एका हलवायाचें दुकान (नाट्यछटा)

<poem>

काय कारट्यांची कटकट आहे पाहा ! मरत नाहींत एकदांची ! - हं, काय म्हटलेंत रावसाहेब ! आपल्याला पुष्कळशीं साखरेची चित्रें पाहिजे आहेत ? घ्या; आपल्याला लागतील तितकीं घ्या. छे ! छे ! भावामध्यें आपल्याशीं बिलकूल लबाडी होणार नाही ! अगदीं देवाची शपथ घेऊन सांगतों कीं, माझ्याजवळ फसवाफसवीचा असा व्यवहारच नाही ! - अग ए ! कोठें मरायला गेली आहे कोणाला ठाऊक ! गप बसारे ! काय, काय म्हणालांत आतां आपण ? हीं साखरेंची चित्रें फार चांगलीं साधली आहेत ? अहो, आपणच काय - पण या दुकानावरुन जाणारा प्रत्येक जण असेंच म्हणतो कीं, हीं साखरेचीं केलेलीं पांखरें - झालेंच तर ही माणसेंसुद्धा ! - अगदी हुबेहुब साधली आहेत म्हणून ! - काय ? मीं दिलेले हे पांखरांवरचे रंग कदाचित् विषारी असतील ? छे हो ! भलतेंच एखादें ! हा घ्या, कावळ्याच्या पंखाचा एक तुकडा आहे, खाऊन पहा ! अहो निव्वळ साखर आहे साखर ! फार कशाला ? हीं सगळीं चित्रें जरी आपल्याच सारखीं जिवंत होऊन नाचायला उडायला लागलीं - तरी देखील यांच्यांत असलेल्या साखरेचा कण - एक कणसुद्धां कमी होणार नाहीं ! रावसाहेब, माझें कामच असें गोड आहे ! - अरेच्या ! काय त्रास आहे पाहा ! अरे पोरट्यांनो, तुम्हीं गप बसतां कीं नाहीं ? का या चुलींत घालून तुम्हा सगळ्यांना भाजून काढूं ? तुमची आई कोठें जळाली वाटतें ? - का हो रावसाहेब, असे गप कां बसलांत ? बोला कीं मग किती चित्रें घ्यायचें ठरलें तें ? ....


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.