१६
सुप्त इच्छा

 ती नि मी ओळीतच बसत असू. मी
नवीनच काम करू लागले होते, ती माझ्याआधी
वर्षभर तेथे होती. आमच्यापुढे दर आठवड्याला
निरनिराळे खटले यावयाचे व आम्ही दोघींनी
मॅजिस्ट्रेटच्या साहाय्याने ते चालवायचे असे
चालले होते. ती होती एक इंग्रज मिशनरी बाई.
हिंदुस्थानात तिचे पंचवीस वर्षे आयुष्य गेले होते.
मूळच्या गोऱ्या रंगाला पिवळसर चामड्याची
झाक आली होती. आपण जवळजवळ हिंदीच
आहोत हे दाखविण्यासाठी ती आपल्या पांढऱ्या
केसांच्या सुपारीएवढ्या अंबाड्यावर मोठी
कडक निशिगंधाची वेणी घालायची, कधी कुंकू
लावायची, कधी लुगडेसुद्धा नेसून यायची. ती
कुमारी होती हे सांगायला पाहिजे. पहिल्या-
पहिल्याने सगळे सुरळीत चालले होते- सुरळीत
म्हणजे मी तिच्या भानगडीत न पडता माझ्यापुढे
आलेल्या गोष्टींचा निकाल लावीत असे; पण पुढे
पुढे ते होईना. ती ख्रिस्ती- सर्व कोकरांवर करडी
नजर असलेल्या धर्माची प्रसारक- आणि ज्या
धर्माला सर्वसाधारण प्रमाण लावणे अशक्य आहे
अशी हिंदू मी होते. संन्यासधर्माचा निदान तोंडाने

उदोउदो करणाऱ्या धर्माची ती, तर गृहस्थाश्रमाचे
१२४ / परिपूर्ती
 

चीज करणाऱ्या धर्माची मी. ख्रिस्त हा एकच प्रेषित व त्याचा धर्म सर्वांनी स्वीकारावा असा तिचा अट्टाहास तर कोणी कोणत्या का धर्माचा असेना, मला काय त्याचे, अशी माझी वृत्ती. खरे पाहिले तर तिचा धर्म तिच्याजवळ व माझा धर्म वा मते माझ्याजवळ. दोघींना एकत्र काम करण्यास काहीच हरकत नव्हती. पण हळूहळू आमचे जमेनासे झाले एवढे मात्र खरे.
 त्यांच्या चर्चची एक कार्यकारी बाई होती. तिचे कार्य म्हणजे तिला नेमून दिलेल्या वस्तीतील घरांवर नजर ठेवायची, त्यांच्या घरी वेळीअवेळी जाऊन कुटुंबातील माणसे काय करतात ते पाहून ती बातमी पाद्याला कळवायची. लहान मुलांचे कोर्ट म्हणजे ख्रिस्ती चर्चचा एक विभाग अशी तिची समजूत होतीसे दिसले. दर आठवड्याला ती निरनिराळी मुले कोर्टात आणायची- कोणाचा बाप दारू पितो म्हणून, कोणाची आई भटकते म्हणून, कोणाचे आईबाप भांडतात म्हणून. ह्या हेरगिरीबद्दल दरवेळी तिला माझ्या सहकारिणीकडून शाबासकी मिळे. मी मात्र दरवेळी ह्या खटल्याबद्दल भांडत असे. “अहो, पुण्यात अशा त-हेने घरोघर हिंडले तर इतकी मुले कोर्टात खेचावी लागतील की, १०० मॅजिस्ट्रेट व ५० कोर्ट मिळूनही काम सपणार नाही. का अशा भानगडी तुम्ही आणता?" तिला ते कधी पटायचे नाही. एक दिवस एक जोडपे व एक मुलगी ह्या कार्यकारी बाईने आणला. मी विचारले, “भानगड काय? मुलीला मारझोड होते, का अन्न मिळत नाही, का तिने गुन्हा केला?" "ह्यापैकी काहीच नाही." कार्यकारी बाई म्हणाली, “पण त्यापेक्षाही भयंकर प्रकार आहे. ह्या गृहस्थाचे नाव जोसेफ, हा बाई सेरा, ही दोघेजण अमक्या घरात राहतात व त्यांना हे सात वर्षाचे लेकरू आहे.' नंतर ती माझ्यापुढे वाकली व पुटपुटली, “अहो, त्या दोघांचे लग्न झाले नाही! तिचे सर्वांग शहारले. मी माझ्या सहकारिणीकडे पाहिले, तिचेही तोंड अगदी गंभीर दिसत होते. खटल्यातील इसमाला पुढे बाल मी विचारले, “काय हो, किती वर्षे तुम्ही सध्याच्या घरी राहता? पाच वर्ष?" "मुलगी कितवीत आहे?' "तिसरीत.” “पगार पोटापुरता मिळतो ना?” “हो.” “काही कर्जबिर्ज?" "मुळीच नाही." बाईला विचारले. तिने सांगितले की, “आमचा भांडणतंटा काही नाही." "मग ह्या पोरीला आणले तरी कशाला इकडे? मी त्रासून सहकारी मॅजिस्ट्रेटला विचारले, तर ती मला म्हणते, “म्हणजे? ह्या कोवळ्या निष्पाप अर्भकाला

अशा पातकाच्या खाईत राहू द्यावयाचे की काय! बिनलग्नाच्या अपवित्र
परिपूर्ती / १२५
 

संबंधापासून पापात जन्मलेले हे पोर आता अशा घरात राहणे योग्य नाही. छे! छे:! तिला सरकारने ताब्यात घेऊन आमच्या मिशनच्या बोर्डिंगात ठेवावे. तो माणूस आमच्या मिशनच्या पंथाचाच ख्रिस्ती आहे. पाच वर्षे तो मिशनशेजारीच राहतो व आमच्या चर्चमध्ये येतो आहे; काय लबाड आहे तो! आज त्याच्या गावची बाई आली होती; तिने सांगितले की, त्याचे लग्न झाले नाही म्हणून." आता मी पण हट्टाला पेटले. “मी हा खटला हातात घेणार नाही. ज्या घरी मूल आहे तेथे त्याचे पालनपोषण नीट होत आहे. आईबाप निर्व्यसनी व सुस्वभावी आहेत. केवळ त्यांचे लग्न झाले नाही ह्या भानगडीशी मला कर्तव्य नाही. तुमच्या चर्चतर्फे त्याच्याविरुद्ध काय इलाज करायचा तो करा, पण हिंदी सरकारने लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या संसारात लुडबूड करायला मुलांचे कोर्ट नेमले नाही.” मी निक्षून सांगितले. “दुसरे, तुमची कार्यकारिणी काही कोर्टाची ऑफिसर नव्हे; तिने परत येथे येता कामा नये.' शेवटी दोन-तीन तासांच्या हुज्जतीनंतर ती केस काढून टाकली, पण आमची मने एकमेकांविषयी कलुषित झाली ती कायमची. तिला वाटे, मला नैतिक दृष्टिकोन व धार्मिक भावनाच नाहीत. मला वाटे ते थोडक्यात सांगण्यासारखे नाही, पण ती व तिची कार्यकारिणी अशा दोघीजणी जेव्हा निरनिराळ्या कुटुंबातील भानगडींबद्दल बोलायच्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची हावरी उत्सुकता पाहन मला शिसारी येई एवढ मात्र खरे.
 एकदा आमच्यापुढे एक जरा गुंतागुंतीचा खटला होता. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून नेल्याबद्दल एका तरुण वेश्येवर खटला होता. त्या वेश्येने आपल्या वतीने बॅरिस्टर दिला होता. तिच्यावर गुन्हा शाबीत हाणं कठीणच होते. कारण तिच्याविरुद्ध साक्ष द्यायला कोणी तयार नव्हते. ज्या पोरीला सोडवून आणली होती ती इतकी भेदरलेली होती की, ती काटोपुढे आली की, त्या वेश्येला व तिच्या साथीदारांना पाहून थरथरा कापायची. पोलिसांना ती बाई जामिनावर सोडायची नव्हती. दुसऱ्या दिवशीच्या साक्षी होईपर्यंत ताब्यात ठेवायची होती. बाईला चोवीस तासांपुरते जामिनावर सोडावे म्हणून बॅरिस्टर कोर्टाची विनवणी करीत होते. ती आपली विडा चघळीत मजेत उभी होती. क्षणाक्षणाला क्लार्क, प्रोबेशन ऑफिसर व मॅजिस्टेट ह्यांच्याकडे बघून मंद हास्य चालले होते तिचे.

बॅरिस्टरचे म्हणणे होते की, पोलीस बाईला वाईट वागवतील, बाईमाणूस
१२३ / परिपूर्ती
 

त्यांच्या ताब्यात जाणे बरे नव्हे, वगैरे. इतक्यात खोलीच्या एका कोपऱ्यात कोणी तरुण पोलीस, “गावभवानी तर आहे..." असे काहीसे पुटपुटला. क्षणार्धात कोर्टात भडका उडाला. इतका वेळ आळसट दृष्टीने पाहणारी ती बाई खाडदिशी जागी झाली. ती ताडताड त्या पोलिसाकडे गेली व त्याच्याकडे हात नाचवून तिने त्याच्यावर शिव्यांचा असा भडिमार केला की, बोलून सोय नाही. ती जे बोलली ते ऐकून बिचारा आमचा प्रोबेशन ऑफिसर शरमेने लाल झाला. आमच्या कानावरच्या शिरा सणसणायला लागल्या. शेवटी मॅजिस्ट्रेटने हुकूम केल्यावर, बॅरिस्टरने मध्यस्थी केल्यावर, ती बाई शांत झाली व जणू काय काही झालेच नाही अशा आविर्भावाने परत विडा चघळीत उभी राहिली. मिनिट दोन मिनिटात हा प्रकार झाला. माझ्या मिशनरी सहचारिणीला काय झाले ते कळले, पण ती बाई काय बोलली ते कळणे शक्यच नव्हते. तिने मला विचारले, “काय हो, काय बोलत होती ती?" "छे! छे! ते भाषांतर करण्यासारखे नाही- आणि मला तरी कुठ सगळे कळले आहे ती काय म्हणाली ते!" मी उडवून लावले. त्या बाईला ठेवायचे कुठे असा प्रश्न पडला- तो काय आश्चर्य! माझी सहकारिणी म्हणाली, "हे पाहा, दोन पोलीस पहाऱ्याला देत असाल तर बाई माझ्या बंगल्यात राहू दे." आम्ही सगळी चकित झालो. पण तिचे मनापासून आभार मानून बाई तिच्या स्वाधीन केली.
 दुसऱ्या दिवशी मी आले तो तीही येऊन पोहोचली होती. पुरुष मॅजिस्ट्रेटना यायला अवकाश होता म्हणून आम्ही बोलत बसलो. आज माझ्या सहकारिणीची वृत्ती का कोण जाणे उत्तेजित दिसत होती. डोळ्यात चमक होती, तोंडावर किंचित हसू, किंचित धास्ती, किंचित समाधान असा काही चमत्कारिक मिश्र भाव दिसत होता. तिने आपली खुर्ची माझ्याजवळ ओढली व मला म्हटले, “काय विलक्षण अनुभव! कालची रात्री मी कधी विसरणार नाही!" "म्हणजे? काय झाले?" मी चकित होऊन उदगारले. "अहो, मी रात्रभर त्या वेश्येला माझ्याच खोलीत ठेवली होती..." माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून ती घाईघाईने पुढे म्हणाली, “मीच पोलिसाकडून दसरी खाट आणवली व ही व्यवस्था केली, म्हणजे तिने पोलिसांशी संगनमत करून पळून जायला नको म्हणून.” “मग तिने तुम्हाला शिव्याबिव्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला की काय?" मी काळजीच्या स्वरात विचारले. "छे!

ती जेवून डाराडूर निजली ती सकाळी आठ वाजेपर्यंत. हालवून हालवून जागे
१२६ / परिपूर्ती
 

त्यांच्या ताब्यात जाणे बरे नव्हे, वगैरे. इतक्यात खोलीच्या एका कोपऱ्यात कोणी तरुण पोलीस. “गावभवानी तर आहे...." असे काहासे पुटपुटला. क्षणार्धात कोर्टात भडका उडाला. इतका वेळ आळसट दृष्टाने पाहणारी ती बाई खाडदिशी जागी झाली. ती ताडताड त्या पोलिसाकडे गेली व त्याच्याकडे हात नाचवन तिने त्याच्यावर शिव्यांचा असा भडिमार केला की, बोलून सोय नाही. ती जे बोलली ते ऐकून बिचारा आमचा प्रोबेशन ऑफिसर शरमेने लाल झाला. आमच्या कानावरच्या शिरा सणसणायला लागल्या. शेवटी मॅजिस्टेटने हकूम केल्यावर, बॅरिस्टरन मध्यस्थी केल्यावर ती बाई शांत झाली व जणू काय काही झालेच नाही अशा आविभावाने परत विडा चघळीत उभी राहिली. मिनिट दोन मिनिटात हा प्रकार झाला. माझ्या मिशनरी सहचारिणीला काय झाले ते कळले. पण ती बाई काय बोलली ते कळणे शक्यच नव्हते. तिने मला विचारले. “काय हो, काय बोलत होती ती?' "छे! छे! ते भाषांतर करण्यासारखे नाही- आणि मला तरी कुठे सगळे कळले आहे ती काय म्हणाली ते!" मी उडवून लावले. त्या बाईला पिच कुठे असा प्रश्न पडला- तो काय आश्चर्य! माझी सहकारिणी म्हणाली, “हे पाहा, दोन पोलीस पहाऱ्याला देत असार तर बाई माझ्या बंगल्यात राह दे." आम्ही सगळी चकित झालो. पण तिचे मनापासून आभार मानून बाई तिच्या स्वाधीन केली.
 दुसऱ्या दिवशी मी आले तो तीही येऊन पोहोचली होती. पुरुष मजिस्ट्रेटना यायला अवकाश होता म्हणून आम्ही बोलत बसलो. आज माझ्या सहकारिणीची वृत्ती का कोण जाणे उत्तेजित दिसत होती. डोळ्यात चमक होती, तोंडावर किंचित हस. किंचित धास्ता, किंचित समाधान असा काही चमत्कारिक मिश्र भाव दिसत होता. तिने आपली खुर्ची माझ्याजवळ ओढली व मला म्हटले, “काय विलक्षण अनुभव! कालची रात्री मी कधी विसरणार नाही!" "म्हणजे? काय झाले?" मी चकित होऊन उदगारले. “अहो, मी रात्रभर त्या वेश्येला माझ्याच खोलीत ठेवली होती...." माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहन ती घाईघाईने पुढे म्हणाली "मीच पोलिसांकडून दुसरी खाट आणवली व ही व्यवस्था केली, म्हणजे पोलिसांशी संगनमत करून पळून जायला नको म्हणन." "मग तिने तुम्हाला शिव्याबिव्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला की काय?" मी काळजीच्या स्वरात विचारले. छे!

ती जेवून डाराडूर निजली ती सकाळी आठ वाजेपर्यंत. हाकवून हालवून जागे
परिपूर्ती / १२७
 

करावे लागले तिला." ती थांबली- मी काहीच बोलले नाही, पण माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला तिने उत्तर दिले, “एक सबंध रात्र अशा बाईच्या सहवासात काढणे, म्हणजे विचित्र नाही का? रात्रभर मला झोप आली नाही. कोर्टापुढे तिच्याबद्दल आलेल्या माहितीचा मी विचार करीत होते-" तिने एक दीर्घ श्वास घेतला व मला विचारले, “ह्या खटल्यासाठी आपल्याला तिच्या घरी जाऊन जागा पाहावी लागेल का?" “काही कारण दिसत नाही." मी शक्य तितक्या निर्विकारपणे उत्तर दिले. माझ्या उत्तराने तिच्या चेहऱ्यावर निराशेची एक सूक्ष्म छटा चमकून गेली. सुदैवाने ती बोलली नाही. ती स्वत:च्याच विचारात गुरफटून गेल्यासारखी दिसली. नेहमी तिच्या चेहऱ्यावर स्वत:बद्दल एक प्रकारचा आत्मविश्वास दिसे. चुकलेल्या जगाला सन्मार्ग दाखविण्यासाठी आपला जन्म आहे अशी तिची ठाम समजूत होती. तिने आपले आयुष्य ख्रिस्ताला वाहिले होते व सेंट पीटरच्या वहीत पुण्याच्या सदरात आपल्या नावाने सारख्या रकमा जमा होत आहेत त्याबद्दल तिला शका नव्हती. तिला संसार नव्हता. मग संसारातली सुख-दु:खे ती काय अनुभवणार? पण त्यांच्यात तिला अवीट गोडी वाटत होती. ती इतरांच्या संसारांच्या बारीक-सारीक बाबी अगदी अधाशीपणे ऐकायची.... अर्थात, ते केवळ त्यांना सन्मार्ग दाखविण्यासाठीच असे. ती मला दरवेळी बजावायची. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर केवळ आत्मतुष्टी नव्हती. अमके पुस्तक वाचू नकोस असे सांगितले असताना ते पुस्तक अचानक हाती पडावे, घाईघाईने ते वाचावे, कधी कल्पना नव्हती असे त्यातले काही तरी अर्धवट आपल्याला कळावे- म्हणजे आपली जी मनोवृत्ती होते तशी तिची झाली होती. थोडी शरम, थोडी भिती, अज्ञात प्रदेशात पाऊल घातल्याचा अभिमान असे तर तिला वाटत नसावे? काल रात्री तिला तिच्या उपाशी कौमारहृदयाने त्या वेश्येच्या संगतीत कसली बरे चित्रे रंगविली असतील? माझ्या शब्दांत सांगण्यापेक्षा एक जुनी गोष्टच सांगितलेली बरी.
 ही गोष्ट द्रौपदीच्या जन्माबद्दलची आहे. ती मध्ययुगीन जैन वाङ्मयात आढळते, विलायती फ्रॉईडच्या पूर्वजन्मींच्या भारतीय अवताराने सांगितलेली ती कथा अशी: एका नगरात एका श्रीमान सावकाराला पूईगंधा (कोणी तिचे नाव सुकुमालिया असेही सांगतात.) नावाची अतिरूपवती मुलगी होती. तिच्या रूपाला भाळून पुष्कळांनी तिला मागणी घातली. योग्य

वेळी त्या सावकाराने मोठ्या थाटाने व पुष्कळ पैसा खर्चुन मुलीचे लग्न त्याच
१२८ / परिपूर्ती
 

गावच्या दुसऱ्या एका सावकाराच्या मुलाशी केले. तो श्रेष्ठिपुत्र रात्री शय्यागारातून धावत बाहेर आला व त्याने आपल्या बापाला सांगितले की, "बाबा, ह्या मुलीबरोबर मी राहणे शक्य नाही. हिला हाकलून द्या." ती अभागिनी बिचारी रडत-रडत लग्नाच्या रात्रीच बापाच्या घरी परत आली. बापाने काही दिवसांनी परगावी जाऊन तेथे तिचे लग्न करून दिले, पण परत तोच प्रकार झाला. असे दोन-चारदा झाल्यावर बापही तिच्यावर रागावला व त्याने तिला घराबाहेर काढून लावले. तिच्या रूपाला भाळून पुष्कळ तरुणांनी तिला आसरा दिला. पण पूर्ववत तिला बाहेर पडावे लागले. शेवटी तिने एका जैन साधूचा उपदेश घेतला व ती श्राविका होऊन गावोगाव भिक्षा मागत व जिनाचे चिंतन करीत हिंडू लागली. सरतेशेवटी ती एका गावी आली. तेथे तिने आपल्या कष्टप्रद निष्फळ जीवनाचा त्याग करण्याचा निश्चय केला व जैन संप्रदायाप्रमाणे उपास करण्यास सुरुवात केली. ती अत्यंत क्षीण झाली. त्या गावच्या उद्यानात एका मोठ्या झाडाखाली बसून ती आयुष्याचे क्षण मोजीत होती. इतक्यात शेजारीच तिला मोठ्याने हसणे व बोलणे ऐकू आले. तिच्या क्षीण डोळ्यांना दिसले की, त्या गावची सुप्रसिद्ध रूपवती वेश्या उद्यानात विहार करीत आहे व त्या गावाचे पाच सुस्वरूप तरुण तिच्या प्रसादाचा याचना करीत तिच्याभोवती भुंग्यासारखे घोटाळत आहेत. अभागिनीच्या मनात आले, 'हाय दैवा! तिला एका वेळी पाच मिळावे आणि माझ्या वाट्याला जन्मात एकसुद्धा येऊ नये?' हा विचार तिच्या मनात येतो तोच तिचा प्राण गेला. मात्र मनाच्या सकाम अवस्थेत देहावसान झाल्यामुळे तिला मुक्ती न मिळता तिला पुनर्जन्म मिळाला व ती दोवई म्हणून जन्माला येऊन तिला पाच पती मिळाले.
 आमच्यापुढची ती केस थोडा वेळ चालून थांबली व नव्या केसला सुरुवात झाली. ती होती एका लहान मुलीचीच. तिला बाप व एक लय झालेली बहीण होती. सर्व माणसे होती ख्रिस्ती. बापाने त्या लहान पाराव लग्न करण्याचा घाट घातला होता. पण ख्रिस्ती बहिणीने तिला पळवून नेऊन आमच्यापुढे आणले होते- बाप पोरगी परत मागत होता. मुलगी फार लहान आहे, एवढ्यात लग्न होऊ नये, असे बहिणीचे म्हणणे होते. ती लहान मुलगी आपली हकीकत सांगत होती. सांगता सांगता ती माझ्या सहकारिणाकडे वळून म्हणाली, "हे बघा, आई, मला माझ्या बहिणीनं संग आणल."

माझ्या सहकारिणीला वात्सल्याचे भरते आले. ती आपल्या मिशनरी
परिपूर्ती / १२९
 

मराठीत म्हणाली, “माझ्या लेकरा, सर्व खरं सांग." "बरं का आई, मी तिला इचारलं कशापायी मला नेतीस?"... आमचा प्रोबेशन ऑफिसर मध्येच म्हणाला, “अग, 'आई'- काय चालवलं आहेस? 'बाई' म्हण." माझी सहकारिणी गदगद स्वराने म्हणाली, "छे:! छे:! प्रभूनंच त्या मुलीच्या जिभेला तसं बोलावयास लावलं... प्रभूनंच ही लेकरं मला दिली आहेत." आता वत्सलरसाच्या पाटात सगळे कोर्ट बुडून जाईल ह्या भीतीने मी त्या मुलीच्या बापाला पुढे बोलावले व त्याने सुरुवात केली- “कसं दोन्ही काऱ्यांनी संगनमत केलं, बाई....” केस पुढे चालू झाली. मी माझ्या सहकारिणीला अगदी जैन धर्मीयांप्रमाणे निदान (मरणापूर्वीची तीव्र इच्छा) केले.... “बाई ग, पुढच्या जन्मी पाच पांडवांची राणी नि शंभर कौरवांची आई हो!"