अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/महिलांच्या यशाचे रहस्य
दूर करून यशाच्या मार्गावरून त्यांची वाटचाल, या संबंधी मागच्या लेखात आपण काही मुद्दे जाणून घेतले आहेत. मी स्वतः तसेच इतर अनेक अभ्यासकांनी अनेक यशस्वी महिला व्यवस्थापकांची जीवनपध्दती व कार्यशैली यांचा सविस्तर अभ्यास केला आहे. त्यावरून पुरुष व्यवस्थापकांच्या तुलनेत महिलांची कार्यक्षमता, निर्णयशक्ती, व्यावसायिक चातुर्य व विजिगिषु वृत्ती कुठेही कमी पडत नाही असं दिसून आले आहे. काहीसा धोका पत्करण्याचं धाडस व व्यवहारी चातुर्य यांच्या साहाय्याने महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांप्रमाणेच पराक्रम गाजवू शकतात व या दोन बाबींची आवश्यकता केवळ त्यांनाच नव्हे, तर पुरुष व्यवस्थापकांनाही असते. धोका पत्करणं व युक्तिबाजपणा याखेरीज परुष व स्त्री यांच्यात आपण समजतो तितका गुणात्मक फरक असत नाही असं अभ्यासावरून दिसून येतं.
रॉर्बट टाऊनसेंड या अभ्यासकाने त्याच्या ‘अप द ऑर्गनायझेशन' नामक पुस्तकात यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा असणाच्या महिला व्यवस्थापकांना प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात काही नेमक्या व व्यवहार्य सूचना केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
प्रश्न : कार्यालयात माझ्या बाजूच्याच खुर्चीवर बसणाच्या आणि मी करते तेच काम माझ्या इतक्याच कुशलतेने करणाच्या माझ्या पुरुष सहकाऱ्याला माझ्यापेक्षा ५०
उत्तर : आपली शंका बरोबर असण्याची शक्यता आहे. आपल्या समाजपद्धतीत
पुरुषाच्या कार्यक्षमतेवर अधिक विश्वास टाकला जातो. साहजिकच काम समान असलं
तरी त्याला फायदे जास्त मिळतात, पण आपण ही स्थिती कौशल्याने हाताळली
पाहिजे. प्रथम आपण मन लावून काम करून संस्थेच्या फायद्याची एखादी कामगिरी
करून दाखवावी. साहजिकच तुमचा बॉस तुमचे कौतुक करेल.त्यानंतर शांतपणे
त्याच्यासमोर तुमची बाजू मांडावी. ‘आपण माझे कौतूक केलेत या बद्दल मी आभारी
आहे .पण हे कौतुक माझ्या पगाराच्या चेकमध्ये कुठे आढळून येत नाही. मी माझ्या
कर्तृत्वाने ही परिस्थिती बदलणार आहे, महिला म्हणून मला कोणतीही सवलत किंवा
अतिरिक्त फायदे नकोत, पण माझ्या पुरुष सहकाऱ्याइतकंच काम तेवढ्याच तडफेने
मी करत असल्याने मला मिळणारी परतफेडही तेवढीच असेल यासाठी मी प्रयत्नशील
राहणार आहे, अशा मोजक्या पण नेमक्या शब्दांत तुमचा आत्मविश्वास व भावना
बॉसच्या निदर्शनास आणा. तुमचं काम होण्याची ९० टक्के शक्यता आहे.
प्रश्न : माझा पुरुष बॉस कंपनी सोडून निघाला आहे. त्याच्या जागी माझी नेमणूक होण्याइतकी माझी सर्व बाबतीत पात्रता आहे. पण कंपनीला त्या जागी पुरुषच हवा
आहे, मी काय करावं?
उत्तर : आपण कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांशी संपर्क साधा. रिकाम्या होणाऱ्या
जागेवर काम करण्याची तुमची इच्छा आहे आणि पुरेपूर पात्रताही आहे याची जाणीव त्यांना
करून द्या. हे पद मलाच मिळेल अशी अपेक्षा आहे असं त्यांना कळवा. इतक करूनही
तुम्हाला डावलण्यात आलं, तर मात्र त्याच कंपनीत खितपत राहू नका.तुमची गुणवत्ता
व पात्रता श्रेष्ठ असेल, तर तुम्हाला अधिक मोकळे व न्याय्य वातावरण असणाऱ्या कंपनीत जरूर संधी मिळेल.तो पर्याय स्वीकारण्याची तयारी करा.
प्रश्न : माझ्या कंपनीत मी एकटीच उच्चपदस्थ महिला व्यवस्थापक
सर्व पुरुष आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीचे अध्यक्ष मी उच्चपदस्थ अधिकारी असूनही मला ‘मिनिट्स' नोंदविण्यास सांगतात.हा माझा अपमान नव्हे का?
उत्तर : अपमान वाटून न घेता अध्यक्ष सांगतात त्याप्रमाणे 'मिनिट्स' नोंद करा.पण अशा पध्दतीने की, बैठक कितीही वेळ चालली तरी तुमची मिनिट्स एका पानात
संपली पाहिजेत. यावरून तमचे अध्यक्ष काय ओळखायचं ते ओळखतील.(या मार्गाचा अवलंब करून एका महिला संचालकाने कंपनीचे अध्यक्षपद पटकावल्याची सत्यकथा मला माहीत आहे.)
प्रश्न : माझ्या कंपनीच्या कामासाठी मला काही वेळा रात्री प्रवास करावा लागतो.याबाबत माझे पती व मुले नाराज असतात.
उत्तर : खरं पाहता मुलांपेक्षा पतीच जास्त नाराज असण्याची शक्यता आहे. अशा
वेळी पतीला समजावण्याचा प्रयत्न करा. पण पती अगदीच हट्टाला पेटला असेल तर
तुम्हाला पती किंवा जॉब यापैकी एकाला ‘घटस्फोट’ द्यावा लागेल. असाच निर्णय
घेण्याची वेळ आली तर लक्षात असू द्या की, चांगली कामे मिळणं दुर्मिळ असतं.
चांगले पती डझनावारी मिळतील. (अर्थात हा सल्ला रॉबर्ट टाऊनसेंड याने पाश्चिमात्य
संस्कृतीला अनुसरून दिला आहे. भारतात नवऱ्यांपासून घटस्फोट घेण्याचा विचार
इतक्या तडकाफडकी स्त्री करू शकणार नाही. अशा वेळी पतीला विश्वासात घेऊन.
काम करणं कुटुंबासाठी किती महत्वाचे आहे हे पटवून देऊन त्याचे सहकार्य
मिळविण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो पती व काम दोन्ही सुरक्षित राहतील असं
पाहण्याचा भारतीय महिलांचा कल असतो.)
प्ररन : बरोबर चार वाजता सर्व कामं टाळून माझ्याबरोबर पार्टीला ये असा
आदेश’ माझ्या पतीने दिला आहे पण मला, महत्वाचे काम असल्याने जाणं शक्य
होणार नाही. पतीची आर्थिक प्राप्ती माझ्या पगारापेक्षा बरीच अधिक आहे माझा ‘जॉब’
त्याला केवळ वेळ घालवण्याचे साधन वाटतं, त्याला माझ्या कामाचे महत्त्वंं वाटत
नाही. पण मला मात्र कामाबद्दल प्रेम वाटतं. अशा स्थितीत मी काय करावे?
उत्तर : पार्टीला मुळीच जाऊ नका. तुमची आर्थिक प्राप्ती कमी असली तरी तुमचा स्वाभिमान कमी नाही, हे दर्शवून देणं तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने महत्वाचे आहे
मात्र रात्री घरी आल्यावर पतीची गोड शब्दांत समजूत घाला. त्याच्या मोठेपणाची व उदार
मनोवृत्तीची स्तुती करा. तुमचा पगार कमी आहे हे मान्य करूनही तुमचा जॉब तुमच्या
प्रतिष्टेच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे आणि तुमच्या प्रतिष्ठेमुळे पतीचीही प्रतिष्ठा कशी
वाढते हे जिव्हाकौशल्याने त्याला पटवून द्या. बहुतेक वेळा पतीची नाराजी दूर होते, असा
अनुभव आहे(हा सल्ला भारतीय महिलांनाही पटण्यासारखा आहे.)
वरील प्रश्नोत्तरं केवळ उच्चपदस्थ महिलांसाठी नाहीत तर नोकरी करणाच्या सामान्य महिलांसाठीही उपयुक्त आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की, महिला म्हणून यशस्वी होताना येणाच्या अडचणींचा बाऊ करून दडपणाखाली येण्यापेक्षा त्यावर युक्तीचा वापर फरून सोपे उपाय शोधण्याकडे लक्ष दिल्यास यशाच्या शिखराकडे आपली वाटचाल सुसह्य होऊ शकेल.आम्ही अभ्यासलेल्या अनेक क्षेत्रांत काम करनाऱ्या यशस्वी महिलांच्या यशाचे रहस्य अन्यायाविरुध्द लढण्याच्या मागपिक्षा अशा सरळ साध्या व्यवहारी युक्त्यांमध्ये दडलेले आहे. या दोन्ही लेखांचं सार इतकंच की, महिलांनी आपली प्राथमिकता आधी निश्चित केली पाहिजे व एकदा ती केल्यानंतर स्वीकारलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही सबबी किंवा तयारी न सांगता अथकपणे प्रयत्नशील असले पाहिजे.मग असं लक्षात येईल की, यशस्वी होण्यासाठी ‘पुरुष’ असणेच आवश्यक नाही.