गणिताच्या सोप्या वाटा/अपूर्णांक व बीजगणित
अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी वे गुणाकार भागाकार आपण शिकलो आहोत. एक गोष्ट विसरू नका की एखाद्या व्यवहारी अपूर्णांकाने भागाकार म्हणजेच तो अपूर्णाक उलटा करून त्याने गुणाकार करायचा. जसे
49 ÷ 13 = 49 x 31 = 43 किंवा 512÷ 23 = 512 x 32 = 58
या गणितात आणखी एका गोष्टीचा सराव हवा. अपूर्णाकांचे गुणाकार
करताना आपण अंशा अंशाचे व छेदा छेदांचे गुणाकार करतो. अशा वेळी अंश व छेद यांच्या सामायीक अवयवाने अंश व छेद दोघांना भागून संक्षिप्त रूप देता येते म्हणजेच उत्तरातील अपूर्णाक फार मोठ्या आकड्यांचा न ठेवता शक्य तेवढ्या लहान संख्यांचा होतो.
जसे 49 x31 = 4 x 39 अंश व छेद दोघांत 3 हा अवयव आहे, त्याने भागून
- 4 x 39 = 43 हे संक्षिप्त रूप आले.
- 512 x 32 = 5 x 312 x 2 = 54 x 2 = 58 (इथे 3 या सामायिक अवयवाने अंश व छेद यांना भागले)
दोन अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करतांना दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान ठेवून मग अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असते हे विसरू नका.
अधिक व उणे संख्यांचा किंवा धन व ऋण संख्यांचा गुणाकार करताना हे नियम विसरू नका.
(धन) x (धन) = धन, (धन) x (ऋण) = (ऋण)
(ऋण) x (ऋण) = धन, (ऋण) x (धन) = (ऋण)
जसे भागाकार म्हणजे उलटा करून गुणाकार तसेच एखादी बहुपदी वजा करणे म्हणजे चिन्ह बदलून बेरीज करणे हेही लक्षात ठेवा. वेगवेगळ्या बहुपदीसाठी कंस वापरा व एखाद्या बहुपदीचे चिन्ह बदलायचं म्हणजे त्यातील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलायचं हेही विसरू नका. दोन बहुपदींचा गुणाकार करताना कंस वापरा व ते हळू हळू, एका वेळी एक कंस याप्रमाणे सोडवा.
उदा. (m-3n+4) व (2m+n) या दोन बहुपदीचा गुणाकार करा.
(m-3n+4) x (2m+n) हा गुणाकार करताना प्रथम पहिला कंस सोडवू व मग दुसरा.
(m-3n+4) x (2m+n) = m x (2m+n) - 3n x (2m+n) + 4 (2m+n)
= 2m2 +mn - 3n x 2m - 3n x n + 8m+ 4n
= 2m2 +mn - 6mn - 3n2 + 8m + 4n
= 2m2 - 5mn - 3n2 + 8m + 4n इथे - 3n ने 2m+n ला गुणताना कंसातील प्रत्येक पदाला गुणलं आहे तसंच पहिला कंस सोडवून झाल्यावर दुसरा सोडवला आहे. मग सजातीय पदांची बेरीज किंवा वजाबाकी केली आहे. तसंच m2 = mxm किंवा m3= m x m x m इत्यादी लक्षात आहे ना?
आणखी दोन उदाहरणे पाहू.
उदा. 1 (2m + n) चा वर्ग करा म्हणजेच
(2m + n) x (2m + n) हा गुणाकार करा.
(2m+n) x (2m+n) = 2m x (2m+n) + n x (2m+n)
= 4m2 + 2mn + 2mn + n2
= 4m2 + 4mn + n2
उदा. 2 (2a-3b) व (2a-3b+4) यांचा गुणाकार करा
(2a+3b) x (2a-3b+4) = 2a x (2a-3b+4)-3b x (2a-3b+4)
= 4a2–6ab+8a - [6ab-9b2+12b]
(इथे 3b ने कंसातील प्रत्येक पदाला गुणले पण वजा चिन्ह कंसाबाहेर ठेवले)
= 4a2–6ab+8a - 6ab+9b2-12b (आता कंसातील प्रत्येक पद वजा केले)
=4a2-12ab+9b2+8a-12b
सरावासाठी खालील गुणाकार करा.
(1) (x-2) (y-3)
(2) (2x+1) (x+3)
(3) (3a+4b) (2a-b)
(4) (4m-n) (m+7n-8)
मिश्रक्रियांची पदावली : कधी कधी एकाच पदावलीत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी कुठल्याही वेगवेगळ्या क्रिया करायच्या असतात. अशा वेळी कुठली आधी व कुठली नंतर करायची याचा गोंधळ होतो. कारणं असं पहा -
4+3x7-2 या पदावलीत बेरीज आधी केली व नंतर गुणाकार व नंतर वजाबाकी केली तर 7x7-2 व 49-2 = 47 असं उत्तर येतं. पण आधी गुणाकार केला तर त्याच पदावलीचं 4+21-2 = 25-2 = 23 असं उत्तर येतं. म्हणजे वेगळ्या क्रिया आधी केल्या तर उत्तर वेगळं येऊ शकतं यासाठी नियम असा आहे की आधी सगळ्या गुणाकार व भागाकार यांच्या क्रिया डाव्या बाजूपासून करायच्या. नंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे करीत यायचं.
म्हणून 4+3x7-2 = 7x7-2 = 49-2 = 47 हे चूक आहे.
4+3x7-2 = 4+21-2 = 25-2 = 23 हे बरोबर आहे.
आणखी एक उदाहरण पहा - उदा. 8÷7x4+5x2 ही पदावली सोडवा.
आधी 8÷7x4 करू, 8÷7x4 = 87 x 4 = 327 = 447
मग 5x2 = 10 हे सोडवले व पदावलीचे नवे रूप
447 + 10 = 1447 असे उत्तर आहे.
पुनः नियम लक्षात ठेवा : (1) साधारणपणे डावीकडून उजवीकडे गणिती क्रिया करायच्या (2) गुणाकार व भागाकार यांच्या क्रिया आधी करून बेरीज व वजाबाकीच्या क्रिया नंतर करायच्या. सरावासाठी खालील पदावल्या सोडवा.
(1) 5÷2 + 4x3 ÷ 8
(2) 100 - 15 ÷ 5x4 + 8 ÷ 2
(3) 10x2 ÷ 6 + 50 ÷3 -4x2
या पदावल्या सोडवताना गोंधळ होत असल्यास ज्या पदांमध्ये गुणाकार किंवा भागाकार आहे त्या पदांभोवती कंस घालून ते कंस
वेगवेगळे सोडवले तर चूक होत नाही.
उदा. 5÷2 -4x3 + 17x3÷2
या पदावलीत कंस घालून
(5÷2) - (4x3) + (17x3÷2) असे रूप येते.
मग 5÷2 = 212 , 4x3 = 12, 17x3÷2 = 512 = 2512
∴ पदावलीची किंमत (212)- (12) + (2512)
- =12 - 10 + 2512
= 26-10 = 16 असे उत्तर येते.
ज्यावेळी फक्त बेरीज व वजाबाकी एवढ्याच क्रिया उरतात त्यावेळी सर्व धन संख्यांची बेरीज आधी केली तर सोपे जाते. अपूर्णांकाच्या पदावल्या देखील अशाच सोडवता येतात.
उदा. 227 - 27 ÷ 2221 + 53ही पदावली सोडवा,
- 227 - (27 ÷ 2221) + 53 (भागाकार क्रिया असलेल्यापदाभोवती कंस टाकून)
मग 27 ÷ 2221 = 27 x 2122 = 311
∴227 - 27 ÷ 2221 + 53 = 227 - 311 + 53
आता सर्व अपूर्णांकांना 7x11x3 हा छेद ठेवू व पदावलीचे नवे रूप
227 - 311 + 53 = 22x 33 -3x21 +5x777x11x3
=726-63+3857x11x3 = 663+3857x11x3 = 10487x11x3
= 1048231
सरावासाठी खालील पदावल्या सोडवा
(1) 43 - 922 ÷ 311 + 53 x 12
(2) 227 x 411 - 83 - 114 ÷ 17