गणपतीची आरती/सुखकारक, दुखहारक, सन्मतिदायक, गणपती मोरया

<poem> सुखकारक, दुखहारक, सन्मतिदायक, गणपती मोरया जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

प्राक्तनातले अरिष्ट नुरवी प्रेमकृपेची धारा झरवी वात्सल्याची वर्षा पुरवी तू गणनायक, सिध्दिविनायक, सुबुध्दिदायक मोरया जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

राग लोभ अज्ञान काननी गुरफटलो मज तार यांतुनी अनन्य भावे शरण तुला मी दे मज स्फूर्ती आणि सन्मती, अंति सद्गती मोरया जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

सर्वसाक्षि तू, तू वरदाता तुजवाचुनि मज कुणी न त्राता क्लेशांमधुनि सोडवि आता मी नतमस्तक करित प्रार्थना हे गजवदना मोरया जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg