदार्थाचा वक्ता, सर्वज्ञ असा अर्हन देव आहे. तोच परमेश्वर होय. ॥१॥ त्याचप्रमाणे 'तौतातितां' (तुतातित-भट्ट कुमारिल) नीही लिहिले आहे:-

सर्वज्ञो दृश्यते तावन्नेदानीमस्मदादिभि । दृष्टो न चैकदेशोऽस्ति लिंगं वा योऽनुमापयेत्।।२।। आर्हत-दर्शन पृ०५६।।

आपण यावेळी ज्याअर्थी परमेश्वराला पाहत नाही त्याअर्थी कोणी सर्वज्ञ व अनादी परमेश्वर प्रत्यक्ष अस्तित्वात नाही. ईश्वराच्या बाबतीत प्रत्यक्ष प्रमाण नसल्यामुळे अनुमान प्रमाणही लागू पडत नाही. कारण कोणत्याही पदार्थाचा एक भाग प्रत्यक्ष दिसल्याखेरीज त्याच्याविषयी अनुमान करता येत नाही. ॥२॥

न चागमविधि कश्चिन्नित्यसर्वज्ञबोधक । न च तत्रर्थवादानां तात्पर्यमपि कल्पते।।३।। आर्हत-दर्शन पृ०५६।।

ज्याअर्थी प्रत्यक्ष व अनुमान ही प्रमाणे विद्यमान नाहीत त्याअर्थी आगम म्हणजे शब्द प्रमाणही नित्य, अनादी, सर्वज्ञ, परमात्म्याचा बोधक होऊ शकत नाही. ज्याअर्थी ही तीन्ही प्रमाणे संभवत नाहीत त्याअर्थी अर्थवाद म्हणजे स्तुती, निंदा व परकृती म्हणजे दुसऱ्याच्या चरित्राचे वर्णन व पुराकल्प म्हणजे इतिहासाचे तात्पर्यही (संदर्भही) लागू पडत नाहीत॥३॥

न चान्यार्थप्रधानैस्तैस्तदस्तित्वं विधीयते। न चानुवादितुं शक्यः पूर्वमन्यैरबोधित ।।४।। आर्हत-दर्शन पृ०५६।।

तसेच अन्यार्थप्रधान म्हणजे बहुर्वाही समासाप्रमाणे परोक्ष परमात्म्याच्या सिद्धीचे विधानही होऊ शकत नाही. तसेच ईश्वराच्या उपदेशकांकडून ऐकल्याशिवाय ईश्वराचे गुण, कर्म, स्वभाव इत्यादींचा अनुवाद (पुनरुच्चार) तरी कसा होऊ शकेल ? ॥४॥

        (या मताचे प्रत्याख्यान म्हणजे खंडन) जर अनादी ईश्वर नसता तर 'अर्हन्' देवांच्या मातापितादिकांच्या शरीराचा साचा कोणी बनविला असता ? संयोगकर्त्यावाचून यथायोग्य, सर्व अवयवांनी संपन्न, यथोचित कार्य करण्यास उपयुक्त, असे शरीर तयार होऊ शकत नाही आणि ज्या पदार्थाचे शरीर बनले आहे ते जड (अचेतन) असल्यामुळे ते स्वतःच अशा प्रकारच्या उत्तम रचनेने युक्त शरीर धारण करू शकत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये यथायोग्य बनण्याचे ज्ञानच नाही. तसेच जो प्रथमत: रागादी (मोहादि) दोषांनी युक्त असतो व नंतर दोष रहित

20 बनतो तो कधीही ईश्वर होऊ शकत नाही. कारण ज्या निमित्ताने तो रागादी (मोहादि) कांपासून मुक्त होतो ते मुक्तीचे निमित्त नाहीसे झाल्यावर त्या निमित्ताचे कार्य जी मुक्ती तीच अनित्य होईल. जो अल्प व अल्पज्ञ आहे तो सर्वव्यापक व सर्वज्ञ कधीच होऊ शकत नाही. कारण जीवाचे स्वरूप एकदेशी असते आणि तो परिमित गुणकर्मस्वभावयुक्त असतो. तो सर्व विद्यांमध्ये सर्व प्रकारे यथार्थवक्ता होऊ शकत नाही. म्हणून तुमचे तीर्थकर कधीच परमेश्वर होऊ शकत नाहीत. ॥१॥

      जे पदार्थ प्रत्यक्ष दिसतात त्यांनाच तुम्ही मानता काय ? अप्रत्यक्षाना नाही ? ज्याप्रमाणे कानांनी रूपाचे व डोळ्यांनी शब्दाचे ग्रहण होऊ शकत नाही. त्याप्रमाणे परमेश्वराचे ग्रहणही इंद्रिये करू शकत नाहीत. अनादी परमात्म्याला पाहण्याचे साधन शुद्ध अंत:करण हे आहे. विद्या आणि योगाभ्यास यांनी पवित्र बनलेला आत्मा परमात्म्याला प्रत्यक्ष पाहू शकतो. ज्याप्रमाणे अभ्यास केल्यावाचून विद्येच्या प्रयोजनांची प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे योगाभ्यास व विज्ञान यांच्यावाचून परमात्माही दिसत नाही. ज्याप्रमाणे भूमीचे रूपादी गुण पाहून व जाणूनच गुणांच्या अव्यवहित संबंधाने पृथ्वी प्रत्यक्ष होत असते; त्याप्रमाणे परमेश्वराने केलेली या सृष्टितील अद्भुत रचना पाहून त्याचे बुद्धीद्वारे जणू प्रत्यक्षच झाल्यासारखे जाणवते. तसेच जेव्हा पापाचरणाची इच्छा होते त्यावेळी मनात जी भीती, शंका व लज्जा उत्पन्न होते, ती अंतर्यामी परमात्म्याच्या प्रेरणेनेच होत असते. त्यातूनही परमात्मा प्रत्यक्ष होतो. मग अनुमान होण्यामध्ये काय संशय? ॥२॥
        प्रत्यक्ष व अनुमान यांची प्रमाणे अशा प्रकारे उपलब्ध होत असल्याने आगम प्रमाणही नित्य, अनादि, सर्वज्ञ ईश्वराचे बोधक होते. म्हणून ईश्वराच्या बाबतीत शब्द प्रमाणही विद्यमान असते. ज्याअर्थी या तीन्ही प्रमाणांच्या साह्याने जीव ईश्वराला जाणू शकतो त्याअर्थी अर्थवाद म्हणजे परमेश्वराच्या गुणांची प्रशंसा करणे हेही यथार्थ असू शकते. कारण जे पदार्थ नित्य आहेत त्यांचे गुणकर्मस्वभावही नित्य असतात. त्यांची प्रशंसा करण्यास कसलीच आडकाठी नाही. ॥३॥
        ज्याप्रमाणे मनुष्यांमध्ये कर्यावाचून कोणतेही कार्य होत नाही त्याचप्रमाणे हे महत्कार्य कर्त्यावाचून नाही. उपदेश करणाऱ्यांकडून परमाल्याचे गुणगान ऐकल्यानंतर त्याचा पुनरुच्चार करणेही सोपे आहे.॥४॥
     यावरून जैन लोक प्रत्यक्षादी प्रमाणांनी ईश्वराचे जे खंडन करतात ते कसे अनुचित आहेहे लक्षात येईल.

(प्रश्न) अनादेरागमस्यार्थो न च सर्वज्ञ आदिमान्।

       कृत्रिमेण त्वसत्येन स कथं प्रतिपाद्यते।।१।। आर्हत-दर्शन पृ०५६, ५, ७।।
     यामध्ये सर्वज्ञ झालेला अनादी शास्त्राचा अर्थ होऊ शकत नाही. कारण असत्यवचनाने सर्वज्ञ परमात्म्याचे प्रतिपादन कसे होऊ शकेल?॥१॥

अथ तद्वचनेनैव सर्वज्ञोऽन्यै प्रतीयते। प्रकल्प्येत कथं सिद्धिरन्योऽन्याश्रययोस्तयो ।।२।। आर्हत-दर्शन पृ०५६, ५, ७।।

जर परमेश्वराच्याच वचनाने परमेश्वर सिद्ध होत असेल तर अनादी ईश्वराने अगदी शास्त्राची सिद्धी आणि अनादी शास्त्राने अनादी ईश्वराची सिद्धी हा अन्योन्याश्रय दोष घडतो. ॥२॥


21 सर्वज्ञोक्ततया वाक्यं सत्यं तेन तदस्तिता । कथं तदुभयं सिध्येत् सिद्धमूलान्तरादृते।।३।। आर्हत-दर्शन पृ०५६, ५, ७।।

कारण सर्वज्ञाच्या कथनानुसार वेदवाक्य हे सत्य मानावयाचे आणि त्याच वेदवचनाच्या आधारे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करावयाचे, हे कसे होऊ शकेल ? वेदशास्त्र व परमेश्वर यांच्या सिद्धीसाठी एखादे तिसरे प्रमाण हवे. जर तसे मानाल तर अनवस्था हा दोष घडेल. ॥३॥

(उत्तर) आम्ही परमेश्वराला आणि त्याच्या गुणकर्मस्वभावाला अनादी मानतो, अनादी, नित्य पदार्थामध्ये अन्योन्याश्रय दोष येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे कार्यावरून कारणाचे ज्ञान होते आणि कारणांवरून कार्याचा बोध होतो. कारण, कार्यामध्ये कारणाचा स्वभाव आणि कारणामध्ये कार्याचा स्वभाव नित्य असतो. त्याप्रमाणे परमेश्वर आणि त्याचे विद्यादी अनंत गुण नित्य असल्याने वेद हे ईश्वर प्रणीत आहेत, असे म्हणण्यात अनवस्था हा दोष घडत नाही.॥१।२।३॥

     तुम्ही तीर्थंकरांना परमेश्वर मानता ते कधीच खरे असू शकत नाही. कारण आईबापांवाचून त्यांचे शरीर निर्माण झाले नसते. मग त्यांनी तपश्चर्या करून ज्ञानवमुक्ती कशी मिळवली असती? तसेच संयोगाचा आरंभ अवश्य असला पाहिजे. कारण वियोगावाचून संयोग होऊ शकत नाही. म्हणून अनादी सृष्टीकर्ता परमात्मा मानला पाहिजे.
      पाहा ! कोणी कितीही सिद्ध पुरुष असला तरी शरीरादिकाची रचना तो पूर्णपणे जाणू शकत नाही. तेव्हा सिद्ध जीव सुषुप्तीच्या म्हणजे स्वप्नरहित गाढ झोपेच्या अवस्थेत जातो तेव्हा त्याला कसलेही भान राहत नाही. जेव्हा जीव दुःखी होतो तेव्हा त्याचे ज्ञानही कमी होते. अशा मर्यादित सामर्थ्याच्या वपरिमित स्थानात राहणाऱ्या वस्तूला ईश्वर मानणे, ही गोष्ट भ्रमिष्ट बुद्धीच्या जैनांखेरीज कोणाकडूनही होणार नाही. जर तुमचे म्हणणे असे असेल की, तीर्थकर हे त्यांच्या आईबापांपासून निर्माण झालेतर ते आई बाप कोणापासून उत्पन्न झाले? आणि त्यांचे आई बाप, त्यांच्या आईबापांचे आईबाप कोणापासून उत्पन्न झाले ? अशी अवस्था होईल.

आस्तिक-नास्तिक संवाद

        यानंतर 'प्रकरण रत्नाकरा' च्या दुसऱ्या भागातील आस्तिक व नास्तिक यांच्या संवादातील प्रश्नोत्तरे आम्ही येथे देत आहोत. मोठमोठ्या जैनांनी या संवादाला मान्यता दिलेली असून तो त्यांनी मुंबईत छापून प्रसिद्ध केला आहे.

(नास्तिक) ईश्वराच्या इच्छेने काही होत नाही. जे काही होते ते कर्माने होते.

(आस्तिक) जर सर्व कमानि होते तर कर्म कशाने होते? जीवादिकांकडून कर्म होते असे तुमचे म्हणणे असेल तर ज्या श्रोतादी साधनांनी जीव कर्म करतो तो साधने कोणापासून उत्पन्न झाली? जर तुमचे असे म्हणणे असेल की, ती अनादिकाळापासून आहेत आणि स्वभावतः उत्पन्न होतात तर अगदीचे सुटणे अशक्य होऊन तुमच्या मते मुक्तीचा अभाव होईल. जर तुम्ही असे म्हणाल की, प्राक अभाववत अनादी सांत आहेत, तर प्रयत्नावाचून सारी कर्मे निवृत्त होऊन जातील. जर ईश्वर फळ देणारा नसेल तर जीव स्वेच्छेने पापाचे फळ

22 असणारे दुःख कधीच भोगणार नाही. ज्याप्रमाणे चोर वगैरे चोरीचे फळ असणारी शिक्षा स्वेच्छेने भोगत नाहीत, राज्यव्यवस्थेमुळे भोगतात. त्याचप्रमाणे परमेश्वराने भोगावयास भाग पाडल्यामुळे जीव पापाची व पुण्याची फळे भोगतात. तसे झाले नाही तर कर्मसंकर होईल. एकाची कर्में दुसऱ्याला भोगावी लागतील.

(नास्तिक) ईश्वर अक्रिय आहे. कारण तो जर कर्म करणारा असता तर त्यालाही कर्माचे फळ भोगावे लागले असते. जसे आम्ही केवली प्राप्त मुक्तांना अक्रिय मानतो तसे तुम्हीही माना.

(आस्तिक) ईश्वर अक्रिय नसून सक्रिय आहे. जर तो चेतन आहे तर कर्ता कसा नसेल ? आणि जर तो कर्ता आहे तर क्रियेहून वेगळा कधीही राहू शकणार नाही. तुम्ही तुमच्या कृत्रिम, बनावटी तीर्थकरांना जीवांपासून बनलेले ईश्वर मानता. अशा प्रकारच्या ईश्वराला कोणीही विज्ञान मानू शकत नाही. कारण जर निमित्त कारणांनी ईश्वर बनला तर तो अनित्य व पराधीन होईल. कारण ईश्वर बनण्यापूर्वी तो जीव होता. नंतर काही कारणांनी तो ईश्वर बनला तरी पुनः जीव होईल. जीव आपला जीवत्व स्वभाव कधीही सोडू शकत नाही. कारण तो अनंत काळापासून जीव असून अनंत काळापर्यंत जीवच राहणार आहे. म्हणून हा अनादी स्वयंसिद्ध ईश्वर मानणे योग्य होय.

    पाहा ! वर्तमान काळामध्ये जीव जसे पाप-पुण्य करतो व सुखदु:ख भोगतो तसे ईश्वर कधीही करीत नाही. ईश्वर क्रियावान नसता तरतो या जगाची निर्मिती कसा करू शकला असता? जर तुम्ही कर्मांना प्राक अभावत अनादी सांत मानत असाल तर ते कर्म समवाय संबंधाने राहणार नाही. जर समवाय संबंध नसेल तर ते संयोगजन्य बनून अनित्य होते. मुक्तीमध्ये क्रियाच नसते असे तुम्ही मानता. तर मग ते मुक्त जीव ज्ञानवान असतात की नाही ? तसे ते असतात असे तुमचे म्हणणे असेल तर ते अंतःक्रियायुक्त ठरतात. नाहीतर ते काय मुक्तीमध्ये पाषाणवत जड होऊन जातात व एके ठिकाणी पडून राहतात आणि कसलीही हालचाल करीत नाहीत ? तसे असेल तर ही मुक्ती कसली? ते तर अंध:कारात व बंधनात पडणे झाले.

(नास्तिक) ईश्वर सर्वव्यापक नाही. तो सर्वव्यापी असता तर सगळ्या वस्तू चेतन का नसतात? आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादींची उत्तम, मध्यम, निकृष्ट अवस्था का झाली? जर ईश्वर सर्वांमध्ये समान रूपाने व्याप्त असेल तर लहान, मोठा असा फरक असता कामा नये.

(आस्तिक) व्याप्य व व्यापक हे एकच असत नाहीत. व्याप्य हा एकदेशी म्हणजे स्थानिक किंवा स्थानसीमित असतो आणि व्यापक हा सर्वदशी म्हणजे सर्वत्र पसरलेला असतो. आकाश हे सर्वव्यापक आहे आणि भूगोल व घटपटादी सर्व व्याप्य गोष्टी एकदेशी आहेत. जसे पृथ्वी व आकाश हे एक माहीत तसे ईश्वर व जग हे एक नाहीत. ज्याप्रमाणे सर्व घटपटादिकांमध्ये आकाश व्यापक आहे आणि घटपटादी आकाश नाही त्याप्रमाणे चेतन परमेश्वर सर्वांमध्ये भरून राहिलेला असला तरी सर्व पदार्थ चेतन होत नाहीत. ज्याप्रमाणे आकाश सर्वांमध्ये समान असते आणि पृथ्वी आदी पदार्थाचे अवयव समान नसतात त्याप्रमाणे परमेश्वरासमान कोणी नाही. ज्याप्रमाणे विद्वान व अविद्वान, धर्मात्मा व अधर्मात्मा यांची बरोबरी होऊ शकत नाही त्याप्रमाणे विद्यादी सद्गुण, सत्यभाषणादि सत्कर्में, सुशीलतादी स्वभाव यांच्या न्यूनाधिक्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य,

23 शुद्र व अंत्यज हे लहान वा मोठे मानले जातात. वर्णासंबंधीचे विवेचन चतुर्थ समुल्लासात आम्ही केले आहे ते पाहावे.

(नास्तिक) ईश्वराने जगाचे आधिपत्य आणि जगतरूपी ऐश्वर्य यांचा स्वीकार कशासाठी केला ?

(आस्तिक) ईश्वराने जगाचे आधिपत्य कधीही ग्रहण केले नव्हते अथवा सोडलेही नव्हते. पतु आधिपत्य आणि जगतरूपी ऐश्वर्य या गोष्टी ईश्वरामध्येच आहेत. तो त्यापासून कधी वेगळा होऊ शकत नाही. तेव्हा ग्रहण काय करणार? कारण अप्राप्त असेल त्याचेच ग्रहण होऊ शकते. व्याप्यापासून व्यापक आणि व्यापकापासून व्याप्य कधी वेगळे होऊ शकत नाही. त्यामुळे अनादी काळापासून सदैव स्वामित्व व अनंत ऐश्वर्य ईश्वरामध्ये आहे, त्याचे ग्रहण व त्याग जीवांच्या बाबतीत घडू शकते. ईश्वराबाबतीत ती शक्यता नसते.

(नास्तिक) ईश्वराने रचल्यामुळे सृष्टी अस्तित्वात आली असेल तर आईबापांचे कार्य काय?

(आस्तिक) ऐश्वरी सृष्टीचा कर्ता ईश्वर आहे. तो जीवसृष्टीचा कर्ता नाही. जीवांची जी कर्तव्यकर्में आहेत ती ईश्वर करीत नाही. ती जीवच करतात. जसे वृक्षफळे औषधी, अन्न इत्यादी गोष्टी ईश्वराने उत्पन्न केल्या आहेत. आता त्या वस्तू घेऊन त्या दळून, कुटून, पोळी, भाकरी वगैरे पदार्थ माणसाने बनविले व खाल्ले नाहीत तर त्याच्या ऐवजी परमेश्वर त्या गोष्टी करील काय? जीवांनी या गोष्टी केल्या नाहीत तर जीवन जगणेच शक्य नाही. म्हणून आदी सृष्टीमध्ये जीवांच्या शरीरांचे साचे बनविणे हे ईश्वराधीन असते. त्यानंतर त्यांपासून पुत्रादींची उत्पत्ती करणे हे जीवांचे कर्तव्य कर्म असते.

(नास्तिक) जर परमात्मा शाश्वत, अनादी, चिदानंद, ज्ञानस्वरूप आहे तर जगाच्या प्रपंचात व दुःखात तो का पडला ? आनंद सोडून दुःख ग्रहण करण्याचे असले काम कोणी सामान्य मनुष्यही करीत नाही. मग ईश्वराने ते का केले?

(आस्तिक) परमेश्वर कसल्याही कटकटीत व दुःखात पडत नाही. तो आपल्या आनंदाचा त्यागही करीत नाही. कारण कटकटीत व दुःखात पडणे ही गोष्ट जो एकदेशी व मर्यादित असेल त्याच्या बाबतीत संभवते. जो सर्वदशी आहे त्याच्या बाबतीत ती संभवत नाही. जर अनादी, चिदानंद, ज्ञानस्वरूप परमात्मा जगाची उत्पत्ति करणार नाही तर दुसरा कोण करू शकेल ? जग निर्माण करण्याचे सामर्थ्य जीवामध्ये नाही, आणि जडामध्ये स्वतः बनण्याचेही सामर्थ्य नाही. यावरून हे सिद्ध होते की, परमात्माच जगाची निर्मिती करतो व सदा आनंदात राहतो. परमात्मा जसा परमाणूपासून सृष्टी निर्माण करतो तसा मातापितारूपी निमित्त कारणाच्या योगाने जीवाची उत्पत्ती होण्याच्या व्यवस्थेचा नियम त्यानेच केला आहे.

(नास्तिक) ईश्वर मुक्तिरूपी सुख सोडून जगाची सृष्टी करणे, ती धारण करणे व प्रलय करणे या भानगडीत कशाला पडला?

(आस्तिक) ईश्वर सदैव मुक्त असल्यामुळे तुमच्या साधनांनी सिद्ध झालेल्या, एका देशात राहणाऱ्या, बंधनपूर्वक मुक्तीने युक्त अशा तीर्थंकरांप्रमाणे तो सनातन परमात्मा नाही. जो अनंतस्वरूपी, गुणकर्मस्वभावयुक्त परमात्मा आहे तो या किंचित मात्र जगाची उत्पत्ति, स्थिती व लय करीत असूनही बंधनात पडत नाही. कारण

24 बंधन व मोक्ष या गोष्टी परस्पर सापेक्ष आहेत. जसे मुक्तीच्या अपेक्षेने बंधन आणि बंधनाच्या अपेक्षेने मुक्ती होते असते. जो कधी बद्ध नव्हता त्याला मुक्त कसे म्हणता येईल? जे जीव एकदेशी असतात तेच सदा बद्ध व मुक्त होत असतात अनंत, सर्वदशी, सर्वव्यापक ईश्वर, तुमच्या तीर्थकरांप्रमाणे नैमित्तिक बंधन-मुक्तीच्या चक्रात कधी अडकत नाही. म्हणून तो परमात्मा सदैव मुक्त असतो, असे म्हटले जाते.

(नास्तिक) भांग घेतली असता तिची नशा जशी भांग पिणाऱ्याला आपोआपच भोगावी लागते. तसेच जीव कर्माची फळे भोगतात. त्यात ईश्वराचा काहीही संबंध नाही.

(आस्तिक) राजाचे शासन नसेल तर चोर, डाकू, लंपट इत्यादी दुष्ट माणसे स्वतः होऊन तुरुंगात किंवा फाशीला जात नाहीत किंवा जाऊ इच्छित नाहीत. परंतु राज्याच्या न्यायव्यवस्थेप्रमाणे त्यांना बळजबरीने पकडून राजा त्यांना शिक्षा देत असतो. याचप्रमाणे जीवालाही ईश्वर त्याच्या कर्मानुसार न्यायव्यवस्थेच्या योगाने यथायोग्य शिक्षा देतो. कारण कोणताही जीव आपल्या दुष्टकर्माची फळे भोगू इच्छित नाही. म्हणून न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायाधीश म्हणून परमेश्वराची आवश्यकता आहे.

(नास्तिक) जगामध्ये एक ईश्वर असून जितके मुक्त जीव आहेत ते सगळे ईश्वर आहेत.

(आस्तिक) हे म्हणणे पूर्णपणे निरर्थक आहे. कारण जो प्रथम बद्ध असतो तो मुक्त होऊन पुनःबंधनात अवश्य अडकतो. कारण तो स्वाभाविकपणे सदैव मुक्त नसतो. तुमचे चोवीस तीर्थकर पूर्वी बद्ध होते. नंतर ते मुक्त झाले. ते पुन:बंधनात अवश्य पडतील. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जीवांसारखेच ईश्वरही अनेक असतील तर जीव अनेक असल्यामुळे जसे आपसात भांडतात तसे ईश्वरही आपसात मारामाऱ्या करतील.

(नास्तिक) हे मूढ जगाचा कर्ता (निर्माता) कोणी नाही. जग हे स्वयंसिद्ध आहे.

(आस्तिक) ही जैनांची फार मोठी घोडचूक आहे. कर्त्यावाचून कोणतेही कर्म आणि कर्मावाचून कोणतेही कार्य होत असलेले जगात दिसते काय ? गव्हाच्या शेतात गहू आपोआप दळले जाऊन त्यांच्या चपात्या बनून त्या जैनांच्या पोटात जाव्यात अशी ही गोष्ट आहे. कापसापासून सूत, कापड व अंगरखा, दुपट्टा, धोतर, पगडी इत्यादी कपडे आपोआप बनत नाहीत. जर असे आहे तर का ईश्वरावाचून हे विविध जग आणि नाना प्रकारची विशेष रचना कशी बनू शकेल ? जर तुम्ही हठ्ठाने हे जग स्वयंसिद्ध आहे असे मानणार असाल तर वर सांगितली वस्त्रे कर्त्यावाचून आपोआप तयार होतात असे तुम्ही प्रत्यक्ष दाखवून द्या. जर तुम्ही तसे सिद्ध करू शकत नसाल तर मग तुमचे निराधार कथन कोणता बुद्धिमान मानू शकतो?

(नास्तिक) ईश्वर विरक्त आहे की मोहित? तो विरक्त असेल तर जगाच्या प्रपंचात तो कापडला? जर तो मोहित असेल तर जग बनविण्यास समर्थ होणार नाही.

(आस्तिक) परमेश्वरामध्ये वैराग्य अथवा मोह कधीच संभवत नाही. कारण जो सर्वव्यापक आहे तो कोणाला सोडणार व कोणाचे ग्रहण करणार? ईश्वराहून उत्तम किंवा त्याला अप्राप्त असा कोणताही पदार्थ नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा मोह त्याला होत नाही, वैराग्य व मोह होणे या गोष्टी जीवाच्या बाबतीत घडतात ईश्वराच्या बाबतीत नाही.

25 (नास्तिक) ईश्वराला जगाचा कर्ता व जीवांच्या कर्माची फळे देणारा समजाल तर ईश्वर ऐहिक गोष्टींत गुरफटून दुःखी होईल.

(आस्तिक) पाहा ! अनेकविध कर्मांचा कर्ता आणि प्राण्यांना त्यांच्या कर्मांची फळे देणारा या जगातील धार्मिक, न्यायाधीश, विद्वान माणूस जर कर्मांमध्ये गुंतत नाही व दुःखी होत नाही तर अनंत सामर्थ्यसंपन्न परमेश्वर ऐहिक गोष्टीत कसा गुरफटेल व कसा दुःखी होईल? बाकी तुम्ही स्वतः प्रमाणे व आपल्या तीर्थकराप्रमाणे परमेश्वरासही अज्ञानयुक्त समजता. ही सारी तुमच्या अविवेची लीला आहे. अविद्यादी दोषांपासून मुक्त होण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेदादी सत्य शास्त्रांचा आश्रय घ्या. निष्कारण भ्रमात पडून धक्के का खाता?

जगाच्या अनादीत्वाची समीक्षा

आता जैन लोक जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहातात व मानतात ते त्यांच्या सूत्रांच्या आधाराने आम्ही दाखवतो आणि सूत्रांचा मूळ अर्थ संक्षेपाने सांगून मग खऱ्या खोट्याची समीक्षा करतो:-

मूल– सामि अणाइ अणन्ते, चउगइ संसारघोरकान्तारे।

       मोहाइ कम्मगुरुठिइ, विवाग वसउ भमइ जीवो।। -प्रकरण रत्नाकर भाग दुसरा षष्ठीशतक।। (२) सम्यक्त्वास्वरूपसत्व।। सूत्र २।।
     हे प्रकरण रत्नाकर नावाच्या ग्रंथाच्या 'सम्यक्त्वप्रकाश' या प्रकरणातील गौतम व महावीर यांचा संवाद आहे. याचा संक्षेपाने उपयोगी अर्थ असा आहे की, जग हे अनादि अनंत आहे. याची कधीही उत्पत्ती झाली नाही व कधीही नाश होणार नाही. अर्थात हे जग कोणीही बनविलेली नाही. आस्तिक, नास्तिक संवादामध्ये हीच गोष्ट याच शब्दांत सांगितलेली आहे की, "हे मूढा! जगाचा कर्ता कोणीही नाही. हे कधी बनले नाही आणि याचा नाश कधी होत नाही.

(समीक्षक) जो संयोगाने उत्पन्न होतो तो कधीच अनादी व अनंत असू शकत नाही. तसेच कर्माची उत्पत्ती व विनाश झाल्याखेरीज राहत नाही. जगामध्ये जितके पदार्थ उत्पन्न होतात ते सर्व संयोगजन्य उत्पत्ती व विनाशयुक्त असल्याचे दिसता. मग हे जग उत्पत्तविनाशयुक्त का नाही? म्हणून तुमच्या तीर्थकरंग सम्यक बोध झालेला नव्हता हेच खरे. त्यांना सम्यक ज्ञान झाले असते तर त्यांनी अशा अशक्य गोष्टी कशाला लिहिल्या असत्या ? जसे तुमचे गुरू आहेत तसेच तुम्ही त्यांचे शिष्य आहात. तुमच्या गोष्टी ऐकणाऱ्यांना पदार्थाचे खरे ज्ञान कधीच होऊ शकणार नाही.

    पाहा ! जो प्रत्यक्ष संयुक्त (संयोगजन्य) पदार्थ दिसतो त्याची उत्पत्ती व विनाश तुम्ही का मान्य करीत नाही? अर्थात यांच्या आचार्यांना व जैनांना भूगोल-खगोल विद्याही येत नव्हती; आणि आजही त्यांच्यात ही विद्या नाही. नाहीतर खाली लिहिलेल्या अशक्य गोष्टी त्यांनी का मानल्या व सांगितल्या असत्या?
    पाहा ! या सृष्टीमध्ये पृथ्वीकाय म्हणजे पृथ्वी ही जीवाचे शरीर आहे आणि जलकायादी जीवही आहेत, असे मानतात. पण त्यांचे हे म्हणणे इतर कोणीही मान्य करू शकणार नाहीत. यांच्या असल्याच आणखी काही खोट्या गोष्टी पाहा. ज्या तीर्थकरांना जैन लोक सम्यक ज्ञानी व परमेश्वर मानतात त्यांच्या खोटेपणाचे हे नमुने

26 आहेत. 'रत्नसारभाग' या ग्रंथाच्या १४५ व्या पृष्ठावर काळाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे: (या ग्रंथाला जैन लोक मानतात २८ एप्रिल १८७९ रोजी बनारसच्या जैनप्रभाकर छापखान्यात नानकचंद जती यांनी हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला आहे)

    समयाचे नाव सूक्ष्मकाल असे आहे. असंख्यात समयांना 'आवलि' असे म्हणतात. एक कोटी, सदुसष्टः लाख, सत्तर हजार, दोनशे सोळा आवल्यांचा एक मुहूर्त होतो. अशा तीस मुहूर्ताचा एक दिवस, पंधरा दिवसांचा एक पक्ष, दोन पक्षांचा एक महिना आणि बारा महिन्यांचे एक वर्ष होते. अशा सत्तर लाख कोटी, छप्पन्न हजार कोटी वर्षांचा एक पूर्व होतो. अशा असंख्यात पूर्वीचा एक 'पल्योपम काळ होतो असे म्हणतात.
    असंख्यात म्हणजे काय ? चार कोस चौरस आणि तितकीच खोल अशी एक विहीर खणावी आणि ती जुगुली माणसाच्या शरीरावरील निम्नलिखित केसांच्या तुकड्यांनी भरावी. हल्लीच्या माणसाच्या केसांहून जुगुली माणसाचा केस चार हजार शहाण्णवव्या हिश्श्याने सूक्ष्म असतो. म्हणजे जुगुली माणसाचे चार हजार शहाण्णव केस एकत्र केले तर आजकालच्या माणसाचा एक केस होतो. अशा जुगुली माणसाच्या एका केसांच्या अंगुळाएवढ्या भागाचे सात वेळा आठ-आठ तुकडे केल्यास २०,९७,१५२ म्हणजे वीस लाख, सत्याण्णव हजार, एकशे बावन्न तुकडे होतात. अशा तुकड्यांनी वर सांगितलेली विहीर भरावयाची. त्यातून दर शंभर वर्षांनी एक तुकडा बाहेर काढावयाचा. जेव्हा सर्व तुकडे बाहेर काढले जातील व विहीर रिकामी होईल तेव्हा त्यासाठी जेवढा काळ लागला असेल त्याला 'संख्यात काळ' असे म्हणतात.
    आता त्यांपैकी एकेका तुकड्याचे असंख्यात तुकडे करून तीच विहीर अशी ठासून भरावयची की, तिच्यावरून चक्रवर्ती राजाची सेना चालत गेली तरी तो ढीग दबता कामा नये. त्या तुकड्यांपैकी दर शंभर वर्षांनी एकेक तुकडा काढावयाचा. अशा प्रकारे जेव्हा ती विहीर रिकामी होईल तेव्हा त्यासाठी लागलेला काळ हा त्यात असंख्यात पूर्व पडेल. तेव्हा एक 'पल्योपम' काळ होतो, हा पल्योपम काळ विहीरीच्या दृष्टांतावरून जाणावा.
    जेव्हा दहा कोट्यान् कोटी पल्योपम काळ व्यतीत होतो. तेव्हा एक 'सागरोपम काळ' होतो. जेव्हा दहा कोट्यान् कोटी सागरोपम काळ निघून जातात तेव्हा एक 'उत्सर्प्पिणी काळ' होतो आणि जेव्हा एक उत्सर्प्पिणी व अवसर्प्पिणी काळ व्यतीत होतो तेव्हा एक 'कालचक्र’ होते. जेव्हा अनंत कालचक्रे व्यतीत होतात तेव्हा एक 'पुद्गलपरावर्त' होतो.
    आता अनंत काळ कशाला म्हणावयाचे ? सिद्धांत पुस्तकामध्ये नऊ दृष्टांतानी काळाची संख्या (गणती) केलेली आहे. त्याच्या पलीकडे असणाऱ्या काळाला अनन्तकाळ असे म्हणतात. जीवाचे भ्रमण चालू असतांना असे अनन्त पुद्गल परावर्त काळ व्यतीत झाले आहेत. इत्यादी:

(समीक्षक) गणितज्ञविद्याविशारद लोकहो, ऐका ! जैनांच्या ग्रंथांतील काळ गणना तुम्ही करू शकाल काय? आणि ती गणना तुम्ही खरी मानू शकाल काय? पाहा ! या तीर्थकरांचे गणितविषेचे ज्ञान हे असे होते. ज्यांच्या अविद्येला काही पारावार नाही असे गुरू व शिष्य यांच्या संप्रदायात आहेत. त्यांच्या अफाट अडाणीपणाची आणखी काही उदाहरणे पाहा.

ऋषभदेवापासून महावीरापर्यंत जैनांचे चोवीस तीर्थकर होऊन गेले आहेत. त्यांच्या वचनांचा सारसंग्रह 'रत्नसारभाग' या ग्रंथात करण्यात आला आहेया ग्रंथाच्या पृष्ठ १३३ पासून जैनांचे सिद्धांत प्रेषित करण्यात आले आहेत. या ग्रंथाच्या पृष्ठ १४८ वर असे लिहिले आहे की, माती, दगड इत्यादी पृथ्वीपासून भिन्न असून त्यांना पृथ्वीकाय जीव समजावे. त्यात राहणाऱ्या जीवांच्या शरीराचे परिमाण (आकार) एका अंगुळाचा असंख्यातवा भाग समजावा. म्हणजे असे की ते असंख्य सूक्ष्मजीव असतात. त्यांचे आयुर्मान जास्तीत जास्त २२ हजार वर्षे असते.

'रत्नसारभाग' पू. १४९: वनस्पतीच्या एका शरीरात अनंत जीव असतात. त्यांना साधारण वनस्पती असे म्हणतात. जे कंदमूल प्रमुख व अनंतकाय प्रमुख असतात त्यांना साधारण वनस्पतींचे जीव म्हटले पाहिजे. त्यांचे आयुर्मान अनंतमुहूर्त असते. मात्र येथे पूर्वी सांगितलेला जैन मुहूर्त समजावा.

सामान्य वनस्पतींचे शरीर एकेंद्रिय असते. म्हणजे त्यात फक्त स्पर्शेद्रिय असते. त्यात एक जीव राहतो. त्याला प्रत्येक वनस्पती म्हणतात. या जीवाचे देहमान म्हणजे शरीराची लांबी एक हजार योजने असते. अर्थात पौराणिकांचे योजन ४ कोसांचे असते. परंतु जैनांचे योजन दहा हजार कोसांचे असते. अशा चार हजार कोसांचे एक शरीर असते. त्याचे जास्तीत जास्त आयुर्मान दहा हजार वर्षाचे असते.

आता दोन इंद्रिये असणाऱ्या जीवांची माहिती त्यांचे एक इंद्रिय म्हणजे त्यांचे शरीर व दुसरे इंद्रिय म्हणजे तोंड होय. शंख, कवडी,ऊ वगैरे जीवांचा यात अंतर्भाव होतो. त्यांचे देहमान जास्तीत जास्त अट्ठेचाळीस कोस स्थूल असते आणि आयुर्मान जास्तीत जास्त बारा वर्षाचे असते. येथे या लोकांची फारच मोठी गफलत झालेली दिसते. कारण एवढ्या मोठ्या शरीराचे आयुर्मान जास्त लिहावयास हवे होते. अशा प्रकारची अट्ठेचाळीस कोस लांबी-लंदी असलेली ऊ जैनांच्या शरीरात पडत असणार व त्यांनीच ती पाहिली असणार एवढी मोठी ऊ पाहण्याचे भाग्य इतरांना कसे लाभणार?

'रत्नसारभाग' पू. १५०:यांची आणखी अंदाधुदी पाहा. यांचे विंचू ढेकूण, कसर व माशी हे प्राणी एक योजन लांब शरीराचे असतात. त्यांचे आयुर्मान जास्तीत जास्त सहा महिन्यांचे असते. आता तुम्हीच पाहा. चार-चार कोसांचा विंचू इतर कोणी पाहिला नसेल. आठ मैल लांब शरीर असणारे विंचू व माशाही जैनांच्या ग्रंथात आढळतात. असे विंचू व माशा त्यांच्यात घरांत असतील व त्यांनीच पाहिल्या असतील. जगात इतर कोणी असे विंचू व माशा पाहिल्या नसतील असे विंचू जेव्हा एखाद्या जैनाला चावत असतील तेव्हा त्यांचे काय हाल होत असतील?

मासे वगैरे जलचरांचे शरीरमान एक हजार योजने असते. म्हणजे दहा हजार कोसांचे एक योजन या हिशेबाने त्यांची शरीरे एक कोटी कोस लांब-सुंद असतात आणि त्यांचे आयुर्मान एक कोटी पूर्व वर्षांचे असते. एवढे प्रचंड जलचर जैनांखेरीज इतर कोणीही पाहिले नसतील. हत्ती वगैरे चतुष्पाद प्राण्यांचे देहमान दोन कोसांपासून नऊ कोसांपर्यंत आणि आयुर्मान चौऱ्याऐंशी हजार वर्षाचे असते असे लिहिले आहे. असे प्रचंड

28 शरीरांचे जीवही जैनांनी पाहिले असावेत. म्हणून ते त्यावर विश्वास ठेवतात. इतर कोणी बुद्धिमान् त्यावर विश्वास ठेवूशकणार नाही.

'रत्नसारभाग' पू.१५१ :- जलचर गर्भज जीवांचे देहमान उत्कृष्ट एक हजार योजने म्हणजे १ कोटी कोस आणि आयुर्मान एक कोटी पूर्व वर्षे असते. एवढे मोठे शरीर व आयुर्मान असणारे जीवही यांच्याच आचार्यानी स्वात पाहिले असतील. जी गोष्ट असणे असंभव व कधीच शक्य नाही, ती आहे असे सांगणे हे एक प्रचंड असत्यच नाही काय?



जैनांचे भूमि परिमाण

आता भूमीच्या परिमाणाची कथा ऐका. 'रत्नसारभाग' पू. १५२ः- या तिरप्या लोकात असंख्यात द्वीपे आणि असंख्यात समुद्र आहेत. या असंख्याताचे प्रमाण असे की, अडीच सागरोपम काळात जेवढा काळ येतो तितकी द्वीपे व सागर आहेत, असे समजावे. आता या पृथ्वीमध्ये प्रथम एक 'जंबुद्वीप' सर्व द्वीपांच्या मधोमध आहे. त्याचे क्षेत्रफळ एक लाख योजने म्हणजे चार लाख कोस आहे. त्याच्या सभोवती लवण समुद्र असून त्याचे क्षेत्रफळ दोन लाख योजने म्हणजे आठ लाख कोस आहे. या जंबुद्वीपाच्या सभोवती 'घातकी खंड' नावाचे द्वीप आहे. त्याचे क्षेत्रफळ चार लाख योजने म्हणजे सोळा लाख कोस आहे त्याच्या मागे 'कालोदधी' समुद्र आहे. त्याचे क्षेत्रफळ आठ लाख योजने म्हणजे बत्तीस लाख कोस आहे. त्याच्या मागे 'पुष्करावर्त' द्वीप आहे. त्याचे क्षेत्रफळ सोळा कोस आहे. ते द्वीप वेगवेगळ्या भागात विभागलेले आहे. त्या द्वीपाच्या अध्य भागात माणसांची वस्ती आहे. त्याखेरीज असंख्यात द्वीपे व समुद्र आहेत. त्यांमध्ये तिर्यक योनीतील जीव राहतात.

'रत्नसारभाग' पू. १५३:- जंबुद्वीपामध्ये एक हिमवंत, एक ऐरण्यवंत, एक हरिवर्ष, एक रम्यक, एक दैवकुरू, एक उत्तरकुरू ही सहा क्षेत्रे आहेत.

(समीक्षक) भूगोल विद्या जाणाऱ्या लोकांनो, ऐका, भूगोलाचे मोजमाप करण्यात तुमची चूक झाली आहे की, जैनांची? जर जैनांची चूक असेल तर तुम्ही त्यांना समजावून सांगा आणि तुमची चूक असेल तर त्यांच्याकडून ती समजावून घ्या. थोडा विचार केला असता आपली अशी खात्री पटते की, जैनांच्या आचार्यानी व त्यांच्या शिष्यांनी भूगोल, खगोल व गणित विद्या यापैकी कशाचाही अभ्यास केलेला नाही. जर ते या विद्या शिकले असते तर त्यांनी या अशा अगदीच अशक्य थापा कशाला मारल्या असत्या?

असे अविद्वान पुरुष जगाला अकर्तृक समजत असतील आणि ईश्वर मानीत नसतील तर त्यात काय आश्चर्य ? म्हणून जैन लोक आपले ग्रंथ इतर संप्रदायाच्या विद्वानांना वाचायला देत नाहीत. कारण ज्यांना हे लोक प्रामाणिक तीर्थंकरांनी रचलेले सिद्धांत ग्रंथ असे मानतात, त्यांमध्ये अशाच अडाणीपणाच्या गोष्टी भरलेल्या आहेत. म्हणून ते लोक आपले ग्रंथ कोणाला पाहू देत नाहीत. ते इतरांनी पाहिले तर त्यांचे बिंग फुटेल ना! यांच्याखेरीज थोडी देखील बुद्धी असलेला कोणीही माणूस त्यांच्या या थापा खऱ्या मानणार नाही. हे जग अनादी आहे असे सिद्ध करण्यासाठी जैनांनी हा सारा डोलारा उभा केलेला आहे. पण त्यांचा हा सिद्धांत मुळातच साफ खोटा आहे.

29 अर्थात जगाचे कारण अगदी आहे. कारण ते परमाणू आदी तत्वस्वरूप अकर्तुक आहेत. परंतु त्यांच्यामध्ये नियमपूर्वक संयुक्त अथवा वियुक्त होण्याचे सामर्थ्य मुळीच नाही. द्रव्यांचे परमाणू स्वभावतः पृथक व जडआहेत म्हणून ते स्वतःच्या सामर्थ्याने, आपोआप यथायोग्य बनू शकत नाहीत. म्हणून त्यांना बनविणारा कोणीतरी चेतन अवश्य असला पाहिजे. तो बनविणारा ज्ञानस्वरूप आहे.

असे पाहा ! पृथ्वी, सूर्य आदी सर्व लोक-लोकांतरांना नियमांमध्ये ठेवणे हे अनादी, अनंत व चेतन परमेश्वराचे काम आहे. ज्यामध्ये संयोग व रचना विशेष दिसते ते स्थूल जण कधीही अनादी असू शकत नाही. जर कार्यरूप जगाला नित्य मानले तर त्याचे कारण कोणीही असणार नाही व तेच कार्यकारणरूप होऊन जाईल. तसे तुम्ही म्हणाल तर आपले आपणच कार्य व कारण असे मानण्यामध्ये अन्योन्याश्रय व आत्माश्रय दोष येईल. आपल्या खांद्यावर आपणच चढू शकत नाही आणि आपला पिता आपणच होणे शक्य नसते. म्हणून जगाचा कर्ता अवश्य मानावा लागतो.

(प्रश्न) जगाचा कर्ता ईश्वर आहे असे तुम्ही मानत असाल तर त्या ईश्वराचा कर्ता कोण आहे? (उत्तर) कर्त्याचा कर्ता व कारणाचे कारण कोणी असू शकत नाही. कारण प्रथम कर्ता व कारण असल्यानेच कार्य होते. ज्यामध्ये संयोग-वियोग नसतो, जो प्रथम संयोग-वियोगाचे कारण आहे. त्याचा कर्ता अथवा कारण कोणी असू शकत नाही. या मुद्याचे विशेष विवेचन आठव्या समुल्लासात सृष्टीविषयक चर्चेमध्ये केले आहे. ते पाहावे.

या जैन लोकांना स्थूल गोष्टींचेही नीट ज्ञान नाही. तर मग त्यांना परम सूक्ष्म सृष्टीविद्येचे ज्ञान कसे काय असणार? जैन लोक सृष्टीला अनादी अनंत मानतात. तसेच द्रव्यपर्यायांनाही अनादी अनंत मानतात आणि प्रतिगुण, प्रतिदेश यांमध्ये पर्याय व प्रतिवस्तूमध्येही अनंत पर्याय मानतात. हे सारे 'प्रकरणरत्नाकरा’ च्या प्रथम भागात लिहिले आहे. तसे होणे कधीही शक्य नाही. कारण ज्यांना अंत म्हणजे मर्यादा असते. त्यांचे सर्व संबंधित पदार्थ अंत असणारेच असतात. अनंताला जरी असंख्य म्हटले तरीही ते टिकू शकत नाही. जीवाच्या संदर्भात ही गोष्ट होऊ शकते. परंतु परमेश्वरासमोर ती टिकू शकत नाही. कारण एका-एका-द्रव्यामध्ये आपापल्या एकेका कार्यकारण सामर्थ्याला अविभाग पर्यायांनी अनंत सामर्थ्ययुक्त मानणे हे निव्वळ अडाणीपणाचे आहे जर एकेका परमाणु द्रव्याची सीमा आहे तेव्हा त्यात अनंत विभागरूप पर्याय कसे राहू शकतात ? याचप्रमाणे एकेका द्रव्यामध्ये अनंत गुण आणि एका गुण प्रदेशात अविभागरूप अनंत पर्यायांनाहीं अनंत मानणे हा निव्वळ पोरकटपणा आहे. कारण ज्याच्या अधिकरणाला अंत आहे तर त्यात राहणान्याला अंत का नसेल ? अशाच लंब्याचवड्या खोट्या गोष्टी या ग्रंथात लिहिल्या आहेत.

जीवभिन्नांचे अचेतनत्व

आता जीव व अजीव या दोन पदार्थाविषयी जैनांचे मत असे आहे: चेतनालक्षणो जीव स्यादजीवस्तदन्यक । सत्कर्मपुद्गला पुण्यं पापं तस्य विपर्यय ।। आर्हत-दर्शन पृ०८७।। हे जिनदतसूरीचे वचन आहे आणि हेच प्रकरण रत्नाकराच्या पहिल्या भागातील नयचक्रसार प्रकरणातही

30 लिहिलेले आहे. जीव चेतनालक्षणयुक्त आहे आणि अजीव चेतनारहित म्हणजे जड़ (अचेतन) आहे. सत्कर्मरूप पुद्गल हे पुण्य आणि दुष्कर्मरूप पुद्गल हे पाप आहे.

(समीक्षक) जीव आणि जड (अचेतन) यांचे लक्षण बरोबर आहे. पण जे जडरूप पुद्गल आहेत ते कधीच पापपुण्ययुक्त असू शकत नाहीत. कारण पाप व पुण्य करण्याचा स्वभाव चेतनामध्ये असतो. पाहा ! हे जितके जड (अचेतन) पदार्थ आहेत ते सर्व पापपुण्यारहित आहेत. जीवांना अनादि मानता ते ठिक आहे. परंतु त्याच अल्प व अल्पज्ञ जीवाला मुक्ती लाभल्यानंतर सर्वज्ञ मानणे चूक आहे. कारण जो अल्प व अल्पज्ञ आहे त्याचे सामर्थ्यही सर्वदा मर्यादितच राहाणार.

जैन लोक जग, जीव, जीवाची कर्में व बंधने अनादि आहेत असे मानतात. या बाबतीतही जैनांच्या तीर्थकरांची चूक झालेली आहे. कारण संयुक्त जगताचे कार्यकारण, प्रवाहाने कार्य आणि जीवाचे कर्में, बंधनेही अनादी होऊ शकत नाहीत. जर तुम्ही तसे मानता तर कर्म व बंधन यांपासून मुक्त होणे का मानता? कारण जो पदार्थ अनादी आहे तो कधीच सुटू शकत नाही. जर अनादीचाही नाश होतो असे मानल तर तुमच्या सर्व अनादी पदार्थाचा नाश होतो असे मानण्याचा प्रसंग तुमच्यावर ओढवेल आणि जर तुम्ही अनादीला नित्य मानाल तर कर्म व बंधन हेही नित्य ठरतील. मग सर्व कर्माच्या नाशाचा प्रसंग येईल आणि जर अनादीला नित्य मानाल तर कर्म व बंधनही नित्य मानावे लागतील. सर्व कर्म सुटणे हीच मुक्ती आहे असे तुम्ही मानत असाल तर सर्व कर्में सुटणे हे मुक्तीचे निमित्त झाले व मग मुक्ती ही नैमित्तिक मुक्ती होईल व ती सदैव राहू शकणार नाही. कर्म व कर्ता यांचा संबंध नित्य असल्यामुळे कर्मेंही कधीच सुटणार नाहीत. शिवाय तुम्ही आपली मुक्ती व तीर्थंकरांची मुक्ती नित्य मानली आहे ते बरोबर नाही.

(प्रश्न) ज्याप्रमाणे धान्याचे फोलपट काढून टाकल्यावर किंवा त्याचा अग्नीशी संयोग झाल्यावर ते बीज पुन्हा उगवत नाही त्याप्रमाणे मुक्त झालेल्या जीवाला पुन: जन्ममरणरूपी संसारचक्रात सापडावे लागत नाही.

(उत्तर) जीव आणि कर्म यांचा संबंध टरफल व बीज यांच्यातील संबंधासारखा नाही. त्यांचा समवाय संबंध आहे. म्हणजे ते नित्य आहे. म्हणून जीव आणि त्याच्यातील कर्म व कर्तृत्वशक्ती यांचा संबंध अनादी काळापासून आहे. जीवामध्ये कर्म करण्याच्या शक्तीचाही अभाव आहे. असे तुम्ही मानाल तर सगळे जीव पाषाणवत होऊन जातील आणि त्यांच्यामध्ये मुक्तीचा उपभोग घेण्यासाठी सामर्थ्यही उरणार नाही. अगदी काळापासून असलेल्या कर्मबंधनातून सुटून जीव जसा मुक्त होतो तसाच तो तुमच्या मुक्तीतूनही सुटून बंधनात पडेल. कारण जसे तुम्ही कर्मरूपी मुक्तीच्या साधनांपासूनही सुटून जीव मुक्त होतो असे मानता तसेच तो नित्य मुक्तीतूनही सुटून बंधनात पडतो असे मानावे लागेल. साधनांनी सिद्ध झालेला पदार्थ कधीही नित्य असू शकत नाही. आणि जर साधन सिद्धवाचून मुक्ती होते असे तुम्ही मानाल तर कर्मावाचूनही बन्ध प्राप्त होऊ शकेल. ज्याप्रमाणे वस्त्रांना घाण लागते आणि वस्त्र धुतल्यावर ती निघून जाते आणि पुन: वस्त्र घाण होते. त्याप्रमाणे मिथ्यावादी हेतूमुळे व राग (मोह), द्वेषादि कारणांच्या आश्रयामुळे जीवाला कर्मरूपी मळ लागतो व तो सत्यक ज्ञान, दर्शन, चरित्राने निर्मळ होतो. मळ लागण्याच्या कारणांमुळे मळ लागला असे तुम्ही मानीत असाल तर मुक्त

31 जीव संसारी बनतो व संसारी जीवमुक्त होतो असे तुम्हाला अवश्य मानावे लागेल. कारण ज्याप्रमाणे निमित्तांनी (कारणांनी) मलिनता सुटते, (नाहीशी होते) त्याप्रमाणे निमित्तांनी मलिनता लागेलही. म्हणून जीवाचे बंधन व मुक्ती यांना प्रवाह रूपाने अनादी माना. अनंतत्वाने त्यांना अनादी मानू नका.

(प्रश्न) जीव कधीही निर्मळ नव्हता. किंतु मळासह आहे.

(उत्तर) जर तो कधी निर्मळ नव्हता तर तो कधीच निर्मळ होऊ शकणार नाही. ज्याप्रमाणे शुभ्र वस्त्रावर नंतर लागलेला मळ धुवून काढता येतो. त्याचा स्वाभाविक पांढरा रंग काढून टाकता येत नाही. वस्त्र धुतल्यानंतरही त्याला मळ लागतो. त्याचप्रमाणे जीवाला मुक्त झाल्यानंतरही मळ लागू शकतो.

प्रश्न) जीव हा पूर्वोपार्जित कर्मानेच स्वत: शरीर धारण करतो. त्यासाठी ईश्वराला मानणे व्यर्थ आहे.

(उत्तर) जर केवळ कर्मच शरीर धारणेचे निमित्त असेल, ईश्वर हे कारण नसेल तर कोणताही जीव ज्यात खूप दुःख भोगावे लागेल असा वाईट जन्म कधीच घेणार नाही, सदैव चांगलेच जन्म धारण करील. कर्म हे प्रतिबंधक आहे, पण ज्याप्रमाणे चोर आपण होऊन तुरुंगात जात नाही किंवा स्वेच्छेने फासावर चढत नाही, पण राजा त्याला तशी शिक्षा देतो, त्याचप्रमाणे जीवाला शरीर धारण करावयास लावणाऱ्या व त्याच्या कर्मांनुसार फळ देणाऱ्या परमेश्वराला तुम्हीही माना.

(प्रश्न) मद (नशा) जसा आपोआप चढतो त्याप्रमाणे कर्माचे फळ आपोआप प्राप्त होते. ते देण्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता नसते.

(उत्तर) तसे असेल तर नेहमी मद्यपान ककरणाऱ्याला कमी नशा चढते आणि सवय नसलेल्यांना जास्त चढते, याप्रमाणे नेहम खूप पाप अथवा पुण्य करणाऱ्यांना कमी फळ आणि कधी-मधी व थोडेसे पाप-पुण्य करणाऱ्यांना जास्त फळ मिळाले पाहिजे. तसेच लहान कर्म करणाऱ्यांना मोठे फळ मिळाले पाहिजे.

(प्रश्न) ज्याचा जसा स्वभाव असतो त्याला तसेच फळ मिळत असते.

(उत्तर) जर स्वभावानुसार फळ मिळत असेल तर ते मिळणे अथवा न मिळणे हे घडू शकत नाही. स्वच्छ वस्त्राला काही कारणांनी मळ लागतो व तो धुण्याच्या निमित्ताने दूर होतो, असे मानणेच योग्य ठरते.

(प्रश्न) संयोगावाचून कर्म परिणामाला प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे व विरजण यांच्या संयोगावाचून दही तयार होत नाही त्याचप्रमाणे जीव आणि कर्म यांच्या संयोगाने कर्माचा परिणाम होत असतो. (उत्तर) दूध आणि विरजण यांचे मिश्रण करणारा तिसरा एकजण असतो. ज्याप्रमाणे जीव आणि त्यांच्या कर्माची फळे यांचा संबंध जोडणारा तिसरा ईश्वर असला पाहिजे. कारण जड (अचेतन) पदार्थ स्वतः नियमाने संयुक्त होत नाहीत आणि जीवही अल्पज्ञ असल्यामुळे स्वत: आपल्या कर्माची फळे प्राप्त करीत नाहीत यावरून हे सिद्ध होते की, ईश्वरस्थापित सृष्टिक्रमावाचून कर्मफळाची व्यवस्था होऊ शकत नाही.

(प्रश्न) जो कर्मापासून मुक्त असतो त्यालाच ईश्वर असे म्हणतात.

(उत्तर) अनादी काळापासून जीवांशी कसे जोडली गेलेली आहेत. त्यांच्यापासून जीव कधीच मुक्त होऊ शकणार नाही.

32 (प्रश्न) कर्माचा बंध अनादी नसून सादी (आदिसहित) आहे

(उत्तर) बंध हा सादी असेल तर कर्माचा योग अनादी असू शकत नाही. आणि संयोगपूर्वी जीव निष्कर्ष होता असे ठरेल. मग निष्कर्माला कर्म लागते तर मुक्तांनाही ते लागेल. कर्म व कर्ता यांचा समवाय म्हणजे नित्य संबंध असतो. तो कधी सुटत नाही. म्हणून नवव्या समुल्लासात आम्ही जे लिहिले आहे तसेच मानणे योग्य आहे.

जीवाने आपले ज्ञान व सामर्थ्य कितीही वाढविले तरी त्याचे ज्ञान परिमित आणि सामर्थ्य मर्यादितच राहणार ते ईश्वरासारखे अनंत व अमर्यादित कधीच होऊ शकणार नाही. मात्र जितके सामर्थ्य वाढणे उचित आहे तितके तो योगाच्या साह्याने वाढवू शकतो.

जैनांमधील अर्हत लोक देहाच्या परिमाणावरून जीवाचेही परिमाण मानतात. त्यांना असे विचारले पाहिजे की, हत्तीचा जीव किडामुंगीत व किडामुंगीचा जीव हत्तीच्यामध्ये कसा सामावू शकेल? हीही एक मूर्खपणाचीच गोष्ट आहे. कारण जीव हा एक सूक्ष्म पदार्थ असून तो एका परमाणूतही राहू शकतो. परंतु त्याच्या शक्ती शरीरामध्ये प्राण, विद्युत व नाडी इत्यादिकांशी संयुक्त होऊन राहतात. त्या शक्तींमुळे त्याला संपूर्ण शरीरातील हालचाली कळतात. तो चांगल्या संगतीने चांगला व वाईट संगतीने वाईट बनतो. जैन लोक अशा प्रकारचा धर्म मानतात.

मूल– रे जीव भव दुहाइं, इक्कं चिय हरइ जिणमयं धम्मं।

       इयराणं पणमंतो, सुह कय्ये मूढ मुसिओसि।। -प्रकरणरत्नाकर, भाग २। षष्टीशतक ६०। सूत्रंक ३।।

संक्षिप्त अर्थ: अरे जीवा! एकच जिनमत, श्रीवीतरागभाषित धर्मच इहलोकाशी संबंधित जन्म, जरा, मरण इत्यादी दुःखांचे हरण करणारा आहे. याचप्रमाणे सुदेव व सुगुरू हेही जैन धर्मी आहेत असे जाणावे. वीतराग ऋषभ देवापासून महावीरापर्यंतच्या वीतराग देवाखेरीज हरी, हर, ब्रह्मा इत्यादी जे इतर कुदेव आहेत त्यांची पूजा आपल्या कल्याणासाठी जे लोक करतात ते सगळे फसविले गेले आहेत.

याचा भावार्थ असा की जैनमताचे सुदेव, सुगुरु व सुधर्म वगळता इतर कुदेव, कुगुरु व कुधर्म यांचे सेवन केल्याने काहीही कल्याण होत नाही.॥३॥ (समीक्षक) याचे धर्मग्रंथ कसे निंदायुक्त आहेत याचा विद्वानांनीच आता विचार करावा. मूल–अरिहं देवो सुगुरु सुद्धं धम्मं च पंच नवकारो। धन्नाणं कयच्छाणं, निरन्तरं वसइ हिययम्मि।। -प्रक० भा०२। षष्टी० ६०। सूत्र० १।।

अरिहन्देवेन्द्रकृत पूजादिरुण सारखा दुसरा कोणताही उत्तम पदार्थ नाही असा जो देवांचा देव, शोभायमान अरिहन्त देव, ज्ञानक्रियावान, शास्त्रांचा उपदेष्टा, शुद्ध, कषायमलरहित, सम्यकत्व, विनय दयामूल, श्रीजिनभाषित जो धर्म आहे तोच दुर्गतीत पडणाऱ्या प्राण्यांचा उद्धार करणारा आहे. इतर हरिहरादिकांचा धर्म इहलोकातून उद्धार करणारा नाही. पंच अरिहंतादिक परमेष्ठी व त्यांच्याशी संबंधित या सर्वांना नमस्कार. हे चार पदार्थ धन्यः आहेत, अर्थात श्रेष्ठ आहेत. दया, क्षमा, सम्यकत्व, ज्ञान, दर्शन व चारित्र्य हा जैनांचा धर्म आहे. ॥१॥

(समीक्षक) जी दया मनुष्यमात्रावर नाही ती दयाही नव्हे व क्षमाही नव्हे. ज्ञानाऐवजी अज्ञानाला, दर्शनाऐवजी अंधाराला आणि चारित्र्याऐवजी उपासमारीला महत्त्व देणे ही काय चांगली गोष्ट आहे?

33 जैन पंथाची प्रशंसा

मूल– जइ न कुणसि तव चरणं, न पढसि न गुणेसि देसि नो दाणम्। ता इत्तियं न सक्किसि, जं देवो इक्क अरिहन्तो।। -प्रकरण० भा० २। षष्टी ६०। सू०१८।।

    हे मनुष्या! जे तू तप-चरित्र करू शकत नाही, सूत्र पण वाचू शकत नाही, प्रकरणादिचा विचारही करू शकत नाही आणि सुपात्राला दान पण देऊ शकत नाही. तो तू एक देवता अरिहंत जो आमची आराधना हेतू सुयोग्य गुरू, सुधर्म जैन मतामध्ये श्रद्धा ठेवणे सर्वोत्तम गोष्टी आहेत, उद्धाराचे कारण आहे.॥२॥

(समीक्षक) दया आणि क्षमा या जरी चांगल्या गोष्टी असल्या तरी पक्षपात केल्याने दया ही अदया व क्षमा ही अक्षमा होत असते. आमच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की, कोणत्याही जीवाला दुःख न देणे ही गोष्ट सर्वथा संभव होऊ शकत नाही. कारण दुष्टांना शिक्षा करणे ही गोष्टी दयाच समजली पाहिजे. एका दुष्टाला शिक्षा दिली गेली नाही तर हजारो माणसांना दु:ख होण्याची शक्यता असते. म्हणून त्याच्या बाबतीतली दया ही अदया व क्षमा ही अक्षम होते.

      सर्व प्राण्यांचे दु:ख नाहीसे करणे व त्यांना सुखी करण्याचा उपाय अंमलात आणणे याला दया असे म्हटले जाते, हे खरे आहे. केवळ पाणी गाळून पिणे आणि क्षुद्र जीवजंतूंना वाचविणे ही खरी दया नव्हे. परंतु अशा प्रकारची दया जैनांच्या फक्त बोलण्यातच असते. कारण तसे आचरण ते मुळीच करीत नाहीत. माणूस कोणत्याही पंथाचा असला तरी त्याच्यावर दया करून त्याला खायला प्यायला घालून त्याचा सत्कार करणे आणि दुसऱ्या पंथाच्या विद्वानांचा सम्मान व सेवा करणे ही दया नाही काय?
     जर या लोकांमध्ये खरी दया असती तर 'विवेकसार' या ग्रंथाच्या पृष्ठ २२१ वर त्यांनी असे का लिहिले असते ? त्यांनी काय लिहिले आहे पहा:-(१) दुसऱ्या पंथाच्या लोकांची स्तुती करू नये; अथवा त्यांच्या सद्गुणांची प्रशंसा करू नये. (२) दुसऱ्या संप्रदायाच्या लोकांना नमस्कार करू नये. (३) 'आलपन ' म्हणजे इतर पंथांच्या लोकांशी कमी बोलावे. (४) 'संलपन ' म्हणजे त्यांच्याशी पुनः पुनः बोलू नये. (५) त्यांना अन्नवस्त्राचे दान करू नये. म्हणजे त्यांना खाण्या-पिण्याच्या वस्तूह देऊ नयेत. (६) इतर पंथाच्या प्रतिमांच्या पूजेसाठी गंध, पुष्पे वगैरेही देऊ नयेत. या सहा यातना आहेत. म्हणजे ही सहा प्रकारची कर्में जैनांनी कधी करू नयेत.
 (समीक्षक) आता बुद्धिमंतांनी याचा विचार करावा की, जैनांच्या मनामध्ये इतर पंथाच्या लोकांविषयी किती अदया, कुदृष्टी व दोष आहे. इतर पंथांच्या मनामध्ये इतकी अदया जैनांमध्ये असल्याने त्यांना दयाहीन किंवा निर्दयी म्हणण्यास काही हरकत नसावी. कारण आपल्याच घरच्या लोकांची सेवा करणे याला काही विशेष धर्म म्हणत नाहीत. त्यांच्या पंथाची माणसेही त्यांच्या घरच्या माणसांसारखीच आहेत. म्हणून ते त्यांची सेवा करतात. इतर संप्रदायांच्या लोकांची सेवा ते करीत नाहीत. मग त्यांना कोणता बुद्धिमान दयाळू म्हणू शकेल ?
    'विवेकसारा’ च्या पू. १०८ वर असे लिहिले आहे की, मथुरेच्या राजाच्या नमुची नावाच्या दिवाणाला जैनांनी आपला विरोधक समजून ठार मारले आणि ते आलोयणा करून शुद्ध झाले. हे कृत्यही दया व क्षमा

३४

यांचा नाश करणारे नाही काय? इतर पंथांच्या लोकांशी त्यांचे प्राण घेण्यापर्यंत जे लोक वैरबुद्धी बाळगतात त्यांना दयाळु म्हणण्याऐवजी हिंसक म्हणणेच योग्य होईल.

     सम्यकत्व दर्शनादिकांची लक्षणे-आहर्त प्रवचन संग्रह परमागमसार या ग्रंथामध्ये सांगितली आहेत. सम्यक-श्रद्धन, सम्यकदर्शन, ज्ञान व चारित्र्यही मोक्षमार्गाची चार साधने आहेत. (सम्यक म्हणजे योग्य, उचित, समय, उपयुक्त, बरोबर., वगैरे) त्यांची व्याख्या योगदेवाने केली आहे. ज्या रूपाने जीवादी द्रव्ये अवस्थित आहेत त्याच रूपाने जिनप्रतिपादित ग्रंथानुसार विपरीत अभिनिवेशादिरहित जी श्रद्धा म्हणजे जिनमतावर प्रती असते तिला 'सम्यक् श्रद्धन' व 'सम्यक् दर्शन' असे म्हणतात

रुचिर्जिनोक्ततत्त्वेषु सम्यक् श्रद्धानमुच्यते। आर्हत-दर्शन पृ०६२।। जिनाने सांगितलेल्या तत्त्वांवर सम्यक श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणजे इतर कशावर श्रद्धा असता कामा नये.

यथावस्थिततत्त्वानां संक्षेपाद्विस्तरेण वा। योऽवबोधस्तमत्रहु सम्यग्ज्ञानं मनीषिण ।। आर्हत-दर्शन पृ०६३।। ज्या प्रकारची जीवादी तत्वे आहेत त्यांचा संक्षेपाने अथवा विस्ताराने जो बोध होतो त्यालाच शहाणेलोक 'सम्यक् ज्ञान' असे म्हणतात.

सर्वथाऽनवद्ययोगानां त्यागश्चारित्रमुच्यते। कीर्त्तितं तदहिसादिव्रतभेदेन पञ्चधा। अहिसासूनृतास्तेयब्रह्मचर्य्यापरिग्रहा ।। आर्हत-दर्शन पृ०६५।।

    सर्व प्रकारे निंदनीय अशा अन्य मतसंबंधाचा त्याग म्हणजे चारित्र्य होय. अहिंसादी भेदांच्या दृष्टीने व्रते ही पाच प्रकारची आहेत :- (१) अहिंसा म्हणजे कोणत्याही प्राण्याला न मारणे. (२) सुनृता म्हणजे प्रिय भाषण करणे. (३) अस्तेय म्हणजे चोरी न करणे. (४) ब्रह्मचर्य म्हणजे जननेन्द्रियाच्या बाबतीत संयम पाळणे. (५) अपरिग्रह म्हणजे सर्व वस्तूंचा त्याग करणे.
      यांतील अनेक गोष्टी चांगल्या आहेत. अहिंसा आणि चोरी वगैरे निंद्य कर्माचा त्याग ही चांगली गोष्ट आहे परंतु या साऱ्या चांगल्या गोष्टी इतर संप्रदायाची निंदा वगैरे दोषांनी युक्त असल्यामुळे त्या चांगल्या गोष्टीही दोषयुक्त झाल्या आहेत. उदाहरणार्थ, पहिल्या सूत्रात असे लिहिले आहे की, "अन्य हरिहरादिकांचा धर्म जगामध्ये उद्धार करणारा नाही." ज्यांचे ग्रंथ पाहिले असता पूर्णविद्या व धार्मिकता स्पष्ट दिसून येते त्यांची नालस्ती करणे ही काय लहान सहान निंदा आहे ? आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे अत्यंत अशक्य अशा गोष्टी बोलणाऱ्या आपल्या तीर्थकरांची स्तुती करणे म्हणजे निव्वळ हटवादीपणा आहे
    ज्या जैनांजवळ चारित्र्य नाही, विद्या नाही, दान देण्याचे सामर्थ्य नाही तो माणूस केवळ जैन पंथ खरा आहे असे म्हणतो म्हणूनच उत्तम ठरतो काय ? आणि इतर पंथाचे लोक श्रेष्ठ असूनही अश्रेष्ठ ठरतात काय? असे म्हणणाऱ्या लोकांना भ्रमिष्ट व बालबुद्धीचे म्हणावयाचे नाही तर काय म्हणावयाचे ?
   यावरून हेच सिद्ध होते की, यांचे आचार्य स्वार्थी होते. ते पूर्ण विद्वान नव्हते. त्यांनी अशी इतरांची

35 निंदानालस्ती केली नसती तर त्यांच्या त्या खोट्या गोष्टी ऐकून कोणी फसले नसते व त्यांचा हेतू पूर्ण झाला नसता.

पाहा ! यावरून हेच सिद्ध होते की, जैनांचा पंथ सर्वांना बुडविणारा असून वैदिक धर्म सर्वांचा उद्धार करणारा आहे. हरिहरादि देव हे सुदेव असून त्यांचे ऋषभदेवादी सगळे कुदेव आहेत, असे जर इतरांनी म्हटले तर त्यांनाही तसेच वाईट वाटणार नाही काय? यांचे आचार्य व अनुयायी यांच्या आणखी चुका पाहा.

मूल– जिणवर आणा भंगं, उमग्ग उस्सुत्त लेस देसणउ।

      आणा भंगे पावं ता जिणमय दुक्करं धम्मम्।।-प्रकरण भाग २। षष्टी श० ६१। सू० ११।।

उन्मार्ग उत्सूत्रांचा लेख दाखविण्याने जिनवर म्हणजे वीतरागी तीर्थंकरांच्या आज्ञेचा जो भंग होतो तोच दु:खाचा हेतू म्हणजे कारण असणारे पाप आहे. जिनेश्वराने सांगितलेल्या सम्यक्त्वादी धर्माचे ग्रहण करणे फार अवघड आहे. म्हणून ज्यायोगे जिनाच्या आज्ञेचा भंग होणार नाही असे वर्तन केले पाहिजे. ॥१॥

(समीक्षक) आपल्याच तोंडाने आपलीच प्रशंसा करणे आणि आपलाच पंथ मोठा आहे असे म्हणून दुसऱ्या ग्रंथाची निंदा करणे हा मूर्खपणा आहे कारण ज्याची प्रशंसा इतर विद्वान करतात त्याचीच प्रशंसा करणे उचित आहे. चोर देखील स्वत:च्या तोंडाने आपली प्रशंसा करतात. म्हणून ते प्रशंसनीय ठरतात काय ? या लोकांची स्थिती अशीच आहे.

मूल– बहुगुण विज्झा निलओ, उसुत्त भासी तहा विमुत्तव्वो। जह वर मणि जुत्तो विहु, विग्घकरी विसहरो लोए।।-प्रकरण भा०२। षष्टी० सू० १८ ।। ज्याप्रमाणे विषधर सापाचा मणी त्याज्य असतो त्याप्रमाणे जो जैन पंथाचा अनुयायी नाही तो कितीही मोठा धार्मिक व पंडित असला तरी त्याचा त्याग करणे हे जैनांच्या दृष्टीने उचित होय॥१८॥

(समीक्षक) पाहा! किती चुकीची गोष्ट आहे. यांचे चेले व आचार्य विद्वान असते तर त्यांनी विद्वानांवर प्रेम केले असते. पण यांच्या तीर्थकरासहित सगळेच अविद्वान् असल्यामुळे ते विद्वानांचा सन्मान कसा करतील? सोने मळात किंवा धुळीत पडले तरी त्याचा त्याग कोणी करतो काय ? यावरून हेच सिद्ध होते की, जैनांखेरीज इतर कोणी त्यांच्यासारखे पक्षपाती, हट्टी, दुराग्रही व विद्याहीन नसतील.

मूल– अइसय पाविय पावा, धम्मिअ पव्वेसु तोवि पाव रया। न चलन्ति सुद्ध धम्मा, धन्ना किविपाव पव्वेसु।।-प्रकरण भा० २। षष्टी० सू० २९।। इतर दर्शन मानणारे कुलिगी म्हणजे जैनमतविरोधी असे जे असतील त्यांचे दर्शनही जैन लोकांनी करू नये. ॥२९॥

   (समीक्षक) ही किती पामरपणाची गोष्ट आहे याचा विचार बुद्धिमान लोकांनी करावा. खरी गोष्ट अशी आहे की, ज्याचे मत खरे असते त्याला कुणाचीही भीती नसते. यांच्या आचार्यांना माहीत होते की, आपले मत पोकळ व विसंगतींनी भरलेले आहे. ते इतरांना सांगितले तर ते त्याचे खंडन करतील. म्हणून सर्वांची निंदा करावी व मूर्ख जैनांना फसवावे, हा मार्ग त्यांनी पत्करला.


36 मूल– नामंपि तस्स असुहं, जेण निदिठाइ मिच्छ पव्वाइ। जेसि अणुसंगाउ, धम्मीणवि होइ पाव मई।।-प्रकरण भा० २। षष्टी० सू० २७।।

    जैन धर्माच्या विरुद्ध असे जे धर्म आहेत ते सर्व माणसांना पापी बनविणारे आहेत. म्हणून कोणताही अन्य धर्म न मानता जैन धर्मच मानणे उत्तम होय॥२७॥

(समीक्षक) यावरून हे सिद्ध होते की, सर्वांशी वैर, विरोध, निंदा, ईर्ष्या वगैरे दुष्ट कर्मरूपी सागरामध्ये माणसाला बुडविणारा जैन पंथ आहे. जैन लोक जसे सर्वांची निंदा करणारे आहेत तसे इतर पंथाच्या अनुयायांमध्ये इतरांची निंदा करणारे महानिंदक व अधर्मी लोक कोणीही नसतील. एका बाजूने सर्वांची निंदा व दुसऱ्या बाजूने स्वत:ची अतिप्रशंसा करणे हे शठांचे म्हणजे लबाड लोकांचेच लक्षण नाही काय? विवेकी लोक कोणत्याही पंथाचे असले तरी ते चांगल्याला चांगले व वाईटाला वाईटच म्हणतात.

मूल– हा हा गुरु अ अकज्झं, सामी न हु अच्छि कस्स पुक्करिमो। कह जिण वयण कह सुगुरु; सावया कह इय अकज्झं।।-प्रकन भा० २। षष्टी सू० ३५।।

  कोठे सर्वज्ञभाषित जिनवचन, जैनांचे सुगुरू व जैनधर्म आणि कोठे त्यांच्या विरुद्ध असणारे कुगुरू व अन्य पंथांचे उपदेशक ? अर्थात आमचे ते सुगुरू, सुदेव व सुधर्म आणि इतरांचे ते कुदेव, कुगुरू व कुधर्म आहेत.॥३५॥

(समीक्षक) हे म्हणजे बोरे विकणाऱ्या माळणीसारखे आहेती जशी आपली आंबट बोरे गोड आहेत म्हणून सांगते आणि दुसऱ्या माळणींची गोड बोरेही आंबट व निरुपयोगी असल्याचे सांगते तशाच या जैनांच्या गोष्टी आहेत. हे लोक आपल्या खेरीज इतर पंथाच्या लोकांची सेवा करणे हे मोठे पाप आहे असे समजतात आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे नागाच्या मस्तकावरील मणीही त्याज्य असतो. त्याप्रमाणे इतर पंथातील श्रेष्ठ धार्मिक पुरुषांचाही त्याग करावा. आता याहूनही जास्त निदा ते इतर पंथियांची करतात. ते म्हणतात,

मूल–सप्पो इक्कं मरणं, कुगुरु आणंताइ देइ मरणाइ। तो वरिसप्पं गहियुं, मा कुगुरुसेवणं भद्दम्।।-प्रक० भा० २। षष्टी० सू० ३७।। जैन पंथाखेरीज इतर सर्वपंथांचे गुरू हे कुगुरू असून ते सापांहूनही वाईट आहेत. त्यांचे दर्शन, सेवा व संग कधीही करू नये. कारण सापाच्या संगतीने एकदाच मरण येते; तर अन्य पंथीय कुगुरूच्या संगतीने अनेकवार जन्म-मरणाच्या सैन्यात पडावे लागतेम्हणून हे भद्रपुरुषा|इतर पंथाच्या गुरूच्या जवळही तू उभा राहू नकोस कारण तू अन्य पंथियांची थोडी जरी सेवा कशील तर तू दु:खात पडशील. ॥३७॥

(समीक्षक) पाहा! जैनांसारखे कठोर, भ्रांत, द्वेषी, निंदक, वाट चुकलेले लोक कोणत्याही पंथात नसतील. यांनी मनाशी असा विचार केलेला दिसतो की, आपण इतरांची निंदा व आपली प्रशंसा केली नाही तर आपली सेवा कोणी करणार नाही व आपली प्रतिष्ठा होणार नाही. परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे. कारण जोपर्यंत हे उत्तम विद्वानांचा सत्संग व सेवा करणार नाहीत तोपर्यंत यांना यथार्थज्ञान व सत्यधर्म याची प्राप्त कधीच होणार नाही. म्हणून जैनांनी आपल्या ज्ञानविरोधी खोट्या गोष्टी सोडून देऊन वेदोक्त सत्य गोष्टींचे ग्रहण करावे हे उचित होय. त्यानेच त्यांचे फार कल्याण होईल

37 मूल– कि भणिमो कि करिमो, ताण हयासाण धिट्ठ दुट्ठाणं। जे दंसि ऊण लिगं खिवंति न रयम्मि मुद्ध जणं।।-प्रक० भा० २। षष्टी० सू० ४०।। ज्याची कल्याणाची आशा नष्ट झाली आहे, उद्धट, वाईट गोष्टी करण्यात अत्यंत चतुर, दुष्ट दोषांनी युक्त अशा माणसाला काय सांगावे ? काय करावे? कारण जो त्याच्यावर उपकार करतो त्याचाच तो नाश करतो. ज्याप्रमाणे कोणी एकजण दवा करावी म्हणून आंधळ्या सिंहाचे डोळे बरे करण्यासाठी त्याच्या जवळ गेला असता त्या सिंहानेच त्या दयाळू माणसाला खाऊन टाकले. त्याप्रमाणे अन्य पंथातील कुगुरूंवर उपकार करणे म्हणजे आपलाच नाश ओढवून घेणे आहे. म्हणून त्यांच्यापासून सदैव दूर राहावे.॥४०॥

(समीक्षक) जैन लोक जसा विचार करतात तसा इतर पंथाचे लोक विचार करतील तर जैनांची केवढी दुर्दशा होईल ! त्यांच्यावर कोणीही कसलाही उपकार केला नाही तर त्यांची अनेक कामे नष्ट होऊन त्यांना किती दुःख भोगावे लागेल ! इतरांसंबंधी जैन लोक असा विचार का करीत नाहीत?

मूल– जह जह तुट्टइ धम्मो, जह जह दुट्ठाण होई अइ उदउ। समद्दिट्ठि जियाणं, तह तह उल्लसइ समत्तं।।-प्रकन भा०२। षष्टी० सू० ४२।। जसजशी दर्शनभ्रष्ट, निह्नव, पासच्छा, उसन्ना व कुसीलियादिक आणि अन्य दर्शनावलंबी, त्रिदंडी, परिव्राजक व विप्रादिक दुष्ट लोकांची अतिशय शक्ती, सत्कार व पूजा आदी अधिक होईल तस तसे सम्यकदृष्टी जीवांचे सम्यकत्व विशेष प्रकाशित व्हावे, हे मोठे आश्चर्यच आहे. ॥४२॥

(समीक्षक) आता तुम्हीच पाहा. या जैनांहून अधिक ईर्ष्या, दोष व वैरबुद्धी बाळगणारा दुसरा कोणी असेल काय? अर्थात इतर पंथामध्येही ईर्ष्या व द्वेष आहेत परंतु जैनांमध्ये ते दुर्गुण जेवढ्या प्रमाणात आहेत तेवढे इतर कोणामध्येच नाहीत. आणि दोष हे तर पापाचे मूळ आहे. म्हणून जैनांमध्ये पापाचार का असणार नाही?

मूल– संगोवि जाण अहिउ, तेसि धम्माइ जे पकुव्वन्ति। मुत्तूण चोर संगं, करन्ति ते चोरियं पावा।।-प्रकनभान २। षष्टी० सू० ७५।। याचा मथितार्थएवढाच आहे की, अडाणी लोकांना चोरांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्यालाही शिक्षा होईल व आपले नाक कापले जाईल याची भीती वाटेनाशी होते त्याप्रमाणे जैन पंथाहून भिन्न अशा चोर पंथामध्ये असणाऱ्या लोकांना आपल्या अकल्याणाचे भय वाटत नाही. ॥७५॥

(समीक्षक) जो माणूस जसा असतो तो बहुधा आपल्या सारखेच इतर आहेत असे समजतो. इतर सगळे पंथ चोरांचे पंथ आहेत आणि जैनांचा तेवढा सज्जनांचा पंथ आहे, ही गोष्ट खरी असू शकते काय? जोपर्यंत माणसामध्ये अत्यंत अज्ञान असते व कुसंगतीने त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते तोपर्यंत तो इतरांविषयी अत्यंत ईर्ष्या, द्वेष बाळगणे यासारखा दुष्टपणा सोडत नाही. जैनमत जसे इतरांचा द्वेष करणारे आहे तसे दुसरे कोणतेही मत नाही. ॥७५॥

मूल– जच्छ पसुमहिसलरका पव्वं होमन्ति पाव नवमीए। पूअन्ति तंपि सढ्ढा, हा हीला वीयरायस्स।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० ७६।।

38 पूर्व सूत्रात सांगितल्याप्रमाणे जैनमार्गाहून भिन्न मार्गाचे अनुसरण करणारे इतर सगळे मिथ्यात्वाचा उपदेश करणारे आहेत व आम्ही सम्यकत्वाचा उपदेश करणारे आहोत. अर्थात इतर सगळे पापी असून जैन मात्र पुण्यात्मे आहेत. म्हणून खोटेपणाचा प्रचार करणाऱ्या धर्माची स्थापना करणाऱ्याला जो कोणी मदत करतो तो पापी आहे. ॥७६॥

(समीक्षक) चामुंडा, कालिका, ज्वाला इत्यादी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी पापनवमी म्हणजे दुर्गानवमी वगैरे जी व्रते व उपवास केले जातात ते जसे वाईट आहेत तशी पर्युषण पर्वासारखी तुमची व्रतेही वाईट नाहीत काय? त्या व्रतांमुळेही व्रत करणाऱ्याला फार कष्ट सोसावे लागतात. या ठिकाणी वाममार्गी लोकांच्या दुष्कृत्यांचे केलेले खंडन बरोबर आहे. परंतु जे लोक शासनदेवी व मरुतदेवी इत्यादिकांची भक्ती करतात त्यांचेही खंडन यांनी केले असते तर बरे झाले असते. आमची देवी हिंसक नाही असे ते म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे खोटे आहे. कारण शासनदेवीने एका पुरुषाचे व एका बकऱ्याचे डोळे काढले होते. म्हणजे ती राक्षसीण आणि दुर्गा व कालिका यांची सख्खी बहीणच ठरत नाही काय? तसेच आपल्या पच्चखाण वगैरे व्रतांना अतिश्रेष्ठ आणि नवमी वगैरे व्रतांना वाईट म्हणणे हा मूर्खपणाच आहे. कारण इतरांच्या उपवासांची निंदा व आपल्या उपवासांची स्तुती करणे हा अडाणीपणाच आहे. अर्थात जैन लोक सत्यभाषणादी ज्या व्रतांचे पालन करतात ती सर्वासाठीच उत्तम आहेत. मात्र जैन लोक व इतर लोक जो उपवास करतात ती गोष्ट चांगली नाही.

मूल– वेसाण वंदियाणय, माहण डुंबाण जरकसिरकाणं। भत्ता भरकट्ठाणं, वियाणं जन्ति दूरेणं।।-प्रकनभान २। षष्टी० सू० ८२।। याचा मुख्य भावार्थ असा की, जे लोक वेश्या, चारण, भाट आणि ब्राह्मण यांचे कौतुक करतात, यज्ञाचे समर्थन करतात. वस्तुत: ज्यांच्याकडे कधी पाहू नये अशा गणेशासारख्या खोट्या देवदेवतांची उपासना करतात ते स्वतः अज्ञान सागरात बुडतात व इतरांना बुडवितात. कारण या देवदेवतांकडे सगळ्या गोष्टी मागतात आणि वितराग (जैन) पुरुषांपासून दूर राहतात. ॥८२॥

(समीक्षक) इतर पंथांच्या देवांना खोटे म्हणणे आणि आपले देव खरे आहेत असे सांगणे केवळ पक्षपातीपणा आहे. हे लोक वाममार्गी संप्रदायाच्या देवीदेवतांचा निषेध करतात. परंतु आपल्या शासनदेवीचा निषेध करीत नाहीत. "श्राद्धदिनकृत' या ग्रंथाच्या पृष्ठ ४६ वर लिहिले आहे की, या शासनदेवीने रात्री जेवण केल्याबद्दल एका पुरुषाला थप्पड़ मारली व त्याचा एक डोळा काढला. मग तिने बकऱ्याचा एक डोळा काढून तो त्या माणसाच्या डोळ्याच्या खाचेत बसविला. अशा या देवीला ते हिंसक का मानत नाहीत? 'रत्नसार' भाग १, पृ.६७ वर काय लिहिले आहे पाहा:- मरुतदेवी पथिकांना दगडाची मूर्ती बनून साह्य करीत असे. तिलाही ते तशीच का मानत नाहीत?

मूल– कि सोपि जणणि जाओ, जाणो जणणीइ कि गओ विद्धि। जई मिच्छरओ जाओ, गुणेसु तह मच्छरं वहइ।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० ८१।।

39 जे जैनमतविरोधी मिथ्या धर्म मानणारे आहेत ते जन्माला तरी कशाला येतात ? आणि जन्मले तर मोठे का होतात? ते जन्मल्यानंतर लगेच मरून गेले असते तर फार चांगले झाले असते. ॥८१॥

पाहा ! यांचा हा वीतरागभाषित दयाधर्म! इतर पंथाच्या लोकांनी जिवंतही राहू नये अशी इच्छा ते करतात. यांचा हा दयाधर्म केवळ बोलण्यापुरता आहे. आणि जे काही आहे तो शुद्ध जीवजंतू व यशू यांच्यासाठी आहे. जैनांखेरीज इतर लोकांसाठी तो नाही.

मूल– सुद्धे मग्गे जाया, सुहेण गच्छत्ति सुद्ध मग्गमि। जे पुण अमग्गजाया, मग्गे गच्छन्ति तं चुय्यं।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० ८३।। याचा थोडक्यात अर्थ असा की, एखादा माणूस जैन कुळात जन्म घेऊन मुक्तीला गेला तर त्यात काही आश्चर्य नाही. परंतु जैनांखेरीज इतर कुळात जन्मलेल्या मिथ्यात्वी अन्यमार्गी माणसाला मुक्ती मिळेल तर ते फारच मोठे आश्चर्य ठरेल. याचा मथितार्थ असा की, जैन पंथाचे लोकच मोक्षाला जातात, इतर कोणी नाही. जे जैन पंथाचा स्वीकार करीत नाहीत ते नरकात जातात.॥८३

(समीक्षक) जैन पंथामध्ये कोणी दुष्ट अथवा नरकाला जाणारा असत नाही काय? सगळेच मुक्तीला जातात काय? इतर कोणाला मुक्ती मिळत नाही काय? भोळ्या भाबड्या लोकांखेरीज या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसेल?

मूल– तिच्छयराणं पूआ, संमत्त गुणाणकारिणी भणिया। साविय मिच्छत्तयरी, जिण समये देसिया पूआ।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० ९०।। वाचा थोडक्यात अर्थ असा की, जिनमूर्तीची पूजा हेच एक सार असून इतर पंथातील मूर्तिपूजा असार आहे. जो जिनमार्गाची आज्ञा पाळतो तो तत्त्वज्ञानी असून जो ती आज्ञा पाळत नाही तो तत्त्वज्ञानी नव्हे ॥९०॥

(समीक्षक) वाहवा। कमालच केली । वैष्णवादिकांच्या मूर्ती जशा पाषाणादी जड (अचेतन) पदार्थांच्या असतात तशा तुमच्या मूर्ती नाहीत काय? जशी तुमची मूर्तिपूजा मिथ्या आहे तशीच वैष्णवादिकांची मूर्तिपूजाही मिथ्या आहे. तुम्ही स्वतला तत्वज्ञानी समजता आणि इतर लोक तत्वज्ञानी नाहीत असे म्हणता, यावरून तुमच्या पंथात तत्त्वज्ञानच नाही हे सिद्ध होते.

मूल– जिन आणाए धम्मो, आणा रहिआण फुड अहमुत्ति। इय मुणि ऊणय तत्तं, जिण आणा कुणहु धम्मं।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० ९२।। याचा मथितार्थ असा की, जी जिनदेवाची आज्ञा व दया क्षमादी गोष्टी आहेत तोच धर्म आहे. त्याखेरीज इतरांच्या आज्ञा हा अधर्म आहे॥९२॥

(समीक्षक) ही केवढी मोठी अन्यायाची गोष्ट आहे! जैनमताखेरीज इतर कोणत्याही पंथात सत्यवादी, धर्मात्मे पुरुष नाहीत काय? इतर पंथातील धार्मिक लोकांना मान देऊ नये काय? हो। जैनमतस्थ माणसाचे मुख व जिव्हा ही चामड्याची नसती व इतरांची कातड्याची असती तर हे म्हणणे ठीक झाले असते. या जैन लोकांनी

40 आपल्या ग्रंथांची, वचनांची व साधूची अशी काही महती वर्णिली आहे की, जणू हे जैन लोक भाट चरणांचेच थोरले भाऊ बनले आहेत.

मूल– वन्नेमि नारयाउवि, जेसि दुरकाइ सम्भरं ताणम्। भव्वाण जणइ हरि हरं, रिद्धि समिद्धीवि उद्घोसं।। -प्रकन भा० २। षष्टी० सू० ९५।। याचा मथितार्थ असा की, हरिहरादी देवांची विभूती नरकाला कारणीभूत आहे. त्यांना पाहून जैनांचा भीतीने थरकाप उडतो. ज्याप्रमाणे राजाज्ञेचा भंग केल्याने माणसाला मरणापर्यंत दु:ख भोगावे लागते त्याप्रमाणे जितेंद्राच्या आज्ञेचा भंग केल्याने माणसाला आमरण दुःख का भोगावे लागणार नाही? ॥९५॥

(समीक्षक) आता पाहा! जैनांच्या आचार्यांची ही मनोवृत्ती म्हणजे उघड उघड कपट व ढोग आहे. आता तर यांच्या मनातली गोष्टही बाहेर आली. हरिहरादी देव आणि त्यांचे उपासक यांचे ऐश्वर्य व उन्नती त्यांच्याने पाहवत नाही. इतरांची उन्नती झालेली पाहन यांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. बहुधा त्यांची अशी इच्छा असावी की, या लोकांचे सारे ऐश्वर्य आपल्यालाच मिळावे आणि हे लोक दरिद्रीच राहावेत. जैन लोक राजाची फार खुशामत करणारे, खोटारडे व भ्याड असतात. म्हणून ते राजाज्ञेचा दृष्टात देतात. राजाची खोटी गोष्टही मानली पाहिजे काय ? जैनांहून अधिक ईर्ष्या व द्वेष करणारा दुसरा कोणीही नसेल.

मूल– जो देई सुद्ध धम्मं, सो परमप्पा जयम्मि न हु अन्नो । कि कप्पद्दुम्म सरिसो, इयर तरू होई कइयावि।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० १०१।। याचा थोडक्यात अर्थ असा की, जे लोक जैन पंथाच्या विरूद्ध आहेत ते मूर्ख आहेत. जे जिनेंद्रभाषित धर्मोपदेशक साधू, गृहस्थ व ग्रंथकार आहेत ते तीर्थंकरांसमान आहेत. त्यांची बरोबरी करू शकेल असा कोणीही नाही. ॥१०१ ॥

(समीक्षक) कसा असणार? जैन लोक पोरकट नसते तर त्यांनी ही गोष्ट खरी कशी मानली असती? वेश्या स्वतःखेरीज इतर स्त्रियांची स्तुती करत नसते. तशीच स्थिती जैनांची आहे असे दिसते.

मूलं–जिणिदं देवो तव्वयणं गुरुजणं महासायाणमं । सेसं पावठ्ठाणं परमप्पाणं च वज्जेमि ।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० १०३।। याचा थोडक्यात अर्थ असा की, जितेंद्रदेव, त्यांनी सांगितलेले सिद्धांत व जिनमताचे उपदेशक यांचा त्याग करणे जैनांना उचित नाही. ॥१०३॥

(समीक्षक) हे सारे जैनांचा हटवादीपणा, पक्षपात व अविद्या यांचे फळ नव्हे तर काय आहे ? जैनांच्या काही थोड्या गोष्टी सोडल्यास बाकी सर्व त्याज्य आहेत. ज्याला थोडीशीही बुद्धी आहे तो जैनांचे देव, सिद्धांतग्रंथ आणि उपदेशकांचे उपदेश पाहून, ऐकून विचार करील तर तत्क्षणीच तो नि:संदेह त्या सर्वांचा त्याग करील.

मूल– वयणे वि सुगुरु जिणवल्लहस्स केसि न उल्लसइ सम्मं। अह कह दिणमणि तेयं, उलुआणं हरइ अन्धत्तं।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० १०८।। 41 संक्षिप्त अर्थ:- जे जिनवचनानुसार आचरण करतात ते पूजनीय आहेत आणि जे त्याविरुद्ध आचरण करतात ते अपूज्य आहेत. जैन गुरूचे अनुसरण करावे. इतर पंथाच्या लोकांचे अनुसरण करू नये. ॥१०८॥

(समीक्षक) जैन लोकांनी इतर अज्ञानी लोकांना चेले बनवून पाळीव पशू प्रमाणे बांधून ठेवले नसते तर त्यांनी त्यांच्या जाळ्यातून सुटून आपली मुक्ती साध्य केली असती व आपल्या जन्माचे सार्थक केले असते. अहो, तुम्हाला जर कोणी कुमार्गी, कुगुरू खोटारडा व वाईट उपदेशक म्हटले तर तुम्हाला किती दुःख होईल ! ज्या अर्थी तुम्ही दुसऱ्याला दुःख देणारे आहात त्या अर्थी तुमच्या पंथामध्ये पुष्कळच निरर्थक व दु:खदायक गोष्टी भरलेल्या आहेत असे सिद्ध होते.

मूल– तिहुअण जणं मरंतं, दट्ठूण निअन्ति जे न अप्पाणं । विरमंति न पावाउ, विद्धी धिट्ठत्तणं ताणं।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० १०९।। संक्षिप्त अर्थ:-मरणाचे दुःख जरी भोगावे लागले तरीही जैनांनी शेती, व्यापार वगैरे गोष्टी करू नयेत. कारण ही कर्में नरकात नेणारी आहेत. १०९॥

(समीक्षक) आता या जैनांना कोणीतरी विचारले पाहिजे की, तुम्ही व्यापारादी कर्में का करता? ती कामे सोडून का देत नाही? तुम्ही जर ती सोडून द्याल तर तुमच्या शरीराचे पालन पोषणही होऊ शकणार नाही. आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे सर्वच लोक ही कामे सोडून देतील तर तुम्ही कोणती वस्तू खाऊन जगाल असला हास्यास्पद उपदेश करणे पूर्णपणे निरर्थक आहे. ते तरी बिचारे काय करतील? विद्या, सत्संग वगैरे न लाभल्यामुळे जे मनात आले ते लिहून मोकळे झाले.

मूल– तइया हमाण अहमा, कारणरहिया अनाणगव्वेण । जे जंपन्ति उस्सुत्तं, तेसि, दिद्धिच्छ पंडिच्चं।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० १२१।। संक्षिप्त अर्थ:- जे जैनागमाच्या विरुद्ध शाखांना मानणारे आहेत ते अधमाधम आहेत. कोणतेही उद्दिष्ट साध्य होत असले तरीही जैनमताविरुद्ध बोलू नये व मानू नये. कोणताही हेतू साध्य होत असला तरी अन्य पंथाचा त्यागच करावा. ॥१२१ ॥

(समीक्षक) तुमच्या मूळ पुरुषापासून आजपर्यंत जितके पुरुष होऊन गेले व होतील त्यांनी इतर पंथांच्या लोकांना शिवीगाळी करण्याखेरीज दुसरे काहीच केले नाही व करणार नाहीत. आपले प्रयोजन सिद्ध होत आहे असे जेव्हा जैनांना दिसते तेव्हा ते चेल्यांचेही चेले बनतात. खोटयानाट्या थापा मारण्यास त्यांना मुळीच लाज वाटत नाही. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे.

मूल–जं वीरजिणस्स जिओ, मिरई उस्सुत्त लेस देसणओ । सागर कोडाकोडि हिडइ अइभीमभवरण्णे।।-प्रकनभान २। षष्टी०सू० १२२।। संक्षिप्त अर्थ :- जर कोणी असे म्हणत असेल की, जैन साधूंमध्ये जसा धर्म आहे तसाच तो आमच्या व इतर धर्मांच्या साधूंमध्येही आहे तर तो माणूस कोट्यवधी वर्षे नरकात राहून पुनः नीच योनीत जन्म घेतो. ॥१२२॥

42 (समीक्षक) वाहवारे वाहवा ! हे विद्येच्या शत्रुंनो! तुम्ही असाच विचार केला असणार की आमच्या मिथ्या वचनाचे खंडन कोणी करू नये. म्हणूनच तुम्ही हे भयंकर वचन लिहिले आहे. पण ती गोष्ट अशक्य आहे. आता तुम्हाला कुठवर समजवावे? तुम्ही तर खोटी निंदा व अन्य पंथाशी वैरव विरोध करण्यासाठी कंबर कसली आहे आणि आपले प्रयोजन साध्य करणे हे शिऱ्यासारखे आहे असे तुम्ही समजला आहात.

मूल– दूरे करणं दूरम्मि साहणं तह पभावणा दूरे। जिण धम्म सद्दहाणं पि तिरकदुरकाइ निट्ठवइ।।-प्रकनभान २। षष्टी०सू० १२७।। संक्षिप्त अर्थ:- जर कोणा माणसाकडून जैन धर्माचे काहीही पालन होत नसेल तरी त्याने जैन धर्मच खरा आहे आणि दुसरा कोणताही खरा नाही अशी श्रद्धा बाळगली. अशा केवळ श्रद्धेने सुद्धा तो दु:खातून तरून जातो.॥१२७॥

(समीक्षक) मूर्ख लोकांना आपल्या पंथाच्या जाळ्यात अडकविण्याची याहून दूसरी कोणती गोष्ट असणार? कारण काहीही कर्म न करता मुक्ती मिळेल असे भोंदू मत कोणते होऊ शकेल ?

मूल– कइया होही दिवसो, जइया सुगुरूण पायमूलम्मि। उस्सुत्त लेस विसलव, रहिओ निसुणेसु जिण धम्मं।।-प्रकनभान २। षष्टी०सू० १२८।। संक्षिप्त अर्थ:- जो कोणी माणूस अशी इच्छा करील की, मी फक्त जिनागम म्हणजे जैनांच्या शाखांचे श्रवण करीन, आणि उत्सूत्र म्हणजे इतर पंथांच्या ग्रंथांचे श्रवण कधीही करणार नाही, तर तेवढ्या इच्छेनेच तो दुःखसागर तरून जातो. ॥१२८॥

(समीक्षक) ही गोष्टही भोळ्या लोकांना फसविण्यासाठी आहे. कारण वर सांगितलेल्या इच्छेने माणूस इहलोकातील दुःखसागर तरून जात नाही; आणि पूर्वजन्मातील संचित पापांचे फळ भोगल्याशिवाय त्याची सुटका होऊ शकत नाही. जर त्यांनी अशा खोट्या म्हणजे विद्याविरोधी गोष्टी लिहिल्या नसल्या तर लोकांनी वेदादी शास्त्रे वाचून व ऐकून सत्यासत्य जाणून घेतले असते तर यांचे पोकळ ग्रंथ सोडले असते. परंतु त्यांनी अडाणी लोकांना असे काही जखडून टाकले आहे की, त्यांच्या जाळ्यातून एखादा बुद्धिमान सत्संगी माणूसच त्याची इच्छा असल्यास सुटू शकेल परंतु इतर जडबुटी लोक त्यातून सुटणे फार अवघड आहे.

मूल– जम्हा जेणहि भणियं, सुय ववहारं विसोहियं तस्स । जायइ विसुद्ध बोही, जिण आणाराहगत्ताओ।।-प्रकनभान २। षष्टी०सू० १३८।। संक्षिप्त अर्थ :- जे लोक जिनाचार्यांनी सांगितले सूत्रे, निरुक्ती, वृत्ती भाष्यचुर्णी मानतात तेच शुभ व्यवहार व दुःसह व्यवहार केल्याने चारित्र्ययुक्त होऊन सुखे प्राप्त करतात. इतर पंथांचे ग्रंथ वाचून त्यांना सुखे मिळत नाहीत. ॥१३८॥

(समीक्षक) स्वत:ची उपासमार करून घेण्यासारखे कष्ट सहन करणे यालाच चारित्र्य म्हणतात काय? जर भुकेने व तहानेने तडफडणे हेच चारित्र्य असेल तर दुष्काळात ज्यांची उपासमार होते अथवा ज्यांना अन्न पाणी न मिळाल्यामुळे उपासमार सहन करावी लागते असे लोक शुद्ध होऊन आणि त्यांना शुभ फळे मिळाली

43 पाहिजेत. पण तेही शुद्ध बनणार नाहीत अथवा तुम्हीही शुद्ध होणार नाही. मात्र पित्तादिकाचा प्रकोप होऊन तुम्ही रोगी होऊन आणि तुम्हाला सुखाऐवजी दुःख भोगावे लागते. न्यायाचरण, ब्रह्मचर्य, सत्यभाषण हाच खरा धर्म असून असत्यभाषण व अन्यायाचरण हे पाप आहे. सर्वांशी प्रेमाने वागून परोपकारासाठी देह झिजविणे यालाच शुभ चारित्र्य म्हणतात. जैन पंथात सांगितल्याप्रमाणे उपाशी व तहानलेले राहणे हा धर्म नव्हे. यांची ही सूत्रे मानल्याने थोडेसे सत्य व पुष्कळसे असत्य मिळाल्याने व लोक दुःखसागरात बुडून जातात

मूल–जइ जाणिसि जिण नाहो, लोयायारा विपरकए भूओ। ता तं तं मन्नंतो, कह मन्नसि लोअ आयारं।।-प्रकनभान २। षष्टी०सू० १४८।। संक्षिप्त अर्थ:- जे उत्तम प्रारब्धवान लोक असतात तेच जिनधर्म ग्रहण करतात. अर्थात जे जिनधर्माचा स्वीकार करीत नाहीत त्यांचे प्रारब्ध नष्ट होते. ॥१४८॥

(समीक्षक) ही गोष्ट चुकीची व खोटी नाही काय? इतर पंथामध्ये उत्तम प्रारब्धवान आणि जैन पंथात प्रारब्धहीन लोक नाहीत काय ? हे लोक असे सांगतात की, सहधर्मी लोकांनी म्हणजे जैनांनी आपसात भांडण तंटा न करता प्रेमाने वागावे. यावरून ही गोष्ट सिद्ध होते की, इतर पंथियांशी भांडणतंटा करण्यामध्ये काही दोष आहे असे जैन लोक मानीत नाहीत. त्यांचे हे म्हणणेही उचित नाही. कारण सजन लोक सज्जनांशी प्रेमाने वागतात व दुर्जनांना शिक्षण देऊन सुशिक्षित बनवितात. ब्राह्मण, त्रिदंडी, परिव्राजकाचार्य म्हणजे संन्यासी व तापसी म्हणजे वैरागी वगैरे सगळे जैन पंथाचे शत्रु आहेत असेही लिहिले आहे. आता तुम्हीच पाहा की, हे जैन इतर सर्वांकडे शत्रुत्वाच्या भावनेने पाहतात व त्यांची निंदा करतात. मग जैनांचा दया-क्षमारूपी धर्म कोठे राहिला? कारण दुसऱ्यांचा द्वेष करणे म्हणजे दया व क्षमा यांचा नाश करण्यासारखे आहे. त्याच्यासारखा दुसरा हिंसारूपी दोष नाही. जैन लोक जसे हेय मूर्ती आहेत तसे दुसरे लोक थोडेच असतील. ऋषभदेवापासून महावीरापर्यंतच्या २४ तीर्थकरांना कोणी रोगी, यी, मिथ्यावादी म्हटले आणि जैन पंथाचे अनुयायी सन्निपातज्वराने पीडित असून त्यांचा पंथ नरकासमान व विषारी आहे असे कोणी मानले तर जैनांना किती वाईट वाटेल? म्हणूनच जैन लोक निंदा व परमतद्वेषरूपी नरकात पडून महाक्लेश भोगत आहेत. ते या गोष्टी सोडून देतील तर फार बरे होईल.

मूल– एगो अ गुरु एगो वि सावगो चेइआणि विवहाणि। तच्छय जं जिणदव्वं, परुप्परं तं न विच्चन्ति।।-प्रकन भा० २। षष्टी० सू० १५०।। संक्षिप्त अर्थः- सर्व श्रावकांचा देव, गुरू व धर्म एकच आहे. चैत्यवंदन म्हणजे जिनप्रतिबिंब असलेल्या, देवळांचे व जैनांच्या संपत्तीचे रक्षण करणे व मूर्तीची पूजा करणे हा धर्म आहे॥१५०॥

(समीक्षक) आता तुम्हीच पाहा. मूर्तिपूजेचा जो सावळा गोंधळ माजला आहे व जे पाखंड पसरले आहे तिची सुरूवात जैनांच्या घरातून झालेली आहे; आणि पाखंडीपणाचे मूळही जैन पंथामध्येच आहे 'श्राद्धदिनकृत्य' ग्रंथाच्या पहिल्या पानावर मूर्तिपूजेचा आधार आहे.

44 नवकारेण विवोहो।।१।। अणुसरणं सावउ।।२।। वयाइं इमे।।३।। जोगो।।४।। चिय वन्दणगो।।५।। पच्चरकाणं तु विहि पुच्छम्।।६।।इत्यादि श्रावकांनी पहिल्या दारात नवकाराचा जप करावा. ॥१॥ दुसऱ्या दारात नवकाराच्या जपानंतर 'मो श्रावक आहे' असे स्मरण करावे॥२॥ तिसऱ्या दारात त्याने स्वतला विचारावे की, "आमच्याजवळ अणुव्रतासारखी किती व्रते आहेत?" ॥३॥ चौथ्या दारात "जीवनाच्या चार प्रमुख उद्दिष्टांपैकी मोक्ष हे अग्रगण्य आहे त्याचे कारण ज्ञान आहे. म्हणून त्याला योग म्हणतात॥४॥ पाचव्या दारात श्रावकाने चैत्यवंदन करावे. म्हणजे मूर्तीला नमस्कार करून द्रव्यभाव पूजा म्हणावी. ५॥ सहाव्या प्रत्याख्यान दारात नवकारसी प्रमुख विधिपूर्वक म्हणेल. ॥६॥

या ग्रंथात पुढे पुष्कळसे विधि लिहिले आहेत. अर्थात संध्याकाळच्या भोजनाच्या वेळी जिनबिंबाची म्हणजे तीर्थकरांच्या मूर्तीची पूजा करावी आणि द्वारपूजन करावे. या द्वारपूजेत बरेच व्यत्यय आहेत. मंदिरे उभारण्याचे नियम, जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे या गोष्टींमुळे मोक्ष होत असतो. मंदिरामध्ये अशा प्रकारे जाऊन बसावे, मोठ्या भक्तीभावाने पूजा करावी, ‘नमोजिनेत्रेभ्य:’ इत्यादी मंत्रांनी स्नान वगैरे करावे, आणि ‘जलचन्दनपुष्पधूपदीपनैः’ इत्यादी मंत्रांनी गंध वगैरे अर्पण करावे. 'रत्नसारभाग' या ग्रंथाच्या १२व्या पृष्ठावर मूर्तिपूजेचे असे फळ सांगितले आहे की, पुजाऱ्याला राजा किंवा प्रजा कोणीही अडवू शकत नाही.

(समीक्षक) या सगळ्या गोष्टी कपोलकल्पित आहेत. कारण पुष्कळशा जैन पुजाऱ्यांना राजा वगैरे लोक अडवतात. 'रत्नसारभाग' पृष्ठ १३ वर असे लिहिले आहे की, मूर्तिपूजा केल्याने रोग, पीडा व महादोष नाहीसे होतात. कोणी एकाने पाच पेशाचे फूल वाहिले तर त्याला १८ देशाचे राज्य मिळाले. त्याचे नाव कुमारपाल झाले होते वगैरे गोष्टी लिहिल्या आहेत. त्या सगळ्या खोट्या असून अडाणी लोकांना आकर्षित करण्यासाठी आहेत. कारण अनेक जैनलोक पूजा करीत असतानाही रोगी बनतात आणि मूर्तिपूजा करून त्यांना एका बिघ्याचेही राज्य मिळत नाही. पाच कवड्यांचे फूल मूर्तीला वाहिल्याने राज्य मिळत असेल तर पाच-पाच कवड्यांची फुले वाहून हे लोक साऱ्या जगाचे राज्य का मिळवत नाहीत ? आणि शासकीय शिक्षा का भोगतात ? आणि जर मूर्तिपूजा करून भवसागर तरून जाता, तर ज्ञान, सम्यग्दर्शन व चारित्र्य यांच्या गोष्टी कशाला करता? 'रत्नसारभाग' पृष्ठ १३ वर लिहिले आहे की, गौतमाच्या अंगठ्यात अमृत असून त्याच्या स्मरणाने मनोवांछित फळ मिळते.

(समीक्षक) असे असले तर सर्व जैन लोक अमर झाले पाहिजेत. पण तसे होत नाही. हे केवळ मूर्च लोकांना फसविण्यासाठी असून त्यात काहीही दुसरे तथ्य नाही. 'विवेकसागर’ पृष्ठ ५२ वर पूजा करण्याचा श्लोक आहे:-

जलचन्दन (पुष्प) धूपनैरथदीपाक्षतकैर्निवेद्यवस्त्रै । उपचारवरै(वयं) र्जिनेन्द्रान् रुचिरैरद्य (मुदा) यजामहे।।

45 आम्ही जल, चंदन, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य, वस्त्र यांनी व अतिश्रेष्ठ उपचारांनी जिनेंद्राची म्हणजे तीर्थकरांची पूजा करावी. म्हणून आम्ही असे म्हणतो की, मूर्तिपूजा जैनांपासून सुरू झाली आहे. 'विवेकसार' पृष्ठ २१:- जिनमंदिरात मोह येत नाही आणि (तेथे गेल्याने) भवसागर पार करता येतो. विवेकसार पृष्ठ५१-५२:- मूर्तिपूजेने मुक्ती मिळते; आणि जिनमंदिरात गेल्याने माणसांमध्ये सद्गुण येतात. जल-चंदनादिकांनी तीर्थकरांची पूजा करणारा नरकातून मुक्त होऊन स्वर्गाला जातो. ‘विवेकसार' पृष्ठ ५५:- जिनमंदिरातील ऋषभदेवादिकांच्या मूर्तीची पूजा केल्याने धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांची सिद्धी होते. 'विवेकसार' पृष्ठ ६१ जिनमूर्तीची पूजा केल्यास जगातील सारे क्लेश नाहीसे होतात.

(समीक्षक) आता यांच्या या अविद्यायुक्त असंभव गोटी पाहा! जर अशा प्रकारे पापादी वाईट कर्में सुटत असतील, मोह होत नसेल, भवसागर तरून जाता येत असेल, सद्गुण प्राप्त होत असतील, नरक सोडून स्वर्गाला जाता येत असेल, धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांची प्राप्त होत असेल आणि सर्व क्लेश नाहीसे होत असतील तर सर्व जैन लोक सुखी झाले असते व सर्व पदार्थाची सिद्धी त्यांना प्राप्त झाली असती. मग तसे का होत नाही?

याच 'विवेकसार' ग्रंथाच्या पृष्ठ ३ वर लिहिले आहे की, ज्यांनी जिनमूर्तीची स्थापना केली आहे. त्यांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या चरितार्थाची तरतूद केली आहे. 'विवेकसार' पृष्ठ २२५:- शिव, विष्णु इत्यादिकांच्या मूर्तीची पूजा करणे ही अत्यंत वाईट गोष्ट असून ते नरक प्राप्तीचे साधन आहे.

(समीक्षक) शिवादिकांच्या मूर्ती हे नरकाचे साधन असेल तर जैनांच्या मूर्ती तशाच माहीत काय? आमच्या मूर्ती त्यागी, शांत व शुभमुद्रायुक्त आहेत म्हणून त्या चांगल्या आहेत आणि शिवादिकांच्या मूर्ती तशा नसल्यामुळे वाईट आहेत, असे त्यांचे म्हणणे असेल तर सांगा की तुमच्या मूर्ती लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या मंदिरात राहतात. आणि त्यांना चंदन, केशर वाहिले जाते मग त्या त्यागी कशा ? शिवादिकांच्या मूर्ती तर छत्र नसलेल्या ठिकाणीही राहतात. मग त्या त्यागी का नाहीत? त्या शांत असतात असे तुमचे म्हणणे असेल तर सगळेच जड (अचेतन) पदार्थ निश्चल असल्यामुळे शांत भासतात. (तात्पर्य असे की), सर्वच पंथांतील मूर्तिपूजा निरर्थक आहे.

(प्रश्न) आमच्या मूर्ती, वस्त्रे, आभूषणे वगैरे धारण करीत नाहीत म्हणून त्या चांगल्या आहेत. (उत्तर) सर्वांसमोर नागव्या मूर्ती असणे व ठेवणे पशुवत खेळ आहे.

(प्रश्न) स्त्रीचे चित्र अथवा मूर्ती पाहिल्याने कामोत्पती होते पण साधू आणि योगी यांच्या मूर्ती पाहिल्याने शुभ गुण प्राप्त होतात. (उत्तर) पाषाणाच्या मूर्ती पाहून शुभ परिणाम उत्पन्न होतात असे तुम्ही मानता तर त्यांचे जडत्वादी (ज्ञानरहित्यादी) गुणही तुमच्यात येतील. तुम्ही जडबुद्धी व्हाल तर सर्वथा नष्ट होऊन जाल. शिवाय उत्तम, विद्वान लोकांची संगत व सेवा सुटल्याने तुमच्यात जास्त मूढता येईल. अकराव्या समुल्लासात मूर्तिपूजेमुळे येणारे जे दोष सांगितले आहेत ते सारे पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा करणाऱ्यांना लागतात. जैगनी मूर्तिपूजेच्या बाबतीत

46 जसा सावळागोंधळ माजविला आहे तसाच गोंधळ त्यांच्या मंत्रांमध्येही पुष्कळ असंभव गोष्टी सांगितल्यामुळे आहे 'रत्नसारभाग' पृष्ठ १ वर त्यांचा हा मंत्र आहे:-

नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उबज्झायाणं नमो लोए सब्बसाहूणं । एसो पंच नमुक्कारो सव्व पावप्पणासणो मंगलाचरणं च सव्वेसि पढमं हवइ मंगलम् ।।१।। या मंत्राचे फार माहात्म्य सांगितले आहे; आणि सर्व जैनांचा हा गुरुमंत्र आहे. त्याचे एवढे माहात्म्य वर्णिले आहे की, तंत्रे, पुराणे व भाटांच्या गाथा यांच्यावरही त्याने मात केली आहे. 'श्राद्धदिनकृत्य पृष्ठ ३:-

नमुक्कारं तउ पढ़े।।९।। जउ कब्बं। मंताणमंतो परमो इमुत्ति । धेयाण– धेयं परमं इमुत्ति। तत्ताणतत्तं परमं पवित्तं। संसारसत्ताण दुहाइयाणं।।१०।। हा मंत्र पवित्र व श्रेष्ठ आहे. तो ध्यानास योग्य व परम ध्येय आहे. तत्वांमध्ये ते परम तत्त्व आहे. दुःखपीडित संसारी जीवांसाठी हा नवकार मंत्र जणू समुद्रातून पलीकडे नेणाऱ्या नौकेसमान आहे. ॥१०॥

ताणं अन्नं तु नो अत्थि जीवाणं भवसायरे। बुड्डुं ताणं इमं मुत्तुं। नमुक्कारं सुपोययम्।।।११।। हा नवकार मंत्र नौकेसारखा आहे. जे त्याचा त्याग करतात ते भवसागरात बुडून जातात. आणि जे त्याचे ग्रहण करतात ते दु:खातून तरून जातात. जीवांना दुखापासून दूर ठेवणारा, सर्व पापांचा नाश करणारा, मुक्ती देणारा असा या मंत्राखेरीज दुसरा कोणताही मंत्र नाही. ॥११॥

कब्बं अणेगजम्मं तरसंचिआणं। दुहाणं सारीरिअमाणुसाणं। कत्तोय भव्वाणभविज्जनासो। न जावपत्तो नवकारमन्तो।।१२।। अनेक जन्मांच्या कर्मामुळे उत्पन्न झालेल्या शारीरिक दुःखातून मुक्त करणारा व जीवांना भवसागर तारून नेणारा हाच मंत्र आहे. जोपर्यंत नवकार मंत्राचा जप केला जात नाही तोपर्यंत जीव भवसागर तरून जाऊ शकत नाही हा अर्थ सूत्रात आहे. अग्निप्रमुख अभय असणाऱ्या अष्टमहाभयातही यामंत्रासारखा साहायक दुसरा नाही. ज्याप्रमाणे वैडूर्य हे महारत्न बाळगणारा अथवा शत्रूचे भय असताना अमोघ शत्र धारण करणारा माणूस अभिनंदनीय ठरतो. त्याप्रमाणे श्रुत केवली स्वीकार करणारा आणि द्वादशांगीचा नवकार मंत्ररहस्य आहे.॥१२॥

या मंत्राचा अर्थ असा आहे :- (नमो अरिहन्तार्ण) सर्व तीर्थंकरांना नमस्कार (नमो सिद्धार्ण) जैन पंथातील सर्व सिद्धांना (संतांना) नमस्कार (नमो आयरियाणे) जैन पंथातील सर्व आचार्यांना नमस्कार (तमो उबज्झायाणं) जैन पंथाच्या सर्व उपाध्यायांना नमस्कार(नमो लोए सब्ब साहूणं) इहलोकी असणाऱ्या सर्व जैन साधूना नमस्कार. या मंत्रामध्ये जैन हा शब्दनाही. तथापि जैनांच्या अनेक ग्रंथांमध्ये जैनांशिवाय इतर कोणालाही नमस्कार करू नये असे लिहिले आहे. म्हणून हाच अर्थ बरोबर आहे.

'तत्त्वविवेक' पृष्ठ १६९:- जो मनुष्य लाकूड व दगड यांची देवबुद्धीने पूजा करतो त्याला चांगली फळे मिळतात.

47 (समीक्षक) असे असेल तर सर्व लोक दर्शन करून सुखरूपी फळे का प्राप्त करून घेत नाहीत ? 'रत्नसारभाग' पृष्ठ १०:- पार्श्वनाथाच्या मूर्तीच्या दर्शनाने पापे नष्ट होतात. 'कल्पसूत्रभाष्य' पृष्ठ ५१ वर लिहिले आहे की, सव्वा लाख मंदिरांचा जीर्णोद्धार केला वगैरे मूर्तिपूजेविषयी याचे पुष्कळ लिखाण आहे त्यावरूनच हे लक्षात येते की, मूर्तिपूजेचे मूळ कारण जैनमत आहे.

आता या जैनसाधूच्या लीला पाहा. 'विवेकसार' पृष्ठ २२८- एक साधू कोशा नावाच्या वेश्येचा उपभोग घेऊन नंतर त्यागी होऊन स्वर्गाला गेला. 'विवेकसागर' पृष्ठ १०१५-अणकमुनी चारित्र्यहीन बनून अनेक वर्षांपर्यंत दत्त शेटाच्या घरी विषयोपभोग करून देवलोकी गेला. श्रीकृष्णाचा मुलगा ढंढण मुनी याला एका कोल्ह्याने पळवून नेले. त्यानंतर तो देव झाला. 'विवेकसार' पृष्ठ १५६ - जैनमताचा साधू फक्त लिंगधारी म्हणजे वेशधारी असला तरी श्रावकांनी त्याचा सत्कार करावा. साधू शुद्ध चारित्र्याचा असो की अशुद्ध चारित्र्याचा, सगळेच पूजनीय आहेत. 'विवेकसार' पृष्ठ १६८ - जैन साधू चारित्र्यहीन असला तरी तो इतर पंथांतील साधुहून श्रेष्ठ असतो. 'विवेकसार' पृष्ठ १७१ - जैन साधू चारित्र्यहीन व भ्रष्टाचारी असल्याचे दिसून आले तरी श्रावकांनी त्याची सेवा केली पाहिजे. 'विवेकसार' पृष्ठ २१६ - एका चोराने पाच मुठी (केश) लुंचन केले; म्हणजे आपले केस उपटून काढले आणि मग चारित्र्य ग्रहण केले. त्याने खूप कष्ट केले व पश्चाताप केला. सहाव्या महिन्यात तो केवल ज्ञान प्राप्त करून सिद्ध पुरुष बनला.

(समीक्षक) आता जैन साधूंची व गृहस्थांची लीला पाहा. यांच्या मतानुसार खूप कुकर्मे करणाऱ्या साधुलाही सद्गती प्राप्त झाली; आणि विवेकसार पृष्ठ १०६ वर लिहिले आहे की, श्रीकृष्ण तिसऱ्या नरकात गेला. 'विवेकसार' पृष्ठ १४५ वर लिहिले आहे की, धन्वंतरी वैद्य नरकात गेला. 'विवेकसार' पृष्ठ ४८ वर असे लिहिले आहे की, योगी, जंगम, काजी, मुल्ला असे कितीतरी लोक अजाणता तप व कट करूनही कुगती प्राप्त करतात. 'रत्नसारभाग' पृष्ठ १७१ वर लिहिले आहे की, नऊ वासुदेव म्हणजे त्रिपृष्ठ वासुदेव, द्विपृष्ठ वासुदेव, स्वयंभू वासुदेव, पुरुषोत्तम वासुदेव, सिंहपुरुष वासुदेव, पुरुषपुंडरीक वासुदेव, दत्त वासुदेव, लक्ष्मण वासुदेव व श्रीकृष्ण वासुदेव हे सगळे अकराव्या, बाराव्या, चौदाव्या, अठराव्या, विसाव्या व बाविसाव्या तीर्थकरांच्या वेळी नरकात गेले, आणि नऊ प्रतिवासुदेव म्हणजे अश्वग्रीव प्रतिवासुदेव, तारक प्रतिवासुदेव, मोरक प्रतिवासुदेव, मधु प्रतिवासुदेव, निशुभ प्रतिवासुदेव, बली प्रतिवासुदेव, प्रहाद प्रतिवासुदेव, रावण प्रतिवासुदेव आणि जरासंध प्रतिवासुदेव हे सगळेही नरकात गेले ‘कल्प (सूत्र)भाष्य' ग्रंथात लिहिले आहे की, ऋषभदेवापासून महावीरापर्यंतचे २४ तीर्थकर सगळे मोक्षाला गेले.

(समीक्षक) आता शहाण्या माणसांनीच या गोष्टीचा विचार करावा की, जैनांचे साधू, गृहस्थ व तीर्थकर यांच्यामध्ये पुष्कळसे वेश्यागामी, परस्त्रीगामी, चोर वगैरे होते; परंतु ते जैन पंथी असल्यामुळे ते सगळे स्वर्गाला गेले व त्यांना मोक्ष मिळाला; तर श्रीकृष्णादी सगळे महान धार्मिक महात्मे नरकाला गेले, असे म्हणणे ही किती वाईट गोष्ट आहे ! चांगल्या माणसांनी जैनांची संगत करणे किंवा त्यांच्याकडे पाहणे हेही वाईट आहे. कारण जे

48 कोणी यांची संगत धरतील त्यांच्या मनातही असल्या खोट्या गोष्टी घर करून बसतील. या महाहट्टी, दुराग्रही माणसांच्या संगतीतून वाईट गोटीखेरीज दुसरे काहीच मिळणार नाही. अर्थात जैनांमध्ये जे उत्तम लोक आहेत त्यांची संगत करण्यात काही दोष नाही.(जो सदाचारी व बुद्धिमान असेल तो या आसार जैन पंथात कधीच राहणार नाही.)

'विवेकसार' पृष्ठ ५५ वर लिहिले आहे की, गंगादी तीर्थ आणि काशी वगैरे क्षेत्रे यांचे सेवन केल्याने कसलाही पदार्थ सिद्ध होत नाही. मात्र गिरनार, पालीताणा, आबू वगैरे तीर्थक्षेत्रे मुक्ती देखील देणारी आहेत, असे लिहिले आहे.

(समीक्षक) येथे असा विचार केला पाहिजे की, शैव-वैष्णवादिकांची तीर्थक्षेत्रे जल, स्थल, जडस्वरूप आहेत तशीच ती जैनांचीही आहेत. त्यांच्यापैकी एकाची निंदा व दुसऱ्याची स्तुती करणे हे मूर्खपणाचे काम आहे.

जैनांच्या मुक्तीचे वर्णन

‘रत्नसारभाग' पृष्ठ २३:- महावीर तीर्थकर गौतमजींना सांगतात की, 'उध्वलोकांमध्ये एक सिद्धशिला स्थान आहे. ती स्वर्गपुरीच्या वर पंचेचाळीस लक्ष योजने लांब व तितकीच आतून पोकळ आहे आणि ८ योजने जाड आहे. मोत्यांचा शुभ्र हार किंवा गाईचे दूध जितके पांढरे असते त्याहूनही ती जास्त शुभ्र आहे. ती सोन्याप्रमाणे प्रकाशमान आणि स्फटिकाहूनही अधिक निर्मळ आहेही सिद्धशिला चौदाव्या लोकाच्या शिखरावर आहे. या सिद्धशिलेवर शिवपुर धाम आहे. त्यामध्येही मुक्त पुरुष अधांतरी राहतात. तेथे जन्ममरणादी कसलाही दोष लागत नाही. सर्व लोक तेथे मोठ्या आनंदात राहतात. त्यांना पुन: जन्ममरणाच्या फेऱ्यात पडावे लागत नाही. ते सर्व कर्मापासून मुक्त होतात. ही जैनांची मुक्ती आहे.'

(समीक्षक) हा विचार आहे की, ज्याप्रमाणे इतर पंथांमध्ये वैकुंठ, कैलास, गोलोक, श्रीपुर वगैरे ठिकाणी पौराणिकांच्या दृष्टीने, चौथ्या आकाशात ख्रिस्ती लोकांच्या दृष्टीने व सातव्या आकाशात मुसलमानांच्या मतामध्ये मुक्तीचे स्थान लिहिले आहे. त्याप्रमाणे जैनांच्या दृष्टीने सिद्धशिला व शिवपुर हे मोक्षाचे स्थान आहे. ज्याला जैन लोक उंच असे मानतात तोच भाग आमच्या भूगोलाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांच्या अपेक्षेने खाली आहे. उंच-खाली हे व्यवस्थित पदार्थ नाहीत. आर्यवर्त्तात राहणारे जैन लोक ज्याला वर (वरच) मानतात त्यालाच अमेरिकावासी खाली (खालच) मानतात; आणि आर्यवर्त्तावासी ज्याला खाली (खालचा) मानतात त्यालाच अमेरिकावासी वर (वरच) मानतात. मग ती शिला पंचेचाळीस लाखच नव्हे तर त्याच्या दुप्पट म्हणजे नव्वद लाख कोस लांब असती तरी तेथे राहणारे लोक मुक्त बंधनामध्येच आहेत. कारण त्या शिलेच्या अथवा शिवपुराच्या बाहेर पडल्यास त्यांची मुक्ती नष्ट होत असली पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये कायम तेथे राहण्याची इच्छा व तेथून बाहेर पडण्याच्या बाबतीत अनिच्छाही राहत असणा. रजेथे अडवणूक, इच्छा व अनिच्छा आहे. तेथे मुक्ती आहे असे कसे म्हणता येईल? नवव्या समुलासात वर्णन केल्याप्रमाणे मुक्ती


49 मानणे हेच योग्य होय. जैनांची मुक्ती हे एक प्रकारचे बंधनच आहे. हे जैन लोकही मुक्तीच्या बाबतीत भ्रमात गुरफटले आहेत. वेदांच्या ज्ञानाशिवाय नीट अर्थबोध झाल्याशिवाय मुक्तीचे स्वरूप कोणालाही कधी जाणता येणार नाही.

आता यांच्या आणखी काही असंभव गोष्टी ऐका. 'विवेकसार' पृष्ठ ७८ :- एक कोटी साठ लाख कलशांनी महावीराला त्याच्या जन्मकाळी स्नान घातले. 'विवेकसार' पृष्ठ १३६ः-दशाण राजा महावीराच्या दर्शनाला गेला. तेथे त्याला गर्व झाला. तेव्हा त्याच्या निवारणासाठी १६,७७,७२,१६,००० इतकी इंद्राची रूपे आणि १३,३७,०५,७२,८०,००,००,००० इतक्या इंद्राण्या तेथे आल्या होत्या. ते पाहून राजा आश्चर्यचकित झाला.

येथे असा विचार करावा की, इतके इंद्र व इंद्राण्या यांना उभे राहण्यास असे कितीतरी भूगोल हवेत. श्राद्धदिनकृत्य (आत्मनिंदा भावना) पृष्ठ ३१ वर असे लिहिले आहे की आड, विहीर व तलाव बनवू नये.

(समीक्षक) जर सर्व माणसे जैन पंथाची अनुयायी असतील आणि कोणीही आड, विहीर, तलाव बांधणार नाही. तर मग सर्व लोक पाणी कोठून पीतील?

(प्रश्न) तलाव वगैरे बांधल्याने त्यात सजीव प्राणी पडून मरतात. त्याचे पाप तलाव बांधणाऱ्याला लागते. म्हणून जैन लोक हे काम करीत नाहीत. (उत्तर) तुमची अक्कल अशी नष्ट का झाली? क्षुद्रकिड्यांच्या मरणाने पाप लागते असे तुम्ही समजता. तर गाय, बैल वगैरे मोठे पशू आणि मनुष्यादी प्राणी यांना पाणी प्यावयास मिळाल्याने महापुण्य मिळेल त्याचा विचार तुम्ही का करीत नाही?

'तत्वविवेक' पृष्ठ १९६ः- नंदमणिकार नावाच्या शेटजीने या शहरात एक विहीर बांधविली. त्यामुळे तो धर्मभ्रष्ट होऊन त्याला सोळा महारोग झाले. पुढे तो मेल्यावर त्याच विहिरीतला बेडूक बनला. महावरांच्या दर्शनाने त्याला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले. महावीर म्हणतात की, "मी आलो आहे हे ऐकून मी मागील जन्मात धर्माचार्य होतो हे ओळखून तो मला वंदन करण्यासाठी येऊ लागला. वाटेत श्रेणिकाच्या घोड्याचा टापेखाली सापडून तो मरून शुभ ध्यान योगाने तो ददृशंक नावाचा महर्ध्दिक देव झाला. आपल्या मर्यादित ज्ञानाच्या आधारे मी येथे आलो आहे ओळखून त्याने मला प्रणाम केला आणि ऋद्धी दाखवून परत गेला."

(समीक्षक) अशा प्रकारच्या ज्ञानविरोधी, अशक्य, खोट्या गोष्टी सांगणाऱ्या महावीराला सर्वोत्तम मानणे हे अत्यंत भ्रमिष्टपणाचे लक्षण आहे.

'श्राद्धदिनकृत्य' ग्रंथाच्या पृष्ठ ३६ वर लिहिले आहे की, मृत माणसाच्या शरीरावरील वस्त्रे साधूने घ्यावीत.

(समीक्षक) म्हणजे आता पहा! यांचे साधूही महाब्राह्मणासारखे झाले. प्रेतावरील वस्त्रे साधून घ्यावीत पण आभूषणे कोणी घ्यावीत? ती बहुमूल्य असल्यामुळे घरातच ठेवून घेत असतील. मग आपण कोण? 'रत्नसार' पृष्ठ १०५ :- धान्य वगैरे भाजणे, कुटणे, दळणे, अन्न शिजविणे वगैरे गोष्टींनी पाप लागते.

50 आता त्यांची ही ज्ञानहीनता पाहा ! ही कामे केली नाहीत तर मनुष्यादी प्राणी कसे जगू शकतील? आणि जैनही तडफडून मरतील.

'रत्नसारपृष्ठ १०४:- बाग लावल्यामुळे माळ्याला एक लक्ष पापे लागतात.

(समीक्षक) माळ्याला लक्ष पापे लागत असतील तर असंख्य जीव झाडांची पाने, फुले, फळे व सावली मिळून आनंदित होत असतात. त्यामुळे कोट्यवधी पटीने पुण्यही लागत असते. इकडे मुळीच लक्ष दिलेले नाही. हे केवढे अज्ञान आहे!

'तत्वविवेक' पू. २०२ - एके दिवशी लब्धी गावाचा साधू चुकून एका वेश्येच्या घरी गेला आणि त्याने धर्माच्या नावाने तिच्याकडे भिक्षा मागितली. वेश्या म्हणाली, येथे धर्माचे काम नसून अर्थाचे काम आहे तेव्हा त्या लब्धी (सिद्ध) साधूने साडेबारा लाख मोहरांचा वर्षाव तिच्या घरात केला.

(समीक्षक) ही गोष्ट खरी आहे असे निर्बुद्ध माणसांखेरीज कोण मनील?

'रत्नसार भाग १' पृष्ठ ६७ वर लिहिले आहे की, एक दगडी मूर्ती घोड्यावर बसली आहे. तिचे स्मरण करताच ती तेथे हजर होऊन रक्षण करते.

(समीक्षक) जैन लोकांनो, आता तुम्हीच सांगा, आजकाल तुमच्या घरी जेव्हा चोरी होते. दरोडा पडतो किंवा अशाच प्रकारच्या शत्रूपासून भय निर्माण होते तेव्हा तुम्ही तिचे स्मरण करून तिच्याकडून आपले रक्षण का करवून घेत नाही ? पोलीस वगैरे शासकीय रक्षकांच्या मागे कशाला मदतीसाठी फिरत असता? आता जैनांच्या साधूंची लक्षणे -

जैन साधू लक्षण समीक्षा

सरजोहरणा भैक्ष्यभुजो लुञ्चितमूर्द्धजा । श्वेताम्बरा क्षमाशीला नि संगा जैनसाधव ।।१।। सर्व० सं० आ० द० श्लो० १०।। जैनांच्या साधूंची लक्षणार्थ म्हणून जिनदत्तसूरीने हे श्लोक रचले आहेत:- सरजोहरण -चवरी जवळ बाळगणे आणि भिक्षा मागून खाणे, डोक्यावरील केसांचे गुंचन करणे म्हणजे ते उपटून काढणे, पांढरी वस्त्रे परिधान करणे, क्षमयुक्त राहणे, कोणाचीही संगत न धरणे, या लक्षणांनी युक्त असणाऱ्या श्वेतांबर जैनांना ‘जती' म्हणतात. ॥१॥

लुञ्चिता पिच्छिकाहस्ता पाणिपात्र दिगम्बरा । ऊर्ध्वाशिनो गृहे दातुर्द्वितीया स्युर्जिनर्षय ।।२।। सर्व० सं० आ० द० श्लो० ११।। दिगंबर म्हणजे वस्त्र धारण न करणे, डोकीचे केस उपटून टाकणे, पिच्छिका म्हणजे लोकरीच्या सुताचे केरसुणी सारखे झाडण्याचे साधन काखेत धरणे, कोणी भिक्षा दिली तर ती हातावर घेऊन खाणे असे करणारे दिगंबर जैन हे दुसऱ्या प्रकारचे साधू होत.२॥

भुङ्क्ते न केवली न स्त्री मोक्षमेति दिगम्बर । प्राहुरेषामयं भेदो महान् श्वेताम्बरै सह।।३।। सर्व० सं० आ० द० श्लो० १२।।


51 भिक्षा देणारा गृहस्थ जेवून उठल्यावर जे भोजन करतात ते जिनर्षी हे तिसऱ्या प्रकारचे साधू होत दिगंबरांचा श्वेतांबरोबर इतकाच भेद आहे की, दिगांबरी स्त्रियांशी संस्पर्श करीत नाही आणि श्वेतांबरी करतात हा जैनांच्या साधूमधील फरक आहे.॥३॥

जैन लोकांचे केशलुंचन (केस उपटणे) सर्वत्र प्रसिद्ध आहे. पाच मुठी लुंचन करावे असे त्यांच्या ग्रंथात लिहिले आहे. 'विवेकसारभाग' या ग्रंथाच्या पृष्ठ २१६ वर लिहिले आहे की, पाच मुष्टी लुंचन करून चारित्र्य ग्रहण केले म्हणजे डोकीचे पाच मुठी, केस उपटून साधू झाला. 'कल्पसूत्रभाष्य' पृष्ठ १०८:- केशलुंचन करावे. गाईच्या अंगावरील केसांप्रमाणे केस ठेवावेत.

(समीक्षक) जैनांनो, आता तुम्हीच सांगा. तुमचा दयाधर्म कोठे राहिला ? केशलुंचन ही हिंसा नाही काय ? केस उपटण्याचे काम स्वतः केले, गुरूने केले अथवा इतर कोणी केले तरी जिवाला किती यातना होत असतील? जिवाला यातना देणे यालाच हिंसा असे म्हणतात.

'विवेकसार' पृष्ठ ७-८ विक्रम संवत् १०३३ (इ.स. १७६ ) साली श्वेतांबरामधून ढूंढिया व ढूंढिया मधून तेरापंथी वगैरे संप्रदाय निघाले. ढूंढिये लोक पाषाणादिकांच्या मूर्तींना मानीत नाहीत आणि भोजन व स्नान करण्याच्या वेळा वगळता इतर सर्व वेळी तोंडावर पट्टी बांधून राहतात. जती वगैरे लोकही पुस्तक वाचण्याच्या वेळी तोंडावर पट्टी बांधतात. इतर वेळी बांधीत नाहीत.

मुखपट्टी-समीक्षा

(प्रश्न) तोंडावर पट्टी अवश्य बांधली पाहिजे. कारण 'वायुकाय' म्हणजे हवेत असणारे सूक्ष्म जीव तोंडातील वाफेच्या उष्णतेने मरतात आणि त्याचे पाप तोंडावर पट्टी न बांधणाऱ्याला लागते. म्हणूनच आम्ही तोंडावर पट्टी बांधणे चांगले समजतो. (उत्तर) ही गोष्ट विज्ञानाच्या दृष्टीने व प्रत्यक्षादी प्रमाणांच्या आधारे अनुचित आहे. कारण जीव अजर अमर असल्याने ते तोंडाच्या वाफेने कधीच मरू शकत नाहीत. त्यांना तुम्हीही अजर, अमर मानता.

(प्रश्न) जीव मरत नाही हे खरे; परंतु तोंडातील उष्ण वाफेने त्यांना पीडा होते ती पीडा देणाऱ्याला पाय लागते. म्हणून तोंडावर पट्टी बांधणे चांगले. (उत्तर) तुमचे हे विधानही अगदीच अशक्य कोटीतील आहे. कारण पीडा दिल्याखेरीज कोणत्याही जीवाचे निर्वाह होऊ शकत नाही. तोंडातील वाफेने तुमच्या ते जीवांना पीडा होत असेल तर चालणे, फिरणे, बसणे, हात उचलणे, डोळे मिचकावणे इत्यादी गोष्टींनीही जीवांना अवश्य पीड़ा होत असणार म्हणून तुम्हीही जीवांना पीडा देण्यापासून अलिप्त राहू शकत नाही.

(प्रश्न) होय! तरीपण शक्य होईल तितके जीवांचे रक्षण केले पाहिजे. जेथे आम्ही जीवांना वाचवू शकत नाही तेथे आपला निरुपाय आहे असे आम्ही समजतो. कारण हवा वगैरे सर्व पदार्थामध्ये जीव भरलेले आहेत. आम्ही तोंडावर कापड बांधले नाही तर पुष्कळ जीव मरतील. कापड बांधल्याने कमी जीव मरतात.

52 (उत्तर ) तुमचे हे म्हणणेही युक्तिशून्य आहे. कारण कापड बांधल्याने जीवांना अधिक दुःख पोचते. तोंडावर कापड बांधल्याने त्याच्या तोंडातील हवेला प्रतिबंध होतो; आणि ती खाली अथवा आजूबाजूला पसरते आणि मौनाच्या वेळी एकत्र येऊन नाकावाटेवेगाने बाहेर पडते. त्यामुळे उष्णता वाढून तुमचे मताप्रमाणे जीवांना जास्तच पीडा पोचत असणार. पाहा ! घराची किंवा खोलीची सर्व दारे बंद केली अथवा पडदे सोडले तर त्यात उष्णता विशेष जाणवते. दारे खिडक्या उघड्या ठेवल्याने उष्णता कमी होते. याचप्रमाणे तोंडावर पट्टी बांधल्याने उष्णता जास्त होते आणि ते उघडे ठेवल्याने ती कमी होते. म्हणजे तुम्ही तुमच्या वागण्याने जीवांना जास्त क्लेश देता. तोंड बंद ठेवल्याने तोंडात साठलेली हवा नाकपुड्यातून वेगाने बाहेर पडून जीवांना जास्त धक्का व दु:ख देत असणार.

पहा! एखादा माणूस अग्नीला तोंडाने फुंकर घालतो तर दुसरा फुंकणीतून वारा फेंकतो. अशावेळी तोंडाने फुंकलेला वारा आजूबाजूला पसरल्यामुळे अग्नीजवळ जाईपर्यंत त्याचा जोर कमी होतो आणि नळीतून फुंकलेला वारा एकत्रित असल्याने जास्त वेगाने अग्नीला लागतो. याचप्रमाणे तोंडावर पट्टी बांधून हवेला अडवल्याने ती नाकपुड्यातून अत्यंत वेगाने बाहेर पडून जीवांना जास्तच दुःख देते. यावरून तोंडावर पट्टी बांधणाऱ्यांपेक्षा न बांधणारे लोक अधिक धर्मात्मे आहेत. शिवाय तोंडावर पट्टी बांधल्याने शब्दांचा उच्चार प्रयत्नपूर्वक केला तरी अक्षरांची यथायोग्य स्थाने व प्रयत्नांसह उच्चार होत नाहीत. सानुनासिक नसलेल्या अक्षरांचा सानुनासिक उच्चार करण्याचा दोष तुम्हाला लागतो.

तोंडावर पट्टी बांधल्याने तोंडाची दुर्गंधी जास्त वाटते. कारण शरीरात दुर्गंध भरलेला आहे. शरीरातून जो वायु बाहेर पडतो तो प्रत्यक्षतः दुर्गंधयुक्त असतो. त्याला प्रतिबंध केल्यास दुर्गंध जास्तच वाढतो. ज्याप्रमाणे बंद असलेले शौचालय जास्त दुर्गंधयुक्त असते व ते उघडे असल्यास त्यात कमी दुर्गध होतो. त्याचप्रमाणे तोंडावर पट्टी बांधल्याने दंतधावन, मुखप्रक्षालन व स्नान केल्याने आणि वस्त्रे न धुतल्याने तुमच्या शरीराला फार घाण वास येतो. आपल्या या वागण्याने तुम्ही जगात अनेक रोग पसरवून जीवांना जितके दुख देता तितके तुमचे पाप जास्त होते. जत्रा वगैरेच्या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने महामारीसारखे अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होऊन जीवांना दु:खदायक होते. याउलट जेथे कमी दुर्गंध असते तेथे रोगांचा प्रसारही कमी होतो व जीवांना जास्त दु:ख सहन करावे लागत नाही. यावरून तुम्ही जास्त दुर्गंध पसरविण्याच्या बाबतीत अधिक अपराधी आहात. जे लोक तोंडावर पट्टी बांधत नाहीत, दात घासतात, तोंड धुतात, स्नान करतात आणि अशा प्रकारे स्थान व वस्त्रे निर्मळ ठेवतात ते तुमच्यापेक्षा खूपच चांगले आहेत.

जसे अंत्यजांच्या दुर्गंधीयुक्त सहवासापासून दूर राहणारे लोक फार चांगले आहेत. ज्याप्रमाणे अंत्यजांच्या दुर्गंधयुक्त सहवासामुळे बुद्धी निर्मळ होत नाही त्याप्रमाणे तुमची तुमच्या सहकाऱ्यांची बुद्धीही विकसित होत नाही. ज्याप्रमाणे रोगाची अधिकता व बुद्धीची अल्पता यांमुळे धर्मानुष्ठानात बाधा निर्माण होते. त्याचप्रमाणे तुमचे व तुमच्या सहकाऱ्यांचे दुर्गंधीयुक्त वर्तमान होत असणार.

(प्रश्न) ज्याप्रमाणे बंद घरात पेटविलेल्या अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडून जीवांना दुख पोचवू शकत नाही,

53 त्याप्रमाणे आम्ही तोंडावर पट्टी बांधून आतील वायूला प्रतिबंध करतो आणि बाहेरच्या जिवांना कमीत कमी कह कर्म दुःख होईल अशी खबरदारी घेतो. तोंडावर पट्टी बांधल्याने बाहेरच्या हवेतील जीवांना त्रास पोचत नहीं ज्याप्रमाणे समोर अग्नी ताप देतो त्याच्या आड हात धरल्यास त्याची धग कमी लागते त्याप्रमाणे हे आहे. अर्थात हवेतील जीवशरीरधारी असल्यामुळे त्यांना पीडा अवश्य पोचते. (उत्तर) तुमचे हे बोलणे पोरकटपणाचे आहे. प्रथम हे पाहा की, जेथे छिद्र नाही व आतील वायूचा बाहेरच्या हवेशी संयोग होत नाही तेथे अग्नी पेटूच शकत नाही. हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहावयाचे असेल तर एखाद्या कंदिलात दिवा पेटवून सर्व छिद्र बंद करा. आतील दिवा ताबडतोब विझतो असे तुम्हाला दिसेल. ज्याप्रमाणे पृथ्वीवर राहणारे मनुष्यादि प्राणी बाहेरच्या हवेशिवाय जगू शकत नाहीत त्याप्रमाणे हवेशिवाय अग्नीही जळू शकत नाही. अग्नीचा वेग एका बाजूने अडविल्यास तो दुसऱ्या बाजूने अधिक वेगाने बाहेर पडतो. अग्नी समोर हात धरल्यास तोंडावर अग्नीची झळ कमी लागते हे खरे, परंतु ती झळ हातावर अधिक लागते. म्हणून तुमचे म्हणणे बरोबर नाही.

(प्रश्न) जेव्हा एखादा लहान माणूस मोठ्या माणसाच्या जवळ जाऊन किंवा त्याच्या कानात बोलतो तेव्हा तो आपल्या तोंडावर उपरणे, रुमाल किंवा हात धरतो, हे सर्वांना माहित आहे. कारण आपल्या तोंडातील थुंकी दुसऱ्या माणसाच्या अंगावर उडू नये अथवा आपल्या तोंडाची दुर्गध त्याच्यापर्यंत पोचू नये असे त्याला वाटत असते. पुस्तक वाचताना तोंडातून थुंकी उडून पुस्तकाबर अवश्य पडते आणि ते उष्टे होऊन खराब होते. म्हणून तोंडावर पट्टी बांधणे चांगले आहे. (उत्तर) यावरून सिद्ध होते की सूक्ष्म जीवांच्या रक्षणासाठी तोंडावर पट्टी बांधणे व्यर्थ आहे. जेव्हा कोणी एखाद्या मोठ्या माणसाशी बोलताना तोंडावर हात अथवा रुमाल धरतो यासाठी की आपली गुप्त गोष्ट इतर कोणी ऐकू नये कारण कोणी जेव्हा उघडपणे बोलतो तेव्हा तो तोंडावर हात अथवा रूमाल धरीत नाही. यावरून हे स्पष्ट आहे की, गुप्त गोष्ट सांगण्यासाठीच असे केले जाते. दंतधावन वगैरे न केल्याने तुमच्या मुखादी अवयवांची फारच घाण येते. जेव्हा तुम्ही काणाजवळ बसत असाल अथवा कोणी तुमच्या जवळ बसत असेल तेव्हा त्याला दुर्गधाशिवाय काय मिळत असेल ? अर्थात तोंडासमोर हात किंवा फडके धरण्याची इतरही अनेक प्रयोजन आहेत. जसे पुष्कळ लोकांसमोर गुप्त बोलताना तोंडासमोर हात अथवा कापड धरले नाही तर हवा जशी इतरांच्या दिशेने पसरेल तशी गोष्टही पसरेल. जेव्हा दोन माणसे एकांतात बोलत असतात तेव्हा तोंडावर हात अथवा फडके धरत नाहीत. कारण तेथे तिसरा कोणी ऐकणारा नसतो. मोठ्या माणसांच्या अंगावर थुंकी उडू नये असे वाटते तर लहान माणसांच्या अंगावर थुंकी उडाली तरी हरकत नाही, असे समजावयाचे काय? कारण आपण दुरून बोलत असलो तरी आपल्याकडून दुसऱ्याकडे वारा वहात असेल तर थुंकीचे त्रसरेणु सूक्ष्मरूपात वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या दुसऱ्या माणसाच्या अंगावर नक्कीच पडणार. त्यामध्ये काही दोष अथवा पाप आहे असे समजणे हे अडाणीपणाचे लक्षण आहे. कारण तोंडातील वाफेच्या उष्णतेने सूक्ष्म जीव मरत असतील अथवा त्यांना पीडा पोचत असेल तर वैशाख किंवा ज्येष्ठ महिन्यात सूर्याच्या भयंकर उष्णतेने

54 वायुकाय जीवापैकी एकही जिवंत राहत नसेल, सगळेच मरून जात असतील. परंतु त्या उष्णतेनेही हवेतील सूक्ष्म जीव मरत नाहीत. म्हणून तुमचा हा सिद्धांत खोटा आहे. तुमचे तीर्थकर पूर्ण विद्वान असते तर त्यांनी असल्या निरर्थक गोष्टी कशाला केल्या असत्या? पाहा! ज्या जीवाची वृत्ती सर्व अवयवांसह विद्यमान असते त्यालाच वेदना होत असतात. याला प्रमाण हे आहे .

पञ्चावयवयोगात्सुखसंवित्ति ।। -सांख्य ।।अ० ५।।सू० २७।।

हे सांख्य शास्त्रातील सूत्र आहे. जेव्हा पाच इंद्रियांचा पाच विषयांशी संबंध घडून येतो तेव्हाच जीवाला सुखाची किंवा दु:खाची प्राप्ती होते. जसे बाहिऱ्या माणसाला शिव्या देऊन काय होणार? आंधळ्या माणसाला रूप कसे दिसणार अथवा समोरून साप, वाघ वगैरे भयंकर प्राणी निघून गेले तरी त्याला कसे कळणार? बधिराला स्पर्श समजणार नाही. नाकाचा पीनस रोग होऊन ज्याचे घाणेंद्रिय नष्ट झाले आहे त्याला गंध कसा येणार ? आणि ज्याला जीभच नाही त्याला रसस्वाद कसा घेता येणार ? तशीच स्थिती त्या जीवांची सुद्धा व्यवस्था आहे.

पाहा जेव्हा माणसाचा जीव सुषुप्ती (गाढनिद्रेच्या) ज्या अवस्थेत असतो तेव्हा त्याला सुख किंवा दुःख काहीच होत नाही. कारण तो शरीराच्या आत असला तरी बाहेरच्या अवयवांशी त्यावेळी त्याचा संबंध नसल्यामुळे तो सुखाचा अथवा दु:खाचा अनुभव घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे वैद्य किंवा आजकालचे डॉक्टर रोग्याला गुंगी आणणारी वस्तू खायला देऊन अथवा हुंगायला लावून त्याच्या शरीराचे अवयव कापतात किंवा फाडतात तेव्हा त्या रोग्याला दु:खाची जाणीव मुळीच होत नाही, त्याप्रमाणे वायुकाय किंवा अन्य स्थावर शरीरयुक्त जीवांना कधीही सुख अथवा दुःख होऊ शकत नाही. मूर्छित झालेल्या प्राण्याला सुखदुःखाची जाणीव होत नाही. त्याचप्रमाणे वायुकाय वगैरे जीवही अत्यंत मूर्छित असल्याने त्यांना सुख-दुःख होत नाही. तेव्हा त्यांना वाचविण्याची गोष्ट कशी सिद्ध होऊ शकेल? त्यांना सुखदुःखाची प्रत्यक्ष अनुभूतीच होत नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत अनुमानादी प्रमाणे कशी तर्कसंगत ठरू शकतील?

(प्रश्न) ते जर जीव आहेत तर त्यांना सुख-दुःख का होत नसेल? (उत्तर) भोळ्या लोकांना, ऐका! जेव्हा तुम्ही सुषुप्तावस्थेत असता तेव्हा तुम्हाला सुख दुःख का होते नाही ? जीव आणि ज्ञानेंद्रिये यांचा प्रत्यक्ष संबंध हा सुखदुःखाच्या अनुभूतीला कारणीभूत असतो. याचे उत्तर आम्ही नुकतेच दिले आहे की, गुंगीचे औषध हुंगायला देऊन डॉक्टर लोक रोग्याच्या अवयवांची शल्य चिकित्सा करतात. त्याचे दु:ख त्या रोग्याला जाणवत नाही. त्याचप्रमाणे अति मूर्छित जीवांना सुख-दु:खाची जाणीव कशी होईल. कारण तेथे ती जाणीव होण्याचे कोणतेच साधन नसते.

(प्रश्न) पाहा. निलोति म्हणजे हिरव्या पालेभाज्या व कंदमुळे आम्ही लोक खात नाही. कारण निलोति मध्ये आणि अनेक कंदमुळांमध्ये अनंत जीव असतात. त्या भाज्या व कंदमुळे आम्ही खाल्ली तर त्या जीवांना मारण्याचे व दु:ख देण्याचे पाप आम्हाला लागेल. (उत्तर) तुमचे हे बोलणे अगदी अज्ञानपणाचे आहे. कारण पालेभाज्या खाल्याने जीव मरतात किंवा

55 त्यांना पीडा होते असे तुम्ही कसे मानता? त्यांना पीडा होत असलेली तुम्हाला प्रत्यक्ष दिसत नाही आणि जर ती तुम्हाला दिसत असेल तर ती आम्हालाही दाखवा. परंतु तुम्ही कधीही ती प्रत्यक्ष पाहू किंवा आम्हाला दाखवू शकणार नाही. जेथे प्रत्यक्ष प्रमाण नसते तेचे अनुमान, उपमान व शब्द प्रमाणही कधी असू शकत नाही. शिवाय आम्ही वर जे उत्तर दिले आहे तेच या बाबतीतही खरे आहे. कारण जे जीव अत्यंत अंध:कारात, महासुषुप्तीत व गाढ गुंगीत असतात त्यांना सुखदुःख होते असे मानणेही तुमच्या तीर्थंकरांचीही चूकच दिसते. या तीर्थंकरांनी तुम्हाला तर्क वज़न यांच्या विरोधी असणारा उपदेश केला आहे. तुम्हीच विचार करा, जेव्हा घराला अंत आहे. तेव्हा त्या घरात राहणारे अनंत कसे असू शकतील ? कंदाचा अंत आम्ही पाहतो. मग त्यात राहणाऱ्या जीवांचा अंत का असणार नाही ? म्हणून तुमचे हे म्हणणे अत्यंत चूक आहे

(प्रश्न) पाहा. तुम्ही लोक पाणी नतापविता तसेच पिता. ते फार मोठे पाप आहे. आम्ही तापविलेले पाणी पितो तसेच तुम्हीही पीत जावे. (उत्तर) हे तुमचे बोलणेही भ्रामक आहे. कारण जेव्हा तुम्ही पाणी उकळता तेव्हा त्या पाण्यातील सारे जीव मरत असणार आणि त्यांची शरीर पाण्यात शिजून ते पाणी बडीशेपेच्या अकसारखे होत असणार म्हणजे तुम्ही जणू त्यांच्या शरीराचा रस पिता, म्हणून तुम्ही फार मोठे पापी बनता. याउलट जे लोक थंड पाणी पितात ते तुमच्या सारखे पापी ठरत नाहीत. कारण थंड पाणी प्याल्यानंतर जे जीव पाण्याबरोबर पोटात जातात त्यांना तेथील ऊब मिळून ते श्वासाबरोबर बाहेर येतील. जलकाय जीवांना वर सांगितल्याप्रमाणे सुखदुःख होत नाही. म्हणून थंड पाणी प्याल्याने कोणालाही पाप लागत नाही.

(प्रश्न) जठराग्नीच्या उष्णतेने जसे पोटात गेलेले जीव बाहेर पडतात तसे पाणी गरम करताना लागणाऱ्या उष्णतेने ते बाहेर का जाणार नाहीत? (उत्तर) होय. ते बाहेर निघून जातात. परंतु तुम्ही तर तोंडातील हवेच्या उष्णतेने जीवांचे मरण मानता. तेव्हा पाणी गरम केल्याने तुमच्या मतानुसार जीव मरून जातील किंवा जास्त दुःख सोसून बाहेर पडतील आणि मग मेलेल्या जीवांची शरीर त्या पाण्यात शिजून जातील. त्यायोगे तुम्ही अधिक पापी व्हाल की गाही?

(प्रश्न) आम्ही आपल्या हातांनी पाणी तापवीत नाही अथवा कोणाही गृहस्थाला पाणी गरम करण्यास सांगत नाही. म्हणून आम्हाला पाप लागत नाही. (उत्तर) तुम्ही गरम पाणी पीत नसता तर गृहस्थांनी ते कशाला गरम केले असते ? म्हणून त्या पापाचे भागीदार तुम्हच आहात. किंबहुना तुम्ही जास्त पापी आहात. कारण तुम्ही कोणा एका गृहस्थाला पाणी तापविण्यास सांगितले असते तर एकाच घरी पाणी तापविले गेले असते. परंतु साधु महाराज कोणाच्या घरी येतील याच काहीच कल्पना नसल्यामुळे सर्वच गृहस्थ आपापल्या घरी पाणी तापवून ठेवतात. म्हणून या पापाचे मुख्य भागीदार तुम्हीच आहात.

तसेच अधिक लाकडे जाळून अग्नी पेटविल्याने वर सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक, शेती व व्यापार इत्यादिकांमध्ये तुम्हीच अधिक पापी व नरकगामी ठरता. पाणी तापविण्याच्या बाबतीत तुम्हीच मुख्यतः

56 निमित्तकारण असता; आणि लोकांनी गरम पाणी प्यावे व थंड पाणी पिऊ नये असा उपदेश तुम्ही करता. म्हणून त्या पापाचे मुख्य भागीदार तुम्हीच आहात. तुमचा उपदेश ऐकून जे लोक तसे करतात तेही पापी आहेत.

आता पाहा । सूक्ष्म जीवांवर दया करण्याच्या गोष्टी तुम्ही बोलता आणि अन्य पंथियांची निंदा व अहित करता ते काय थोडे पाप आहे? तुमच्या तीर्थकरांनी सांगितलेले सिद्धांत खरे असते तर या जगात ईश्वराने इतका पाऊस का पाडला असता ? इतक्या नद्या का वाहिल्या असत्या? आणि ईश्वराने इतके पाणी का निर्माण केले असते. त्याने सूर्यही उत्पन्न केला नसता. कारण तुमच्या मतानुसार सूर्याच्या उन्हाने कोट्यावधी जीव मरत असणार. ज्यांना तुम्ही ईश्वर मानता ते तुमचे तीर्थकर जेव्हा विद्यमान होते तेव्हा त्यांनी दया करून सूर्याची उष्णता का नष्ट केली नाही आणि ढगांची निर्मिती का थांबविली नाही.

आम्ही वर दाखवून दिल्याप्रमाणे भाजीपाल्यात किंवा कंदमुळांमध्ये असणाऱ्या जीवांना सुखदुःखाची जाणीव होत नाही, तर केवळ प्रत्यक्ष दिसणाऱ्या प्राण्यांमध्येच ती जाणीव असते. सर्वथा सर्व जीवांवर दया करणे हेही दुःखाला कारणीभूत होते. कारण तुमच्या सांगण्याप्रमाणे सगळी माणसे वागू लागतील आणि चोरे-दरोडेखोरांना कसलीच शिक्षा होईनाशी झाली तर जगात किती पाप वाढेल ! म्हणून दुष्टांना यथोचित शिक्षा देणे व श्रेष्ठांचे पालन करणे हीच खरी दया आहे. याविरुद्ध आचरण करण्यात दयाक्षमारूपी धर्माचा नाश आहे. कितीतरी जैन लोक दुकानदारी करतात . ते आपल्या व्यवहारात खोटे बोलतांत, दुसऱ्यांच्या धनाचा अपहार करतात आणि गरिबांना फसवितात. त्यांनी अशी कुकर्मे करू नयेत असा खास उपदेश तुम्ही का करीत नाही? तोंडावर पट्टी बांधणे वगैरे सोंगे ढोंगे का करीत असता?

जेव्हा तुम्ही लोकांना चेला किंवा चेली बनवता तेव्हा त्यांचे केशलुंचन करता; आणि त्यांना पुष्कळ दिवस उपाशी राहायला भाग पाडता. अशा प्रकारे तुम्ही इतरांच्या व आपल्या स्वतःच्या आत्म्याला कष्ट व दुख देता. स्वत: पीडा सहन करून इतरांना दु:ख देता. एकप्रकारे तुम्ही आत्महत्या करणारे म्हणजे आत्म्याला दु:ख देणारे ठरून हिंसक का बनता? हत्ती, घोडे, बैल, उंट इत्यादी प्राण्यांवर बसण्यात आणि माणसांकडून मजूरी करविण्यात पाप आहे असे जैन लोक का समजत नाहीत ? तुमचे चले जसे मूर्खपणाच्या व बाष्कळ गोष्टी खऱ्या आहेत असे सिद्ध करू शकत नाहीत तसेच तुमचे तीर्थकरही त्यांना सत्य ठरवू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही महग्रंथ वाचता तेव्हा तुम्ही आणि तुमचे श्रोते यांच्यामध्ये असणारे जीव तुमच्या मतानुसार मरतच असणार, मग तुम्ही त्या पापाचे धनी का होता? आम्ही हे सारे थोडक्यात सांगितले आहे. त्यावरून पुष्कळ काही समजून घ्या. या साऱ्यां विवेचनाचे तात्पर्य हे आहे की जल, स्थल व वायू यांमध्ये राहणाऱ्यां स्थावर शरीरधारी मूर्च्छित जीवांना कधीच सुख अथवा दु:ख होऊ शकत नाही.

जैनांच्या असंभव गोष्टी

आता जैनांच्या आणखी काही असंभव गोष्टी लिहितो. त्या तुम्ही ऐका आणि हेही लक्षात ठेवा की. आपल्या हाताने साडेतीन हातांचे धनुष्य असते आणि जी कालगणना आम्ही यापूर्वी नमूद केली आहे ती तशीच आहे हे समजावे. ‘रत्नसारभाग' पू. १६६-१६७ वर असे लिहिले आहे की,


57 १) ऋषभदेवाचे शरीर ५०० धनुष्ये लांब (उंच) होते आणि त्याचे आयुष्य ८४ लाख पूर्ववर्णे होते. २) अजितनाथाचे शरीर ४५० धनुष्ये लांब आणि आयुष्य ७२लाख पूर्ववर्षेचे आयुष्य. ३) संभवनाथाचे शरीर ४०० धनुष्ये लांब आणि ६० लाख पूर्ववर्षेचे आयुष्य. ४) अभिनंदनाचे शरीर ३५० धनुष्ये लांब आणि ५० लाख पूर्ववर्षेचे आयुष्य. ५) सुमतिनाथाचे शरीर ३०० धनुष्ये लांब आणि ४० लाख पूर्ववर्षेचे आयुष्य. ६) पद्मप्रभाचे शरीर १४० धनुष्ये लांब आणि ३० लाख पूर्ववर्षेचे आयुष्य. ७) पार्श्वनाथाचे शरीर २०० धनुष्ये लांब आणि २० लाख पूर्ववर्षेचे आयुष्य. ८) चंद्रप्रभचे शरीर १५० धनुष्ये लांब आणि १० लाख पूर्ववर्षेचे आयुष्य. ९) सुविधिनाथाचे शरीर १०० धनुष्ये लांब आणि २ लाख पूर्ववर्षेचे आयुष्य. १०) शीतलनाथाचे शरीर ९० धनुष्ये लांब आणि १ लाख पूर्ववर्षेचे आयुष्य. ११) श्रेयांसनाथाचे शरीर ४० धनुष्ये लांब आणि ८४ लाख वर्षांचे आयुष्य. १२) वासुपूज्यस्वामीचे शरीर ७० धनुष्ये लांब आणि ७२ लाख वर्षांचे आयुष्य. १३) विमलनाथाचे शरीर ६० धनुष्ये लांब आणि ६० लाख वर्षांचे आयुष्य. १४) अनंतनाथाचे शरीर ५० धनुष्ये लांब आणि ३० लाख वर्षांचे आयुष्य. १५) धर्मनाथाचे शरीर ४५ धनुष्ये लांब आणि १० लाख वर्षांचे आयुष्य. १६) शांतिनाथाचे शरीर ४० धनुष्ये लांब आणि १ लाख वर्षांचे आयुष्य. १७) कुंथुनाथाचे शरीर ३५ धनुष्ये लांब आणि ९५ हजार वर्षांचे आयुष्य. १८) अमरनाथाचे शरीर ३० धनुष्ये लांब आणि ८४ हजार वर्षांचे आयुष्य. १९) मल्लीनाथाचे शरीर २५ धनुष्ये लांब आणि ५५ हजार वर्षांचे आयुष्य. २०) मुनी सुवृताचे शरीर २० धनुष्ये लांब आणि ३० हजार वर्षांचे आयुष्य. २१) नमिनाथाचे शरीर १४ धनुष्ये लांब आणि

१० हजार

वर्षांचे आयुष्य. २२) नेमिनाथाचे शरीर १० धनुष्ये लांब आणि १ हजार वर्षांचे आयुष्य. २३) पार्श्वनाथाचे शरीर ९ हात लांब १०० वर्षांचे वर्षांचे आयुष्य. २४) महावीर स्वामीचे शरीर ७ हात लांब ७२ वर्षांचे वर्षांचे आयुष्य.


हे चोवीस तीर्थकर जैनांचे मतप्रवर्तक आचार्य व गुरू आहेत. त्यांनाच जैन लोक परमेश्वर मानतात आणि ते सर्व मोक्षाला गेले असे समजतात. माणसाचे एवढे मोठे शरीर आणि इतके दीर्घ आयुष्य असणे शक्य तरी आहे काय असा विचार बुद्धिमंतांनी केला पाहिजे. या भूगोलाबर असली अवाढव्य माणसे फारच थोडी राहू शकतील याच जैनांच्या थापा उसन्या घेऊन पुराणिकांनी एक लाख, दहा हजार व एक हजार वर्षांची आयुष्ये असल्याच्या गोष्टी लिहिल्या. त्यादेखील शक्य कोटीतील असू शकत नाहीत. मग जैनांच्या या थापा कशा खऱ्या असू शकतील?

58 आता आणखी ऐका, 'कल्पभाष्य' पृष्ठ ४: नागकेताने गावाएवढया आकाराची एक शिळा बोटावर उचलून धरली. 'कल्पभाष्य' पृष्ठ ३५: महावीराने अंगठ्याने पृथ्वीला दाबले. त्यामुळे शेषनागाचा थरकाप झाला. 'कल्पभाष्य' पृष्ठ ४६: महावीराला साप चावला त्यावेळी रक्ताऐवजी दूध निघाले आणि तो साप आठव्या स्वर्गाला गेला. 'कल्पभाष्य' पूछ ४७: महावीराच्या पायावर खीर शिजवीली पण पाय भाजले नाहीत. 'कल्पभाष्य' पृष्ठ १६ एका लहानश्या भांड्यात एक उंट उभा केला. 'रत्नसार', भाग १, पृष्ठ १४ शरीरावरील मळ काढून टाकू नये व खाजवू नये. 'विवेकसार' पृष्ठ २१५: दमसार नावाच्या एका जैन साधूने क्रुद्ध होऊन, उद्वेगजनक सूत्र उच्चारून एका शहराला आग लावली. हा साधु महावीर तीर्थकरांचा फार लाडका होता. 'विवेकसार' पृष्ठ २२७ : राजाची आज्ञा अवश्य मानली पाहिजे. 'विवेकसार' पृष्ठ २२७: कोशा नावाच्या एका वैश्येने थाळीमध्ये मोहऱ्यांचा ढीग करून त्याच्यावर फुलांनी झाकलेली एक सुई उभी केली. त्या सुईवर उभे राहून तीने उत्तम प्रकारे नाच केला. परंतु ती सुई तिच्या पायात घुसली नाही अथवा मोहऱ्यांचा ढीगही विस्कटला नाही ! 'तत्वविवेक' पृष्ठ २२८: याच कोशा वेश्येशी एका स्थूल मुनीने १२ वर्षे भोग केला आणि त्यानंतर दीक्षा घेऊन तो सद्गतीला गेला. ती कोशा वेश्याही जैन धर्माचे पालन करून सद्गतीला गेली. 'विवेकसार' पृष्ठ ११५: एका सिद्धाची गळ्यात घालण्याची कथा एका वैश्याला दरोज ५०० मोहरा देत असे. 'विवेक' पृष्ठ २२८: बलवान पुरुषाची आज्ञा व देवाची आज्ञा मोडल्याने घोर वनात कष्ट सहन करून राहिल्याने आणि गुरू, माता, पिता, कुलाचार्य जातीचे लोक आणि धर्मोपदेशक यांच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याने धर्माचा कमीपणा होते असला तरी त्यामुळे धर्माची हानी होत नाही.

(समीक्षक) आता पाहा! यांच्या मिथ्यागोष्टी! एक माणूस गावाच्या आकाराची मोठी शिळा बोटावर उचलून कधीतरी धरू शकेल काय? आणि जमिनीवर अंगठा दाबल्याने कधीतरी पृथ्वी दाबली जाऊ शकते काय ? आणि शेषनाग नावाचा प्राणी अस्तित्वातच नाही तर थरकाप कुणाचा उडणार? ॥१॥ शरीराला कापल्यावर त्यातून दूध निघाल्याचे कोणीही पाहिलेले नाही. हा इंद्रजाल जादूचा खेळच झाला. महावीराला चावणारा साप स्वर्गाला गेला आणि महात्मा श्रीकृष्ण वगैरे तिसऱ्या नरकात गेलेही किती खोटी गोष्ट आहे! ॥३।४॥ महावीराच्या पायावर खीर शिजविली तेव्हा त्याचे पाय जळून कसे गेले नाहीत ?॥५॥ एका लहान भांडयात उंट कधी सामावला आहे काय ? ॥६॥ अंगावरील मळ ते काढून टाकत नसतील व अंग चोळीत नसतील तर ते दुर्गधरूपी महानरक भोगीत असणार. ॥७॥ ज्या साधूने शहर जाळले त्याची दया व क्षमा कोठे गेली? महावीराच्या सहवासात राहूनही त्याचा आत्मा पवित्र बनला नाही. तर मग आता महावीराच्या मृत्यूनंतर त्याच्या आश्रयाने जैन लोक कधीही पवित्र बनू शकणार नाहीत. ॥८॥. राजाची आज्ञा मानली पाहिजे, परंतु जैन लोक व्यापारी असल्यामुळे भिऊन ही गोष्ट लिहिली असावी. ॥९॥ कोशा वेश्येचे शरीर कितीही हलके असले तरी तिने मोहऱ्यांच्या ढीगावर सुई उभी करून तिच्यावर नृत्य करणे, सुई न टोचणे आणि मोहरा न विस्कटणे, हे घडघडीत खोटे नाही तर काय आहे ?॥१०॥ कोणत्याही अवस्थेत काहीही झाले तरी, कोणीही धर्म सोडता कामा नये. ॥११॥ कथा हे केवळ वस्त्र आहे. ती दरोज ५०० मोहरा कशी देऊ शकेल ?॥१२॥

59 जैनांच्या साहित्यातील अशा असंभव व खोट्या गोष्टी मी लिहू लागलो तर त्यांच्या पोकळ ग्रंथांसारखा एक महाग्रंथ तयार होईल. म्हणून मी जास्त लिहीत नाही. याचा अर्थ एवढाच की, जैनांच्या काही थोड्या चांगल्या गोष्टी वगळता इतर सगळ्या गप्पा खोट्या व जादूने भरल्या आहेत. पाहा :-

जैन पंथातील जम्बूद्वीप परिमाण

दो ससि दो रवि पढमे। दुगुणा लवणंमि धायई संडे। बारस ससि बारस रवि। तप्पमि इं निदिठ ससि रविणो।। प्रक० भा० ४।। संग्रहणी सू० ७७।। जे जंबुद्वीप लाख योजने म्हणजे ४ लाख कोस क्षेत्रफळाचे आहे असे लिहिले आहे त्यातील हे पहिले द्वीप आहे. त्यात दोन सूर्य व दोन चंद्र आहेत, आणि लवण समुद्रात त्याच्या दुप्पट म्हणजे चार सूर्य व चार चंद्र आहेत. तसेच धातकी (धातूच्या) खंडात बारा चंद्र व बारा सूर्य आहेत. ॥७७॥

तिगुणा पुब्बिल्लजया। अणंतराणंतरं मिखित्तमि। कालो ए बयाला। बिसत्तरी पुरकर द्वंमि।। प्रक० भा० ४।। संग्रहणी सू० ७८।। त्यांची तिप्पट केल्यास त्यांची संख्या छत्तीस होते. त्यात जंबुद्वीपाचे दोन व लवण समुद्राचे चार मिळवले तर बेचाळीस चंद्र व बेचाळीस सूर्य कालोदधि समुद्रात आहेत. याचप्रमाणे पुढील द्वीपे व समुद्र त्यामध्ये धातकी बंडाचे १२, लवण समुद्राचे ४ आणि जंबुद्वीपाचे २-२ अशी बेरीज केल्यास पुष्करद्वीपात १४४ चंद्रव १४४ सूर्य होतात. ही फक्त अर्ध्या मनुष्य क्षेत्राची गणना आहे. परंतु जेथे माणसे राहत नाहीत तेथे पुष्कळसे सूर्य व चंद्र आहेत. अर्ध्या पुष्करद्वीपात जे पुष्कळ चंद्र व सूर्य आहेत ते स्थिर आहेत. वर सांगितलेल्या १४४ ची तिप्पट केल्यास ४३२ होतात. त्यामध्ये पूर्वोक्त जंबुद्वीपाचे २ चंद्र, २ सूर्य, ४-४ लवण समुद्राचे, १२-१२ शतकी खंडाचे व ४२ कालोदधीचे मिळविल्यास पुष्कर समुद्रात ४९२ चंद्र व ४९२ सूर्य होतात॥७८॥ या सर्व गोष्टी श्रीजिनभद्रगणीक्षमाश्रमणाने मोठ्या 'संघवणी’ मध्ये व 'योतीसकरण्डक पयन्न' मध्ये आणि 'चन्द्रपन्नति' या प्रमुख सिद्धांतग्रंथांमध्ये अशाच प्रकारे लिहिलेल्या आहेत.

(समीक्षक) भूगोल-खगोलाचे जाणकार असलेल्या लोकांनो, आता ऐका! या एका भूगोलामध्ये एका प्रकारे ४९२ आणि दुसऱ्या प्रकारे असंख्य सूर्य व चंद्र आहेत असे जैन लोक मानतात. तुम्ही मोठे भाग्यवान आहात की, वेदमतानुयायांनी लिहिलेल्या सूर्य सिद्धांत वगैरे ज्योतिष ग्रंथांचे अध्ययन केल्यामुळे तुम्हाला भूगोल व खगोल या शाखांचे खरे ज्ञान प्राप्त झाले. जैनांच्या महाअंधकारपूर्ण पंथाचे तुम्ही अनुयायी असता तर जसे जैन लोक आजकाल अंधारात चाचपडत आहेत तसेच तुम्हीही जन्मभर अंधारात राहिला असता. या अविद्वानांना अशी शंका आली की, जंबुद्वीपात एक सूर्य व एक चंद्र यांनी काम भागणार नाही. कारण एवढ्या मोठ्या पृथ्वीला ३० घटिका (२४ तास) एक पूर्व व एक चंद्र कसे प्रकाश देऊ शकतील? हे जैन लोक पृथ्वी ही सूर्यचंद्रापेक्षा मोठी व स्थिर आहे असे मानतात. त्यांची ही फार मोठी चूक आहे.

दो ससि दो रवि पंती एगंतरिया छसठि संखाया। मेरुं पयाहिणंता। माणुसखित्ते परिअडंति।। प्रक० भा० ४।। संग्रहणी सू० ७९।।

60 मनुष्यलोकातील चंद्र व सूर्य यांच्या पंक्तींची (मालांची ) संख्या ते सांगतात दोन चंद्रांच्या व दोन सूर्याच्या पंक्ती (श्रेणी) आहेत. त्या एकमेकांपासून एक लाख योजने म्हणजे चार लाख कोस अंतरावरून फिरत असतात. सूर्याच्या एका पंक्तांच्या अनंतर चंद्राची एक पंक्ती आहे व त्याचप्रमाणे चंद्राच्या एका पंक्तीनंतर सूर्याची एक पंक्ती आहे. अशा प्रकारच्या चार बार पंक्ती आहेत, चंद्राच्या एकेका पंक्तीत ६६ चंद्र आणि सूर्याच्या एकेका पंक्तीत ६६ सूर्य आहेत. या चारही पंक्ती जंबुद्वीपातील मेरु पर्वताला प्रदक्षिणा घालीत मनुष्यक्षेत्रात परिभ्रमण करीत आहेत. ज्यावेळी जंबुद्वीपातील मेरु पर्वताच्या दक्षिणेला एक पूर्व फिरत असतो त्यावेळी दुसरा सूर्य उत्तर दिशेला फिरत असतो. याचप्रमाणे लवण समुद्राच्या एकेका दिशेला दोन-दोन सूर्य फिरत असतात. धातकी खंडाचे ६, कालोदधीचे २१ व पुष्करार्धाचे ३६ अशा प्रकारे सगळे मिळून ६६ सूर्य दक्षिण दिशेला आणि ६६ सूर्य उत्तरदिशेला आपापल्या क्रमानुसार फिरत असतात. या दोन्ही दिशांतील सर्व सूर्याची बेरीज केली असता त्यांची संख्या १३२ होते. याचप्रमाणे दोन्ही दिशांना फिरणार्या चंद्रांची संख्याही १३२ होते. हे सर्व चंद्र-सूर्य मनुष्यलोकामध्ये फिरत असतात. चंद्राबरोबर नक्षत्रांच्याही अनेक मालिका फिरत असतात असे समजावे. ॥७९॥

(समीक्षक) आता तुम्हीच पाहा! या भूगोलातील १३२ सूर्य व १३२ चंद्र जैनांच्या घरावरच तळपत असतील. जर ते खरोखरीच तळपत असतील तर जैन लोक जिवंत कसे? रात्रीच्या वेळी ते थंडीने काकडून जात असतील ना? अशा अशक्य गोष्टींवर भूगोल व खगोल शास्त्रांचे ज्ञान नसलेले लोकच विश्वास ठेवतात. इतर लोक असे फसत नाहीत. वस्तुतः एकच सूर्य या भूगोलासारख्या इतर अनेक भूगोलांना प्रकाशित करीत असतो. मग या लहानशा भूगोलाची काय कथा? बर पृथ्वी फिरत नसती व सूर्य पृथ्वीभोवती फिरत असता तर अनेक वर्षाचा दिवस, अनेक वर्षांची रात्र झाली असती. हिमालयाशिवाय सुमेरु नावाचा दुसरा कोणताही पर्वत नाही. एखाद्या घागरी समोर मोहरीचा एक दाणा असावा तसा हा पर्वत सूर्यासमोर आहे. किंबहुना तेवढही नाही. जोपर्यंत जैन लोक आपल्या पंथात गुरफटून राहतील तोपर्यंत त्यांना या गोष्टी समजणार नाहीत. ते सदैव अंधारातच राहतील.

सम्मत्तचरण सहिया सव्वं लोगं फुसे निरवसेसं । सत्तय चउदस भाए पंचय सुयदेशविरईए।। प्रक० भा० ४।। संग्रहणी सू० १३५।। सम्यक चारित्र्यासह जे केवली (ते केवळ समुद्धत) स्थितीने सर्व १४ राज्य आत्मप्रदेश करून भ्रमण करतील॥१३५॥

(समीक्षक) जैन लोक १४ राज्ये मानतात. त्यांतील चौदाच्या राज्याच्या शिखरावर सर्वार्थसिद्धी विमानाच्या ध्वजापासून थोड्या अंतरावर सिद्धशिला व दिव्य आकाश आहे. त्याला शिवपुर म्हणतात. तेथे केवली लोके जातात. ज्यांना केवल ज्ञान, सर्वज्ञता व पूर्ण पवित्रता प्राप्त झालेली आहे. ते त्या लोकात जातात आणि ते आत्मप्रदेशात सर्वज्ञ बनून राहतात. ज्याचा प्रदेश असतो तो विभू नसतो तो कधीच सर्वज्ञ व केवलज्ञानी असू शकत नाही. कारण ज्याचा आत्मा एकदेशी असतो तोच जातो व येतो, आणि बद्ध, मुक्त, ज्ञानी, अज्ञानी होतो.

61 तो कधीच सर्वव्यापी व सर्वज्ञ होऊ शकत नाही. जैनांचे जे तीर्थकर जीवरूपामध्ये अल्प व अल्पज्ञ होऊन राहत होते ते सर्वव्यापक व सर्वज्ञ कधीच होऊ शकत नाहीत. परंतु जो परमात्मा अगदी अनंत, सर्वव्यापक, सर्वज्ञ, पवित्र, ज्ञानस्वरूप आहे त्याला जैन लोक मानत नाहीत की ज्याच्या मध्ये सर्वज्ञतादी गुण अथवा तथातथ्य असतात.

गब्भनर तिपलियाऊ। तिगाऊ उक्कोस ते जहन्नेणं। मुच्छिम दुहावि अन्तमुहु। अंगुल असंख भागतणू।। प्रक० भा० ४।। संग्रहणी सू० २४१।। येथे माणसे दोन प्रकारची आहेत. एक गर्भातून उत्पन्न झालेली व दुसरी गर्भाशिवाय उत्पन्न झालेली. त्यांच्यापैकी गर्भज माणसांचे आयुष्य उत्कृष्ट तीन पल्यापम असते व शरीर तीन केसांचे असते असे जाणावे. ॥२४१॥

(समीक्षक) तीन पल्योपमाचे आयुष्य व तीन कोसांचे शरीर असणारी माणसे या पृथ्वीमध्ये फारच थोडी सामावू शकतील. शिवाय आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे तीन पल्योपम आयुष्य व तीन कोसांचे शरीर असलेली माणसे फार दीर्घकाळापर्यंत जगतील आणि त्यांची मुलेही तीन कोस लांब शरीराची असतील. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात दोन आणि कलकत्यासारख्या शहरात जेमतेम तीन-चारच माणसे राहू शकतील. एका शहरात लाखो माणसे राहत असल्याचे जैनांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे हे लोक राहत असलेले नगरही लाखो कोसांचे असले पाहिजे. म्हणजे संपूर्ण भूगोलाबर तसे एक देखील नगर राहू शकणार नाही,

पणयाल लरकजोयण विरकंभा सिद्धिसिल फलिह विमला। तदुवरि गजोयणंते लोगंतो तच्छ सिद्धठिई।। प्रक० भा० ४।। संग्रहणी सू० २५८।। सर्वार्थसिद्धी विमानाच्या ध्वजाच्या १२ योजनेवर जी सिद्धशिला आहे तिची लांबी, रुंदी व पोकळी ४५ लाख योजने आहे. ती संपूर्ण शुभ्र आहे. सुवर्णमय स्फटिकासारखी निर्मळ असणारी सिद्धशिला ही सिद्धभूमी आहे. कोणी तिला 'ईषत् प्राग्भरा' असेही म्हणतात. या सर्वार्थ सिद्धशिला विमानापासून १२ योजनांवर अलोक (ज्याची अनुभूती होऊ शकत नाही असा प्रदेश) ही आहे. हा परम अर्थ (रहस्य) फक्त बहुश्रुत केवलीला माहीत आहे. ही सर्वार्थ सिद्धशिला मध्यभागी ८ योजने जाड आहेतेथून ती चार दिशांना व उपदिशांना माशीच्या पंखाप्रमाणे पातळ होत गेली आहे. तिचा आकार उघडलेल्या छत्रीसारखा आहे. त्या शिळेवर एक योजन अंतरावर लोकान्त आहे. तेथे सिद्ध लोक राहतात. ॥२५८॥

(समीक्षक) आता विचारले पाहिजे की, जैनांच्या मुक्तीचे स्थान सर्वार्थासिद्धी विमानाच्या ध्वजाच्या वर ४५ लाख योजनेची शिळा आहे. ती शिळा कितीही चांगली व निर्मळ असली तरी तेथे राहणारे मुक्त जीव एक प्रकारे बद्ध आहेत. कारण ते त्या शिळेवरून बाहेर पडले की, त्यांचे मुक्तीचे मुख साधन सुटत असावे आणि ते शिळेमध्येच राहत असतील तर त्यांना हवा देखील लागत नसेल. हे सारे अडाणी लोकांना फसविण्यासाठी कल्पनेने विणलेले भ्रमाचे जाळेच आहे. (जायण सहस्स महिषं एगिंदियवेह मुक्कोसं)

62 वि ति चउरिंदिस सरीरं । बारस जोयणं तिकोस चउकोसं। जोयण सहसपणिदिय । उहे वुच्छंत विसेसंतु।। प्रक० भा० ४।। संग्रहणी सू० (२६६)२६७ ।।

सामान्यतः एका इंद्रियाचे शरीर १ हजार योजनांचे असते. ते उत्कृष्ट आहे असे समजावे दोन इंद्रियांचे शंखादिकांचे शरीर १२ योजनांचे जाणावे. कृषीकीटकांचे तीन इंद्रियांचे शरीर ३ कोसांचे समजावे. भ्रमरादिकांचे चार इंद्रियांचे शरीर ४ कोसांचे आणि पाच इंद्रिये असणाच्या जीवांचे शरीर १ हजार योजनांचे म्हणजे ४ हजार कोसांचे असते असे जाणावे. ॥२६७॥

(समीक्षक) चार-चार हजार कोसांची शरीरे असतील तर पृथ्वीच्या पाठीवर फारच थोडी माणसे राहू शकतील. शेकडो माणसांनी हा भूगोल अगदी ठासून भरला जाईल. कोणाला हिंडाफिरायला जागाही राहणार नाही मग ती माणसे जैगांनाच विचारतील की आम्ही कोठे राहायचे? तेव्हा जैन लोक त्यांना कदाचित आपल्या घरातच ठेवून घेतील. परंतु चार हजार कोस लांब शरीर असणाऱ्या एका माणसाला राहण्यासाठी किमान ३२ हजार कोस लांब-बंद असणारे घर तरी पाहिजे. असे एक घर बांधण्यासाठी जैनांची सारी संपत्ती खर्च झाली तरी ते तयार होऊ शकणार नाही. एवढ्या मोठ्या आठ हजार कोस लांबीच्या घराचे छप्पर तयार करण्यासाठी लागणारे वासे कोठून आणणार? आणि त्या घराला आधारासाठी मध्ये खांब लावला तर त्यात राहणाऱ्या माणसाला आत प्रवेशच करता येणार नाही. म्हणून असल्या गोष्टी खोट्याच होत असतात.

ते थूला पल्ले विहु संखिज्जाचे बहुंति सव्वेवि। ते इक्किक्क असंखे । सुहुमे खम्भे पकप्पेह।।-प्रकरण०भा० ४। लघुक्षेत्रसमासप्रकरण सूत्र ४।। पूर्वी सांगितल्याप्रमाणे एक अंगुळ केसांच्या तुकड्यांनी चार कोस औरस-चौरस व तितकाच खोल खड़ा भरावा. अंगुळा एवढ्या केसांचे एकूण तुकडे वीस लाख,सत्तावन्न हजार एकशे बावन्न होतात. एक घन योजन पल्योपम जागेमध्ये मावणाऱ्या सर्व स्थूल केसांच्या तुकड्याच संख्या जास्तीत जास्त ३३०, ७६२, १०८,२४६, ५६२,५४२, १९९, ६०९७,५३,६१,०००,०००० एवढी होते. हाही संख्यात काल होतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे एका केसाच्या तुकड्याचे असंख्यात तुकडे मनाने कल्पना करून जाणावेत. तेव्हा ते असंख्यात सूक्ष्म रोमाणू होतील.

(समीक्षक) अशी आहे यांची गणनेची रीत पहा! एका अंगुळाएवढया केसाचे किती तुकडे झाले आहेत याची गणना कोणाला तरी करता येईल काय? शिवाय त्यानंतरही त्या एकेका तुकड्याचे असंख्य तुकडे केले आहेत अशी कल्पना ते करतात. यावरून हे ही सिद्ध होते की पूर्वोक्त तुकडे हाताने केले असावेत. जेव्हा हाताने होऊ शकले नाहीत तेव्हा मनाने केले. खरे तर एक अंगुळ केसाचे असंख्य तुकडे करणे कधीतरी शक्य आहे काय ?

जम्बूद्वीपपमाणं गुलजोयणलरक वट्टविरकंभी। लवणाई यासेसा। बलयाभा दुगुण दुगुणाय।।-प्रकरण०भा० ४। लघुक्षेत्रसमा० सू० १२।। जम्बुद्वीपाचे क्षेत्रफळ १ लाख योजने एवढे असून ते पोकळ आहे. बाकी लवणादी सात समुद्र व सात द्वीपे

63 यांची क्षेत्रफळे जंबुद्वीपाच्या दुप्पट आहेत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे या एका पृथ्वीवर जम्बुद्वीपादी सात द्वीपे व समुद्र आहेत. ॥१२॥

(समीक्षक) दुसरे द्वीप जंबुद्वीपाहून मोठे असून त्याचे क्षेत्रफळ २ लाख योजन आहे. तिसरे द्वीप चारलाख योजनांचे, चौथे आठ लाख योजनांचे, पाचवे सोळा लाख योजनांचे, सहावे बत्तीस लाख योजनांचे व सातवे चौसष्ट लाख योजनांचे आहे. एवढेच किंवा याहून मोठे असे समुद्रांच्या परिमाणाचे ह्या पन्द्रह सहस्त्र परिधि असणाऱ्या भूगोलात कसे सामावू शकतील यावरून ही गोष्ट खोटी आहे.

कुरु नइ चुलसी सहसा। छच्चेवन्तरनईउ पइ विजयं। दो दो महा नईउ । चउदस सहसाउ पत्तेयं।।-प्रकरणरत्ना०भा० ४। लघुक्षेत्रसमा० सू० ६३।। कुरुक्षेत्रामध्ये ८४ हजार नद्या आहेत. ॥६३॥

(समीक्षक) कुरुक्षेत्र हा फार लहान प्रदेश आहे. तो न पाहताच एक धादांत खोटी गोष्ट लिहिण्यात यांना मुळीच लाज वाटला नाही.

जामुत्तराउ ताउ । इगेग सिहासणाउ अइपुब्बं। चउसुवि तासु नियासण, दिसि भवजिण मज्जणं होई।।-प्रकरणरत्नाकर भा० ४। लघुक्षेत्रसमा० सू० ११९।। त्या शिळेच्या थेटदक्षिणेला व उत्तरेला एक-एक सिंहासन आहे हे जाणावे. त्या शिळांची नावे दक्षिणेकडील अतिपांडुकंबला आणि उत्तरेकडील अतिरक्तकंबला आहेत. त्या सिंहासनांवर तीर्थकर बसतात. ॥१९॥

(समीक्षक) आता यांच्या तीर्थकरांचे जन्मोत्सवादी करण्याच्या शिळा पाहा। अशीच यांची मुक्तीची सिद्धशिला आहे. अशा यांच्या अनेक गोष्टी घोटाळ्याच्या आहेत. कुठवर लिहावे ? परंतु पाणी गाळून पिणे, सूक्ष्म जीवांवर नाममात्र दया करणे आणि रात्री जेवण न करणे या यांच्या तीन गोष्टी चांगल्या आहेत. यांच्या बाकी सर्व गोष्टी अशक्य कोटीतील आहेत.

आम्ही जे थोडक्यात सांगितले आहे. त्यावरून बुद्धिमान लोक पुष्कळ काही समजून घेतील आम्ही केवळ नमुन्या दाखल लिहिले आहे. यांच्या सगळ्या अशक्य गोष्टी लिहायला बसलो तर इतके ग्रंथ तयार होतील की एक मनुष्य जन्मभर वाचीत राहिला तरी ते संपणार नाहीत म्हणून ज्या प्रमाणे शितावरून भाताची परीक्षा करतात त्याप्रमाणे या संक्षिप्त विवेचनावरून शहाण्या लोकांना पुष्कळ गोष्टी माहीत होतील. बुद्धिमान माणसांना फार विस्ताराने सांगावे लागत नाही. कारण केवळ दिदर्शन केले तरी तेवढ्यावरून ते सर्व काही जाणतात. यानंतर ख्रिस्ती पंथाविषयी आम्ही विवेचन करणार आहोत.

इति श्रीमदयानन्द सरस्वती स्वामि निर्मिते सत्यार्थप्रकाशे सुभाषविभूषिते नास्तिकमतान्तर्गतचार्वाकबौद्धजैनमतखण्डनमण्डनविषये द्वादशः समुल्लासः सम्पूर्णः॥१२॥