मुख्य मेनू उघडा

गणपतीची आरती/नानापरिमळ दुर्वा शेंदूर

< गणपतीची आरती
template error: please do not remove empty parameters (see the style guide and template documentation).

<poem> नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें। लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें। ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे। अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती। तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ॥धृ.॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती। त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती। वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती। सर्वहि पावती अंती भवसागर तरती॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती॥२॥

शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी। कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि। त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी। गोसावीनंदन रत नामस्मरणी। जय देव जय देव जय मंगलमूर्ती॥३॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg