सत्यार्थ प्रकाश/२. पहिला समुल्लास



॥ओ३म्॥

पहिला समुल्लास

संपादन

ईश्वर नाम व्याख्या


[ओ३म् ची संक्षिप्त व्याख्या]

संपादन

ओ३म्  शन्न॒ऽइन्द्रो॒ बृह॒स्पतिः॒ शन्नो॒ विष्णु॑रुरुक्र॒मः॥

नमो॒ ब्रह्मणे॒ नम॑स्ते वायो॒ त्वमे॒व प्र॒त्यक्षं॒ ब्रह्मा॑सि।

त्वामे॒व प्र॒त्यक्षं॒ ब्रह्म॑ वदिष्यामि ऋ॒तं व॑दिष्यामि स॒त्यं व॑दिष्यामि तन्माम॑वतु॒ तद्व॒क्तार॑मवतु॒।

अव॑तु॒ माम॑वतु व॒क्तार॑म्। ओ३म् शान्ति॒श्शान्ति॒श्शान्तिः॑॥१॥

[तुलना—तैत्ति॰ आ॰, प्रपा॰ ७। अनु॰ १]

अर्थ—(ओ३म्) हा ओंकार शब्द परमेश्वराचे सर्वोत्तम नाव आहे. कारण यात जे ‘अ’, ‘उ’ आणि ‘म्’ ही तीन अक्षरे मिळून एक ‘ओम्’ समुदाय बनला आहे. या एका नावातून परमेश्वराची अनेक नावे उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, अकारापासून ‘विराट’, ‘अग्नी’ आणि ‘विश्व’ आदी. उकारापासून ‘हिरण्यगर्भ’, ‘वायू’ आणि ‘तैजस’ आदी. मकारापासून ‘ईश्वर’, ‘आदित्य’ आणि ‘प्राज्ञ’ आदी नावांचा वाचक व बोधक आहे. वेदादी सत्य शास्त्रांमध्ये त्याची अशीच स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. त्यावरून प्रकरणानुसार ही सर्व नावे परमेश्वराचीच आहेत.


[अनेकार्थक शब्दांचे अर्थ-निश्चय]

संपादन

 

(प्रश्न) परमेश्वराहून भिन्न अर्थांची वाचक ‘विराट’ आदी नावे की नाहीत? ब्रह्मांड, पृथ्वी आदी भूत, इंद्रादी देवता आणि वैद्यक शास्त्रातील सुंठ वगैरे औषधी वनस्पतींचीही ही नावे आहेत की नाही?

(उत्तर) आहेत. परंतु ती परमेश्वराची ही नावे आहेत.

(प्रश्न) केवळ देवांचे ग्रहण या नावांनी तुम्ही करता की नाही?

(उत्तर) तुम्ही ग्रहण करता याला काय आधार आहे?

(प्रश्न) सगळे देव प्रसिद्ध व उत्तमही आहेत म्हणून हे मी मान्य करतो.

(उत्तर) परमेश्वर अप्रसिद्ध आणि त्याहूनही उत्तम असा कोणी आहे काय? मग ही नावे परमेश्वराचीही आहेत असे तुम्ही का मानत नाही? परमेश्वर अप्रसिद्ध नाही आणि त्याच्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. तेव्हा त्याच्याहून उत्तम कोणी कसा असू शकेल? म्हणून तुमचे हे विधान बरोबर नाही. कारण तुमच्या या विधानात अनेक दोष आहेत. उदाहरणार्थ, ‘उपस्थितं परित्यज्याऽनुपस्थितं याचत इति बाधितन्यायः’एकाने दुसऱ्यासाठी खाण्याचे पदार्थ ठेवून त्याला सांगितले की, “तुम्ही जेवण करा.” अशा वेळी ते खाद्यपदार्थ तसेच टाकून ती दुसरी व्यक्ती न मिळालेल्या अन्नासाठी इकडे-तिकडे भटकू लागली तर तिला शहाणा समजू नये. कारण तो जवळ असलेला तयार पदार्थ सोडून अनुपस्थित म्हणजेच अप्राप्त पदार्थांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. म्हणून जसा तो पुरुष बुद्धिमान नव्हे तसेच हे तुमचे विधान शहाणपणाचे नव्हे. कारण तुम्ही विराट आदी नावांनी प्रसिद्ध व प्रमाणसिद्ध परमेश्वराचा व ब्रह्मांड आदी उपस्थित अर्थांचा त्याग करून असंभव व अनुपस्थित देवादींचे ग्रहण करण्यासाठी श्रम करता. यामध्ये कसलेही प्रमाण किंवा तर्क (औचित्य) नाही.


[अर्थ-निर्णय करण्यामध्ये प्रकरणाचे विचार करणे आवश्यक]

संपादन

जर तुम्ही असे म्हणाल की, ‘जेथे ज्याचा संबंध असेल तेथे तेच ग्रहण करणे योग्य असते’. उदाहरणार्थ, एकाने दुसऱ्याला सांगितले की, ‘हे भृत्य ! त्वं सैन्धवमानय।’‘म्हणजे, हे नोकरा! तू सैंधव घेऊन ये’. तेव्हा त्याने काळ वेळ व प्रसंग यांचा विचार केला पाहिजे. कारण सैंधव हे दोन वस्तूंचे नाव आहे. घोडा आणि मीठ या दोघांनाही सैंधव असे नाव आहे. मालकाची बाहेर जाण्याची वेळ असल्यास घोडा आणि जेवणाची वेळ असल्यास मीठ आणणे उचित होय. परंतु बाहेर जाण्याच्या वेळी मीठ आणि जेवणाच्या वेळी नोकर घोडा घेऊन आला तर मालक क्रुद्ध होऊन त्याला म्हणेल, “तू मूर्ख आहेस. तुला काळ वेळ समजत नाही. तेवढा विवेक तुझ्या ठिकाणी असता तर ज्यावेळी जी वस्तू आणावयास हवी तीच तू आणली असतीस. प्रसंग कोणता आहे, याचा विचार तू करायला हवा होतास. पण तो तू केला नाहीस. म्हणून तू मूर्ख आहेस. तू चालता हो.” यावरून हेच सिद्ध झाले की जेथे जो अर्थ घेणे योग्य असेल तेथे तोच अर्थ घेतला पाहिजे. आपण सर्वांनी असेच मानले व केलेही पाहिजे.


[‘ओम्’ आदी नामे ईश्वरांची वाचक : वेद आदी ग्रंथांची प्रमाण]

संपादन

॥ अथ मन्त्रार्थः॥

ओं खं ब्रह्म॑॥१॥ यजुर्वेद, अध्याय ४०। मन्त्र १७॥

पहा, वेदांमध्ये खालील प्रकरणांमध्ये ‘ओम्’ आदी परमेश्वराची नावे आहेत.

ओमित्येतदक्षरमुद्गीथमुपासीत ॥२॥ छान्दोग्य उप॰ प्रपा॰ १। खण्ड १। मन्त्र १॥

ओमित्येतदक्षरमिदꣳ सर्वं तस्योपव्याख्यानम्॥३॥ माण्डूक्य उप॰ १॥

सर्वे वेदा यत्पदमामनन्ति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति।

यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योमित्येतत् ॥४॥

कठोपनिषद् वल्ली २ मन्त्र १५॥

प्रशासितारं सर्वेषामणीयांसमणोरपि।

रुक्माभं स्वप्नधीगम्यं विद्यात्तं पुरुषं परम्॥५॥

मनु॰,अ॰ १२। श्लोक १२२॥

एतमग्निं वदन्त्येके मनुमन्ये प्रजापतिम्।

इन्द्रमेके परे प्राणमारे ब्रह्म शोधतम् ॥६॥

मनु॰, अ॰ १२। श्लोक १२३॥

स ब्रह्मा स विष्णुः स रुद्रस्स शिवस्सोऽक्षरस्स परमः स्वराट् ।

स इन्द्रस्स कालाग्निस्स चन्द्रमाः ॥७॥

कैवल्य उप॰ खण्ड १ मन्त्र ८॥

इन्द्रं॑ मि॒त्रं वरु॑णम॒ग्निमा॑हु॒रथो॑ दि॒व्यः स सु॑प॒र्णो ग॒रुत्मा॑न्।  

एकं॒ सद्विप्रा॑ बहु॒धा व॑दन्त्य॒ग्निं य॒मं मा॑त॒रिश्वा॑नमाहुः॥८॥

ऋग्वेद, मण्डल १। सूक्त १६४। मन्त्र ४६॥

भूर॑सि॒ भूमि॑र॒स्यदि॑तिरसि वि॒श्वधा॑या॒ विश्व॑स्य॒ भुव॑नस्य ध॒र्त्री।

पृ॒थि॒वीं य॑च्छ पृथि॒वीं दृ॑ꣳह पृथि॒वीं मा हि॑ꣳसीः॥९॥

यजुर्वेद, अ॰ १३। मन्त्र १८॥

इ꣡न्द्रो꣢ म꣣ह्ना꣡ रोद꣢꣯सी पप्रथ꣣च्छ꣢व꣣ इ꣢न्द्रः꣣ सू꣡र्य꣢मरोचयत्।    

इ꣡न्द्रे꣢ ह꣣ वि꣢श्वा꣣ भु꣡व꣢नानि येमिर꣣ इ꣡न्द्रे꣢ स्वा꣣ना꣢स꣣ इ꣡न्द꣢वः॥१०॥

सामवेद उत्तरार्चिक, प्रपा॰ ७। त्रिक ८। मन्त्र २॥ [मन्त्र १५८८]

प्रा॒णाय॒ नमो॒ यस्य॒ सर्व॑मि॒दं वशे॑।

यो भू॒तः सर्व॑स्येश्व॒रो यस्मि॒न्त्सर्वं॒ प्रति॑ष्ठितम्॥११॥

अथर्ववेद, काण्ड ११। प्रपा॰ २४। अ॰ २। मन्त्र १॥ [११.४.१]


[परमेश्वराचे सर्व नावे सार्थक]

संपादन

[अर्थ— हे प्रमाण लिहिण्याचा हेतू येथे आहे की अशा प्रकरणांमध्ये ओंकार आदी नावे परमेश्वराचे वाचक आहेत, जसे की पूर्वी उल्लेख केला. परमेश्वराचे जी नावे वेदामध्ये दिली आहेत, ती सर्व अन्वर्थक आहेत. जसे की लोकमध्ये कोणा मनुष्याचे नाव धनपती असूनही तो दरिद्री असतो. तसा परमेश्वराच्या नावां-संबंधात नसते. हे सिद्ध करते की परमेश्वराचे नाव कुठे गौणिक, कुठे कार्मिक आणि कुठे स्वाभाविक अर्थवाचक आहेत.] ‘ओ३म्' आदी नावे सार्थक आहेत. उदाहरणार्थ—


[‘ओम्’ आदि ईश्वर-नावांची वैदिक प्रमाणांचे अर्थ]

संपादन

 [ओं खं ब्रह्म॰ मंत्राचे अर्थ]

(ओं खं॰) “अवतीत्योम् आकाशमिव व्यापकत्वात् खम्, सर्वेभ्यो बृहत्वाद् ब्रह्म” म्हणजे रक्षण करण्याने (ओम्), आकाशाप्रमाणे व्यापक असल्याने (खम्) आणि सर्वांहून मोठा असल्याने (ब्रह्म) ईश्वराचे नाव आहे. ॥१॥

[ओमित्येतदक्षर॰ मंत्राचे अर्थ]

(ओमित्ये॰)ओ३म्’ ज्याचे नाव आहे आणि जो कधी नष्ट होत नाही त्याचीच उपासना करणे उचित होय, इतरांची नाही. ॥२॥

[ओमित्येतदक्षरमिदं॰ मंत्राचे अर्थ]

(ओमित्येत॰) सर्व वेदादी शास्त्रांमध्ये परमेश्वराचे प्रमुख व स्वतःचे नाव ‘ओ३म्’ हे असल्याचे सांगितले आहे. इतर सर्व नावे गुणवाचक आहेत. ॥३॥

[सर्वे वेदा यत्पद॰ मंत्राचे अर्थ]

(सर्वे वेदा॰) ज्या अर्थी सर्व वेद, सर्व धर्मानुष्ठानरूप तपश्चरण ज्याचे कथन करतात आणि मान्यता देतात. ज्याच्या प्राप्तीची इच्छा बाळगून ब्रह्मचर्याश्रमाचे पालन करतात त्याचे नाव ‘ओम्’ आहे. ॥४॥

[प्रशासितारं सर्वेषा॰ श्लोकाचे अर्थ]

(प्रशासिता॰) जो सर्वांना उपदेश देणारा, सूक्ष्माहून सूक्ष्म, स्वप्रकाश-स्वरूप, समाधिस्थ बुद्धीने जाणण्यास योग्य आहे त्याला परम पुरुष समजले पाहिजे. ॥५॥

[एतमग्निं वदन्त्येके॰ श्लोकाचे अर्थ]

(एतमग्निं॰) तो स्वप्रकाश असल्याने ‘अग्नी’, विज्ञानस्वरूप असल्याने ‘मनु’, सर्वांचे पालन करणारा असल्याने ‘प्रजापती’, आणि परम ऐश्वर्यवान असल्याने ‘इंद्र’,सर्वांच्या जीवनाचे जीवन असल्याने ‘प्राण’ आणि निरंतर व्यापक असल्याने त्या परमेश्वराचे नाव ‘ब्रह्म’ आहे. ॥६॥

[स ब्रह्मा स विष्णुः॰ मंत्राचे अर्थ]

 (स ब्रह्मा स विष्णुः॰) परमेश्वर हा संपूर्ण जग निर्माण करणारा असल्याने तो ‘ब्रह्मा’ आहे, सर्वव्यापी असल्याने ‘विष्णु’, दुष्टांना शिक्षा करून रडवितो म्हणून ‘रुद्र’, मंगलमय व सर्वांचे कल्याण करणारा म्हणून ‘शिव’ आहे. ‘यः सर्वमश्नुते न क्षरति न विनश्यति तदक्षरम्’ ‘य: स्वयं राजते स स्वराट्’ ‘योऽग्निरिव काल: कलयिता प्रलयकर्ता स कालाग्निरीश्वरः’ (अक्षर) जो सर्वत्र व्याप्त, अविनाशी (स्वराट्) स्वत: प्रकाशस्वरूप आणि (कालाग्नि) प्रलयाच्या वेळी सर्वांचा काळ आणि काळाचाही काळ आहे. म्हणून परमेश्वराचे नाव ‘कालाग्नि’ असे आहे. [परमेश्वर स्वयं आनन्दस्वरूप आणि सर्वांना आनन्द देणारा आहे, त्या परमेश्वराचे नाव ‘चंद्रमा’ आहे] ॥७॥

[इन्द्रं मित्रं वरुण॰ मंत्राचे अर्थ]

(इन्द्रं मित्रं॰) जो एक अद्वितीय सत्यब्रह्म वस्तु आहे त्याचीच इंद्रादी सर्व नावे आहेत. ‘द्युषु शुद्धेषु पदार्थेषु भवो दिव्यः’, ‘शोभनानि पर्णानि पालनानि पूर्णानि कर्माणि वा यस्य सः सुपर्णः’, ‘यो गुर्वात्मा स गरुत्मान्’, ‘यो मातरिश्वा वायुरिव बलवान् स मातरिश्वा’ (दिव्य)  जो प्रकृत्यादि दिव्य पदार्थांमध्ये व्याप्त (सुपर्ण) आहे, जो उत्तम पालन करतो आणि ज्याची कर्मे पूर्ण आहेत, (गरुत्मान्)ज्याचा आत्मा अर्थात स्वरूप महान आहे, जो (मातरिश्वा) वायूसारखा अनंत बलवान आहे. म्हणून परमेश्वराला दिव्य, सुपर्ण, गरुत्मान आणि मातरिश्वा ही नावे आहेत. इतर नावांचे अर्थ पुढे सांगणार आहोत. ॥८॥

[भूरसि भूमिर॰ मंत्राचे अर्थ]

(भूमिरसि॰) ‘भवन्ति भूतानि यस्यां सा भूमि:’ जिच्यामध्ये सर्व प्राणिमात्र राहतात, म्हणून ईश्वराचे नाव ‘भूमि’ असे आहे. इतर नावांचे अर्थ नंतर सांगणार आहोत. ॥९॥

(इन्द्रो मह्ना॰) या मंत्रात ‘इंद्र’ हे परमेश्वराचेच नाव आहे, म्हणून हे प्रमाण उद्धृत केले आहे. ॥१०॥

[प्राणाय नमो यस्य॰ मंत्राचे अर्थ]

(प्राणाय॰) ज्या प्रमाणे प्राणाच्या स्वाधीन सर्व शरीर व इंद्रिये असतात त्या प्रमाणे सारे जग परमेश्वराच्या स्वाधीन असते. [म्हणून परमेश्वराचे नाव ‘प्राण’ असे आहे.] ॥११॥


[‘अग्नी’ आदी नावांनी परमेश्वराचे ग्रहण करण्यामध्ये प्रकरण व विशेषण नियमकारक]

संपादन

इत्यादी प्रमाणांचे (पुराव्यांचे) अचूक अर्थ जाणून घेतल्याने या नावांद्वारे परमेश्वराचेच ग्रहण होते. कारण ‘ओ३म्’ आणि ‘अग्नी’ नावांच्या मुख्य अर्थांने परमेश्वराचेच ग्रहण होते. ज्याप्रमाणे व्याकरण, निरुक्त, ब्राह्मण, सूत्र इत्यादी आणि ऋषीमुनींनी जे विवरण केले आहे त्यांमध्ये परमेश्वराचेच ग्रहण केलेले दिसते त्याप्रमाणे सर्वांनी ग्रहण करणे योग्य आहे. परंतु ‘ओ३म्’ हे केवळ परमेश्वराचेच नाव आहे. ‘अग्नी’ आदी नावांनी परमेश्वराचे ग्रहण करण्यामध्ये प्रकरण (वर्णन) व विशेषण नियमकारक आहेत. यावरून हे सिद्ध झाले की, जेथे-जेथे स्तुती, प्रार्थना, उपासना, सर्वज्ञ, व्यापक, शुद्ध, सनातन व सृष्टिकर्ता आदी विशेषणे आली आहेत तेथे-तेथे या नावांनी परमेश्वराचे ग्रहण होते. आणि जेथे-जेथे अशी वर्णने येतात की—


[कोणत्या संदर्भात कोणताही शब्द परमेश्वर वाचक नाही]

संपादन

ततो॑ वि॒राड॑जायत वि॒राजो॒ऽअधि॒ पूरु॑षः।  यजुर्वेद अ॰ ३१। मन्त्र ५॥

श्रोत्रा॑द्वा॒युश्च॑ प्रा॒णश्च॒ मुखा॑द॒ग्निर॑जायत। यजुर्वेद अ॰ ३१। मन्त्र १२॥

तेन॑ दे॒वाऽअ॑यजन्त।    यजुर्वेद अ॰ ३१। मन्त्र ९॥

प॒श्चाद् भूमि॒मथो॑ पु॒रः॥ यजुर्वेद अ॰ ३१। मन्त्र ५॥

तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः। आकाशाद्वायुः।

वायोरग्निः। अग्नेरापः। अद्भ्यः पृथिवी। पृथिव्या ओषधयः।

ओषधिभ्योऽन्नम्। अन्नाद्रेतः। रेतसः पुरुषः।

स वा एष पुरुषोऽन्नरसमयः॥ तैत्ति॰ उप॰ ब्रह्म॰ वल्ली अनु॰ १॥

हे वचन तैत्तिरीय उपनिषदातील आहे.

अशा प्रमाणांमध्ये विराट, पुरुष, देव, आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी इत्यादी नावे लौकिक पदार्थांची असतात. कारण जेथे-जेथे उत्पत्ती, स्थिती, प्रलय [आदी व्यवहार आणि,], अल्पज्ञ, जड (अचेतन) दृश्य इत्यादी विशेषणे सुद्धा लिहिलेली असतील तेथे-तेथे परमेश्वराचे ग्रहण होत नाही. तो उत्पत्ती वगैरे व्यवहारांपासून वेगळा आहे आणि वरील मंत्रांमध्ये उत्पत्ती वगैरे गोष्टी आहेत म्हणून येथे विराट आदी नावांनी परमेश्वराचे ग्रहण न होता लौकिक पदार्थांचे ग्रहण होते. परंतु जेथे-जेथे सर्वज्ञ आदी विशेषणे असतील तेथे-तेथे परमेश्वराचे आणि जेथे-जेथे इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दु:ख आणि अल्पज्ञ आदी विशेषणे असतील तेथे-तेथे जीवाचे ग्रहण होते, असे सर्वत्र समजावे. कारण परमेश्वराचा जन्म अथवा मृत्यू कधी होत नसतो. म्हणून विराट आदी नावांनी त्याचे आणि जन्म वगैरे विशेषणांनी जगतातील जड़ इत्यादी पदार्थांचे ग्रहण करणे उचित होय, परमेश्वराचे नव्हे. आता ज्या प्रकारे विराट आदी नावांनी परमेश्वराचे ग्रहण होते तो प्रकार खाली लिहिल्याप्रमाणे समजून घ्यावा.


[परमेश्वराचे ओंकार आदी शंभर नावे]

संपादन


[परमेश्वराची नावे : ओ३म्, विराट, अग्नी, विश्व (१-४)]

संपादन

 

[१] ॥ अथ ओङ्कारार्थः — ओंकाराचा अर्थ ॥

[२] (वि) उपसर्गपूर्वक (राजृ दीप्तौ) या धातूला ‘क्विप्’ प्रत्यय लावल्याने ‘विराट’ शब्द बनतो. ‘यो विविधं नाम चराऽचरं जगद्-राजयति प्रकाशयति स विराट्’, विविध म्हणजे जो अनेक प्रकारच्या जगाची निर्मिती करतो तो विराट. म्हणून ‘विराट’ या नावाने परमेश्वराचे ग्रहण होते.

[३] (अञ्चु गतिपूजनयोः) (अग, अगि, इण् गत्यर्थक)  धातू आहेत. त्यांच्यापासून ‘अग्नि’ हा शब्द तयार होतो. ‘गतेस्त्रयोऽर्था: ज्ञानं गमनं प्राप्तिश्चेति, पूजनं नाम सत्कारः’ ‘योऽञ्चति, अच्यतेऽगत्यङ्गति-एति वा सोऽयमग्निः’, जो ज्ञानस्वरूप, सर्वज्ञ, जाणण्यास प्राप्त होण्यास व पूजा करण्यास योग्य आहे. म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘अग्नी’ आहे.

[४] (विश प्रवेशने) वा धातूपासून ‘विश्व’ शब्द बनतो.  ‘विशन्ति प्रविष्टानि [सन्ति] सर्वाणि-आकाशादीनि भूतानि यस्मिन्, यो वाऽऽकाशादिषु सर्वेषु भूतेषु प्रविष्टः स विश्व ईश्वरः’, ज्यामध्ये आकाशादी सर्व भूते प्रवेश करीत आहेत अथवा जो यांमध्ये व्याप्त होऊन प्रविष्ट होत आहे. म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘विश्व’ आहे.

इत्यादी नावांचे ग्रहण अकारमात्राने होते.


[परमेश्वराची नावे : हिरण्यगर्भ, वायू, तैजस (५-७)]

संपादन

[५] “ज्योतिर्वै हिरण्यम्”, “तेजो वै हिरण्यम्” इत्यैतरेयशतपथब्राह्मणे।

[ऐत॰ ब्रा॰ ७। १२; शत॰ ब्रा॰ ६। ७। १। २]

“हिरण्यानि सूर्यादीनि तेजांसि गर्भे यस्य स हिरण्यगर्भः” अथवा ‘यो हिरण्यानां सूर्यादीनां तेजसां गर्भ उत्पत्तिनिमित्तमधिकरणं स हिरण्यगर्भः’ ज्यामध्ये सूर्यादी तेजस्वी लोक उत्पन्न होऊन ज्याच्या आधारे राहतात अथवा जो सूर्यादि तेज:स्वरूप पदार्थांचा गर्भ अर्थात नाव उत्पत्तिस्थान व निवासस्थान आहे. म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘हिरण्यगर्भ’ आहे. याला यजुर्वेदाच्या मंत्राचा आधार आहे —

हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सम॑वर्त्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ऽआसीत्।

स दा॑धार पृथि॒वीं द्यामु॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम॥ यजुर्वेद, अध्याय १३। मन्त्र ४॥

इत्यादी ठिकाणी ‘हिरण्यगर्भ’ शब्दाने परमेश्वराचे ग्रहण केले जाते.

[६] (वा गतिगन्धनयोः) या धातूपासून ‘वायु’ शब्द बनतो. (गन्धनं हिंसनम्) ‘यो वाति चराऽचरं जगद्-धरति [जीवयति, प्रलयति वा] बलिनां बलिष्ठः स वायुः’, जो चराचर जगाचे धारण, जीवन आणि प्रलय करतो आणि सर्व बलवानांहून बलवान आहे. म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘वायू’ आहे.

[७] (तिज निशाने) या धातूपासून ‘तेजः’ शब्द बनतो व त्याचे तद्धित प्रत्यय केल्याने ‘तैजस’ शब्द तयार होतो. [यः-तेजोमयः तेजसां सूर्यादीनां च प्रकाशकः सः तैजसः]  जो स्वत: स्वयंप्रकाश स्वरूप आणि सूर्यादी तेजस्वी लोकांना प्रकाशमान करणारा आहे. म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘तैजस’ आहे.

इत्यादी नामार्थ उकारमात्रापासून ग्रहण होतात.


[परमेश्वराची नावे : ईश्वर, अदिती, आदित्य, प्रज्ञ, प्राज्ञ (८-१२)]

संपादन

[८] (ईश ऐश्वर्ये) या धातूपासून ‘ईश्वर’ शब्द तयार होतो.  ‘य ईष्टे सर्वैश्वर्यवान् वर्त्तते स ईश्वरः’ ज्याचे सत्य विचार, शील, ज्ञान व अनंत ऐश्वर्य आहे. यामुळे त्या परमेश्वराचे नाव ‘ईश्वर’ आहे.

[९-१०] (दो अवखण्डने) या धातूपासून ‘अदिति’ आणि त्याचे तद्धित प्रत्यय केल्यावर ‘आदित्य’ शब्द तयार होतो. ‘न विद्यते विनाशो यस्य सोऽयमदितिः, अदितिरेव आदित्यः, अवखण्डनं नाम विनाशः’, ज्याचा विनाश कधीही होत नाही [त्याच ईश्वराचे नाम ‘अदिती’ आहे, अदितीच ‘आदित्य’ आहे.] म्हणून ईश्वराचे ‘आदित्य’ असे नाव आहे.

[११-१२] (ज्ञा अवबोधने) या धातूच्या आधी ‘प्र’ लावल्याने ‘प्रज्ञ’ शब्द बनतो. त्याचे तद्धित रूप ‘प्राज्ञ’ असे होते. ‘यः प्रकृष्टतया चराऽचरस्य जगतो व्यवहारं जानाति स प्रज्ञः, प्रज्ञ एव प्राज्ञः’, जो निर्भ्रांत  ज्ञानयुक्त सर्व चराचर जगाचे व्यवहार यथावत जाणतो. [तो ‘प्रज्ञ’ आहे, प्रज्ञच प्राज्ञ म्हणतात.] म्हणून ईश्वराचे नाव ‘प्राज्ञ’ आहे.

इत्यादी नामार्थ मकाराने ग्रहण होतात. या ठिकाणी जसे एका-एका मात्रेने तीन-तीन अर्थ व्यक्त केले आहेत. तसेच अन्य नामार्थही ओंकारापासून जाणिले जातात.


[मित्र आदी शब्द ईश्वर-वाचक]

संपादन

(शन्नो मित्रः शं व॰) या मंत्रात जी मित्रादी नावे आहेत तीही परमेश्वराची आहेत. कारण स्तुती, प्रार्थना, उपासना ही श्रेष्ठाचीच केली जाते. जो गुण, कर्म, स्वभाव आणि सत्य-सत्य व्यवहारांमध्ये सर्वांहून अधिक असतो त्याला श्रेष्ठ असे म्हणतात. त्या सर्व श्रेष्ठांमध्येही जो अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याला परमेश्वर म्हणतात. ज्याची तुलना कशाशीही होत नाही, ना झाली, ना होईल. त्याच्या बरोबरीचाच कोणी नाही तर त्याच्याहून अधिक श्रेष्ठ कोण कसा असणार? परमेश्वराचे सत्य, न्याय, दया, सर्वसामर्थ्य आणि सर्वज्ञत्व यांसारखे जे अनंत गुण आहेत तसे गुण इतर कोणत्याही जड (अचेतन) पदार्थात अथवा जीवात नाहीत. जो पदार्थ सत्य आहे त्याचे गुण, कर्म, स्वभावही सत्य असतात. म्हणून मनुष्यांनी परमेश्वराचीच स्तुती, प्रार्थना आणि उपासना करावी हे योग्य होय, त्याहून दुसऱ्याची कधी करू नये, कारण ब्रह्मा, विष्णु, महादेव नावाचे पूर्वज महाशय विद्वान, दैत्य दानवादी निकृष्ट मानव आणि इतर सामान्य माणसे यांनीही परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याचीच स्तुती, प्रार्थना व उपासना केली. त्याच्याशिवाय दुसऱ्याची केली नाही, तसे आपण सवानी करणे योग्य आहे. याची विशेष चर्चा मुक्ती आणि उपासना या विषयात करण्यात येईल.

(प्रश्न) मित्रादी नावांवरून सखा आणि इंद्रादी देवांचे प्रसिद्ध व्यवहार पाहिल्यास त्यांचेच ग्रहण केले पाहिजे.

(उत्तर) येथे त्यांचे ग्रहण करणे योग्य नाही. कारण जो माणूस कुणा एकाचा मित्र असतो तोच दुसऱ्या कुणाचा शत्रू असतो आणि एखाद्याच्या बाबतीत तो उदासीन असतो, असे दिसून येते. म्हणून मुख्यार्थामध्ये सखा आदीचे ग्रहण होऊ शकत नाही, परंतु परमेश्वर हा सा-या जगाचा निश्चित मित्र असतो. तो कुणाचा शत्रू नाही अथवा कुणाच्या बाबतीत तो उदासीनही असत नाही. परमेश्वराखेरीज इतर कोणताही जीव अशा प्रकारे होऊ शकत नाही, म्हणून येथे परमेश्वराचेच ग्रहण होऊ शकते. तरी पण गौण अर्थाने मित्रादी शब्दापासून सुहृदादी मनुष्यांचे ग्रहण होते.


[परमेश्वराची नावे : मित्र, वरुण, अर्यमा (१३-१५)]

संपादन

[१३] (ञिमिदा स्नेहने) या धातूपासून औणादिक ‘क्त्र’ प्रत्यय लागुन ‘मित्र’ शब्द बनतो. ‘यो मेदते, मेद्यति स्निह्यति स्निह्यते वा स मित्रः’, जो सर्वांशी स्नेह करतो आणि सर्वांनी प्रेम करण्यास योग्य असतो तो मित्र. म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘मित्र’ आहे.

[१४] (वृञ्  वरणे, वर ईप्सायाम्) या धातूंपासून उणादी ‘उनन्’ प्रत्यय लागून ‘वरुण’ शब्द बनतो. ‘यः सर्वान् शिष्टान् मुमुक्षून् धर्मात्मनो वृणोति, अथवा यः शिष्टैर्मुमुक्षुभिर्धर्मात्मभिः व्रियते वर्यते वा स वरुणः परमेश्वरः’ जो आप्तयोगी, विद्वान, मुक्तिची इच्छा बाळगणारे व धर्मात्मा यांचेकडून ग्रहण केला जातो, अथवा जो शिष्ट, मुमुक्षु, मुक्त व धर्मात्मा यांच्याकडून ग्रहण केला जातो त्या ईश्वराला ‘वरुण’ असे म्हणतात. किंवा‘वरुणो नाम वरः श्रेष्ठः’परमेश्वर सर्वांत श्रेष्ठ आहे म्हणून त्याचे नाव‘वरुण’आहे.

[१५] (ऋ गतिप्रापणयोः) या धातूपासून ‘यत्’ प्रत्यय लागून ‘अर्य्य’ शब्द तयार होतो. आणि ‘अर्य्य’ पूर्वक (माङ् माने) या धातूला ‘कनिन्’ प्रत्यय लागून ‘अर्यमा’ शब्द तयार होतो. “योऽर्य्यान् स्वामिनो न्यायाधीशान् मिमीते मान्यान् करोति सोऽर्यमा”, जो सत्य न्याय करणाऱ्या मनुष्यांना स्विकारार्ह वाटतो आणि पाप व पुण्य करणाऱ्यांना पापाची व पुण्याची फळे यथावत देणारा सत्य-सत्य नियमकर्ता आहे, म्हणूनच त्या परमेश्वराचे नाव ‘अर्यमा’ आहे.


[परमेश्वराची नावे : इंद्र, बृहस्पती, विष्णू, उरुक्रम (१६-१९)]

संपादन

 [१६] (इदि परमैश्वर्ये) या धातूला ‘रन्’ प्रत्यय लागून ‘इंद्र’ शब्द तयार होतो. ‘य इन्दति परमैश्वर्यवान् भवति स इन्द्रः परमेश्वरः’, जो अखिल ऐश्वर्ययुक्त आहे, म्हणून त्याचे नाव ‘इंद्र’ आहे.

[१७] ‘बृहत्’ शब्दपूर्वक (पा रक्षणे) या धातूपासून ‘डति’ प्रत्यय लागून, बृहत् मधील तकाराचा लोप व सुडागम होऊन ‘बृहस्पति’ शब्द बनतो. ‘यो बृहतामाकाशादीनां पति: स्वामी पालयिता स बृहस्पतिः’, जो मोठ्याहून मोठा आणि मोठ्या आकाशादि ब्रह्मांडांचा स्वामी आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘बृहस्पती’ आहे. 

[१८] (विषॢ व्याप्तौ) या धातूला ‘नु’ प्रत्यय लागून ‘विष्णु’ शब्द बनला आहे. “वेवेष्टि व्याप्नोति चराऽचरं जगत् स विष्णुः”, परमात्मा चर आणि अचर जगाला व्यापून राहिल्यामुळे परमेश्वराचे नाव ‘विष्णू’ आहे.

[१९] ‘उरुर्महान् क्रम: पराक्रमो यस्य स उरुक्रमः’ अनंत पराक्रमयुक्त असल्याने परमेश्वराचे नाव ‘उरुक्रम’ आहे.


[शन्नो मित्रः शं वरुणः॰ मन्त्राचे अर्थ]

संपादन

जो परमेश्वर (उरुक्रमः) महापराक्रमयुक्त (मित्रः) सर्वांचा सुहृद अविरोधी आहे तो (शम्) सुखकारक, तो (वरुणः) सर्वोत्तम (शम्) सुखस्वरूप तो (अर्य्यमा) न्यायाधीश, तो (शम्) सुखप्रचारक, तो (इन्द्रः) (शम्) सकल ऐश्वर्यदायक, तो (बृहस्पतिः) सर्वांचा अधिष्ठाता (शम्) विद्याप्रद आणि (विष्णुः) जो सर्वांमध्ये व्यापक परमेश्वर आहे, तो (न:) आमचा कल्याणकर्ता (भवतु) होवो.


[वायो ते ब्रह्मणे नमो॰ मन्त्राचे अर्थ]

संपादन

(वायो ते ब्रह्मणे नमोऽस्तु) (बृह बृहि वृद्धौ) या धातूंपासून ‘ब्रह्म’ शब्द बनला आहे. जो सर्वांवर विराजमान आहे, सर्वांहून मोठा, अनंत बलयुक्त परमात्मा आहे त्या ब्रह्माला आम्ही नमस्कार करतो. हे परमेश्वरा ! (त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि) तूच अंतर्यामी रूपाने प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. (त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि) मी तुम्हालाच प्रत्यक्ष ब्रह्म म्हणेन कारण तुम्ही सर्वत्र व्याप्त असून सर्वांना नेहमीच प्राप्त असतो. (ऋतं वदिष्यामि) तुमची जी वेदस्थ यथार्थ आज्ञा आहे तिचाच मी सर्वांना उपदेश करीन व आचरणही करीन. (सत्यं वदिष्यामि) मी सत्य बोलेन, सत्य मानीन व सत्यच करीन. (तन्मामवतु) म्हणून तुम्ही माझे रक्षण करावे. (तद्वक्तारमवतु) म्हणून आप्तनिष्ठ (आप्त) व सत्यवक्ता असणाऱ्या माझे तुम्ही रक्षण करावे. ज्यायोगे तुमच्या आज्ञेमध्ये माझी बुद्धि स्थिर होऊन त्या विरुद्ध कधी न होवो. कारण जी तुमची आज्ञा आहे तोच धर्म आहे आणि तिच्या विरुद्ध जे आहे तोच अधर्म आहे. ‘अवतु मामवतु वक्तारम्’ हा दुसऱ्यांदा आलेला पाठ अधिक अर्थ देण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, ‘कश्चित् कञ्चित् प्रति वदति त्वं ग्रामं गच्छ गच्छ’या वाक्यात क्रियेचा उच्चार दोनदा केल्याने‘तू लौकर गावाला जा’असे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे येथेही आहे. तुम्ही माझे अवश्य रक्षण करा. अर्थात् मी सुनिश्चितपणे धार्मिकतेत वागावे व नेहमी अधर्माचा तिरस्कार करावा, अशी कृपा तुम्ही माझ्यावर करावी. मी तुमचे खूप उपकार मानीन.


[तीनदा शांतीपाठ : त्रिविध-ताप निवारण]

संपादन

(ओ३म् शान्तिः शान्तिः शान्तिः) येथे तीनदा शांतीपाठ केला आहे. त्याचे प्रयोजन असे की ताप त्रिविध आहेत. म्हणजे या जगात तीन प्रकारची दु:खे आहेत —

(१) ‘आध्यात्मिक’ —  आत्मा व शरीरातील अविद्या, प्रीति, द्वेष, मूर्खता आणि ज्वर, पीडा इत्यादी आध्यात्मिक दुःखे होत.

(२) दुसरे ‘आधिभौतिक’ — जे शत्रु, व्याघ्र, सर्प वगैरे द्वारे मिळते.

(३) तिसरे ‘आधिदैविक’ — म्हणजे अतिवृष्टी, कडाक्याची थंडी व भयंकर उन्हाळा आणि मनाची व इंद्रियांची अशांती यांमुळे होणारी दुःखे.

या तीन प्रकारच्या क्लेशांपासून तुम्ही आम्हाला दूर ठेवत; आणि नेहमी कल्याणकारक कामांमध्ये प्रवृत्त करावे. कारण तुम्हीच कल्याणस्वरूप, साऱ्या जगाचे कल्याण करणारे आणि धार्मिक मुमुक्षूंना कल्याण प्रदान करणारे आहात, म्हणून तुम्ही स्वत: आपल्या करुणेने सर्व जीवांच्या हृदयात प्रकाशित व्हा. ज्यायोगे सर्व जीव धर्माचे आचरण करतील, अधर्माचा त्याग करून, परमानंदाला प्राप्त होतील आणि दुःखांपासून दूर राहतील.


[परमेश्वराची नावे : सूर्य, आत्मा, परमात्मा, परमेश्वर, सविता (२०-२४)]

संपादन

[२०] “सूर्य्य॑ऽआ॒त्मा जग॑तस्त॒स्थुष॑श्च” - यजु॰ अ॰ ७ । मं॰ ४२ ॥

यजुर्वेदातील या वचनावरून जगत म्हणजे जे प्राणी ‘चेतन व जंगम’ (म्हणजे चालणारे-फिरणारे) आहेत आणि ‘तस्थुषः’ जे अप्राणी म्हणजे स्थावर, जड अर्थात पृथ्वी आदी आहेत त्या सर्वांचा आत्मा असल्याने सर्वांना प्रकाश देतो म्हणून त्याचे नाव ‘सूर्य’ आहे.

[२१-२२] (अत सातत्यगमने) या धातूपासून ‘आत्मा’ शब्द बनतो. ‘योऽतति व्याप्नोति स आत्मा’ जो सर्व जीवादि जगतामध्ये निरंतर व्यापक होत आहे. ‘परश्चासौ-आत्मा च, यश्च आत्मभ्यो जीवेभ्यः सूक्ष्मेभ्यः परोऽतिसूक्ष्मः स परमात्मा’, जो सर्व जीवांहून उत्कृष्ट आणि जीव, प्रकृति तसेच आकाश यांच्याहूनही अतिसूक्ष्म, तसेच सर्व जीवांचा अंतर्यामी आत्मा आहे. म्हणून ईश्वराचे नाव ‘परमात्मा’ आहे.

[२३] सामर्थ्यवानाचे नाव ईश्वर आहे. ‘य ईश्वरेषु समर्थेषु परम: श्रेष्ठः स परमेश्वरः’, जो ईश्वरांमध्ये म्हणजे समर्थांमध्ये समर्थ आहे, ज्याच्या समान कोणीही नाही त्याचे नाव ‘परमेश्वर’ आहे.

[२४] (षुञ् अभिषवे, षूङ् प्राणिगर्भविमोचने) या धातूंपासून ‘सविता’ शब्द बनतो. ‘अभिषवः प्राणिगर्भविमोचनं चोत्पादनम्। यश्चराचरं जगत् सुनोति सूते वा-उत्पादयति स सविता परमेश्वरः’, जो साऱ्या जगाची उत्पत्ती करतो, म्हणून परमेश्वराचे नाव ‘सविता’ आहे.


[परमेश्वराची नावे : देव (२५)]

संपादन

[२५] (दिवु क्रीडाविजिगीषाव्यवहारद्युतिस्तुतिमोदमदस्वप्नकान्तिगतिषु) या धातूपासून ‘देव’ शब्द बनतो. (क्रीडा) जो शुद्ध सर्व जगताला क्रीडा करविण्याच्या (विजिगीषा) धार्मिकांचा विजय व्हावा असे इच्छिणारा (व्यवहार) सर्व व्यवहारांची साधने-उपसाधने देणारा आहे, (द्युति) स्वयंप्रकाशस्वरूप, सर्वांचा प्रकाशक, (स्तुति) प्रशंसेस योग्य, (मोद) स्वत: आनंदस्वरूप व इतरांना आनंद देणारा, (मद) मदोन्मत्तांना ताडना करणारा, (स्वप्न) सर्वांच्या निद्रेसाठी रात्र व प्रलय निर्माण करणारा (कान्ति) कामना करण्यास योग्य, आणि (गति) ज्ञानस्वरूप आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘देव’ आहे.

अथवा ‘यो दीव्यति क्रीडति स देवः’, जो आपल्या स्वरूपात आनंदाने स्वत:च क्रीडा करतो किंवा कुणाच्याही साह्याशिवाय क्रीडावत् सहज स्वभावाने साऱ्या जगाची निर्मिती करतो, अथवा सर्व क्रीडांचा आधार आहे; ‘[यो] विजिगीषते स देवः’, जो सर्वांना जिंकणारा, स्वत: अजय म्हणजे ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा आहे; ‘[यो] व्यवहारयति स देवः’, जो न्याय व अन्यायरूपी व्यवहार जाणणारा व उपदेशक आहे;  ‘यः-चराचरं जगत् द्योतयति [स देवः]’, जो सर्वांचा प्रकाशक आहे; ‘य: स्तूयते स देव:’ जो सर्व मनुष्यांकडून प्रशंसा करण्यास योग्य आहे व निंदा करण्यास योग्य नाही; ‘यो मोदयति स देवः’, जो स्वतः आनंद स्वरूप आहे, इतरांना आनंद देतो आणि ज्याला लेशमात्रही दु:ख नाही; ‘यो माद्यति स देवः’, जो सदा हर्षित, शोकरहित आणि इतरांना आनंदित करणारा व दु:खांपासून दूर ठेवणारा आहे; ‘य: स्वापयति स देव:’, जो प्रलयाच्या वेळी अव्यक्तामध्ये सर्व जीवांना झोपवितो; ‘यः कामयते काम्यते वा स देवः’, ज्याची सर्व कामे सत्य असतात आणि ज्याच्या प्राप्तीची कामना सर्व सभ्य लोक करतात; तसेच ‘यो गच्छति गम्यते वा स देवः’, जो सर्वामध्ये व्याप्त व जाणण्यास योग्य आहे; यामुळे त्या परमेश्वराचे नाव ‘देव’ आहे.


[परमेश्वराची नावे : कुबेर, पृथ्वी, जल (२६-२८)]

संपादन

[२६] (कुबि आच्छादने) या धातूपासून ‘कुबेर’ शब्द बनतो.  ‘यः सर्वं कुम्बति स्वव्याप्त्या-आच्छादयति स कुबेरो जगदीश्वरः’, जो आपल्या व्यापकतेने सर्वांना व्यापतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘कुबेर’ आहे.

[२७] (पृथु विस्तारे) या धातूपासून ‘पृथिवी’ (पृथ्वी) शब्द बनतो. ‘यः पर्थति सर्वं जगद्-विस्तृणाति तस्मात् स पृथिवी’, जो सर्व विस्तृत जगाचा विस्तार करणारा आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘पृथ्वी’ आहे.

[२८] (जल घातने) या धातूपासून ‘जल’ शब्द तयार होतो. ‘जलति घातयति दुष्टान् सङ्घातयति-अव्यक्तपरमाण्वादीन् तद् ब्रह्म जलम्’, जो दुष्टांना दंड देतो आणि अव्यक्त व परमाणू यांचा एकमेकांशी संयोग अथवा वियोग करतो त्या परमेश्वराला ‘जल’ असे म्हणतात.


[परमेश्वराची नावे : आकाश, अन्न, अन्नाद, अत्ता (२९-३२)]

संपादन

[२९] (काशृ दीप्तौ) या धातूपासून ‘आकाश’ शब्द बनतो. ‘यः सर्वतः सर्वं जगत् प्रकाशयति स आकाश:’, जो सर्व बाजूंनी जगाचा प्रकाशक आहे म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘आकाश’ आहे.

[३०-३२] (अद भक्षणे) या धातूपासून ‘अन्न’ शब्द तयार होतो.

अद्यतेऽत्ति च भूतानि तस्मादन्नं तदुच्यते॥  तैत्तिरीयोपनिषत् २।२॥

अहमन्नमहमन्नमहमन्नम्।

अहमन्नादोऽहमन्नादोऽहमन्नादः॥ तैत्तिरीयोपनिषत्  ३।१०॥

अत्ता चराऽचरग्रहणात्॥ वेदान्त सूत्र १।२।९ ॥

हे व्यासमुनिकृत शारीरिक सूत्र आहे. जो सर्वांना स्वत:मध्ये ठेवण्यास, सर्वांना ग्रहण करण्यास योग्य चराचर जगाचे ग्रहण करणारा आहे. यावरून ईश्वराला ‘अन्न’, ‘अन्नाद’आणि ‘अत्ता’ही नावे आहेत. यामध्ये एक पाठ जो तीनदा आलेला आहे. तो आदर व्यक्त करण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे उंबर फळात उत्पन्न होणारे किडे त्यातच राहतात व नष्ट होतात, त्याप्रमाणे परमेश्वरामध्ये सर्व जगाची अवस्था असते.


[परमेश्वराची नावे : वसू, रुद्र (३३-३४)]

संपादन

[३३] (वस निवासे) या धातूला ‘वसु’ शब्द बनला आहे. ‘वसन्ति भूतानि यस्मिन्-अथवा यः सर्वेषु भूतेषु वसति स वसुरीश्वरः’, ज्याच्यामध्ये सर्व आकाशादिभूते वसतात आणि जो सर्वांमध्ये वास करीत आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘वसू’ आहे.

[३४] (रुदिर् अश्रुविमोचने) या धातूला ‘णिच्’  आणि ‘रक्’ प्रत्यय लागून ‘रुद्र’ शब्द तयार होतो. ‘यो रोदयति-अन्यायकारिणो जनान् स रुद्रः’, जो दुष्ट कृत्ये करणाऱ्यांना रडवितो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘रुद्र’ आहे.

यन्मनसा ध्यायति तद्वाचा वदति,

यद्वाचा वदति तत् कर्मणा करोति,

यत् कर्मणा करोति तदभिसम्पद्यते॥

[तुलना—शतपथ ब्राह्मण १४। ७। २। ७]

हे यजुर्वेदाच्या ब्राह्मण ग्रंथाचे वचन आहे. जीव ज्याचे मनाने ध्यान करतो ते वाणीने बोलतो, जे वाणीने बोलतो ते कृतीने करतो, जे कृतीने करतो तेच त्याला प्राप्त होते. यावरून असे सिद्ध झाले की जीव जसे कर्म करतो तसेच फळ त्याला मिळते. जेव्हा दुष्ट कर्म करणारे जीव ईश्वराच्या न्यायरूपी व्यवस्थेमुळे दु:खरूपी फळ मिळवतात तेव्हा रडतात. याच प्रकारे ईश्वर त्यांना रडवितो, म्हणून ईश्वराचे नाव ‘रुद्र’ आहे.


[परमेश्वराची नावे : नारायण, चंद्र, मंगल (३५-३७)]

संपादन

[३५] आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नरसूनवः।

ता यदस्यायनं पूर्वं तेन नारायणः स्मृतः॥ मनु॰ अ॰ १५ श्लो॰ १०॥

जल आणि जीव यांचे नाव नारा आहे. ती ज्याची निवासस्थाने आहेत, म्हणून सर्वं जीवांमध्ये व्यापक असलेल्या परमेश्वराला ‘नारायण’ म्हणतात.

[३६] (चदि आह्लादे) या धातूपासून ‘चन्द्र’ शब्द बनतो. ‘यः-चन्दति चन्दयति वा स चन्द्रः’, जो आनंदस्वरूप व सर्वांना आनंद देणारा आहे, म्हणून ईश्वराचे नाव ‘चंद्र’ आहे.

[३७] (मगि गत्यर्थक) या धातूपासून ‘मङ्गेरलच्’ [उणादि॰ ५।७०]  या सूत्राने ‘मंगल’ शब्द तयार होतो. ‘यो मङ्गति मङ्गयति वा स मङ्गलः’, जो स्वतः मंगलस्वरूप आणि सर्व जीवांच्या मंगलाचे कारण आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘मंगल’ आहे.


[परमेश्वराची नावे : बुध, शुक्र, शनैश्चर, राहू, (३८-४१)]

संपादन

[३८] (बुध अवगमने) या धातूपासून ‘बुध’ शब्द बनतो. ‘यो बुध्यते बोधयति वा स बुधः’, जो स्वतः बोधस्वरूप व सर्व जीवांच्या बोधाचे कारण आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘बुध’ आहे.

‘बृहस्पति’ शब्दाचा अर्थ यापूर्वी सांगितला आहे.

[३९] (ईशुचिर् पूतीभावे) या धातूपासून ‘शुक्र’ शब्द बनला आहे. ‘यः शुच्यति शोचयति वा स शुक्रः’, जो अत्यंत पवित्र आहे आणि ज्याच्या संगाने जीवसुद्धा पवित्र होतो, म्हणून ईश्वराचे नाव ‘शुक्र’ आहे.

[४०] (चर गतिभक्षणयोः) या धातूपासून ‘शनैस्’ अव्यय उपपद लावल्याने ‘शनैश्चर’ शब्द बनला आहे. ‘यः शनैश्चरति स शनैश्चरः’, जो सर्वांमध्ये सहज प्राप्त, धैर्यवान् आहे. म्हणनू त्या परमेश्वराचे नाव ‘शनैश्चर’ आहे.

[४१] (रह त्यागे) या धातूपासून ‘राहु’ शब्द बनतो. ‘यो रहति परित्यजति दुष्टान् राहयति त्याजयति स राहुरीश्वरः’, जो एकांतस्वरूप आहे ज्याच्या स्वरूपात दुसरा पदार्थ मिसळलेला नाही, जो दुष्टांना सोडणारा व इतरांना सोडविणारा आहे, म्हणून परमेश्वराचे नाव ‘राहू’ आहे.


[परमेश्वराची नावे : केतू, यज्ञ, होता (४२-४४)]

संपादन

[४२] (कित निवासे रोगापनयने च) या धातूपासून ‘केतु’ शब्द बनतो. ‘य केतयति चिकित्सति वा स केतुरीश्वरः’, जो सर्व जगाचे निवासस्थान आहे, सर्व रोगांपासून रहित आहे आणि मुमुक्षूंना मुक्तीच्या वेळी सर्व रोगांपासून सोडवितो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘केतू’ आहे.

[४३] (यज देवपूजासङ्गतिकरणदानेषु) या धातूपासून ‘यज्ञ’ शब्द बनतो. ‘यज्ञो वै विष्णुः’ [शत॰ब्रा॰, १।१।२।१३, गो॰ ब्रा॰ उत्तरभाग, प्रपा॰ ४। कं॰ ६]. हे ब्राह्मण ग्रंथातील वचन आहे.  ‘यो यजति विद्वद्भिः-इज्यते वा स यज्ञः’, जो सर्व जगातील पदार्थांना जोडतो, सर्व विद्वानांना पूज्य आहे आणि ब्रह्मापासून सर्व ऋषिमुनींना पूज्य होता, आहे व असेल, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘यज्ञ’ आहे. कारण तो सर्वत्र व्यापक आहे.

[४४] (हु दानाऽऽदनयोः, आदाने चेत्येके) या धातूपासून ‘होता’ शब्द बनला आहे.  ‘यो जुहोति स होता’. जो जीवांना देण्यास योग्य पदार्थांचा दाता आणि ग्रहण करण्यास योग्य पदार्थांचा ग्राहक आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘होता’ आहे.


[परमेश्वराची नावे : बंधू, पिता, पितामह, प्रपितामह (४५-४८)]

संपादन

[४५] (बन्ध बन्धने) यावरून ‘बन्धु’ शब्द बनतो. ‘यः स्वस्मिन् चराऽचरं जगद् बध्नाति बन्धुवद्-धर्मात्मनां सुखाय सहायो वा वर्तते स बन्धुः’,  ज्याने स्वतःमध्ये सर्व लोकलोकांतरांना नियमांनी बद्ध करून ठेवले आहे व जो भावाप्रमाणे सहायक आहे म्हणूनच ते आपापल्या परिधीचे अथवा नियमाचे उल्लंघन करू शकत नाही, ज्याप्रमाणे भाऊ भावांना साह्य करतो त्याप्रमाणे परमेश्वरही पृथ्वी आदी लोकांचे धारण, रक्षण आणि सुख देणारा म्हणून त्याला ‘बंधू’ म्हणतात.

[४६-४८] (पा रक्षणे) या धातूपासून ‘पिता’ शब्द बनला आहे. ‘यः पाति सर्वान् स पिता’, जो सर्वांचे रक्षण करतो, ज्याप्रमाणे बाप आपल्या संतानांवर नेहमी कृपा करून त्यांची उन्नति इच्छितो. त्याच प्रमाणे परमेश्वर सर्व जीवांची उन्नती इच्छितो, म्हणून त्याचे नाव ‘पिता’ आहे.

‘यः पितॄणां पिता स पितामहः’, जो पित्यांचाही पिता आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘पितामहः’ (आजोबा) आहे.

‘यः पितामहानां पिता स प्रपितामहः’, जो पित्यांच्या पितरांचा पिता आहे, म्हणून परमेश्वराचे नाव ‘प्रपितामह’ (पणजोबा) आहे.


[परमेश्वराची नावे : माता, आचार्य, गुरू (४९-५१)]

संपादन

 [४९] (माङ्  माने शब्दे च)  यावरून ‘माता’ शब्द सिद्ध होतो.

‘यो मिमीते मानयति सर्वान्-जीवान् स माता’, ज्याप्रमाणे पूर्णकृपायुक्त जननी आपल्या संतानांचे सुख व उन्नती इच्छिते त्याप्रमाणे परमेश्वरही सर्व जीवांची उन्नती इच्छितो, म्हणून परमेश्वराचे नाव ‘माता’ आहे.

[५०] (चर गतिभक्षणयोः) आङ् पूर्वक या धातूपासून ‘आचार्य’ शब्द बनतो.  ‘य आचारं ग्राहयति, सर्वा विद्या बोधयति स आचार्य ईश्वरः’, जो सत्य आचाराचा ग्रहण करणारा आणि सर्व विद्यांच्या प्राप्तीचा हेतू बनून सर्व विद्या मिळवून देतो, म्हणून परमेश्वराचे नाव ‘आचार्य’ आहे.

[५१] (गॄ शब्दे) या धातूपासून ‘गुरु’ शब्द बनला आहे.

‘यो धर्म्यान् शब्दान् गृणाति-उपदिशति स गुरुः’,

‘स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात्॥’ (योग॰ सू॰ १।२६)

जो सत्यधर्मप्रतिपादक, सकल विद्यायुक्त, वेदांचा उपदेशक, सृष्टीच्या प्रारंभी अग्नी, वायू, आदित्य, अंगिरा आणि ब्रह्मादि गुरूचाही गुरू आहे व ज्याचा नाश कधी होत नाही, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘गुरू’ आहे.


[परमेश्वराची नावे : अज, ब्रह्मा, सत्य, ज्ञान, अनंत (५२-५७)]

संपादन

[५२] (अज गतिक्षेपणयोः, जनी प्रादुर्भावे) या धातूंपासून ‘अज’ शब्द बनतो. ‘योऽजति सृष्टिं प्रति सर्वान् प्रकृत्यादीन् पदार्थान् प्रक्षिपति जनयति, कदाचित्-न जायते सोऽजः’, जो सर्व प्रकृतीचे अवयव आकाशादि भूत परमाणूंचे यथायोग्य मिश्रण करतो, शरीराशी जीवांचा संबंध जोडून जन्म देतो. पण स्वतः मात्र कधी जन्म घेत नाही, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘अज’ आहे.

[५३] (बृह  बृहि  वृद्धौ) या धातूंपासून ‘ब्रह्मा’ शब्द तयार होतो. ‘योऽखिलं जगत्-निर्माणेन बर्हति [बृंहति] वर्द्धयति स ब्रह्मा’, जो संपूर्ण जगाला रचून वाढवितो, म्हणून परमेश्वराचे नाव ‘ब्रह्मा’ आहे.

[५४-५७] ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’. (तैत्तिरीयोपनिषद् ब्रह्म॰, अनु॰ १)

हे तैत्तिरीय उपनिषदातील वचन आहे.

‘सन्तीति सन्तः, तेषु सत्सु साधु तत्सत्यम्। यज्जानाति चराऽचरं जगत् तत्-ज्ञानम्। न विद्यतेऽन्तोऽवधिः-मर्यादा यस्य तदनन्तम्। सर्वेभ्यो बृहत्त्वाद् ब्रह्म’. जे पदार्थ आहेत त्यांना सत् म्हणतात. त्यांमध्ये साधुअसल्याने परमेश्वराचे नाव ‘सत्य’ आहे. तो सर्वांचा जाणणारा आहे, म्हणून परमेश्वराचे नाव ‘ज्ञान’ आहे. ज्याचे अंत, अवधी, मर्यादा म्हणजे तो इतका लांब, रुंद, लहान, मोठा असे परिमाण नाही, म्हणून परमेश्वराची नावे ‘सत्य, ज्ञान, अनन्त[आणि ब्रह्म]’ अशी आहेत.


[परमेश्वराची नावे : अनादी, सत्, चित्, आनंद, सच्चिदानंदस्वरूप (५८-६२)]

संपादन

[५८] (डुदाञ् दाने) ‘आङ्’ पूर्वक या धातूपासून ‘आदी’ आणि ‘नञ्’ पूर्वक ‘अनादि’ हे शब्द बनतात.  ‘यस्मात् पूर्वं नास्ति परं चास्ति स आदिः-इत्युच्यते।’ ‘न विद्यते आदिः कारणं यस्य सोऽनादिः-ईश्वरः’, ज्याच्या आधी काही नसते आणि नंतर असते त्याला आदी म्हणतात. ज्याचे आदी कारण काहीही नाही, म्हणून परमेश्वराचे नाव ‘अनादी’ आहे.

[५९] (टुनदि समृद्धौ) ‘आङ्’ पूर्वक या धातूपासून ‘आनंद’ शब्द बनतो. ‘आनन्दन्ति सर्वे मुक्ता यस्मिन् यद्वा यः सर्वान्-जीवान्-आनन्दयति स आनन्दः’, जो आनंदस्वरूप आहे, ज्यात सर्व मुक्त जीव आनंदाला प्राप्त होतात आणि जो सर्व धर्मात्मा जीवांना आनंदयुक्त करतो, म्हणून ईश्वराचे नाव ‘आनंद’ आहे.

[६०] (अस भुवि) या धातूपासून ‘सत्’ शब्द बनतो. ‘यदस्ति, त्रिषु कालेषु न बाध्यते तत्सद् ब्रह्म’, जो सदा विद्यमान असतो, म्हणजे भूत, भविष्य व वर्तमान या तीन्ही काळांमध्ये त्याचा बाध होत नाही म्हणून त्या परमेश्वराला ‘सत्’ म्हणतात.

 [६१-६२] (चिती संज्ञाने) या धातूपासून ‘चित्’ शब्द बनतो. ‘यश्चेतति चेतयति संज्ञापयति सर्वान् सज्जनान् योगिनः-तच्चित्परं ब्रह्म’, जो चेतनस्वरूप आहे, सर्व जीवांना सावधान करणारा व सत्यासत्य जाणणारा आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘चित्’ आहे. या तीन्ही शब्दांच्या विशेषणांमुळे परमेश्वराला ‘सच्चिदानन्दस्वरूप’ म्हणतात.


[परमेश्वराची नावे : नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त (६३-६६)]

संपादन

[६३] नित्य—‘यो ध्रुवोऽचलोऽविनाशी स नित्यः’, जो निश्चल अविनाशी आहे, म्हणून तो ‘नित्य’ शब्द वाचक ईश्वर आहे.

[६४] (शुन्ध शुद्धौ) यापासून ‘शुद्ध’ शब्द बनतो. ‘यः शुन्धति सर्वान् शोधयति वा स शुद्ध ईश्वरः’, जो स्वतः पवित्र, सर्व अशुद्धींपासून मुक्त आणि सर्वांना शुद्ध करणारा आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘शुद्ध’ आहे.

[६५] (बुध अवगमने) या धातूला ‘क्त’ प्रत्यय लागून ‘बुद्ध’ शब्द बनतो, ‘यो बुद्धवान् सदैव ज्ञाताऽस्ति स बुद्धो जगदीश्वरः’, जो सदा सर्वांना जाणणारा आहे, म्हणून ईश्वराचे नाव ‘बुद्ध’ आहे.

[६६] (मुचॢ मोचने) या धातूपासून ‘मुक्त’ शब्द बनतो. ‘यो मुञ्चति मोचयति वा मुमुक्षून् स मुक्तो जगदीश्वरः’, जो सर्वदा अशुद्धींपासून दूर असतो आणि सर्व मुमुक्षुची क्लेशापासून सुटका करतो, म्हणून परमेश्वराचे नाव ‘मुक्त’ आहे. ‘अत एव नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभावो जगदीश्वरः’, यामुळेच परमेश्वराचा स्वभाव नित्य, शुद्ध, बुद्ध व मुक्तआहे.


[परमेश्वराची नावे : निराकार, निरंजन, गणेश, गणपती (६७-७०)]

संपादन

[६७] ‘निर्’आणि‘आङ्’पूर्वक (डुकृञ् करणे) या धातूपासून ‘निराकार’ शब्द बनतो. ‘निर्गत आकारात् स निराकारः’, ज्याला कोणताही आकार नाही आणि जो कधी शरीर धारण करीत नाही, म्हणून परमेश्वराचे नाव ‘निराकार’ आहे.

[६८] (अञ्जू व्यक्तिम्रक्षणकान्तिगतिषु) या धातूपासून ‘अञ्जन’ शब्द आणि निर् उपसर्ग लागल्याने ‘निरञ्जन’ शब्द बनतो. ‘अञ्जनं व्यक्तिर्म्रक्षणं कुकामनाभिः-इन्द्रियैः प्राप्तिः-इति-अस्मात्-यो निर्गतः पृथग्भूतः स निरञ्जनः’, जी व्यक्ती अर्थात आकृती, म्लेच्छाचार, दुष्ट कामना आणि चक्षुरादि इंद्रियांच्या विषयांच्या मार्गापासून दूर आहे, म्हणून ईश्वराचे नाव ‘निरंजन’ आहे.

[६९-७०] (गणसंख्याने) या धातूपासून ‘गण’ शब्द बनतो. याच्या पुढे ‘ईश’ किंवा ‘पति’ हे शब्द लावल्यास ‘गणेश’‘गणपति’ हे शब्द बनतात. ‘ये प्रकृत्यादयो जडा जीवाश्च गण्यन्ते संख्यायन्ते तेषामीशः स्वामी पतिः पालको वा स गणेशो गणपतिर्वा’, जो प्रकृत्यादि जड (अचेतन) आणि सर्व जीव प्रख्यात पदार्थांचा स्वामी अथवा पालन करणारा आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘गणेश’ किंवा ‘गणपती’ आहे.


[परमेश्वराची नावे : विश्वेश्वर, कूटस्थ, चिति, देवी, शक्ती (७१-७५)]

संपादन

[७१] ‘यो विश्वमीष्टे स विश्वेश्वरः’, जो जगाचा अधिष्ठाता आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘विश्वेश्वर’ आहे.

[७२] ‘य: कूटेऽनेकविधव्यवहारे स्वस्वरूपेणैव तिष्ठति स कूटस्थ: परमेश्वरः’, जो सर्व व्यवहारांमध्ये व्याप्त आणि सर्व व्यवहारांचा आधार असूनही कोणत्याही व्यवहारात आपले स्वरूप बदलत नाही, म्हणून परमेश्वराचे नाव ‘कूटस्थ’ आहे.

[७३-७४] 'देव’ शब्दाचे जितके अर्थ लिहिले आहेत तितकेच ‘देवी’ शब्दाचेही आहेत. परमेश्वराची नावे तीन्ही लिंगांत आहेत. उदाहरणार्थ, ‘ब्रह्म चितिरीश्वरश्चेति’, जेव्हा ईश्वराचे विशेषण असेल तेव्हा ‘देव’ आणि जेव्हा चितीचे असेल तेव्हा देवी असे समजावे, म्हणून ईश्वराचे नाव ‘देवी’ आहे.

[७५] (शकॢ शक्तौ) या धातूपासून ‘शक्ती’ शब्द बनतो.  ‘यः सर्वं जगत् कर्तुं शक्नोति स शक्तिः’, जो संपूर्ण जग निर्माण करण्यास समर्थ आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘शक्ती’ आहे.


[परमेश्वराची नावे : श्री, लक्ष्मी, सरस्वती (७६-७८)]

संपादन

[७६] (श्रिञ् सेवायाम्) या धातूपासून ‘श्री’ शब्द बनतो.  ‘यः श्रीयते सेव्यते सर्वेण जगता विद्वद्भिः-योगिभिश्च स श्रीरीश्वरः’;ज्याचे ग्रहण संपूर्ण, विश्व, विद्वान आणि योगीजन करतात; त्या परमेश्वराचे नाव ‘श्री’ आहे.

[७७] (लक्ष दर्शनाङ्कनयोः) या धातूपासून ‘लक्ष्मी’ शब्द बनतो.  ‘यो लक्षयति पश्यति-अङ्कते चिह्नयति चराऽचरं जगद् अथवा वेदैः-आप्तैः-योगिभिश्च यो लक्ष्यते स लक्ष्मीः सर्वप्रियेश्वरः’, जो सर्व चराचर जगताला पाहतो, चिह्नित म्हणजे दृश्य बनवितो. जसे शरीराचे डोळे, नाक आदी आणि वृक्षाची पाने, फुले, फळे, मुळे, पृथ्वी, पाणी, काळे, लाल, पांढरे, माती-दगड, चंद्र, सूर्य वगैरे चिह्न बनवितो व सर्वांना पाहतो. जो सर्व शोभांची शोभा आहे आणि जो वेदादि शास्त्रे अथवा धार्मिक विद्वान् योगी यांचे लक्ष्य म्हणजे पाहण्यास योग्य आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘लक्ष्मी’ आहे.

[७८] (सृ गतौ) या धातूपासून ‘सरस्’ व त्याला ‘मतुप्’ आणि ‘ङीप्’ प्रत्यय लागन ‘सरस्वती’ शब्द बनतो ‘सरो विविधं ज्ञानं विद्यते यस्यां चितौ सा सरस्वती’, ज्याला विविध विज्ञानांचे म्हणजे शब्द व अर्थ यांचे संबंध प्रयोग यांचे ज्ञान यथावत असते, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘सरस्वती’ आहे.


[परमेश्वराची नावे : सर्वशक्तिमान, न्यायकारी, दयाळू (७९-८१)]

संपादन

[७९] ‘सर्वाः शक्तयो विद्यन्ते यस्मिन् स सर्वशक्तिमानीश्वरः’, जो आपले कार्य करण्यात इतर कुणाच्या साह्याची इच्छा बाळगीत नाही, आपल्याच सामर्थ्याने आपली सर्व कामे पूर्ण करतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘सर्वशक्तिमान’ आहे.

[८०] (णीञ् प्रापणे) या धातूपासून ‘न्याय’ शब्द बनतो. ‘प्रमाणैरर्थपरीक्षणं न्याय:’ [वात्स्यायन भाष्य १।१।१], हे वचन न्यायसूत्रांवरील वात्स्यायनमुनिकृत भाष्यातील आहे. ‘पक्षपातरहित्याचरणं न्याय:’, जे प्रत्यक्षादि प्रमाणांच्या परीक्षेने सत्य सिद्ध होते तसेच पक्षपातरहित धर्मरूप आचरण आहे, त्याला ‘न्याय’ असे म्हणतात.

‘न्यायं कर्तुं शीलमस्य स न्यायकारी-ईश्वरः’, ज्याचा स्वभाव न्याय म्हणजे पक्षपातरहित धर्माचरण करण्याचाच आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘न्यायकारी’ आहे.

[८१] (दय दानगतिरक्षणहिंसादानेषु) या धातूपासून ‘दया’ शब्द बनतो. ‘दयते ददाति जानाति गच्छति रक्षति हिनस्ति यया सा दया, बह्वी: दया विद्यते यस्य स दयालुः परमेश्वरः’, जो अभय देणारा सत्यासत्य सर्व विद्या जाणणारा, सर्व सज्जनांचे रक्षण करणारा आणि दुष्टांना यथायोग्य शिक्षा देणारा आहे, म्हणून परमेश्वराचे नाव ‘दयाळू’ आहे.


[परमेश्वराची नावे : अद्वैत (८२)]

संपादन

[८२] ‘द्वयोर्भावो द्वाभ्यामितं सा द्विता द्वीतं वा सैव तदेव वा द्वैतम्, न विद्यते द्वैतं द्वितीयेश्वरभावो यस्मिंस्तदद्वैतम्’ अर्थात ‘सजातीय-विजातीय-स्वगत-भेदशून्यं ब्रह्म’, दोन होणे अथवा दोन युक्त होणे म्हणजे द्विता, द्वीत किंवा द्वैत. जो यापासून रहित आहे जसे सजातीय मनुष्यांचा सजातीय दुसरा मनुष्य होतो. विजातीय म्हणजे मनुष्याहून भिन्न जातीचा वृक्ष, पाषाण आदी होतो. स्वगत म्हणजे शरीरामध्ये जसे डोळे, नाक, कान वगैरे अवयवांचा भेद आहे तसा दुसरे स्वजातीय ईश्वर, विजातीय ईश्वर किंवा आपल्या आत्म्यामधील तत्त्वांवर वस्तू यांपासून रहित एक परमेश्वर आहे, म्हणून परमेश्वराचे नाव ‘अद्वैत’ आहे.


[परमेश्वराची नावे : निर्गुण, सगुण (८३-८४)]

संपादन

[८३] ‘गुण्यन्ते ये ते गुणा वा यैः-गुणयन्ति ते गुणाः, यो निर्गतः गुणेभ्यो स निर्गुण ईश्वरः’, सत्व, रज, तम; रूप, रस, स्पर्श, गन्ध आदी जडाचे (अचेतनाचे) गुण अविद्या, अल्पज्ञता, राग (मोह), द्वेष आणि अविद्या आदी क्लेश हे जीवाचे गुण आहेत. त्यांच्यापासून जो वेगळा आहे. यामध्ये ‘अशब्दमस्पर्शमरूपमव्ययम्’ इत्यादी उपनिषदांचे प्रमाण आहे. जो शब्द, स्पर्श, रूप आदी गुणांनी रहित आहे, म्हणून परमेश्वराचे नाव ‘निर्गुण’ आहे.

[८४] ‘यो गुणैः सह वर्त्तते स सगुणः’, जो सर्वांचे ज्ञान, सर्वसुख, पवित्रता, अनंत बलादि गुणांनी युक्त आहे, म्हणून परमेश्वराचे नाव ‘सगुण’ आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीगंधादि गुणांमुळे ‘सगुण ’आणि इच्छादि गुणांनी रहित असल्यामुळे ‘निर्गुण’ आहे; त्याप्रमाणे जग आणि जीव यांच्या गुणांहून वेगळा असल्यामुळे परमेश्वर ‘निर्गुण’ आहे आणि सर्वज्ञादि गुणांनी युक्त असल्यामुळे ‘सगुण’ आहे. अर्थात असा कोणताही पदार्थ नाही जो सगुणता व निर्गुणता यापासून दूर आहे. ज्याप्रमाणे चेतनाच्या गुणांहून भिन्न असल्याने जड (अचेतन) पदार्थ निर्गुण असतो आणि आपल्या गुणांनी युक्त असल्याने सगुण असतो त्याच प्रमाणे जड़ाच्या (अचेतनाच्या) गुणांहून भिन्न असल्याने जीव निर्गुण असतो आणि इच्छादि आपल्या गुणांनी युक्त असल्याने तो सगुण असतो. परमेश्वराच्या बाबतीतही असेच समजले पाहिजे.

[परमेश्वराची नावे : अंतर्यामी, धर्मराज, यम, भगवान, मनु (८५-८९)]

संपादन

[८५] ‘अन्तर्यन्तुं नियन्तुं शीलं यस्य सोऽयमन्तर्यामी’, जो सर्व प्राणी आणि अप्राणिरूप जगामध्ये व्यापक राहून सर्वांचे नियमन करतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘अंतर्यामी’ आहे.

[८६] ‘यो धर्मे राजते स धर्मराजः’, जो धर्मामध्येच प्रकाशमान असतो आणि अधर्माने रहित धर्माचा प्रकाश करतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘धर्मराज’ आहे.

[८७] (यमु उपरमे) या धातूपासून ‘यम’ शब्द बनतो. ‘य: सर्वान् प्राणिनो नियच्छति स यम:’, जो सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्माची फळे देण्याची व्यवस्था करतो आणि सर्व अन्यायांपासून पृथक राहतो, म्हणून परमेश्वराचे नाव ‘यम’ आहे.

[८८] (भज सेवायाम्) या धातूपासून ‘भग’ त्यास ‘मतुप्’ प्रत्यय होऊन ‘भगवान्’ शब्द बनतो. ‘भगः सकलैश्वर्यं सेवनं वा विद्यते यस्य स भगवान्’, जो समग्र ऐश्वर्याने युक्त अथवा भजण्यास योग्य आहे, म्हणूनच त्या ईश्वराचे नाव ‘भगवान’ आहे. 

[८९] (मन ज्ञाने) या धातूपासून ‘मनु’ शब्द बनतो.  ‘यो मन्यते स मनुः’, जो मनु म्हणजे विज्ञानशील आणि मानण्यास योग्य आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘मनु’ आहे.


[परमेश्वराची नावे : पुरुष, विश्वंभर, काल, शेष (९०-९३)]

संपादन

[९०] (पॄ पालनपूरणयोः) या धातूपासून ‘पुरुष’ शब्द बनला आहे.  ‘यः स्वव्याप्त्या चराचरं जगत् पृणाति पूरयति वा स पुरुषः’, जो सर्व जगात परिपूर्ण होत आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘पुरुष’ आहे.

[९१] (डुभृञ् धारण-पोषणयोः) विश्वपूर्वक या धातूपासून ‘विश्वंभर’ शब्द बनतो. ‘यो विश्वं बिभर्ति धरति पुष्णाति वा स विश्वम्भरो जगदीश्वरः’, जो जगाचे धारण व पोषण करतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘विश्वंभर’ आहे.

[९२] (कल संख्याने) या धातूपासून ‘काल’ शब्द बनला आहे. ‘कलयति संख्याति सर्वान् पदार्थान् स कालः’, जो जगातील सर्व पदार्थांची व जीवांची संख्या (गणना) करतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘काल’ आहे.

[९३] (शिषॢ विशेषणे) या धातूपासून ‘शेष’ शब्द बनतो. ‘यः शिष्यते स शेषः’, जो उत्पत्ती आणि प्रलय यांपासून शेष म्हणजे अलिप्त आहे, (मुक्त असतो), म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘शेष’ आहे.


[परमेश्वराची नावे : आप्त, शंकर, महादेव, प्रिय (९४-९७)]

संपादन

[९४] (आपॢ व्याप्तौ) या धातूपासून आप्त शब्द बनतो.  ‘यः सर्वान् धर्मात्मन आप्नोति वा सर्वैर्धर्मात्मभिः-आप्यते छलादिरहितः स आप्तः’, जो सत्योपदेशक सकल विद्यायुक्त सर्व धर्मात्म्यांना प्राप्त होणारा आणि धर्मात्म्यांकडून प्राप्त होण्यास योग्य, छलकपटादींपासून रहित आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘आप्त’ आहे.

[९५] (डुकृञ् करणे) ‘शम्’ पूर्वक या धातूपासून ‘शङ्करः’ शब्द बनला आहे.  ‘यः शं कल्याणं सुखं करोति स शङ्करः’, जो कल्याण म्हणजे सुखी करणारा आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘शंकर’ आहे.

[९६] ‘महत्’ शब्दपूर्वक ‘देव’ शब्दापासून ‘महादेव’ हा शब्द बनतो. ‘यो महतां देवः स महादेवः’, जो महान देवांचा देव अर्थात विद्वानांचाही विद्वान, सूर्यादि पदार्थांचा प्रकाशक आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘महादेव’ आहे.

 [९७] (प्रीञ् तर्पणे कान्तौ च) या धातूपासून ‘प्रिय’ शब्द बनतो.  ‘यः प्रीणाति प्रीयते वा स प्रियः’, जो सर्व धर्मात्मांना, मुमुक्षूंना व सज्जनांना प्रसन्न करतो आणि सर्वांकडून कामना करण्यास योग्य आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘प्रिय’ आहे.


[परमेश्वराची नावे : स्वयंभू, कवी, शिव (९८-१००)]

संपादन

 [९८] (भू सत्तायाम्) ‘स्वयं’ पूर्वक या धातूपासून ‘स्वयंभू’ शब्द बनतो, ‘यः स्वयं भवति स स्वयम्भूः-ईश्वरः’, जो आपण स्वत:च आहे, कधी कोणापासून उत्पन्न झालेला नाही, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘स्वयंभू’ आहे.

[९९] (कु शब्दे) या धातूपासून ‘कवि’ शब्द बनतो.  ‘यः कौति शब्दयति सर्वा विद्याः स कविः-ईश्वरः’. जो वेदांद्वारे सर्व विद्यांचा उपदेश करणारा आहे आणि जाणणारा आहे म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘कवी’ आहे.

[१००] (शिवु कल्याणे) या धातूपासून ‘शिव’ शब्द बनतो. ‘बहुलमेतन्निदर्शनम्’ [धातुपाठे चुरादिगणे]  यापासून शिवु धातू मानला जातो. जो कल्याणस्वरूप व कल्याण करणारा आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘शिव’ आहे.

[ओंकारार्थप्रकरणाचे वर्णित ईश्वराचे १०० संस्कृत नावांची अनुक्रमणिका]

[परमेश्वराची नावे : आप्त, शंकर, महादेव, प्रिय (९४-९७)]

[९४] (आपॢ व्याप्तौ) या धातूपासून आप्त शब्द बनतो.  ‘यः सर्वान् धर्मात्मन आप्नोति वा सर्वैर्धर्मात्मभिः-आप्यते छलादिरहितः स आप्तः’, जो सत्योपदेशक सकल विद्यायुक्त सर्व धर्मात्म्यांना प्राप्त होणारा आणि धर्मात्म्यांकडून प्राप्त होण्यास योग्य, छलकपटादींपासून रहित आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘आप्त’ आहे.

[९५] (डुकृञ् करणे) ‘शम्’ पूर्वक या धातूपासून ‘शङ्करः’ शब्द बनला आहे.  ‘यः शं कल्याणं सुखं करोति स शङ्करः’, जो कल्याण म्हणजे सुखी करणारा आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘शंकर’ आहे.

[९६] ‘महत्’ शब्दपूर्वक ‘देव’ शब्दापासून ‘महादेव’ हा शब्द बनतो. ‘यो महतां देवः स महादेवः’, जो महान देवांचा देव अर्थात विद्वानांचाही विद्वान, सूर्यादि पदार्थांचा प्रकाशक आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘महादेव’ आहे.

 [९७] (प्रीञ् तर्पणे कान्तौ च) या धातूपासून ‘प्रिय’ शब्द बनतो.  ‘यः प्रीणाति प्रीयते वा स प्रियः’, जो सर्व धर्मात्म्यांना, मुमुक्षूंना व सज्जनांना प्रसन्न करतो आणि सर्वांकडून कामना करण्यास योग्य आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव ‘प्रिय’ आहे.

[परमेश्वराची नावे : स्वयंभू, कवी, शिव (९८-१००)]

 [९८] (भू सत्तायाम्) ‘स्वयं’ पूर्वक या धातूपासून ‘स्वयंभू’ शब्द बनतो, ‘यः स्वयं भवति स स्वयम्भूः-ईश्वरः’, जो आपण स्वत:च आहे, कधी कोणापासून उत्पन्न झालेला नाही, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘स्वयंभू’ आहे.

[९९] (कु शब्दे) या धातूपासून ‘कवि’ शब्द बनतो.  ‘यः कौति शब्दयति सर्वा विद्याः स कविः-ईश्वरः’. जो वेदांद्वारे सर्व विद्यांचा उपदेश करणारा आहे आणि जाणणारा आहे म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘कवी’ आहे.

[१००] (शिवु कल्याणे) या धातूपासून ‘शिव’ शब्द बनतो. ‘बहुलमेतन्निदर्शनम्’ [धातुपाठे चुरादिगणे]  यापासून शिवु धातू मानला जातो. जो कल्याणस्वरूप व कल्याण करणारा आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ‘शिव’ आहे.


[ओंकारार्थप्रकरणाचे वर्णित ईश्वराचे १०० संस्कृत नावांची अनुक्रमणिका]

संपादन
1 ओम् (ओंकार) 26 कुबेर 51 गुरु 76 श्री
2 विराट् 27 पृथिवी 52 अज 77 लक्ष्मी
3 अग्नि 28 जल 53 ब्रह्मा 78 सरस्वती
4 विश्व 29 आकाश 54 ब्रह्म 79 सर्वशक्तिमान्
5 हिरण्यगर्भ 30 अन्न 55 सत्य 80 न्यायकारी
6 वायु 31 अन्नाद 56 ज्ञान 81 दयालु
7 तैजस 32 अत्ता 57 अनन्त 82 अद्वैत
8 ईश्वर 33 वसु 58 अनादि 83 निर्गुण
9 अदिति 34 रुद्र 59 सत् 84 सगुण
10 आदित्य 35 नारायण 60 चित् 85 अन्तर्यामी
11 प्रज्ञ 36 चन्द्र 61 आनन्द 86 धर्मराज
12 प्राज्ञ 37 मंगल 62 सच्चिदानन्दस्वरूप 87 यम
13 मित्र 38 बुध 63 नित्य 88 भगवान्
14 वरुण 39 शुक्र 64 शुद्ध 89 मनु
15 अर्यमा 40 शनैश्चर 65 बुद्ध 90 पुरुष
16 इन्द्र 41 राहु 66 मुक्त 91 विश्वम्भर
17 बृहस्पति 42 केतु 67 निराकार 92 काल
18 विष्णु 43 यज्ञ 68 निरञ्जन 93 शेष
19 उरुक्रम 44 होता 69 गणेश 94 आप्त
20 सूर्य 45 बन्धु 70 गणपति 95 शंकर
21 आत्मा 46 पिता 71 विश्वेश्वर 96 महादेव
22 परमात्मा 47 पितामह 72 कूटस्थ 97 प्रिय
23 परमेश्वर 48 प्रपितामह 73 चिति 98 स्वयम्भू
24 सविता 49 माता 74 देवी 99 कवि
25 देव 50 आचार्य 75 शक्ति 100 शिव


[परमेश्वराचे अनंत गुण, कर्म, स्वभाव व नावे]

संपादन

परमेश्वराची ही शंभर नावे येथे लिहिली आहेत. परंतु याहून वेगळी अशी परमेश्वराची असंख्य नावे आहेत, कारण जसे परमेश्वराचे अनंत गुण, कर्म, स्वभाव आहेत तशी त्याची अनंत नावेही आहेत. त्यांपैकी प्रत्येक गुण, कर्म व स्वभाव यांचे एक-एक नाव आहे, म्हणून मी जी ही नावे नमूद केली आहेत ती सागरासमोर बिंदुसारखी आहेत. कारण वेदादी शास्त्रांमध्ये परमेश्वराचे असंख्य गुण, कर्म व स्वभाव वर्णिलेले आहेत. ते वाचल्यावर, शिकविल्यावर त्यांचा बोध होऊ शकतो आणि जे लोक वेदादी शास्त्रे वाचतात त्यांनाच इतर पदार्थांचे ज्ञानही पूर्णपणे होऊ शकते.


[मंगलाचरण विचार]

संपादन

(प्रश्न) इतर ग्रंथकार लोक आदी, मध्य व अंत प्रसंगी मंगलाचरण करतात तसे आपण काहीच केले नाही किंवा लिहिले नाही. हे कसे?

 (उत्तर) तसे तर आम्हांला करणे योग्य नाही. कारण जो आदी, मध्य व अंत प्रसंगी मंगल करील तर त्याच्या ग्रंथामध्ये आदी, मध्य व अंत यांच्या दरम्यान जे काही लिहिलेले असेल ते अमंगलच असेल म्हणून ‘मङ्गलाचरणं शिष्टाचारात् फलदर्शनाच्छुतितश्चेति’ (सांख्यदर्शन अ॰ ५। सू॰ १) असे सांख्यशास्त्राचे वचन आहे. त्याचा अभिप्राय असा की न्याय, पक्षपातरहित सत्य वेदोक्त ईश्वराची जी आज्ञा आहे तिचेच यथावत सर्वत्र सदैव आचरण करणे म्हणजेच मंगलाचरण म्हटले जाते. ग्रंथाच्या प्रारंभापासून समाप्तीपर्यंत सत्याचार करणे हेच मंगलाचरण होय असे नाही की कोठे मंगल व कोठे अमंगल लिहावे. महाशय महर्षीचा लेख पाहा —

‘यान्यनवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि ॥

हे तैत्तिरीय उपनिषदातील [१।११] वचन आहे. हे मानवांनो ! जी ‘अनवद्य’, अनिंदनीय म्हणजे धर्मयुक्त कर्मे आहेत तीच तुम्ही करणे योग्य आहे. अधर्मयुक्त कर्मे करणे योग्य नव्हे.

म्हणून आधुनिक ग्रंथात ‘श्रीगणेशाय नमः’, ‘सीतारामाभ्यां नमः’, ‘राधाकृष्णाभ्यां नमः’, ‘श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः’, ‘हनुमते नमः’, ‘दुर्गायै नमः’, ‘वटुकाय नमः’, ‘भैरवाय नमः’, ‘शिवाय नमः’, ‘सरस्वत्यै नमः’, ‘नारायणाय नमः’ इत्यादी जे काही लिखाण पाहाण्यांत येते ते वेद आणि शास्त्रे यांच्या विरुद्ध असल्यामुळे बुद्धिमान लोक ते मिथ्याच समजतात. कारण वेदांमध्ये आणि ऋषींच्या ग्रंथांमध्ये कोठेही असले मंगलाचरण आढळत नाही. आर्ष (ऋषिकृत) ग्रंथांमध्ये ‘ओ३म्’ आणि ‘अथ’ हे शब्द मात्र आढळतात. पहा—

‘अथ शब्दानुशासनम्’अथेत्ययं शब्दोऽधिकारार्थः प्रयुज्यते॥ (व्याकरणमहाभाष्य)

‘अथातो धर्मजिज्ञासा’ अथेत्यानन्तर्ये वेदाध्ययनानन्तरम्। (पूर्वमीमांसा)

‘अथातो धर्मं व्याख्यास्यामः’ अथेतिधर्मकथनानन्तरधर्मलक्षणं विशेषेण व्याख्यास्यामः। (वैशेषिक दर्शन).

‘अथ योगानुशासनम्’ अथेत्ययमधिकारार्थः। (योगदर्शन).

‘अथ त्रिविधदुःखात्यन्तनिवृत्तिरत्यन्तपुरुषार्थः॥

सांसारिकविषयभोगानन्तरं त्रिविधदुःखात्यन्तनिवृत्त्यर्थः प्रयत्नः कर्तव्यः। (सांख्यदर्शन).

‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’। चतुष्टय-साधन-संपत्त्यनन्तरं ब्रह्म जिज्ञास्यम्॥ (वेदान्तसूत्र)

‘ओमित्येतदक्षरमुद्गीथमुपासीत’॥ हे छांदोग्य उपनिषदातील वचन आहे.

‘ओमित्येतदक्षरमिदꣳ सर्वं तस्योपव्याख्यानम् । हे माण्डूक्य उपनिषदाच्या आरंभीचे वचन आहे.

असेच अन्य ऋषिमुनींच्या ग्रंथांमध्ये ‘ओ३म्’‘अथ’ शब्द लिहिलेले आहेत. त्याच प्रमाणे (अग्नि, इट्, अग्नि, येत्रिषप्ताः परियन्ति) हे शब्द चारही वेदांच्या प्रारंभी लिहिलेले आहेत. ‘श्री गणेशाय नमः’ इत्यादी शब्द कोठेही नाहीत. जे वैदिक लोक वेदाच्या आरंभी ‘हरिः ओम्’ लिहितात अथवा म्हणतात हे सर्व पौराणिक व तांत्रिक लोकांच्या चुकीच्या कल्पनांवरून शिकले आहेत. वेदादि शास्त्रांमध्ये ‘हरि’ हा शब्द प्रारंभी कोठेही नाही, म्हणून ‘ओ३म्’ किंवा ‘अथ’ हा शब्दच ग्रंथाच्या आरंभी लिहिला पाहिजे.

हे किंचितमात्र ईश्वराविषयी लिहिले. यानंतर शिक्षणाविषयी लिहिण्यात येईल.

इति श्रीमद्दयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे

सुभाषाविभूषित ईश्वरनामविषये प्रथम: समुल्लास: सम्पूर्णः॥