श्री-विद्या बळ मत्त प्रभु शुंभनिशुभं जाहले होते ॥ शक्रादि लोकपाळां करवीं च पदासि लाहलें हो ते ॥१॥ काळातें हि न भीतीं जे ते मीतील दैत्य कां पवितें ॥ तद्वळ सुरांसि कांपवि जेविं दरिद्रसि शैत्य कांपवितें ॥२॥ तीतें शक्रादि सुर स्तविती जाउनि तदा हिम नंगातें ॥ जीच्या वात्सल्यांतें सर्व मु कविंचें सदा हि मन गातें ॥३॥ सुर जन करीत होता केवळ दीनां जना सम स्त्वन ॥ तद्रचितस्तवनादें नादमय चि होय तें समस्त वन ॥४॥ तो त्या स्थानी गौरी ये गंगा तोय मज्जन कराया ॥ जी त्या हिमालयातें ह्मणतें हो होय मज्जनक राया ॥५॥ जी ह्मणते निज दासा हुनि सुरभीचा न वत्स भासुर हो ॥ ती त्यांसी पुसे करिती कोनाचा स्तव भवैत्सभा सुर हो ॥६॥ तों तच्छरीरकोशा पासुनि सहसा निघे शिवा मग ती ॥ स्तवुनि मज ह्मणे केलें शुंभ निशुंभमादिशत्रुनीं अगती ॥७॥ झाली शरीरकोशा पासुनी या स्त्व वि कौशिकी नामें ॥ तद्दशेनीं च आलीं जीं नव्हतीं तो सुरव्रजीं धोमें ॥८॥ निघतां चि शिवा झाली कृष्ण जी तप्त कांचन च्छावे ती ॥ गौरीस कालिका हें ठेवुनि अभिधान या स्तवें स्तविती ॥९॥ होती हिमाऽचलीं श्री जगदंबा परमसुंदरी तींतें ॥ खळ चंड मुंड देखति जे वश सुंदोपसुंदरीतीतें ॥१०॥ ते दृष्ट भृष्ट तेथुनि जाऊनि कुशील मद्यकुंभातें ॥ स्व स्वामीतें भेटुनिं ऐसें प्रार्थुनि वदति शुंभातें ॥११॥ सुमनोहराकृति महा राजा आह्नीं विलोकिली महिला ॥ शोभवितो निरुपम निज देह द्युतिनें हिमाऽद्रिच्या महिला ॥१२॥ उत्तम रुप तसें तो कोणीं कोठें न देखिलें होतें ॥ जाणों न करें विधिनें चतुरें चित्तें चि रेखिलें हों तें ॥१३॥ ती कोण स्त्री प्रभुने शीघ्र निपुन शोध करुनि जाणावी ॥ देखावी स्वामीनें घ्यावी निज मंदिरासि आणावी ॥१४॥ देवा देह द्युतिने ती युवति दिशा दहा हि शोभविते ॥ जसि चंद्रिका चकोरा तसि जो प्रेक्षक तयासि लोभविते ॥१५॥ रत्‍नें मणि गज वाजी जे जे उत्तम पहार्थ लोकांत ॥ ते त्रे सर्व हि सांप्रत शोभति शुंभा तुझ्या ति ओंकांत ॥१६॥ ऐरावत गज रत्‍न दुम रत्‍न हि पारिजात हय रत्‍न ॥ उच्चेःश्रवा हि शक्रा पासुनि त्वां आणिला करुनि यत्‍न ॥१७॥ जें अत्यऽदुत दिव्य ब्रह्मायाचें हम्स युक्त अजि राया ॥ तुझिया विमानरत्‍न हि सेवितसे सर्वकाळ अजिरा या ॥१८॥ निधि मुख्य महापद्म हि धनदा पासुन आणिला आहे ॥ तुजला दिली समुद्रें माला अल्मान पंकजा बा हे ॥१९॥ वारुण कनक स्त्रावी छत्र तुझ्या मदिरीं असें स्वामी ॥ पूर्वी प्रजापतीचा जो रथ वर तोहि या असे धामीं ॥२०॥ त्वां मृत्युं शक्ति हरिली जीचें उत्क्रांतिदा असे नाम ॥ कोणा अर्था विषयी सकळ झाला प्रभो तुझा काम ॥२१॥ पाश सलिल राजाचा तव अनुजाच्या परिग्रहीं धन्या ॥ ज्या ज्या समुद्र जाता त्या त्या सद्रत्‍न जाति ही अन्या ॥२२॥ तैशीं च अग्निशौंचें दर्हनें ही तुज दिलीं प्रभो वस्त्रें ॥ या परि सकळें रत्‍नें त्वां प्रभुनें स्पष्ट जोडिली शस्त्रें ॥२३॥ मग रत्‍नभुग्वरें त्वां ऐसें स्त्रीरत्‍न कां न जोडावें ॥ या लाभा करितां तों कुशलें सर्वस्व तुच्छ सोडावें ॥२५॥ खळ भृत्य कथित कुमत श्रवत करुनि दृष्ट मति सुराकुंभ ॥ न करुनि विचार काहीं निजदुततें असें ह्मणे शुंभ ॥२५॥ सुग्रीवा शीघ्र करीं जेणें वश होय रत्‍नभुता तें ॥ सांगे मदांऽध जैसा वेताळ सुधाति यत्‍नभुतातें ॥२६॥ कासार असे समुचित तो तव संगमसुरापगे लाहो ॥ ऐसें ह्माणावया त्या परमशिवे प्रति सुराप गेला हो ॥२७॥ दुत ह्मणे देवि जसा जलनिधि पानें प्रसिद्ध कुंभज या ॥ त्रैलोक्य, त तसा चि प्रख्यात असे करुनि शुंभ जया ॥२८॥ जो, अहताज्ञ सुरांत स्वजना बहु देतसे मर्ह हताऽरी ॥ असुरांप्रताप ज्याचा व्यसनीं ह्मणउनि परा अहह तारी ॥२९॥ दैत्येश्वर परमेश्वर माझ्या वदनें करुनि आपण तो ॥ श्रवण करावें त्वां तें देवि त्वदेनुग्रहार्थ जें ह्मणतो ॥३०॥ त्रैलोक्य सकळ माझें मजला झालें समस्त सुर वश तें ॥ यश ऐकिलें जगें जें विश्रुत गंधर्व राज सु स्व शंतें ॥३१॥ इंद्रादिदेवता मी सेवितसें सर्व यज्ञ भागांतें ॥ माझा प्रताप दुःसह अहितांतें गरुड जेविं नागांतें ॥३२॥ लोकत्रयांत रत्नें जीं जीं ऐराअतादि गज रत्नें ॥ होतीं ज्यांची त्यांही आणुनि मज तीं समर्पिलीं यत्नें ॥३३॥ क्षीरधिमथनोद्भव जो नामें उच्चेःश्रवा यशें सजला ॥ हरि वाहन हरि रत्‍न प्रणव सुरांही समर्पिला मजला ॥३४॥ जें रत्‍नें देवांची गंधर्वांची तशी च नागांचीं ॥ तों झालीं प्राप्त मला व्हावीं च फळे जशी स्व यागांचीं ॥३५॥ स्त्री रत्‍न मानितों तुज लोकीं मी रत्‍न मात्र सेवितसें ॥ ये मज कडे चि आले रत्‍नाऽतर निज यशोऽर्थ देवि तसें ॥३६॥ स्त्री रत्‍न ह्मणुनि भज तुं मज करित्या शत्रु हानि शुंभातें ॥ कीं गुरुपराक्रमा या मत्तुल्या मदनुजा निशुंनातें ॥३७॥ तुं मत्परिग्रहास्तवं परमेश्वर्यासि पात्र होशील ॥ व्हावासि मत्परिग्रह तुज वरि च तुझें प्रसन्न हो शीलं ॥३८॥ दुर्जनदुतोक्त असें ऐकें ऐकों नये कधीं परि तं ॥ गंभीर अंतरीं स्मित करुनि भगवति स्वयें वदे अरितें ॥३९॥ दुता किमापि न मिथ्या तु वदलासि स्व वृत्ति हित साच ॥ त्रैलोक्याचा अधिपति शुंभ जसा तो निशुंभहि तसाच ॥४०॥ तरि कां अवश्य न ह्माणशिं ऐसें वदशीलं सांगतं परिस ॥ सोडुं नेये प्रतिज्ञा धर्म नसे सत्य भाषणा परिस ॥४१॥ अल्पमीतत्वें आपण हा पण दुता मनांत म्यां पहिला ॥ केला आहे अनुता भ्यावें तितुकें भिऊं नये अहिला ॥४२॥ जो मज जिंकील रणीं मम गर्वातें करील जो दुर ॥ तो मज समबळ माझा भर्त होईल जनांत जो शुर ॥४३॥ ऐसा मत्पण या स्त्व करुनि रणीं गर्व हानि शुंभानें ॥ किंवा शीघ्र धरावा जिंकुनि मज पाणि हा निशुंभानें ॥४४॥ दुत ह्मणे गर्विष्ठे न वद असें मज पुढें कसें व्दसी ॥ शुंभ निशुंभ सदुर्जय कंप द पविपाणिलाहि कि तदसी ॥४५॥ त्रिजगीं कोन पुरुष तो शुभं निशुंभा समोर राहिल ॥ पाहेल घुक रविला काय शश हरि प्रहार साहेल ॥४६॥ अन्या दैत्याही पुढें सर्व सुरांचेहि कांपती काथ ॥ मग शुभांदिसमक्ष स्त्री जी न धरील कांप ती काय ॥४७॥ जाशील एकली स्त्री तुं कैसी त्या समोर उत्साहें ॥ स्पष्ट तुझें तुज देईल जोडुनि अविचार शील कुत्सा हें ॥४८॥ अभिमान मनीं धरिला तो द्याया दुःखरौखा जागे ॥ देवि न होऊनि कैशा कर्षणनिर्घृतगौरवा जा गे ॥४९॥ देवी ढुतासि ह्मणे वदलासि जसे तसेंचि हें आहे ॥ शुंभ तसाचि निशुंभ प्रभुपणही न स्व लंघना साहे ॥५०॥ काय अकरु मी केली न विचार करुनि अशी प्रतिज्ञा त्या ॥ जा सांग असें कृत पण रक्षाऽर्थ धरुनि असिप्रति ज्ञात्या ॥५१॥ भ्यावें स्वःपणापुर्वीं म्यां आतां भिउनि काय गा होतें ॥ माझा निरोप सर्वहि सांग तया योग्य जें करो तो तें ॥५२॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.