अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ समारोप
समारोप
या विषयाला विशिष्ट अशी मर्यादा नाही. मानवाच्या यच्ययावत सर्व व्यवहारांमध्ये व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. किंबहुना उत्तम व्यवस्थापनाशिवाय कोणत्या ही कार्याची अगर व्यवहाराची यशस्वी सांगता होत नाही. चार माणसांचं (अलीकडचा काळात तर तीनच) छोटे कुटुंब सुखानं चालवायचं असो अगर तीन चार हजार कर्मचारी असलेला असलेला कारखाना किंवा संस्था असो, चालक जितका व्यवस्थापन कुशल तितकं यश अधिक असं सूत्र आहे. व्यवस्थापन ही एक कला तसंच एक शास्त्र आहे. घर,शाळा,महाविद्यालय,कारखाना,सेवा केंद्र, समाजिक संस्था,राजकाय पक्ष दुकान, हॉटेल क्लब, सरकारी कार्यालय, खाजगी अगर सरकारी कंपन्या इत्यादी कोणतीही संस्था असोत आणि यांना अनन्यसाधारण तेथे व्यवस्थापन व्यवस्थापक महत्त्व उद्दिष्टपूर्तीसाठी संस्थेतील बाहेरील घटकांकडून असतेच. संस्थेच्या व विविध शास्त्रशुध्द व नियमबध्द पध्दतीने काम करून घेणे आणि निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य करणे म्हणजे व्यवस्थापन अशी त्याची सर्वसाधारण व्याख्या करता येईल.
याचे दोन भाग आहेत. एक बहिर्गत व्यवस्थापन आणि दोन अंतर्गत व्यवस्थापन संस्था सुरू करण्यापूर्वी व झाल्यानंतर तिच्यासाठी आर्थिक स्रोतांची जुळवाजुळव, कर्मचाच्यांची निवड,साधने अगर यंत्रसामुग्री खरेदी, तयार होणाच्या उत्पादनाचा किंवा सेवेची विक्री, पुरवठादार व ग्राहकांशी संबंध, सरकार व इतर समाज घटकांशी संपर्क इत्यादी काम बहिर्गत व्यवस्थापनाचा एक भाग असतात. तर उत्पादन, त्याच्या गुणवत्तेच संवर्धन, कर्मचाच्यांकडून काम करून घेणं, त्यांनी अधिक व चांगलं काम करावं यासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती, संस्थेच्या विविध विभागांमध्ये चांगला समन्वय व संपर्क इत्यादी जबाबदारी अंतर्गत व्यवस्थापनाची असते. या दोन्हींचा समतोल उत्तम सांभाळणं हे संस्थाप्रमुखाचं काम असतं आणि हे साध्य झाल्यास संस्था यशस्वी होते.
कार्यप्रवणता,सत्यनिष्ठा,संपर्क साधण्याचं कौशल्य,बदल स्वीकारण्याची तयारी,दूरदृष्टी व सहकार्याची भावना ही व्यवस्थापनाची पाच मूलभूत तत्त्वं आहेत.कार्य कोणतंही असो, ते या पाच तत्त्वांत बसवल्यास त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीनं होतं. या लेखमालेच्या विविध लेखांमध्ये आपण बिर्ला,अमूल’चे कुरियन इत्यादी अनेक
व्यक्तींचे संदर्भ घेतले.त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य आभाळाएवढं आहे.आदर्श नेहमी मोठेच असावे लागतात.पण याचा अर्थ असा नव्हे की ,सर्वसामान्यांनी स्वतःला क्षुद्र समजावं. ज्ञानेश्वर म्हणतात,
अर्थ असा, राजहंसाचं चालणे हे जात सर्वात डौलदार व सुंदर समजलं जातं.पण याचा अर्थ असा नव्हे की अन्य कुणी चालूच नये.
तद्वतच व्यवस्थापनाची तत्त्वं केवळ मोठ्यांसाठीच आहेत अस समजण्याचंं काही कारण नाही.बेताचं शिकलेली पण कल्पक अश गृहिणी असते. पतीच्या मर्यादित उपन्नात तिला सुबकपणे संसार करावयाचा असतो. महिन्याच्या पाच तारखेला पतीनं तिला पाच-सहा हजार रुपये दिलेले असतात.पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत
तिला त्यावर संसार चालवायचा असतो.अशा वेळी ती काय करते?
हातात असलेल्या पैशाचं योग्य व्यवस्थापन करते. आवश्यक धान्य,दूध,भाजीपाला,इतर जिनस कुठं स्वस्त मिळतात हे पाहते. मात्र केवळ काटकसर हा उद्देश नसतो.तर वस्तूच्या गुणवत्तेकडे ही लक्ष देत.कोणतेही सामुग्री वायफळ जाऊ दत नाही.गँँस,विजेचा वापर जपून करते. मुलांचे अतिलाड करत नाही. पण शक्यतो त्यांना काही कमीही पडू देत नाही. निवडणं, टिपणं, झाडलोट शक्य स्वतःच करते.मात्र सर्व जबाबदारी आपणच उचलत नाही. मुलांना आणि पतीलाही कधी गोड बोलून तर कधी शिस्तीचा बडगा दाखवून घराची काही कामं करावयास ती भाग पाडते. मुलाच्या अभ्यासाकडी अजिबात दुर्लक्ष होऊ देत नाही.शिळेपाकं उरलंच तर तेही वाया जाऊ देत नाही, इतकंच नव्हे, तर आल्या गेल्या पैपाहुण्यालाही आनंद वाटेल याची खबरदारी घेते. हे करताना काही वेळा तिला स्वतःच्या काही इच्छा माराव्या लागतात. पण ते ती फारसं मनावर घेत नाही आणि एवढंं करूनही महिन्याकाठी चारपाचशे शिल्लक उरले तर तिचा चेहरा प्रफुल्लित झालेला दिसतो.व्यवस्थापन शास्त्राची कुठलीही पदवी न घेताही ती एक कुशल व्यवस्थापक असते.
एखाद्या प्रचंड कारखान्यातील महिना एक लाख रुपये पगार मिळविणारा जबाबदार आणि कर्तव्यपरायण व्यवस्थापक तरी यापेक्षा वेगळे काय करतो? फक्त तो उच्च पदावर असतो,म्हणून मोठा वाटतो इतकंच.सांगायचा मुद्दा असा की,आपलं कार्यक्षेत्र मोठं असो वा लहान, व्यवस्थापनाच्या या तत्त्वांचं चिंतन,मनन आणि अंगीकार केला पाहिजे.व्यवस्थापनावर कोणत्याही विशिष्ट गटाची मालकी नाही.ते सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही पदावरील व्यक्तीनं आपण केवळ कर्मचारी नव्हे तर व्यवस्थापक’ आहोत या भावनेनं काम केल्यास ते अधिक सरस होतं. व्यवस्थापनशास्त्राच्या पैलूचा आपण या लेखमालेतून मागोवा
घेतला आहे.व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वं आपापल्या परीनं सर्वच जण अमलात आणत असतात.तथापि,यालाच 'व्यवस्थापन' म्हणतात, याची जाणीव त्यांना नसते म्हणजेच, त्यांना ही कला लहान-मोठ्या प्रमाणात अवगत असते, पण त्याचं शास्त्र माहीत नसतं.ते समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न आपण केला आहे.या विषयाचा
विस्तार प्रचंड आहे.साहजिकच त्याचे सर्व बारकावे आणि खुब्या यांचा परामर्श घेणं शक्य झालं नसलं तरी या विषयाच्या रुपरेषेशी आपण परिचित झालो आहोत.
अन्य पशूंंपासून आपण वेगळे आहोत याची जाणीव माणसाला झाल्यापासून गेल्या १० हजार वर्षात मानवाने कृषी ते संगणकयुग अशी चौफेर प्रगती केली.विशेषतः औद्योगिक क्रांतीची सुरुवात २०० वर्षांपूर्वी झाल्यानंतर तर या विकासाचा वेेग अधिकच वाढला.या प्रगतीत व्यवस्थापन शास्त्राचा सिंहाचा वाटा आहे.
या कालावधीत मानवजातीनं विकासाचे अनेक टप्पे पार केले.प्रत्येक टप्प्यावर तिनं अनेक नव्या संकल्पना स्वीकारल्या व जन्यांना मूठमाती दिली.‘व्यवस्थापन’ या सर्व टप्प्यांचा साक्षीदार आहे. या प्रवासाचा मागोवाही या लेखमालेतून घेण्यात आला.
वैदिक वाङ्मयात एक प्रार्थना आहे.
अर्थात, असत्य लयाला जावो आणि सत्याचा उत्कर्ष होवो.अंधार नष्ट होवो आणि प्रकाशाचा उदय होवो.मृत्यूची जागा अमरत्व घेवो.या हजारो वर्षांपूर्वीच्या प्रार्थनेत व्यक्त करण्यात आलेल्या आशावादाच्या दिशेनेच आपली वाटचाल सुरू आहे.व्यवस्थापनशास्त्राचे मूळ उद्दिष्ट हेच तर आहे.
व्यवस्थापन क्षेत्रातील शरू रांगणेकर हे मोठे नाव. भारत अन् भारताबाहेरही त्यांनी या क्षेत्रात भरघोस कार्य केले आहे.
अमेरिकन विद्यापीठात व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी तेथेच विविध उद्योगांमध्ये उच्च पदे भूषविली. त्यानंतर ते भारतातील अनेक नामवत आस्थापनांमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. १९७८ साली सेवानिवृत्त झाल्यावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अन् काही प्रतिष्ठित
व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी जवळजवळ पाच हजार व्यवस्थापनविषयक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. एक प्रभावी वक्ता अन् उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. व्यवसायाने केमिकल इंजिनियर अन् उच्चपदस्थ व्यवस्थापक असलेले शरू रांगणेकर मराठी कथाक्षेत्रातही समर्थपणे आपली हजेरी लावत असतात.
भारतातील व्यवस्थापन क्षेत्रातील कितीतरी मजेदार कथा त्यांनी ‘इन द वंडरलँँड ऑफ इंडियन मॅनेजर्स' आणि 'इन द वर्ल्ड ऑफ कार्पोरेट मॅनेजर्स' या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे व्यस्थापन जगतात ती दोन पुस्तकं दीपस्तंभासारखी इच्छूक व्यवस्थापकांना दिशा दाखवत ठामपणे उभी आहेत.
अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची हे नवीन पुस्तक व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक, त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना व रसिकांच्या पसंंतीला नक्कीच उतरेल याची आम्हाला खात्री आहे!
राजेंद्र वाणी
अग्रणी प्रकाशन
औरंगाबाद