हें काय उगीचच ? (नाट्यछटा)

<poem> पन्नास - नाहीं शंभर वर्षाचें असतों म्हणून काय झालें असतें ? आहे काय त्यांत ? आणायचा अवकाश, तेव्हांच नीट करुन दिलें असतें ! - एकदा नीट पहाल तर खरें ! ऐसें झकास तुमचें घड्याळ झालें आहे, कीं नांव नको आतां पुनः बिघडण्याचे ! - अलवत् ! आमचें इस्पितळच असें आहे ! आला रोगी कीं बरा झालाच पाहिजे ! - ती पाहा ! ती बाजाची पेटी दुरुस्त करायला आणली, तेव्हां एक सूर धड असेल तर शपथ ! हाडेंन हाडें खिळखिळींत झाली होतीं ! पण तीच आतां ? अशी गोड गाते आहे कीं, ज्याचें नांव तें ! - सांगतो ना ! एकदां जिथल्या तिथं ठाकठीक होऊन जेव्हां तिचे सूर निघायला लागले, तेव्हां किती मनस्वी आनंद झाला म्हणून सांगूं तुम्हांला ! - मालक तर उड्या मारायला लागला ! - बरोबरच आहे ! करावयाचें कांहीं, तर असेंच केलें पाहिजे ! नाहीं तर सांगा, जन्माला घातलें कशाला ? - असें हें सगळें मोडलेलें चालू करावयाचें, याचकरितां कीं नाहीं ? अन् खरी मौज यांतच ! नाहीं का ? - तेव्हां एकंदर क्रमच असा आहे कीं, बिघडलेले म्हणून कांहीं राह्यचेंच नाहीं - हो मग ! शंका आहे काय ? - तें जें प्रेत चाललें आहे, तें सुद्धां पुन्हा धड व्हायलाच ! - मला सांगा, आपण केलेलें कांहीं नादुरुस्त झालें, तर काय हव्वें तें करुन, नीट करतोंच कीं नाहीं आपण ? - झालें तर ! हें जसें माणसाचें, तेंच आपल्या निर्माणकर्त्याचें ! तेव्हां इथं आपल्या हदयाचे ठोके बंद पडले, तर काय बिघडलें त्यांत ? पुनः कुठें तरी चालू होतातच ते ! - आणि असें आहे, म्हणूनच आपण सगळें हें - हव्या तशा हाल अपेष्टा सोसतों, जिवाची माणसें जातात - तेंही सोसतों, अन् सगळें हें नेटानें करीत राहातों ! - हें काय उगीचच ?...

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.