अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/तर्कशास्त्र:कामाचे,कर्मचाऱ्यांचे

मचं बरं आहे बुवा,आपलं दहा ते पाच कामाच्या पाट्या टाकल्या की संध्याकाळी बायको,मुलांबरोबर मजा करायला मोकळे. नाही तर आमचं बघा. धड डे शिफ्ट म्हणावी तर तशी नाही आणि पूर्ण नाईट शिफ्ट म्हणावी तर तशीही नाही.जेव्हा तुम्ही लोक फिरायला बाहेर पडता तेव्हा आम्ही कामाला जाण्यासाठी बाहेर पडतो आणि तुम्ही गाढ झोपलेले असता; तेव्हा आम्ही घरी परतत असतो. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही मोकळी मिळत नाही.घरगुती कार्यक्रमांतही नीटपणे भाग घेणं न जमल्यामुळे सगळीच पंचाईत होते.कामाच्या अशा या‘ऑड'वेळेचा तब्येतीवर परिणाम होतो तो वेगळाच.तुम्ही नशीबवान आहात लेको."

 वृत्तपत्राच्या कचेरीत दररोज संध्याकाळी पाच ते रात्री दीड-दोन पर्यंत शिफ्ट करावी लागणारा एक ‘उपसंपादक’ बँकेत काम करणाऱ्या आपल्या मित्राला 'चेष्टेत' आपली अडचण सांगत होता. वृत्तपत्राचा अंक दररोज सकाळी सहा वाजता वाचकांच्या हातात

पडणे अनिवार्य असल्याने व तो अंक बाहेर काढण्याची जबाबदारी त्याची असल्याने कामाच्या या अवघड वेळेत बदल होणे शक्य नाही याची त्याला जाणीव होतीच.तरीही आपल्या बाकी काही मित्रांच्या कामाची सुखावह वेळ पाहून त्याच्या मनात कुठे तरी थोडीशी बोचही होती.ते कामाच्या बाबतीत अत्यंत चोख आणि कष्टाळू होता.उपसंपादकाचं काम त्याला आवडतही होतं.नाइलाजास्तव त्याने हे काम पत्करलं होतं.अशीही परिस्थिती नव्हती.तरीदेखील 'आपण पूर्वी प्रयत्न करून अशी सरकारी नोकरी मिळविली असती तर किती बरं झालं असतं’ असा विचार त्याच्या मनाला चाटून जाणं

अगदीच अनैसर्गिक नव्हते.
 हे काही अपवादात्मक उदाहरण नाही.पुराण व इतिहासकाळी युध्ददेखील केवळ दिवसा उजेडीच खेळण्याचा व सूर्य अस्ताला गेल्यानंतर ते थांबवण्याचा नियम होता.तिथे इतर कामे रात्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.त्याकाळी एकंदरीतच समाजजीवन आणि व्यक्तिगत जीवनाची गती इतकी धिमी होती की,रात्रीचा दिवस करून'काम'करण्याची आवश्यकता केवळ बाहेरचे नाद असणार्यानाच वाटत असावी.बाकीचे जग 'दिवसा काम आणि रात्री आराम' अशा चाकोरीबध्द,संथ पण आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने योग्य अशा वेळापत्रकानुसार वागत असे.
 गेल्या शंभर वर्षांत काळ बदलला.गेल्या पन्नास वर्षांत तर तो फारच बदलला आणि माणसाला चोवीस तास कमी पडू लागले.पूर्वी दिवसाचे दिवस व रात्र असे दोन भाग होते. आता या दोन्ही भागांना ‘दिवस’ म्हणूनच ओळखले जाते.झपाट्याने होणारा तंत्रज्ञान विकास, उत्पादन वाढ,मानवी गरजांमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि आलेली विविधता यामुळे सर्व क्षेत्रात काम करणार्यान कर्मचार्यांंनी एकाच वेळी काम करणे व एकाच वेळी विश्रांती घेणे अशक्य झाले आहे.जेव्हा व जिथे वेळ उपलब्ध असेल त्याचा व्यावसायिक कार्यासाठी उपयोग करून घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामळेच काहींना सकाळी, काहींना दपारी,काहींना रात्री तर काही जणांना या तिन्ही वेळी आळीपाळीने काम करावं लागतं. परिणामी थोड्या लोकांना १० ते ५ अशी आदर्श वेळ लाभत असली तरी बहसंख्य कर्मचार्यांना काहीशा अडचणीच्या वेळी काम करावं लागतं व त्यानुसार आपला दिनक्रम व इतर कार्याची वेळ बदलावी लागते.
 या परिवर्तनातून व्यवस्थापनशास्त्रात ‘कामाचे तर्कशास्त्र'(वर्क लॉजिक) व 'कर्मचाच्यांचे तर्कशास्त्र’(वर्कर्स लॉजिक) या संकल्पना उदयास आल्या.
 रासायनिक पदार्थ तयार करणारा कारखाना चोवीस तास चालू ठेवावा लागतो. अगदी राष्ट्रीय सणांच्या दिवशीही सुटी घेऊन चालत नाही. कारण अशा पदार्थाचे उत्पादन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यात खंड पडल्यास उत्पादनाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. अशा कारखान्यांतील यंत्रसामुग्री अखंड सुरू असते आणि ती चालविण्यासाठी तेथे कर्मचाऱ्यांची उपस्थिती अखंड असावी लागते. याचाच अर्थ कारखान्याचे वेळापत्रक त्यात तयार होणाऱ्या पदार्थाच्या स्वरूपावर अवलंबून ठेवावं लागतं. यालाच कामाचं तर्कशास्त्र असंं म्हणतात.
 याउलट कर्मचाऱ्यांच तर्कशास्त्र असतं.बहुुतेक कर्मचाऱ्यांना बालपणापासून रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत झोपण्याची, तसेच कुटुंबीय व मित्रमंडळ यांच्यासमवेेत सण उत्सव साजरे करण्याची सवय लागलेली असते.आज आपण ज्यावेळी गाढ झोपेेत आहोत त्याच वेळी पुढे आपल्याला काम करावे लागणार आहे याची जाणीवही कुणाला होत नाही. मात्र तशी वेळ आल्यावर तर्कशास्त्राशी जुळवून घेणे कर्मचाऱ्याला भाग पडते आणि या दोन तर्कशास्त्रांमध्ये संघर्षही घडू शकतो.
 कामाचं तर्कशास्त्र व कर्मचाऱ्यांचं तर्कशास्त्र केवळ काम करण्याच्या वेळेवर अवलंबून असतं असं नाही.तर कामाची जागा, स्वरूप आणि पध्दतीचाही त्यावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ लोखंड वितळविण्यांची भट्टी चालवणाच्या कर्मचाऱ्याला सतत आगीच्या धगीत काम करावं लागतं. अणुऊर्जा केंद्रात करणाऱ्या शास्त्रज्ञाला किंवा तंत्रज्ञाला घातक अशा किरणोत्सर्गी वातावरणात काम करावे लागत.खत,दारूगोळा,तेलशुध्दीकरण केंद्रे, इत्यादी ठिकाणी कामे करणाऱ्या अभियंत्यांना प्रदूषणयुक्त वातावरणाचा सामना करावा लागतो. पोलीस, लष्कर,अग्निशामक दल आदी सेवांमध्ये असणाऱ्यांना तर जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, तर काही जणाना सुबक व निर्धोक जागी काम करण्याची संधी मिळते.
 कर्मचारी बर्याचदा कामाच्या तर्कशास्त्राशी स्वतःला नाईलाजास्तव जुळवून घेतात.तथापि,कामाचं स्वरूप व कर्मचाऱ्यांची मानसिकता यांचा सांधा जुळला नाही तर कर्मचारी मनातल्या मनात कुढत राहतो.कामात त्याचं मन लागत नाही.याचा त्याच्या कामगिरीवर अपरिहार्यपणे परिणाम होतो. परिणामी उद्योगाचं नुकसान होतं.त्यामुळे कामाचं तर्कशास्त्र आणि कर्मचाऱ्याचं तर्कशास्त्र यांचा मेळ बसविणं हे व्यवस्थापनाला स्वीकारावं लागतं.
कर्मचाऱ्यांचे प्रबोधन :
 हा मेळ बसविण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मानसिकतेविषयी व कामाच्या स्वरूपाविषयी प्रबोधन करणे हा होय.आपल्या कामाची वेळ, स्थान किवा वातावरण आदर्श नसलं तरी आपलं काम महत्त्वाचे आहे.आपल्या आर्थिक प्राप्तीकरताच हे काम करावे लागत आहे असं नाही तर ती आपली सामाजिक जबाबदारी आहे.आपण थोडी कळ सोसून ते केलं नाही तर उद्योग व्यवस्थेचेच नुकसान होणार आहे, ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण केली तर अत्यंत कठीण अवस्थेतही तो मनापासून काम करण्यास सक्षम बनतो. प्रबोधनातून अशी भावना निर्माण करणे शक्य होतं. हे प्रबोधन पुढील प्रकारे करता येईल.
 १.कर्मचार्यांकरीता चर्चासत्रं आयोजित करणंं.
 २.अडचणींंच्या वेळी व प्रतिकूल वातावरणात काम करूनही कर्मचाऱ्यांची प्रकृती चांगली कशी राहील याबाबत मार्गदर्शन करणंं.
 ३.वरिष्ठ व्यवस्थापकाने स्वत: दिवसातून थोडा वेळ तरी कर्मचार्यांबरोबर त्याच परिस्थितीत काम करणंं हा एक महत्वाचा उपाय आहे.वरिष्ठ वातानुकुलित खोलीत आरामशीर बसून केवळ हुकूम सोडण्याचंं काम करत असतील तर कर्मचार्याच्या मनात त्यांच्याबद्दल अढी निर्माण होते.मग कर्मचारी शक्य होईल तेव्हा हा राग कामावर काढतो. परिणामी त्याची कामगिरी खालावते.
 ४.प्रतिकूल परिस्थितीत काम करणार्या कर्मचार्यांच्या अडचणींचा, सहानुभूतीपूर्वक विचार करणे. केवळ नियमांवर व कर्मचार्यांकडून कबूल करून घेतलेल्या ‘सहिंस कंडिशन'वर बोट ठेवून त्याला राबवून घेण्याऐवजी कल्पकता दाखवून त्याच्या अडचणी सुसह्य होतील असे उपाय व्यवस्थापनाने योजल्यास कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास दुणावतो. वरिष्ठ अधिकार्यांनी रजा नाकारली म्हणून कनिष्ठ पोलिसांकडून आत्महत्या करण्याचे प्रकार काही वेळ घडतात.त्यात कर्मचार्याचा आततायीपणा असला तरी त्याच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार न करण्याची वरिष्ठांची मनोवृत्तीही अशा प्रकारांना तितकीच कारणीभूत असते.
 तात्पर्य,कामाचे तर्कशास्त्र कर्मचार्याचंं तर्कशास्त्र यांच्यात व परस्पर सहयोग जितका चांगला तितकी कर्मचार्याची व पर्यायाने संस्थेची कामगिरी सरस होते. हे लक्षात घेऊन व्यवस्थापकाने साधक असे उपाय योजले पाहिजेत.