बालमित्र भाग २/करनकरी स्वभावाचे वर्णन
करनकरी स्वभावाचे वर्णन. मनी- तें नाहीं मी करावयाची; अगोदर कांचोळीच शिवीन, ती तिला आवडते. जना०- अगे, कांचोळी अझून बेतली देखील नाहीं; शिवतेस कायर परकराचा चीण राहिला आहे, तेव- ढा शीव, मणजे काम झालें. तुझे चुलत बहिणीचा आज वाढवीस आहे, ह्या करितां तिला तूं परकर शिवूनदे; कांचोळी मी आपल्या जवळची देते. तिला कांही द्यावयास नेल्यावांचन त्वांतिजकडे जाऊंनये, असें मी ह्मणते. मनी- आई, तूं ह्मणतेस ते खरेच आहे; पण मला वाटते की कांचोळी इतक्यांत बोलता बोलतां तया- र होईल. जना- मुलीं, ह्या कामाचा विचार अगोदर कर, तुला ठावके आहे की तुझी भावशी व भावजय मागला प्रहर दिवस राहतां तिकडे जाणार आहेत ९ तुझा जर परकर झाला नाही तर तुला काही त्या आ- पल्या बरोबर नेणार नाहीत. SHRNAL मनी- त्या काही प्रहर दिवस राहतां जाणार नाहीत, चार घटका दिवस राहतां जातलि. जना०- काय पोर इजतखोर पहा! अगे मी इतका जीव तोडून तुला सांगते तरी तं आपले सोडीत नाहीस; हा तुझा वाईट स्वभाव कधी जाईल आणि कधी शुद्धीवर येशील, बाई १ मनी- पण, त्या केव्हां जाणार हे मला जर खचीत र बाळमित्र. ठाऊक असले तर मग ! जना- बरें, बरें, पाहीन आतां; हातच्या कांकणास आरसा कशाला ? आरशाची गोष्ट राहूंदे. पण मा- झी एवढी गोष्ट ऐक; तिसरे प्रहरी त्यां बरोबर जा- वयाला सिद्ध ऐस, मणजे झालें. मनी- असे काय ९ तर पहा, मी कांचोळी शिवून ति- सरे प्रहरीच तयार होऊन बसेन; पण एथे मला काही सुचत नाही; मी आपली बागाच्या बंगल्यां- त जाऊन शिवीत बसते; तेथे मला पावघटका क- मीच लागेल. जना- कशावरून? मनी-तिकडे मी आपली एकटी, दुसन्याची गडबड नाही, आणि उजेडही पुष्कळ आहे. जना०-तूं तिकडे जाण्या येण्याखालीच वेळ गमाव- शील; शाळू दिवस आतां भरकन निघून जाईल. मनी-जाईनाका भेला गेला तर; पहा मी इतक्यांत कशी शिवून तयार करते ती एथल्यापेक्षा तेथे माझे काम दहा वांटे अधिक लौकर होईल. जना०- मी तुला सांगन ठेविते, हें कांहीं शेवटास जाणार नाही. आणि तोही जाणे होणार नाहीं मग हाका मारशील. माझें सांगणे तूं ऐकत नाहीस पण ह्याचे फळ तुला भोगावे लागेल ही खूण गांड बांधून ठेव. मनी- कांही का होईना, मी आपली भोगीन, ही प. करनकरी स्वभावाचे वर्णन. ९५ हा मी आतां धांवत धांवत बागांत जाते. मनी बागाकडे धांवत धांवत गेली. बागांत पोहच- ल्यावर श्वासोश्वास टाकतांगकतां स्वस्थ होण्यास तिला एक घटकाभर उगीच बसावे लागले, नंतर हा- नांत सुई घेऊन शिवं लगली. तों धांवल्यामुळे जो तिच्या हातां पायांस कंप झाला होता त्याचे योगानें तिला टांका देखील मारवेना; शेवटीं आणखी घटकाभर बसून जेव्हां स्वस्थ झाली तेव्हां मग शिवू लागली. शि- वतां शिवतां ते काम अधिकच वाढत चालले असे ति- ला दिसूं लागले, इतक्यांत तिची आई तेथे आली. जना०- एथें फार चांगले शिवणे होत असेल, झा. ली का कांचोळी तयार : मनी०- नाही, अझून झाली नाही. पण दिवस चारच घटका राहिला असें नाहीं, अझून पुष्कळ आहे. जना- तुझें खरेंच आहे पण, तिसरे प्रहरचा चवघडा वाजून गेला. मनी- अझून कांहीं चवघडा वाजला नाही, माझे कान तिकडेसच आहेत. जना०- तर मला कसा ऐकू आला कोण जाणे तु. झ्या मावशीनेही ऐकिला असावा; ती नवे लुगडे नेसून जावयास निघाली आहे, हे तूं आतां पा. हशील. मनी- आई, तूं मला उगीच भिववितीस; इतक्यांत कोठली जावयाला ती. बाळमित्र. जना- तुला सारेच खोटे वाटते. पहा ती आंगावर दागीने घालून शालजोडी पांघरते आहे; ह्या पहा तुझ्या बहिणी आल्या व भाऊ आले. मनी- अहाग आई, आतां कसें करूं, असें पण कसे झाले ९ भाऊ- (आंत येऊन ह्मणतो.) मनुबाई, मनुबाई च. लचल लवकर, मावशी तुजसाठी खोळंबली आहे. मनी- बाबा, अंमळसा दम खा एक क्षणभर. भाऊ- अगे तिसरे प्रहरचा चवघडा तर वाजून गेला; मावशीने जेवते वेळेस सांगितलें नाहीं की चवघडा वाजतांच जावयाचे ह्मणून : चार घटिका दिवस राहतां तिला माघारें आले पाहिजे, कारण की रामराव भाऊची बायको भेटीला येणार आहे. जना-कां, पाहिलें, मने १ मी तुला मघापासून हेच सांगतेना १ मनी- तर मग आतां कसें करूं आई. (मनीच्या तिघी बहिणी आंत येऊन मोठ्याने हाका मारि- तात.) चलचल, लवकर ये. मनी- होहो, पण इतकी उतावळी कां मांडली आहे। भाऊ- काय मने, कांचोळी अझून तयार नाहीं ९ ही पहा, मी आपले चुलत बहिणीला कशी कुंची घे. तली आहे ती. पहिलीबहीण- मी, पहा, तिला जरीकांठी फडकी द्यावयाला घेतली आहे. करनकरी स्वभावाचे वर्णन. ९७ दुसरीबहीण- मी तिला खेळावया करितां मुरती बाहुल्यांचा जोड घेतला आहे. (मावशी आंत येते.) मावशी- मने, ठाऊक नाही तुला मी केव्हां जाणार ती : मी कधी कोणाचा खोळंबा करीत नाही, आणि कोणासाठी खोळंबणारही नाहीं; तुला लवकर यावयाचे असले तर ये, नाही तर बैस घरी. मनी- मावशी, अंमळ थांब, आतां थोडे राहिले आहे माझें शिवणे. मावशी०- (सर्व मुलांस बाहेर चला ह्मणते.) बरें तर मने, आह्मी जातों आतां, तूं बैस शिवीत; तुला का- म आहे ह्मणून आझी तेथे सांगू, (सर्व बाहेर नि- घून जातात.) मनी०- (रडकुंडे तोंड करून ह्मणते.) आतां काय करूं? फार दिवस माझे मनांत होते की, मी आपले बहिणीस सर्वीपेक्षा चांगली देणगी देईन, तें आज सारे व्यर्थ गेलें; मी अवघ्यांमध्ये मोठी असून घरी राहिले, तर मला आतां काय ह्मणतील १ जना०- मला तुझी दया येते खरी, पण तूं माझें कुठे ऐकतेस १ तूं अगोदर परकराचा चीण शिवून मग कांचोळीचे नादी लागतीस, तर इतके कशाला हो- तें. मावशी चार घटका दिवस राहतां जाणार हे जर मनांत न आणतीस, आणि इकडे येण्यांत दोन घटका व्यर्थ न घालवितीस, तर आतां तुला ताड बाळमित्र. खिन्न करावे लागतेना; असो, आतां झालें तें बरेंच झाले; गेल्या गोष्टीचा खेद करून काय फळ९ मनी- पण, माझा काका व काकी मला काय ह्मण. तील ९ त्यांचे मनांत येईल की, तिने काही वाईट काम केले असेल, ह्मणून आईने पाठविली नाही; आणि ह्मणतील, तिला आमचे घरचे कार्याचे मुख नाही, व बहिणीचे कोड कौतुकाची हौस नाही. जना०- त्यांचे मनांत असें येईल हे तुला वाटले नापर मनी- आई, आता आणखी तूं मला शब्दांच्या फांस- प्या मारूं नको. जना०- मने, मी काही तुला लावून बोलत नाही; तूं गेली नाहीस ह्मणून मला देखील वाईट वाटते; पण काय करूं १ असो, तुझें समाधान व्हावयाजोगी म- ला कांहीं यक्ति सुचली आहे. मनी- तर बरें आहे आई, मी ही इतक्यांत कांचोळी शिवून तयार करितें, तूंनि मी तशी मागून जाऊं; माझी कांचोळी पाहून काका काकी फार आनद पावतील, आणि ह्मणतील की, ही ह्याच कामांत हो- ती ह्मणून हिला इतका उशीर लागला; तर आई, तूं बासनांतून नवे लुगडे काढतीस तंव मी इतक्यांत कांचोळी तयार करिते. जना०- मी नाही जावयाची, निलाजऱ्या सारखें मागून जाणे फार वाईट आहे. हा तुझा करनकरी करनकरी स्वभावाचे वर्णन. ९९ स्वभाव तुझ्या मावशीला आवडला नाही, ह्मणून ती तुला टाकून गेली; पण आतां माझें ऐक; तिकडे जाण्यांत जे तुला सुख मिळावयाचें तें इकडे राहि- ल्यानेच अक्षयी मिळेल, अशी कांहीं युक्ति सांगते. मनी०- ती कोणती, आई १ जना० अगे, युक्ति हीच की, आजपासून तूं हा वाईट स्वभाव टाकून दे, आपल्याच हेक्याने वागत जाऊं नको; आई बापांचे काही ऐकत जा, कांकी त्यांना तुजपेक्षा अधिक समजतें; ह्यांत तुझें कल्याण आहे, आणि त्यांच्या सांगीप्रमाणे वागावयास काही फा रसे अवघड नाही; तूं शहाणी आहेस ह्मणून तुला सांगते. मनी०- बरें आई, मी आजपासून तुझ्याच शिकवणी. प्रमाणे वर्तेन. जना०- फार चांगले आहे; सोमवारापावेतों हा तु- झा करनकरी स्वभाव सुटला, ह्मणजे तुला मी आ- पले बरोबर तुझे काकीकडे नेईन; परकर व कां- चोळी तुजकडून तुझ्या बहिणीस नेसवीन; तेव्हां मग त्यांस बाटेल की, परकर कांचोळी तयार नव्ह- ती झणून पोर आली नाही. मनी०- ( गहिवरून ह्मणते. ) आहा, आई, तुझे शि- कवणीची गोष्ट मी कधी विसरणार नाही. जना- शाबास मने! माझे सांगणे तुझ्या मनांत ठस- ले एवढ्याने मलाही फारच आनंद वाटतो; तूं