सत्यार्थ प्रकाश/९. आठवा समुल्लास
आठवा समुल्लास सृष्टि उत्पत्ति
आता सृष्टिची उत्पत्ति, स्थिती व प्रलय यांसंबंधी लिहावयाचे आहे.
इयं विसृष्टिर्यत आ बभूव यदि वा दधे यदि वा न । यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अंग वेद यदि वा न वेद ।।१।।–ऋ० मं० १०। सू० १२९। मं० ७।।
हे अङ्ग-मनुष्या! ज्याच्या पासून ही विविध सृष्टी प्रकाशित झाली आहे, जो तिचे धारण करतो व प्रलय करतो, जो या जगाचा स्वामी आहे व ज्या सर्वव्यापकामध्ये हे सारे जग उत्पत्ति, स्थिती वलय यांना प्राप्त होते तोच परमात्मा आहे. त्याला तू जाण आणि दुसर्या कोणालाही सृष्टिकर्ता मानू नको. ॥१॥
तम आसीत्तमसा गूळमग्रेऽप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् । तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्तपसस्तन्महिना जायतैकम् ।।२।।–ऋ० मं० १०। सू० १२९। मं० ३।।
हैसरे जग सृष्टिच्या पूर्वी अंधकाराने वेष्टीलेले आणि रात्रीरूप जाणण्यास अयोग्य असे हे अवकाशरूपी सारे जग जसे तुच्छ म्हणजे अनंत परमेश्वरासमोर एकास्थानामध्ये अंधाराने आच्छादलेले होते. नंतर परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने त्याला कारण रूपांतून कार्यरूप बनविले. ॥२॥
हिरण्यगर्भः समवत्तर्ताग्रे भतूस्य जातः पतिरेक आसीत् । स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधमे ।।३।।-ऋ०मं० १०। सू० १२९। मं० १।।
हे मनुष्यानो ! जो सूर्यादी सर्व तेजस्वी पदार्थाचा आधार आणि या उत्पन्न झालेल्या व पुढे उत्पन्न होणाऱ्या जगाचा एक अद्वितीय स्वामी, तो परमेश्वर या जगाच्या उत्पत्ती पूर्वी विद्यमान होता. याने पृथ्वीपासून सूर्यापर्यंत संपूर्ण जग उत्पन्न केले आहे त्या परमेश्वराची प्रेमाने भक्ती करीत असावे. ॥३॥
पुरुष एवेदँ् सर्वं यद्भूतं यच्च भाव्य्म् । उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ।।४।।-यजुः अ० ३१। मं० २।।
हे मनुष्यांनो! जो सर्वांमध्ये पूर्ण व्यापक पुरुष आणि जो नाशरहित कारण व जीवाचा स्वामी आहे, जो पृथिव्यादी जड पदार्थ व जीव यांहून निराळा आहे तोच पुरुष (परमेश्वर) या सर्व भूत, भविष्य व वर्तमान काळातील जगाचा रचयिता आहे. ॥४॥
यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति। यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद् ब्रह्म।।५।।-तैनिरीयोपनि० भृगु० अनु०१।।
ज्या परमेश्वराच्या रचनेने ही सारी पृथिव्यादी भूते उत्पन्न होतात, ज्याच्या योगाने ती जगतात व ज्याच्यामुळे लयाला जातात तेच ब्रह्म होय. त्याला जाणण्याची इच्छा करा.॥५॥
जन्माद्यस्य यतः।। -शारीरक सू० अ० १।।। पा० १।। सूत्र० २।।
ज्याच्या योगाने या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय होतात तेच ब्रह्म जाणण्यास योग्य आहे. (प्रश्न) हे जग परमेश्वरापासून उत्पन्न झाले आहे की दुसऱ्यापासून? (उत्तर) निमित्त कारण परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहे परंतु याचे उपादान कारण ती प्रकृती आहे. (प्रश्न) काय प्रकृती परमेश्वराने उत्पन्न नाही केली काय ? (उत्तर) नाही ती अगदी आहे (प्रश्न) अनादी कोणास म्हणतात आणि किती पदार्थ अगदी आहेत? (उत्तर) ईश्वर, जीव आणि जगाचे कारण या तीन गोष्टी अगदी आहेत. (प्रश्न) या विधानाला काय प्रमाण आहे?
(उत्तर) द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परि षस्वजाते । तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभि चाकशीति।।१।।-ऋ०मं० १। सू० १६४। मं० २०।।
(ख) ब्रह्म आणि जीव हे दोघे (सुपर्णा) चैतन्य व पालनशक्ती आदी गुणांनी सारखे (सयुजा) व्याप्य-व्यापक भावाने संयुक्त. (सखाया) ते एकमेकांचे मित्रतायुक्त, सनातन अगदी आहेत आणि (समान) या दोघांप्रमाणेच वृक्षम्) अगदी मूलरूप कारण व शाखारूप कार्य यांनी युक्त वृक्ष म्हणजे तो स्थूल होऊन प्रलयामध्ये छिन्नभिन्न होऊन जातो. तो तिसरा अगदी पदार्थ आहे. या तिघांचे गुण, कर्म व स्वभावसुद्धा अनादी आहेत. (तयोरन्यः) या जीव व ब्रह्म यापैकी जो जीव आहे तो या वृक्षरूपी विश्वातील पापपुण्याच्या फळांचा (स्वादु अति) उत्तम भोक्ता आहे मात्र दुसरा परमात्मा आहे (अनश्नन्) कर्मफळांना भोगत नसून चारी बाजूनी म्हणजे आत व बाहेर सर्वत्र प्रकाशमान होत आहे. जीवाहून ईश्वर व ईश्चराहून जीव आणि त्या दोघांहून प्रकृती भिन्न स्वरूप आहे. हे तीन्ही पदार्थ अनादी आहेत.॥१॥
शाश्वतीभ्यः समाभ्यः ।।२।। -यजुः० अ० ४०। मं० ८।।
(शाश्वती) अनादी सनातन जीवरूप प्रजेकरिता वेदांद्वारे परमेश्वराने सर्व विद्यांचा उपदेश केला आहे॥२॥
अजामेकां लोहितशुक्लकृष्णां बह्वीः प्रजाः सृजमानां सरूपाः। अजो ह्येको जुषमाणोऽनुशेते जहात्येनां भुक्तभोगामजोऽन्यः।। श्वेताश्वेतर उ०अ० ४।। मं० ५।।
हे उपनिषदातील वचन आहेप्रकृती, जीव व परमेश्वर हे तिघेही अज म्हणजे ज्यांचा जन्म कधी होत नाही आणि हे कधी जन्म घेत नाहीत. अर्थात हे तीनही सान्या जगाचे कारण आहेत. यांचे कारण कोणी नाही. या अनादी प्रकृतीचा उपभोग अनादी जीव घेताना त्यात गुरफटतो. परंतु परमेश्वर तिच्यात गुरफटत नाही आणि तिचा उपभोग करीत नाही ईश्वर व जीव यांची लक्षणे पूर्वी ईश्वराविषयात सांगितली आहेत. आता प्रकृतीचे लक्षण लिहित आहे.
सत्त्वरजस्तमसां साम्यावस्था प्रकृतिः प्रकृतेर्महान् महतोऽहंकारोऽहंकारात् पञ्चतन्मात्रण्युभयमिन्द्रियं पञ्चतन्मात्रेभ्यः स्थूलभूतानि पुरुष इति पञ्चविशतिर्गणः।। -सांख्यसूत्र।। ।अ० १।।सू० ६१।।
(सत्व) शुद्ध आहे (जः) मध्य व (तमः) जडता या तीन बस्तू मिळून जो एक संघात (समूह) आहे त्याचे नाव प्रकृती आहे. त्यापासून महत्तत्व बुदी, तिच्यापासून अहंकार, त्यापासून पाच तन्मात्रा ही सूक्ष्म भूते आणि दहा इंद्रिये व अकरावे मन, पंचतन्मात्रांपासून पृथ्वी आदी पाच भूते हे चोवीस पदार्थ आणि पंचविसावा पुरुष म्हणजे जीव व परमेश्वर आहे. यांपैकी प्रकृति अविकारी आणि महत्तत्व, अहंकार व पंच सूक्ष्म भूते हे सर्व मूळ अविकृत प्रकृतीचे कार्य आणि इंद्रिये, मन आणि स्थूल भूत यांचे कारण आहेपुरुष हा कोणाची प्रकृती उपादान कारणही नाही अथवा कशाचे कार्यही नाही.
(प्रश्न) सदेव सोम्येदमग्र आसीत्।।१।। छान्दोग्य० प्रपा० ६।। खं० २।। व०१।। असद्वा इदमग्र आसीत्।।२।। तै० उप० ब्रह्मा० अनु० ७।। आत्मा वा इदमग्र आसीत्।।३।। बृहदा० प्रपा० ११।।ब्रा० ४।। मं० १।। ब्रह्म वा इदमग्र आसीत्।।४।। शतपथ० प्रपा० ११ ।।ब्रा० १।। के० १।।व०१।।
ही उपनिषदांतील वचने आहेत. हे वेतकेतो! हे जग सृष्टीच्या पूर्वी सत्।१। असत् ।२। आत्मा।३। आणि ब्रह्मरूप होते।।४। नंतर
तदैक्षत बहुः स्यां प्रजायेयेति।।१।। तै० उप० ब्रह्मा० व० ६।। १ ।। सोऽकामयत बहुः स्यां प्रजायेयेति।।२।। तै० उप० ब्रह्मा० व० ६।। २ ।। हे तैत्तिरीय उपनिषदातील वचन आहे तोच परमेश्वर आपल्या इच्छेने बहरूप बनला आहे॥१।२॥
सर्वं खल्विदं ब्रह्म नेह नानास्ति किञ्चन।।
हे ही उपनिषदातील वचन आहे. जे हे सारे जग आहे ते सर्व निश्चितपणे ब्रह्म आहे. त्यात दुसरे नाना प्रकारचे पदार्थ मुळीच नाहीत. तरी ते सारे ब्रह्मरूप आहे.
(उत्तर) या वचनाचा असा अनर्थ तुम्ही का करता? कारण त्याच उपनिषदांमध्ये-(एवमेव खलु) अन्नेन सोम्य शुंगेनापो मूलमन्विच्छ अद्भिस्सोम्य शुंगेन तेजोमूलमन्विच्छ तेजसा सोम्य शुंगेन सन्मूलमन्विच्छ सन्मूलाः सोम्येमाः प्रजाः सदायतनाः सत्प्रतिष्ठाः।। -छान्दोग्य उपनि०।।प्रपा० ६।। खं० ८।। व० ४।।
हे श्वेतकेतो! तू अन्नरूपी पृथ्वी या कार्यावरून जलरूपी मूळ कारण जाण, कार्यरूपी जलावरून तेजोरूपी मूळ जाण आणि तेजोरूपी कार्यावरून सत्रूप कारण जी नित्य प्रकृती आहे तिला तू जाण. हीच सत्यस्वरूप प्रकृती साऱ्या जगाचे मूळ घर आणि त्याच्या स्थितीचे स्थान आहे. हे सारे जग सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी असत् सदृश आणि जीवात्मा, ब्रह्म व प्रकृती यांतलीन होऊन विद्यमान होते. त्याचा अभाव नव्हता आणि ते ' सर्व खल्विदं' हे वचन वडाची साल पिंपळाला लावण्यासारख्या खेळाप्रमाणे आहे. कारण,
सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जलानिति शान्त उपासीत। -छान्दोग्य।। प्रपा० ३।। खं० १४।। व० १।। आणि नेह नानास्ति किञ्चन।। -कठो० अ० २।। वल्ली० ४।। श्लो० ११।।
हे कठवल्लीचे वचन आहे ज्याप्रमाणे शरीराचे अवयव जोपर्यत शरीराबरोबर असतात तोपर्यंतच ते कामाचे असतात पण शरीराहून वेगळे झाले की निरुपयोगी होतात त्याप्रमाणेच एखाद्या प्रकरणातील वाक्ये घेतली तरच ती सार्थक आणि ती प्रकरणाच्या संदर्भापासून वेगळी काढली किंवा दुसऱ्याच प्रकरणाशी जोडली तर ती रर्थक बनतात, ऐका, या वचनांचा अर्थ असा आहे: हे जीवा! तूत्या ब्रह्माची उपासना कर. ज्या ब्रह्मापासून जगाची उत्पत्तिस्थिती व जीवन होतात. ज्याच्या बनविण्याने व धारण केल्याने हे सारे जग अस्तित्वात आले आहे किंवा जे ब्रह्मापासून सहचरित आहे त्याला सोडून दुसऱ्या कोणाचीही उपासना तू करू नकोस. या चेतनमत्र अखंड एकरस ब्रह्मस्वरूपामध्ये नाना वस्तूंचे मिश्रण झालेले नाही परंतु हे सारे वेगवेगळ्या स्वरूपात परमेश्वराच्या आधाराने टिकून आहे.
(प्रश्न) जगाची कारणे किती होतात? (उत्तर) जगाच तीन कारणे आहेत. १) निमित्त कारण, २) उपादान कारण ब ३) साधारण कारण ज्याच्या बनविण्याने काही बनते, बनविले नाही तर काहीच बनत नाही, जे स्वत: बनत नाही पण प्रकारांतराने दुसऱ्याला बनविते त्याला निमित्त कारण असे म्हणतात. ज्याच्यावाचून काही बसत नाही व जे अवस्थांतररूप होऊन बनते व बिघडतेही, त्याला उपादान कारण म्हणतात. पदार्थ बनविण्याचे जे साधन व साधारण निमित्त असते त्याला साधारण कारण असे म्हणतात.
निमित्त कारण दोन प्रकारचे असते. १) सर्व सृष्टीला कारणाद्वारे बनविणारे, धारण करणारे व लय करणारे
आणि सवांची व्यवस्था ठेवणारे असे मुख्य निमित्त कारण परमेश्वर आहे. २) परमेश्वराच्या सृष्टीतील पदार्थ घेऊन अनेकविध कार्य कार्यातर बनविणारा साधारण निमित्त कारण जीव आहे.
उपादान कारण-प्रकृती परमाणू जिला सर्व सृष्टी रचनेची सामुग्री म्हणतात ती जड (अचेतन) असल्यामुळे स्वत: बनू किंवा बिघडू शकत नाही. परंतु दुसयाने बनविल्यास ती बनते आणि बिघडविल्यास बिघडते. कोठे
कोठे जड (अचेतन) पदार्थाच्या निमित्ताने जड (अचंतन) सुद्धा बनत व बिघडतोही. ज्याप्रमाणे परमेश्वराने निर्माण केलेले बीज भूमीत पडले आणि त्याला पाणी मिळाले तर ते वृक्षाचे रूप धारण करते आणि अशी आदी जड (अचेतन) पदार्थांच्या संयोगाने ते बिघडून जाते. पंतु याचे नियमपूर्वक बनणे अथवा बिघडणे हे परमेश्वर व जीव यांच्या हाती असते.
जेव्हा एखादी वस्तू बनविली जाते तेव्हा ती बनविण्याला जी जी साधने जसे ज्ञान, दर्शन, बळ , हात आणि नाना प्रकारची साधने आणि दिशा, काळ व आकाश त्याला साधारण कारण म्हणतात. उदाहरणार्थ; माठ बनविणारा कुंभार हा निमित्त कारण होय. माती हे उपादान कारण आणि काठी, चाक वगैरे गोष्टी हे सामान्य निमित्त कारण होय. तसेच दिशा, काळ, आकाश, प्रकाश, डोळे, हात, ज्ञान, क्रिया आदी साधारण निमित्ते व निमित्त कारणेही असतात. या तीन कारणांवाचून कोणतीही वस्तू बसू शकत नाही आणि बिघडू शकत नाही.
(प्रश्न) आधुनिक वेदांती लोक केवळ परमेश्वरालाच जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण मानतात.
यथोर्णनाभिः सृजते गृह्णते च ।। मुण्डक० १।। खं०१।। मं० ७।।
हे उपनिषदातील वचन आहे. ज्याप्रमाणे कोळी बाहेरून कोणताही पदार्थ न घेता आपल्याच शरीरातून तंतु काढून त्याचे जाळे विणतो व त्यातच राहन खेळतो त्याप्रमाणे ब्रह्मही आपल्यातूनच जगाची निर्मिती करून, स्वत: जगदाकार बनून आपणच त्यात क्रीडा करीत आहे. अशा प्रकारे 'मी बहुरूप म्हणजे जगदाकार व्हावे अशी इच्छा व कामना करीत ते ब्रह्म संकल्पमात्रानेच सर्व जगद्रूप बनले. कारण,
आदावन्ते च यन्नास्ति वर्त्तमानेऽपि तत्तथा ।। गौडपादीय कारिका श्लोक ३१।।
ही मांडूक्य उपनिषदावरील कारिका आहे. जे आरंभी नसते व अंतीही राहत नाही ते वर्तमान काळीही नसते. परंतु सृष्टीच्या प्रारंभी जग नव्हते व ब्रह्म होते. प्रलयाच्या अंती जण राहणार नाही. तेव्हा वर्तमानकाळी
सर्व जग हेच ब्रह्म आहेअसे का नाही? (उत्तर) तुमच्या म्हणण्या प्रमाणे ब्रह्म हे जगाचे उपादान कारण असेल तर ते ब्रह्म परिणामीव अवस्थांतर युक्त विकारी होईल आणि उपादान कारणाचे गुण, कर्म, स्वभाव कार्यामध्येसुद्धा येतात(म्हणून ब्रह्माचे गुण जगामध्ये आले पाहिजेत.)
कारणगुणपूर्वकः कार्य्यगुणो दृष्टः।। -वैशेषिक सूत्र अ० २।। आ० १।। सू० २४।।
उपादान कारणाचे सदृश गुण कार्यामध्ये येत असतात. तर ब्रह्म हे सच्चिदानंदस्वरूप आहे. परंतु जग हे कार्यरूपामुळे असत्, जड (अचेतन) व आनन्दरहित आहे. ब्रह्म हे अज (न जन्मलेले) आहे पण जग हे उत्पन्न झालेले आहे. ब्रह्म अदृश्य आहे तर जग दृश्य आहे. ब्रह्म हे अखंड तर जग खंडरूप आहे. जर ब्रह्मापासून पृथ्वी आदी कार्यनिर्माण झाले तर पृथ्वी आदी कार्याचे जडत्वादी (अचेतनत्वादी) गुण ब्रह्मामध्येही असले पाहिजेत. म्हणजे पृथ्वी आदी पदार्थ जसे जड (अवेतन) आहेत तसेच ब्रह्मही जड (अचेतन) होईल आणि परमेश्वर जसा चेतन आहे तसे पृथ्वी आदी कार्य पदार्थही चेतन असले पाहिजेत(परंतु तसे नाही. म्हणून ब्रह्म हे सृष्टीचे उपादान कारण नव्हे, हे सिद्ध होते. ) आणि तुम्ही जो कोळ्याचा दृष्टांत दिला आहे तो तुमच्या मताला साधक नसून बाधक आहे. कारण कोळी जडरूप शरीर तंतूला उपादान आणि जीवात्मा हा निमित्त कारण आहे आणि हाही परमेश्वराच्या अद्भुत रचनेचा प्रभाव आहे. कारण दुसरा कोणताही प्राणी आपल्या शरीरातून कोळ्याप्रमाणे धागा काढू शकत नाही. याचप्रमाणे व्यापक ब्रह्माने आपल्यातील व्याप्य प्रकृती आणि परमाणु कारणांपासून स्थूल जग बनवून, बाह्य भाग स्थूलरूप करून, स्वतः त्यातच व्यापक होऊन, साक्षीभूत, आनंदमय होऊन राहिला आहे. आणि परमेश्वराने जीई क्षण म्हणजे दर्शन, विचार व कामना केली की मी सारे जग निर्माण करून प्रसिद्ध (प्रकट) व्हावे. म्हणजे जेव्हा जग उत्पन्न होते तेव्हाच जीवांचे विचार,ज्ञान, ध्यान, उपदेश, श्रवण यांच्यामध्ये परमेश्वर प्रसिद्ध होतो आणि पुष्कळ स्थूल पदार्थामुळे तो सहवर्तमान (विद्यमान) होतो. जेव्हा प्रलय होतो तेव्हा परमेश्वर व मुक्त जीव यांच्याखेरीज परमेश्वराला जाणणारा कोणी नसतो. आणि जी ही कारिका आहे ती भ्रामक आहे. कारण प्रलयामध्ये जगप्रसिद्ध (प्रकट) नव्हते आणि सृष्टिचा
अंत म्हणजे प्रलयाच्या आरंभापासून जोपर्यंत पुन: दुसरी सृष्टि उत्पन्न होणार नाही तोपर्यंत देखील जणाचे कारण सूक्ष्म होऊन अप्रसिद्ध (अप्रकट) राहते. कारण,
तम आसीत्तमसा गूळमग्रे ।।१।। ऋ० मं० १०।। सू० १२६।। मं० ३।। हा ऋग्वेदाचा मंत्रांश आहे. आसीदिदं तमोभूतं अप्रज्ञातं अलक्षणम् । अप्रतर्क्यं अविज्ञेयं प्रसुप्तं इव सर्वतः मनु०।। अ० १।। श्लो० ५।।
हे सारे जग सृष्टिच्या आधी प्रलयकाळी अंधाराने वेष्टित आच्छादित होते आणि प्रलयाच्या प्रारंभानंतरही तशीच स्थिती होत असते. त्यावेळी ते कुणीही जाणण्यास योग्य नव्हते न तकनि ग्रहण करण्यायोग्य आणि प्रसिद्ध चिह्नांनी युक्त नसल्यामुळे इंद्रियांना आकलन होण्यासारखे नव्हते व नसणार. परंतु वर्तमानकाळी ते आकलन होते आणि प्रसिद्ध चिह्नांनी युक्त असल्याने जाणण्यास योग्य असते व यथावत प्रत्ययास येते शिवाय त्या कारिकाकाराने वर्तमानकाळीही जगाचा अभाव असल्याचे म्हटले आहेते सर्वथैव निराधार आहे. कारण सिद्धान्ती जे प्रमाणांनी जाणतो व प्राप्त करतो ते अन्यथा कधी होऊ शकत नाही.
(प्रश्न) जगाच्या निर्मितीमध्ये परमेश्वराचा काय आहे? (उत्तर) ते न बनविण्यात त्याचा काय हेतू आहे? (प्रश्न) त्याने जग बनविले नसते तर तो आनंदात राहिला असता आणि जीवानां सुख-दु:ख भोगावे लागले नसते. (उत्तर) ही आळशी व दरिद्री लोकांची गोष्ट आहे. पुरुषार्थ माणसाची नाही आणि जीवांना प्रलयामध्ये कसले सुख अथवा दुःख असणार? सृष्टितील सुख व दु:ख यांची तुलना केल्यास सुख अनेक पटींनी जास्त असल्याचे आढळून येईल. अनेक-पवित्रात्मे जीव मुक्तीची साधना करून मोक्षाचा आनंदही प्राप्त करतात. ते प्रलयामध्ये सुषुप्तावस्थेप्रमाणे काहीही न करता पडून राहीले असते. परमेश्वराने जग निर्माण केले नसते तर प्रलयाच्यापूर्वी सृष्टितील जीवांना त्यांनी केलेल्या पापपुण्याच्या कमांची फळे परमेश्वर त्यांना कसा देऊ शकला असता आणि जीवांना ती फळे कशी भोगता आली असती?
तुम्हांला कोणी विचारले की, "डोळे असण्याचे प्रयोजन काय?" तर तुम्ही असेच सांगाल की, "डोळे हे पाहण्यासाठी आहेत. त्याचप्रमाणे परमेश्वरामध्ये जगाची रचना करण्याचे विज्ञान, सामर्थ्य व क्रियाशीलता आहे त्याचे प्रयोजन काय? जगाची उत्पत्ती करण्यांखेरीज दुसरे कोणते प्रयोजन असणार? याखेरीज तुम्हांला दुसरे काहीच प्रयोजन सांगता येणार नाही. परमेश्वराचे न्याय, धारण, दया आदी गुणही तेव्हाच सार्थक होऊ शकतात जेव्हा जगाची उत्पत्ति होते त्याचे अनंत सामर्थ्य जगाची उत्पत्ति, स्थिती, लय व व्यवस्था करण्यानेच सफल होते. जसा डोळ्यांचा स्वाभाविक गुण पाहणे हा आहे, तसाच परमेश्वराचा स्वाभाविक गुण जगाची उत्पत्ती करून सर्व जीवांना असंख्य पदार्थ देऊन परोपकार करणे हा आहे
(प्रश्न) बीज आधी आहे की वृक्ष? (उत्तर) बीज. कारण बीज, हेतू , निदान, निमित्त आणि कारण इत्यादी शब्द एकाच अर्थाचे आहेत. कारणाचे नाव बीज असल्याने ते कार्याच्या आधीच असते (प्रश्न) जर परमेश्वर सर्व शक्तिमान आहे तर तो जीवाला व मुष्टिच्या कारणालाही उत्पन्न करू शकतो. त्याला तसे करता येत नसेल तर तो सर्वशक्तिमान कसा असू शकेल?
(उत्तर) सर्वशक्तिमान या शब्दाचा अर्थ आम्ही पूर्वी सांगितला आहे. जो असंभव गोष्टीही करू शकतो त्याला सर्वशक्तिमान म्हणावयाचे काय? जर तो असंभव गोटीही करू शकत असेल, म्हणजे कारणावाचून कार्य करू शकत असेल तर कारणाशिवाय दुसऱ्या ईश्वराला निर्माण करणे, स्वतः मरणे, जड (अचेतन), दुःखी, अन्यायकारी, अपवित्र आणि कुकर्मी होणे सुद्धा होऊ शकतो की नाही? जो स्वाभाविक नियम म्हणजे जसा अग्नी उष्ण, जल शितल आणि पृथ्वी आणि आदी सर्व जड पदार्थाना त्यांच्या विरुद्ध गुणांचे ईश्वरसुद्धा करू शकत नाही. जसा तो स्वत: जड (चैतन्यरहित) होऊ शकत नाही तसे तो जडाला चेतनही करू शकत नाही. तसेच ईश्वराचे नियम सत्य आणि पूर्ण आहेत. म्हणून तो त्या नियमांमध्ये बदल करू शकत नाही म्हणून सर्वशक्तिमान या शब्दाचा अर्थ एवढाच आहे की परमेश्वर दुसऱ्या कोणाच्याही मदतीशिवाय आपली सर्व कामे पूर्ण करू शकतो. (प्रश्न) ईश्वर साकार आहे की निराकार ? तो जर निराकार आहे तर हात, पाय इत्यादी साधनांशिवाय तो जग निर्माण करू शकणार नाही आणि जर तो साकार आहे तर काही दोष येत नाही. (उत्तर) ईश्वर निराकार आहे. जो साकार म्हणजे शरीयुक्त आहे तो ईश्वरच नव्हे. कारण तसे असेल तर तो मर्यादित शक्ती असलेला, देश व काळ वस्तूंनी बांधलेला, सुधा-तृष्णा, छेदन, भंदन, शीत-उष्ण, ज्वरपीडा यांनी युक्त असलेला होईल. हे सारे जीवाचे गुण आहेतते ईश्वरामध्ये कधीही असू शकत नाहीत. जसे तुम्ही आम्ही साकार म्हणजे शरीरधारी आहोत; म्हणून त्रसरेणु, अणु, परमाणू आणि प्रकृती यांना आपल्या आधीनस्थ ठेवू शकत नाही आणि त्या सूक्ष्म पदार्थांना पकडून स्थूल बनवू शकत नाही. याचप्रमाणे देखील स्थूल देहधारी परमेश्वरसुद्धा त्या सूक्ष्म पदार्थापासून स्थूल जग निर्माण करू शकला नसता.
परमेश्वर भौतिक इंद्रियगोलक आणि हात, पाय इत्यादी अवयवरहित आहे. परंतु त्याची शक्ती, बळ व पराक्रमहीं अनंत आहेत. त्यांनी तो सारी कामे करतो. ही कामे जीव आणि प्रकृती यांच्याकडून कधीच होऊ शकत नाहीत. तो प्रकृतीहूनही सूक्ष्म असून तिच्यामध्ये व्यापक आहे. म्हणूनच तो त्यांना पकडून जगदाकार करून टाकतो; आणि तो सर्वगत असल्याने सर्वांचे धारण व प्रलयही करू शकतो.
(प्रश्न) मनुष्यादिकांचे आईबाप साकार आहेत म्हणून त्यांची संततीही साकार होते. ते निराकार असते तर त्यांची मुलेबाळेही निराकार झाली असती. याचप्रमाणे परमेश्वर निराकार असेल तर त्याने बनविलेले हे जगदेखील निराकार असले पाहिजे (उत्तर) हा तुमचा प्रश्न पोरकटपणाचा आहे. कारण आम्ही नुकतेच सांगितले आहे की परमेश्वर हे जगाचे उपादान कारण नसून निमित्त कारण आहे. प्रकृती व परमाणू हे स्थूल असून ते जगाचे उपादान कारण आहेत. ते पूर्णपणे निराकार माहीत परंतु ते परमेश्वराहून स्थूल आणि इतर जड (अचेतन) कार्यापेिक्षा सूक्ष्म आकार ठेवतात म्हणून साकारापासून साकार बनले, असे समजावे. (प्रश्न) परमेश्वर कारणावाचून कार्य निर्मिती करू शकत नाही काय? (उत्तर) नाही. कारण ज्याचा अभाव म्हणजे जे विद्यमान नाही त्याचा भाव व त्याचे अस्तित्व असणे सर्वथा असंभव आहे. एखाद्या थापाडयाने असे सांगितले की, मी वंध्या स्त्रीचा मुलगा व मुलगी यांचा विवाह पाहिला. त्यांनी माणसाच्या शिंगाचे धनुष्य घेतले होते व आकाशपुष्पांच्या माळा घातल्या होत्या. ते मृगजळात स्नान करीत होते आणि गंधर्वनगरीत राहत होते. तेथे ढगांशिवाय पाऊस पडत होता आणि जमीन नसताना सर्व धान्यांचे उत्पादन होत होते.तर या सान्या गोष्टी अशक्य आहेत. त्याचप्रमाणे कारणावाचून कार्य होणे ही असंभव आहे.
कोणी असे म्हटले की, 'मम मातापितरौ न स्तोऽहमेवमेव जातः । मम मुखे जिह्वा नास्ति वदामि च।' म्हणजे मला आई बाप नव्हते; त्यांच्या शिवाय मी जन्मलो.माझ्या तोंडात जीभ नाही; तरीही मी बोलतो. बिळात साप नव्हता पण तो त्यातून बाहेर आला. मी कोठेही नव्हतो व हेही कोठेही नव्हते. तरीही आम्ही सगळे जण येथे आलो आहोत. अशा असंभव गोष्टी बोलणे म्हणजे उन्मत्त वेड्या लोकांचे बरळणेच होय.
(प्रश्न) कारणाशिवाय कार्य होत नाही तर मग कारणाचे कारण कोणते ? (उत्तर) जे केवळ कारणरूप आहे ते कोणाचेही कार्य होत नाही आणि जे कुणाचे कारण आणि कुणाचे कार्य असते ते दुसरे कारण म्हटले जाते. उदाहरणार्थ पृथ्वी (माती) हे घर वगैरेचे कारण आहे. पण तिच पाणी वगैरेच कार्य होते. मात्र जीआदिकारण प्रकृती आहे ती अगदी आहे.
मूले मूलाभावादमूलं मूलम्।। -सांख्य सू०।।अ० १।।सू० ६७।।
मुळाचे मूळ म्हणजे कारणाचे कारण नसते. म्हणून अकारण हेच सर्व कार्याचे कारण असते. कारण कोणत्याही कार्याचा आरंभ होण्यापूर्वी तीन्ही कारणांची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे कापड बनविण्यापूर्वी विणकर रुईपासून सूत व माग वगैरे आधीच विद्यमान असतील तरच वस्त्र बनेल, त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी परमेश्वर, प्रकृती, काल व आकाश आणि जीवांचे अनादित्व या गोष्टी असल्या तरच जगाची उत्पत्ती होते. यांपैकी एकही गोष्ट नसेल तर जगसुद्धा होणार नाही.
अत्र नास्तिका आहु- शून्यं तत्त्वं भावोऽपि नश्यति वस्तुधर्मत्वाद्विनाशस्य।।१।। -सांख्य सू०।।अ० १।।सू० ४४।।
(प्रश्न) येथे नास्तिक लोक असे म्हणतात की, 'शून्य हाच एक पदार्थ आहे. सूर्याच्या पूर्वी शून्य होते आणि अखेरीस शून्यच राहिल. कारण जो भाव म्हणजे वर्तमान पदार्थ आहे त्याचा अभाव होऊन शून्यच होईल. (उत्तर) आकाश, अदृश्य, अवकाश व बिंदू यांनाही शून्यअसे म्हणतात. शून्य हा जड (अचेतन) पदार्थ आहे. या शून्यामध्ये सर्व पदार्थ अदृश्य असतात. ज्याप्रमाणे एका बिंदूपासून रेखा बनते, रेखांमुळे वर्तुळादी आकार बनतात. त्यातून ईश्वराद्वारे भूमी, पर्वत आदी ईश्वरीय रचना बनतात. शून्याला जाणणारा शून्य होत नाही. ॥१ ॥
अभावात् भावोत्पत्तिर्नानुपमृद्य प्रादुर्भावात्।।२।। -न्यायसू०। अ० ४। आह्नि० १।।सू० ९४ ।।
(प्रश्न) दुसरा नास्तिक म्हणतो, 'अभावातून भावाची उत्पत्ति होते. बीजाचे मर्दन केल्याशिवाय अंकुर फुटत नाही. परंतु बीज फडून पाहिले तर त्यात अंकुराचा अभाव दिसतो. म्हणजे प्रथम अंकुर दिसत नव्हता तो अभावातून उत्पन्न झाला. (उत्तर) अंकुर फुटण्यापूर्वी जो बीजाचे उपमर्दन करतो तो आधीपासूनच बीजामध्ये होता. तो नसता तर अंकुर कधीच उत्पन्न झाला नसता. ॥२॥
ईश्वरः कारणं पुरुषकर्माफल्यदर्शनात्।।३।। -न्यायसू०। अ० ५। आह्नि० १।।सू० २१ ।।
(प्रश्न) तिसरा नास्तिक म्हणतो, कमांचे फळ पुरुषाने कर्म केल्याने प्राप्त होत नाही. कित्येक कर्में निष्फळ झालेली आढळतात. यावरून असे अनुमान केले जाते की, कमांचे फळ मिळणे हे ईश्वराच्या हाती आहे. ईश्वर ज्या कर्माचे फळ देऊ इच्छित असेल त्याचे फळ देतो. ज्या कर्माचे फळ तो देऊ इच्छित नाही त्याचे फळ तो देत नाही. यावरून कर्मफळ हे ईश्वराधीन आहे. (उत्तर) कर्माचे फळ देणे हे ईश्वराधीन असेल तर तो कर्माशिवाय फळ का देत नाही? म्हणून मनुष्य जसे कर्म करतो तसेच फळ ईश्वर त्याला देतो, यावरून ईश्वर आपल्या लहरीप्रमाणे कर्माचे फळ देऊ शकत नाही परंतु जीव जसे कर्म करतो तसेच फळ ईश्वर त्याला देतो. ॥३॥
अनिमित्ततो भावोत्पत्तिः कण्टकतैक्ष्ण्यादिदर्शनात्।।४।। -न्यायसू०। अ० ४। आह्नि० १।।सू० २२ ।।
(प्रश्न) चौथा नास्तिक म्हणतो, 'निमित्ताबाचून पदार्थाची उत्पत्ती होते. बाभळीसारख्या झाडांना अणकुचीदार काटे असलेले दिसतात. यावरून असे जाणले जाते की जेव्हा जेव्हा सुष्टिचा आरंभ होतो तेव्हा तेव्हा शरीरादी पदार्थ निमित्तावाचून उत्पन्न होतात. (उत्तर) ज्यापासून जो पदार्थ उत्पन्न होतो तेच त्याचे निमित्त असते. काटेरी झाडांखेरीज इतरांना काटे का फुटत नाहीत ? ॥४॥
सर्वमनित्यमुत्पत्तिविनाशधर्मकत्वात्।।५।। -न्यायसू०। अ० ४। आह्नि० १।।सू० २५ ।।
(प्रश्न) पाचवा नास्तिक म्हणतो, सर्व पदार्थ उत्पत्ति व विनाशी आहेत म्हणून ते सर्व अनित्य आहेत.
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रन्थकोटिभिः। ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः।।
हा कोणत्यातरी ग्रंथातील श्लोक आहे. आधुनिक वेदांती लोक हे या पाचव्या नास्तिकाच्या कोटीतील आहेत. कारण ते असे म्हणतात की, 'कोट्यवधी ग्रंथांचा हा सिद्धांत आहे की, ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मापासून भिन्न नाही. (उत्तर) जर सर्वांची नित्यता नित्य आहे तर सर्व अनित्य होऊ शकत नाही. (प्रश्न) सवांचीनित्यताही अनित्यच आहे. उदाहरणार्थ, अग्नी काष्ठांना जाळून टाकतो वस्वतःही नष्ट होऊन जातो. (उत्तर) यथावत उपलब्ध होते त्याचे विद्यमानतेत अनित्यत्व आणि परमसूक्ष्म कारणालाही अनित्य म्हणणे कधीच होऊ शकत नाही. वेदांती लोक ब्रह्मापासून जगाची उत्पत्ती झाली असे मानतात, आणि ब्रह्म हे सत्य असल्याने त्याचे जगदुत्पत्तीचे कार्य कधीही असत्य होऊ शकत नाही. जे स्वप्न किंवा दोरीमध्ये होणाऱ्या सर्पाच्या भासाप्रमाणे काल्पनिकही म्हटले तरी देखील कारण कल्पना हा गुण आहे. गुणापासून द्रव्य व द्र्व्यापासून गुण हे वेगळे राहू शकत नाहीत. जर कल्पनेचा कर्ता नित्य असेल तर त्याची कल्पनाही नित्यच असली पाहिजे नाहीतर त्याला सुद्धा अनित्य माना.
न पाहिलेल्या व न ऐकलेल्या गोष्टीविषयी कधी स्वप्न पडत नाही. जागृत अवस्थेमध्ये म्हणजे वर्तमान काळात जे सत्य पदार्थ आहेत त्यांच्या साक्षात संबंधाने प्रत्यक्षादी न झाल्यावर संस्कार म्हणजे त्यांचे वासनारूप ज्ञान आल्यामध्ये स्थित होते त्याचेच प्रत्यक्ष दर्शन स्वनामध्ये घडते. ज्याप्रमाणे सुषुप्तीच्या अवस्थेत (गाढ झोपेत) बाह्य पदार्थाच्या ज्ञानाचा अभाव असला तरी बाह्य पदार्थ विद्यमान असतातच, त्याप्रमाणे प्रलयकाळीही कारणद्रव्य विद्यमान असतात. जर संस्काराशिवाय स्वप्न पडत असेल तर जन्मांधालाही रूपाचे स्वन पडले असते. (पण तसे घडत नाही. म्हणून तेथे त्यांचे फक्त ज्ञान असते; आणि बाहेर सर्व पदार्थ विद्यमान असतात.
(प्रश्न) ज्याप्रमाणे जागृतीतील पदार्थस्वामध्ये आणि या दोन्ही स्थितीतील पदार्थ सुषुप्तीमध्ये अनित्य होतात, त्याप्रमाणे जागृतीतील पदार्थानाही स्वप्नवत मानले पाहिजे. (उत्तर) तसे कधी मानू शकत नाही. कारण स्वप्न व सुषुप्ती यांमध्ये बाह्य-पदार्थाचे अज्ञान मात्र असते, अभाव होत नाही. उदाहरणार्थ एखाद्याच्या पाठीमागे असणारे पुष्कळसे पदार्थ अदृष्ट असतात; पण त्यांचा अभाव नसतो. तीच गोष्ट स्वप्न व सुषुप्ती यांच्यासंबंधी समजावी. म्हणून, पूर्वी आम्ही सांगितल्याप्रमाणे ब्रह्म, जीव व जगाचे कारण असलेली प्रकृती हे तीन पदार्थ अगदी व नित्य आहेत, हेच खरे आहे॥५॥
सर्वं नित्यं पञ्चभूतनित्यत्वात्।।६।। -न्यायसू०। अ० ४। आह्नि० १।।सू० २९ ।।
(प्रश्न) सहावा नास्तिक म्हणतो की, 'पंचमहाभूते (पृथ्वी, जल, तेज, वायूव आकाश) नित्य असल्यामुळे जगही नित्य आहे. (उत्तर) ही गोष्ट खरी नाही. कारण ज्या पदार्थांच्या उत्पत्तीचे व विनाशाचे कारण दृष्टीस पडते ते सर्व जर नित्य असतील तर सारे स्थूल जग, शरीर आणि घटपटादी जे पदार्थ उत्पन्न व नष्ट होत असलेले दिसतात त्यांनाही नित्य म्हणावे लागेल. म्हणून कार्याला नित्य मानणे शक्य नाही. ॥६॥
सर्वं पृथग् भावलक्षणपृथक्त्वात्।।७।। -न्यायसू०। अ० ४। आह्नि० १।।सू० ३४ ।।
(प्रश्न) सातवा नास्तिक म्हणतो की, 'सर्व पदार्थ पृथक-पृथक आहेत. कोणताही एक पदार्थ नाही.जो जो पदार्थ आपण पाहतो त्यामध्ये दुसरा कोणताही पदार्थ दिसत नाही. (उत्तर) अवयवांमध्ये अवयवी, वर्तमान काळ, आकाश, परमात्मा व जाती या गोष्टी वेगवेगळ्या पदार्थाच्या समूहांमध्ये एक-एक आहेत. त्यांच्यापासून कोणताच पदार्थ वेगळा होऊ शकत नाही. यामुळे सारे पदार्थ एकमेकांपासून पृथक नाहीत; परंतु स्वरूपत: वेगवेगळे आहेत; आणि या वेगवेगळ्या पदार्थामध्ये एक समान पदार्थ किंवा ऐक्यही आहे॥७॥
सर्वमभावो भावेष्वितरेतराभावसिद्धेः।।८।। -न्यायसू०। अ० ४। आह्नि० १।।सू० ३७ ।।
(प्रश्न) आठवा नास्तिक म्हणतो, ’सर्व पदार्थामध्ये इतरेतर (एकमेकांचा एकमेकांमध्ये) अभाव सिद्ध होत असल्यामुळे सर्वच अभावरूप आहेत. जसे, 'अनश्वो गौः। अगौरश्वः' म्हणजे गाय घोडा गही व घोडा गाय नाही. म्हणून सर्वांना अभावरूप मानले पाहिजे. (उत्तर) सर्वप दार्थामध्ये इतरेतर अभावाचा योग असला तरी गवि गौरवेऽश्वोभावरूपो वर्तत एव' म्हणजे गायीत गायपणा आणि घोडयात घोडेपणाचा भावही आहे. त्याचा कधीच अभाव होऊ शकत नाही. जर पदार्थाचा भोव नसेल तर इतरेतर अभाव तरी कसा म्हटला जाईल ? ॥८॥
न स्वभावसिद्धिरापेक्षिकत्वात् ।।९।।-न्यायसू०। अ० ४। आह्नि० १।।सू० ३१ ।।
(प्रश्न) नववा नास्तिक म्हणतो की, 'स्वभावाने जगाची उत्पत्ति होते. पाणी व अन्न एकत्र येऊन कुजू लागले की त्यात किडे उत्पन्न होतात. तर बीजपृथ्वी (माती) व पाणी यांच्या संयोगाने गवत, झाडे, दगडधोंडे वगैरे उत्पन्न होतात. समुद्रावर वाऱ्यामुळे लाटा उठतात; आणि लाटांमुळे फेस उत्पन्न होतो. हळद, चुना व लिंबाचा रस यांच्या मिश्रणाने कुंकू तयार होते. त्याचप्रमाणे सर्व जगततत्त्वांच्या स्वभावगुणांमुळेच उत्पन्न झाले आहे. त्याला बनविणारा कोणीही नाही. (उत्तर) जर स्वभावामुळे जगाची उत्पत्ति होत असेल तर त्याचा विनाश कधीच होणार नाही, आणि विनाशही स्वभावानेच मानला तर उत्पत्ति होणार नाही आणि जर उत्पत्ति व विनाश हे दोन्ही स्वभाव सर्व द्रव्यात एकाच वेळी मानाल तर उत्पत्ति व विनाश यांची व्यवस्था कधीही होणार नाही. जर निमित्ताने उत्पत्ति बनाश मानाल तर हे निमित्त उत्पत्ति व विनाश होणार्या द्रव्यांहून वेगळे मानावे लागेल. स्वभावानेच उत्पत्ति व विनाश होत असते तर एकाच वेळी उत्पत्ति व विनाश होणे कसे संभव नाही? जर स्वभावामुळेच सर्व उत्पन्न का होत असते तर या भूगोलाजवळ दुसरा भूगोल, चंद्र, सूर्य इत्यादी का उत्पन्न होत नाहीत ?
ज्याच्या ज्याच्या संयोगाने जे-जे उत्पन्न होते ते-ते ईश्वराने उत्पन्न केलेले बीज, अन्न, जलादी, पृथ्वी इत्यादींच्या संयोगाने गवत, झाडे, किडे वगैरे उत्पन्न होतात. त्यांच्याशिवाय ही निर्मिती होऊ शकत नाही. हळद, चुना व लिंबाचा रस निरनिराळ्या ठिकाणांहून येऊन आपोआप एकत्र मिसळत नाही. कोणालातरी त्यांचे मिश्रण करावे लागते. ते ही योग्य प्रमाणात मिसळले तरच कुंकू तयार होते. त्यांचे प्रमाण कमी जास्त झाल्यास कुंकू तयार होत नाही. त्याचप्रमाणे प्रकृती व परमाणू यांना ज्ञान व युक्तीने परमेश्वराने त्यांचे मिश्रण केल्याशिवाय जड (अचेतन) पदार्थस्वतः कोणत्याही कार्यसिद्धीसाठी विशेष पदार्थ बनवू शकत नाहीत. म्हणून स्वभावादिकांनी सृष्टि होत नाही परमेश्वराच्या रचनेने ती निर्माण होते. ॥९॥
(प्रश्न) या जगाचा कोणी कत नव्हता, नाही व नसणार. परंतु अनादी काळापासून ते तर जसेच्या तसे राहिले आहे. त्याची कधी उत्पत्ति झाली नाही आणि त्याचा कधी बिनाश होणार नाही. (उत्तर) कर्त्यावाचून कोणतीही क्रिया अथवा क्रियाजन्य पदार्थ बनू शकत नाही. पृथ्वी आदी ज्या पदार्थामध्ये संयोगाने विशेष रचना झालेली दिसते ते पदार्थ अगदी कधी होऊ शकत नाहीत; आणि जे संयोगाने बनते ते संयोगाच्या आधी नसते आणि वियोगानंतर राहत नाही. जर तुम्ही हे मानले नाही तर (प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहा.) अत्यंत कठिण पाषाण, हिरा आणि पोलाद यांना तोडून बारीक तुकडे करा, ते वितळवा किंवा त्यांचे भस्म करा. तुम्हाला असे आढळून येईल की या पदार्थात वेगवेगळे बारीक परमाणू एकत्र होऊन ते बगले आहेत.ते जर एकत्र झाले आहेत तर प्रसंग पडल्यास ते वेगवेगळेही अवश्य होतात. ॥१०॥
(प्रश्न) अनादी ईश्वर कोणी नाही. परंतु योगाभ्यासाने अणिमादि ऐश्वर्य प्राप्त करून सर्वज्ञत्वादी गुणांनी युक्त केवल ज्ञानी बनतो त्या जीवालाच परमेश्वर असे म्हणतात.
(उत्तर) जर अनादी ईश्वर जगाचा स्रष्टा (निर्माता) नसेल तर साधनांनी सिद्ध होणाऱ्या जीवांचा आधार जीवनरूप जग, शरीर आणि इंद्रियांचे गोलक कसे बनले असते ? त्यांच्यावाचून जीव आपले साधन तयार करू शकत नाही. जर ही साधने नसती तर तो कसा सिद्ध झाला असता?
जीव हवे ते साधन तयार करून सिद्ध झाला तरी ईश्वराची जी स्वयं सनातन अनादी सिद्धी आहे, तिच्यामध्ये अनंत सिद्धंचा समावेश आहे. तिची बरोबरी कोणताही जीव करू शकत नाही. कारण जीवाचे ज्ञान परमावधीपर्यंत वाढले तरी त्याचे ज्ञान व सामर्थ्य मर्यादितच राहते. तो अनंत ज्ञान व सामर्थ्य असणारा कधीच होऊ शकत नाही. पाहा! आजपर्यंत ईश्वरकृत सृष्टिक्रम बदलणारा कोणीही झालेला नाही व होणार नाही. अगदी सिद्ध परमेश्वराने डोळ्याने पाहण्याचा व कानांनी ऐकण्याचा जो नियम बनविला आहे तो कोणताही योगी बदलू शकत नाही. जीव हा कधीही ईश्वर होऊ शकत नाही.
(प्रश्न) कल्पकल्पांतरी ईश्वर विलक्षण विलक्षण सृष्टि बनवितो की एकसारखी? (उत्तर) सृष्टि जशी आज आहे तशीच ती पूर्वीच्या कल्पांत होती व पुढील कल्पांतही ती तशीच राहील, तो तिच्यात फरक करीत नाही.
सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् । दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो स्वः ।।-ऋ० मं० १०। सू० १९०। मं० ३।।
(धाता) परमेश्वराने जसे पूर्वीच्या कल्पांत सूर्य, चंद्र, विद्युत, पृथ्वी, अंतरिक्ष इत्यादी बनविले होते तसेच आताही बनविले आहेत आणि पुढेही तसेच बनवील.॥१॥ परमेश्वराची कामे त्रुटिरहित असल्यामुळे नेहमी एकसारखीच होत असतात. तो अल्पज्ञ असतो आणि ज्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी व क्षय होत असतात त्याच्याच कामात चुकभूल होते. ईश्वराच्या कामात कधी चूक होत नाही. (प्रश्न) सृष्टिच्या विषयासंबंधी वेदादी शास्त्रांचा परस्पर विरोध आहे की अविरोध? (उत्तर) अविरोध आहे (प्रश्न) जर अविरोध आहे तर .
तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः। आकाशाद्वायुः। वायोरग्निः। अग्नेरापः। अद्भ्यः पृथिवी। पृथिव्या ओषधयः। ओषधिभ्योऽन्नम्। अन्नाद्रेतः। रेतसः पुरुषः। स वा एष पुरुषोऽन्नरसमयः।। तै० उप० ब्रह्मा० अनु० १।।
हे तैत्तिरीय उपनिषदातील वचन आहे, परमेश्वरव प्रकृती यांच्यापासून आकाश किंवा अवकाश हे निर्माण झाले. अर्थात जे कारणरूप द्रव्य सर्वत्र पसरलेले होते ते एकत्र केले असता अवकाश उत्पन्न होतो. वस्तुतः आकाशाची उत्पत्ती होत नसते. कारण आकाशाशिवाय प्रकृती व परमाणू कोठे राहणार? आकाशानंतर वायु, वायुनंतर अग्नी, अग्नीनंतर पाणी, पाण्यानंतर पृथ्वी, पृथ्वीपासून ओषधी, औषधीपासून अन्न, अन्नापासून वीर्य, वीर्यापासून पुरुष म्हणजे शरीर उत्पन्न होते. याठिकाणी आकाशादी क्रमाने आणि छांदोग्यामध्ये अग्नी आदी क्रमाने, तर ऐतरेयामध्ये जलादी क्रमाने सृष्टिची उत्पत्ति झाल्याचे सांगितले आहे. वेदांमध्ये कोठे पुरुषापासून, कोठे हिरण्यगर्भादींपासून, मीमांसेमध्ये कर्मापासून, वैशेषिकामध्ये काळापासून, न्यायामध्ये परमाणूंपासून, योगामध्ये पुरुषार्थापासून, सांख्यामध्ये प्रकृतीपासून आणि वेदांतामध्ये ब्रह्मापासून सृष्टिची उत्पत्ति झाली, असे मानले आहे. आता यांपैकी कोणाला खरे व कोणाला खोटे मानावे ?
(उत्तर) यामध्ये सर्वच खरे आहेत. कोणी खोटा नाही.जो यात विरोध विपरीत समजतो तोच खोटा आहे. कारण परमेश्वर हा जगाचे निमित्त कारण असून प्रकृती ही जगाची उपादान कारण आहे. जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा ती सृष्टि आकाशादी क्रमाने म्हणजे जेव्हा आकाश व वायू यांचा प्रलय होत नाही व अन्यादिकांचा होतो तेव्हा अमी आदी क्रमाने आणि विद्युत व अग्नी यांचाही नाश होत नाही तेव्हा जलाच्या क्रमाने सृष्टिची उत्पत्ति होते. अर्थात, ज्या-ज्या प्रलयामध्ये जेथपर्यंत प्रलय होतो तेथून पुढे सृष्टिची उत्पत्ति होते.
आता पुरुष आणि हिरण्यगर्भ इत्यादिकांपासून सृष्टी झाली असे आम्ही प्रथम समुल्लासात सांगितले आहे. त्यात काहीच विसंगती नाही. कारण ती सारी परमेश्वराचीच नावे आहेत. (सहा शाखांमध्ये विरोध आहे असे तुम्ही म्हणता ते बरोबर नाही.) कारण एकाच कार्यात एकाच विषयासंबंधी परस्परविरोधी विधाने असतील तर त्याला विरोध असे म्हणतात. सहा शास्त्रांमध्ये अविरोध या प्रकारे आहे पहा: मीमांसेमध्ये असे सांगितले आहे की, 'कर्म, चेष्टा केल्याशिवाय जगात कोणतेही कार्य होत नाही.' वैशेषिक सांगतो, 'वेळ खर्च केल्यावाचून काही घडतच नाही. न्याय म्हणतो, "उपादान कारण नसेल तर काहीही होऊ शकत नाही. योग सांगतो, विद्या, ज्ञान व विचार न केल्यास काहीच घडू शकत नाही.’ सांख्य सांगतो की, 'तत्त्वांचा मेळ झाला नाही तर काही बनू शकत नाही,आणि वेदांतात असे सांगितले आहे की, 'बनविणाऱ्याने बनविला नाही तर कोणताही पदार्थ बनू शकत नाही.’ अशा प्रकारे या सहा कारणांनी सृष्टि बनते. त्यांच्यापैकी एकेका कारणाची व्याख्या एकेका शास्त्रात केली आहे. त्यामुळे त्यांच्यात विरोध मुळीच नाही. सहा पुरुषांनी मिळून एक छप्पर उचलून भिंतीवर ठेवावे त्याप्रमाणे सृष्टिरूपं कार्याची व्याख्या सहा शास्त्रकारांनी मिळून पूर्ण केली आहे. पाच आंधळे आणि एक मंददृष्टीवाला यांना कोणीतरी हत्तीचा एकेक भाग दाखविला आणि त्यांना विचारले की हत्ती कसा आहे. तेव्हा त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, 'खांबासारखा दुसरा म्हणाला, 'सुपासारखा', तिसरा म्हणाला, 'मुसळासारखा’ चौथा म्हणाला, 'केरसुणी सारखा' पाचव्याने सांगितले, 'चबुतऱ्यासारखा' आणि सहावा म्हणाला,तो काळा-काळाचार खांबावर काहीसा, रेडयाच्या आकाराचा आहे. या आंधळ्यांसारखी आजकाल स्थिती आहे. ते नवीन अनार्ष ग्रंथ वाचतात, प्राकृत भाषेमध्ये शिक्षण घेणारे हे लोक ऋषिप्रणीत ग्रंथांचे अध्ययन करीत नाहीत, नवीन क्षुद्रबुद्रिकल्पित संस्कृतचे व इतर भाषांचे ग्रंथ वाचून ते एकमेकांची निंदानालस्ती करीत असतात.त्यांनीच हा निराधार वितंडवाद माजविला आहे. त्यांचे म्हणणे बुद्धिमंतांनी किंवा इतरांनी मानण्याच्या योग्यतेचे नाही. कारण आंधळ्यांच्या मागून आंधळे चालत राहिले तर त्यांना दु:ख होणारच. त्याचप्रमाणे आजकालच्या अल्पविद्यायुक्त, स्वार्थी, इंद्रियासक्त पुरुषांची लीला जगाचा नाश करणारी आहे.
(प्रश्न) कारणावाचून कार्य होत नाही तर त्या कारणाचे कारण का नाही? (उत्तर) अरे भोळ्या माणसांनो ! तुम्ही आपल्या बुद्धीचा थोडा वापर का करीत नाही ? पाहा. या विश्वामध्ये दोनच पदार्थ आहेत. एक कारण व दुसरे कार्य. जे कारण असते ते कार्य नसते; आणि ज्यावेळी जे कार्य असते ते त्याच वेळी कारण नसते. जोपर्यंत मनुष्य सृष्टीला यथावत जाणत नाही तोपर्यंत त्याला यथावत् ज्ञान प्राप्त होत नाही.
नित्यायाः सत्त्वरजस्तमसां साम्यावस्थायाः प्रकृतेरुत्पन्नानां परमसूक्ष्माणां पृथक् पृथग्वर्त्तमानानां तत्त्वपरमाणूनां प्रथमः संयोगारम्भः संयोगविशेषाद– वस्थान्तरस्य स्थूलाकारप्राप्तिः सृष्टिरुच्यते।।
अगदी नित्यस्वरूप सत्व, रज, तम या तीन गुणांच्या एकावस्थास्वरूप प्रकृतीपासून उत्पन्न झालेले जे परमसूक्ष्म पृथक-पृथक तत्त्वावयव विद्यमान आहेत, त्यांचा प्रथमच जो संयोगारंभ आहे, त्या संयोगविशेषाच्या
योगाने अवस्थांतर होत-होत दुसन्या अवस्थेत सूक्ष्मातून स्थूलस्थूल बनत-बनवीत ही सृष्टि विचित्र रूप बनली आहे. यापासूनच हा मेळ झाल्यामुळेच तिला सृष्टि असे म्हणतात. जो प्रथम संयोगामध्ये मिसळणारा व मिसळविणारा पदार्थ आहे, जो संयोगाचा आदी आणि वियोगाचा अंत म्हणजे ज्याचे विभाजन होऊ शकत नाही त्याला कारण असे म्हणतात. जे संयोगानंतर बनते आणि वियोगानंतर तसेच राहत नाही त्याला कार्य म्हणतात. त्या कारणाचे कारण, कर्त्याचा कर्ता, साधनाचे साधन व साध्याचे साध्य म्हटल्या जाते हा वितंडवाद जो घालतो तो पाहत असून आंधळा, ऐकत असून बहिरा आणि जाणात असून मूढ आहे, डोळ्याचा डोळ, दिव्याचा दिवा आणि सूर्याचा सूर्य कधी असू शकतो काय? जे ज्याच्यापासून उत्पन्न होते ते कारण आणि जे उत्पन्न होते ते कार्य होय आणि कारणाला कार्यरूप बनविणारा आहे तो कर्ता म्हणविला जातो.
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदिर्शभिः।। भगवद्गीता।। अ० २।। श्लो० १६।।
कधी असताच भाव (जे कारणरूपात नाही ते कार्यरूपात येणे) म्हणजे वर्तमानता आणि सताचा अभाव (जे कार्यरूपात आहे ते कारणरूपात नसणे) म्हणजे अवर्तमानता होत नाही. या दोहोचा निर्णय तत्त्वदर्श लोकांनी जाणला आहे. ही गोष्ट इतर पक्षपाती, आग्रही, मलिनात्मा, अविद्वान लोकांना सहजासहजी कशी कळणार? कारण जो माणूस विद्वान नाही, सत्संग करीत नाही व पूर्ण विचार करीत नाही तो सदैव भ्रमामध्येच अडकलेला राहतो. जे पुरुष सर्व विद्यांचे सिद्धांत जाणतात व जाणण्यासाठी तप करतात आणि इतरांना स्वच्छ मनाने समजावून देतात ते धन्य होत. म्हणून जे कोणी कारणावाचून सृष्टि उत्पन्न झाली असे मानतात त्यांना काहीच कळत नाही.
जेव्हा सृष्टिच्या उत्पत्तिची वेळ येते तेव्हा परमेश्वर त्या परमसूक्ष्म पदार्थाना एकत्र करतो. त्या प्रथम अवस्थेत जे परमसूक्ष्म प्रकृतिरूप कारणाने काहीसे स्थूल बनते त्याचे नाव महत्तत्व आहे. त्यानंतर त्यापेक्षा आणखी थोडे स्थूल होते. त्याचे नाव अहंकार. या अहंकारापासून भिन्न-भिन्न पाच सूक्ष्म भूते, श्रोत्र, त्वचा, नेत्र, जिव्हा, प्राण ही पाच ज्ञानेंद्रिये, वाक्, हस्त, पाद, उपस्थ व गुदा ही पाच कर्मेद्रिये आणि अकरावे मन ही काहीशी स्थूल अशी उत्पन्न होतात. नंतरत्या पंचतन्मात्रांपासून अनेक स्थूल अवस्थांना प्राप्त होत होत क्रमाने पाचस्थूल भूते (पंचमहाभूते) उत्पन्न होतात. ती आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. त्यांच्यापासून नाना प्रकारच्या औषधी, वृक्ष आदी निर्माण होतात. त्यांच्यापासून अन्न, अन्नापासून वीर्य व वीर्यापासून शरीर उत्पन्न होते. परंतु आदी सृष्टि ही मैथुनातून निर्माण झालेली नसते. कारण जेव्हा परमेश्वर स्त्रीपुरुषांची शरीरे उत्पन्न करून त्यांमध्ये जीवांचा संयोग घडवून आणतो तेव्हापासून मैथुनी सृष्टिचालू होते. पाहा ! या शरीरामध्ये कशाप्रकारे ज्ञानपूर्वक सृष्टिर चना केली आहे की, जी पाहून विद्वान लोक आश्चर्यचकित
होतात. शरीरात हाडांचे साधे, गाड्यांची (शिरांची) बांधणी, त्यावर मांसाचे लेपन, चामडीचे झाकण, प्लीहा, यकृत, फुफ्फुसे, पंख्याची कलापूर्ण योजना, रक्ताचे शुद्धीकरण व प्रचालनविद्युत (ऊर्जा) निर्मिती, जीवाचे संयोजन, डोक्यातील मेंदूची अद्भुत रचना, अंगावरील केस व नखे यांची उत्पत्ति, डोळ्यातील अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्यांची तारांसारखी केलेली गुंफण, इंद्रियांच्या मागांचे प्रकाशन, जीवाच्या जागृत, स्वप्न व सुषुप्त या अवस्था आणि त्यांच्या भोगण्यासाठी विशिष्ट स्थानांची निर्मिती, सर्व धातूंचे वर्गीकरण, कला कौशल्याची स्थापना इत्यादी अद्भुत सृष्टिला परमेश्वराखेरीज कोण बनवू शकतो?
याशिवाय नाना प्रकारची रत्ने व धातू यांनी विभूषित भूमी, विविध प्रकारच्या वटवृक्षादिकांच्या बीजमधील अत्यंत सूक्ष्म रचना, असंख्य हरित, श्वेत, पीत, कृष्ण, चित्र मध्यरूप युक्त चित्रविचित्र पाने, पुष्पे, फळे, मुळे यांची निर्मिती; गोड, खारट, तिखट, कडू, आंबट, तुरट वगैरे विविध रस, सुगंधी पाने फुले, फळे, अन्न, कंदमुळे इत्यादींची रचना, अनेकानेक कोट्यवधी भूगोल, सूर्य, चंद्र इत्यादी लोकांचे निर्माण, धारण भ्रमण, त्यांना नियमात ठेवणे या साऱ्या गोष्टी परमेश्वराखेरीज कोणीही करू शकत नाही, जेव्हा कोणी एखादा पदार्थ पाहतो तेव्हा त्याला दोन प्रकारचे ज्ञान उत्पन्न होते. एक तो पदार्थ जसा आहे तसे त्याचे ज्ञान होणे आणि दुसरा प्रकार म्हणजे तो पदार्थातील रचना पाहून तो निर्माण करणार्याचे ज्ञान होणे. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला जंगलात पडलेला एक सुंदर दागिना सापडला. त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो
सोन्याचा आहे आणि तो कोणीतरी कुशल कारागिराने बनविला आहे, याचप्रमाणे या नाना प्रकारच्या सृष्टिमध्ये असणारी विविध प्रकारची रचना पाहिल्यानंतर ती निर्माण करणार्या परमेश्वराला सिद्ध करते. (प्रश्न) मनुष्य सुष्टि प्रथम झाली की पृथ्वी आदिची? (उत्तर) आधी पृथ्वी आदीनिर्माण झाली. कारण पृथ्वी आदिकाशिवाय मनुष्याची स्थिती व पालन होऊ शकत नाही. (प्रश्न) सृष्टिच्या प्रारंभी एकच मनुष्य किंवा अनेक माणसे उत्पन्न केली होती किंवा काय/कसे ? (उत्तर) अनेक माणसे उत्पन्न केली होती. कारण ज्या जीवांची कर्में ईश्वरी सृष्टीमध्ये उत्पन्न होण्यासारखी होती त्यांनाच ईश्वर सृष्टिच्या आरंभी जन्माला घालतो.
‘मनुष्या ऋषयश्च ये । ततो मनुष्या अजायन्त'(श. )
असे यजुर्वेदात म्हटले आहेया प्रमाणावरून सृष्टिच्या प्रारंभी अनेक म्हणजे शेकडो-हजारो माणसे उत्पन्न झाली होती हे निश्चित होते. तसेच सृष्टि रचनेकडे पाहिल्यानंतरही निश्चित होते की माणसे ही अनेक आईबापांची संतति आहेत. (प्रश्न) आदी सृष्टिमध्ये मनुष्यादिकांची जी उत्पत्ति झाली ती बाल्य, युवा (तरुण) व वृद्ध यांपैकी कोणत्या अवस्थेत झाली? की तीन्ही अवस्थांमध्ये? (उत्तर) युवावस्थेमध्ये परमेश्वराने प्रथम बालके निर्माण केली असती तर त्यांचे पालन करण्यासाठी इतर माणसांची गरज भासली असती; आणि त्याने वृद्धावस्थेतील माणसांची निर्मिती प्रथम केली असती तर मैथुनी सृष्टि झाली नसती म्हणून त्याने युवावस्थेमध्ये सुष्टिकेली आहे (प्रश्न) सृष्टिचा प्रारंभ केव्हा तरी झाला आहे की नाही? (उत्तर) नाही. ज्याप्रमाणे दिवसापूर्वी रात्र आणि रात्रीपूर्वी दिवस, तसेच दिवसांनतर रात्र व रात्री नंतर दिवस हे चक्र चालू असते. त्याचप्रमाणे सृष्टीपूर्वी प्रलय आणि प्रलयापूर्वी सृष्टि, तसेच सूटिनंतर प्रलय व प्रलयानंतर सृष्टी हे चक्र अनादी काळा पासून चालत आले आहे. त्याला आदी किंवा अंत नाही. परंतु जसा दिवसाचा किंवा रात्रीचा आरंभ व अंत पाहायला मिळतो तसाच सृष्टि आणि प्रलय यांचा आदी व अंत होत राहतो. कारण जसे परमेश्वर, जीव, जगाचे कारण हे तीन पदार्थ स्वरूपतः अगदी आहेत, तसे जगाची उत्पत्ति, स्थिती व लय हेही प्रवाह रूपाने अगदी आहेत. नदीचा प्रवाह डोळ्यांना दिसतो, कधी तो सुकून जातो, कधी दिसतच नाही. तो पावसाळ्यात पुनः दिसू लागतो व उन्हाळ्यात दिसेनासा होतो. अशा या व्यवहाराला प्रवाहरूप समजावेजसे परमेश्वराचे गुण, कर्म, स्वभाव अनादी आहेत, तसेचत्यांच्या जगाची उत्पत्ति, स्थिती वलय घडून येणे हेही अगदी आहे. ज्याप्रमाणे ईश्वराचे गुण, कर्म व स्वभाव यांचा आरंभ व अंत नाही त्याचप्रमाणे त्याच्या कर्तव्यकर्माचाही प्रारंभ आणि अंत नाही. (प्रश्न) ईश्वराने काही जीवांना माणसाचा जन्म, काहींना वाघसिंहासारखा हिंस्र प्राण्यांचा, काहींना हरिण, गाय यांसारख्या पशूंचा, काहींना वृक्षादी, काहींना कृमी, कीटपतंगादी यांचा जन्म दिला आहे. यावरून परमेश्वर हा पक्षपाती असल्याचे दिसून येते. (उत्तर) ईश्वर पक्षपाती नाही. कारण त्या जीवांना आधीच्या सृष्टिमध्ये केलेल्या कमांनुसार व्यवस्था केल्याने ते जन्म दिले गेले. कर्मवाचून जन्म दिले गेले असते तर पक्षपात झाला असता.
मानव उत्पत्ति स्थान
(प्रश्न) मनुष्याची पूर्व सृष्टि कोणत्या ठिकाणी झाली? (उत्तर) आजकाल ज्याला तिबेट (तिब्बत) असे म्हणतात त्या त्रिविष्टप देशात झाली. (प्रश्न) आदी सृष्टिच्या वेळी माणसाची एकच जात होती की अनेक?
(उत्तर) एकच मानव जात होती. त्यानंतर ‘विजानीह्यार्य्यान्ये च दस्यवः’याऋवेदवचनात सांगितल्याप्रमाणे श्रेष्ठांचे नाव आर्य, विद्वान, देव असे पडले आणि जे , चोर, डाकू होते त्यांना दस्यु असे म्हणू लागले. अशा प्रकारे आर्य व दस्यु ही दोन नावे प्रचारात आली. ‘‘उत शूद्रे उतार्ये” या ऋग्वेदातील वचनात सांगितल्याप्रमाणे आर्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्ध असे (गुणकर्मस्वभावानुसार) चार भेद झाले. द्विज विद्वानांचे नाव आर्य आणि मूखांचे नाव शुद्र अनार्य म्हणजे अडाणी झाले. (प्रश्न) मग ते येथे कसे आले? (उत्तर) जेव्हा आर्य व दस्यु म्हणजे देव (विद्वान) व असुर (अविद्वान) यांच्यामध्ये वारंवार झगडे होऊ लागले, खूपच उपद्रव होऊ लागला तेव्हा आर्य लोक सर्व पृथ्वीतलावर ही भूमी उत्तम आहे हे ओळखून येथे येऊन बसले. त्यामुळे या देशाचे आर्यावर्त असे नाव पडले. (प्रश्न) आर्यावत्तांच्या सीमा कोठपर्यत आहेत ?
(उत्तर) आ समुद्रात्तु वै पूर्वादा समुद्राच्च पश्चिमात् । तयोरेवान्तरं गिर्योरार्यावर्तं विदुर्बुधाः ।।१।। मनु०।। अ०२ ।। श्लो० २२।। सरस्वतीदृशद्वत्योर्देवनद्योर्यदन्तरम् । तं देवनिर्मितं देशं ब्रह्मावर्तं प्रचक्षते ।।२।। मनु०।। अ०७ ।। श्लो० १७।।
उत्तरेला हिमालय, दक्षिणेला विंध्याचल, पूर्वेला आणि पश्चिमेला समुद्र ॥१॥ तसेच पश्चिमेला सरस्वती (अटक) नदी व पूर्वेला दृषद्वती नदी. ही दृषद्वती नेपाळच्या पूर्व भागातील डोंगरांमधून उगम पावून बंगाल व आसामच्या पूर्व बाजूने व ब्रह्मदेशाच्या पश्चिमबाजूने वाहत जाऊन दक्षिणेस समुद्राला मिळाली आहे. तिला ब्रह्मपुत्रा असे म्हणतात. जी उत्तरेकडील पर्वतांमध्ये उगम पावून दक्षिणेतील सागराच्या खाडीला जाऊन मिळते ती अटक नदी होय. हिमालयाच्या असणारी दक्षिणमध्य रेषेपासून बाजूच्या पर्वतापासून रामेश्वरापर्यंत जाते तिच्या कक्षेत जेवढा प्रदेश येतो त्याला आर्यावर्त असे म्हणतात. कारण हा प्रदेश देवांनी म्हणजे विद्वानांनी बसविला आहे; आणि हेच आर्यांनी निवास केल्यामुळे त्याला आर्यावर्त असे म्हटले आहे.
आर्य म्लेंच्छ शब्दांची व्याख्या
(प्रश्न) प्रथम या देशाचे नाव काय होते आणि येथे कोण राहत होते? (उत्तर) आर्याच्या पूर्वी येथे कोणी राहत नव्हते. त्यामुळे या देशाला कोणतेही नाव नव्हते. कारण की आर्य लोक मनुष्य सृष्टिनंतर सृष्टिच्या उत्पत्तिनंतर काही काळाने तिबेटमधून थेट याच देशात येऊन बसले. (प्रश्न) कोणी म्हणतात की हे लोक इणातून आले म्हणूनच त्यांचे नाव आर्य असे झालेते तेथे येण्यापूर्वी येथे जंगली लोक राहत असत. त्यांना असुर व राक्षस असे म्हणत होते. आर्य लोक स्वतःला देव म्हणावीत होते व त्यांचा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा त्याला देवासुरसंग्राम कथामध्ये सांगितले आहे. (उत्तर) हे सर्वथा सफ खोटे आहे कारण,
वि जानीह्यार्यान्ये च दस्यवो बिर्हष्मते रन्धया शासदव्रतान् ।।-ऋ० मं० १। सू० ५१। मं० ८।। उत शूद्रे उतार्ये ।। अथर्व० कां० १९।। सू० ६२।। मं० १ ।। हे ही वेदांचे प्रमाण आहे.
पूर्वी सांगितल्याप्रमाणे जे लोक धार्मिकविद्वान व आप्त पुरुष होते त्यांचे नाव आर्य होते. तर या विपरीत लोकांचे नाव दस्यु अर्थात चोर, दुष्ट, अविद्वान व अधार्मिक आहेत. तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या द्विजांचे नाव आर्य आणि शूद्रांचे नाव अनार्य अर्थात अडाणी आहे. जेथे वेदामध्ये असे सांगितले आहे तर इतर विदेशी लोकांच्या कपोलकल्पित गोष्टींना बुद्धिमान लोक कधीच मानू शकत नाहीत. देवासुर संग्रामामध्ये अर्जुन व महाराजा दशरथ आणि आर्यावर्त्तातील इतर लोक असुरांचा संहार करण्याच्या कामी आर्यांना मदत करण्यास जात असत. हिमालय पर्वतावर आर्य आणि दस्यु व म्लेंच्छ असुरांचे जे युद्ध झाले होते. त्यामध्ये देवांचे म्हणजे आर्यांचे रक्षण व असुरांचा पराभव करण्याच्या कामी त्यांची मदत झाली होती. यावरून हेच सिद्ध होते की, आर्यावर्त्ताच्या बाहेर चोहोंबाजूला हिमालयाच्या पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य देशांमध्ये जे लोक राहत असत, त्यांचेच नाव असुर असे सिद्ध होते. कारण जेव्हा हे असुर हिमालयातील प्रदेशांमध्ये राहणाऱ्या आर्यावर स्वारी करत तेव्हा आर्यावर्त्तातील राजे-महाराजे त्या उत्तरादी देशात आर्याच्या मदतीला जात. दक्षिणेकडे श्रीरामचंद्रांचे जे युद्ध झाले त्याचे नाव देवासुरसंग्राम नाही. त्याला राम-रावण युद्ध किंवा आर्य-राक्षस युद्ध असे म्हणतात. आर्य लोक इराणातून आले आणि येथील जंगली लोकांशी लढून विजयी होऊन त्यांना या देशातून हाकलून देऊन या देशाचे राजे बनले असे, कोणत्याही संस्कृत ग्रंथात किंवा इतिहासात लिहिलेले नाही. अशा पुनश्च स्थितीत विदेशी लोकांचे लिखाण मान्य कसे होऊ शकते? शिवाय,
आर्यवाचो म्लेच्छवाचः सर्वे ते दस्यवः स्मृताः।।१।। मनु०।। अ०१०।। श्लो० ४५।। म्लेच्छदेशस्त्वतः परः।।२।। मनु०।। अ० २।। श्लो० २३।।
आर्यावर्त्ताहून वेगळे असे जे देश आहेत, त्यांना दस्युदेश व म्लेच्छदेश म्हटले जाते. यावरूनही हेच सिद्ध होते की, आर्यावर्ताच्या बाहेर पूर्वेकडील देशापासून इराणपर्यंत, उत्तर, वायव्य आणि पश्चिम या देशांत राहणाऱ्यांचे नाव दस्यु, म्लेच्छ व असुर आहे आणि नैऋत्य, दक्षिण व आगेय दिशांतील आर्यावर्त्तांच्या बाहेरील देशांमध्ये राहणाऱ्या माणसांचे नाव राक्षस आहे. आजही पाहा. हबशी लोकांचे स्वरूप भयंकर राक्षसांच्या वर्णनासारखे दिसून येते आणि आर्यावर्ताच्या थेट खालच्या बाजूस राहणाल्या लोकांचे नाव नाग आणि त्यांच्या देशाला पाताळ यासाठी की आर्यावर्त्तीय लोकांच्या पादतली (पायतळी) जो देश आहे.. तेथे नाग नावाच्या पुरुषाच्या वंशातील राजे राज्य करीत असत. त्यांना नागवंशी म्हणत अर्थात त्यांच्यापैकी एका राजाच्या उलूपी नामक राजकन्येचा अर्जुनाशी विवाह झाला. होता. अर्थात इक्ष्वाकू राजापासून कौरव-पांडवांपर्यंत साया पृथ्वीवर आर्यांचे राज्य होते आणि वेदांचा थोडा थोडा प्रचार प्रसार आर्यावर्ताबाहेरील देशांमध्येही होता. याला पुरावा असा की, ब्रह्माचा पुत्र विराट, विराटाचा मनू आणि मनूचे मरीची आदी दहा पुत्र आणि त्यांच्यापासून स्वायंभुवादी सात राजे व त्यांची संतति इक्ष्वाकू आदी राजा जो आर्यावर्ताचा पहिला राजा होय.
त्यानेच आर्यावर्त्त वसविला आहे
आता दुर्दैवाने आर्यांमधील आळस, प्रमाद व आपसातील यादवी यामुळे इतर देशांवर राज्य करण्याची गोष्ट तर दूरच राहिली; पण खुद्द आर्यावर्तातही आर्यांचे अखंड, स्वतंत्र, स्वाधीन, निर्भय राज्य यावेळी राहिले नाही. जे काही उरले आहे तेही विदेशी लोकांकडून पादाक्रांत केले जात आहे. काही थोडे राजे स्वतंत्र आहेत. जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा देशवासियांना अनेक प्रकारची दुखे भोगावी लागतात. कोणी कितीही म्हटले तरी जे स्वदेशी राज्य असते ते सर्वोपरि उत्तम असते. मतमतांतराच्या दुराग्रहापासून अलिप्त, आपले व परके यांच्या बाबतीत पक्षपात न करणारे, प्रजेवर मातापित्यांप्रमाणे कृपा,न्याय व दया करणारे देखील परकीय लोकांचे राज्यसुद्धा पूर्णपणे सुखदायक होत नाही. परंतु वेगवेगळ्या भाषा, भिन्न प्रकारचे शिक्षण आणि भिन्न व्यवहार यांच्यामुळे निर्माण होणारा विरोध नाहीसा होणे अत्यंत कठिण आहे. तो नाहीसा झाल्याखेरीज परस्परांचा पूर्ण उपकार आणि हित साधणे कठिण आहे म्हणून वेदादी शाखांमध्ये जी काही व्यवस्था किंवा इतिहास लिहिला आहे तो मान्य करणे हे सज्जनांचे काम आहे.
(प्रश्न) जगाची उत्पत्ती होऊन किती वर्षे झाली? (उत्तर) एक अब्ज, सत्याण्णव कोटी, काही लाख व अनेक हजार वर्षे जगाची उत्पत्ति व वेदांचा प्रकाश होण्यात झाली आहेत याचे सविस्तर विवेचन ‘ऋग्वेदादिभाष्यभूमिका’ या माझ्या ग्रंथांत लिहिले आहे ते पाहावे. इत्यादी प्रकार सृष्टि उत्पतित व बनण्यात झाली आहेत शिवाय असे आहे की ही सृष्टी परमाणूपासून बनली आहे. ज्याचे विभाजन होऊ शकत नाही ते परमाणू आहे. साठ परमाणूंचा एक अणु बनतो. दोन अणूंचा एक द्वयणुक बनतो. जो स्थूलवायू आहे. तीन द्वयणुकांचा त्रसरेणू बनतो. यालाच अग्नी म्हणतात. चार द्वयणुकाचे जल, पाच द्वयणुकाची पृथ्वी बनते म्हणजे तीन द्वयणुकांचा त्रसरेणू व त्याची दुप्पट झाल्याने पृथ्वी आदी दृश्य पदार्थ होत आहेत. अशा प्रकारे मिश्रण करून परमेश्वराने हे भूगोल आदी बनविले आहेत.
जगाचा धारणकर्ता ईश्वर
(प्रश्न) या भूगोलाचे धारण कोण करतो ? कोणी म्हणतो की शेषाच्या म्हणजे सहस्रफणा असलेल्या नागाच्या मस्तकावर पृथ्वी आहे. दुसरा कोणी म्हणतो की ती बैलाच्या शिंगांवर आहेतिसरा म्हणतो की ती कशाहीवर नाही. चौथा म्हणतो की तिला वायूचा आधार आहेपाचवा म्हणतो की सूर्याच्या आकर्षणाने खेचली गेल्यामुळे ती आपल्या जागी वसलेली आहेसहावा म्हणतो की पृथ्वी वजनदार भारी असल्यामुळे ती खाली-खाली अवकाशात चालली आहे. यांपैकी कोणाचे म्हणणे खरे मानावे? (उत्तर) जे लोक असे म्हणतात की सापाच्या डोक्यावर आणि बैलाच्या शिंगांवर पृथ्वी आधारलेली आहे, त्यांना असे विचारले पाहिजे की साप आणि बैल यांच्या आईबापांच्या जन्माच्या वेळी ती कशावर टिकून होती ? आणि साप व बैल कोणाच्या आधाराने राहिले आहे ? बैलाच्या शिंगांवर पृथ्वी आधारलेली आहे असे म्हणणारे मुसलमान हा प्रश्न ऐकून निरुत्तर मात्र होतील. परंतु सर्पवाले म्हणतील की सर्प कूर्मावर, कूर्म जलावर, जल अग्नीवर, अग्नी वायूवर आणि वायू अवकाशात स्थिर आहे. त्यांना असे विचारले पाहिजे की हे सारे कशावर टिकून आहे ? तर ते अवश्य सांगतील की ते परमेश्वरावर आधारलेले आहेत. त्यांना जर विचारले की शेष आणि बैल ही कुणाची मुले आहेत ? तर ते सांगतील की कश्यप हा कद्रूचा व बैल हा गायीचा मुलगा आहे. मरिचीचा पुत्र कश्यप, मनूचा पुत्र मरीची, विराटाचा मनु व ब्रह्माचा विराट आणि ब्रह्मा आदी सृष्टिचा होता अशी वंशपरंपरा आहे. म्हणजे असे की शेषाचा जन्म होईपर्यंत पाच पिढ्या होऊन गेल्या होत्या. तेव्हा पृथ्वी कोणी धारण केली होती? हा प्रश्न म्हणजे कश्यपाचे जन्माचे वेळी पृथ्वी कशावर होती ? विचारल्यावर 'तेरी भी चुप मेरी भी चुप होऊन ते भांडू लागतील.
याचा खरा अभिप्राय हा आहे की जे बाकी उरते त्याला शेष असे म्हणतात. म्हणून कोणातरी कवीने ‘शेषाधारा पृथिवीत्युक्तम्’ असे म्हटले की शेषाचा आधार पृथ्वी आहे त्याचा अर्थ न समजता सर्पाची मिथ्या कल्पना केली. वस्तुतः परमेश्वर हा उत्पत्ति व प्रलय यांतून बाकी म्हणजे वेगळा राहतो. म्हणूनच त्याला 'शेष' असे म्हणतात. त्याचाच आधार पृथ्वी आहे.
सत्येनोत्तभिता भूमिः ।। ऋ० मं० १०। सू० ८५। मं० १।।
(सत्य) तो त्रिकालाबाधित आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, त्या परमेश्वराने भूमी, आदित्य आणि सर्व लोकांचे धारण केले आहे.
उक्षा दाधार पृथिवीमुत द्याम् ।। ऋ० मं० १०। सू० ३१। मं० ८।। , अथर्व० कां० ४।। सू० ११।। मं० १ ।।
(उक्षा) हा उक्षा शब्द पाहून बैलाची कल्पना कोणी तरी केली असावी. कारण उक्षा हे बैलाचे गाव आहेपरंतु त्या मूढाला हे समजले नाही की एवढ्या प्रचंड पूला उचलून धरण्याचे सामर्थ्य बैलामध्ये कसे असणार? कोठून येणार? उक्षा=वर्षा द्वारा भूगोलावर जलसिंचन करणाऱ्या सूर्याचे नाव आहे. त्याने आपल्या आकर्षणाने पृथ्वीला धारण केले आहे तु सूर्य वगैरेना धारण करणारा परमेश्वराखेरीज दुसरा कोणीही नाही. (प्रश्न) एवढ्या मोठ्या भूगोलांना परमेश्वर कसा धारण करू शकत असेल? (उत्तर) ज्याप्रमाणे अनंत आकाशापुढे मोठेमोठे भूगोल काहीच नाहीत किंवा समुद्रापुढे पाण्याच्या एका कणासारखा म्हणजे काहीच नाही. त्याप्रमाणे त्याअनंत परमेश्वरासमोर हे असंख्यलोक (गोल) एका परमाणु सारखे सुद्धा म्हटले जाऊ शकत नाहीत. तो आत व बाहेर सर्वत्र व्यापक आहे. ‘विभुःप्रजासु' हे यजुर्वेदात वर्णन आहे. म्हणजे तो परमेश्वर प्रजामध्ये व्यापक होऊन सर्वांचे धारण करीत आहे. जर तो खिस्ती, मुसलमान व पौराणिक लोकांच्या म्हणण्या प्रमाणे विभु म्हणजे सर्वव्यापक नसता तर तो या सृष्टिला कधीही धारण करू शकला नसता. कारण मिळाल्याशिवाय कुणी कुणाला धारण करूः शकत नाही.
यावर कोणी म्हणेल की हे सारे लोक परस्पर आकर्षणाने धारित स्थित असतील मग पुन्हा त्यांना परमेश्वराने धारण करण्याची काय अपेक्षा आहे ? याचे उत्तर असे दिले की ही सृष्टि अनंत आहे की सांत? जर ती अनंत आहे असे म्हणत असाल तर साकार वस्तू अनन्त असू शकत नाही आणि जर ती सांत आहे असे तुमचे म्हणणे असेल तर ती जेथे संपली त्याच्या पलीकडे दुसरा कोणताच लोक नाही. मग कोणाच्या आकर्षणाने तिचे धारण होणार? जशी समष्टी व व्यष्टी सर्वसमुदायाचे नाव वन ठेवतात म्हणून ती समष्टी आणि एक-एक वृक्ष स्वतंत्रपणे पाहिला तर ती व्यर्थ होय. त्याप्रमाणे सर्व भूगोलांची एक समष्टी समजून त्याला जग असे म्हटले तर साऱ्या जगाचे धारण व आकर्षण करणारा परमेश्वरावाचून दुसरा कोणीही नाही. म्हणून तो सार्या जगाची रचना करतो तोच-
स दाधार पृथिवीमुत द्याम् ।। -यजु० अ० १३। मं० ४।।
पृथ्वी आदी प्रकाशरहित लोकलोकांतर पदार्थ तथा सूर्य आदी प्रकाशसहित लोक व इतर पदार्थ यांची रचना व धारण परमेश्वर करतो. तोच सर्वत्र व्यापक झाला आहे तोच साऱ्या जगाचा कर्ता व धर्ता (धारण करणारा) आहे.
(प्रश्न) पृथ्वी आदी लोक फिरत आहेत की स्थिर आहेत?
(उत्तर) ते फिरत आहेत. (प्रश्न) कित्येक लोक असे म्हणतात की सूर्य फिरतो व पृथ्वी फिरत नाही. तर दुसरे काही लोक असे म्हणतात की सूर्य फिरत नसून पृथ्वी फिरत असते. यातील खरे कोणते? (उत्तर) ही दोन्ही मते अर्ध सत्य आहेत. कारण वेदामध्ये असे लिहिले आहे की
‘आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः । पितरं च प्रयन्त्स्वः।।‘-यजुः० अ० ३। मं० ६।। म्हणजे हा भूगोल जलासहित सूर्याच्या भोवती फिरतो म्हणून भूमी फिरत असते. आ कृष्णेन रजसा वत्तर्मानो निवेशायन्नमतृं मर्त्यं च । हिरण्ययेन सविता रथेना देवो याति भुवनानि पश्यन् ।।-यजुः० अ० ३३। मं० ४३।।
जो सविता म्हणजे सूर्य वर्षा आदी करणारा आहे. प्रकाशस्वरूप तेजोमय, रमणीय स्वरूपासह विद्यमान
आहे, सर्व प्राणी व अप्राणी यांच्यामध्ये अमृतरूप वृष्टी अथवा किरणे यांच्याद्वारे अमृताचा प्रवेश करून, सर्व मूर्तिमान द्रव्ये दाखवित आहे, सर्व लोकांबरोबर आकर्षण गुणासह वर्तमान आहे, आपल्या परिघामध्ये फिरत राहतो. परंतु तो कोणत्याही गोलाच्या भोवती फिरत नाही. त्याचप्रमाणे एकेका ब्रह्मांडात (सूर्यमालिकेत) एक सूर्य प्रकाश देणारा असतो व इतर सर्व लोक त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे आहेत. जसे
दिवि सोमो अधि श्रितः।। -अथर्व० कां० १४। अनु० १। मं० १।।
जसा हा चंद्रलोक सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो, तसेच पृथ्वी आदी लोकही सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. मात्र दिवस व रात्र हे चक्र सदैव चालत असते. कारण पृथ्वी आदी लोक फिरत असताना जो भाग सूर्यासमोर येतो तेथे दिवस व जो भाग मागच्या बाजूस येतो तेथे रात्र असते. अर्थात जे उदय, अस्त, संध्या, मध्याह्न, मध्यरात्र वगैरे कालावयव आहेत, ते देशदेशांतरामध्ये सदैव विद्यमान असतात. म्हणजे जेव्हा आर्यावर्त्तात सूर्योदय होतो तेव्हा पाताळात म्हणजे 'अमेरिकेत' अस्त होतो आणि जेव्हा आर्यावर्त्तात सूर्यास्त होतो तेव्हा पाताळ देशात सूर्योदय होतो. जेव्हा आर्यावर्तात मध्याह्न किंवा मध्यरात्र असते त्यावेळी पाताळदेशात मध्यरात्र आणि मध्याह्न असते. जे लोक असे म्हणतात की सूर्य फिरतो व पृथ्वी फिरत नाही, ते सर्व अज्ञानी आहेत. कारण तसे असते तर हजारो वर्षाचा दिवस व तेवढीच दीर्घ रात्र झाली असती. कारण सूर्य पृथ्वीच्या लाखोपट मोठा असून तो पृथ्वीपासून कोट्यावधी मैल दूर आहे. म्हणूनच सूर्याला वेदांमध्ये ब्रध्नः नाव आहे. ज्याप्रमाणे मोहरीसमोर
पर्वत फिरू लागला तर त्याला खूप वेळ लागेल; आणि मोहरीला फिरायला फार वेळ लागणार नाही, त्याप्रमाणेच पृथ्वी (स्वतःभोवती) फिरत असल्यामुळे यथायोग्य दिवस व रात्री होतात; सूर्याच्या फिरण्यामुळे नव्हे.
जे लोक सूर्य स्थिर आहे असे म्हणतात, ते सुद्धा ज्योतिर्विद्याविद नाहीत. कारण सूर्य फिरत नसता तर एका राशिस्थानातून दुसऱ्या राशीत अर्थात दुसऱ्या जागेला तो प्राप्त झाला नसता शिवाय गुरू (मोठा) पदार्थ फिरल्यावाचून आकाशात नियत स्थानावर केव्हाही राहू शकला नसता. जैन लोक म्हणतात की पृथ्वी फिरत नसून ती खाली-खाली जात आहे; आणि फक्त जंबुद्वीपामध्ये दोन सूर्य व दोन चंद्र आहेत.ते जणू भांगेच्या नशेत धंद आहेत. असे का? जर पृथ्वी खाली-खाली जात असती तर चारी बाजूच्या वायुचे चक्र न झाल्याने ती छिन्न भिन्न झाली असती. खालच्या वायूला राहण्यायोग्य वायूचा स्पर्श झाला असता खालच्या लोकांना अधिक स्पर्श झाला असता आणि वायूची गती एकाच प्रकारची झाली असती. दोन सूर्य व दोन चंद्र असते तर रात्र व कृष्णपक्ष यांचे अस्तित्व उरले नसते. म्हणून एका भूमीजवळ एक चंद्र असतो आणि अनेक भूमीसाठी अनेक चंद्र असतो व त्या सर्वांमध्ये एकच सूर्य असतो.
(प्रश्न) सूर्य, चंद्र व तारे या काय वस्तू आहेत ? त्यांच्यावर मनुष्यादी सृष्टी आहे का नाही? (उत्तर) हे सर्व भूगोल लोक आहेत व त्यांमध्ये मनुष्यादी प्रजाही राहते. कारण-
एतेषु हीदँ्सर्वं वसुहितमेते हीदँ्सर्वं वासयन्ते तद्यदिदँ्सर्वं वासयन्ते तस्माद्वसव इति।। -शत० प्रपा० १४।।ब्रा० ६।। के० ९।। व० ४।।
पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश, चंद्र, नक्षत्रे आणि सूर्य यांचे गाव वसू यासाठी आहे की यांच्यामध्येच सर्व पदार्थ व प्रजा वास करतात; आणि हेच सर्वांना वसवितात. ज्याअर्थी हे निवासाची घरे आहेत त्याअर्थी त्यांना वसू नाव आहे. पृथ्वीप्रमाणेच सूर्य, चंद्र व नक्षत्रे वसू आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही याप्रकारे माणसे असणार यात काय संदेह ? शिवाय परमेश्वराचा पृथ्वी हा एक लहानसा गोल मनुष्यादी सृष्टीने भरलेला आहे. तर काय इतर सारे लोक शून्य रिकामे असतील? परमेश्वराचे कोणतेही कार्य निष्प्रयोजन होत नाही. मग इतक्या असंख्य गोलांवर मनुष्यादी सुष्टि नसेल तर ईश्वराचे प्रयोजन कसे सफल होऊ शकणार? म्हणून सर्वत्र मनुष्यादी सृष्टि आहे.
(प्रश्न) या पृथ्वीवरील मनुष्यादी सृष्टिची जी आकृति व अवयव आहेत. तसेच इतर गोलांवर असतील की वेगळे असतील? (उत्तर) आकारांमध्ये थोडाफार फरक असण्याची शक्यता आहे. या जगात चिनी, हबशी व आर्यावर्त, यूरोप वगैरे देशांतील लोकांचे अवयव व रंगरूप आणि आकृतिचा थोडा-थोडाफरक आहे, तसाच। वेगवेगळ्या ग्रहांवरील लोकांमध्ये भेद असतात. परंतु ज्या जातीची जशी सृष्टि या जगात आहे, तशाच प्रकारची सृष्टि अन्य लोकातही आहे. म्हणजे या जगातील लोकांच्या शरीराच्या ज्या-ज्या जागी डोळे वगैरे इंद्रिये असतात त्याच जागी इतर गोलांवरील लोकांच्या शरीरातही तशाच प्रकारचे अवयव सुद्धा तसेच असतात, कारण-
सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् । दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो स्वः ।। – ऋ० मं० १०। सू० १९०।।
(धाता) परमेश्वराने ज्याप्रमाणे सूर्य, चंद्र, द्दौ, भूमी, अंतरिक्ष व तत्रस्थ विशिष्ट सुखदायक पदार्थ पूर्वीच्या कल्पामध्ये रचले होते, तसेच ते या कल्पात म्हणजे या सृष्टित रचले आहेत; आणि सर्व लोकलोकांतरमध्येही ते तसेच बनविले आहेत. त्यांत किंचित मात्र फरक नाही. (प्रश्न) ज्या वेदांचा या जगात प्रकाश आहे त्यांचाच प्रकाश त्या लोकांमध्ये आहे किंवा नाही? (उत्तर) होय ! त्यांचाच प्रकाश तेथेही आहे. ज्याप्रमाणे एका राजाची राज्यव्यवस्था नीति त्याच्या राज्यात सर्वत्र सारखी असते त्याप्रमाणे राजराजेश्वर परमेश्वराची वेदोक्त नीती त्याच्या सृष्टिरूपी संपूर्ण राज्यात सारखीच आहे. (प्रश्न) जर हे जीव आणि प्रकृतिस्थ तत्वें अगदी आहेत व ती ईश्वराने बनविलेली नाहीत तर ती स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यावर ईश्वराचा अधिकारही असता कामा नये. (उत्तर) ज्याप्रमाणे राजा व प्रजा हे समकालीन असतात आणि प्रजा राजाच्या आधीन असते त्याचप्रमाणे जीव व जड (अचेतन) पदार्थ परमेश्वराच्या आधीन आहेत तर परमेश्वरसारी सृष्टि बनविणारा, जीवांना त्यांच्या कर्मांचा यथायोग्य फळे देणारा, सर्वांचे यथावत रक्षण करणारा आणि अनंत सामर्थ्ययुक्त आहे तर अल्प सामर्थ्यवान आणि जड (अचेतन) पदार्थ त्याच्या आधीन का नसावेत ? म्हणून जीव हा कर्म करण्यास स्वतंत्र परंतु केलेल्या कमांची फळे भोगण्यात ईश्वराच्या व्यवस्थेमुळे परतंत्र आहे. याउलट परमेश्वर हा सर्वशक्तिमान विश्वाची निर्मिती, संहार व पालन सर्व जगाचे करणारा आहे.
हा आठवा समुल्लास पूर्ण झाला. पुढील समुल्लासात विद्या, अविद्या, बंध व मोक्ष यांविषयी लिहिण्यात येईल.
इति श्रीमद्वयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे सुभाषाविभूषिते सृष्ट्युत्पत्तिस्थितिप्रलयविषये अष्टमः समुल्लासः सम्पूर्णः ॥८॥